Tuesday 4 October 2016

पहिला समुल्लास

पहिला समुल्लास

 ईश्वर नाम व्याख्या

             ओ३म् शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्वर्य्यमा ।
               शन्नSइन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुरुक्रमः ॥
        नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि । त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि। तन्मामवतु तद्वक्तारमवतु । अवतु मामवतु वक्तारम् । ओ३म् शांतिशशांतिशशांतिः ॥१॥ तैप्रपा७ । अनु१.

     ईश्वर ओ३म् ची संक्षिप्त व्याख्या

 अर्थ :- (ओ३म्) हा ओंकार शब्द परमेश्वराचे सर्वोत्तम नाव आहे. कारण यात जे अ, , आणि म् ही तीन अक्षरे मिळून एक ( ओ३म् ) समुदाय बनला आहे. या एका नावातून परमेश्वराची अनेक नावे उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, अकारापासून विराट, अग्नि आणि विश्व आदि. उकारापासून हिरण्यगर्भ, वायु आणि तैजस आदि. मकारापासून ईश्वर, आदित्य आणि प्राज्ञ आदि नावांचा वाचक व बोधक आहे. वेदादि सत्य शास्त्रांमध्ये त्याची अशीच स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. त्यावरून प्रकारणानुसार ही सर्व नावे परमेश्वराचीच आहेत.

(प्रश्नपरमेश्वराहून भिन्न अर्थांची वाचक विराट आदि नावे का नाहीतब्रह्माण्डपृथ्वी आदि भूतइन्द्रादि देवता आणि वैद्यक शास्त्रातील सूंठ वगैरे औषधी वनस्पतींचीही ही नावे आहेत की नाही?
(उत्तर) आहेतपरंतु ती परमेश्वराची ही नावे आहेत.

(प्रश्नकेवळ देवांचे ग्रहण या नावांनी तुम्ही करता की नाही?
(उत्तर) तुम्ही ग्रहण करता याला काय आधार आहे?

(प्रश्नसगळे देव प्रसिद्ध व उत्तम ही आहेत म्हणून हे मी मान्य करतो.
(उत्तर) परमेश्वर अप्रसिद्ध आणि त्याहुनही उत्तम असा कोणी आहे काय ? मग ही नावे परमेश्वराचीही आहेत असे तुम्ही का मानत नाही परमेश्वर अप्रसिद्ध नाही आणि त्याच्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाहीतेंव्हा त्याच्याहून उत्तम कोणी कसा असू शेकेल म्हणून तुमचे हे विधान बरोबर नाही. कारण तुमच्या या विधानात अनेक दोष आहेतउदाहरणार्थ"उपस्थितं परित्यज्याSनुपस्थितं याचत इति बाधितन्याय:" एकाने दुसऱ्यासाठी खाण्याचे पदार्थ ठेवून त्याला सांगितले की "तुम्ही जेवण कराअशा वेळी ते खाद्यपदार्थ तसेच टाकून ती दूसरी व्यक्ति न मिळालेल्या अन्नासाठी इकडेतिकडे भटकू लागली तर तिला शहाणा समजू नयेकारण तो जवळ असलेला तयार पदार्थ सोडून अनुपस्थित म्हणजेच अप्राप्त पदार्थाच्या प्राप्तिसाठी प्रयत्न करतोम्हणून जसा तो पुरुष बुद्धिमान नव्हे तसेच हे तुमचे विधान शहाणपणाचे नव्हेकारण तुम्ही विराट आदि नावांनी प्रसिद्ध व प्रमाणसिद्ध परमेश्वराचा व ब्रह्माण्ड आदि उपस्थित अर्थांचा त्याग करून असंभव व अनुपस्थित देवादींचे ग्रहण करण्यासाठी श्रम करता. यामध्ये कसलेही तर्क (औचित्य) नाहीजर तुम्ही असे म्हणाल की, "जेथे ज्याचा संबंध असेल तेथे तेच ग्रहण करणे योग्य असते." उदाहरणार्थएकाने दुसऱ्याला सांगितले कीहे भृत्य ! त्वं सैन्धवमानय म्हणजे, हे नोकरा तू सैन्धव घेवून ये." तेंव्हा त्याने काळ वेळ व प्रसंग यांचा विचार केला पाहिजेकारण सैन्धव हे दोन वस्तुंचे नाव आहे. घोडा आणि मीठ या दोघांनाही सैन्धव असे नाव आहे. मालकाची बाहेर जाण्याची वेळ असल्यास घोडा आणि जेवणाची वेळ असल्यास मीठ आणणे उचित होयपरंतु बाहेर जाण्याच्या वेळी मीठ आणि जेवणाच्या वेळी नोकर घोडा घेऊन आला तर मालक क्रुद्ध होऊन त्याला म्हणेल, "तू मुर्ख आहेसतुला काळ वेळ समजत नाहीतेवढा विवेक तुझ्या ठिकाणी असता तर ज्यावेळी जी वस्तु आणावयास हवी तीच तू आणली असतीसप्रसंग कोणता आहेयाचा विचार तू करायला हवा होतासपण तो तू केला नाहीसम्हणून तू मुर्ख आहेसतू चालता हो." या वरून हेच सिद्ध झाले की जेथे जो अर्थ घेणे योग्य असेल तेथे तोच अर्थ घेतला पाहिजेआपण सर्वांनी असेच मानले व कलेही पाहिजे.

॥ अथ मन्त्रार्थ ॥

ओं खम्ब्रह्म ॥१॥ यजु४०। मं.१७
'ओ३म्आदि नावे सार्थक आहेतउदाहरणार्थ (ओं खं.) 'अवतीत्योम् आकाशमिव व्यापकत्वात् खम्सर्वेभ्यो बृहत्वाद् ब्रह्म म्हणजे रक्षण करण्याने (ओम्)आकाशा प्रमाणे व्यापक असल्याने (खम्) आणि सर्वांहून मोठा असल्याने ( ब्रह्म ) ईश्वराचे नाव आहे. ॥१॥
पहावेदादि शास्त्रांमध्ये खालील प्रकारणांमध्ये 'ओम्आदि परमेश्वराची नावे आहेत.

ओमित्येतदक्षरमुद्गीथमुपासीत ॥२॥ छान्दोग्य उपनिषद् प्रपा१। खं१ । मं
(ओमित्ये.) ओ३म ज्याचे नाव आहे आणि जो कधी नष्ट होत नाही त्याचीच उपासना करणे उचित होयइतरांची नाही. ॥२॥
ओमित्येतदक्षरमिदँ सर्वं तस्योपव्याख्यानम् ॥३॥ माण्डूक्य.मं.
(ओमित्येत.) सर्व वेदादि शास्त्रांमध्ये परमेश्वराचे प्रमुख व स्वतः चे नाव ओ३म् हे असल्याचे सांगितले आहेइतर सर्व नावे गुणवाचक आहेत. ॥३॥

सर्वे वेदा यत्पादमामानंति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योमित्येतत् ॥४॥ कठोपनिषद् वल्ली २ । मं.१५
(सर्वेवेदा.)ज्या अर्थी सर्व वेद, सर्व धर्मानुष्ठानरूप तपश्चरण ज्याचे कथन करतात आणि मान्यता देतात, ज्याच्या प्राप्तीची इच्छा बाळगूण ब्रह्मचर्याश्रमाचे पालन करतात त्याचे नाव ओ३म् आहे॥४॥

प्रशासितारं सर्वेषामणियांसमणोरपि ।
रुकमाभं स्वप्नधिगम्यं विद्यात्तं पुरुषं परम् ॥५॥ मनु१२ । श्लोक १२२
(प्रशासिता) जो सर्वांना उपदेश देणारासूक्षमाहून-सूक्ष्मस्वप्रकाश-स्वरूपसमाधिस्त बुद्धिने जाणण्यास योग्य आहे त्याला परम पुरुष समजले पाहिजे.॥५॥

एतमग्निन् वदंत्येके मनुमन्ये प्रजापतिम् ।
इंद्रमेके परे प्राणामपरे ब्रह्म शाश्वतम् ॥६॥ मनु१२। श्लोक १२३.
तो स्वयं प्रकाश असल्याने 'अग्नि', विज्ञानस्वरूप असल्याने 'मनु', सर्वांचे पालन करणारा असल्याने 'प्रजापति ', आणि परम ऐश्वर्यवान असल्याने 'इंद्र', सर्वांच्या जीवनाचे जीवन असल्याने 'प्राणआणि निरंतर व्यापक असल्याने त्या (परमेश्वराचे) नाव 'ब्रह्मआहे॥६॥

स ब्रह्मा स विष्णुस रुद्रस्स शिवस्सोSक्षरस्स परमः स्वराट् । 
स इंद्रस्स कालाग्निस्स चंद्रमाः ॥७॥ कैवल्य उपनिषद्.
(स ब्रह्मा स विष्णुः) परमेश्वर हा सम्पूर्ण जग निर्माण करणारा असल्याने तो 'ब्रह्माआहेसर्वव्यापी असल्याने 'विष्णु', दुष्टांना शिक्षा करून रडवितो म्हणून 'रूद्र', मंगलमय व सर्वांचे कल्याण करणारा म्हणून 'शिवआहे. 'सर्वमश्नुते न क्षरति न विनश्यति तदक्षरम्' 'यः स्वयं राजते स स्वराट्.' 'योSग्निरिव कालः कलयिता प्रलयकर्ता स कालमग्निरिश्वरः (अक्षर) जो सर्वत्र व्याप्तअविनाशी (स्वराट्स्वतः प्रकाशस्वरूप आणि (कालाग्निप्रलयाच्या वेळी सर्वांचा काळ आणि काळाचाही काळ आहेम्हणून परमेश्वराचे नाव कालाग्नि आहे. ॥७॥

इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्यस्स सुपर्णो गरुत्मान ।
एकं सद्विप्रा बहुधा वदंत्यग्निन् यमं मातरिश्वानमाहु॥८॥
(इन्द्रं मित्रं.) जो एक अद्वितीय सत्यब्रह्म वस्तु आहे त्याचीच इंद्रादी सर्व नावे आहेत. 'द्युषु शुद्धेषु पदार्थेषु भवो दिव्य:', 'शोभनानि पर्णानि पालनानि पूर्णानि कर्माणि वा यस्य सः', 'यो गुर्वात्मा स गरुत्मान्', 'ये मातरिश्वा वायुरिव बलवान् स मातरिश्वा', (दिव्य) जो प्रकृत्यादि दिव्य पदार्थांमध्ये व्याप्त (सुपर्णआहे, जो उत्तम पालन करतो आणि ज्याची कर्मे पूर्ण आहेत(गरुत्मान्)ज्याचा आत्मा अर्थात स्वरूप महान आहेजो मातरिश्वा वायुसारखा अनंत बलवान आहेम्हणून परमेश्वराला दिव्यसुपर्ण, गरुत्मान आणि मातरिश्वा ही नावे आहेतइतर नावांचे अर्थ पुढे सांगणार आहोत. ॥८॥

भूरसि भूमिरसिदितिरसि विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्री ।
पृथिवीं यच्छ पृथिवीं दृ ह पृथिवीं मा हिँ सीः ॥९॥ यजु१३। मं १८.
(भूमिरसि.) 'भवन्ति भूतानि यस्यां सा भूमि:' जिच्यामध्ये सर्व प्राणिमात्र राहतातम्हणून ईश्वराचे नाव 'भूमिआहेइतर नावांचे अर्थ नंतर सांगणार आहोत॥९॥

इन्द्रो मह्ना रोदसी पप्रथच्छव इन्द्रः सूर्य्यमरोचयत् ।
इंद्रे ह विश्वा भुवनानिर्येमिर इंद्रे स्वानास इन्दवः ॥१०॥ सामउत्तरार्चिक प्रपा७ । तृतीयार्थ त्रिक ८ । मं
(इन्द्रो मह्न.) या मंत्रात इंद्र हे परमेश्वराचेच नाव आहेम्हणून हे प्रमाण उद्धृत केले आहे॥१०॥

प्राणाय नमो यस्य सर्वमिदं वशे ।
यो भूतः सर्वस्येश्वरो यस्मिन्त्सर्वं प्रतिष्ठितम् ॥११॥ अथर्व. कां११ । सू४। मं.
(प्राणाय) ज्या प्रमाणे प्राणाच्या स्वाधीन सर्व शरीर व इंद्रिये असतात त्या प्रमाणे सारे जग परमेश्वराच्या स्वाधीन असते॥११॥

इत्यादि प्रमाणांचे (पुराव्यांचे) अचूक अर्थ जाणून घेतल्याने या नावांद्वारे परमेश्वराचेच ग्रहण होते. कारण ओ३म् आणि अग्नि नावांच्या मुख्य अर्थाने परमेश्वराचेच ग्रहण होते. ज्या प्रमाणे, व्याकरण, निरुक्त, ब्राह्मण, सूत्र इत्यादि ऋषी मुनींनी जे विवरण केले आहे त्यांमध्ये परमेश्वराचेच ग्रहण केलेले दिसते त्या प्रमाणे सर्वांनी ग्रहण करणे योग्य आहे. परंतु ओ३म् हे केवळ परमेश्वराचेच नाव आहे. अग्नि आदि नावांनी परमेश्वराचे ग्रहण करण्यामध्ये प्रकरण (वर्णन) व विशेषणही नियमकारक आहेत. यावरून हे सिद्ध झाले की, जेथे-जेथे स्तुति, प्रार्थना, उपासना, सर्वज्ञ, व्यापक, शुद्ध, सनातन, व सृष्टिकर्ता आदि विशेषणे आली आहेत तेथे-तेथे या नावांनी परमेश्वराचे ग्रहण होते. आणि जेथे-जेथे अशी वर्णने येतात की,

ततो विरादजायत विराजो अधि पुरुष॥१॥ यजु३१ । मं ५.
श्रोत्राद्वायुश्र्च मुखादग्निरजायत ॥२॥ यजु३१ । मं १२.
तेन देवा अजयंत ॥ यजु३१ । मं ९.
पश्चाद्भूमिमथो पुरः ॥ यजु३१ । मं ५
तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशसम्भूतआकाशद्वायु:। वायोराग्नि। अग्नेराप। अदभ्यपृथिवी । पृथिव्या  ओषधयः । औषधिभ्योSन्नम् । अन्नाद्रेत। रेतसपुरुष। स वा एष पुरुषो अन्नरसमय
हे वचन तैत्तिरीय उपनिषदातील आहे.
           अशा प्रमाणांमध्ये विराट, पुरुष, देव, आकाश, वायु, अग्नि, जल, भूमि इत्यादि नावे लौकिक पदार्थांची असतात. कारण जेथे-जेथे उत्पत्ति, स्थिति, प्रलय, अल्पज्ञ, जड (अचेतन) दृश्य इत्यादि विशेषणेसुद्धा लिहिलेली असतील तेथे-तेथे परमेश्वराचे ग्रहण होत नाही. तो उत्पत्ती वगेरे व्यवहारांपासून वेगळा आहे आणि वरील मंत्रांमध्ये उत्पत्ति वगैरे गोष्टी आहेत म्हणून तेथे विराट आदि नावांनी परमेश्वराचे ग्रहण न होता लौकिक पदार्थांचे ग्रहण होते. परंतु जेथे-जेथे सर्वज्ञ आदि विशेषणे असतील तेथे-तेथे परमेश्वराचे आणि जेथे-जेथे इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख, आणि अल्पज्ञ, आदि विशेषणे असतील तेथे-तेथे जीवाचे ग्रहण होते, असे सर्वत्र समजावे. कारण परमेश्वराचा जन्म अथवा मृत्यु कधी होत नसतो. म्हणून विराट आदि नावांनी त्याचे आणि जन्म वगैरे विशेषणांनी जगतातील जड इत्यादि पदार्थांचे ग्रहण करणे उचित होय, परमेश्वराचे नव्हे. आता ज्या प्रकारे विराट आदि नावांनी परमेश्वराचे ग्रहण होते तो प्रकार खाली लिहिल्या प्रमाणे समजून घ्यावा.

॥ ओंकाराचा अर्थ ॥

(‘वि’) उपसर्गपूर्वक (राजृ दीप्तौ) वा धातूला क्विप्‌ प्रत्यय लावल्याने विराट्’ शब्द बनतो, ‘यो विविधं नाम चराऽचरं जगद्राजयति प्रकाशयति स विराट्’ ' विविध महणज जो अनेक प्रकारच्या जगाची निर्मिती करतो तो विराट. म्हणन विराट्’ या नावाने परमेश्वराचे ग्रहण होते.

(अञ्चु गतिपूजनयोः) (अगअगिइण् गत्यर्थक) धातु आहेत त्यांच्यापासून 'अग्नीहा शब्द तयार होतो. गतेस्त्रयोऽर्थाः ज्ञानं गमनं प्राप्तिश्चेतिपूजनं नाम सत्कारः।’ ‘योऽञ्चतिअच्यतेऽगत्यंगत्येति सोऽयमग्निः’ जो ज्ञानस्वरूपसर्वज्ञजाणण्यासप्राप्त होण्यास वे पूजा करण्यास योग्य आहे. म्हणून त्या परमेश्वराचे नाव अग्निआहे.

(विश प्रवेशने) या धातुपासून विश्व शब्द बनतो. विशन्ति प्रविष्टानि सर्वाण्याकाशादीनि भूतानि यस्मिन् । यो वाऽऽकाशादिषु सर्वेषु भूतेषु प्रविष्टः स विश्व ईश्वरः’ ज्यामध्ये आकाशादि सर्व भूते प्रवेश करीत आहेत अथवा जो यांमध्ये व्याप्त होऊन प्रविष्ट होत आहे. म्हणून त्या परमेश्वराचे नाव विश्व आहे. इत्यादि नावांचे ग्रहण अकारमात्राने होते.

ज्योतिर्वै हिरण्यं, (शांत.६।७।१।२) तेजो वै हिरण्यमित्यैतरेयशतपथब्राह्मणे(तै.ब्रा.८।१।९।१) ‘यो हिरण्यानां सूर्यादीनां तेजसां गर्भ उत्पत्तिनिमित्तमधिकरणं स हिरण्यगर्भः’ ज्यामध्ये सूर्यादि तेजस्वी लोक उत्पन्न होऊन ज्याच्या आधारे राहतात अथवा जो सूर्यादि तेज:स्वरूप पदार्थाचा गर्भ अर्थात नाव उत्पत्तिस्थान व निवासस्थान आहेम्हणून त्या परमेश्वराचे नाव  हिरण्यगर्भ’ आहे. याला यजुर्वेदाच्या मंत्राचा आधार आहे :-

हिरण्यगर्भः समवर्त्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् ।
स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधमे ।।
इत्यादि ठिकाणी 'हिरण्यगर्भशब्दाने परमेश्वराचे ग्रहण केले जाते.

(वा गतिगन्धनयोः) या धातूपासून 'वायुशब्द बनतो. (गन्धनं हिसनम्) यो वाति चराऽचरञ्जगद्धरति बलिनां बलिष्ठः स वायुः’ जो चराचर जगाचे धारणजीवन आणि प्रलय करतो आणि सर्व बलवानांहून बलवान आहे. म्हणुन त्या ईश्चराच नाव वायुआहे.

(तिज निशाने) या धातूपासून 'तेज:शब्द बनतो व त्याचे तद्धित केल्याने तैजस’ शब्द तयार होतो. जो स्वतः स्वयंप्रकाश आणि सूर्यादि तेजस्वी लोकांना प्रकाशमान करणार आहे. म्हणून त्या ईश्वराचे नाव 'तैजसआहे. इत्यादि नामार्थ उकारमात्रापासून ग्रहण होतात.

(ईश ऐश्रर्य) या धातृपासून 'ईश्नरशब्द तयार होतो, ‘य ईष्टे सर्वैश्वर्यवान् वर्त्तते स ईश्वरं:’ ज्याचे सत्य विचारशीलज्ञान व अनंत ऐश्वर्य आहेयामुळे त्या परमेश्वराचे नाव ईश्वर आहे.

(दो अवखण्डने) वा धातूपासून 'अदितिआणि त्याचे तद्धित केल्यावर 'आदित्यशब्द तयार होतो. न विद्यते विनाशो यस्य सोऽयमदितिःअदितिरेव आदित्यः’ ज्याचा विनाश कधीही होत नाही त्याच ईश्वराला आदित्य असे म्हणतात.

(ज्ञा अवबोधने) या धातूच्या आधी 'प्रलावल्याने 'प्रज्ञशब्द बनतो. त्याचे तद्धित रूप 'प्राज्ञअसे होते. यः प्रकृष्टतया चराऽचरस्य जगतो व्यवहारं जानाति स प्रज्ञःप्रज्ञ एव प्राज्ञः’ जो निर्भ्रात ज्ञानयुक्त सर्व चराचर जगाचे व्यवहार पाठवत जाणतोम्हणून ईश्वराचे नाव 'प्राज्ञआहे. इत्यादि नामार्थ मकराने ग्रहण होतात. या ठिकाणी जसे एका-एका मात्रेने तीन-तीन अर्थ व्यक्त केले आहेत. तसेच अन्य नामार्थही ओंकारापासून जाणले जातात.

(शन्नो मित्रः शंव.) या मंत्रात जी मित्रादि नावे आहेत ती ही परमेश्वराचीच आहेत. कारण, स्तुति, प्रार्थना, उपासना ही श्रेष्ठाचीच केली जाते. जो गुण, कर्म, स्वभाव आणि सत्य -सत्य व्यवहारांमध्ये सर्वांहून अधिक असतो त्याला श्रेष्ठ असे म्हणतात. त्या सर्व श्रेष्ठांमध्येही जो अत्यंत श्रेष्ठ आहे त्याला परमेश्वर म्हणतात. ज्याची तुलना कशाशीही होत नाही, ना झाली, ना होईल. त्याच्या बरोबरीचाच कोणी नाही तर त्याच्याहून अधिक श्रेष्ठ कोण कसा असणार परमेश्वराचे सत्य, न्याय, दया, सर्वसामर्थ्य आणि सर्वज्ञत्व यांसारखे जे अनंत गुण आहेत तसे गुण इतर कोणत्याही जड (अचेतन) पदार्थात अथवा जीवात नाहीत. जो पदार्थ सत्य आहे त्याचे गुण, कर्म, स्वभाव ही सत्य असतात. म्हणून मनुष्यांनी परमेश्वराचीच स्तुति, प्रार्थना व उपासना करावी हे योग्य होय, याहून वेगळे कधी करू नये. कारण ब्रह्मा, विष्णु, महादेव नावाचे पूर्वज महाशय विद्वान, दैत्य-दानवादि निकृष्ट मानव आणि इतर सामान्य माणसे यांनीही परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याचीच स्तुति, प्रार्थना व उपासना केली. त्याच्याशिवाय दुसऱ्याची केली नाही. तसे आपण सर्वांनी करणे योग्य आहे. याची विशेष चर्चा मुक्ति आणि उपासना या विषयात करण्यात येईल.

(प्रश्न) मित्रादि नावांवरुन इन्द्रादि देवांचे प्रसिद्ध व्यवहार पाहिल्यास त्यांचेच ग्रहण केले पाहिजे.
(उत्तर) येथे त्यांचे ग्रहण करणे योग्य नाही. कारण जो माणूस कुणा एकाचा मित्र असतो तोच दुसऱ्या कुणाचा शत्रु असतो आणि एखाद्याच्या बाबतीत तो उदासीन असतो, असे दिसून येते. म्हणून मुख्यार्थामध्ये सखा आदिचे ग्रहण होऊ शकत नाही. परंतु परमेश्वर हा साऱ्या जगाचा निश्चित मित्र असतो. तो कुणाचा शत्रु नाही अथवा कुणाच्या बाबतीत तो उदासीन ही असत नाही. परमेश्वराखेरीज इतर कोणताही जीव अशाप्रकारे असू शकत नाही. म्हणून येथे परमेश्वराचेच ग्रहण होऊ शकते. तरी पण गौण अर्थाने मित्रादि शब्दांपासून सुहृदादि मनुष्यांचे ग्रहण होते.

(त्रिमिदा स्नेहने) या धातूपासून औणादिक 'क्तप्रत्यय लागुन 'मित्रशब्द बनतो. 'मेद्यति स्निह्यति स्निह्यते वा स मित्रःजो सर्वांशी स्नेह करतो आणि सर्वांनी प्रेम करण्यास योग्य असतो तो मित्रम्हणून त्या परमेश्वराचे नाव 'मित्रआहे.

(वञ् वरणे, वर ईप्सायाम्) या धातूंपासून 'उनन्प्रत्यय लागून वरुण शब्द बनतो 'यः सर्वान् शिष्टान् मुमुक्षुन्धरमात्मनो वृणोत्यथवा यः शिष्टैर्मुमुक्षुभिर्धर्मात्माभिर्व्रियते वर्यते वा स वरुणः परमेश्वरःजो आप्तयोगी, विद्वान, मुक्तिची इच्छा बाळगणारे व धर्मात्मा यांचेकडून ग्रहण केला जातो, अथवा जो शिष्ट, मुमुक्षु, मुक्त व धर्मात्मा यांच्याकडून ग्रहण केला जातो त्या ईश्वराला 'वरुणअसे म्हणतात. किंवा 'वरुणो नाम वरः श्रेष्ठ:' परमेश्वर सर्वांत श्रेष्ठ आहे म्हणून त्याचे नाव 'वरुणआहे.

(ऋ गतिप्रापणयो:) या धातूपासून 'यत्प्रत्यय लागुन 'अर्य्यशब्द तयार होतो. आणि 'अर्य्यपूर्वक (माङ्माने) या धातूला 'कनिन्प्रत्यय लागून 'अर्यमाशब्द तयार होतो.  'योSर्य्यान् स्वामिनो न्यायाधिशान् मिमिते मान्यान् करोति सोSर्यमा. 'जो सत्य न्याय करणाऱ्या मनुष्यांना स्वीकारार्ह वाटतो आणि पाप व पूण्य करणाऱ्यांना पापाची व पुण्याची फळे यथावत देणारा सत्य-सत्य नियमकर्ता आहेम्हणूनच त्या परमेश्वराचे नाव 'अर्यमाआहे.

(इदि परमैश्वर्ये) या धातूला रन्’ प्रत्यय लागून इन्द्र’ शब्द तयार होतो. य इन्दति परमैश्वर्यवान् भवति स इन्द्रः परमेश्वरः’ जो अखिल ऐश्वर्ययुक्त आहेम्हणून त्याचे नाव इन्द्र आहे.

  'बृहत्शब्दपूर्वक (पा रक्षणे) या धातूपासून 'डतिप्रत्यय लागून, बृहत् मधील तकाराचा लोप व सुडागम होऊन 'बृहस्पतिशब्द बनतो. 'यो बृहतामाकाशादिनां पतिस्वामी पालयिता स बृहस्पति:'  मोठ्याहून मोठा आणि मोठ्या आकारादि ब्रह्मांडांचा स्वामी आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'बृहस्पति' आहे.

(विष्लृ व्यापतौ) या धातूला 'नुप्रत्यय लागून 'विष्णुशब्द बनला आहे'वेवेष्टि व्याप्नोति चराऽचरं जगत् स विष्णुः' परमात्मा चर आणि अचर जगाला व्यापून राहिल्यामूळे परमेश्वराचे नाव 'विष्णु' आहे.

'उरुर्महान् क्रमः पराक्रमो यस्य स उरुक्रमः' अनंत पराक्रम युक्त असल्याने परमेश्वराचे नाव 'उरुक्रमआहे. जो परमेश्वर (उरुक्रमः) महापराक्रम युक्त (मित्रः) सर्वांचा सुहृद अविरोधी आहे तो (शम्) सुखकारक, तो (वरुणः) सर्वोत्तम (शम) सुखस्वरूप तो (अर्यमा) न्यायाधीश, तो (शम्) सुखप्रचारकं, तो (इन्द्रः) (शम्) सकल ऐश्वर्यदायक, तो (बृहस्पतिः) सर्वांचा अधिष्ठाता (शम्) विद्याप्रद आणि (विष्णुः) जो सर्वांमध्ये व्यापक परमेश्वर आहे तो (नः) आमचा कल्याणकर्ता (भवतु) होवो.

(वायो ते ब्रह्मणे नमोऽस्तु) (बृह बृहि वृध्दौ) या धातूंपासून 'ब्रह्मशब्द बनला आहे. जो सर्वांवर विराजमान आहे, सर्वांहून मोठा, अनंत बलयुक्त परमात्मा आहे त्या ब्रह्माला आम्ही नमस्कार करतो. हे परमेश्वरा (त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि) तूच अंतर्यामी रुपाने प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. (त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि) मी तुम्हालाच प्रत्यक्ष ब्रह्म म्हणेन कारण तुम्ही सर्वत्र व्याप्त असून सर्वांना नेहमीच प्राप्त असता. (ऋतं वदिष्यामि) तुमची वेदस्थ यथार्थ आज्ञा आहे तिचाच मी सर्वांना उपदेश करीन व आचरण ही करीन(सत्यं वदिष्यामि) मी सत्य बोलेनसत्य मानीन व सत्यच करीन(तन्मामवतु) म्हणून तुम्ही माझे रक्षण करावे. (तद्वक्तारमवतु) म्हणून आप्तनिष्ठ (आप्त) व सत्यवक्ता असणारा माझे तुम्ही रक्षण करावे. ज्यायोगे तुमच्या आज्ञेमध्ये माझी बुद्धि स्थिर होऊन त्या विरुद्ध कधी न होवो. कारण जी तुमची आज्ञा आहे तोच धर्म आहे आणि तिच्या विरुद्ध जे आहे तोच अधर्म आहे. 'अवतु मामवतु वक्तारम्हा दुसऱ्यांदा आलेला पाठ अधिक अर्थ देण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, 'कश्चित् कश्चित् प्रति वदति त्वं ग्रामं गच्छ गच्छया वाक्यात क्रियेचा उच्चार दोनदा केल्याने तू लौकर गावाला जा असे स्पष्ट होते. त्याच प्रमाणे येथेही आहे. तुम्ही माझे अवश्य रक्षण करा. अर्थात् मी सुनिश्चितपणे धार्मिकतेत वागावे व नेहमी अधर्माचा तिरस्कार करावा, अशी कृपा तुम्ही माझ्यावर करावी. मी तुमचे खूप उपकार मानीन.

(ओ३म् शान्तिः शान्तिः शान्तिः) येथे तीनदा शांतीपाठ केला आहे. त्याचे प्रयोजन असे की ताप त्रिविध आहेत. म्हणजे या जगात तीन प्रकारची दुःखे आहेत :- (१ ) 'आध्यात्मिक’, आत्मा व शरीरातील अविद्या, प्रिति, द्वेष, मुर्खता आणि ज्वर, पीडा इत्यादि आध्यात्मिक दुःखे होत. दुसरे 'आधिभौतिकजे शत्रू, व्याघ्र, सर्प वगैरे द्वारे मिळते. तिसरे 'आधिदैविकम्हणजे अतिवृष्टी, कडाक्याची थंडी व भयंकर उन्हाळा आणि मनाची व इंद्रियांची अशांती यांमुळे होणारी दुःखे. या तीन प्रकारच्या क्लेशांपासून तुम्ही आम्हाला दूर ठेवतआणि नेहमी कल्याणकारक कामांमध्ये प्रवृत्त करावे. कारण तुम्हीच कल्याणस्वरूप  साऱ्या जगाचे कल्याण करणारे आणि धार्मिक मुमुक्षूंना कल्याण प्रदान करणारे आहात. म्हणून तुम्ही स्वतः आपल्या करुणेने सर्व जीवांच्या हृदयात प्रकाशित व्हा. ज्यायोगे सर्व जीव धर्माचे आचरण करतील, अधर्माचा त्याग करुन, परमानंदाला प्राप्त होतील आणि दुःखांपासून दूर राहतील.
'सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च'- यजु७ मं४२ 
यजुर्वेदातील या वचनावरून जगत म्हणजे जे प्राणी चेतन व जंगम (म्हणजे चालणारे-फिरणारे) आहेत आणि 'तस्थुषःजे अप्राणी म्हणजे स्थावर, जड अर्थात पृथ्वी आदि आहेत त्या सर्वांचा आत्मा असल्याने सर्वांना प्रकाश देतो म्हणून त्याचे नाव 'सूर्यआहे.

(अत सातत्यगमने) या धातूपासून (आत्मा) शब्द बनतो. 'योऽतति व्याप्नोति स आत्माजो सर्व जीवादि जगतामध्ये निरंतर व्यापक होत आहे. 'परश्चासावात्मा च य आत्मेभ्यो जीवेभ्यः सुक्ष्मेभ्यः परोऽतिसूक्ष्मः स परमात्मा'. जो सर्व जीवांहून उत्कृष्ट आणि जीव, प्रकृति तसेच आकाश यांच्याहूनही अति सुक्ष्म, तसेच सर्व जीवांचा अंतर्यामी आत्मा आहे. म्हणून ईश्वराचे नाव 'परमात्मा' आहे.

सामर्थ्यवानाचे नाव ईश्वर आहे. 'य ईश्वरेषु समर्थेषु परमः श्रेष्ठः स परमेश्वरः' जो ईश्वरांमध्ये म्हणजे समर्थांमध्ये समर्थ आहेज्याच्या समान कोणीही नाही त्याचे नाव 'परमेश्वर' आहे.

(षुञ् अभिषवेषूङ्प्राणीगर्भविमोचनेया धातूपासून 'सविताबनतो. 'अभिषवः प्राणिगर्भविमोचनं चोत्पादनम् । यश्चराचरं जगत् सुनोति सूते वोत्पादयति स सविता परमेश्वरः ' जो साऱ्या जगाची उत्पत्ती करतो म्हणून परमेश्वराचे नाव 'सविताआहे.

(दिवु क्रीडाविजीगीषाव्यवहारद्युतिस्तुतिमोदमदस्वप्नकान्तिगतिषु) या धातूपासून 'देवशब्द बनतो. (क्रीडा) जो शुद्ध सर्व जगताला क्रीडा करविण्याच्या (विजिगीषा) धार्मिकांचा विजय व्हावा असे इच्छिणारा (व्यवहार) सर्व व्यवहारांची साधने-उपसाधने देणारा आहे, (द्युति) स्वयंप्रकाशस्वरूप, सर्वांचा प्रकाशक, (स्तुति) प्रशंसेस योग्य, (मोद) स्वतः आनंद स्वरूप व इतरांना आनंद देणारा, (मद) मदोन्मत्तांना ताडना करणारा, (स्वप्न) सर्वांच्या निद्रेसाठी रात्र व प्रलय निर्माण करणारा, (कान्ति) कामना करण्यास योग्य, आणि (गति) ज्ञानस्वरुप आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'देवआहे. अथवा 'यो दीव्यति क्रीडति स देव:' जो आपल्या स्वरूपात आनंदाने स्वतःच क्रीडा करतो किंवा कुणाच्याही साह्याशिवाय क्रीडावत् सहज स्वभावाने साऱ्या जगाची निर्मिती करतो, अथवा सर्व क्रीडांचा आधार आहे. 'विजिगीषते स देवःजो सर्वांना जिंकणारा, स्वतः अजय म्हणजे ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा आहे. व्यवहारयति स देवः जो न्याय व अन्यायरूपी व्यवहार जाणणारा व उपदेशक आहे. 'यश्चराचरं जगत् द्योतयतिजो सर्वांचा प्रकाशक आहे. 'यः स्तूयते स देवःजो सर्व मनुष्यांकडून प्रशंसा करण्यास योग्य आहे व निंदा करण्यास योग्य नाही, 'यो माद्यति स देवःजो सदा हर्षित, शोकरहित आणि इतरांना आनंदित करणारा व दुःखांपासून दूर ठेवणारा आहे. 'स्वापयति स देव:' जो प्रलयाच्या वेळी अव्यक्तामध्ये सर्व जीवांना झोपवितो. 'यः कामयते काम्यते वा सदेवः'. ज्याची सर्व कामे सत्य असतात आणि ज्याच्या प्राप्तीची कामना सर्व सभ्य लोक करतात. तसेच 'यो गच्छति गम्यते वा स देवः'. जो सर्वांमध्ये व्याप्त व जाणण्यास योग्य आहे, त्यामुळे त्या परमेश्वराचे नाव 'देवआहे.

(कुबि आच्छादने) या धातूपासून 'कुबेरशब्द बनतो. 'यः सर्वं कुंबति स्वव्याप्ताच्छादयति स कुबेरो जगदीश्वरःजो आपल्या व्यापकतेने सर्वांना व्यापतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'कुबेर आहे.

(पृथु विस्तारे) या धातूपासून 'पृथिवी(पृथ्वी) शब्द बनतो. 'य पर्थतिसर्वंजगद्विस्तृणाति तस्मात् स पृथिवी'. जो सर्व विस्तृत जगाचा विस्तार करणारा आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'पथिवी' आहे.

(जल घातने) या धातूपासून 'जलशब्द तयार होतो. 'जलति घातयति दुष्टान् संघातयतिअव्यक्तपरमाण्वादिन तद् ब्रह्म जलम्'. जो दुष्टांना दंड देतो आणि अव्यक्त व परमाणु यांचा एकमेकांशी संयोग अथवा वियोग करतो त्या परमेश्वराला 'जलअसे म्हणतात.

(काश्रृ दीप्तौ ) या धातूपासून 'आकाश शब्द बनतो. 'यः सर्वतः सर्वं जगत् प्रकाशयति स आकाशःजो सर्व बाजूंनी जगाचा प्रकाशक आहे म्हणून त्या परमेश्वराचे नाव आकाश आहे.

(अद् भक्षणे) या धातूपासून 'अन्न' शब्द तयार होतो.
अद्यतेSत्ति च भूतानि तस्मादन्नम् तदुच्यते । तै/
अहमन्नमहमन्नमहमन्नम् ।
अहमन्नादोSहमन्नादोहमन्नाद॥ तैत्तिउपनि/१०
अत्ताचाराSचरग्रहणात् ॥ वेसू//
   हे व्यासमुनिकृत शारीरिक सूत्र आहे. जो सर्वांना स्वतःमध्ये ठेवण्यास, सर्वांना ग्रहण करण्यास योग्य चराचर जगाचे ग्रहण करणारा आहे, यावरून ईश्वराला 'अन्न', 'अन्नाद'  आणि 'अत्ताही नावे आहेत. यामध्ये एक पाठ जो तीनदा आलेला आहे, तो आदर व्यक्त करण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे उंबर फळात उत्पन्न होणारे किडे त्यातच राहतात व नष्ट होतात, त्याप्रमाणे परमेश्वरामध्ये सर्व जगाची अवस्था असते.

(वस निवासे) या धातूपासून 'वसु’ शब्द बनला आहे. 'वसन्ति भूतानि यस्मिन्नथवा यःसर्वेषु भूतेषु वसति स वसुरीश्वरःज्याच्यामध्ये सर्व आकाशादि भूते वसतात आणि जो सर्वांमध्ये वास करीत आहेम्हणून त्या परमेश्वराचे नाव 'वसुआहे.

(रुदिर् अश्रु विमोचने) या धातूला 'णिच्प्रत्यय लागून 'रूद्रशब्द तयार होतो. 'यो रोदयत्यन्यायकारिणो जनान् स रुद्रःजो दुष्ट कृत्ये करणाऱ्यांना रडवितो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'रूद्र' आहे.

  यन्मनासा ध्यायति तद्वाचा वदति, यद्वाचा वदति, तत् कर्मणा करोति, यत् कर्मणा करोति तदभिसम्पद्यते ॥ 
हे यजुर्वेदाच्या ब्राह्मण ग्रंथाचे वचन आहे. जीव ज्याचे मनाने ध्यान करतो ते वाणीने बोलतो, जे वाणीने बोलतो ते कृतीने करतो, जे कृतीने करतो तेच त्याला प्राप्त होते. यावरून असे सिद्ध झाले की जीव जसे कर्म करतो तसेच फळ त्याला मिळतेजेंव्हा दुष्ट कर्म करणारे जीव ईश्वराच्या न्यायरूपी व्यवस्थेमुळे दुःख रूपी फळ मिळवतात तेंव्हा रडतात. याच प्रकारे ईश्वर त्यांना रडवितो, म्हणून ईश्वराचे नाव 'रूद्र' आहे.

आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नरसूनव
ता यदस्यायनं पूर्वं तेन नारायणः स्मृतः ॥ मनु१ । श्लोक १०.
जल आणि जीव यांचे नाव नारा आहे. ती ज्याची निवासस्थाने आहेत,  म्हणून सर्व जीवांमध्ये व्यापक असलेल्या परमेश्वराला 'नारायण' म्हणतात.

(चदि आल्हादे) या धातूपासून 'चंद्रशब्द बनतो. 'यश्चन्दति चंदयति वा स चन्द्रःजो आनंदस्वरूप व सर्वांना आनंद देणारा आहे, म्हणून ईश्वराचे नाव 'चंद्र' आहे.

(मगि गत्यर्थक) या धातूपासून 'मङ्गेरलच्या सूत्राने 'मंगलशब्द तयार होतो. 'यो मङ्गति मङ्गयति वा स मङ्गल:' जो स्वतः मंगलस्वरूप आणि सर्व जीवांच्या मंगलाचे कारण आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव मंगल आहे.

(बुध अवगमने) या धातूपासून 'बुध शब्द बनतो. 'यो बुध्यते बोधयति वा स बुधःजो स्वतः बोधस्वरूप व सर्व जीवांच्या बोधाचे कारण आहे. म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'बुध' आहे.

'बृहस्पतिशब्दाचा अर्थ या पूर्वी सांगितला आहे.
(ईशुचिर् पूतीभावे) या धातूपासून 'शुक्रशब्द बनला आहे. 'यः शुच्यति शोचयति वा स शुक्र:'. जो अत्यंत पवित्र आहे आणि ज्याच्या संगाने जीवसुद्धा पवित्र होतो, म्हणून ईश्वराचे नाव 'शुक्र आहे.

(चर गतिभक्षणयो:) या धातूपासून 'शनैस्अव्यय उपपद लावल्याने 'शनैश्चरशब्द बनला आहे. 'यः शनैश्चरति स शनैश्चर:'. जो सर्वांमध्ये सहज प्राप्त, धैर्यवान आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'शनैश्चर' आहे.

(रह त्यागे) या धातूपासून 'राहुशब्द बनतो. 'यो रहति परित्यजति दुष्टान् राहयति त्याजयति स राहुरीश्वरः'. जो एकान्तस्वरूप आहे, ज्याच्या स्वरुपात दूसरा पदार्थ मिसळलेला नाही, जो दुष्टांना सोडणार व इतरांना सोडविणारा आहे. म्हणून परमेश्वराचे नाव 'राहु' आहे.

(कित निवासे रोगापनये च) या धातूपासून 'केतुशब्द बनतो. 'य केतयति चिकित्साति वा स केतुरीश्वरः'. जो सर्व जगाचे निवासस्थान आहे, सर्व रोगांपासून रहित आहे आणि मुमुक्षूंना मुक्तीच्या वेळी सर्व रोगांपासून सोडवितो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'केतु' आहे.

(यज देवपूजासङ्गतिकरणदानेषु) या धातूपासून 'यज्ञशब्द बनतो. 'यज्ञो वै विष्णुःहे ब्राह्मण ग्रंथातील वचन आहे. 'यो यजति विद्विद्भिरिज्यते वा स यज्ञ:' जो सर्व जगातील पदार्थांना जोडतो, सर्व विद्वांनांना पूज्य आहे, आणि ब्रह्मा पासून सर्व ऋषिमुनींना पूज्य होता, आहे व असेल, म्हणून त्या परमेश्वराचे नाव यज्ञ आहे. कारण तो सर्वत्र व्यापक आहे.

(हु दानाSSदनयोः आदाने चेत्येके) या धातूपासून 'होताशब्द बनला आहे. 'यो जुहोति स होताजो जीवांना देण्यास योग्य पदार्थांचा दाता आणि ग्रहण करण्यास योग्य पदार्थांचा ग्राहक आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव 'होताआहे.

(बन्ध बंधने) यावरून 'बंधुशब्द बनतो. 'यः स्वस्मिन् चरचारं जगत् बध्नाति बन्धुवद्धर्मात्मनां सुखाय सहायो वा वर्तते स बन्धु:' ज्याने स्वतः मध्ये सर्व लोकांतरांना नियमांनी बद्ध करून ठेवले आहे व जो भावाप्रमाने सहायक आहे म्हणूनच ते आपापल्या परिधीचे अथवा नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. ज्याप्रमाणे भाऊ भावांना साह्य करतो त्या प्रमाणे परमेश्वरही पृथ्वी आदि लोकांचे धारण, रक्षण आणि सुख देणारा त्याला 'बंधू' म्हणतात.

(पा रक्षणे) या धातूपासून 'पिताशब्द बनला आहे. 'यः पाति सर्वान् स पिताजो सर्वांचे रक्षण करतो, ज्या प्रमाणे बाप आपल्या संतानांवर नेहमी कृपा करून त्यांची उन्नति इच्छितो, त्याच प्रमाणे परमेश्वर सर्व जीवांची उन्नती इच्छितो, म्हणून त्याचे नाव पिता आहे.

'यः पितृणां पिता स पितामहः', जो पित्यांचा ही पिता आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'पितामह(आजोबा) आहे
'यः पितामहानां पिता स प्रपितामह: 'जो पित्यांच्या पितरांचा पिता आहे, म्हणून परमेश्वराचे नाव 'प्रपितामह(पणजोबा) आहे. माङ्गमाने शब्दे च या वरून माता शब्द सिद्ध होतो.

'यो मिमिते मानयति सर्वाञ्जीवान् स माताज्याप्रमाणे पूर्णकृपायुक्त जननी आपल्या संतानांचे सुख व उन्नती इच्छिते त्याप्रमाणे परमेश्वरही सर्व जीवांची उन्नती इच्छितो, म्हणून परमेश्वराचे नाव माता आहे.

(चर गतिभक्षणयो:) आङ्गपूर्वक या धातूपासून आचार्य शब्द बनतो. 'य आचारं ग्राहयति, सर्वा विद्या बोधयति स आचार्य ईश्वरः', जो सत्य आचाराचा ग्रहण करणारा आणि सर्व विद्यांच्या प्राप्तिचा हेतु बनून सर्व विद्या मिळवून देतो, म्हणून परमेश्वराचे नाव 'आचार्यआहे.

(गृ शब्दे) या धातूपासून 'गुरुशब्द बनला आहे. 'यो धर्म्यान् शब्दान् गृणात्युपदिशति स गुरु:'. 'स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् ॥( योगसूत्र १/२६ ) जो सत्यधर्मप्रतिपादक, सकल विद्यायुक्त, वेदांचा उपदेशक, सृष्टीच्या प्रारंभी अग्नि, वायु, आदित्य, अंगिरा आणि ब्रह्मा आदि गुरुंचाही गुरु आहे व ज्याचा नाश कधी होत नाही, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'गुरु' आहे.

(अज गतिक्षेपणयो:, जनी प्रादुर्भावे) या धातूंपासून 'अजशब्द बनतो. 'योSजति सृष्टिं प्रति सर्वान् प्रकृत्यादिन् पदार्थान् प्रक्षिपति जनयति, कदाचिन्न जायते सोS:'. जो सर्व प्रकृतीचे अवयव आकाशादि भूत परमाणूंचे यथायोग्य मिश्रण करतो, शरीराशी जीवांचा संबंध जोडून जन्म देतो, पण स्वतः मात्र कधी जन्म घेत नाही, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'अज' आहे.

(बृह बृहि वृध्दौ) या धातुंपासून 'ब्रह्माशब्द तयार होतो. 'योSखिलं जगन्निर्माणेन बर्हति वर्द्धयति स ब्रह्मा'. जो सम्पूर्ण जगाला रचून वाढवितो, म्हणून परमेश्वराचे नाव ब्रह्मा आहे.

'सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्मं( तै/१ ) हे तैत्तरीय उपनिषदातील वचन आहे. 
'संतीति सन्तस्तेषु सत्सु साधु तत्सत्यम् । यज्जानाति चराSचरं जगत्तज्ज्ञानम् । न विद्यतेSन्तोSवधिर्मर्यादा यस्य तदनंतरम् । सर्वेभ्यो बृहत्वाद् ब्रह्म'.  जे पदार्थ आहेत त्यांना सत् म्हणतात. त्यांमध्ये साधू असल्याने परमेश्वराचे नाव 'सत्यआहे. तो सर्वांचा जाणणारा आहे, म्हणून परमेश्वराचे नाव 'ज्ञानआहे. ज्याचे अंत अवधी, मर्यादा म्हणजे तो इतका लांब, रुंद, लहान, मोठा असे परिणाम नाही म्हणून परमेश्वराचे नाव 'सत्, ज्ञान व अनंत अशी आहेत.

(डु दाञ् दाने) आङ्पूर्वक या धातूपासून 'आदिआणि 'नञ्पूर्वक 'अनादिहे शब्द बनतात. 'यस्मात् पूर्वं नास्ति परं चास्ति स आदितिरित्च्युते' ‘न विद्यते आदिकारणं यस्य सोSनादिरीश्वर:' ज्याच्या आधी काही नसते आणि नंतर असते त्याला आदि म्हणतात. ज्याचे आदि कारण काहीही नाही म्हणून परमेश्वराचे नाव 'अनादिआहे.

(टुनदि समृध्दौ) आङ्पूर्वक या धातूपासून 'आनंदशब्द बनतो. 'आनन्दति सर्वे मुक्ता यस्मिन् यद्वा यः सर्वाञ्जीवानानंदयति स आनंद:'. जो आनंदस्वरूप आहे, ज्यात सर्व मुक्त जीव आनंदाला प्राप्त होतात आणि जो सर्व धर्मात्मा जीवांना आनंदयुक्त करतो म्हणून ईश्वराचे नाव 'आनंद' आहे.

(अस भुवि) या धातूपासून 'सत् शब्द बनतो. 'यदस्ति त्रिंषु कालेषु न बाध्यते तत्सद् ब्रह्म'. जो सदा विद्यमान असतो, म्हणजे भूत, भविष्य व वर्तमान या तीन्ही काळांमध्ये त्याचा बाध होत नाही, म्हणून त्या परमेश्वराला 'सत्' म्हणतात.

(चिती संज्ञाने) या धातूपासून 'चित्त्शब्द बनतो. 'यश्चेतति चेतयति संज्ञापयति सर्वान् सज्जनान् योगिनिस्तच्चित्परं ब्रह्मजो चेतनस्वरूप आहे, सर्व जीवांना सावधान करणारा व सत्यासत्य जाणणारा आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'चित्', आहे. या तीन्ही शब्दांच्या विशेषणांमुळे परमेश्वराला 'सच्चिदानन्दस्वरूप' म्हणतात.

'यो नित्य ध्रुवोSचलोSविनाशी स नित्य'जो निश्चल अविनाशी आहे, म्हणून तो 'नित्यशब्द वाचक ईश्वर आहे.

(शुन्ध शुध्दौ) या पासून 'शुद्धशब्द बनतो. 'यः शुन्ध्यति सर्वान् शोधयति वा स शुद्ध ईश्वरः', जो स्वतः पवित्र, सर्व अशुद्धींपासून मुक्त आणि सर्वांना शुद्ध करणारा आहे, म्हणून त्या ईश्वराचे नाव 'शुद्ध' आहे.

(बुध अवगमने) या धातूला 'क्तप्रत्यय लागून 'बुद्ध', शब्द बनतो. 'यो बुद्धवान् सदैव ज्ञाताSस्ति स बुद्धो जगदीश्वरः'. जो सर्वांना जाणणारा आहे, म्हणून ईश्वराचे नाव 'बुद्ध' आहे.

(मुच्लृ मोचने) या धातूपासून 'मुक्तशब्द बनतो. 'यो मुञ्चति मोचयति व मुमुक्षुन् स मुक्तो जगदीश्वरः', जो सर्वदा अशुद्धींपासून दूर असतो आणि सर्व मुमुक्षुंची क्लेशांपासून सुटका करतो, म्हणून परमेश्वराचे नाव 'मुक्त' आहे. 'अत एव नित्यशुद्धबुद्धमुक्त स्वभावो जगदीश्वरः'. यामुळेच परमेश्वराचा स्वभाव नित्य, शुद्ध, बुद्ध व मुक्त आहे.

निर् आणि आङ्पूर्वक (डुकृञ् करणे) या धातूपासून निराकार शब्द बनतो. 'निर्गत आकारात्स निराकारःज्याला कोणताही आकार नाही आणि जो कधी शरीर धारण करत नाही, म्हणून परमेश्वराचे नाव 'निराकार' आहे.

(अञ्जू व्यक्तिम्लक्षणकांतिगतिषु) या धातूपासून 'अञ्जनशब्द आणि निर् उपसर्ग लागल्याने 'निरञ्जनशब्द बनतो. 'अञ्नं व्यक्तिर्म्लक्षणं कुकामइन्द्रियैप्राप्तिश्चेत्यस्माद्यो निर्गतपृथगभूतस निरञ्जन:' जी व्यक्ति अर्थात आकृति, म्लेंच्छाचार, दुष्ट कामना आणि चक्षुरादि इंद्रियांच्या विषयांच्या मार्गापासून दूर आहे, म्हणून ईश्वराचे नाव 'निरञ्जन' आहे.

(गण संख्याने) या धातूपासून 'गणशब्द बनतो. याच्या पुढे, 'ईशकिंवा 'पतिहे शब्द लावल्यास 'गणेशव  'गणपतिहे शब्द बनतात. 'ये प्रकृत्यादि जडा जीवाश्च गण्यन्ते संख्यायन्ते तेषामीशस्वामी पतिपालको वाजो प्रकृत्यादि जड (अचेतन) आणि सर्व जीव प्रख्यात पदार्थांचा स्वामी अथवा पालन करणारा आहे म्हणून त्या ईश्वराचे नाव 'गणेश' किंवा 'गणपती' आहे.

'यो विश्वमीष्टे स विश्वेश्वर: ' जो जगाचा अधिष्ठाता आहे म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'विश्वेश्वर' आहे. 'यः कूटेSनेकविधव्यवहारे स्वरुपेणैव तिष्ठति स कूटस्थपरमेश्वर:' जो सर्व व्यवहारांमध्ये व्याप्त आणि सर्व व्यवहारांचा आधार असूनही कोणत्याही व्यवहारात आपले स्वरूप बदलत नाही, म्हणून परमेश्वराचे नाव 'कूटस्थ' आहे.
'देवशब्दाचे जितके अर्थ लिहिले आहेत तितकेच 'देवीशब्दाचेही आहेत. परमेश्वराची नावे तीन्ही लिंगांत आहेत. उदाहरणार्थ, 'ब्रह्म चितिरीश्चरश्चेति. जेंव्हा ईश्वराचे विशेषण असेल तेंव्हा 'देवआणि जेंव्हा चितीचे असेल तेंव्हा 'देवीअसे समजावे. म्हणून ईश्वराचे नाव 'देवी' आहे.

(शुक्लृ शक्तौ) या धातूपासून 'शक्तिशब्द बनतो. 'यः सर्वं जगत् कर्तुं शक्नोति स शक्ति:'. जो सम्पूर्ण जग निर्माण करण्यास समर्थ आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'शक्ति' आहे.

(श्रीञ् सेवायाम्) या धातूपासून 'श्रीशब्द बनतो. 'यः श्रीयते सेव्यते सर्वेण जगता विद्वद्भिर्योगिभिश्च स श्रीरीश्वरःज्याचे ग्रहण सम्पूर्ण विश्वविद्वान आणि योगीजन करतात, त्या परमेश्वराचे नाव 'श्री' आहे.

(लक्ष, दर्शनाङ्ग्कनयो:) या धातूपासून 'लक्ष्मीशब्द बनतो. 'यो लक्षयति पश्यत्यङ्ग्कते चिन्हयति चरचारं जगदथवा वेदैराप्तैर्योगिभिश्च तो लक्ष्यते स लक्ष्मीसर्वप्रियेश्वर:'. जो सर्व चराचर जगताला पाहतो, चिह्नित म्हणजे दृश्य बनवितो. जसे शरीराचे डोळे, नाक आदि आणि वृक्षाची पाने, फुले, फळे, मुळे, पृथ्वी, पाणी, काळे, लाल, पांढरे, माती-दगड, चंद्र, सूर्य, वगैरे चिह्ने बनवितो व सर्वांना पाहतो. जो सर्व शोभांची शोभा आहे आणि जो वेदादि शास्त्रे अथवा धार्मिक विद्वान् योगी यांचे लक्ष्य म्हणजे पाहण्यास योग्य आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'लक्ष्मी' आहे.

(सृ गतौ) या धातूपासून 'सरसत्याला मतुप् आणि ङीप् प्रत्यय लागून 'सरस्वतीशब्द बनतो. 'सरो विविधं ज्ञानं विद्यते यस्यां चितौ सा सरस्वती', ज्याला विविध विज्ञानांचे म्हणजे शब्द व अर्थ यांचे संबंध प्रयोग यांचे ज्ञान यथावत असते, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'सरस्वती' आहे.

'सर्वाशक्तयो विद्यन्ते यस्मिन् स सर्वशक्तिमानीश्वर:'. जो आपले कार्य करण्यात इतर कुणाच्या साह्याची इच्छा बाळगीत नाही, आपल्याच सामर्थयाने सर्व कामे पूर्ण करतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'सर्वशक्तिमानआहे.

(णीञ् प्रापणे) या धातूपासून 'न्यायशब्द बनतो. 'प्रमाणैरर्थपरिक्षणम् न्यायःहे वचन न्याय सूत्रावरील वात्स्यायनमुनिकृत भाष्यातील आहे. 'पक्षपातरहित्याचारणं न्यायः'. जे प्रत्यक्षादि प्रमाणांच्या परिक्षेने सत्य सिद्ध होते तसेच पक्षपातरहित धर्मरूप आचरण आहे, त्याला न्याय असे म्हणतात. 'न्यायं कर्तुं शीलमस्य स न्यायकारीश्वरः', ज्याचा स्वभाव न्याय म्हणजे पक्षपातरहित धर्माचरण करण्याचाच आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'न्यायकारी' आहे.

(दय दानगतिरक्षणहिंसादानेषु) या धातूपासून 'दयाशब्द बनतो. दयते ददाति जानाति गच्छति रक्षति हिनस्ति यया सा दया, बव्हीदया विद्यते यस्य स दयालुपरमेश्वरः', जो अभय देणारा, सत्यासत्य सर्व विद्या जाणणारा, सर्व सज्जनांचे रक्षण करणारा आणि दुष्टांना यथायोग्य शिक्षा देणारा आहे, म्हणून परमेश्वराचे नाव 'दयाळूआहे.

           'द्वयोर्भावो द्वाभ्यामितं सा द्विता द्वीतं वा सैव तदेव वा द्वैतम्, न विद्यते द्वैतं द्वितीयेश्वरभावो यस्मिंस्तदद्वैतम् ।अर्थात् 'सजातीयविजातीय स्वगतभेदशून्यं ब्रह्मदोन होणे अथवा दोन युक्त होणे म्हणजे द्विता, द्वीत किंवा द्वैत. जो या पासून रहित आहे जसे सजातीय मनुष्याचा सजातीय दूसरा मनुष्य होतो. विजातीय म्हणजे मनुष्याहुन भिन्न जातीचा वृक्ष, पाषाण आदि होतो. स्वगत म्हणजे शरीरामध्ये जसे डोळे, नाक, कान वगैरे अवयवांचा भेद आहे तसा दुसरे स्वजातीय ईश्वर, विजातीय ईश्वर किंवा आपल्या आत्म्यामधील तत्त्वांवर वस्तु यांपासून रहित एक परमेश्वर आहे, म्हणून परमेश्वराचे नाव 'अद्वैतआहे.

   'गुण्यन्ते ये ते गुणा वा वैर्गुणायन्ति ते गुणाः, यो गुणेभ्योनिर्गतस निर्गुण ईश्वर:' सत्व, रज, तम, रूप, रस, स्पर्श, गंध आदि जडाचे (अचेतनाचे) गुण अविद्या, अल्पज्ञता, राग (मोह) द्वेष आणि अविद्या आदि क्लेश हे जीवाचे गुण आहेत. त्यांच्यापासून जो वेगळा आहे. या मध्ये 'अशब्दमस्पर्शमरूपमव्ययम्इत्यादि उपनिषदांचे प्रमाण आहे. जो शब्द, स्पर्श, रूप आदि गुणांनी रहित आहे. म्हणून परमेश्वराचे नाव 'निर्गुण' आहे.

             'यो गुणैसह वर्त्तते स सगुणः'. जो सर्वांचे ज्ञान, सर्वसुख, पवित्रता, अनंत बलादि गुणांनी युक्त आहे. म्हणून परमेश्वराचे नाव 'सगुणआहे. ज्या प्रमाणे पृथ्वी गंधादि गुणांमुळे 'सगुणआणि इच्छादि गुणांनी रहित असल्यामुळे 'निर्गुणआहेत्या प्रमाणे जग आणि जीव यांच्या गुणांहून वेगळा असल्यामुळे परमेश्वर 'निर्गुणआहे आणि सर्वज्ञादि गुणांनी युक्त असल्यामुळे 'सगुणआहे. अर्थात असा कोणताही पदार्थ नाही जो सगुणता व निर्गुणता या पासून दूर आहे. ज्या प्रमाणे चेतनाच्या गुणांहून भिन्न असल्याने जड़ (अचेतन) पदार्थ निर्गुण असतो आणि आपल्या गुणांनी युक्त असल्याने सगुण असतो त्याच प्रमाणे जडाच्या (अचेतनाच्या) गुणांहून भिन्न असल्याने जीव निर्गुण असतो आणि इच्छादि आपल्या गुणांनी युक्त असल्याने तो सगुण असतो. परमेश्वराच्या बाबतीतही असेच समजले पाहिजे.

 'अन्तर्यन्तुं नियतुं शीलं यस्य सोSयमन्तर्यामी', जो सर्व प्राणी आणि अप्राणिरूप जगामध्ये व्यापक राहुन सर्वांचे नियमन करतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'अंतर्यामीआहे.

               'यो धर्मे राजते स धर्मराजःजो धर्मामध्येच प्रकाशमान असतो आणि अधर्माने रहित धर्माचा प्रकाश करतो. म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'धर्मराजआहे.

(यमु उपरमे) या धातूपासून 'यमशब्द बनतो. 'यः सर्वान् प्राणिनो नियच्छति स यमःजो सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्माची फळे देण्याची व्यवस्था करतो आणि सर्व अन्यायांपासून पृथक राहतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'यम' आहे.

(भज सेवायाम्) या धातूपासून 'भगत्यास 'मतुप्होऊन 'भगवानशब्द बनतो. 'भगः सकलैश्वर्य सेवनं वा विद्यते यस्य स भगवान्जो समग्र ऐश्वर्याने युक्त अथवा भजण्यास योग्य आहे, म्हणूनच त्या ईश्वराचे नाव 'भगवान' आहे.

(मन ज्ञाने) या धातूपासून 'मनुशब्द बनतो. 'यो मन्यते स मनु:'. जो मनु म्हणजे विज्ञानशील आणि मानण्यास योग्य आहे म्हणून त्या ईश्वराचे नाव 'मनु' आहे.

(पृ पालनपूरणयोः) या धातूपासून 'पुरुषशब्द बनला आहे.  'यः स्वव्याप्त्या चराSचरं जगत् पृणाती पूरयति वा स पुरुष:' जो सर्व जगात परिपूर्ण होत आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'पुरुष आहे.

 (डुभृञ् धारणपोषणयोः) विश्वपूर्वक या धातूपासून 'विश्वंभरशब्द बनतो. 'यो विश्वं बिभर्ति धरति पुष्णाति वा स विश्वम्भरो जगदीश्वरः'. जो जगाचे धारण व पोषण करतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'विश्वंभरआहे.

(कल संख्याने) या धातूपासून 'कालशब्द बनला आहे. 'कलयति संख्याति सर्वान् पदार्थान् स कालः'. जो जगातील सर्व पदार्थांची व जीवांची संख्या (गणनाकरतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'कालआहे.

(शिष्लृ विशेषणे) या धातूपासून 'शेषशब्द बनतो. 'यः शिष्यते स शेषःजो उत्पत्ति आणि प्रलय यांपासून शेष म्हणजे अलिप्त आहे, (मुक्त असतोम्हणून त्या परमेश्वराचे नाव 'शेष' आहे.

(आप्लृ व्याप्तौ) या धातूपासून आप्त शब्द बनतो. यः सर्वान् धर्मात्मानआप्नोति वा सर्वै धर्मात्मराप्यते छलादिरहितः स आप्त:'. जो सत्योपदेशक सकल विद्यायुक्त सर्व धर्मात्म्यांना प्राप्त होणारा आणि धर्मात्म्यांकडून प्राप्त होण्यास योग्य, छलकपटादींपासून रहित आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'आप्त' आहे.

(डुकृञ् करणे) 'शम्पूर्वक या धातूपासून 'शंकर:' शब्द बनला आहे. 'यः शंकल्याणं सुखं करोती स शंकर:'. जो कल्याण करणारा म्हणजे सुखी करणारा आहे, त्या ईश्वराचे नाव 'शंकर' आहे.

'महत्शब्दपूर्वक 'देवशब्दापासून 'महादेवहा शब्द बनतो. 'यो महतां देवः स महादेवः', जो महान देवांचा देव अर्थात विद्वानांचाही विद्वान, सूर्यादि पदार्थांचा प्रकाशक आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'महादेव' आहे.

(प्रीञ् तर्पणे कान्तौ च) या धातूपासून 'प्रियशब्द बनतो. 'यः पृणाति प्रीयते वा स प्रियःजो सर्व धर्मात्म्यांना, मुमुक्षूंना व सज्जनांना प्रसन्न करतो आणि सर्वांकडून कामना करण्यास योग्य आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'प्रिय' आहे.

(भू सत्तायाम्) 'स्वयंपूर्वक या धातूपासून 'स्वयंभूशब्द बनतो. यः स्वयं भवति स स्वयंभुरीश्वरःजो आपण स्वतः च आहे, कधी कोणापासून उत्पन्न झालेला नाही, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'स्वयंभू' आहे.

(कु शब्दे) या धातूपासून 'कविशब्द बनतो.'यः कौति शब्दयति सर्वा विद्यास कविरीश्वरः'. जो सर्व वेदांद्वारे सर्व विद्यांचा उपदेश करणारा आहे आणि जाणणारा आहे म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'कवी' आहे.

(शिवु कल्याणे) या धातूपासून 'शिवशब्द बनतो. 'बहुलमेतन्नि दर्शनम्यापासून शिवु धातू मानला जातो. जो कल्याणस्वरूप व कल्याण करणारा आहे, म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'शिवआहे.

     परमेश्वराची ही शंभर नावे येथे लिहिली आहेत. परंतु याहून वेगळी अशी परमेश्वराची असंख्य नावे आहेत. कारण जसे परमेश्वराचे अनंत गुण, कर्म, स्वभाव आहेत तशी त्याची अनंत नावे ही आहेत. त्यापैकी प्रत्येक गुण, कर्म व स्वभाव यांचे एक एक नाव आहे.म्हणून मी जी ही नावे नमूद केली आहेत ती सागरासमोर बिंदुसारखी आहेत. कारण वेदादि शास्त्रांमध्ये परमेश्वराचे असंख्य गुण, कर्म व स्वभाव वर्णिलेले आहेत. ते वाचल्यावर, शिकविल्यावर त्यांचा बोध होऊ शकतो आणि जे लोक वेदादि शास्त्रे वाचतात त्यांनाच इतर पदार्थांचे ज्ञानही पूर्णपणे होऊ शकते.

मंगलाचरण विचार

(प्रश्न) इतर ग्रंथकार लोक आदि, मध्य व अंत प्रसंगी मंगलाचरण करतात तसे आपण काहीच केले नाही किंवा लिहिले नाही. हे कसे ?
(उत्तर) तसे तर आम्हांला करणे योग्य नाही. कारण जो आदि, मध्य व अंत प्रसंगी मंगल करील तर त्याच्या ग्रंथामध्ये आदि, मध्य व अंत यांच्या दरम्यान जे काही लिहिलेले असेल ते अमंगलच असेल म्हणून 'मंगलाचरणं शिष्टाचारात् फलदर्शनाच्छुतितश्चेति ( सां५।सू१ ) असे सांख्यशास्त्राचे वचन आहे. त्याचा अभिप्राय असा की न्याय, पक्षपातरहित सत्य वेदोक्त ईश्वराची जी आज्ञा आहे तिचेच यथावत सर्वत्र सदैव आचरण करणे म्हणजेच मंगलाचरण म्हटले जाते. ग्रंथाच्या प्रारंभापासून समाप्तिपर्यंत सत्याचार करणे हेच मंगलाचरण होय असे नाही की कोठे मंगल व कोठे अमंगल लिहावे. महाशय महर्षींचा लेख पाहा :-

      'यान्यनववद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि ॥'
हे तैत्तिरीय उपनिषदातील (/११) वचन आहे. हे मानवांनो जी 'अनवद्य',  आनिंदनीय म्हणजे धर्मयुक्त कर्मे आहेत तीच तुम्ही करणे योग्य आहे. अधर्मयुक्त कर्मे करणे योग्य नव्हे.

       म्हणून आधुनिक ग्रंथात 'श्रीगणेशाय नमः', 'सितारामाभ्यां नमः', 'राधाकृष्णाभ्यां नमः', 'श्रीगुरुचरणारविंदाभ्यां नमः', 'हनुमंते नमः', 'दुर्गायै नमः', 'बटुकाय नमः', 'भैरवाय नमः', ' शिवाय नमः', 'सरस्वत्यै नमः', 'नारायणाय नमःइत्यादि इत्यादि जे काही लिखाण पाहाण्यांत येते ते वेद आणि शास्त्रे यांच्या विरुद्ध असल्यामुळे बुद्धिमान लोक ते मिथ्याच समजतात, कारण वेदांमध्ये आणि ऋषींच्या ग्रंथांमध्ये कोठेही असले मंगलाचरण आढळत नाही. आर्ष (ऋषिकृत) ग्रंथांमध्ये 'ओ३म्आणि 'अथहे शब्द मात्र आढळतात. पहा :-

     'अथ शब्दानुशासनम् अथेत्ययं शब्दोSधिकारार्थप्रयुज्यते ।  व्याकरणमहाभाष्य.
     'अथातो धर्मजिज्ञासा अथेत्यानन्तर्ये वेदाध्ययनानंतरम् । पूर्वमीमांसा.
    'अथातो धर्मं व्याख्यास्यामः अथेति धर्मकथनानन्तरं धर्मलक्षणं विशेषेण व्याख्यास्याम वैशेषिक दर्शन.
     'अथ योगानुशासनम् अथेत्ययमधिकारार्थ। योगदर्शन.
     'अथ त्रिविधदु:खात्यन्तनिवृत्तिरत्यन्तपुरुषार्थ '
      सांसारिकविषयभोगा नन्तरं त्रिविधदुःखात्यन्तनिवृत्यर्थप्रयत्नकर्तव्य। ( सांख्यदर्शन )'
      अथातो ब्रह्मजिज्ञासा । चतुष्टय साधन सम्पत्त्यनन्तरं ब्रह्म जिज्ञास्यम् ॥ ( वेदांतसूत्र )
    'ओमित्येतदक्षरमुद्गीथमुपासित ॥ हे छान्दोग्य उपनिषदातील वचन आहे.
     'ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानम् ।' हे माण्डूक्य उपनिषदाच्या आरंभीचे वचन आहे.

     असेच अन्य ऋषिमुनींच्या ग्रंथांमध्ये 'ओ३म्व 'अथशब्द लिहिलेले आहेत. त्याच प्रमाणे ( अग्निइट्ये त्रिषप्तापरियन्ति ) हे शब्द चारही वेदांच्या प्रारंभी लिहिलेले आहेत. 'श्रीगणेशाय नमःइत्यादि शब्द कोठेही नाहीत. जे वैदिक लोक वेदांच्या आरंभी 'हरिः ओम्लिहितात अथवा म्हणतात हे सर्व पौराणिक व तांत्रिक लोकांच्या चुकीच्या कल्पनांवरून शिकले आहेत. वेदादि शास्त्रांमध्ये 'हरिहा शब्द प्रारंभी कोठेही नाही. म्हणून 'ओ३म्किंवा 'अथहा शब्दच ग्रंथाच्या आरंभी लिहिला पाहिजे.
हे किंचिन्मात्र ईश्वराविषयी लिहिले. यानंतर शिक्षणाविषयी लिहिण्यात येईल.
इति श्रीमद्दयानंदसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे
सुभाषाविभूषित ईश्वरनामविषये

प्रथमसमुल्लाससम्पूर्ण

No comments:

Post a Comment