Sunday 26 June 2016

अकरावा समुल्लास भाग १

उत्तरार्द्ध

अनुभूमिका (१)

     पाच हजार वर्षांपूर्वी वैदिक धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म नव्हता, ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. कारण वेदात्त सर्व गोष्टी विद्येने सिद्ध आहेत. वेदांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे महाभारत युद्ध झाले. वेदांकडे पाठ फिरविल्यामुळे जगात अविद्यारूपी अंधकार पसरला; आणि माणसांची बुद्धी भ्रमिष्ट बनली. ज्याच्या मनात जे आले त्याचाच त्याने पंथ बनविला. या सर्व पंथांमध्ये चार पंथ प्रमुख असून त्यांतून इतर पंथांचा उगम झाला आहे ते पंथ म्हणजे वेद विरुद्ध असलेले पौराणिक मत, जैन, खिस्ती व इस्लामी मत हे होत. हे चार पंथ याच क्रमाने जगात प्रचलित झाले आहेत. या पंथांच्या शाखांची संख्या एक हजाराहून कमी नाही. यास सर्व पंथांचे अनुयायी, त्यांचे चेले व इतर सर्व लोक यांना परस्पर सत्यासत्याचा विचार करण्याच्या बाबतीत अधिक कष्ट पडू नयेत म्हणून, हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. यामध्ये सत्य वैदिक धर्माचे मंडन व असत्याचे खंडन आम्ही स्पष्ट केले आहे. ते सर्वांना कळावे, त्यांनी सत्यासत्याचा विचार करता यावा याकरिता हा ग्रंथ आहे बुद्धिप्रमाणे व विचेच्या आधारे या चार मतांचे मूलग्रंथपाहून मला जे काही समजले ते सर्वासमोर मांडणे हे उत्तम कार्य मी समजतो कारण या मतांच्या प्रचारामुळे विज्ञान वेदांचे ज्ञान पूर्णतः नाहीसे झाले तर ते पुनः सहजासहजी मिळणार नाही. पक्षपात सोडून या ग्रंथाचे वाचन लोकांनी केले तर त्यांना सत्य काय व असत्य काय ते सहज समजेल. त्यानंतर सर्वांना आपापल्या समजुतीप्रमाणे सत्य मताचे ग्रहण करणे व असत्य मताचा त्याग करणे सोपे होईल. यापैकी पुराणादी ग्रंथांतून विविध शाखांच्या रूपाने अनेक पंथ आर्यावर्त्तात प्रचलित झाले आहेत. त्यांचे गुणदोष संक्षेपाने अकराव्या समुल्लासात वर्णन केले आहेत.
     माझे हे काम उपकारक नाही, असे जरी कोणाला वाटले तरी त्यांनी त्याला विरोधही करू नये. कारण माझा हेतू कोणाचे नुकसान करावे अथवा कोणाला विरोध करावा हा नसून सत्यासत्याचा निर्णय करणे व करविणे हा आहे. याचप्रमाणे सर्व लोकांनी न्यायाने वागणे हे अत्यंत उचित आहे. मनुष्याचा जन्म वादविवाद हा विरोध करण्यासाठी नसून सत्यासत्याचा निर्णय करण्यासाठी व करविण्यासाठी आहे. या मतमतांतराच्या वितंडवादाने जगामध्ये ज्या अनिष्ट गोष्टी घडल्या, घडत आहेत व घडतील, त्यांची कल्पना निपक्षपाती विद्वज्जन करू शकतात.
     जोपर्यंत मानवजातीमध्ये प्रचलित एकमेकांविरुद्धचा मिथ्या मतमतांतराचा विरोध संपणार नाही तोपर्यंत सर्वांना आनंद प्राप्त होणार नाही. जर आपण सर्व माणसे व विशेषतः विद्वान लोक ईष्य व द्वेष सोडून देऊन सत्यासत्याचा निर्णय करून सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करतील व करवतील तर ही गोष्ट असाध्य नाही,




     हे निश्चित आहे की या विद्वानांमधील विरोधामुळेच सर्व लोक विरोधाच्या जाळ्यात अडकले आहेत. जर हे लोक आपल्याच स्वार्थाचा विचार न करता सर्वांच्या हिताचा विचार करतील तर तात्काळ एकमत होईल. हे एकमत साधण्याचा उपाय या ग्रंथाच्या शेवटी सांगितला आहे. सर्वशक्तिमान परमात्मा एकाच सत्यमताच्या स्वीकृतीसाठी सर्वांना उत्साहित करून प्रवृत्त करो हा उत्साह सर्व मानवांच्या आत्म्यात प्रकाशित करो.

अलमतिविस्तरेण विपश्चिद्वरशिरोमणिषु ।

 =======================================================


अकरावा समुल्लास

आर्यावर्त्तीय मतांचे खंडन मंडन

आर्यावर्त्तीयांची महत्ता

     आता आर्यावर्त्त देशात राहणाऱ्या आर्य लोकांच्या मतांचे आम्ही खंडन-मंडन करणार आहोत. या आर्यावर्त्तासारखा दुसरा देश या भूमंडळावर कोणताही नाही. म्हणूनच या भूमीला सुवर्णभूमी असे म्हणतात. कारण ही भूमी सुवर्णादी रलांची खाण आहे. म्हणूनच सृष्टिच्या प्रारंभी आर्य लोक याच देशात येऊन राहिले. सृष्टिविषय नावाच्या समुल्लासात आम्ही सांगितलेच आहे की, आर्य हे उत्तम पुरुषांचे नाव असून आर्येतर मानवांचे नाव दस्यु आहे. जगाच्या पाठीवर जितके देश आहेत ते सारे याच देशाची प्रशंसा करतात ज्यांनी पारसमणि दगडाबद्दल जे ऐकले आहेत तर खोटे आहे. वस्तुतः आर्यावर्त्त देश हाच खरा परीस आहे. ज्याच्या शनि दरिद्री परदेशी लोकांच्या रूपाने जे लोखंड त्याचे तात्काळ सोने बनवितो आणि ते श्रीमंत बनतात.

एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्पृथिव्यां सर्वमानवाः ।। मनु०।। अ०२ ।। श्लो० २०।।

     "या आर्यावर्त देशात उत्पन्न झालेल्या ब्राह्मणापासून म्हणजे विद्वानांपासून या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी म्हणजे ब्राह्मण, क्षत्रियवैश्य, शूद्र, दस्यु म्लेच्छ वगैरे सर्वांनी आपापल्या योग्यतेप्रमाणे विद्या, ज्ञान व चारित्र्य यांचे शिक्षण घ्यावे " मनुस्मृतीतील या श्लोकाप्रमाणे सृष्टिच्या प्रारंभापासून पाच हजार वर्षांपूर्वीपर्यंत साऱ्या भूमंडळावर आर्यांचेच एकमात्र सार्वभौम चक्रवर्ति राज्य होते. इतर देशांत लहान-लहान मांडलिक राजे राज्य करीत होते. कौरव-पांडवांच्या काळापर्यंत येथील राजांच्या शासनानुसार जगातील सगळे मांडलिक राजे व प्रजाजन वागत होते. सृष्टिच्या प्रारंभीरचल्या गेलेल्या मनुस्मृतीत या गोष्टीचा पुरावा आहे. महाभारत युद्धाचा शेवट झाल्यानंतर विजयी महाराजा युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ केला होता. त्यावेळेपर्यंत जगातील सारी राज्ये येथील महाराजांच्या आधीन होती.
     पाहा ! चीनचा भगदत्त, अमेरिकेचा बभ्रुवाहन, युरोपचा बिडालाक्ष, यूनान (ग्रीस) चे यवन आणि इराणचा शल्य वगैरे सगळे राजे सम्राटाच्या आज्ञेप्रमाणे महाभारत युद्धात व राजसूय यज्ञात सहभागी होण्यासाठी येथे आले होते. ज्यावेळी येथे रघुकुलातील राजे राज्य करीत होते. त्यावेळी लंकेचा रावणही त्यांचा मांडलिक होता. श्रीरामचंद्रांच्या वेळी रावण विरुद्ध झाला तेव्हा रामचंद्रांनी त्यास दण्डित करून राज्य हिसकावून त्याचे भावाला म्हणजे बिभीषणाला दिले होते.
     स्वायंभुव राजापासून पांडवांपर्यंत या भूमंडळावर आर्याचे चक्रवर्ती राज्य होते. त्यानंतर येथील राजे आपसातील विरोधामुळे एकमेकांशी लढून नष्ट झाले. परमेश्वराच्या या सृष्टीमध्ये अहंकारी, अन्यायी, अविद्वान लोकांचे राज्य फार काळ टिकत नसते या जगाची ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे की, जेव्हा एखाद्या लोकसमूहात किंवा देशात लोकांच्या गरजेपेक्षा जास्त धन जमा होते तेव्हा आळस, पुरुषार्थहीनता, ईर्ष्या, द्वेष, विषयासक्ती आणि प्रमाँद वाटू लागतात. त्यामुळे देशात विद्या व सुशिक्षण ही नष्ट होऊन दुर्गुण व दुष्टव्यसन,मद्यमांस-सेवन बाल्यावस्थेत विवाह स्वैराचार वगैरे सारखे दुर्गुण व व्यसने वाढतात आणि जेव्हा युद्धविभाग, युद्धविद्याकौशल्य आणि सैन्य इतके प्रचंड वाढते की, त्याच्यासमोर जगातील कोणताही देश टिकाव धरू शकत नाही, तेव्हा त्या सामर्थ्यशाली देशाच्या लोकांमध्ये पक्षपात अभिमान यामुळे अन्याय वाढतो. हे दोष वाढले की, त्यांच्यात यादवी सुरू होऊन त्यांचा नाश होतो तेव्हा एखाद्या लहानशा गटातून एक अत्यंत समर्थ पुरुष उदयाला येतो आणि तो त्यांचा पराभव करतो. उदाहरणार्थ, मुसलमान बादशहांच्या सत्तेविरुद्ध शिवाजी बगुरु गोविंदसिंह यांनी मुसलमानी सत्ता छिन्न भिन्न केली.

अथ किमेतैर्वा परेऽन्ये महाधनुर्धराश्चक्रवर्तिन केचित् सुद्युम्नभूरिद्युम्नेन्द्रद्युम्नकुवलयाश्व-यौवनाश्ववद्श्वाश्वपतिशशविन्दुहरिश्चन्द्राऽम्बरीषननक्तु- शर्यातिययात्यनरण्याक्षसेनादय: ।
अथ मरुत्तभरतप्रभृतयो राजान ।। -मैत्र्युपनि० ।। अ०१ ।। व० ४ ।। 

सुद्युम्न, भूरिद्युम्न, इन्द्रद्युम्न, कुवलयाश्व, यौवनाश्व, वद्ध्र्यश्व, अश्वपति, शशविन्दु, हरिश्चन्द्र, अम्बरीष, ननक्तु, शर्याति, ययाति, अनरण्य, अक्षसेन, मरुत्त आणि भरत हि या जगातील सुप्रसिद्ध सार्वभौम व चक्रवर्ती राजांची नावे आहेत." या पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, सुटीच्या प्रारंभापासून महाभारतापर्यंत चक्रवर्ती व सार्वभौम राजे आर्यकुलांतच झाले होते. आता त्यांच्या वंशजांचे भाग्य फिरल्यामुळे ते राज्यभ्रष्ट होऊन परकीयांकडून पादाक्रांत केले जात आहेत. तसे पाहिल्यास स्वायंभुवांपासून पांडवांपर्यंतच्या चक्रवर्ती राजांची गावे मनुस्मृती, महाभारत इत्यादी ग्रंथात नमूद आहेत. ते सारे खोटे आहे असे म्हणणे हे अज्ञानी व पक्षपाती लोकांचे काम आहे.

मंत्रसिद्धी निराकरण

(प्रश्न) या देशात आग्नेयास्त्रादिक विद्या होत्या, ते खरे की खोटे ? त्या काळी तोफा व बंदुका होत्या की नाही?
(उत्तर) त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. शस्त्रे होती. कारण पदार्थविज्ञानाने ही शस्त्रास्त्रे तयार करणे शक्य आहे.
(प्रश्न) ही शस्त्रास्त्रे देवांकडील मंत्रांच्या साह्याने तयार केली जात होती काय?
(उत्तर) नाहीही. नुसता मंत्रांचा जप केल्याने शस्त्रे तयार होत नाहीत. मंत्र म्हणजे विचार पदार्थविज्ञानाचा विचार करून ती शस्त्रे तयार केली जात व चालविली जात. वस्तुतः मंत्र हा शब्दमय असतो. त्याच्यापासून कोणतेही द्रव्य उत्पन्न होत नसते. जर कोणी म्हणत असेल की, मंत्राने अमी उत्पन्न होतो तर त्या मंत्राचा जप करणार्याचे हृदय व जीभही जळून भस्म झाली पाहिजे. म्हणजे शठूला मारायला निघाला आणि स्वत:च मरून गेला असे व्हायचे. मंत्र म्हणजे वस्तुतः विचार होय. उदाहरणार्थ, राजमंत्री म्हणजे राज्यकारभाराचा विचार करणारा. याचप्रमाणे मंत्राने म्हणजे विचाराने साऱ्या सृष्टीतील पदार्थाचे प्रथम ज्ञान प्राप्त होते आणि मग क्रिया केल्याने अनेक प्रकारचे पदार्थ व क्रिया कौशल्य निर्माण होतात.
     लोखंडाचा एखादा बाण किंवा गोळा बनवून त्यामध्ये असे काही पदार्थ भरावयाचे की, ज्यांना अग्नीचा स्पर्श होताच हवेत धूर पसरेल आणि सूर्याच्या किरणाने अथवा वायूच्या स्पशनि आगीचा भडका उडेल. या अस्त्राला 'आग्नेयास्त्र' नाव आहे. या अस्त्राचे निवारण करण्यासाठी प्रतिपक्षाकडून त्यावर 'वारुणास्त्र सोडले जाई. जर शत्रुकडून आपल्या सैन्यावर आग्नेयास्त्रचा मारा केला गेला तर आपल्या सैन्याच्या रक्षणासाठी सेनापती त्यावर वारुणास्त्र सोडून ते आग्नेयास्त्रपासून निवारण करीत असे. या वारुणास्त्रामध्ये अशी द्रव्ये भरलेली असत की, त्यांच्या धुराचा वायूशी संपर्क घडताच त्याने ढगात रूपांतर होऊन पाऊस पडू लागे आणि अग्नी विझून जाई असेच एक 'नागपाश’ होते. ते शकुंवर सोडले असता आपल्या पाशांनी शत्रुचे शरीर आवळून टाकी. असेच एक "मोहनास्त्र' होते. त्यात गुंगी आणणारी द्रव्ये भरलेली असत. त्याच्या धुराने शत्रुसैन्याचे सारे सैनिक निद्रास्थ किंवा मूर्छित होऊन पडत. अशाच प्रकारची इतरही अनेक शस्त्रास्त्रे होती. 'पाशुपतास्त्र' त्यामध्ये तार, काच किंवा अन्य एखादा पदार्थ यांचा असा काही वापर केला जाई की, त्यातून वीज निर्माण होई आणि ती शत्रुसैनिकांवर पडून त्यांचा नाश करी.ते सुद्धा आग्नेयास्त्र म्हटले जात होते.
     'तोफ' व 'बंदूक' हे शब्द परकीय भाषेतील आहेत. त्यांची संस्कृत व आर्य भाषेतील नाहीत. विदेशी भाषेच्या या शब्दाला संस्कृतमध्ये व आर्य भाषेत तोफेला शतघ्नी बंदुकीला भुगूडी असे म्हणतात. ज्यांना संस्कृत भाषेचा गंध नाही ते लोक भ्रमात पडून काही तरी लिहितात व बकतात. त्यांचे ते लिहिणे व बोलणे सुज्ञ  लोक प्रमाण मानीत नाही. आज जगामध्ये ज्या विद्या पसरल्या आहेत त्या सर्व आर्यावर्त्तांतूनच तिकडे गेल्या आहेत. आर्यावर्त्तातून मिश्र तेथून यूनान, ग्रीसमधून तुर्कस्तानात तेथून युरोपखंडात आणि तेथून अमेरिका वगैरे देशांत आर्यविद्येचा प्रसार झाला. आजही संस्कृत विद्येचा जेवढा प्रचार आर्यावर्त्तात आहे, तेवढा इतर कोणत्याही देशात नाही. काही लोक म्हणतात की, जर्मनीमध्ये संस्कृत विद्येचा खूप प्रचार असून मोक्षमूलर (मैक्समूलर) साहेबांनी संस्कृतचा जेवढा अभ्यास केला आहे. तेवढा इतर कोणीच केलेला नाही. पण या साऱ्या बोलायच्या गोष्टी आहेत. ‘यस्मिन्देशे द्रुमो नास्ति तत्रैरण्डोऽपि द्रुमायते।‘ म्हणजे ज्या ठिकाणी मोठा वृक्ष नसतो तेथे एरंडाचे झाड हाच मोठा वृक्ष समजला जातो, या म्हणीप्रमाणे युरोप खंडात संस्कृत विद्येचा प्रचार झालेला नसल्यामुळे जर्मन लोकांनी व मोक्षमूलर साहेबांनी संस्कृतचे जे थोडेफार अध्ययन केले तेच त्यांना फार वाटले. परंतु आर्यावर्त्ताशी तुलना केल्यास त्यांचे संस्कृतचे ज्ञान अगदीच सामान्य म्हणावे लागेल. मी जर्मनीतील एका प्रिन्सिपॉलशी पत्रव्यवहार केला असता मला समजले की, त्या देशात संस्कृमध्ये लिहिलेल्या पत्राचा अर्थ समजणारे लोक फारच थोडे आहेत. मोक्षमूलर साहेबांचे संस्कृत साहित्य व त्यांनी केलेली वेदांची थोडीशी व्याख्या पाहून माझ्या लक्षात आले की, त्यांनी आर्यावर्त्तातील लोकांची लिहिलेली टीका वाचून काहीतरी थातुरमातुर लिखाण केले आहे. उदाहरणार्थ,

युञ्जन्ति ब्रध्नमरुषं चरन्तं परि तस्थुषः । रोचन्ते रोचना दिवि ।। ऋ० मं० १।। सू० ६।। मं० १।।

      या मंत्रातील 'ब्रघ्न'  या शब्दाचा अर्थ त्यांनी 'घोडा' असा केला आहे. यापेक्षा सायणाचार्यांनी केलेला 'सूर्य' हा अर्थ जास्त चांगला आहे. परंतु त्याचा खरा अर्थ 'परमात्मा' असा आहे. माझ्या ऋग्वेदादिभाष्यभूमिका' या ग्रंथात यथायोग्य अर्थ पाहून घ्यावा. त्यावरून जर्मनी देशातील आणि मोक्षमूलर साहेब यांचे संस्कृत विद्योतील पांडित्य किती आहे हे जाणावे.
     जगामध्ये जेवढ्या विद्या व मत प्रचलित आहेत, त्या सर्वांचे मूळ आर्यावर्त्तातूनच तिकडे गेले आहे. पाहा फ्रान्स देशातील पॅरिस शहरी राहणारे “जॉकोलियट साहेब आपल्या 'बायबल इन इंडिया' या ग्रंथात लिहितात की, "आर्यावर्त्त हा देश सर्व विद्यांचे माहेरघर आणि चांगल्या गोष्टींचे भांडार आहे. येथूनच सर्व विद्या व मत पसरले आहेत. ते परमेश्वरास अशी प्रार्थना करतात की, "हे परमेश्वराचे पूर्वी आर्यावर्त देशाची जशी उन्नती होती तशी आमच्या देशाची कर" हे एका फ्रेंच पंडिताचे लिखाण त्या ग्रंथात पाहावे.
     याचप्रमाणे दाराशिकोह या राजपुत्राने असेच मत ठामपणे व्यक्त केले होते की, संस्कृत भाषेत जेवढी विद्या आहे तेवढी दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाही. त्याने उपनिषदाचे फारसीमध्ये भाषांतर केले आहे. त्या ग्रंथात तो लिहितो की, "मी अरबी वगैरे अनेक भाषा शिकलो. परंतु माझ्या मनातील संदेह दूर झाला नाही व मला आनंद मिळाला नाही. परंतु जेव्हा मी संस्कृत भाषा शिकलो आणि संस्कृत विद्येचे श्रवण केले तेव्हा मी निःशंक होऊन आनंदित झालो.
     काशीच्या मानमंदिरातील (वेधशाळेतील) शिशुमारचक्र ( राशीचक्र किंवा सूर्यमंडळ) पाहा. त्याचे नीट रक्षण केले जात नाही. तरीही ते किती उत्तम स्थितीत आहे. त्यावरून आजही खगोलाची कितीतरी माहिती मिळते. त्याचे मोडतोड झालेले भाग दुरूस्त करून त्याची योग्य देखभाल ठेवण्याची व्यवस्था जयपूरचे सवाई महाराज करतील तर फार चांगले होईल. परंतु अशा या शिरोमणी देशाला महाभारत युद्धाने असा जोरदार धक्का दिला की तो अजूनही सावरून पूर्वस्थितीला आला नाही. कारण जेव्हा भाऊच भावाच्या जिवावर उठतो तेव्हा नाश होण्यास काय संदेह?

पाखंडी लोकांचे प्रस्थ

विनाशकाले विपरीतबुद्धि । चाणक्यनीति ।। या० १६।। श्लो०५।।

     हे कुण्या कवीचे वचन आहे. जेव्हा विनाश होण्याचा काळ जवळ येतो तेव्हा बुद्धि फिरते; आणि विपरीत कामे करतात. कोणत्यांना नीट समजावून सांगूलागला तर ते त्याचा उलटाच अर्थ घेतात आणि कोणी उलट सांगू लागला तर त्यांना तो सरळ वाटतो. महाभारत युद्धात मोठमोठे विद्वान, राजे,महाराजे, ऋषी, महर्षी मारले गेले व पुष्कळसे मेले, तेव्हा विद्या व वेदोक्त धर्म यांचा प्रचार थांबला. लोक ईर्ष्या, द्वेष व अभिमान एकमेकांत करू लागले. जो बलवान होता, त्याने राज्य ताब्यात करून तो राजा बनलात्यामुळे आर्यावर्त्त देशाचे खंड खंड होऊन लहान लहान राज्ये झाली. तेव्हा द्विषांतरातील राज्यांची व्यवस्था कोण पाहणार? जेव्हा ब्राह्मणच विद्याविहीर बनले, तेव्हा क्षत्रिय, वैश्य व शुद्ध अविद्वान बनले असल्यास काय आश्चर्य वेदादी शास्त्रांचे अंसह पठनपाठन करण्याची परंपराही खंडित झाली. केवळ पोट भरण्यासाठी ब्राह्मण लोक वेदांचे पठन करीत राहिले. त्यांनी क्षत्रियादिकांना शिकविली नाही. कारण जेव्हा अविद्वान लोक गुरू बनले तेव्हा त्यांच्यात कपट आणि अधर्म वाढीस लागला. ब्राह्मणांनी आपल्या पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था करावी हा विचार केला. म्हणून त्यांनी संगनमत करून ठरविले त्याप्रमाणे ते क्षत्रियांदिकांना असा उपदेश करू लागले की, आम्हीच तुमचे पूजनीय देव आहोत. आमची सेवा केल्याखेरीज तुम्हाला स्व किंवा मुक्ती मिळणार नाही. जर तुम्ही आमची सेवा न कराल तर घोर नरकात पडाल." वैदिक ऋषीमुनींनी लिहिलेल्या वेदांमध्ये आहे की, ज्ञानी, धार्मिक व पवित्र असतात त्यांचे नाव ब्राह्मण. परंतु येथे जर मूखी, विषयासक्त, कपटी, लंपट वे अधार्मिक लोक स्वतला ब्राह्मण समजून घेऊ लागले. परंतु सात्विक, सत्यवादी वृत्तीच्या, विद्वान व सत्यप्रिय आप्तांची लक्षणे या लोकांमध्ये थोडेच आढळणार? जेव्हा क्षत्रियादी यजमान संस्कृत विखेला पारखे झाले तेव्हा या ब्राह्मणांनी ज्या काही थाया त्यांचेसमोर मारल्या त्या साऱ्या त्या बिचाऱ्यांनी मानून घेतल्या. त्यामुळे या नामधारी ब्राह्मणांचे चांगलेच फावले. त्यांनी आपल्या वाक् जालात सर्वांना अडकवून आपल्या आधीन करून घेतले; आणि ते लोकांना सांगू लागले की, ‘ब्रह्मवाक्यं जनार्दनः'
     म्हणजे ब्राह्मणांच्या मुखातून जे काही वचन निघते, ते जणू साक्षात परमेश्वराच्या मुखातूनच निघाले आहे असे समजावे. जेव्हा ज्ञानाच्या बाबतीत आंधळे (अडाणी) आणि पैशाने खूप श्रीमंत असलेले क्षत्रियादी वर्णांचे लोक ब्राह्मणांचे चेले बनले तेव्हा ब्राह्मण हे नाव व्यर्थ धारण करणाऱ्यांना विषयरूप उपवनच मिळाले. या जगामध्ये जे काही उत्तमोत्तम आहे ते सारे ब्राह्मणांसाठी आहे, असेही त्यांनी जाहीर करून टाकलेत्यासाठी गुण-कर्म-स्वभावावर आधारलेली वर्णव्यवस्था मोडून काढून त्यांनी ती जनमाधिष्ठित बनविली आणि मृतका संबंधीचे दान यजमानांकडून घेऊ लागले. जसे मनाला येईल तसे ते वागू लागले. येथपर्यंत मजल मारली की, आम्ही भूदेव आहेत. आमची सेवा केल्याखेरीज देवलोक (स्वर्ग) मिळू शकत नाही. त्यांना असे विचारले पाहिजे की, "तुम्ही स्वतः कोणत्या लोकात जाणार आहात? तुमची कृत्ये तर घोरे नरक भोगणारी आहेत. तुम्हीतर किडे, कीटाणू पतंगादी बनाल तेव्हाते क्रुद्ध होऊन म्हणतात, "आम्ही तुम्हाला शाप दिला तर तुमचा नाश होईल. कारण लिहिले आहे की, ‘ब्रहाद्रोही विनश्यति' म्हणजे जो कोणी ब्राह्मणांचा द्रोह करतो त्याचा नाश होतो. परंतु हे खरे आहे की, पूर्ण वेद विद्या व परमात्मा यांना जाणणारे धर्मात्मे साऱ्या जगाचे उपकारकर्ते अशा पुरुषांचा जो कोणी द्वेष करील तो अवश्य नष्ट होईल. परंतु जो ब्राह्मण विद्वान नाही. तो ब्राह्मण नाही. त्याला ब्राह्मण नाव नाही व त्याची सेवाही करू नये.
(प्रश्न) तर मग आम्ही कोण आहोत? (उत्तर) तुम्ही पोप आहात.
(प्रश्न) पोप कुणाला म्हणतात?
(उत्तर) पोप हा मूळ रोम भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ उत्तम श्रेष्ठ पिता असा आहे. पण आता लबाडी करून इतरांना फसविणारा व आपला स्वार्थ साधणारा इसम पोप म्हटला जातो.
(प्रश्न) आम्ही तर ब्राह्मण व साधू आहोत. कारण आमचे आईबाप ब्राह्मण होते आणि आम्ही अमक्या साधूचे चेले आहोत.
(उत्तर) तुम्ही म्हणता ते खरे आहे. परंतु ऐका. केवळ आईबाप ब्राह्मण असल्याने आणि एखाद्या साधूचे शिष्यत्व पत्करल्याने कोणीही ब्राह्मण अथवा साधू होऊ शकत नाही. ब्राह्मण आणि साधू हे आपल्या गुण, कर्म, स्वभावामुळे व परोपकारी वृत्तीमुळे असतात. असे की, रोमचे पोप आपल्या अनुयायांना ऐकवित आहे की तुम्ही तुमची पाये आमच्यासमोर प्रकट केलीत तर आम्ही तुम्हांला क्षमा करू आमची सेवा केल्याशिवाय आणि आमच्या आज्ञेशिवाय कोणीही स्वर्गात जाऊ शकत नाही. तुम्हांला स्वर्गात जाणे असेल तर जितके रुपये तुम्ही आमचेजवळ जमा कराल तितक्या रुपयाची सामग्री तुम्हाला स्वर्गात मिळेल" त्यांचे हे बोलणे ऐकून अकलखाती शून्य आणि भरपूर पैसा अडका असणारे लोक स्वागत जाण्याची इच्छा बाळगून पोप महाशयांकडे जाऊन त्यांना पोप त्यांना येशू व मेरी भरपूर पैसा देत. तेव्हा व मेरी यांच्या समोर उभे करून या प्रकारची हंडी लिहून देत असे की, "हे खुदावंत येशू ! ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्या इसमाने स्वर्गात येण्यासाठी तुझ्या नावाने आमच्याकडे लाख रुपये जमा केले आहेत. जेव्हा हा गृहस्थ स्वर्गात येईल तेव्हा तू आपल्या बापाच्या स्वर्गातील राज्यामध्ये याला पंचवीस हजार रुपये घरे व बागबगीचे यांसाठी, पंचवीस हजार रुपये नोकरचाकर, वाहने व शिकार यांसाठी, पंचवीस हजार रुपये खाणे-पिणे, कपडालता यांसाठी आणि बाकीचे पंचवीस हजार रुपये याचे जे कोणी इष्ट मित्र, नातेवाईक वगैरे तेथे असतील त्यांच्या सरबराईसाठी द्यावेत" अगत्या हुंडीखाली आपली सही करून पोप महाराज ती त्या इसमाच्या हातात देत व त्याला सांगत, "तु मरताना ही हुंडी कबरीमध्ये तुझ्या उशाशी ठेवण्यास तुझ्या कुटुंबियांना सांगून ठेव. मग तुला नेण्यासाठी जेव्हा देवदूत येतील तेव्हा तुझ्याबरोबर ही हुंडी स्वर्गात घेऊन जातील, आणि यात नमूद केल्याप्रमाणे साऱ्या गोष्टी तुला मिळवून देतील.
     म्हणजे पाहा ! जणू स्वर्गाचा ठेकाच पोप महाशयांनीच घेतला आहे. जोपर्यंत युरोपात मूर्खता होती तोपर्यंत तेथे पोप महाराजांची ही लीला चालत राहिली. आता तेथे ज्ञानाचा प्रसार झाल्यामुळे पोपची ही खोटी लीला चालत नाही. मात्र अजून ती समूळ नाहीशी झालेली नाही.
     अशाच प्रकारे आर्यावर्त्तातही जणू पोप महाशयांनी लाखो अवतार धारण करून ती लीला चालविली आहे. राजाला व प्रजेला विद्या शिकू नदेणे. सत्पुरुषांचा सत्संग घडून देणे, रात्रंदिवस प्रमात ठेवणे यांखेरीज दुसरे कोणतेच काम येथील पोप म्हणजे ब्राह्मण व साधू करीत नाहीत. मात्र येथे ही गोष्ट लक्षात ठेवावी की जे लोक छल कपटादी लबाडी व फसवाफसवीचा व्यवहार करतात. त्यांनाच पोप म्हटले आहे.त्यांच्यापैकी जे कोणी धर्मनिष्ठविद्वान व परोपकारी आहेत ते खरे ब्राह्मण व साधू आहेत.
     म्हणून लोकांना फसवून आपला स्वार्थ साधणाऱ्या लबाड व कपटी लोकांनाच पोप असे संबोधणे आणि उत्तम पुरुषांचा ब्राह्मण व साधू म्हणून स्वीकार करणे हेच उचित होय. पाहा! जर या देशात उत्तम ब्राह्मण व साधू नसते तर वेदादी सत्यशास्त्रांच्या ग्रंथांचे स्वरांसह पठन-पाठन करून त्यांचे रक्षण कोणी केले असते? आणि जैन, मुसलमान, ख्रिस्ती वगैरे लोकांच्या जाळ्यात अडकण्यापासून आर्यांचा बचाव करून वेदादी सत्यशास्त्राविषयी प्रेम बाळगणाऱ्या लोकांना वर्णाश्रम व्यवस्थेद्वारे कायम ठेवण्याचे काम ब्राह्मण आणि
साधूशिवाय कोणी केले असते. ‘विषादप्यमृतं ग्राह्यम्।‘ मनु०।। अ०२ ।। श्लो० २३९।। म्हणजे विषामधूनही अमृत ग्रहण करावे, त्याप्रमाणे येथील ब्राह्मणांच्या व साधूच्या या पोपगिरीमुळे का होईना, आलोक जैन वगैरे पंथांपासून दूर राहिले. जणू ते विषातून निघालेले अमृतच होते.
     जेव्हा यजमान विद्याविहीन बनले तेव्हा थातुरमातुर मंत्रपाठ करणारे घमेंडखोर बनले. अशा साऱ्या लोकांनी आपसात संगनमत करून राजा वगैरे वरिष्ठ लोकांना सांगितले की, "ब्राह्मण व साधू हे अदण्ड्य आहेत ‘ब्राह्मणो न हन्तव्यः ‘साधुर्न हन्तव्यःयासारखी जी वचने खऱ्या ब्राह्मण व खऱ्या साधुसाठी होती परंतु पोपगिरी करणारांनी हे वचन आपल्यासाठीच आहे असे म्हटले. अशीच खोटी वचने असणारे ग्रंथ या लोकांनी ऋषिमुनींच्या नावांनी रचले, ऋषिच्या नावाने ऐकवित राहिले. त्या प्रतिष्ठित पी महर्षांची नावे वापरून आपल्यावरील शिक्षा हटविली आणि मग ते स्वैराचार करू लागले. त्यांनी असे काही कडक नियम बनविले की, या पोपांच्या आज्ञेशिवाय लोकांना झोपणे, उठणे, बसणे, जाणे, येणे, खाणे, पिणे इत्यादी गोष्टीही करणे कठीण झाले. राजे लोकांच्या मनात या भारतीय पोपांनी असे ठसविले की, ब्राह्मण व साधू यांनी वाटेल ते केले तरी त्यांना शिक्षा होऊ नये, एवढेच नव्हे तर त्यांना शिक्षा करण्याचा विचारही मनात आणता कामा नये.
     जेव्हा लोक असे मूख बनले तेव्हा हे पोप मनास येतील त्या गोष्टी करू लागले व इतरांकडून करवून घेऊ लागले. हा परिस्थितीत झालेला बिघाड महाभारत युद्धाच्या आधी एक हजार वर्षांपासून झाला होता. कारण त्या काळी चांगले ऋषी-मुनी होते. तरी पण आळस, प्रमाद, ईर्ष्या, द्वेष यांचे थोडे फार अंकुरी फुटू लागले होते ते वाढत वाढत मोठे झाले. जेव्हा सदुपदेश कमी होत गेला तसतसे आर्यावर्तात अजून पसरू लागले आणि लोक आपसात भांडू-लढू लागले. कारण,

उपदेश्योपदेष्टृत्वात् तत्सिद्धि ।। इतरथान्धपरम्परा।। -सांख्यसू०।। ।।अ० ३।।सू० ७०, ७१।।

     जेव्हा उत्तमोत्तम उपदेशक विद्यमान असतात तेव्हा धर्म, अर्थ, काम व मोक्ष सिद्ध होतात. परंतु जेव्हा चांगले उपदेशक व श्रोते नसतात तेव्हा अंध परंपरा चालू होते. परंतु जेव्हा सत्पुरुष उत्पन्न होऊन सद्धर्माचा उपदेश करतात, तेव्हा अंध परंपरा नष्ट होऊन सत्याचा प्रकाश होतो.

वाममार्ग समीक्षा

     पुनः ते पोप लोक आपली व आपल्या चरणांची पूजा करवून घेऊ लागले आणि सांगू लागले की, “यातच तुमचे कल्याण आहे" जेव्हा लोक मनाने त्यांचे गुलाम बनले तेव्हा पोप विषयसेवनात दंग झाले ते जणू धनगर, मेंढपाळाप्रमाणे होऊन खोटे गुरू बनले आणि लोक चले बनले. लोकांमधून विद्या, बला, बुढी, पराक्रम, शौर्य, वीरता इत्यादी सद्गुण नष्ट होऊ लागले. नंतर विषयासक्त होऊन लपून छपून मांसाशन व मद्यपान करू लागले. मग त्यातूनच एक वाममार्ग उत्पन्न झाला. शिव उवाच, 'पार्वत्युवाच, ‘भैरव उवाच यांसारखे मंत्र तयार करून त्याचे नाव तंत्र ठेवले. त्या ग्रंथामध्ये अशा विचित्र गोष्टी लिहिलेल्या आढळतात त्या याप्रमाणे:-

अयं मांसं च मीनं च मुद्रा मैथुनमेव च।
एते पञ्चमकाराः स्युर्मोक्षदा हि युगे युगे ॥१॥
प्रवृत्ते भैरवीचक्रे सर्वे वर्णा द्विजातय ।
निवृत्ते भैरवीचक्रे सर्वे वर्णा पृथक् पृथक्।।२।। कालातन्त्रादि
पीत्वा पीत्वा पुन पीत्वा यावत्पतति भूतले।
पुनरुत्थाय वै पीत्वा पुनर्जन्म न विद्यते।।३।। कुलार्णव तन्त्र अ० ८।। श्लो० ९६।।
मातृयोनि परित्यज्य विहरेत् सर्वयोनिषु।।४।। कुलार्णव तन्त्र अ० ७।। श्लो० १००।।
वेदशास्त्रपुराणानि सामान्यगणिका इव ।
एकैव शाम्भवी मुद्रा गुप्ता कुलवधूरिव।।५।। ज्ञान संकलन तन्त्र

     या घमेंडखोर पोपांची ही लीला पाहिली. या वाममार्गी लोकांनी वेदांविरुद्ध व महान अधार्मिक गोष्टींनाच श्रेष्ठ ठरविले आहे. मद्य, मांस, मासळी, मुद्रा पुऱ्या, कचोऱ्या सेवन व पाचवे मैथुन म्हणजे सर्व पुरुष शिव व सर्व स्त्रिया पार्वती असे मानून आणि अहं भैरवस्त्वं भैरवी ह्यावयोरस्तु संगमः ।। कुलार्णव तन्त्र उल्लास ८-९७,१०२

    मी भैरव असून तू भैरवी आहेस. आपणा दोघांचा संगम होवो. हा असंबद्ध मंत्र म्हणून कोणत्याही पुरुषाने कोणत्याही स्त्रीशी समागम केला असता त्यात काही दोष नाही, असे हे वाममार्गी समजतात. ज्या स्त्रिया मासिक पाळी वगैरे कारणांनी अस्पर्श समजल्या जातात त्यांना हे वाममार्गी लोक अत्यंत पवित्र मानतात. शास्त्रांनी रजस्वला वगैरे स्त्रियांना स्पर्श करणे निषिद्ध ठरविले आहे. परंतु त्यांना या वाममार्गी लोकांनी अत्यंत पवित्र मानले आहे. ऐका त्यांचा अंटसंट श्लोक:-

रजस्वला पुष्करं तीर्थं चाण्डाली तु स्वयं काशी ।
चर्मकारी प्रयाग स्याद्रजकी मथुरा मता ।।
अयोध्या पुक्कसी प्रोक्ता।। रुद्रयामल तंत्र इत्यादी०

      याचा अर्थ असा :- रजस्वला स्त्री समागम करण्याने जणू पुष्करतीर्थातीळ स्नान, चांडालीशी समागम केल्याने काशी यात्रा, चांभारणीशी संभोग केल्याने प्रयागस्नान, धोबीणीशी संग केल्याने मथुरेची यात्रा आणि वेश्येशी समागम केल्याने अयोध्येची यात्रा केली. दारूला तीर्थ, मांसाला 'शुद्धी' आणि 'पुष्य' मासळीला 'तृतीया' किंवा 'जलभोपळा, मुद्देला ‘चतुर्थी' आणि मैथुनाला 'पंचमी अशी नावे ठेवली आहेत. इतरांना कळू नये म्हणून त्यांनी ही अशी नावे ठेवलीत. त्यांची आपली नावे-कौल (कपळ), आर्द्र (दयाळू),  वीर शांभव (शंभूचे उपासक), गण वगैरे ठेवली आहेत आणि जे वाममार्गी मतात नाहीत त्यांना ते कंटक' विमुख','शुष्कपशू' (मरतुकडी जनावरे) इत्यादी नावे देतात. ते म्हणतात की जेल भैरवीचक्र सुरू होते तेव्हा त्यामध्ये ब्राह्मणांपासून चांडाळांपर्यंत सारेच द्विज होतात; आणि जेव्हा ते भैरवीचक्रातून वेगळे होतात तेव्हा आपापल्या मूळ वर्णाचे होतात.
     वाममार्गी लोक जमिनीवर किंवा पाट्यावर बिंदू, त्रिकोण, चतुष्कोण किंवा वर्तुळ काढून भैरवीचक्रात त्यावर दाने भरलेली घागर ठेवून तिची पूजा करतात. मग ते असा मंत्र म्हणतात "ब्रह्मशापं विमोचथ!" हे मद्या! तू ब्रह्मा आदींच्या शापापासून रहित हो. वाममार्गी स्त्रीपुरुष एखाद्या गुप्त ठिकाणी जमतात. तेथे ते वाममार्गी लोकांशिवाय इतर कोणाला येऊ देत नाहीत. मग एका स्त्रीला नागवी करून तिची पूजा करतात व एका पुरुषाला नग्न करून स्त्रिया त्याची पूजा करतातत्यानंतर स्त्री त्याची स्वतःची मता अथवा दुसऱ्याची पत्नी, कन्या, आई, बहीण, सून यापैकी कोणी का असेना येतात. त्यानंतर एका भांड्यात दारू आणि एका परातीत मांसाचे तुकडे, वडे ठेवतात. मग त्यांचा आचायं ते मद्यपात्र हातात घेऊन 'भैरवोऽहम् शिवोऽहम्' -मी भैरव आहे. मी शिव आहे असे म्हणतो आणि मद्यपान करतो. त्यानंतर त्या उष्ट्या पात्राने सगळेजण पितात त्यानंतर एखाद्या स्त्रीला किंवा वेश्येला किंवा पुरुषाला मम करून त्याच्या हातात तलवार देतात मग स्त्रीला देवी व पुरुषाला महादेव असे समजतात. मग त्यांच्या जननेंद्रियांची पूजा करून त्या देवला किंवा शिवाला मद्यपाजतात आणि त्याच उष्ट्या पात्रातून सर्वजण एकेक पेलाभर दारू पितात. याच क्रमाने वारंवार मद्यप्राशन करून ते पुरे किंगतात मग ती कुणाचीही बहीण, मुलगी किंवा आई असली तरी आणि मनास येईल त्या स्त्रीशी कुकर्म करतात. कधी-कधी त्या नशेत ते एकमेकांशी जोड्यांनी, लाथा-बुक्यांनी मारामारी करतात व एकमेकांच्या झिंज्या उपटतात. काही जणांना तेथेच वांत्या होतात. त्यांच्यापैकी जो मोठ्या पदाला पोचलेला अघोरी म्हणजे सिद्ध पुरुष असतो तो पडलेली उल्टी खातो. अशी त्यांच्या त्या सर्वात मोठ्या सिद्धाची गोष्ट आहे.

हालां पिबति दीक्षितस्य मन्दिरे सुप्तो निशायां गणिकागृहेषु। विराजते कौलवचक्रवर्ती।।

     जो दीक्षिताच्या म्हणजे कलालाच्या घरी जाऊन बाटल्यांवर बाटल्या दारू ढोसतो. वेश्येच्या घरी जाऊन तिच्याशी संभोग करून झोपतो आणि ही सारी दुष्कृत्ये करण्यामध्ये निर्लज्ज, नि:शंक असतो तोच वाममार्गी लोकांमध्ये चक्रवर्ती राजाप्रमाणे सर्वश्रेष्ठ समजला जातो. अर्थात त्यांच्यात जो अत्यंत दुराचारी असेल तोच सर्व श्रेष्ठ आणि जो वईट कामांना भितो तो लहान असतो. कारण,

पाशबद्धो भवेज्जीव पाशमुक्त सदा शिव ।।  ज्ञानसंकलनी तंत्र ।। श्लो० ४३

     त्यांच्या तंत्रामध्ये असे आहे की, लोकलज्जा, कुललज्जा, देशलज्जा इत्यादी पाशांनी जो बांधलेला असतो तो जीव आणि जो निर्लज्ज बनून दुराचार करतो तोच सदाशिव आहे.
    उड्डीस तंत्र इत्यादींमध्ये एक प्रयोग नमूद केलेला आहेकी:- एका घरामध्ये चारही बाजूना खोल्या असाव्यात. त्या खोल्यांमध्ये मद्याच्या बाटल्या भरून ठेवाव्यात. एका खोलीत जाऊन दारूची बाटली प्यावी. तेथून दुसऱ्या खोलीत जाऊन तेथील एक बाटली प्यावी. मग तिसऱ्या खोलीत जाऊन तेथील एक बाटली प्यावी चौध्या खोलीत जावे. अशा प्रकारे उभ्या उभ्या दारू पीत जावे. एखाद्या काठीप्रमाणे जमिनीवर कोसळेपर्यंत एका मागून एका खोलीत जाऊन दारू प्यावी. नशा उतरल्यावर पुन: असेच धराशायी होईपर्यंत मद्यपान करावे. तिसऱ्यांदा असे मद्यपान करून जो उठतो त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. खरी गोष्ट अशी आहे की, अशा माणसांना पुनः मनुष्य जन्म मिळणेच कठिण आहे. त्यांना गेल्यानंतर एखाद्या नीच योनीत दीर्घ काळापर्यंत खितपत पडावे लागेल.
     वाममार्गी लोकांच्या तंत्रग्रंथामध्ये असा नियम आहे की, एक आई सोडून कोणतीही स्त्रीला वर्ज्य समजू नये. मग ती, स्वत:ची मुलगी अथवा बहीण का असेना तरी तिच्याशी संभोग केला पाहिजे. या वाममार्गी लोकांच्या दहा महाविद्या प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक मातंगी विद्यावाला म्हणतो की ‘मातरमपि न त्यजेत्। म्हणजे आईलाही समागम केल्याशिवाय सोडू नये आणि स्त्री पुरुष समागमाच्या वेळी ’आम्हाला सिद्धी प्राप्त होवो असा मंत्र जपतातअसे वेडे व महामूखी माणसे जगामध्ये फारच कमी असतील !! जो माणूस असत्याचरण करू इच्छितो तो सत्याची निंदा अवश्य करणारच. वाममार्गी काय म्हणतात पाहा! वेद, शास्त्रे व पुराणे ही सारी सामान्य वेश्यांसारखी आहेत. परंतु ही शांभवी वाममार्गी मुद्रा मात्र गुप्त कुळाच्या स्त्री सारखी आहे. अशा या लोकांनी वेद विरुद्ध आपले मत स्थापन केले. कालांतराने त्यांचे हे मत खूप प्रसिद्ध झाले. तेव्हा त्यांनी धूर्तपणे वेदांच्या नावाखालीही आपले वाममार्ण तत्त्वज्ञानाची थोडीथोडी लीलाचालविली. अर्थात-

सौत्रमण्यां सुरां पिबेत् । प्रोक्षितं भक्षयेन्मांसम् ।।मनु०।। अ०५ ।। श्लो० २७।।
वैदिकी हिंसा, हिंसा न भवति  ।।मनु०।। अ०५ ।। श्लो० ५६।।

     "सौत्रामणी यज्ञात मद्य प्राशन करावे." याचा अर्थ तर असा आहे की, सौत्रामणी यज्ञामध्ये सोमरस म्हणजे सोमवल्लीचा रस प्यावा. “प्रोक्षित म्हणजे यज्ञात मांसाचे भक्षण करण्यात दोष नाही."अशा नीचपणाच्या गोष्टी या वाममार्गीयांनी चालविल्या आहेत. त्यांना असे विचारले पाहिजे की, वैदिकी (यज्ञातील) हिंसा ही जर हिंसा नसेल तर तुम्हांला व तुमच्या कुटुंबाला मारून होम केला तर काय हरकत आहे? ॥१॥

न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
प्रवृत्तिरेषा भूतानां निवृत्तिस्तु महाफला ।। २ ।।मनु०।। अ०५ ।। श्लो० ५६।।

      "मांस भक्षण करणे, दारू पिणे, परस्त्रीगमन करणे यात मुळीच दोष नाही, असे म्हणणे हा निव्वळ पोरकटपणा आहे. कारण प्राण्यांना दुःख दिल्याशिवाय मांस प्राप्त होत नाही; आणि कसलाही अपराध नसताना एखाद्याला दुःख देणे हे धर्माचे काम नाही. मद्यपान हे तर सर्वथा निषिद्ध आहे. कारण वाममार्गी लोकांच्या ग्रंथांखेरीज इतर कोणत्याही ग्रंथात मद्यपान गाही. परंतु त्याचा सर्वत्र निषेध केलेला आहे. तसेच विवाहापूर्व समागम करण्यात दोष आहे पण याला निर्दोष समजणारा दोषी आहे॥२॥
      अशा प्रकारची वचने ऋषींच्या ग्रंथांमध्ये घुसवून कितीतरी ऋषी मुनींच्या नावाने ग्रंथ रचून गोमेध, अश्वमेध नावांचे यज्ञही करविले जाऊ लागते. या पशूना मारून त्यांची आहुती होमामध्ये दिल्यास यजमान व पशु यांना स्वर्ग मिळतो असे या लोकांनी जाहीर केले. वस्तुतः ब्राह्मणग्रंथांमध्ये अश्वमेध, गोमेध, नरमेध इत्यादी जे शब्द येतात त्यांचा खरा अर्थच त्यांना समजलेला नाही. त्यांना तो समजला असता तर त्यांनी असा अर्थाचा अनर्थ कशाला केला असता?
(प्रश्न) अश्वमेघ, गोमेध, नरमेध वगैरे शब्दांचा अर्थ काय आहे?
(उत्तर) त्यांचा अर्थ असा आहे की,
राष्ट्रं वा अश्वमेध ।  शतपथ० प्रपा० १३।।ब्रा० १।। कं० ६।। व० ३।।
अन्नँ्हि गौ । शतपथ० प्रपा० ४।।ब्रा० १३।। कं० १।। व० २५।।
अग्निर्वा अश्व । शतपथ० प्रपा० ३।।ब्रा० ६।। कं० २।। व० ५।।
आज्यं मेध ।। शतपथ० प्रपा० १३।।ब्रा० ३।। कं० ६।। व० २।।
     घोडा, गाय वगैरे पशूना अथवा माणसाला मारून त्यांचा होम करावा असे कोठेही लिहिलेले नाही. केवळ वाममार्गी लोकांच्या ग्रंथामध्ये असा अनर्थ लिहिला आहे. परंतु ही गोष्टही वाममार्गीयांनी सुरू केली. आपली ही मते वैदिक ग्रंथांमध्ये घुसवून दिली आहेत. असे पहा ! शतपथ ब्राह्मण या ग्रंथांत असे सांगितले आहे की, राजाने न्यायाने व धर्माने प्रजेचे पालन करणे, विद्याचे दान करणारा यजमान आणि अग्नीमध्ये तुपाने होम करणे हा अश्वमेध यज्ञ आहे. अन्न, इंद्रिये, किरण, पृथ्वी इत्यादी पवित्र ठेवणे हा गोमेध यज्ञ होय. मनुष्य मेल्यानंतर त्याच्या शरीराचे विधिपूर्वक दहन करणे याला नरमेध यज्ञ म्हटला जातो.
(प्रश्न) यज्ञ करणारे असे म्हणतात की, यज्ञ केल्याने यजमान व पशू स्वर्गाला जातात. होम केल्यानंतर मृत पशूला पुन: जिवंत करीत असत, हे सारे खरे आहे काय?
(उत्तर) नाही. यज्ञ करणारा यजमानव यज्ञात बळी दिला जाणारा पशू हे स्वर्गाला जातात असे म्हणणाऱ्यास मारून, होमामध्ये त्याची आहती देऊन त्याला स्वर्गात पाठविले पाहिजे किंवा त्याचे प्रिय माता-पिता, पली, पुत्र इत्यादिकांना मारून होमामध्ये त्यांची आहुती देऊन त्यांना स्वर्गाला का पाठवीत नाहीत? किंवा होमकुंडातून पुनः जिवंत का करीत नाहीत ?
(प्रश्न) जेव्हा लोक यज्ञ करतात तेव्हा वेदांतील मंत्र म्हणतातते मंत्र वेदांमध्ये नसते तर यज्ञामध्ये त्यांनी ते कसे म्हटले असते ?
(उत्तर) मंत्र म्हणण्यापासून कोणी कोणाला अडवू शकत नाही. कारण मंत्र हा एक शब्द आहे. परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की पशुला मारून हवन करावे. ‘अग्नये स्वाहा इत्यादी मंत्राचा अर्थ असा की, अमीमध्ये तूप वगैरे पौष्टिक पदार्थाचे हवन केल्याने वायु, वृष्टि, जल यांची शुद्धी होऊन जगाला उपकारक होतात. परंतु हा सत्य अर्थ त्या मूढांना कसा कळणार? कारण जे स्वार्थ बुद्धि लोक त्यांच्या स्वार्थाखेरीज दुसरे काही जाणत नाही व मान्य करीत नाहीत.
     जेव्हा लोकांनी या पोपांचा हा अनाचार पाहिला आणि मृत व्यक्तीचे श्राद्ध, तर्पण वगैरे गोष्टी पाहिल्या तेव्हा वेदादी शास्त्रांचे निंदक असे महाभयंकर जैन व बौद्ध पंथ उदयाला आले. असे ऐकले की, आपल्या देशात गोरखपूरचा एक राजा होता. त्याच्याकडून या पोपांनी एक यज्ञ करविला. त्याच्या प्रिय राणीचा घोड्याशी समागम करविल्याने ती मेली. यामुळे राजाला वैराग्य प्राप्त झालेआणि तो आपल्या मुलाला राज्यावर बसवून स्वत: साधू बनला आणि या पोषांचे विंग फोडू लागला. याचा परिणाम होऊन जैन किंवा बौद्ध पंथाच्या शाखा चार्वाक व आभाणक या नावांनी प्रचलित झाल्या. त्यांनी अशा प्रकारचे श्लोक बनविले आहेत:

पशुश्चेन्निहत स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति।
स्वपिता यजमानेन तत्र कथं न हिस्यते।। सर्वदर्शनसंग्रह, चार्वाकमत-प्रकरण

पशुला मारून अग्नीमध्ये त्याचे हवन केल्याने तो पशू स्वर्गाला जात असेल तर यजमान आपल्या बापाला वगैरे मारून त्यांना स्वर्गात का पाठवीत नाहीत ?॥१॥

मृतानामिह जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम्।
गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम्।।सर्वदर्शनसंग्रह, चार्वाकमत-प्रकरण

     श्राद्ध व तर्पण केल्याने मेलेल्या माणसांची तृप्ती होत असेल तर परदेशी जाणार्या माणसांनी वाटखर्च व खाण्यापिण्यासाठी बरोबर पैसे त्यांना देणे निरर्थकच आहे.॥२॥
    कारण जर मेलेल्या माणसाला श्राद्ध व तर्पण केल्याने अन्न-पाणी मिळते तर परदेशी जाणाऱ्या अथवा रस्त्याने जाणाऱ्या माणसाला त्याच्या घरच्या लोकांनी त्याच्या नावाने जेवणाचे पान वाढून ठेवले व लूट भरून पाणी ठेवले तर, ते त्याला का मिळत नाही ? परदेशी राहणाऱ्या किंवा दहा हातावर दूर बसलेल्या माणसाला त्याच्या नावाने दिलेले पोहचत नाही तर मेलेल्या व्यक्तीपर्यंत ते कोणत्याही प्रकारे पोहचू शकत नाही. अशा प्रकारचा चार्वाकाचा युतीयुक्त उपदेश ऐकून लोक मानू लागले आणि त्यांचे मत बाढू लागले.
     जेव्हा पुष्कळसे राजे व जमीनदार या पंथांचे अनुयायी बनले, तेव्हा यथाकथित पोप सुद्धा घबाड प्राप्तिसाठीही तिकडे वळले. ते झटकन जैन बनले. जैनांमध्येही वेगळ्या प्रकारच्या पोपलीला खूप आहेत. त्या बाराव्या समुल्लासात विस्ताराने लिहिणार आहोते. अनेकांनी त्या पंथाचा स्वीकार केला. परंतु डोंगराळ प्रदेशांतील काशी, कनोज पश्चिम व दक्षिण भारतातील लोकांनी जैन पंथाचा स्वीकार केला नाही. त्या जैनांना वेदांचा अर्थ कळला नसून ते बाहेरच्या पोप लीलांच्याभूत गोष्टी वेदसमंत  समजून वेदांची निंदा करू लागले. त्यामुळे वेदांचे अध्ययन-अध्यापन, यज्ञोपवीतादी संस्कार व ब्रह्मचर्यादी नियम यांचाहास होऊ लागला. त्यांनी वेदादिकांचे जेथे जेवढे ग्रंथ मिळाले ते नष्ट केले. त्यांनी आर्यावर राजसत्ता चालवून त्यांना दुख दिले.जेव्हा त्यांना भय उरले नाही तेव्हा त्यांनी आपल्या पंथातील गृहस्थ व साधू यांची प्रतिष्ठा व वेदमार्गी लोकांचा अपमान करण्यास सुरुवात केली व छळही करीत राहिले आणि जैन लोक स्वत: मात्र सुखात चंगीत अभिमानाने फुलून राहू लागले. ऋषभदेवापासून महावीरापर्यंत आपल्या तीर्थकरांच्या मोठमोठया पाषाणाच्या मूर्ती बनवून ते त्यांची पूजा करू लागले. अर्थात पाषाणादी मूर्तिपूजेची मूळ प्रथा जैनांपासून सुरू झाली. परमेश्वराला मानणे गौण झाले आणि मूर्तीपूजेमध्ये लागलेअसे हे जैनांचे राज्य आर्यावत्तांत तीनशे वर्षे चालले. या काळात वेदार्थज्ञानापासून लोक शून्य झाले. ह्या गोष्टीस अनुमानाने अडीच हजार वर्षे झाले असावेत.

श्री शंकराचार्यांचे कार्य

     सुमारे २,२०० वर्षांपूर्वी द्रविड देशातील एका ब्राह्मण कुलोत्पन्न एक शंकराचार्य ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून व्याकरणादी सर्व शास्त्राचे अध्ययन करूल विचार करू लागले की, 'अरे ! सत्य, आस्तिक वेदमत सुटणे आणि जैन नास्तिक मत प्रचलत होणे ही अत्यंत हानिकारक गोष्ट आहेकसेही करून हे हटविले पाहिजे शंकराचार्यांनी शास्त्राचे अध्ययन तर केलेले होतेच; परंतु जैनपंथाच्या ग्रंथांचाही अभ्यास केला होता आणि त्यांचा युक्तिवादही प्रबळ होता. त्यांनी विचार केला की जैगपंथाला कशारीतीने हटवावे ? उपदेश व शास्त्रार्थ यांमुळे हे हटविले जाईल असा विचार करून ते उज्जयिनी नगरीत आले. त्यावेळी तेथे सुधन्वा नावाचा राजा होता. याने जैनांचे ग्रंथ आणि थोडेफार संस्कृत ग्रंथही वाचले होते तेथे जाऊन शंकराचार्य वेदांचा उपदेश करू लागले. राजाला भेटून ते त्याला म्हणाले, 'आपण संस्कृतचे आणि जैनांचेही ग्रंथ वाचले आहेत. आणि स्वत: जैनपंथाचा स्वीकार करता आहात म्हणून मी आपल्याला सांगतो आहे की, आपण माझा जैन पंडितांशी शास्त्रार्थ घडवून आणा. त्यामध्ये अशी अट राहील की, जो शास्त्रार्धात पराभूत होईल त्याने जिंकणाऱ्याच्या मताचा स्वीकार करावा. एवढेच नव्हेतर तुम्ही सुद्धा स्वत:ही विजयी मताचा स्वीकार करावा.
     सुधन्वा राजा जैन मतात होते तथापि त्यांनी संस्कृत ग्रंथ वाचलेले असल्याने त्याच्या बुद्धीमध्ये थोडाफार ज्ञानाचा प्रकाश होता. त्यामुळे त्याच्या मनात पराकोटीचे पशुत्व भरलेले नव्हते. कारण जो विद्वान असतो तो सत्यासत्याची पारख करून सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करतो. सुधन्वा राजाला जोपर्यंत कोणी मोठा विद्वान उपदेशक भेटला नव्हता तोपर्यंत ते संदेहात होते की वैदिक धर्म व जैन मंतांपैकी कोणते खरे व कोणते खोटे आहे? शंकराचार्यांचे हे बोलणे ऐकून त्याला खूप आनंद झाला; आणि म्हणाला, 'शास्त्रार्थ घडवून आणून आम्हा सत्यासत्याचा निर्णय अवश्य करून घेऊ. त्याप्रमाण जैन पंडितांना दूरवरून बोलावून आणण्यात आले आणि शाखाथांची सभा केल.
     त्या वादविवादामध्ये शंकराचार्य वैदिकमत वजेन विद्वान वेदांविरुद्ध मतांचे होते. अर्थात शंकराचार्याच पक्ष वैदिक-मताचे मंडन व जैनमताचे खंडन करणारा व जैन पंडित आपल्या मताचे मंडन व वेदांचे खंडन करणार होतेहा शास्त्रार्थ कित्येक दिवस चालला. जैनांचे असे मत होते की, सृष्टीचा कर्ता अनादी ईश्वर वगैरे कोणीही नाही. हे जग ब जीव अगदी आहेत. या दोघांची उत्पत्ति आणि नाश कधीच होत नाही. याउलट शंकराचार्याचे असे मत होते की, अनादी सिद्ध परमात्मा हाच जगाचा कर्ता आहे. हे जग व जीव मिथ्या आहेत. कारण त्या परमेश्वराने आपल्या मायेने हे विश्व बनविले आहे. तोच त्याचे धारण करतो व प्रलय करतो आणि हे जीव व जग हे स्वप्नवत आहे. परमेश्वरस्वत:च सर्वरूप बनून लीला करीत आहे
     हा शास्त्रार्थ बरेच दिवस चालत राहिला. पतु अखेर युक्तिवाद व पुरावे यामुळे जैनमत टिकाव धरू शकले नाही व शंकराचार्यांचे मत अखंडीत राहिले. तेव्हा त्या जैन पंडितांनी व सुधन्वा राजाने वैदिक-मताचा स्वीकार केला व जैन मत सोडले यामुळे खूप खळबळ माजली. तेव्हा सुधन्वा राजाने आपल्या अनेक इष्टमित्र राजांना कळवून जागोजागी शंकराचार्यांशी शास्त्रार्थ घडवून आणला. परंतु जैनमताचा पराजय सतत होत गेला.
      यानंतर सुधन्वादी राजांनी शंकराचार्यांना साऱ्या आर्यावर्त्तात भ्रमण करता यावे अशी व्यवस्था केली आणि त्यांच्या रक्षणासाठी नोकरचाकरही दिले. त्या वेळेपासून आर्यावर्तात सर्वांचे यज्ञोपवीत संस्कार होऊ लागले आणि वेदांचे अध्ययन-अध्यापन सुरू झाले. शंकराचार्यांनी दहा वर्षांपर्यंत आर्यावर्त्तात सर्वत्र फिरून जैनमताचे खंडन व वेदांचे मंडन केले. ज्या भग्न जेन मूर्ती आज प्राप्त होतात त्या शंकराचार्यांच्या काळी जैनपंथाचा त्याग करणाऱ्या लोकांनी ध्वंसित केल्या होत्या. शंकराचार्यांच्या वेळी ज्या भग्न केल्या होत्या व ज्या अखंडीत मूर्ति होत्या त्यांना जैनांनी भूमित गाडून टाकल्या होत्या कारण त्यांचा नाश केला जाऊ नये. त्या आजही निघत आहेत ज्याच्यामध्ये काही अखंडित मूर्तीही सापडतात.
      शंकराचार्यापर्वा शैवमताचाही थोडासा प्रचार होता. त्याचे सुद्धा खंडन शंकराचार्यांनी केले. वाममार्गाचेही खंडण केलेत्या काळी या देशात विपुल धन होते व देशभक्तीही होती. जैनांची मंदिरे शंकराचार्य व सुधन्वा राजा यांनी उध्वस्त केली नव्हती. कारण त्या ठिकाणी वेदादिशास्त्रांच्या पाठशाळा स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. अशा प्रकारे वैदिकमताची पुन: स्थापना झाली आणि वेदविद्येचा प्रचार करण्याचा विचार चालू झाला. इतक्यात दोन कपटी जैन मुनि शंकराचार्याजवळ आले. ते आतून कट्टर जेन होते. परंतु ते कपटी मुनि होते. शंकराचार्य त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होते. त्या दोघांनी संधी साधून कपटाने शंकराचार्यांना अशी एक विषारी वस्तू खाऊ घातली की, तिच्यामुळे आचार्याची भूक मंदावली आणि त्यांच्या अंगावर फोड उठले. सहा महिन्यांच्या आत आचायचे देहावसान झाले आणि सारे आर्य निरुत्साहित झालेत्यामुळे वेदविद्येचा जो प्रचार होणार होता तो होऊ शकला नाही.
       शंकराचार्यांनी शारीरभाष्य आदी जैनमताचे खंडन करणारे जे ग्रंथ लिहून ठेवले होते, त्यांचा प्रचार आचार्यांचे शिष्य करू लागले. जैन मताच्या खंडासाठी आचार्यानी ब्रह्म सत्य, जग मिथ्या आणि जीव ब्रह्म यांची एकता कथन केली होती त्यालाच वेदमत समजून त्याचा उपदेश करू लागले. आचार्यानी दक्षिणेस श्रृंगेरी, पूर्वेस भूगोवर्धन, उत्तरेस जोशीमठ व पश्चिमेस द्वारकेला शारदा मठ, स्थापना करून त्यांचे शिष्य या मठांचे महंत बनून श्रीमंत झाले व चैन करू लागले. कारण शंकराचार्यानंतर त्यांच्या शिष्यांना खूप मान मान्यता होत होती.
     येथे हे विचारले पाहिजे की, जीव व ब्रह्म यांचे ऐक्य आणि जण मिथ्या हे जे शंकराचार्यांचे वैयक्तिक मत होते तर ते बरोबर नव्हते. परंतु जैनमताच्या खंडासाठी त्यांनी हे मत मांडले असेल तर काही अंशी का होईना ते चांगले झाले.

नवीन वेदान्ती लोकांचे मत असे आहे:-

अद्वैतवाद समीक्षा

(प्रश्न) जग स्वप्नवत आहे. जसा दोरीमध्ये सापाचा, शिंपल्यामध्ये चांदीचा, मृगजळामध्ये पाण्याचा भास होतो तसे किंवा गंधर्वनगर आणि इंद्रजाल याप्रमाणे हे विश्व मिथ्या असून एक ब्रह्म हेच सत्य आहे
(सिद्धान्ती) तुम्ही मिथ्या कशाला म्हणता?
(नवीन वेदान्ती) जी वस्तू नसते, नाही मात्र प्रतीत होते तिला आम्ही मिथ्या असे म्हणतो.
(सिद्धान्ती) जी वस्तू अस्तित्वातच नाही, तिची प्रतीती कशी होऊ शकते?
(नवीन.) अध्यारोपाने.
(सिद्धान्ती) अध्यारोप म्हणजे काय?
(नवीन.) वस्तुन्यवस्त्वारोपणमध्यास ’।। वेदान्तसार खण्ड ६
अध्यारोपापवादाभ्यां निष्प्रपञ्चं प्रपञ्च्यते।। अनुभूतीप्रकाश १।१८।। एका पदार्थावर पदार्थ काही दुसरा असतो पण त्यावर अन्य वस्तूंचा आरोप करणे म्हणजे याला अध्यास किंवा अध्यारोप असे म्हणतात. या अध्यारोपाचे निराकरण करणे, याला अपवाद असे म्हणतात. अध्यारोप व अपवाद यांच्या योगाने प्रपंचरहित ब्रह्मामध्ये प्रपंचरूप जगाचा विस्तार होतो.
(सिद्धान्ती) तुम्ही दोरीला वस्तू आणि सापाला अवस्तू समजून या भ्रमामध्ये पडले आहात.साप ही वस्तू नाही काय? तुम्ही असे म्हणाल की, साप या वस्तूचा संस्कार मात्र हुदयात आहे परंतु ती इतरत्र कोठेतरी आहे मग तो सर्पसुद्धा अवस्तू राहिला नाही. याचप्रमाणे वाळलेल्या झाडाच्या खोडामध्ये माणसाचा व शिंपल्यामध्ये चांदीचा वगैरे भास समजून घ्यावा परंतु स्वनामध्येही अशाच गोष्टी दिसतात ज्या कोठेतरी अस्तित्वात असतात. त्यांचे संस्कार त्याच्या आत्म्यामध्येही आहेत. म्हणून ते स्वनही वस्तूमध्ये अवस्तूचे आरोपण करण्यासारखे
(नवीन.) कधीही न पाहिलेल्या व न ऐकलेल्या जसे, आपले डोके छाटले आहे. आपण रडत आहोत, पाण्याचा प्रवाहवर चालला आहे, यांसारख्या कधीही न घडलेल्या गोष्टी पाहिल्या जातात. त्या कशा सत्य होऊ शकतात ?
(सिद्धान्ती) हाही दृष्टांत तुमचे म्हणणे सिद्ध करीत नाही. कारण जे पाहिलेले किंवा ऐकलेले नसते त्याचा संस्कार होत नाही. संस्काराखेरीज स्मृती व स्मृती खेरीज साक्षात अनुभव होत नाही. एखाद्याचे डोके युद्धात कापलेले कोणीतरी पाहिले किंवा ऐकले आणि त्याचा भाऊ, बाप वगैरेला रडताना प्रत्यक्ष पाहिले, कारंजाचे पाणी वर उडताना पाहिले किंवा ऐकले तर त्याचे संस्कार त्याच्या अंत:करणामध्ये जमा होतात. जेव्हा तो माणूस जागृतीच्या अवस्थेपासून वेगळा होऊन पाहतो तेव्हा त्याने ज्या गोष्टी जागृतावस्थेत पाहिलेल्या अथवा ऐकलेल्या असतात त्यांचे दर्शन त्याला आत्म्यात घडते. आपले डोके कापले आहे, आपण रडत आहोत आणि पाण्याचा प्रवाह ऊर्ध्व दिशेला वाहत आहे असे वाटते हे काही वस्तूवर अवस्तूचे आरोपण सदृश नाही. तर ज्याप्रमाणे चित्र  ढणारी व्यक्ती, पूर्वी पाहिलेल्या, ऐकलेल्या किंवा केलेल्या गोष्टी आत्म्यामधून काढून कागदावर उतरविते किंवा प्रतिबिंब काढणारा माणूस बिंबाला पाहून त्याचे स्वरूप आत्म्यात साठवतो स्वप्नात जसे की आपल्या शिक्षकाला पाहतो किंवा बहुत वेळी पाहून व ऐकून अतीत जाणून साक्षात्कार करतो. कधी-कधी पडणारे स्वप स्मरणजन्य असते. अशा वेळी पूर्वी आपण जे पाहिले, ऐकले अथवा केले होते तेच त्यालाच ऐकतो, पाहतो व करतो, जागृतावस्थेत जसे स्मरण होते तसे ते स्वामध्ये होत नसते. म्हणून तुमची अध्यास व आरोप यांची लक्षणे खोटी आहेत. तसेच वेदान्ती जो विवर्तवाद प्रतिपादितात म्हणजे दोरीमध्ये सपांचा भास किंवा ब्रह्मामध्ये जगाचा भास होण्याचा जो दृष्टांत देतात, तोही ठीक नाही.
(नवीन.) अधिष्ठानाखेरीज अध्यस्त (आरोपित) वस्तूची प्रतीती होत नाही. दोरी नसेल तर सापाचा भासही होत नाही. शिवाय दोरीमध्ये तीन्ही काळी सर्ष असत नाही. फक्त अंधुक प्रकाशात अचानक दोरी दृष्टीस पडली तर सापाचा भास होऊन माणूस घाबरतो. परंतु दिव्याने तो पाहतो तेव्हा त्याचा भ्रम दूर होतो आणि भीती नाहीशी होते. तसे ब्रह्मा जी जगाची मिथ्या प्रतीती झाली आहे ती ब्रह्माच्या साक्षात्काराने त्या जगाची निवृत्ति आणि ब्रह्माची प्रतीत . जशी सपची निवृत्ति आणि दोरीची प्रतीती होत असते.
(सिद्धान्ती) ब्रहामध्ये जगाचा भास कोणाला झाला?
(नवीन.) जीवाला,
(सिद्धान्ती) जीव कोठून आला?
(सिद्धान्ती) अज्ञान कोठून आले व ते कोठे राहते?
(नवीन.) अज्ञान हे अगदी असून ते ब्रह्मामध्ये राहते.
(सिद्धान्ती) ब्रह्मामध्ये ब्रह्मासंबंधी अज्ञान झाले की, दुसऱ्याच्या बाबतीत झाले? आणि ते अज्ञान कोणाला झाले?
(नवीन.) चिदाभासाला
(सिद्धान्ती) चिदाभासाचे स्वरूप काय आहे?
(नवीन.) ब्रह्म हेच चिदाभासाचे स्वरूप आहेजेव्हा ब्रह्माला ब्रह्मासंबंधी अज्ञान होते तेव्हा त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो.
(सिद्धान्ती) स्वरूपाचे विस्मरण होण्याचे कारण कोणते?
(नवीन.) अविद्या.
(सिद्धान्ती) अविद्या हा सर्वव्यापी सर्वसाचा गुण आहे की अल्पज्ञानाचा ?
(नवीन.) अल्पज्ञानाचा.
(सिद्धान्ती) तुमच्या मते एका अनंत चेतनाखेरीज दुसरे एखादे चेतन आहे किंवा नाही? आणि हा अल्पज्ञ कोठून आला? अर्थात हे अल्पज्ञ चेतन ब्राहून वेगळे आहे असे तुम्ही मानीत असाल तर ते ठीक आहे. एका ठिकाणी ब्रह्माला स्वत:च्या स्वरूपाचे अज्ञान असेल तर ते अज्ञान सर्वत्र पसरणार, ज्याप्रमाणे शरीराच्या एका भाणावर फोड झाल्यास त्याची वेदना संपूर्ण शरीरात पसरून सर्व अवयवांना निरुपयोगी बनविते. त्याचप्रमाणे ब्रह्माचा एक भाग अज्ञानी व क्लेशयुक्त बनला तर संपूर्ण ब्रह्मही अज्ञानी व पीडा अनभवयुक्त होत जाईल.
(नवीन.) हा सारा उपाधीचा धर्म आहे. तो ब्रह्माचा धर्म नाही.
(सिद्धान्ती) उपाधी जड आहे की चेतन? सत्य आहे की असत्य?
(नवीन.) ती अनिर्वचनीय आहे. म्हणजे तिला जड अथवा चेतन, सत्य अथवा असत्य म्हणू शकत नाही.
(सिद्धान्ती) तुमचे हे बोलणे ‘वदतो व्याघात' म्हणजे स्पष्टतः विसंगत आहे. कारण आधी ही अविद्या आहे' असे तुम्ही म्हणता आणि त्याच वेळी ती जड चेतन, सत किंवा असत नाही म्हणता. ज्या सोन्यामध्ये पितळ मिसळलेले आहे ते सोनाराकडे नेऊन ते सोने आहे की पितळ याची पारख करावी आणि याला आम्ही सोनेही म्हणू शकत नाही किंवा पितळही म्हणू शकत नाही. कारण यात दोन्ही धातू मिसळलेले आहेत, असे म्हणण्यासारखेच तुमचे बोलणे आहे.
(नवीन.) असे पाहा! घटाकाश, मठाकाश, मेघकाश या उपाधींमुळे एकच महदाकाश (माठ, घर व  मेघ यामुळे त्यांच्यांतील आकाश) वेगवेगळे प्रतीत होतेवस्तुतः त्या सर्वांमध्ये महदाकाशच असते. याचप्रमाणे माया, अविद्या, समष्टी, व्यष्टी व अंतःकरण या उपाधींमुळे अज्ञानी लोकांना ब्रह्म वेगवेगळे भासते. वस्तुतः ते एकच आहे. यासंबंधी एक प्राचीन पुरावा असा आहे:

अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव ।
एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च।। कठो० वल्ली ५।। मं० ९।।

    ज्याप्रमाणे अग्नी हा लांब, रुंद, गोल, लहान, मोठ्या अशा अनेक आकारांच्या वस्तूमध्ये व्याप्त होऊन तदाकार झालेला दिसतो. परंतु त्या वस्तूंहून वेगळा असतो, त्याप्रमाणे सर्व व्यापक परमात्मा अंत:करणामध्ये व्याप्त होऊन अंत:करणाचा आकार धारण केल्यासारखा वाटतो, परंतु तो त्या अंत:करणांपासून वेगळा असतो.
(सिद्धान्ती) तुमचे हेही म्हणणे निरर्थक आहे. कारण ज्याप्रमाणे तुम्ही घट, मठ, मेघ व आकाश यांना भिन्न मानतात त्याप्रमाणे कारणकार्यरूप जग व जीव यांना ब्रह्माहून व ब्रह्माला जीव व जग यांच्याहन भिन्न का मानीत नाही?
(नवीन.) ज्याप्रमाणे अग्नी सर्व पदार्थामध्ये प्रविष्ट होतो तेव्हा तो पाहणाऱ्यांना तदाकार झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे परमात्मा हा जड व जीव यांमध्ये व्याप्त असल्याने अज्ञानी लोकांना तो आकारयुक्त भासतो. वस्तुतः ब्रह्म हे जड अचेतन) ही नाही अथवा जीवही नाही. पाण्याने भरलेल्या हजारो भांड्यांमध्ये सूर्याची हजारो प्रतिबिंब दिसतात. परंतु वस्तुतः सूर्य एकच असतो. ती भांडी नाहीशी झाल्याने किंवा त्यांतील पाणी पसरल्याने अथवा वाहन गेल्याने सूर्य नष्ट होत नाही, पसरत नाही अथवा वाहन जात नाही. याचप्रमाणे अंत:करणांमध्ये ब्रह्माचे जे प्रतिबिंब पडते म्हणजे त्याचा जो आभास होतो त्याला चिदाभास असे म्हणतात. जोपर्यंत अंत:करण असते तोपर्यंतच जीव असतो. जेव्हा अंतःकरणाचे ज्ञानाने नाहीसे होते तेव्हा जीव ब्रह्मस्वरूप बनतो. या चिदाभासाला आपल्या ब्रह्मस्वरूपाविषयी अज्ञान होते आणि आपण कर्ता भोक्ता, सुख, दुःख, पापी, पुण्यात्मा, जन्म-मरणयुक्त आहोत असे आपल्यात आरोपित करीत आहे. त्याचे हे अज्ञान जोपर्यंत कायम असते तोपर्यंत तो या जगाच्या बंधनांतून मुक्त होत नाही.
(सिद्धान्ती) तुमचा हा दृष्टांत व्यर्थ नाही. कारण सूर्याला आकार आहे आणि पाण्याच्या भांड्यांनाही आकार आहे. सूर्य आणि पाण्याची भांडी एकमेकांहून भिन्न, वेगवेगळे आहेत. म्हणूनच सूर्याचे प्रतिबिंब त्या भांड्यांत पडते. सूर्य आणि जलपात्रे निराकार असती आणि ती एकमेकांहून वेगळी नसती तर सूर्याचे प्रतिबिंब कधीही पडले नसते. परमेश्वर निराकार असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब कधीही पडू शकत नाही; आणि तो आकाशाप्रमाणे सर्वव्यापक असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब ज्यात पडू शकेल अशी दुसरी वस्तूच अस्तित्वात नाही. ब्रह्मापासून कोणताही पदार्थ अथवा पदार्थाहून ब्रह्म वेगळे होऊ शकत नाही. त्यांच्यातील व्याप्यव्यापक संबंधामुळे ते एकही होऊ शकत नाहीत. अन्वयव्यतिरेकभावाच्या दृष्टीने पाहिले असता व्याप्य व व्यापक हे एकमेकांशी संयुक्त असले तरी सदैव वेगळे असतात. ते जर एक असतील तर त्यांच्यात व्याप्यव्यापकभाव संबंध असू शकत नाही. म्हणून बृहदारण्यकातील अंतर्यामी ब्राह्मण ग्रंथांमध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की, ब्रह्माचा आभास (प्रतिबिंब) पडू शकत नाही. कारण आकार नसेल तर त्याचे प्रतिबिंब कसे पडणार? अंत:करण उपाधीमुळे तुम्ही ब्रह्मच जीव होतो असे जे तुम्ही मानता तोही तुमचा पोरकटपणा आहे. कारण अंत:करण चलायमान (चंचल) व खंड-खंड झालेले असते तर ब्रह्म हे अचल व अखंड आहे. जर तुम्ही ब्रह्म व जीव हे । वेगवेगळे नसून एकच आहेत असे मानीत असाल तर या प्रश्नाचे उत्तर द्या की, जेथे-जे अंत:करण जाईल तेथे तेथे असणाऱ्या ब्रह्माला ते अज्ञानीव जेथून ते निघून जाते तेथील ब्रह्माला ते ज्ञानी करील की नाही? ज्याप्रमाणे प्रकाशामध्ये छत्री जेथे-जेथे जाते तेथील प्रकाशाला ती झाकून टाकते आणि जेथून ती निघून जाते तेथील प्रकाशाला आवरणरहित बनविते. त्याचप्रमाणे अंत:करण हे ब्रह्माला क्षणोक्षणी ज्ञानी, अज्ञानी, बब मुक्त करीत जाईल. अखंड ब्रह्माच्या एका स्थानातील आवरणाचा प्रभाव सर्वत्र झाल्याने संपूर्ण ब्रह्म अज्ञानी होईल. कारणते चेतन आहे. मथुरेमध्ये ज्या अंत:करणस्थ ब्रह्माने जी वस्तू पाहिली त्याच अंत:करणस्थ ब्रह्माला त्या वस्तूचे स्मरण काशीला गेल्यावर होणार नाही. कारण ‘अन्यदृष्टमन्यो न स्मरतीति न्यायात्म्हणजे एकाने पाहिलेले दुसऱ्याला आठवत नाही, असा न्याय आहे. ज्या न्यायाने ज्याचिदाभासाने मथुरेमध्ये एक गोष्ट पाहिली तोच चिदाभास काशीमध्ये नसल्यामुळे त्याला तेथे ती गोष्ट आठवणार नाही. तसेच, मथुरेतील चिदाभासाला प्रकाशमान बनविणारे ब्रह्म हे काशीत असणारे ब्रह्मा नसते. जर ब्रह्म हाच जीव असेल, वेगळे नसेल तर जीव सर्वज्ञ असला पाहिजे, पण तसा तो नाही. जर ब्रह्माचे प्रतिबिंब वेगळे असेल, तर त्याच्या ठिकाणी प्रत्यभिज्ञा असणार नाही. म्हणजे पूर्वी पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टीचे ज्ञान त्याला होऊ शकणार नाही. जर तुम्ही असे म्हणत असाल की, ब्रह्म एक असल्यामुळे त्याला स्मरण होते, तर ब्रह्माच्या एके ठिकाणी अज्ञान अथवा दुःख झाल्याने संपूर्ण ब्रह्माला अज्ञान अथवा दु:ख झाले पाहिजे. अशा प्रकारचे दृष्टांत देऊन तुम्ही नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभावयुक्त ब्रह्माला अनित्य, अशुद्धअज्ञानी, बद्ध वगैरे करून टाकता आणि जे ब्रह्म अखंड आहे त्याला तुम्ही खंडित करता.
(नवीन.) निराकाराचाही आभास जाणवतो. जसाआरशात किंवा पाण्यात आकाशाचा आभास जाणवतो. तो आभास निळा किंवा करडा गडद असतो. तसाच ब्रह्माचाही सर्व अंत:करणांत आभास जाणवतो.
(सिद्धान्ती) जेव्हा आकाश हे निराकार असल्यामुळे ते कोणालाही डोळ्यांनी दिसत नाही. जो पदार्थ दिसतच नाही तो आरशात किंवा पाण्यात कसा दिसणार? जी वस्तू साकार असते तीच गडद किंवा फिकट दिसते. निराकार बस्तू दिसत नाही.
(नवीन.) तर मगवर जेनिळसर दिसते आणि त्याचे प्रतिबिंब आशात किंवा पाण्यात पडते तो काय पदार्थ आहे?
(सिद्धान्ती) पृथ्वीवरून ठडून अवकाशात पसरलेले ते माती, पाणी व अमी यांचे त्रसरेणू (कण) असतात. जेथून पाऊस पडतो तेथे पाणी नसेल तर पाऊस कोटून पडणार? म्हणून आभाळात तंबूसारखे जे दिसते जलचक्र किंवा घनीभूत झालेली वाफ असते. ज्याप्रमाणे धुके दुरून तंबूसारखे खूप दाट असल्याचा भास होतो परंतु जवळ गेल्यावर ते विरळ असल्याचे आढळून येते, त्याप्रमाणे आकाशात गेलेली पाण्याची वाफ दुरून तंबू सारखी दिसते.
(नवीन.) आम्ही पूर्वी जे रज्जू (दोरी) सर्प, वगैरेचे दृष्टांत दिले ते मिथ्या आहेत काय?
(सिद्धान्ती) नाही. ते चूक नाहीत परंतु तुमची समजूत चुकीची आहे. ते विवेचन आम्ही यापूर्वी केलेच आहे. बरे, आता हे सांगा की प्रथम अज्ञान कोणाला होते?
(नवीन.) ब्रह्माला,
(सिद्धान्ती) ब्रह्म अल्पज्ञ आहे की सर्वज्ञ?
(नवीन.) ब्रह्म सर्वज्ञही नाही अथवा अल्पज्ञही नाही. कारण सर्वज्ञता किंवा अल्पज्ञता ही उपाधिसहित असणाऱ्यांमध्ये असते.
(सिद्धान्ती) उपाधिसहितं कोण आहे ?
(नवीन.) ब्रह्मा
(सिद्धान्ती) तर मग ब्रह्मच सर्वज्ञ व अल्पस . मग तुम्ही ब्रह्म हे सर्वज्ञ व अल्पज्ञ आहे या विधानाला का आक्षेप घेतला ? उपाधी हीच कल्पित म्हणजे मिथ्या आहे असे तुमचे म्हणणे असेल तर कल्पक म्हणजे कल्पना करणारा कोण आहे ?
(नवीन.) जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत की वेगवेगळे?
(सिद्धान्ती) ते वेगवेगळे आहेत. कारण ते एकच असते तर ब्रह्मापासून मिथ्या कल्पना उत्पन्न झाली नसती. ज्याची कल्पना मिथ्या आहे ते सत्य कसे होऊ शकेल?
(नवीन.) सत्य व असत्य हे दोन्ही मिथ्या आहेत असे आम्ही मानतो. वाणीने बोलणेही मिथ्याच आहे.
(सिद्धान्ती) जर तुम्ह सत्य, असत्य व वाण मिथ्या समजत असाल तर तुम्ही स्वतःच मिथ्या नाही कशावरून?
(नवीन.) ते जाऊ द्या. खरे आणि खोटे या आमच्याच कल्पना असून आम्ही त्या दोहोंच साक्षी व अधिष्ठान आहोत.
(सिद्धान्ती) जर तुम्ही खरे व खोटे यांचे अधिष्ठान म्हणजे आधार असाल तर तुम्ही सज्जन आणि चोर यांच्या सारखे झालात, त्यामुळे तुम्ही अप्रामाणिकही ठरता. कारण जो प्रामाणिक असतो तो सदैव सत्य मानतो, सत्य बोलतो, सत्य करतो, असत्य मानीत नाही, असत्य बोलत नाही, असत्य कार्य करत नाही. तुम्ही आपलेच म्हणणे खोटे आहे असे म्हणता त्या अर्थी तुम्ही अनाप्त व मिथ्यावादी आहात.
(नवीन.) अनादी माया ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ती ब्रह्मावर आवरण घालते. तिला तुम्ही मानता की नाही?
(सिद्धान्ती) नाही. कारण जी वस्तू प्रत्यक्षात नाही, पण असल्यासारखी भासते ती माया, असा अर्थ तुम्ही करता. ज्याच्या अंतरीचा डोळा फुटला आहे.असा अविवेकी माणूसच तुमचे हे म्हणणे मान्य करील. कारणी वस्तू अस्तित्वात नाही तिचा भास होणे हे पूर्णपणे अशक्य आहे. बंध्या स्त्रीच्या पुत्राचे प्रतिबिंब असू शकत नाही. तसेच हे आहे तसेच, ‘सन्मूलाः सोम्येमाः प्रजाः’ यांसारख्या छांदोग्य उपनिषदांतील बचांविरुद्ध तुमचे हे मत आहे.
(नवीन.) तुम्ही वसिष्ठ, शंकराचार्य यांच्यापासून निश्चलदासापर्यंतच्या पंडितांहून स्वतःला शहाणे समजता काय ? त्यांनी जे काही सांगितले आहे त्याचे तुम्ही खंडन कसे काय करता ? आम्हाला तर वसिष्ठ, शंकराचार्य व निश्चलदास यांचेच सिद्धांत बरोबर वाटतात.
(सिद्धान्ती) तुम्ही विद्वान आहात की अविद्वान?
(नवीन.) आम्ही देखील काही विद्वान आहोत.
(सिद्धान्ती) ठीक आहेतर मग तुम्ही वसिष्ठ, शंकराचार्य व निश्चलदास यांचा पक्ष आमच्यासमोर मांडा आम्ही त्याचे खंडन करतो. ज्याचा पक्ष बरोबर ठरेल तो मोठा ठरेल. त्यांचे व तुमचे म्हणणे खोडून काढता येण्यासारखे नसेल तर तुम्ही त्यांच्या युक्तिवादाच्या साह्याने आमच्या युक्तियुक्तमताचे खंडन का करीत नाही? तसे तुम्ही केले तर तुमचे व त्यांचे मत ग्राह्य समजले जाईल.
      आमचे असे अनुमान आहे की, शंकराचार्यासारख्या विद्वानांनी जैन मताचे खंडन करण्यासाठीच हे मत स्वीकारले होते. कारण देशकालानुरूप आपला पक्ष सिद्ध करण्यासाठी अनेक स्वार्थी विद्वान स्वत:ला मान्य नसलेल्या मतांचा स्वीकार करून प्रतिपक्षाचे खंडन करतात. जीव आणि ईश्वर हे एकच असून जग हे मिथ्या आदी व्यवहार खराच मानीत होते असे शंकराचार्यांचे खरोखरीच मत असेल तर ते चूक होते असे म्हणणे भाग आहे.
     निश्चलदासांचे पांडित्य पाहा. त्यांनी वृत्तिप्रभाकर ग्रंथात अनुमान लिहिले आहे. ‘जीवो ब्रह्माऽभिन्नचेतनत्वात' म्हणजे जीव हा चेतन असल्यामुळे तो ब्रह्मापासून अभिन्न आहे. अगदीच कमी बुद्धी असणारी व्यक्तीच असे विधान करील. कारण केवळ साधर्म्यामुळे दोन वस्तू एकच आहेत असे ठरत नाही. तेथे वैधर्म्य भेदक होते. 'पृथिवी जलाऽभिन्ना जड़त्वात' पृथ्वी आणि पाणी हे दोन पदार्थ जड (अचेतन) असल्यामुळे ते अभिन्न म्हणजे एकच आहेत, असे कोणी म्हणेल तर ते बरोबर होणार नाही. तसेच निश्चलदासांचे मतही निरर्थक आहेकारण जीवामध्ये अल्पत्व, अल्पज्ञता व भ्रांतिमत्व वगैरे जे धर्म आहेत ते ब्रह्माच्या धर्माने वेगळे आहेत आणि सर्वगामित्व, सर्वज्ञता व निर्भ्रान्तित्व  वगैरे जे गुण ब्रह्यामध्ये आहेत ते जीवाच्या गुणांविरुद्ध आहेत. त्याचे कारण त्या दोघांमधील वैधर्म्य हे आहे. म्हणून ब्रह्म व जीव हे भिन्न-भिन्न आहेत. ज्याप्रमाणे गंधत्व, कठिणत्व वगैरे भूमीचे धर्म; रसवत्व, द्रवत्व वगैरे पाण्याच्या धर्माहून वेगळे असल्यामुळे पृथ्वी व पाणी एक गाहीत, त्याप्रमाणे जीव व ब्रह्म यांच्यामध्ये वैधर्म्य असल्यामुळे जीव व ब्रह्म पूर्वी कधी एक नव्हते, आज एक गाहीत व पुढे कधी एक होणार नाहीत.
     यावरून निश्चलदासादिकांच्या पांडित्याला समजून जावे. ज्याने योगवसिष्ठ रचले तो कोणीतरी आधुनिक वेदान्ती असावा. वाल्मीकी, वसिष्ठ किंवा रामचंद्र यांनी ते रचलेले नाही. कारण ते सगळे वेदानुयायी होते. ते वेदांविरुद्ध काहीही लिहू, बोलू व ऐकू शकत नव्हते.
(प्रश्न) व्यासांनी शारीरिक सूत्रे रचली आहेत. त्यामध्ये जीव व ब्रह्म यांचे ऐक्य प्रतिपादिले आहे. ते काय म्हणतात पहा:

सम्पद्याऽऽविर्भाव स्वेन शब्दात्।।१।।
ब्राह्मेण जैमिनिरुपन्यासादिभ्य ।।२।।
चिति तन्मात्रेण तदात्मकत्वादित्यौडुलोमि ।।३।।
एवमप्युपन्यासात् पूर्वभावादविरोधं बादरायण ।।४।।
अत एव चानन्याधिपति ।।५।। वेदान्त द० अ० ४।। पा० ४।। सू० १, ५-७,९।।

अर्थ:- जो जीव पूर्वी ब्रह्मस्वरूप होता तोच स्वस्वरूप होऊनं प्रकट होतो. कारण 'स्व' शब्दाने आपल्या ब्रह्मस्वरूपाचे ग्रहण केले जाते॥१॥ 'अयमात्मा अपहतपाप्मा' इत्यादी कथनांवरून ईश्वर प्राप्ती पर्यंतच्या हेतूंनी ब्रह्मस्वरूपाने जीव स्थित होतो असे जैमिनी आचार्यांचे मत आहे.॥२॥ औडुलोमी आचार्याचे असे मत आहे की, तदात्मकस्वरूप निरूपणादी बृहदारण्यकातील वचनांवरून चैतन्यमात्र स्वरूपाने जीव मुक्तीमध्ये स्थित राहतो. ॥३॥व्यास महर्ष पूर्वोक्त उपन्यास आदी ऐश्वर्यप्राप्तिरूप हेतूंनी जीवाच्या ब्रह्मस्वरूप होण्यामध्ये अविरोध मानतात॥४॥ योगी सर्व ऐश्वर्यासह आपल्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊन अन्य अधिपतींनी रहित होते. म्हणजे आपणच स्वत: आपला व सर्वांचा अधिपती बनतो आणि ब्रह्मस्वरूपाने मुक्तीमध्ये स्थित राहतो. ॥५॥
(उत्तर) या सूत्रांचा अर्थ तुम्ही म्हणता तसानाही. त्यांचा खरा अर्थ असा आहे :- जोपर्यंत जीव आपल्या स्वकीय शुद्ध स्वरूपाला प्राप्त होऊन, सर्व मलांनी रहित होऊन पवित्र होत नाही, तोपर्यंत त्याला योगाची सर्व ऐश्वर्यं प्राप्त होणार नाहीत आणि आपल्या अंतर्यामी असणाऱ्या ब्रह्माला प्राप्त होऊन तो आनंदात स्थित होऊ शकणार नाही. ॥१॥याचप्रमाणे जेव्हा योगी पापरहित व ऐश्वर्ययुक्त बनतो तेव्हा तो ब्रह्मासह मुक्तीचा आनंद उपभोगू शकतो, असे जैमिनी आचार्यांचे मत आहे॥२॥ जेव्हा अविद्यादि दोषांपासून मुक्त होऊन शुद्ध चैतन्यमात्र स्वरूपाने जीव स्थिर राहतो तेव्हाच त्याला 'तदात्मकत्व म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी संबंध प्राप्त होतो, असे औडुलोमी आचार्यांचे मत आहे.॥३॥ व्यास मुनींचे म्हणणे असे आहे की जेव्हा जीव शरीरात असतानाच योगाचे ऐश्वर्य व शुद्ध विज्ञान प्राप्त करून जीवन्मुक्त होतो व ब्रह्माशी संबद्ध होतो तेव्हा त्याला त्याचे मूळचे निर्मळ स्वरूप प्राप्त होते आणि तो आनंदित होतो.॥४॥ जेव्हा योगी सत्यसंकल्प बनतो तेव्हा त्याला खुद परमेश्वराची प्राप्त होउन मुक्तीचे सुख मिळते. तेथे तो स्वाधीन व स्वतंत्र राहतो. जगामध्ये एकजण प्रमुख व दुसरा गौण असतो.तसे मुक्ती मध्ये नसते. सारे मुक्त जीव एकसमान पातळीवरचे असतात. ॥५॥

वरील सूत्रांचा आम्ही जो अर्थ लावला आहे तो बरोबर नसेल तर पुढील सूत्रांशी विरोध उत्पन्न होईल.

नेतरोऽनुपपत्ते ।।१।। वेदान्त द० अ० १।। पा० १।। सू० १६।।

अर्थ:- ब्रह्माखेरीज इतर कोणताही जीव सृष्टिकर्ता नाही. कारण अल्पज्ञ व अल्प सामर्थ्यसंपन्न जीवामध्ये सृष्टिकर्तृत्व असू शकत नाही. म्हणून जीव व ब्रह्म एक नाहीत॥१॥

भेदव्यपदेशाच्च।।२।। वेदान्त द० अ० १।। पा० १।। सू० १७।।

रसं ह्येवायं लब्ध्वानन्दी भवति।' हे उपनिषदातील वचन आहेजी. व व ब्रह्म भिन्न आहेत. त्यांच्यातील भेदाचे प्रतिपादन येथे केले आहे. तसे नसते तर आनंस्वरूप ब्रह्माची प्राप्त करून घेऊन जीव आनंदस्वरूप होतो आणि ब्रह्म हा प्राप्तीचा विषय आहे व जीव हा ब्रह्माची प्राप्त करून घेणारा आहे, हे विधान निराधार ठरले असते. म्हणून जीव व ब्रह्म हे एक माहीत. ॥२॥

विशेषणभेदव्यपदेशाभ्यां च नेतरौ।।३।।  वेदान्त द० अ० १।। पा० २।। सू० २२।।
दिव्यो ह्यमूर्त्त पुरुष स बाह्याभ्यन्तरो ह्यज ।
अप्राणो ह्यमना शुभ्रो ह्यक्षरात्परत पर ।।  मुण्डक २।। खं० १।। मं० २।।

दिव्य, शुद्धी, मूर्तिमत्वरहित (अमूर्त, निराकार), सर्वत्र भरलेला, आत व बाहेर निरंतर व्याप्त, अजन्मा, जन्म-मरण व शरीर धारणा आदींनी रहित, श्वासोच्छ्वास, शरीर व मन यांच्या संबंधांनी रहित, प्रकाशस्वरूप इत्यादी विशेषणे परमेश्वराची आहेत. तो अक्षर व नाशरहित असून प्रकृतीच्या पलीकडे असणारा आहे. जीव सूक्ष्म आहे परंतु परमेश्वरत्याही पलीकडचा आहे. म्हणजे ब्रह्म हे जीवाहूनही अत्यंत सूक्ष्म आहे. भेद प्रतिपादक हेतुद्वारे प्रकृती व जीव यांहून ब्रह्म हे भिन्न आहे. ॥३॥

अस्मिन्नस्य च तद्योगं शास्ति।।४।। वेदान्त द० अ० १।। पा० १।। सू० १९।।

याच सर्वव्यापक ब्रह्मामध्ये जीवाचा किंवा जीवामध्ये ब्रह्माचा संयोग करावा असे प्रतिपादन केले जाते यावरून जीव व ब्रह्म हे भिन्न आहे असे सिद्ध होते. कारण भिन्न पदार्थाचाच संयोग होत असतो. ॥४॥

अन्तस्तद्धर्मोपदेशात्।।५।। वेदान्त द० अ० १।। पा० १।। सू० २०।।

या ब्रह्माचे अंतर्यामी' वगैरे गुणधर्म सांगितले आहेत आणि जीवामध्ये ब्रह्म व्यापक असल्यामुळे व्याप्य जीव हा व्यापक ब्रह्मांहून वेगळा असल्याचे सिद्ध होते. कारण व्याप्य-व्यापक संबंधसुद्धा भेदात संघटित होत असतो.॥५॥

भेदव्यपदेशाच्चान्य ।।६।। वेदान्त द० अ० १।। पा० १।। सू० २१।।

परमात्मा जसा जीवाहून भिन्न आहे तसाच तो इंद्रिये, अंत:करण, पंच महाभूते, दिशा, वायू, सूर्यादी दिव्य गुणांच्या योगाने देवता वाच्य विद्वानापेक्षा भिन्न आहे.॥७॥

गुहां प्रविष्टावात्मानौ हि तद्दर्शनात्।।७।। वेदान्त द० अ० १।। पा० २।। सू० ११।।

गुहां प्रविष्टौ सुकृतस्य लोके इत्यादी उपनिषदांतील वचनांनुसार जीव व परमात्मा हे भिन्न आहेत. अशी भेददर्शक वचने उपनिषदांमध्ये अनेक ठिकाणी आली आहेत. ॥७॥

अनुपपत्तेस्तु न शारीर ।।८।। वेदान्त द० अ० १।। पा० २।। सू० ३।।

'शरीर भवः शारीरः' शरीरधारी जीव हा ब्रह्म नव्हे. कारण ब्रह्माचे गुण, कर्म, स्वभाव जीवामध्ये नसतात. ॥८॥

अन्तर्याम्यधिदैवादिषु तद्धर्मव्यपदेशात्।।९।। वेदान्त द० अ० १।। पा० २।। सू० १८।।

(अधिदैव) सर्व दिव्य पदार्थ म्हणजे मन वगैरे इंद्रिये, (अधिभूत) पृथ्वी वगैरे भूते. (अध्यात्म) सर्व जीवांमध्ये-परमात्मा अंतर्यामी रूपाने स्थित आहे. कारण त्याच परमात्म्याचे व्यापकत्व आदी धर्म सर्वत्र उपनिषदांमध्ये वर्णिलेले आहेत. ॥९॥

शारीरश्चोभयेऽपि हि भेदेनैनमधीयते।।१०।। वेदान्त द० अ० १।। पा० २।। सू० २०।।

शरीरधारी जीव हा ब्रह्म नव्हे कारण ब्रह्म व जीव यांच्यातील भेद स्वरूपतः सिद्ध आहे॥१०॥
     अशा प्रकारच्या शारीरिक सूत्रांवरूनही ब्रह्म व जीव हे स्वरूपतः भिन्न आहेत असे सिद्ध होते.
     याचप्रमाणे वेदांती लोकांचा उपक्रम व उपसंहारही लागू होत नाही. कारण 'उपक्रम' म्हणजे सृष्टिचा प्रारंभ व उपसंहार म्हणजे सृष्टिचा विलय या दोन्ही गोष्टी ब्रह्मामध्येच आहेत असे समजतात. जेव्हा ब्रह्माशिवाय दुसरी वस्तूच नाही, तेव्हा उत्पत्ति व प्रलय हे दोन्ही ब्रह्माचेच धर्म होतात. उत्पत्तिविनाशरहित ब्रह्माचे प्रतिपादन वेदादी शास्त्रांमध्ये केले आहे. नवीन वेदान्ती लोकांवर तो प्रहार होईल. कारण निर्विकार अपरिणामी, शुद्धसनातन, निम्नन्ति आदी विशेषणांनी युक्त ब्रह्मामध्ये विकार, उत्पत्ति व अज्ञान वगैरे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. तसेच उपसंहार (प्रलय) झाल्यानंतरही ब्रह्म, कारणात्मक जड आणि जीव हे विद्यमान राहतात. म्हणून उपक्रम व उपसंहार ही वेदान्ती लोकांची कल्पना खोटी आहेअशा इतर अनेक गोष्टी आहेत की त्या शास्त्रांच्या व प्रत्यक्षादी प्रमाणांच्या विरुद्ध आहेत.
      यानंतर जैन व शंकराचार्यांचे अनुयायी यांच्या उपदेशाचा थोडाफार संस्कार आर्यावर्त्तामध्ये प्रसृत होता. त्यांचे आपसात खंडनमंडनही चालत असे. शंकराचार्यानंतर तीनशे वर्षांनी उज्जयिनी नगरीमध्ये विक्रमादित्य नावाचा प्रतापी राजा होऊन गेला. त्याने साऱ्या राजांमध्ये चालू असलेल्या लढाया थांबवून शांतता स्थापन केली. त्यानंतर भर्तुहरी नावाचा राजा काव्यादी शास्त्रांमध्ये थोडाफार विद्वान होता. त्याला वैराग्य प्राप्त झाले आणि त्याने राज्य त्याग केला. विक्रमादित्यानंतर पाचशे वर्षांनी भोज राजा झाला. त्याने आपल्या राज्यामध्ये व्याकरण, काव्य व अलंकार इत्यादींचा इतका प्रचार केला की, मेंढया राखणारा कालिदासही रघुवंशासारखे काव्य करणारा झाला. भोज राजाकडे जो कोणी चांगला श्लोक रचून घेऊन जाई त्याला राजा पुष्कळ धन देई व त्याची प्रतिष्ठा होत होती. त्यानंतर राजांनी व श्रीमंत लोकांनी विद्याध्ययन करणेच सोडून दिले.

शैव-मत समीक्षा

         शंकराचार्यापूर्वी वाममार्गी लोकांनंतर शैव वगैरे संप्रदाय प्रचलित झालेले होते. परंतु त्यांचा जोर फारसा नव्हता. महाराजा विक्रमादित्यांच्या वेळेपासून शैवांचा जोर वाटू लागला. वाममार्गी शाक्तांमध्ये जशा दशमहाविद्या इत्यादी शाखा आहेत तशा शैवांमध्ये पाशुपत वगैरे अनेक शाखा होत्या. या लोकांनी शंकराचार्यांना शिवाचे अवतार मानले. त्यांचे अनुयायी संन्यासीही शैवपंथी बनले आणि त्यांनी वाममार्गी लोकांशीही संबंध ठेवले शैव हे शिवाचे म्हणजे महादेवाचे उपासक आहेत; आणि शिवाची पत्नी देवी (पार्वती) हिचे उपासक वाममार्गी झालेत. या दोन्ही पंथांचे अनुयायी सद्राक्ष धारण करतात व अंगाला भस्म लावतात. मात्र वाममार्गी जसे वेदविरोधी आहेत तसे शैव नाहीत.

धिक् धिक् कपालं भस्मरुद्राक्षविहीनम्।।१।।
रुद्राक्षान् कण्ठदेशे दशनपरिमितान्मस्तके विशती द्वे,
षट् षट् कर्णप्रदेशे करयुगलगतान् द्वादशान्द्वादशैव ।
बाह्वोरिन्दो कलाभि पृथगिति गदितमेकमेवं शिखायां,
वक्षस्यष्टाऽधिकं य कलयति शतकं स स्वयं नीलकण्ठ ।।२।। रुद्राक्ष जाबाल उपनिषद अ०१। श्लो० १५,१६।।

     अशा प्रकारचे अनेक श्लोक शैव लोकांनी बनविले, आणि ’ज्यांच्या कपाळाला भस्म आणि गळ्यात रुद्राक्ष नाही त्याचा धिक्कार असो, असे म्हणू लागले. तसेच ‘तं त्यजेदन्त्यजं यथा’ अशा  भस्मरूद्राक्षविहीन माणसाला चांडाळ समजून त्याचा त्याग केला पाहिजे.॥१॥ जो गळ्यात ३२, डोक्यावर ४०, प्रत्येक कानात ६-६, प्रत्येक हातात १२-१२प्रत्येक दंडावर १६-१६, शेंडीत १ आणि हृदयावर १०८ रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात महादेवासारखा असतो. ॥२॥ असे शाक्तसुद्धा मानतात.
     नंतर वाममार्गी व शैवानी संगनमताने योनिलिंगाची स्थापना केली ज्यास जलाधारी व उपस्थ म्हणतात. आणि त्यांची पूजा करू लागले. त्या बेशर्मांना थोडीही लाज वाटली नाही की हे दुष्कर्म आषण का करीत आहोत. एका कवीने म्हटले आहे की, ‘स्वार्थी दोषं न पश्यति' स्वार्थी माणसे आपला स्वार्थ साधण्यासाठी दुष्कर्यांनाही उत्तम समजतो. त्याच पाषाणादिकांच्या भग व लिंग यांच्या पूजेने धर्म, अर्थ, काम व मोक्षाची प्राप्त मानू लागले. राजा भोजाच्या पश्चात जैन लोक आपल्या मंदिरात मूर्तीची स्थापना करून मूर्तीच्या दर्शन-स्पर्शनासाठी तेथे जाऊ लागले. तेव्हा पोपांचे चेलेही जैन मंदिरात जाऊ लागले. तिकडे याच पश्चिम भागात अन्य पंथांचे यवन आर्यावर्त्तात येऊ लागले. तेव्हा पोपांनी हा श्लोक तयार केला :-

न वदेद्यावनीं भाषां प्राणै कण्ठगतैरपि ।
हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमन्दिरम्।। भ०पु० प्रतिसर्ग पर्व ३।। अ० २८।। श्लो० ५३।।

     कितीही दुःख होऊ दे आणि प्राण कंठाशी आले व मृत्यु समय आला तरी यावनी (म्लेच्छ) भाषा बोलू नये; आणि उन्मत्त हत्ती अंगावर चालून आला व जैन मंदिरात गेल्याने प्राण वाचणार असले तरी जैनांच्या मंदिरात जाऊ नये. जैन मंदिरात प्रवेश करून जीव वाचविण्यापेक्षा हत्तीच्या पायांखाली चिडून मरणे जास्त चांगले. असा असा उपदेश ते आपल्या चेल्यांना करू लागले. जेव्हा कोणी त्यांना विचारी की, "तुमच्या या मताला एखाद्या प्रतिष्ठित ग्रंथाचे प्रमाण आहे काय ?" तेव्हा ते म्हणत, "होय, आहे. जेव्हा त्यांना म्हटले की, "दाखवा पाहू आधार ? तेव्हा मार्कंडेय  पुराणादी ग्रंथांतील वचने ते वाचून दाखवीत व ऐकवि जसे दुर्गापाठात देवी वर्णन आले आहे.
     राजा भोजाच्या राज्यात व्यासांच्या नावाने मार्केंडेय पुराण व शिवपुराण यांची कोणीतरी रचना केली. ही
गोष्ट भोजराजाला समजताच त्याने त्यापंडिताचे हात तोडून टाकण्याची शिक्षा फर्मावली आणि असे जाहीर केले की, जो कोणी काव्यादी रचना करील तर त्याने ती आपल्या स्वतःच्या नावाने करावी. ऋषी-मुनींच्या नावावर नव्हे. ही गोष्ट राजा भोजाने लिहिलेल्या 'संजीवनी ’ नावाच्या इतिहासात नमूद आहे. जो, ग्वाल्हेर संस्थानातील भिंड नावाच्या नगरात तिवाडी ब्राह्मणांच्या घरी पाहावयास मिळते. लखुनाचे रावसाहेब आणि त्यांचे गुमास्ते रामदयाल चौबे यांनी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. यागंधात असे स्पष्ट लिहिले आहे की,
व्यासांनी चार हजार चारशे आणित्यांच्या शिष्यांनी त्यात पाच हजार सहाशे श्लोकांची भर घालून एकूण दहा
हजार श्लोकांचे प्रमाण "भारत तयार केले. महाराजा भोज लिहितो की, हे भारत महाराजा विक्रमादित्याच्या
काळात वीस हजार श्लोकांचे माझ्या वडिलांच्या कारकिर्दीत ते पंचवीस हजार श्लोकांचे आणि मी मध्यम वयाचा होईपर्यंत महाभारतातील लोकांची संख्या तीस हजार झाली आहे. महाभारताची लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर हा ग्रंथ म्हणजे एका उंटाचे ओझे होईल ऋषीमुनींच्या नावांनी असेच पुराणादी ग्रंथ चले जाऊ लागले तर आर्यावर्त्तातील लोक भ्रमजाळात पडून वेदिक-धर्मविहीन होऊन भ्रष्ट होतील. यावरून असे माहित होते की, भोजराजावर वेदांचा थोडाफार संस्कार होता. त्याच्या भोजप्रबंध' या ग्रंथात असे म्हटले आहे की,

घट्येकया त्रफ़ोशदशैकमश्व सुकृत्रिमो गच्छति चारुगत्या ।
वायुं ददाति व्यजनं सुपुष्कलं विना मनुष्येण चलत्यजस्रम्।।

     राजाभोजाच्या राज्यात व आसपास असे असे शिल्पकार होते की, त्यांनी घोड्याच्या आकाराचे यांत्रिक यान यंत्रकला युक्त बनविले होतेते यान एका घटकेला अकरा कोस आणि एका तासाला साडे सत्तावीस कोस जात असे.ते भूमीवरून आणि अंतरिक्षातूनही चालत असे. दुसरा असा एक पंखा असा बनविला होता की, जो माणसाशिवाय केवळ कला यंत्राचे बळाने तो सारखा फिरत राही आणि पुष्कळ बारा देई. या दोन वस्तू आजपर्यंत टिकून राहिल्या असल्या तर युरोपीय लोक इतक्या अभिमानात शेफारले नसते.
     या पोपांनी आपल्या शिष्यांना जैन मंदिरात जाण्यापासून खूप परावृत्त केले. परंतु त्यांचे जाणे थांबले नाही. त्यांची कथा प्रवचने ऐकत. जैनांचे पोप या पौराणिक पोपांच्या अनुयायांना बहकाऊ लागले; तेव्हा पौराणिकांनी विचार केला की, यावर काहीतरी उपाय केला पाहिजे; नाहीतर आपले चेले जैन बनतील. त्यानंतर या पुराणिकांनी अशी सम्मती केली की, जैनांप्रमाणे आपणही अवतार, मंदिरमूर्ती बसवाव्यात आणि कथेचे ग्रंथ लिहावे त्याप्रमाणे त्यांनी जैनांच्या चोवीस तीर्थकरांसारखे चोवीस अवतार, मंदिरे व मूर्ती बनविल्या आणि जैनांच्या आदिपुराण, उत्तरपुराण आहेत, यांसारखी अठरा पुराणे रचली.

वैष्णव मत समीक्षा

     राजा भोजनंतर दीडशे वर्षांनी वैष्णव मताचा प्रारंभ झाला. कंजर कुळात शठकोप नावाचा एक इसम जन्मास आला. त्याने हा पंथ थोडाफार चालविला. त्याच्यानंतर भंगी कुळातील मुनिवाहन आणि तिसरा यावनाचार्य यवन कुलोत्पन्न आचार्य बनला. चौथा आचार्य ब्राह्मणकुलोत्पन्न रामानुज झाला. त्याने आपला पंथ प्रसारीत केला. शेवांनी शिवपुराणादी, शक्तांनी देवी भागवत आदी आणि वैष्णवांनी विष्णुपराण आदी ग्रंथ निर्माण केलेया पुराणांवर लेखकांनी आपली नावे घातली नाहीत; कारण आपली नावे घातली तर कोणीही ते ग्रंथ प्रमाण मानणार नाहीत म्हणून त्या पुराणांचे लेखक व्यास वगैरे ऋषी-मुनींची गावे ठेवलीत वास्तविक यांची गावे नवीन ठेवली पाहिजे होती. जसा एखादादी माणूस आपल्या मुलाचे नाव महाराजाधिराज असे ठेवतो किंवा आधुनिक पदार्थाचे नाव सनातन ठेवतो. त्यासारखेच हे आहे. त्यात काय आश्चर्य ? त्या पंथांचे आपसात ज्याप्रकारचे कलह होत त्याचप्रकारचे त्यांच्या या पुराणांमध्येही आले आहेत.
     पहा ! देवी भागवतामध्ये 'श्री' नावाची देवी श्रीपूरच स्वामिनी असून तिनेच सारे जग रचले असून ब्रह्मा, विष्णु व महेश यांनाही तिनेच निर्माण केले, असे लिहिले आहे. जेव्हा त्या देवीला इच्छा झाली तेव्हा तिने आपला हात घासला. त्याबरोबर तिच्या हातावर एक फोड आला. त्यातून ब्रह्मा उत्पन्न झाला. त्याला ती देवी म्हणाली की, "तू माझ्याशी लग्न कर." ब्रह्मा म्हणाला, "तू तर माझी माता आहेस मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही." हे ऐकताच मातेला भयंकर राग आला आणि तिने क्रोधाग्नीने  ब्रह्माला म्हणजे आपल्या मुलाला
जाळून भस्म केले. मग तिने पुन: हात घासला आणि त्याचप्रकारे दुसरा मुलगा उत्पन्न केला. त्याचे नाव विष्णू असे ठेवले. त्यालाही तिने तसेच लग्न करण्यास म्हटले. त्याने ते मान्य केले गाही. म्हणून तिने त्यालाही भस्म करून टाकले. मग तिने त्याच पद्धतीने तिसरा मुलगा निर्माण केला. त्याचे नाव महादेव असे ठेवले. त्यालाही तिने सांगितले की, "तू माझ्याशी लग्न कर" महादेव म्हणाला, 'मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, तू दुसऱ्या स्त्रीचे शरीर धारण कर." त्याप्रमाणे देवीने तसेच केले. तेव्हा महादेवाने तिला विचारले, "हे दोन राखेचे ढीग कसे पडले आहेत ? देवीने सांगितले, ते तुझे दोन भाऊ आहेत. त्यांनी माझी आज्ञा मानली नाही म्हणून मी त्यांना भस्म करून टाकले." महादेवाने तिला म्हटले की, "मी एकट कसा राहू? तू त्यांना जीवंत करून आणखी दोन स्त्रिया उत्पन्न कर, म्हणजे आम्हा तिघांची लग्ने तीन स्त्रियांशी होतील. त्याप्रमाणे देवीने केले आणि तिघांचे विवाह तिथींशी झाले.
     वाहवा ! त्यांनी आईशी लग्न केले नाही पण बहिणीशी केले. हे सारे उचित समजायचे काय? त्यानंतर देवीने इंद्रादी यांना उत्पन्न केले ब्रह्मा, विष्णु, रुद्र व इंद्र यांना पालखी उचलणारे भोई बनविले.
अशाच स्वरूपाच्या लंब्या-चौड्या गप्पा-थापा मनात येईल तसे पुराणांमध्ये आहेत.
     या लोकांना विचारले पाहिजे की, बाबांनो, देवीचे शरीर व श्रीपुर निर्माण करणारा कोण होता? देवीचे आई-बाप कोण होते? जर ते म्हणतील की, देवी अनादी आहे तर त्यावर उत्तर असे आहे की, जी वस्तू संयोगजन्य असते ती कधीही अनादी असू शकत नाही. आईचा मुलाशी विवाह हे जर पाप असेल तर भावाबहिणीचे लग्न हे काय पुण्यप्रद समजायचे ? ज्याप्रमाणे देवी भागवतात् ब्रह्मा, विष्णू, महादेव इत्यादिकांची क्षुद्रता आणि देवीची महत्ता लिहिली आहे. त्याच प्रमाणे शिवपुराणात देवीचे क्षुद्रत्व लिहिले आहे. अर्थात इतर सगळे महादेवाचे दास असून महादेव सर्वांचा ईश्वर आहे. रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. ते शरीरावर जर धारण केले आणि अंगावर भस्म फासले की, मुक्ती मिळत असेल तर राखेत लोळणारी गाढवे व इतर पशू आणि गुंजांच्या किंवा इतर जंगली फळांच्या माळा धारण करणारे भिल्ल, कंजर वगैरे लोक सहजासहजी मुक्त होऊन जातील आणि डुकरे, कुत्री, गाढवे वगैरे राखेत लोळणाऱ्या प्राण्यांना मुक्ती का मिळत नाही?
(प्रश्न) कालाग्निरुद्रोपनिषदामध्ये भस्मलेपन करावे असे सांगितले आहेते काय खोटे आहे?
     त्र्यायुषं जमदग्नेः०’ । यजु० अ० ३। मं० ६२।। हे यजुर्वेदातील वचन आहे त्यासारख्या वेदांतील मंत्रांमध्ये भस्म लावावे असे आहे. पुराणांमध्ये असे लिहिले आहे की, "मुद्राच्या डोळ्यांतून जो अश्रुपात झाला त्यातून जो वृक्ष निर्माण झाला त्याचे नाव रुद्राक्ष आहे. म्हणून रुद्राक्ष धारण करण्यात पुण्य आहे. एक जरी रुद्राक्ष धारण केला तरी सर्व पायांतून मुक्त होऊन मनुष्य स्वर्गाला जातो. त्याला यमाची किंवा नरकाची भीती उरत नाही.
(उत्तर) 'कालाग्निरुद्रोपनिषद्' कुणा गोसाव्याने म्हणजे अंगाला राख फासणाऱ्याने रचले आहे. कारण त्यातील 'यास्य प्रथमा रेखा सा भूलोकः' इत्यादी वचने निरर्थक आहेत. कारण जी रेखा कपाळावर दररोज हाताने काढली जाते ती भूलोकाची प्रतीक कशी होऊ शकते? तसेच  त्र्यायुषं जमदग्नेः०’ इत्यादी जे मंत्र आहेत ते भस्म किंवा त्रिपुंड्र धारण करा असे सांगणारे नाहीत.  ‘चक्षुर्वै जमदग्नि ’ शतपथ "हे परमेश्वरा ! माझ्या नेत्रांची ज्योती (त्र्यायुषं) त्रिगुणित होवो म्हणजे तीनशे वर्षांपर्यंत राहो; आणि मीही अशी धर्मकृत्ये करावी की ज्यायोगे माझा दृष्टी नाश होऊ नये.
     डोळ्यांतील अश्रू त्यापासून वृक्ष उत्पन्न होऊ शकतो, हा केवढा मूर्खपणा आहे ! परमेश्वराच्या सृष्टिक्रमाविरुद्ध कोणी काही करू शकतो काय? परमात्म्याने ज्या वृक्षाचे बीज जसे निर्माण केले त्यापासून तसाच वृक्ष उत्पन्न होऊ शकतो दूसरा नाही. म्हणून त्या पुराणांमध्ये रुद्राक्ष, भस्म, तुळशी, कमलाक्ष, दर्भ, चंदन वगैरे गळ्यात धारण करण्यासंबंधी जे काही लिहिले आहे ते सर्व जंगली पशुवत माणसाचे काम आहे. असे हे वाममार्गी व शैवपंथी लोक अत्यंत मिथ्याचारी, विरोधी आणि आपली कर्तव्य कर्म त्यागणारे होतात. त्यांच्यामध्ये जो कोणी चांगला मनुष्य असतो तो या गोष्टीवर विश्वास न ठेवता सत्कर्मे करतो. रुद्राक्ष व भस्म धारण केल्याने यमराजाचे दूत घाबरत असतील तर पोलिस शिपाईही घाबरत असतील. जर भस्म व रुद्राक्ष धारण करणाऱ्यांना कुत्रे, सिंह, साप, विंचू, माशी, डास हेही भीत नाहीत. तर न्यायाधीशाचे म्हणजे यमाचे दूत का घाबरतील?
(प्रश्न) वाममार्गा व शैव तर चांगले नाहीत; पण वैष्णव तर चांगले आहेत?
(उत्तर) ते वेदविरोधी असल्याने त्यांच्याहून अधिक वाईट आहेत.

(प्रश्न) ‘नमस्ते रुद्र मन्यवे। यजु० अ० ३४। मं० २।। शिवाय च शिवतराय च । यजु० अ० ३४। मं० २।।
 ‘वैष्णवमसि । यजु० अ० ३४। मं० २।। ‘वामनाय च। यजु० अ० ३४। मं० २।।
गणानां त्वा गणपतिँ् हवामहे । यजु० अ० ३४। मं० २।।  ‘भगवती भूया:’ । अथर्व० कां० ९ ।। सू० १०।। मं० २०।। सूर्या आत्मा जगतस्तस्थुषश्च । यजु० अ० ३४। मं० २।। इत्यादी वेदप्रमाणांनी आधारे शैवादी मते सिद्ध होतात. मग त्यांचे तुम्ही खंडन का करता?

(उत्तर) या वचनांवरून शैवादी संप्रदाय सिद्ध होत नाहीत. कारण त्यातील 'रुद्ध' परमेश्वर, प्राणादी वायू, जीव, अग्नी इत्यादीचे नाव आहे. ('नम' शब्दाचा अर्थ नमस्कार व 'अन्न' असाही आहे. (नम इति अन्न नाम. निघं . २।७) परमात्मा हा दुष्टावर क्रोध करून त्यांना रडविणारा म्हणजे रुद्र आहे. त्याला नमस्कार करावा. प्राण आणि जठराग्नी यांना अन्न द्यावे. जो मंगलकारी परमेश्वर जगाचे अत्यंत कल्याण करणारा आहे त्याला नमस्कार केला पाहिजे. ‘शिवस्य परमेश्वरस्यायं भक्त शैव ’। ‘विष्णो परमात्मनोऽयं भक्तो वैष्णव ’। ‘गणपते सकलजगत्स्वामिनोऽयं सेवको गाणपत ’। ‘भगवत्या वाण्या अयं सेवको भागवत ’। ‘सूर्यस्य चराचरात्मनोऽयं सेवक सौर ’ रुद्र, शिव, विष्णू, गणपती, सूर्य वगैरे ही परमेश्वराची गावे आहेत. भगवती सत्यभाषणयुक्त वाणीचे नाव आहे. असे अज्ञानाने समजून या लोकांनी निष्कारण असे भांडण माजविले. जसे-
     कोण्या एका वैराग्याचे दोन चेले होते. ते दररोज आपल्या गुरूचे पाय दाबीत. एकाने उजव्या पायाची आणि दुसऱ्याने डाव्या पायाची सेवा करावी असे वाटून घेतले होते. एके दिवशी असे झाले की, एक चेला बाजार करायला गेला; आणि दुसरा आपल्या वाटणीच्या पायाची सेवा करीत होता. इतक्यात गुरूजी दुसऱ्या कुशीवर वळले, त्याबरोबर त्या शिष्याच्या पायावर दुसऱ्या शिष्याचा वाटणीचा पाय पडला त्याने दांडके घेऊन त्या पायाला ठोकले. गुरू म्हणाले, "अरे दुष्टा! काय केलेस तू हे ?" चेला उत्तरला, "माझ्या वाट्याच्या पायावर हा पाय का येऊन पडला?" इतक्यात बाजार करायला गेलेला शिष्य परत आला; आणि तो आपल्या वाट्याच्या पायाची सेवा करू लागला. पाहिले तर तो पाय सुजला होता त्याने वैराग्याला विचारले, "गुरूजी माझ्या वाटणीच्या या पायाला काय झाले?" गुरुने सारी हकीगत त्याला सांगितली. तेव्हा त्या मूर्ख चेल्याने काहीही न बोलता दांडके घेऊन गुरूच्या दुसऱ्या पायावर मारले. बिचारा गुरू जोर जोरात ओरडू लागला. त्याबरोबर त्या दोघांनी गुरूच्या पायांना काठने मारू लागले. तेव्हा मोठा कोलाहल झाला ते ऐकून लोक धावून आले आणि विचारू लागले की, ‘साधु महाराज ! काय झाले?" त्यांच्यातील एका शहाण्या माणसाने आधी त्या मूर्ख शिष्यांच्या तावडीतून गुरूची सुटका केली; आणि मग त्यांना असा उपदेश केला की, "पहा !
हे दोन्ही पाय तुमच्या गुरूचे आहेत. त्यांची सेवा केल्याने गुरूला सुख मिळते आणि त्यांना दु:ख दिल्याने गुरूलाच दुःख होते."
     जसे एका गुरूच्या सेवेत शिष्यांनी खेळखंडोबा केला त्याचप्रमाणे जो एक अखंड, सच्चिदानंद, अनंत स्वरूप परमात्म्याची विष्णू, रुद्र इत्यादी अनेक नावे आहेत. त्या नावांच्या अर्थासंबंधी आम्ही प्रथम समुल्लासात विवेचन केले आहे. तो सत्यार्थ समजून न घेता शैव, शाक्त, वैष्णव आदी संप्रदायाचे लोक परस्परांच्या नावाची निंदा करतात. हे मठ्ठ लोक आपल्या बुद्धचा थोडाफार वापर करून असा विचार करीत नाहीत की, ही सारी विष्णू, रुद्र, शिव इत्यादी नावे एका अद्वितीय, सर्वनियंता, सर्वांतर्यामी, जगदीश्वराचे अनेक गुण, कर्म व स्वभाव युक्त असल्यामुळे ती त्याचेच वाचक आहेत. अशा लोकांवर ईश्वराचा कोप होत नसेल काय?

चक्रांकित वैष्णव
(आता चक्रांकित वैष्णवांची अद्भुत माया पाहा:-)

ताप पुण्ड्रं तथा नाम माला मन्त्रस्तथैव च ।
अमी हि पञ्च संस्कारा परमैकान्तहेतव ।।१।। रामानुजपटलपद्धती, पृष्ठ ७
अतप्ततनूर्न तदामो अश्नुते । इति श्रुते ।।  ऋ० मं० ९।। सू० ८३।। मं० १।।

अर्थ :- (तापः) शंख, चक्र, गदा व पद्म हो चिह्न असणाऱ्या मुद्रा अग्नीमध्ये तापवून वैष्णव लोक आपल्या दंडाच्या मूळावर डाग देतात आणि मग त्या मुद्रा दुध पात्रात बुडवून थंड करतात आणि काही लोक ते दूध पितातही. आता पाहा. अशा प्रकारे प्रत्यक्ष माणसांच्या मांसाचाही स्वाद त्या दुधात उतरत असणार. असल्या कृत्यांनी परमेश्वराला प्राप्त करण्याची आशा वैष्णव लोक बाळगतात आणि म्हणतात की, "शंखचक्रादी तप्त मुद्रा शरीरावर मारून घेतल्याशिवाय जीवाला परमेश्वराची प्राप्त होत नाही. कारण तोपर्यंत तो (आमः) कच्चा आहे आणि सरकारी बिल्ला (चापरास) लावल्यानंतर तो माणूस सरकारी नोकर आहे हे ओळखून सर्व लोक त्याला घाबरतात त्याप्रमाणेच विष्णूच्या शंखचक्रादी आयुधांची चित्रे माणसाच्या अंगावर पाहून यमराज व त्याचे दूत भितात आणि असे म्हणतात की,"

दोहा बाना बड़ा दयाल का, तिलक छाप और माल।
यम डरपै कालू कहे, भय माने भूपाल।। भक्तमाल, निष्ठा ६

अर्थ :-ईश्वराचा वेष असणारा टिळा, मुद्रा व माळ धारण करणे हे फार मोठे आहे. याला यमराज व राजाही भीतो. (पुण्ड्रम्) त्रिशूलासारखे कपाळावर चित्र काढणे, (नाम) नारायणदास, विष्णुदास यांसारखी दास शब्दांत नावे ठेवणे, (माला) कमळाच्या बियांची माळ बाळगणे आणि पाचवा मंत्र ‘ओं नमो नारायणाय’ या गोष्टी त्यांनी सामान्य लोकांसाठी मंत्र ठरवून दिल्या आहेत. तसेच,

श्रीमन्नारायणचरणं शरणं प्रपद्ये।।१।। श्रीमते नारायणाय नम ।।२।। श्रीमते रामानुजाय नम ।।३।। इत्यादी मंत्र श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांसाठी बनविले आहेत. पहा ! हीही एक दुकानदारीच झाली, जसा चेहरा तसा टिळा.या पाच संस्कारांना ते चक्रांकित मुक्तीचा हेतू समजतात. या मंत्रांचा अर्थ :- मी नारायणाला नमस्कार करतो. मी लक्ष्मीयुक्त नारायणाच्या चरणांना शरण जातो.॥१। मी श्रीमान नारायणाला नमस्कार करतो अर्थात जो शोभायुक्त नारायण आहे त्याला माझा नमस्कार असो. ॥२॥श्रीमान रामानुजांना मी नमस्कार करतो. ॥३ जसे वाममार्गी लोक पंचमकार मानतात तसे वैष्णव चक्रांकित पाच संस्कार मानतात. शंखचक्र, वगैरे डागण्यासाठी हे लोक जो वेदमंत्र प्रमाण सांगतात त्यांचा पाठ व अर्थ असा आहे:-

पवित्रं ते विततं ब्रह्मणस्पते प्रभुर्गात्रणि पर्येषि विश्वतः ।
अतप्ततनूर्न तदामो अश्नुते शृतास इद्वहन्तस्तत्समाशत ।।१।।
तपोष्पवित्रं विततं दिवस्पदे ।।२।। – ऋ० मं० ९ । सू० ८३ । मं० १ । २ ।।

अर्थ :- हे ब्रह्मांडाचे व वेदांचे पालन करणाऱ्या प्रश्न सर्वसामर्थ्ययुक्त, सर्व शक्तिमान ! तू आपल्या व्यापकतेने जगाचे सर्व अवयव व्याप्त करून ठेवले आहेस. तुझे स्वरूप जे व्यापक व पवित्र आहे. जो ब्रह्मचर्य, सत्य भाषण, शम, दम, योगाभ्यास, जितेंद्रियत्व, सत्संग इत्यादी तपश्चर्या रहित जो अपरिपक्व अंतःकरणयुक्त आहे, तो तुझ्या त्या स्वरूपाला प्राप्त होत नाही. पण जे लोक पूर्वोक्त तप करून शुद्ध आहेत तेच त्या तपाचे आचरण करून तुझ्या त्या शुद्ध स्वरूपाला उत्तम प्रकारे प्राप्त होतात॥१॥
     जे प्रकाशस्वरूप परमेश्वराच्या सृष्टीमध्ये विस्तृत पवित्राचरणरूपी तप करतात ते परमेश्वराच्या प्राप्तीसाठी योग्य असतात. ॥२॥
       आता विचार करावा की, रामानुजीयादी लोक या मंत्राने चक्रांकित होणे कसे सिद्ध करतात? खरेच हे
सांगणारे लोक विद्वान होते की अविद्वान ? ते विद्वान होते तर ते असा असंभवनीय अर्थ कसा, का करतात ?
कारण या मंत्रात 'अतप्ततनू' असा शब्द आहे, 'अतप्तभुजैकदेशः' असा शब्द नाही. पुनः 'अतप्ततनूः' हा अर्थ 'ज्यांचे शरीर नखशिखान्तपर्यंत समुदाय असा होतो. हे प्रमाण मानून चक्रांकित लोक अमीने शरीर तापवावे. असा स्वीकार करतील तर त्यांनी आपले सारे शरीर भट्टीत टाकून जाळून घ्यावे तरी ते या मंत्राच्या अर्थी विरुद्धच होईलकारण या मंत्रामध्ये सत्यभाषणादी पवित्र कर्म करणे हे तप असे घेतले आहे.

ऋतं तपः सत्यं तपो दमस्तपः स्वाध्यायस्तपः।। -तैत्तरीय॰।। व०१०।। अ० ८।।

अर्थ :-(ऋतं तपः) यथार्थ शुद्ध भाव, सत्य मानने, सत्य बोलणे, सत्य करणे,मनाला अधर्माकडे जाऊ न देणे, बाह्य इंद्रियांना अन्यायचरणापासून परावृत्त करणे म्हणजे शरीर, इंद्रिये , व मन यांनी शुभकर्माचरण करणे, वेदादी सत्यविद्यांचे अध्ययन-अध्यापन करणे, वेदानुसार आचरण करणे इत्यादी उत्तम धर्म युक्त कर्माचे नाव तप आहे. धातूचे छाप तापवून चामडी जाळणे म्हणजे तप म्हणणे नव्हे.
     पाहा ! तप्त मुद्राधारी लोक स्वत:ला मोठे वैष्णव समजतात. परंतु आपली परंपरा आणि कुकर्मे यांच्याकडे लक्ष देत नाहीत. वैष्णव पंथाचा मूळ पुरुष 'शठकोप' झाला. चक्रांकित लोकांच्या 'भक्तमाल' जो
ग्रंथ नाभाडूमाने रचला त्यात लिहिले आहे की, ‘विक्रीय शूर्प विचचार योगी इत्यादी वचन चक्रांकितांच्या ग्रंथात लिहले आहे.
     शठकोप योगी सुपे तयार करून विकत असे आणि सर्वत्र संचार करीत असे. म्हणजे तो कुंजर जातिमध्ये जन्मला होता. जेव्हा तो ब्राह्मणांकडून शास्त्रे शिकू किंवा ऐकू इच्छित असेल, तेव्हा ब्राह्मणांनी त्याचा तिरस्कार केला असावा. म्हणून त्याने ब्राह्मणांविरुद्ध एक नवीन संप्रदाय तिलक चक्रांकित आदी शास्त्र विरुद्ध मनमाने सुरु केला असावा. त्याचाशिष्य 'मुनिवाहन' जो चांडाळ कुळात जन्मलेला होता. त्याचा चेला 'यावनाचार्य हा यवन कुलोत्पन्न होता. त्याच्या गावात बदल करून काही लोक त्याला 'यामुनाचार्य' असेही म्हणतात त्याच्या नंतर ब्राह्मण कुळात जन्मलेला 'रामानुज' हा चक्रांकित (तप्तमुद्राधारी) झाला. त्याच्या पूर्वी काही ग्रंथ लिहिले गेले होते. रामानुजाने थोडीशी संस्कृत शिकून संस्कृतमध्ये श्लोकबद्ध ग्रंथ आणि शारीरिक सूत्रे व उपनिषदांची टिका जी शंकराचार्यांच्या टीकेविरुद्ध लिहली होती. त्याने शंकराचार्यांची यथेच्छ निंदाही केली.
      जसे शंकराचार्यांचे मत आहे की, जीव व ब्रह्म हे एकच आहेत. दुसरी कोणतीच गोष्ट वास्तविक नाही. जगाचा हा सर्व विस्तार मिथ्या, मायारूप व अनित्य आहे. याउलट रामानुजाचे असे मत आहे की, जीव, ब्रह्म व माया ही तीन्ही नित्य आहेत. येथे शंकराचार्यानी ब्रह्माखेरीज जीव आणि कारण वस्तूला न मानणे हे ठीक नाही. तसेच रामानुजांच्या मते जीव व माया यांच्यासह परमेश्वर एक आहे, हे बरोबर नाही. जे की विशिष्ट अद्वैत म्हणजे जीव ईश्वर व माया या तीन्ही वस्तूंना नित्य मानणे आणि तीनही एकच आहेत हे म्हणणे हे ही चूक आ. हेकंठी, तिलक, माला, मूर्तिपूजा इत्यादी पाखंडी गोष्टी प्रचलित मानणे ह्या वाईट गोष्टी चक्रांकितमध्येही आहेत. जसे चक्रांकित संप्रदाय जसा वेदविरोधी आहे तसे शंकराचार्यांच्या मताचे लोक नाहीत.

मूर्तिपूजा समीक्षा

(प्रश्न) मूर्तिपूजा कोठून सुरू झाली?
(उत्तर) जैन लोकांपासून.
(प्रश्न) जैनांनी ती कोठून घेतली?
(उत्तर) आपल्या मूर्खपणातून.
(प्रश्न) जैन लोक म्हणतात की, शांत ध्यानावस्थेत बसलेली मूर्ती पाहून आपल्या जीवावरही तसाच शुभ
परिणाम होतो.
(उत्तर) जीव चेतन व मूर्ती जड (अचेतन) आहे. मूर्तीप्रमाणे जीवही जड ( अचेतन) होईल काय ? ही मूर्तीपूजा केवळ पाखंड मत आहेती जैनांनी सुरू केली आहेयासाठी याचे खंडन जैनमताचे बाराव्या समुल्लासात करणार आहोत.
((प्रश्न) शाक्त, इत्यादिकांनी मूर्तीच्या बाबतीत जैनांचे अनुकरण केलेले नाही. कारण जैनांच्या मूर्तीसारख्या वैष्णवादिकांच्या मूर्ती नाहीत.
(उत्तर) होय. ते बरोबर आहे. जर त्यांनी जैनांसारख्याच आपल्या मूर्ती बनविल्या असल्या तर तेही जैनच झाले असते. म्हणून त्यांनी आपल्या मूर्ती जैनांच्या मूर्तीच्या विरुद्ध प्रकारच्या बनविल्या. कारण जैनना विरोध
करणे हे त्याचे काम होते व त्यांना विरोध करणे हे जैनांचे मुख्य काम होते. जसे जैनांच्या मूर्ती नम, ध्यानावस्थित आणि विरक्त माणसासारख्या बनविल्या आहेत. तर त्यांच्या उलट वैष्णवादिकांच्या मूर्ती भरपूर शृंगारगारलेल्या, स्त्रीसहित, रंग-राग-भोग आणि विषयासक्ती दर्शविणाऱ्या, उभ्या किंवा बसलेल्या बनविल्या आहेत. जैन लोक शंख, घंटा, झांजा वगैरे वाद्य वाजवित नाही; तर (वैष्णवादिक लोक) अनेक वाद्यांचा फारच गोंगाट करतात. त्यांच्या या युक्तीमुळे वैष्णवादी संप्रदायी पुरोहितांचे वेले जैनांच्या जाळ्यात न अडकता त्या
पोपांच्या जाळ्यात अडकले; आणि त्यांच्यापैकी अनेकांनी व्यासादी महर्षीच्या नावांवर कपोलकल्पित असंभवनीय कथांचे गाथायुक्त ग्रंथ रचले. त्यांनी 'पुराण' असे नाव त्यांना दिले आणि कथादेखील ऐकवू लागले आणि मग पाषाणाच्या मूर्ती बनवून त्या गुप्तपणे डोंगरात किंवा जंगलात ठेवून येत किंवा जमिनीत पुरून ठेवीत. मग आपल्या चेल्याकडून सगळीकडे अशी बातमी पसरवीत की, मला रात्री स्वामध्ये महादेव, पार्वती, राधा, कृष्ण, सीता, राम, लक्ष्मी, नारायण, भैरव, नुमान यांच्यापैकी कोणी येऊन सांगितले की, "मी अमुक ठिकाणी आहे, मला तेथून घेऊन ये आणि मंदिरामध्ये माझी स्थापना करतूच माझा पुजारी हो. म्हणजे मी तुला मनोवांछित फळ देईन."
     अज्ञानी लोकांनी त्या पोपांची लीला ऐकली आणि ते खरे आहे असे मानले मग त्या पोपांना विचारीत, ‘महाराज, अशी मूर्ती कोठे आहे?" तेव्हा तो भोंदू त्यांना सांगे, "अमुक डोंगरात किंवा जंगलात ती मूर्ती आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला. मी ती तुम्हाला दाखवितो. मग ते आंधळे त्या लबाड इसमाच्या बरोबर तेथे जाऊन पाहत आणि आश्चर्यचकित होते आणि त्या पुरोहिताच्या पायावर लोळण घेऊन म्हणत, "महाराज ! तुमच्यावर या देवाची फारच कृपा आहे. तुम्ही ही मूर्ती घेऊन चला. आम्ही तिच्यासाठी मंदिर बांधून देऊ त्यामध्ये या देवाचीस्थापना करून तुम्हीच त्याची पूजा करा. मग आम्हीही या प्रतापी देवाचे दर्शनस्पर्शन करून मनोवांछित फळ मिळवू." अशी चलाखी एकाने केलेली पाहन सगळ्या पोपांनी आपले पोट भरण्यासाठी छल कपट करून मूर्ती स्थापन केल्या.
(प्रश्न) परमेश्वर निराकार आहे. त्याचे ध्यान करता येत नाही. म्हणून ध्यानासाठी मूर्तीच असली पाहिजे. अगदी काहीच न करण्यापेक्षा मूर्तीसमोर जाऊन, हात जोडून जे लोक परमेश्वराचे स्मरण करतात व नामजप करतात, त्यात काय नुकसान आहे ?

(उत्तर) ज्याअर्थी परमेश्वर निराकार, सर्वव्यापक आहे त्याअर्थी त्याची मूर्ती बनूच शकत नाही आणि जर केवळ मूर्तीच्या दर्शनाने परमेश्वराचे स्मरण होत असेल तर परमेश्वराने निर्माण केलेली पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती वगैरे वस्तूंच्या अद्भुत रचना पाहून ईश्वराचे स्मरण होणार नाही काय? अशा परमेश्वर रचित
पृथ्वी पर्वतादि महा मूर्ति की ज्या पर्वतापासून मनुष्यकृत मूर्ति बनतात त्या रचनांना पाहून परमेश्वराचे स्मरण
होऊ शकत नाही काय? शिवाय मूर्ती पाहिल्यानंतर परमेश्वराचे स्मरण होते असे जे तुम्ही म्हणता ते पूर्णपणे
खोटे आहे. कारण जेव्हा मूर्ती समोर नसेल तेव्हा परमेश्वराचे स्मरण न झाल्याने माणूस एकान्त मिळताच चोरी, जारी वगैरे दुष्कृत्ये करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. कारण तो समजतो की आपल्याला कोणी यावेळी व या ठिकाणी पाहत नाही म्हणून तोते कुकर्म केल्याशिवाय चुकणार नाही. अशा प्रकारे पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा करण्यात अनेक दोष आहेत असे सिद्ध होते
     आता असे पाहा ! जो कोणी पाषाणादिकांच्या मूर्तींना न मानून सर्वदा सर्वव्यापक, सर्वांतर्यामी, न्यायकारी परमात्मा सर्वत्र आहे असे जाणतो व मानतो तो हे ओळखतो की, परमेश्वर सगळ्यांची बरी-वाईट कृत्ये सदैव पाहत असतो; आणि एक क्षणही आपण परमात्म्यापासून वेगळे राहू शकत नाही. म्हणून कुकर्म करण्याची गोष्ट तर दूरच राहिली, तसे काही करण्याचा वाईट विचारही तो मनात आणू शकत नाही. त्याला हे माहीत असते की,
जर मी मनाने अथवा वाणीनेही काही वाईट कृत्य करीन तर त्या सर्वांतर्यामी परमेश्वराच्या न्यायानुसार मला शिक्षा झाल्याखेरीज राहणार नाही. शिवाय केवळ नामस्मरणाने काहीही फळ मिळत नसते. नुसते तोंडाने साखर, साखर असे म्हटल्याने तोंड गोड होत नाही किंवा कडुलिंबाचा जप केल्याने तोंड कडू होत नाही. प्रत्यक्ष
जिभेने चाखल्यावरच गोडवा किंवा कडूषणा लक्षात येतो.

नामस्मरण

(प्रश्न) देवाचे नाव घेणे पूर्णपणे मिथ्या आहे काय ? सर्व पुराणांमध्ये तर नामस्मरणाचे खूपच माहात्म्य वर्णिले आहे.
(उत्तर) नामस्मरण करण्याची तुमची रीत चांगली नाही. ज्याप्रकारे तुम्ही नामस्मरण करता ती रीत चुकीची आहे.
(प्रश्न) आमची रीत चुकीची का आहे?
(उत्तर) कारण ती वेदविरुद्ध आहे
(प्रश्न) तर मग वेदोक्त नामस्मरणाची रीत तुम्ही आम्हांला सांगावी!
(उत्तर) वैदिक पद्धतीने नामस्मरण अशा प्रकारे केले पाहिजे. 'न्यायकारी हे ईश्वराचे एक नाव आहे. त्याचा अर्थ असा की, परमात्मा पक्षपातरहित होऊन सर्वांचा यथायोग्य न्याय करतो. हा अर्थ लक्षात ठेवून न्याययुक्त व्यवहार करावा, कधीही अन्याय करू नये. अशा प्रकारे परमेश्वराच्या एका नावानेदेखील आचरण
केल्यास एका माणसाचे कल्याण होऊ शकते.
(प्रश्न) परमेश्वर निराकार आहे, हे आम्हालाही माहीत आहे. परंतु त्याने शिव, विष्णू, गणेश, सूर्य, देवी इत्यादिकांची शरीर धारण करून राम, कृष्ण वगैरे अवतार घेतले. म्हणून त्याच्या मूर्ती बनतात. तेही चूक आहे काय?
(उत्तर) होय. तेही चूक आहे. कारण ‘अज एकपात् ‘अकायम्  ’ इत्यादी विशेषणांचा वापर करून परमेश्वर हा जन्ममरणरहित व शरीररहित असल्याचे वेदात सांगितले आहे. तसेच युक्तिवादानेही परमेश्वर कधी अवतार घेत नाही. कारण जो आकाशासारखा सर्वत्रव्यापक, अनंत आणि सुखदु:ख इत्यादी गुणरहित तो एका लहानशा वीर्यात, गर्भाशयात किंवा शरीरात कसा सामावू शकेल ? जो एकदेशीय असतो त्याचेच येणे व जाणे होत असते. जो अचल, अदृश्य व अणुरेणूत भरून राहिलेला आहे त्याचा अवतार होतो असे म्हणणे म्हणजे वंध्यापुत्राचा विवाह होऊन त्याच्या पत्राचे दर्शन करण्याची गोष्ट आहे.
(प्रश्न) ज्याअर्थी परमेश्वर सर्वव्यापक आहे तर तो मूतीतही आहे. मग त्याची भावना कोणत्याही पदार्थात करून पूजा करण्यास काय हरकत आहे? पाहा

न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये।
भावे हि विद्यते देवस्तस्माद्भावो हि कारणम्।। गरुडपुराण, प्रेत खं० अ० ३०।। श्लो० १३।।

     देव हा लाकूडदगड व माती यांनी बनविलेल्या पदार्थात नसतो; तर तो भावनेत असतो. जेथे भाव करावा तेथे परमेश्वर सिद्ध होतो. (भाव तसा देव)
(उत्तर) परमेश्वर सर्वत्र व्यापक असताना एखाद्या विशिष्टवस्तूच्या ठिकाणीच आहे आणि इतरत्र नाही, अशी भावना बाळगणे म्हणजे चक्रवर्ती राजाला संपूर्ण राज्याचा सत्ताधीश न मानता एखादा लहानशा झोपडीचा मालक समजण्यासारखे आहे. पहा । हा त्याचा केवढा मोठा अपमान आहे तसेच तुम्ही त्याचाही अपमान करण्यासारखे आहे. परमेश्वर सर्वव्यापक आहे तर मग बागेतली पानेफुले तोडून ती मूर्तीवर का वाहता? चंदन उगाळून का लावता? उदबत्ती कशाला जाळता ? घंटा, झांज, टाळ, पखवाज काठीने कशाला बडवता? तो तुमच्या हातांत परमेश्वर आहे. मग हात कशाला जोडता? मस्तकात आहे मग ते कशाला नमवता ? अन्नपाण्यात आहे. मग त्याचा नैवेद्य कशाला दाखवता ? पाण्यात ईश्वर आहे मग देवाला आंघोळ कशाला घालता? कारण की तो परमेश्वर या सर्व पदार्थात व्यापक आहे
      आणि तुम्ही व्यापकाची पूजा करता की, व्याप्याची? जर तुम्ही व्यापकाची पूजा करीत असाल तर दगड, लाकूड इत्यादींवर गंधफुले का वाहता? आणि जर तुम्ही व्याप्याची पूजा करत आहात तर आम्ही परमेश्वराची
पूजा करतो असे खोटे का बोलता? आम्ही ईश्वराचे नव्हे तर पाषाणादिकांचे पुजारी आहोत असे खरे का नाही सांगत?
       आता असे सांगा की, 'भाव' खरा आहे की खोटा? तो खरा आहे तर तुमच्या भावनेच्या आधीन बनून परमेश्वर बद्ध होऊन जाईल आणि तुम्ही मातीमध्ये सोने, चांदी इत्यादी, दगडामध्ये हिरा, पन्ना इत्यादी; समुद्राच्या फेसामध्ये मोती; पाण्यामध्ये दूध, तूप, दी इत्यादी; आणि धुळीमध्ये मैदा, साखर इत्यादीची भावना
बाळगून त्यांना तसे का बनवीत नाही . तुम्ही दुःखाची भावना कधी करीत नाही; मग ते का होते? आणि सदैव सुखाची भावनां करता; मग ते का मिळत नाही? आंधळा माणूस नेत्रांची भावना करून का पाहू शकत नाही? मरण्याची भावना करीत नाही; मग का मरता ? म्हणून तुमची भावना खरी नाही. कारण जो जसा असेल तसाच तो मानणे ही खरीभावना होय जसे अग्नीमध्ये अग्नी, पाण्यामध्ये पाणी समजणे ही भावना आणि पाण्यामध्ये अग्नी व अग्नीमध्ये पाणी आहे असे समजणे ही अभाव होय. कारण जे जसे आहे त्याला तसे जाणणे हे ज्ञान आहे आणि त्याच्या विपरीत जाणणे हे अज्ञान होय. म्हणून तुम्ही अभावनेला भावना व भावनेला अभावना म्हणता.
(प्रश्न) अहो ! जोपर्यत वेदमंत्रांनी आवाहन केले जात नाही तोपर्यंत देवाचे आगमन होत नाही. आवाहन केले की, परमेश्वर झटकन येतो आणि विसर्जन केले की तो निघून जातो.
(उत्तर) जर मंत्रोच्चाराने आवाहन केल्याने मूर्तीमध्ये देव येत असेल तर ती मूर्ती सचेतन का होत नाही? आणि विसर्जन केल्याने तो निघून जात असेल तर तो कोठून येतो आणि कोठे जातो
     बंधूनो ऐका ! पूर्णब्रह्म परमात्मा येतही नाही अथवा जातही नाही. जर तुम्ही मंत्रबळाने परमेश्वराला बोलावू शकता, तर त्या मंत्रांनी आपल्या गेलेल्या पुत्राच्या शरीरात जीवाला का बोलावित नाही ? आणि शत्रूच्या शरीरातील जीवात्म्याचे विसर्जन करून त्याला ठार का मारू शकत नाही?
     भोळ्या भाबडया बंधूगो, ऐका ! हे पोप तुम्हाला फसवून आपला स्वार्थ साधतात. वेदांमध्ये पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा आणि परमेश्वराच्या आवाहन-विसर्जनाशी संबंधित एक अक्षरही त्यात नाही. (प्रश्न) प्राणा इहागच्छन्तु सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा।
आत्मेहागच्छतु सुखं चिर तिष्ठतु स्वाहा।
इन्द्रियाणीहागच्छन्तु सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा।। प्रतिष्ठामयुख आदी ग्रंथ

इत्यादी प्राणप्रतिष्ठापनेचे वेदमंत्र विद्यमान असताना ते नाहीत असे तुम्ही कसे म्हणता?
(उत्तर) अरे बाबा ! आपली बुद्धी थोडी तरी वापर की, ही सारी वेदवचने नसून वाममार्गी लोकांनी वेदांविरुद्ध लिहिलेल्या ग्रंथातील पोपरचित पंक्ती आहेत.
(प्रश्न) तंत्र ग्रंथ खोटे आहेत काय?
(उत्तर) होय. ते पूर्णपणे खोटे आहेत. ज्याप्रमाणे पाषाणादी मूर्तीशी संबंधित एकही मंत्र वेदात नाही त्याचप्रमाणे 'स्नानं समर्पयामि' यांसारखी वचनेही त्यांत नाहीत ‘पाषाणादिमूर्ति रचयित्वा मन्दिरेषु संस्थाप्य गन्धादिभिरर्चयेत्' म्हणजे पाषाणादींची मूर्ती बनवून तिची स्थापना मंदिरात करावी आणि गंधाक्षतांनी तिची पूजा करावी, असे वेदांमध्ये मुठीच सांगितलेले नाही.
(प्रश्न) वेदांमध्ये तशी विधि नाही तर खंडनही नाही आणि जरी खंडन केले आहे तरी ‘प्राप्तौ सत्यां निषेधः’ म्हणजे मूर्ती अस्तित्वात असल्यानेच त्याचा निषेध होऊ शकतो.
(उत्तर) विधि तर नाही याउलट परमेश्वराच्या ठिकाणी अन्य कोणत्याही पदार्थाला पूजनीय मानू नये असे स्पष्ट सांगितले आहे व तसे करणे सर्वथैव निषिद्ध ठरविले आहे. काय अपूर्वविधी होत नाही? हे ऐका !

अन्धन्तमः प्रविशन्ति येऽसम्भूतिमुपासते ।
ततो भूयऽइव ते तमो यऽउ सम्भूत्यारताः ।।१।।-यजुः० अ० ४० । मं० ९ ।।

अर्थ:-जे लोक 'असंभूति' म्हणजे अनुत्पन्न अगदी प्रकृतिरूप कारणाची ब्रह्माच्या ठिकाणी उपासना करतात ते अंधकारात प्रवेश करतात आणि जे लोक 'संभूति म्हणजे मूळ प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या कार्यरूप पृथ्वी आदी भूतांना, पाषाण, वृक्ष इत्यादीकांच्या अवयवांना व मनुष्यादिकांच्या शरीरांना ब्रह्म समजून त्यांची उपासना करतात, ते त्याहूनही जास्त गडद अंध:कारात पडतात. अर्थात ते महामूर्ख लोक घोर दुःखरूपी नरकात पडून दीर्घकाळ महाक्लेशभोगतात. ॥१॥

न तस्य प्रतिमाऽअस्ति ।।२।। -यजुः० अ० ३२ । मं० ३ ।।

जो परमात्मा सर्व जगातव्यापक आहे, त्या निराकार परमेश्वराची भौतिक प्रतिमा, परिमाण सादृश्य किंवा मूर्ती नाही. ॥२॥

यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते।।१।। केनोपनि०।। खंड १।। मं० ४।।

जो परमेश्वर वाणीचा विषय नाही; म्हणजे 'हे पाणी आहे. घ्या,’ असा तो विषय नाही आणि ज्याच्या धारणेने व सत्तेने वाणीची प्रवृत्ती असते तेच ब्रह्म आहे हे तू जाण व त्याची उपासना कर. त्याच्या खेरीज अन्य जे काही आहे ते उपासनीय नाही. ॥१॥

यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम् ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते।।२।। केनोपनि०।। खंड १।। मं० ५।।

जो परमेश्वर मनाने 'इयत्ता तुकडी करून मनात आणला जात नाही, जो मनाला जाणतो तेच ब्रह्म आहे. हे तु जाण आणि त्याचीच उपासना कर. याच्याहून भिन्न असा जो जीव व अंतःकरण आहे त्याची उपासना ब्रह्याच्या स्थानी करू नकोस॥२॥

यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षूंषि पश्यन्ति ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते।।३।। केनोपनि०।। खंड १।। मं० ६।।

जो परमात्मा डोळ्यांना दिसत नाही, परंतु ज्याच्यामुळे डोळे पाहतात तेच ब्रह्म आहे हे तू जाण आणि त्याचीच उपासना कर. त्याच्याहून भिन्न सूर्य, विद्युत व अग्नी वगैरे जे जडपदार्थ आहेत, त्यांची उपासना करू नकोस. ॥३॥

यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम् ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते।।४।। केनोपनि०।। खंड १।। मं० ७।।

ज्या परमेश्वराचे ग्रहण कानांनी होऊ शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे कान ऐकतात त्यालाच तू ब्रह्म जाण आणि त्याचीच उपासना कर. त्याच्याहून वेगळे असे जे शब्दादी विषय आहेत त्यांची उपासना तु ब्रह्माच्या ठिकाणी करू नकोस. ॥४॥

यत्प्राणेन न प्राणिति येन प्राण प्रणीयते ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते।।५।। केनोपनि०।। खंड १।। मं० ८।।

जो परमेश्वर प्राणांच्या योगाने गतिमान होत नाही, परंतु ज्याच्यामुळे प्राण गमनशील होतात तेच ब्रह्म आहे हे जाण आणि त्याचीच उपासना कर. त्याच्याहून भिन्न असे वायू वगैरे जे पदार्थ आहेत त्यांची उपासना तू करू नकोस.॥५॥
     अशा प्रकारे अनेक निषेध आहे. निषेध हा प्राप्ताचा व अप्राप्ताचाही होतो. एके ठिकाणी बसलेल्या माणसाला तेथून उठविणे हा 'प्राप्त' चा निषेध होय. " हे पुत्रा ! तू कधी चोरी करू नकोस. विहिरीत पडू नकोस. दुष्टांची संगत धरू नकोस. विद्याहीन राहू नकोस" हा "अप्राप्त वा निषेध होय. म्हणून मनुष्याच्या ज्ञानामध्ये अप्राप्तचा आणि परमेश्वराच्या ज्ञानामध्ये प्राप्तचा निषेध केला आहे. म्हणून पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा अत्यंत निषिद्ध आहे.
(प्रश्न) मूर्तिपूजेमध्ये जर पुण्य नाही तसे पापही नाही.
(उत्तर) कर्में दोन प्रकारची असतात. विहित व निषिद्ध. सत्य भाषण करावे इत्यादी जी कर्तव्ये वेदांत सांगितली आहेत ती विहित कर्में होत. असत्य भाषण करू नये, यांसारखी जी अकर्तव्ये वेदांत सांगितली आहेत. ती निषिद्धक होत. विहित कर्माचे अनुष्ठान करणे हा धर्म असून ती न करणे हा अधर्म आहे. याचप्रमाणे निषिद्ध कर्मे करणे हा अधर्म असून ती न करणे हा धर्म आहे. ज्याअर्थी वेदांनी निषिद्ध ठरविलेली मूर्तिपूजा वगैरे कर्में तुम्ही करता याअर्थी तुम्ही पापी ठरत नाही काय?
(प्रश्न) असे पाहा! वेद अनादी आहेत. त्या काळ मूर्तीची काय आवश्यकता होती? कारण पूर्वी देव प्रत्यक्ष होते. ही मूर्तिपूजा कालांतराने तंत्रमार्गी ग्रंथ व पुराणे यांच्यापासून निर्माण झाली. जेव्हा माणसाचे ज्ञान व सामर्थ्य कमी झाले तेव्हा निराकार परमेश्वराचे ध्यान करू शकले नाही. मात्र मूर्तीचे ध्यान करणे त्याना शक्य
होते. म्हान अज्ञानी लोकांसाठी मूर्तिपूजा आहे. घराची एकेक पायरी चढतच वर जाता येते. पहिली पायरी सोडून व जाणे शक्य होत नाही म्हणून मूर्तिपूजा ही पहिली पायरी आहे. ती करता-करता जेव्हा ज्ञान प्राप्त होते व अंतःकरण  पवित्र बनते तेव्हा माणूस परमात्म्याचे ध्यान करू शकेल. ज्याप्रमाणे लक्ष्यवेध करणारा प्रथम स्थूल लक्ष्यावर गोळी किंवा गोळा मारतो आणि मग हळूहळू सूक्ष्म लक्ष्यवेध करू शकतो. जशा मुली बाहुल्याचा खेळतोपर्यंत खेळतात जोपर्यंत त्यांना खरा पती प्राप्त होत नाही. अशाप्रकारे मूर्तिपूजा करणे वाईट गोष्ट नाही.
(उत्तर) ज्याअर्थी वेदविहित धर्म आणि वेदविरुद्ध आचरण करणे हा अधर्म आहे त्याअर्थी तुमच्या म्हणण्याप्रमाणेही मूर्तिपूजा करणे हा अधर्म ठरतो. जे ग्रंथ वेदविरुद्ध आहेत त्यांना प्रमाण मानणे म्हणजे जणू
नास्तिक बनणेच होय. पाहा:-

नास्तिको वेदनिन्दकः ।। १ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ११।।

मनु महाराज असे सांगतात की, "वेदांची निंदा म्हणजे अपमान, त्याग, वेदांविरुद्ध आचरण करतो तो नास्तिक आहे."॥१॥

या वेदबाह्याः स्मृतयो याश्च काश्च कुदृष्टयः ।
सर्वास्ता निष्फलाः प्रेत्य तमोनिष्ठा हि ताः स्मृताः ।। २ ।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० ९५।।

जे ग्रंथ वेदबाह्य कुत्सित पुरुषांनी बनविले आहेत, ते जगाला दुःखसागरात बुडविणारे आहेत. ते सर्व निष्फळ, असत्य, अंध:काररूप आणि इहलोकी व पर लोकी दुःख देणारे आहेत. ॥२॥

उत्पद्यन्ते च्यवन्ते च यान्यतोऽन्यानि कानि चित् ।
तान्यर्वाक्कालिकतया निष्फलान्यनृतानि च  ।। ३ ।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० ९६।।

वेदांचा विरोध करणारे जे ग्रंथ तयार होतात ते आधुनिक असल्यामुळे लवकर नष्ट होतात. त्यांना मानणे निष्फळ व चुकीचे आहे॥३॥

      याचप्रमाणे ब्रह्मदेवापासून जैमिनी महर्षीपर्यंतच्या विद्वानांचे मत आहे की जे काही वेदांविरुद्ध असेल ते मान्य न करणे आणि जे वेदानुकूल असेल त्याचे आचरण करणे हा धर्म होय. का? कारण वेद हा सत्य अथवा प्रतिपादक आहे. याविरुद्ध जे तंत्रग्रंथ व पुराणग्रंथ वेदविरुद्ध आहेत ते खोटे आहेत. त्यामध्ये सांगितलेली मूर्तिपूजाही अधर्मरूप आहे. माणसांचे ज्ञान जडाची पूजा केल्याने वाढत नाही किंबहुना जे काही ज्ञान असते तेही जड पूजनाने नष्ट होऊन जाते. ज्ञान लोकांची सेवा व सत्संग केल्याने ज्ञान वाढते. पाषाणादिकांच्या मूर्तीची सेवा करून ते वाढत नाही मूर्तिपूजेने परमेश्वराचे ध्यान करणे सुलभ होते काय ? मुळीच नाही मूर्तिपूजा ही पायरी नसून एक मोठी दरी आहे. माणूस त्यात पडला की, त्याचा चक्काचूर होतो. तो त्यातून बाहेर पडू शकत नाही, त्यातच मरून जातो. लहान धार्मिक पंडितांपासून मोठ्या विद्वान योग्यापर्यंत लोकांच्या सत्संगाने, सद्विद्या व सत्यभाषण इत्यादी परमेश्वर प्राप्तीच्या पायऱ्या आहेत. जशा घराच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी शिडीचा उपयोग होतो (तसा या पायऱ्यांचा ज्ञान मिळविण्यास माणसाला उपयोग होतो.) परंतु मूर्तिपूजा करता करता कोण ज्ञानी तर झाला नाही. परंतु सारे मूर्तिपूजक अज्ञानी राहून, मनुष्यजन्म व्यर्थ घालवून मरून गेले आणि जे उरले आहेत व यापुढे असतील तेही मनुष्यजन्म फुकट घालवून धर्म, अर्थ, काम व मोक्षच्या प्राप्तीपासून मिळणाऱ्या फळांना मुकतील व निष्कारण नष्ट होतील. मूर्तिपूजा ही ब्रह्माच्या प्राप्तीतील स्थूल लक्ष्यासारखी नाही. परंतु धार्मिक विद्वान व सृष्टिविद्या या गोष्टी आहेत. त्यामुळे ज्ञान वाढवीत वाढवीत माणूस ब्रह्माता जाणू शकतो. मूर्तिपूजा ही बाहुल्यांच्या खेळासारखी नाही. त्याऐवजी प्रथम अक्षरओळख करून घेऊन मग चांगला विद्याभ्यास करणे हे बाहुल्यांच्या खेळासारखे ब्रह्माच्या प्राप्तीचे साधन आहे. लक्षात ठेवा. जो कोणी उत्तम विद्या व शिक्षण मिळवील त्याला खरा स्वामी परमात्माही प्राप्त होईल.

मूर्तिपूजेचे १६ दोष

(प्रश्न) सकारावर मन स्थिर होते तसे हे निराकावर स्थिर होणे कठिण आहे. म्हणून मूर्तिपूजा आवश्यक आहे.
(उत्तर) (१) साकारावर मला कधीही स्थिर होऊ शकत नाही. कारण मन मूर्तीचे ग्रहण चटकन करते आणि
मग तिच्या एकेका अवयवावरते फिरत राहते आणि निराकार अनंत परमात्म्याचे ग्रहण करताना मन त्याच्या
सामर्थ्यनुसार खूप धावपळ करते परंतु त्याला त्याचा अंत लागत नाही. निरवयव असल्यामुळे मन चंचल राहत नाही. उलट परमेश्वराच्या गुण, कर्म, स्वभावाचा विचार करता करता ते आनंदात मग्न होऊन स्थिर होते आणि जर साकारावर मन स्थिर होऊ शकले असते तर जगातील सगळ्या माणसांची मने स्थिर झाली असती. कारण या जगात माणूस आपली पत्नी, मुलगा, धन, मित्र इत्यादी साकारांमध्ये सदैव गुंतलेला असतो. परंतु कोणाचेही मन स्थिर होत नाही तोपर्यंत निराकारामध्ये मन गुंतविले जात नाही. म्हणून मूर्तिपूजा करणे हा अधर्म आहे.
(२) मंदिर बांधण्यात कोट्यवधी रुपये खर्च करून माणसे दरिद्री बनतात. शिवाय त्यात अनेक घोटाळेही होतात.
(३) देवळांमध्ये स्त्री पुरुषांची गर्दी होत असल्याने तेथे व्यभिचार, भांडणतंटे व रोगराई वगैरे वाईट गोष्टी घडतात.
(४) मूर्तिपूजा हेच धर्म, अर्थ, काम व मुक्ती यांचे साधन आहे असे मानल्यामुळे माणूस पुरुषार्थहीन बनतो आणि मनुष्यजन्म वय घालवितो.
(५) मूर्तिपूजेमुळे नाना प्रकारची नावे व चारित्रे असणाऱ्या मूर्ती परस्परविरोधी प्रचारात येतात आणि त्यांच्या पुजाऱ्यांमधील एकमत नाहीसे होऊन त्यांच्यात वैमनस्य निर्माण होते. आपसातील या फाटफुटीमुळे देशाचा नाश होतो.
(६) मूर्तिपूजक लोक मूर्तीच्या भरवशावर शत्रूचा पराजय व आपला जय होईल असे समजून स्वस्थ बसतात. म्हणून त्यांचा पराजय होऊन त्यांचे राज्य, स्वातंत्र्य, धनाचे सुख शत्रूंच्या ताब्यात जाते. मग ते पराधीन होऊन भटारखान्याच्या तट्टाप्रमाणे किंवा कुंभाराच्या गाढवाप्रमाणे शत्रुचे गुलाम बनून नाना प्रकारची दु:खे भोगतात.
(७) जर कोणी एखाद्याला असे म्हटले की, "तुझ्या बसण्याच्या जागी किंवा नावावर मी दगड ठेवतो." तर तो माणूस क्रुद्ध होऊन त्याला मारील किंवा शिव्या देईल. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या उपासनेचे स्थान असणारे हृदय व त्याचे नावावर यांच्या जागी पाषाणादिकांच्या मूर्ती स्थापन केल्या तर त्या दुष्टबुद्धीच्या लोकांचा सत्यानाश परमेश्वराने का करू नये?
(८)भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊल मूर्तिपूजक लोक वेगवेगळ्या देवळांना भेट देण्यासाठी देशदेशांतरी हिंडत फिरतात; आणि दुःख भोगतात. धर्म, संसार, व परमार्थाचे काम नष्ट करतात. त्यांना चोर-दरोडेखोर आणि लबाड लोक फसवून लुबाडतात.
(९) मूर्तिपूजक लोक दुष्ट पुजाऱ्यांना जे धन देतात त्याचा उपयोग ते पुजारी, वेश्यागमन, परस्त्रीगमन, मद्यपान, मांसाहार, तंटेबखेडे यात खर्च करतात. त्यामुळे धन देणाऱ्याचे सुख मूळ नाहीसे होऊन त्याला दु:ख होते.
(१०) हे लोक माता, पिता वगैरे आदरणीय व्यक्तींचा अपमान करून पाषाणादिकांच्या मूर्तीचा सन्मान करतात. अशा प्रकारे ते कृतघ्न होतात.
(११) जेव्हा कोणी त्यांच्या मूर्ती फोडतात किंवा चोरून नेतात तेव्हा ते हाय हाय करीत रडत बसतात
(१२) पुजारी परस्त्रीगमन आणि पुजारिणी परपुरुषगमन करतात. त्यामुळे दोघेही स्त्रीपुरुषांच्या वैवाहिक प्रेमाच्या आनंदाला मुकतात.
(१३) स्वामीच्या आज्ञेचे पालन सेवक यथावत करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात विरोधभाव निर्माण होऊन नष्ट भ्रष्ट होतात.
(१४) जडाचे ध्यान करणाऱ्याचा आत्माही जडबुद्धीचा होतो. कारण ध्येयाचा जडत्व हा धर्म अंतकणाद्वारे आत्म्यामध्ये णक्कीच येतो.
(१५) परमेश्वराने सुगंधी फुले वगैरे गोष्टी हवा व पाणी यांचा दुर्गध नाहीसा होऊन वातावरण आरोग्य संपन्न व्हावे यासाठी निर्माण केल्या आहेत. त्या फुलांचा सुगंध वातावरणात पसरून दीर्घ काळपर्यंत हवा व पाणी शुद्ध करतो. ती फुले झाडांवर राहिली तर त्यांचा संपूर्ण सुगंथ अनेक दिवस दरवळत राहतो. परंतु पुजारी लोक ही फुले मध्येच तोडून त्यांचा नाश करतात. फुले गाऱ्यात पडून सडतात व दुर्गध उत्पन्न करतात. काय
परमेश्वराने दगडांवर वाहण्यासाठी फुलांसारख्या सुगंधी गोष्टी निर्माण केल्या आहेत?
(१६) दगडावर वाहिलेली फुले, गंध, अक्षता वगैरे पाण्यात व मातीत पडून, मोरीत अथवा कुंडात राहिल्याने कुजतात. त्यांचा तो दुर्गध वातावरणात पसरतो तो माणसाच्या विष्टेच्या घाणीसारखा असतो आणि त्यात हजारो किडे पडतात व मरतात.
      अशा प्रकारे मूर्तिपूजा करण्यात अनेक दोष येतात. म्हणून पाषाणादिंच्या मूर्तीची पूजा सज्जनांना त्याज्य
आहे. ज्या लोकांनी पाषाणमय मूर्तीची पूजा केली, जे करीत आहेत आणि पुढे करतील ते वर सांगितलेल्या दोषांपासून वाचले नाहीत, वाचत नाहीत व वाचणार नाहीत.

पंचायतन पूजा समीक्षा

(प्रश्न) कोणत्याही प्रकारची मूर्तीपूजा करू नये अथवा करवू नये. परंतु आपल्या आर्यावर्त्तात प्राचीन काळापासून पंचदेवपूजा हा शब्द परंपरेने चालत आलेला आहे. या पंचायतनामध्ये शिव, विष्णु, अंबिका, गणेश व सूर्य यांच्या मूर्ती पूजिल्या जातातही पंचायतन पूजा आहे की नाही?
(उत्तर) कोणत्याही प्रकारची मूर्तिपूजा करू नये. परंतु जे सजीव आहेत त्यांची पूजा, सत्कार करणे. पंचदेवपूजा किंवा पंचायतनपूजा हा या शब्द चांगल्या अर्थाचा आहे. परंतु विद्याविहीन निर्बुद्ध लोकांनी त्याचा
उत्कृष्ट अर्थ सोडून निकृष्ट अर्थ ग्रहण केला आहे. आजकाल शिव वगैरे पाच मूर्तीची जी पूजा केली जाते तिचे
खंडन आम्ही वर केलेच आहे. परंतु जी खरी वेदोक्त व बेदानुकूल अशी पंचायतनाची देवपूजाब मूर्तिपूजा आहे तो ऐका:

मा नो वधीः पितरं मोत मातरम् ।।१।। यजु०।। अ० १६। मं० १५।।
आचार्यऽउपनयमानो ब्रह्मचारिणमिच्छते ।।२।।
अतिथिर्गृहानुपगच्छेत् ।।३।। अथर्व०।। कां० १३।। सू० ५।। मं० ११।।
अचर्त प्रार्चत प्रिय मेधासो अचर्त ।।४।। ऋ० मं० ८।। सू० ६९।। मं० ९।।
त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि।।५।। -तैनिरीयोप०।। व०१।। अनु० १।।
कतम एको देव इति स ब्रह्म त्यदित्याचक्षते।।६।।-शतपथ प्रपाठ० ५। ब्राह्मण ७। कण्डिका १०।।
मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव।।७।। -तैनिरीयोप०।। व०१।। अनु० १।।
पितृभिर्भ्रातृभिश्चैताः पतिभिर्देवरैस्तथा ।
पूज्या भूषयितव्याश्च बहुकल्याणं ईप्सुभिः ।।८।।  मनु०।। अ०३।। श्लो० ५५।।
पूज्यो देववत्पतिः।।९।।  मनु०।। अ० ५।। श्लो० १४४।।

     पहिली मूर्तिमती, पूजनीया देवता माता आहे, सर्व मुला-मुलींनी तन-मन-धनाने मातेची सेवा करून तिला प्रसन्न ठेवावे. दुसरा देव पिता आहे. मातेप्रमाणे त्याचीही सेवा कवी.॥१॥ तिसरादेव आचार्य विद्यादाता आहे. त्याची तन-मन-धनाने सेवा करावी.॥२॥ चौथा देव अतिथी. जो विद्वान, धार्मिक, निष्कपटी, सर्वांचे कल्याण इच्छिणारा, जगभर भ्रमण करणारा, सत्याच्या उपदेशाने सवना सुखी करणाऱ्या अतिथीची सेवा करावी.॥३॥ पाचवा देव पत्नीसाठी पती व पतीसाठी पत्नी पूजनीय होय. ॥४॥ हेच ते पाच मूर्तीमान देव ज्यांच्या संगाने मनुष्यदेहाची उत्पत्ति, पालन, सत्य शिक्षण, विद्या व सत्योपदेश यांची प्राप्त होते. याच परमेश्वर प्राप्तीच्या पायऱ्या आहेत. या दैवतांची सेवा न करता जे लोक पाषाणदिकांच्या मूर्तीची पूजा करतात ते अत्यंत वेदविरोधी आहेत.

मूर्तिपूजेचे अंधविश्वास

(प्रश्न) माता, पिता इत्यादींची सेवा करून मूर्तिपूजाही केली तर त्यात काही दोष नाही ना?
(उत्तर) पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा पूर्णपणे सोडणे व माता, पिता इत्यादी मूर्तिमंत देवांची सेवा करणे यातच कल्याण आहे. माता, पिता वगैरे प्रत्यक्ष सुख देणाऱ्या देवांना सोडून पाषाणादी अदेवांसमोर लोक डोके आपटतात ही केवढी अनर्थकारक गोष्ट आहे ! माता, पिता इत्यादी देवांसमोर नैवेद्य ठेवला तर ते तो स्वतः खाऊन टाकतील आणि भेटवस्तु, पूजा वगैरे ग्रहण करतील; मग आपल्या तोंडात किंवा हातात काहीच पडणार नाही, म्हणून पाषाणादिकांच्या मूर्ती बनविल्या, त्यांच्यासमोर नैवेद्य ठेवून ठण ठण घंटानाद करावा, पूं पूं असा शंख वाजवावा, सावळा गोंधळ माजवावा, देवाला अंगठा दाखवून 'त्वं अंगुष्ठं गृहाण, भोजन पदार्थ वा अहं ग्रहीष्यामि' असे म्हणून एखाद्याला फसवावे किंवा चिडवावे की, 'तू घंटा घे' आणि त्याला अंगठा दाखवून त्याच्या समोरचे सगळे पदार्थ आपणच उपभोगावेत तशीच ही पूजा नावाच्या सत्कर्माच्या शत्रूंची म्हणजे पुजाऱ्यांचा खेळ आहे. हे ठग लोक मूर्तीला भपकेबाज कपडे व झगमगीत दागिने घालून सजवितात आणि बिचाऱ्या निर्बुद्ध व भोळ्याभाबड्या लोकांना लुटून त्यांच्या पैशावर स्वतः चैन करतात. एखादा धार्मिक राजा असता तर त्याने या पाषाणप्रिय लोकांना दगड फोडणे, घरे बांधणे यांसारखी कामे करायला लावून त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली असती.
(प्रश्न) ज्याप्रमाणे स्त्रीची पाषाणदिकांची मूर्ती पाहून मनात कामविकार उत्पन्न होतात त्याप्रमाणे वीतराग, शांत भाव असलेली मूर्ती पाहून मनात वैराग्याची भावना निर्माण होऊन शांती का मिळणार नाही?
(उत्तर) नाही ! तसे होऊ शकत नाही. कारण त्या मूर्तीचा जडत्व धर्म आत्म्यामध्ये आल्याने विचारशक्ती कमी होऊ लागते. विवेकावाचून वैराग्य नाही, वैराग्यावाचून विज्ञान नाही आणि विज्ञानावाचून शांती नाही. शिवाय जो काही लाभ मिळतो तो विद्वानांचा सत्संग, उपदेश व त्याच्या इतिहासाचे ज्ञान यांपासून मिळत असतो. कारण एखाद्या व्यक्तीचे गुण अथवा दोष माहीत नसताना केवळ तिची मूर्ती पाहून तिच्याविषयी प्रेम
निर्माण होत नसते. प्रेम निर्माण होण्याचे कारण सदगुण ज्ञान आहे.
     मूर्तीपूजेसारख्या वाईट गोष्टीमुळेच या आर्यावर्त्तात निकामी पुजारी, आळशी भिक्षुक आणि कोट्यावधी पुरुषार्थहीन लोक निर्माण झाले आहेत. यांनीच जगामध्ये मूढता पसरविली, असत्य व फसवाफसवी यांचा विस्तार झाला आहे.
(प्रश्न) पाहा ! काशमध्ये औरंगजेब बादशहाला लाटभैरव (काळभैरव) वगैरे देवांनी मोठमोठे चमत्कार करून दाखविले. जेव्हा मुसलमानांनी मंदिर उध्वस्त करण्यासाठी त्यावर तोफा डागल्या. तेव्हा मोठमोठ्या गांधील माशांनी हजारोंच्या संख्येने सैन्यावर हल्ला केला व त्याला पळवून लावले.
(उत्तर) हा काही दगडाच्या मूर्तीचा चमत्कार नव्हता. तेथे गांधील माशांची पोळी असणार, या माशा भयंकर क्रूर असतात. जेव्हा त्यांना कोणी त्रास देतात तेव्हा त्या त्यांच्यावर हल्ला करून कडकडून चावतात. मूर्तीतून दुधाची धारा निघाल्याचा जो चमत्कार सांगितला जातो तीही पुजाऱ्याची हातचलाखी होती.
(प्रश्न) पाहा ! म्लेच्छांच्या दृष्टीस पडावयाचे नाही म्हणून महादेव ज्ञानवापीत दडून बसले आणि वेणीमाधव एका ब्राह्मणाच्या घरात जाऊन लपले. हाही चमत्कार नाही काय?
(उत्तर) महादेवाजवळ कालभैरव, लाटभैरव यासारखी भूतप्रेते कोटपाल होती, गरुडासारखे गण होते. त्यांनी मुसलमानांशी लढून त्यांना का परतवून लावले नाही? महादेव आणि विष्णू यांनी त्रिपुरासुरासारख्या मोठ्या व भयंकर दुष्टांना जाळून भस्म केले अशा कथा पुराणात आहेत, मग त्यांनी मुसलमानांना का भस्म करून टाकले नाही? यावरून हेच सिद्ध होते की बिचाऱ्या दगडांमध्ये लढणे, लढविण्याचे सामर्थ्य नसते. जेव्हा मुसलमान मंदिरांचा व मूर्तीचा विध्वंस करीत काशीजवळ आले तेव्हा पुजाऱ्यांनी विश्वनाथाचे पाषाण लिंग विहिरीत टाकून दिले आणि वेणीमाधवला एका ब्राह्मणाच्या घरात लपवून ठेवले. जर काशीमध्ये कालभैरवाच्या भीतीने यमदूत येत नाहीत व प्रलयाच्यावेळी देखील कालभैरव काशीचा नाश होऊ देत नाही, ही गोष्ट खरी असेल तर मग त्याने म्लेच्छांच्या दूतांना भयभीत करून पळवून का लावले नाही ? आणि त्याने आपल्या राजाच्या मंदिराचा नाश का होऊ दिला? ही सारी पोपमाया लीला आहे.

गया श्राद्ध समीक्षा

(प्रश्न) गयेला जाऊन श्राद्ध केल्याने पितरांचे पाप नष्ट होते आणि तेथील श्राद्धाच्या पुण्यप्रभावाने पितर स्वर्गाला जातात, तसेच पितर आपला हात बाहेर काढून पिंड घेतात. ही गोष्टही खोटी आहे काय?
(उत्तर) पूर्णपणे खोटी आहे ! तेथे पिंड देण्याचा एवढा प्रभाव पडत असेल तर ज्या पंड्यांना पितरांच्या सुखासाठी लोक जे लाखो रुपये देतात ते पैसे हे गयाचे राहणारे पंडे लोक वेश्यागमनादी पापात खर्च करतात. ही त्यांची पापे का नष्ट होत नाहीत ? पितरांचे हात बाहेर येत असलेले आजकाल दिसत नाहीत. केवळ पंड्यांचेच हात दिसतात. कधीतरी एखाद्या लबाड इसमाने जमिनीत खड्डा खणून त्यात एका माणसाला बसविले असावे. त्याच्या डोकीवर काही तरी पांघरून घालून तेथे पिंड ठेवला असावा आणि त्या धूर्त माणसाने तो पिंड उचलून घेतला असावा. निर्बुद्ध माणसांना पंड्यांनी याप्रकारे फसविले असल्यास आश्चर्य ते कसले? याचप्रमाणे रावणाने वैजनाथ शिवलिंग आणल्याची कथाही साफ खोटी आहे.
(प्रश्न) अहो ! कलकत्याची काली, कामाक्षा वगैरे देवींना लाखो लोक भजतात. हा चमत्कार नाही काय?
(उत्तर) मुळीच नाही. ते ज्ञानांध लोक मेंढराप्रमाणे एका मागून दुसरा असे जातात. हे लोक अखेर खड्ड्यात पडतातते स्वतःला वाचवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे एका मुर्खांच्या मागून दुसरा जातो आणि मूर्तिपूजारूपी खड्ड्यात पडून दु:ख भोगतात.

जगन्नाथ तीर्थाची समीक्षा

(प्रश्न) बरे, हे तर जाऊ द्या. परंतु जगन्नाथाच्या मंदिरात तर प्रत्यक्षात चमत्कार आहे जेव्हा जगन्नाथाचे शरीर बदलण्याची वेळ येते तेव्हा चंदनाचा मोठां ओंडका समुद्रातून आपोआप वाहत येतो. मंदिरातील चुलीवर एकावर एक असे सात हंडे ठेवले जातात. त्यापैकी वरच्या हंड्यातील भात आधी शिजतो.तसेच तेथे जर कोणी जगन्नाथाचा प्रसाद खाल्ला नाही तर त्याला महारोग होतो, जगन्नाथाचा रथ आपोआप चालतो, आणि पापी लोकांना तो दर्शन देत नाही. इंद्रदमनाच्या कारकीर्दीत देवांनी ते मंदिर बांधले आहे. देवाचे शरीर (कलेवर) बदलण्याच्या वेळी एक राजा, एक पंडा व एक सुतार मरतो. हे सारे चमत्कार तुम्ही खोटे सिद्ध करू शकणार नाही.
(उत्तर) ज्याने बारा वर्षे जगन्नाथाची पूजा केली होती असा एक माणूस विरक्त होऊन मथुरेला आला होता, तो मला भेटला होता, मी त्याला विचारले होते. तेव्हा त्याने ते सगळे खोटे असल्याचे मला सांगितले होते. परंतु विचारांती हा निर्णय आहे की, जेव्हा कलेवर बदलण्याची वेळ येते तेव्हा चंदनाचा ओंडका नौकेत घालून तो समुद्रात टाकला जातो. तो समुद्राच्या लाटांवरून वाहत वाहत किनाऱ्याला लागतो. त्याला घेऊन सुतार मूर्ती बनवितात. जेव्हा प्रसादाचे अन्न शिजविले जाते तेव्हा सगळी दारे बंद करून घेतात आणि आचाऱ्यांखेरीज इतर कोणाला तेथे जाऊ देत नाहीत किंवा पाहू देत नाहीत. जमिनीवर चारी बाजूना सहा व
मधोमध एक अशा चक्राकार चुली बनवितात. त्या हंड्यांच्या बुडाला तूप, माती व राख लावून व आत तांदूळ
घालून शिजवितात. मग ते चुलीवरून उतरून त्यांची बुडे स्वच्छ करतात. त्याच वेळी मधल्या चुलीवरील भांड्यात तांदूळ घालतात. सभोवतालच्या सहा चुलीवर लोखंडाच मोठे तवे ठेवून त्यांची तोंडे बंद करतात. नंतर इतर सहा हंडे मध्यभागी असलेल्या चुलीवरील हंड्यावर रचून ठेवतात आणि श्रीमंत भक्तांना तो चमत्कार पाहण्यासाठी आत बोलावतात सर्वात खालच्या हंड्यामध्ये नुकतेच टाकलेले तांदूळ कच्चे असतात. तर वरच्या हंड्यांतील तांदूळ शिजून त्यांचा भात झालेला असतो. ती गोष्ट चमत्कार म्हणून लोकांना दाखविली जाते आणि त्यांना असे सांगितले जाते की या हंड्यांसमोर काही ठेवा. तो चमत्कार पाहून मठ्ठ बुद्धीचे श्रीमंत लोक तेथे रुपये किंवा मोहरा ठेवतात आणि काही लोक दरमहा अमुक रक्कम देण्याचे कबूल करतात.
     शूद्र नीच लोक मंदिरात नैवेद्य घेऊन जातात. नैवेद्य दाखविल्यानंतर ते त्यातील थोडासा भाग काढून खातात. अशा प्रकारे उरलेला उष्टा नैवेद्य जो कोणी पैसे देईल त्याच्या घरी ती हंडीनेऊन पोचवितात. नंतर दीन-दरिद्री गृहस्थ व साधुसंतांपासून शूद्र व अंत्यजांपर्यंत एका पंगतीत बसून उष्टे एकमेकांनी केलेले अन्न ते खातात. एक पंगत जेवून उठली की त्याच उष्ट्या पानांवर इतरांना जेवायला वाढतात. असा महा अनाचार तेथे चालतो. पुष्कळ लोक तेथे जाऊन आपल्या स्वतःच्या हातांनी शिजविलेले अन्न खातात. तरीही त्यांना कुष्ठरोग वगैरे आजार होत नाहीत. तसेच खुद्द जगन्नाथपुरीतही असंख्य लोक देवाचा प्रसाद खात नाहीत. त्यांनाही महारोग वगैरे होत नाहीत. याउलट त्याच जगन्नाथपुरीत अनेक महारोगी आहेत. ते दररोज उष्टा प्रसाद खातात. तरीही त्यांचा रोग नाहीसा होत नाही.
         या जगन्नाथाच्या मंदिरात वाममार्गी लोकांनी भैरवी चक्र बनविले आहे. वस्तुतः सुभद्रा ही श्रीकृष्ण व
बलराम यांची बहीण आहे. परंतु तिला त्यांनी दोन भावांच्या मध्ये पत्नीच्या व मातेच्या जागी स्थापिले आहे शाक्तांचे भैरवचक्र नसते तर हा अभद्र प्रकार झाला नसता.
      (चोध्या चमत्काराच्या बाबतीत सांगायचे तर) जगन्नाथाच्या रथाच्या चाकामध्ये एक विशिष्ट प्रकारची कळ (यंत्र) बसविली असते. ती कळ पुलटी फिरविली की रथ चालू लागतो. जेव्हा तो जमावाच्या मध्यभागी जाऊन पोचतो तेव्हा कळ उलटी फिरविली की तो उभा राहतो. जागचा हालत नाही. मग पुजारी ओडून सांगतात की, "भक्त जनान, दान द्या. पुण्य करा. त्याने जगन्नाथ प्रसन्न होऊन आपला रथ चालू करील, आपल्या धर्माचे रक्षण होईल. लोकांकडून दक्षिणा मिळत राहते तोपर्यंत ते असच पुकारा करीत राहतात. भरपूर पैसा गोळा झाल्यानंतर एक व्रजवासी पुजारी अंगावर उत्तम कपडे घालून व शाल पांघरून रथासमोर उभा राहतो आणि हात जोडून प्रार्थना करतो की, "हे जगन्नाथ स्वामी! कृपा करून रथ पुढे जाऊ द्या आणि आमच्या धर्माचे रक्षण करा" अशा प्रकारची प्रार्थना करून तो साष्टांग नमस्कार घालतो व रथावर चढतो. मग पुजारी ती कळसुलट फिरवितात आणि जगन्नाथाचा जयजयकार करीत हजारो माणसे रथाचा दोर ओढतात. रथ चालू लागतो.
        जगन्नाथाचे देऊळ इतके मोठे आहे को, त्याच्या आतील भागात दिवसा देखील अंधार असतो. त्यामुळे
दिवे लावावे लागतात. मूर्तीसमोर दोन्ही बाजूना ओढून सरकणारे पडदे असतात. पंडे, पुजारी पडद्यांच्या आत उभे असतात. ते चटकन एका बाजूचा पडदा ओढतात. त्याबरोबर मूर्ती दिसेनाशी होते. तेव्हा सारे पंडे
मोठ्याने ओरडतात की, "देवासमोर दान-दक्षिणा ठेवा म्हणजे तुमची पाप नष्ट होतील आणि तुम्हाला देवाचे
दर्शन होईल. त्वरा करा. " बिचारे भोळे भक्त त्या लबाड पुऱ्यांकडून लुटले जातात. त्याबरोबर पुजारी दुसरा
पडदा बाजूला सारतात आणि मग देवाचे दर्शन होते. तेव्हा जगन्नाथाचा प्रसन्नतेने जयजयकार करीत धक्के खात, तिरस्कृत होऊन बाहेर पडतात.
       ज्या इंद्रदमन राजाचा उल्लेख तुम्ही केला त्याचे वंशज आजही कलकत्यात राहतात. तो राजा धनाढ्य व देवीचा उपासक होता. त्याने लक्षावधी रुपये खर्चून हे देऊळ यासाठी बांधले की या पद्धतीने आर्यावर्त्तातील भोजन समस्या सुटावी आणि कुणीही शिवाशिवी मानू नये. परंतु मूर्ख लोक हे केव्हा सोडतील ? ज्या कारागिरांनी व शिल्पकारांनी हे मंदिर उभारले त्यांनाच देव मानावे.
         देवाचे कलेवर बदलण्याच्यावेळी राजा, पंडा व सुतार मरत नाहीत. उलट त्यावेळी ते तीघेही प्रमुख हजर असतात.ते खालच्या लोकांना फार त्रास देत असावेत आणि त्यांच्या छळाला ते कंटाळले असावेत. खालच्या लोकांनी कलेवर बदलण्याच्या वेळी विचार सम्मत करून ते तिथे या समारंभाच्या वेळी प्रत्यक्ष हजर राहत त्यावेळी मूर्तीचे हृदय पोकळ ठेवण्यात आले. त्यामध्ये सोन्याच्या गिलाव्याचा एक शाळिग्राम ठेवला. त्यास धुवून चरणामृत तयार करतात. रात्रीच्या शयन आरतीच्या वेळी खालच्या लोकांनी त्या शाळिग्रामाला विषाचे तेजाब फासून ठेवले असेल आणि सकाळ शालीग्रामास आंघोळ घालून त्याचे चरणोदक त्या तिघांना प्यायला दिले असेल. ते पिऊन ते तिथे मेले असतील. मग त्या भोजन भाऊंनी असे प्रसिद्ध केले असावे की जगन्नाथ आपले शरीर बदलण्याच्या वेळी आपल्या त्या तीन भक्तांना आपल्या बरोबर घेऊन गेला !
     दुसऱ्यांचे धन लुबाडण्यासाठी अशा अफवा नेहमीच पसरविल्या जातात.

रामेश्वर समीक्षा

(प्रश्न) गंगोत्रीचे पाणी रामेश्वरावर घातल्यावर ते लिंग वाढते, ही गोष्टही खोटी आहे काय?
(उत्तर) होय ! साफ खोटी आहे. कारण त्या मंदिरातही दिवसा अंधार असतो. त्यामुळे रात्रंदिवस तेथे दिवे जळत असतात. जेव्हा त्या शिवलिंगावर पाण्याची धार धरतात तेव्हा त्या पाण्यात विजेसारखे दिव्याचे प्रतिबिंब चमकते एवढेच, इतर काही घडत नाही. पाषाण हा वाढतही नाही अथवा घटतही नाही. जेवढा असतो तेवढाच राहतो. अशी लीला करून पुजारी लोक मात्र अडाणी भक्तांना लुबाडतात.
(प्रश्न) श्रीरामचंद्राने रामेश्वराची स्थापना केली. मूर्तिपूजा वेदविरुद्ध असती तर रामाने शिवलिंगाची स्थापना कशाला केली असती? आणि वाल्मीक ऋषीनी रामायणात कशाला लिहिले असते ?
(उत्तर) श्रीरामचंद्राच्या काळी रामेश्वराचे लिंग अथवा त्यावरील देऊळ यांचे नावनिशाणही नव्हते. परंतु हे खरे की दक्षिणेतील राम नावाच्या एका राजाने तेथे शिवमंदिर बांधले आणि त्या शिवलिंगाचे नाव रामेश्वर ठेवले. जेव्हा श्रीरामचंद्र सीतेला घेऊन हनुमानादिसह श्रीलंकेतून आकाशमार्गाने अयोध्येला यायला निघाले तेव्हा विमानामध्ये ते सीतेला म्हणाले,

अत्र पूर्वं महादेव प्रसादमकरोद्विभु ।
सेतुबन्ध इति विख्यातम्।। -वाल्मीकि रा०। लंका कां०।। ( सारंग १२३।। श्लो० २२,२१।।)

"हे सीते ! तुझ्या वियोगाने व्याकूळ होऊन मी भटकत असता याच ठिकाणी चातुर्मास केला होता. त्यावेळी मी परमेश्वराचे ध्यान व उपासना करीत असे. जो सर्वत्र विभू. (व्यायक), देवांचा देव, महादेव, परमात्मा आहे त्या परमेश्वराच्या कृपेने आम्हाला या ठिकाणी सर्व सामग्री प्राप्त झाली आणि तो सेतू पाहा. तो आम्ही बांधून लंकेत प्रवेश केला आणि रावणाचा वध करून तुला परत आणले. याखेरीज वाल्मीकींनी तेथे दुसरे काहीही लिहिले नाही.

कालियाकन्त सोमनाथ समीक्षा

(प्रश्न) रज है कालियाकन्तको। निखने हुक्का पिलाया सन्त को।

           दक्षिण भारतात कालियाकंताची एक मूर्ती आहे. ती अजूनही हुक्का पीत असते. मूर्तिपूजा खोटी असेल तर हा चमत्कार ही खोटा होईल.
(उत्तर) तो साफ खोटा आहे. ती सारी पुजाऱ्यांची पापलीला आहे. कारण की प्रत्यक्षात त्या मूर्तीचे तोंड पोकळ असणार. त्या तोंडात एक नळी बसवून मूर्तीच्या मागे असणाऱ्या भिंतीला छिद्र पाडून तो दुसऱ्या खोलीत नेलेली असणार. जेव्हा पुजारी हुक्का भरून,त्याला नळी जोडून तेथे बसलेला इसम नळी तोंडात धरून हुक्का ओढीत असणार. त्याबरोबर हुक्क्यातून गुडगुड असा आवाज येत असणार. दुसरे छिद्र नाक व मुखाबरोबर लावले असेल त्यामुळे मागे बसलेला माणूस हुका ओटू लागला की, -तोंडातून धूर बाहेर येत असणार तो चमत्कार दाखवून मूर्ख भक्तांकडून पुजारी पैसे उकळत असणार व त्यांना धनरहित करीत असणार.
(प्रश्न) बरे ! द्वारकेतील डाकोरजीची (कृष्णाची) मूर्ती भक्ताबरोबर तेथपर्यंत चालत गेली. कित्येक मणाची ती मूर्ती एक-सव्वा रत्ती सोन्याच्या बरोबर तोलली गेली. हाही चमत्कार नाही काय?
(उत्तर) मुळीच नाही. त्याभक्ताने ती मूर्ती चोरून आणली असणार. त्या मूर्तीची सव्वा रत्ती सोन्याने तुला करण्याची थाप भांग पिणाऱ्या माणसाने ठोकली असेल.
((प्रश्न)  बरे सोमनाथ अधांतरी राहत असे, हा तरी चमत्कार होता की नाही? का तीही गोष्ट खोटी आहे?
(उत्तर) होय ! ती गोष्टही खोटीच आहे. त्या मूर्तीच्या वर-खाली लोहचुंबक पाषाण लावून ठेवला होता. त्यामुळे ती मूर्ती आकर्षणाने अधांतरी राही. जेव्हा गझनीच्या मुहम्मदाने येऊन मंदिरावर हल्ला केला तेव्हा मात्र चमत्कार घडला. तो असा की, मुहम्मदाने मंदिर फोडून त्याचा विध्वंस केला आणि पुजाऱ्यांची दुर्दशा झाली. दहा हजार मुस्लिम सैनिकांनी हिंदूच्या लाखो सैनिकांचा धुव्वा उडविला. त्यावेळी सोमनाथाचे पुजारी पूजा, पुरश्चरण स्तुती करून अशी प्रार्थना करीत होते की, "हे महादेवा! तू या म्लेंच्छांना मारून आमचे रक्षण कर," आणि ते आपले चेले असणाऱ्या राजांना समजावीत होते की, "महाराज, तुम्ही निश्चित राहा.महादेव भैरवाला अथवा वीरभद्राला पाठवून देईल. ते साऱ्या म्लेंच्छांना मारून टाकतील किंवा आंधळे करून टाकतील किंवा ते असे सांगत असतील की, "आता इतक्यात आमचा देव प्रकट होईल. हनुमान, दुर्गा व भैरव यांनी आम्हांला स्वप्नात येऊन असे सांगितले आहे की, "आम्ही तुमचे सारे काम करून टाकू." बिचारे भोळे राजे आणि क्षत्रिय लोक पुजाऱ्यांच्या या फसव्या आश्वासनावर विश्वास ठेवून गाफील राहिले. कित्येक ज्योतिषांनीही राजांना सांगितले की, "आता शत्रूंवर चढाई करण्याचे मुहूर्त नाही."  एकाने चंद्र आठवा आहे असे सांगितले तर दुसऱ्याने योगिनी ग्रह समोर उभी असल्याचे सांगीतले. अशा प्रकारे बहकविण्यात ते राहिले. त्यामुळे जेव्हा म्लेंच्छांच्या फौजेने येऊन वेढा घातला तेव्हा पळत सुटले. अनेक पुजारी व त्यांचे चेले पकडले गेले. पुजऱ्यांनी म्लेच्छांना हात जोडून म्हटले की, "तुम्ही तीन कोटी रुपये घ्या मात्र तुम्ही आमचे देऊळ आणि मूर्ती फोडू नका"  मुसलमान म्हणाले की, "आम्ही बुतपरस्त म्हणजे मूर्तिपूजक नसून बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक आहोत." त्यांनी ताबडतोब मंदिर उध्वस्त करून टाकले. जेव्हा त्यांनी वरचे छत तोडले तेव्हा वरचा लोहचुंबक दूर झाला. त्याबरोबर मूर्ती खाली पडली. म्लेच्छांनी ती मूर्ती फोडली तेव्हा तिच्यातून अठरा कोटी रुपयांची रत्ने बाहेर पडली असे ऐकले आहे." पुजाऱ्यांना फटके मारले ते रडू लागले मग म्लेंच्छांनी कोष खजिना दाखवा असे म्हटले.” असे म्हणून म्लेंच्छांनी ती सारी संपत्ती लुटली आणि पुजारी व त्यांचे चले यांना भरपूर मारहाण केली. एवढेच नव्हे तर म्लेंच्छांनी त्यांना गुलाम बनवून त्यांच्याकडून वेठबिगारी करवून घेतली. त्यांना धान्य दळावयास लावले, चारा कापायला लावला, मलमूत्रसाफ करायला लावले आणि चणे खायला घातले. अरेरे ! दगडाची पूजा करून असा आपला सत्यानाश का बरे करून घेतला? त्यांनी परमेश्वराची भक्ती का केली नाही? त्यानां खऱ्या ईश्वराची भक्ती केली असती तर म्लेंच्छांचा धुव्वा उडवून ते विजयी झाले असते. मूर्तीची पूजा करण्याऐवजी त्यांनी शूर वीरांची पूजा केली असती तर त्यांचे नक्कीच रक्षण झाले असते. पुजाऱ्यांनी या दगडांची इतकी भक्ती केली परंतु त्या मूर्तींपैकी एकही मूर्ती शत्रूच्या मस्तकावर जाऊन आदळली नाही. त्यांनी एखाद्या शूर वीर पुरुषाची मूर्तिसारखी सेवा केली असती तर त्या पुरुषाने आपल्या सेवकांना यथाशक्ती वाचविले असते आणि शत्रुना मारले असते.

द्वारका ज्वालामुखी समीक्षा

(प्रश्न) द्वारकेच्या रणछोडीने नरसी मेहताला हुंडी दिली आणि त्याचे कर्ज फेडले, ही गोष्टही खोटीच काय?
(उत्तर) एखाद्या सावकाराने सपये दिले असतील आणि मग कोणीतरी अशी अफवा उठविली असेल की, ते पैसे श्रीकृष्णाने पाठविले होते. जेव्हा संवत् १९१४ (इ.स. १८५७) मध्ये इंग्रजांनी तोफा डागून मंदिरे व मूर्ती उडवून दिल्या, तेव्हा त्या मूर्ती कुठे गेल्या होत्या ? याउलट बाघेर लोकांनी जेवढे शौर्य दाखविले आणि शत्रूंशी लढून त्यांना ठार मारले किंबहुना त्या मूर्तीना एका माशीचीही तंगडी मोडता आली नाही. तेथे श्रीकृष्णासारखा कोणी असता तर त्याने शत्रूंचा धुव्वा उडविला असता आणि ते सैरावैरा पळाले असते. खरी
गोष्ट अशी आहे की, ज्यांचा रक्षकच मार खातो त्याला शरण जाणारे का पिटले जाणार नाहीत?
(प्रश्न) ज्वालामुखी देवी ही तर प्रत्यक्ष देवता आहे. ती सर्वांना खाऊन टाकते. तिला नैवेद्य दाखविला तर ती त्यातला अर्धा खाते आणि अर्धा ठेवून देते. मुसलमान बादशहांनी तिच्यावर पाण्याचा पाट नेऊन सोडला आणि तिच्या तोंडावर लोखंडाचे तवे ठोकले तरीही ती ज्वाळा विझली नाही, की थांबली नाही. याचप्रमाणे हिंगलाज देवीही मध्यरात्री घोड्यावर बसून डोंगरावरून जाताना दिसते. तिच्यामुळे डोंगराला गर्जना करावयास लावते. तसेच चंद्रकृप ही विहीर बोलते, आणि योनियंत्रातून बाहेर आल्यास पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. दुसरा बांधल्यास पूर्ण महापुरुष म्हटला जातो. जोपर्यंत हिंगलाजची यात्रा घडत नाही तोपर्यंत माणूस अर्धा महापुरुषच समजला जातो. या सगळ्या गोष्टी विश्वसनीय माहीत काय?
(उत्तर) मुळीच नाहीत. कारण त्या ज्वालामुखी पर्वतातून आग बाहेर पडते. त्यात पुजाऱ्यांनी विचित्र चलाखी केली आहे. ज्याप्रमाणे फोडणी देण्यासाठी तापविलेल्या पळीत थोडेसे तूप टाकताच त्या पळीतून ज्वाळा निघतात, ती पळी आगीपासून दूर केली किंवा तिच्यावर फुंकर मारली की ती ज्वाळा विझते व तिच्या पळीतील थोडेसे तूप खाऊन टाकते पण बाकीचे शिल्लक उरते. त्याचप्रमाणे तेथेही घडते. जसे चुलीच्या ज्वाळेत जे काही टाकावे ते सारे जळून भस्म होते. जंगलाला किंवा घराला आग लागली असता ती सारे काही जाळून टाकते. याहून वेगळे असे तेथे काय आहे? हिंगलाजमध्ये एक देऊळ एक कुंड व इकडे तिकडे काही नळ याखेरीज काहीही नाही. तेथे कोणतीही देवता घोड्यावर बसून येत नाही. तेथे चमत्कार म्हणून जे काही दाखविले जाते ती सारी पुजाऱ्यांची लबाडी असते. दुसरे काही नाही त्यांनी दलदलीमध्ये पाण्याचे एक कुंड बनविले आहे. त्याच्या तळातून बुडबुडे वर येतात. ते पाहून आपली यात्रा सफळ झाली असे मूर्ख लोक समजतात. पुजाऱ्यांनी तेथे जे योनियंत्र बनविले आहे तेही लोकांकडून पैसे उकळण्यासाठीच आहे. ठुमरे बांधण्याचा प्रकार हीही अशीच पुजाऱ्यांची लीला आहे. ठुमरे बांधल्याने जर सामान्य माणसाचा महापुरुष होत असेल तर पशुवर ठुमऱ्याचे ओझे लादल्यास तो महापुरुष बनेल काय? वस्तुतः महापुरुष तर उत्तम धर्मयुक्त पुरुषार्थाने होतो.
(प्रश्न) अमृतसरच्या तलावाचे पाणी अमृतासारखे मधुर आहे. मुरेतही नावाच्या झाडाचे फळ अर्धे गोड व अर्धे कडू असते. गुरुदासपूरला एक भिंत आहे. ती हलविली असता वाकते, परंतु कोसळून पडत नाही. रेवालसर या सरोवरात दगड पाण्यावर तरंगतात. अमरनाथला आपोआप लिंग तयार होते. तेथे हिमालयातून
कबुतरांच्या जोड्या येतात आणि सर्वांना दर्शन देऊन परत जातात. या साच्या गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या
नाहीत काय?
(उत्तर) मुळीच नाहीत. त्या तलावाचे केवळ नाव अमृतसर आहे. त्या जागी जेव्हा कधी जंगल असेल तेव्हा त्या तळ्याचे पाणी चांगले असेल. त्यामुळे त्याचे नाव अमृतसर असे ठेवले असावे. ते जर खरोखरीच अमृत असते तर पुराणिकांच्या सांगण्यामध्ये ते पाणी पिणारे सगळेच अमर झाले असते; जी भिंत पडत नाही असे तुम्ही म्हणता ती अशा युक्तीने बांधलेली असणार की वाकावी पण पडू नये. मुरेठीच्या फळाचा अर्धा भाग गोड व अर्धा भाग कडू असण्याचे कारण त्यावर गोड फळाच्या झाडाचे कलम केलेले असावे; किंवा ती नुसतीच थाप असेल. रेवालसरामध्ये दगड तरतात यामध्ये काहीतरी कल्पक कारागिरी असावी. अमरनाथाला बर्फाचे डोंगर बनतात. तेव्हा तेथे पाणी गोठून लहान लिंग बनत असल्यास त्यात कसले आश्चर्य ? कबुतरांच्या जोड्या पाळलेल्या असून ती डोंगराच्या आडून कोणीतरी सोडत असतील आणि लोकांना तो चमत्कार दाखवून पैसे उकळत असतील.

हरिद्वार बद्रीनारायण समीक्षा

(प्रश्न) हरिद्वार हे स्वर्गाचे दार आहे. तेथील हर की पैडी या गंगेच्या घाटावर स्नान केल्यास सारी पाप नष्ट होतात. तेथील तपोवनात राहिल्यास माणूस तपस्वी बनतो. देवप्रयाग,गंगोत्तरीतील गोमुख, उत्तर काशीतील गुप्तकाशी, येथे त्रियुगी नारायणाचे दर्शन होते. केदारनाथ व बद्रीनारायण यांची पूजा सहा महिने माणसे करतात व सहा महिने देव करतात. महादेवाचे मुख नेपाळात पशुपतीच्या रूपात, कुल्ले केदारनाथाच्या रूपात, गुडघे तुंगनाथामध्ये आणि पाय अमरनाथामध्ये आहेत. त्यांचे दर्शन, स्पर्शन व स्नान केल्याने मुक्ती मिळते. केदारनाथ व बद्रीनाथ येथून सरळ स्वर्गात जाता येते. या सगळ्यागोटविषयी तुमचे काय म्हणणे आहे?
(उत्तर) हरद्वार हे स्थान हिमालयात जाण्याच्या एका मार्गाचा प्रारंभ आहे. गंगेच्या पात्रात असणाऱ्या कुंडामध्ये सान करण्यास जाण्यासाठी ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत त्यांना हरकी पैडी असे म्हणतात. खरे
म्हणजे त्याचे नाव 'हाडपैडी' असे आहे. कारण देशोदेशीच्या मृत व्यक्तींच्या अस्थी त्या कुंडात आणून टाकल्या जातात. पाप हे कधी असल्या नानांनी नष्ट होत नसते. पापांची फळे भोगल्याखेरीज ती नाहीशी होत
नाहीत ‘तपोवन' हे कधी काळी तपस्वी लोकांचे निवासस्थान असेलही, परंतु सध्यातरी ते 'भिक्षुकवन' आहे तपोवनात गेल्याने किंवा तेथे राहिल्याने तप होत नाही. तप हे प्रत्यक्ष केल्यानेच होते. त्या तपोवनातील अनेक
दुकानदार खोटे बोलणारेही आहेत.
       'हिमवतः प्रभवति गङ्गा' गंगा हिमालयातून उगम पावते. गंगोत्री या ठिकाणी डोंगरावरून पाणी खाली पडते. तेथे भक्तांकडून पैसे उकळण्यासाठी पुजाऱ्यांनी गोमुखाचा आकार बनविला असावा, हिमालय
हाच पोपांचा स्वर्ग आहे. तेथील उत्तरकाशी वगैरे ठिकाणे ध्यान-धारणा करणाऱ्यांसाठी चांगली आहेत. परंतु
दुकानदारांची दुकानदारी तेथेही चालूच असते. देवप्रयाग वगैरैपुराणिकांच्या गप्पा आहेत. अर्थात जेथे अलकनंदा व गंगा यांचा संगम झालेला आहे तेथे देवता निवास करतात अशा अफवा पसरविल्या नाहीत तर तेथे कोण जाईल? आणि पैसे कोण देईल ? गुप्त काशी ही गुप्त नसून ती तर प्रसिद्ध काशी आहे. तेथे जी धुनी पेटलेली असते ती तीन युगांपासून जळत असल्यासारखी मुळीच दिसत नाही. पुरोहितांच्या दहा-वीस पिढ्यांपासून ती तेथे जळत असावी. गोसाव्यांची धुनी आणि पारशांची अग्यारी जशी सदैव पेटलेली असते तशी ही धुनी जळत असते. तप्तकुंड हे इतर ठिकाणच्या उन्हाळ्यासारखेच आहे. डोंगराच्या पोटात असलेल्या उष्णतेने या कुंडातील पाणी गरम होऊन बाहेर पडते. त्याच्या शेजारी असलेल्या कुंडातील पाणी मात्र थंड आहे. त्याचे पाणी ज्या वाटेने ते येते तेथे उष्णता नाही. केदारनाथाचे स्थान अत्यंत सुंदर व आरोग्यदायक आहे. परंतु तेथेही पुजाऱ्यांनी अथवा त्यांच्या चेल्यांनी एका भक्कम शिळेवर मंदिर उभारले आहे. तेथील पंडे पुजारी श्रीमंत परंतु मठ्ठ लोकांना फसवून पैसे उकळतात आणि मजेते विलासी जीवन घालवितात. याचप्रमाणे बद्रीनारायणातही लबाड पंड्यांनी आपला अड्डा कायम केला आहे. तेथील मुख्य पुजाऱ्याला 'रावलजी' असे म्हणतात. त्याने एकच नव्हे तर अनेक स्त्रिया ठेवल्या आहेत. या लोकांनी या मंदिराला पशुपतीचे मंदिर आणि मूर्तीला पंचमुखी असे नाव दिले आहे. जेव्हा कोणी जाब विचारणारा नसतो तेव्हाच असा भ्रष्टाचार बळावतो. मात्र मैदानी प्रदेशातील तीर्थक्षेत्रांमध्ये राहणारे लोक जसे लबाड व लुटारू असतात तसे येथील पहाडी लोक नाहीत. हा डोंगरी प्रदेश अत्यंत रमणीय व पवित्र आहे.
(प्रश्न) विंध्याचलामध्ये विंध्येश्वरी, काली व अष्टभुजा हे तर प्रत्यक्ष सत्य आहे. ही विंध्येश्वरी तीन वेळेस आपले तीन रूप बदलते. तिच्या देवळाच्या आवारात एकही माशी नसते. प्रयाग हे तीर्थराज आहे. तेथे मुंडन करून घेतले असता सिद्धी प्राप्त होते. गंगायमुनेच्या संगमात काम केल्यास इच्छापूर्ती होते. तसेच अयोध्या साऱ्या वस्तीसह उडून एकदा स्वर्गात गेली. मथुरा ही सर्व तीर्थस्थानांहून श्रेष्ठ आहे. चंदावन हे श्रीकृष्णाचे लीलास्थान आहे. गोवर्धन व्रजयात्रा मोठ्या भाग्यानेच घडते. सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रामध्ये जत्रा भरते. त्या जत्रेत लाखो लोक सहभागी होतात. या सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत काय?
(उत्तर) वस्तुतः विंध्याचलामध्ये तीन वेगवेगळ्या मूर्ती डोळ्यांनाच दिसतात. त्या दगडाच्या मूर्ती आहेत. दिवसातून तीन वेळा पुजारी त्या मूर्तीना वेगवेगळी वस्त्रे नेसवितात व दागिने घालतात. त्यामुळे एकच देवी तीन वेळा तीन रूप धारण करते असा भास होतो. माशांविषयी तुम्ही जे सांगता ते तर साफ खोटे आहे. मी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, तेथे हजारो लाखो माशा असतात. प्रयागला एखाद्या न्हाव्याने आपला धंदा चालावा म्हणून त्या अर्थाचा श्लोक तयार केला असावा अथवा पुजाऱ्याला पैसे देऊन त्याच्या कडून मुंडन माहात्म्य लिहवून घेतले असावे. प्रयागात स्नान केल्याने माणसे स्वर्गाला गेली असती तर कोणीच घरी परतला नसता. परंतु संगमावर स्नान करणारे सगळे लोक घरी परत आलेले दिसतात. किंबहुना तेथे जर कोणी बुडून मेला तर त्याचा जीवह आकाशात वायूबरोबर भ्रमण करून पुन: जन्म घेत असणार. प्रयागला तीर्थराज हे नाव पैसे उकळणाऱ्या लोकांनीच दिलेले आहे. वस्तुतः जड (अचेतन) पदार्थामध्ये राजा-प्रजा भाव असूच शकत नाही. सारी लोकवस्ती, कुत्री, गाढवे, भंगी, चांभार, शौचकूप यांच्यासह अयोध्यानगरी तीन वेळा स्वर्गात गेली असेल, ही अगदीच अशक्य गोष्ट आहे. ती मुळीच स्वर्गात गेली नाही. जेथे होती तेथेच आहे. परंतु पुजाऱ्यांनी रचलेल्या कपोलकल्पित कथांमध्ये मात्र अयोध्या उडून स्वर्गात गेली. ही कथा एकाच्या तोंडून दुसऱ्याकडे अवश्य उडत गेली असणार. नैमिषारण्यासंबंधी या पुजार्यांनी पसरविलेल्या अफवाही अशाच निरर्थक आहेत.
      मथुरा ही तीन लोकांहून निराळी मुळीच नाही. मात्र तेथे अत्यंत तापदायक असे तीन प्राणी अवश्य आहेत. त्यांच्यामुळे जळ,स्थळी व आकाशी कुणालाही सुखाने जगणे कठिण होऊन बसले आहे. त्यातला एक प्राणी म्हणजे तिथला चौबे नावाचा पंडा हा होय. जो कोणी स्नान करायला जातो त्याच्याकडून आपला कर वसूल करण्यासाठी तो उभा असतो. तो सारखा बडबडत असतो की, "यजमान ! द्या दक्षिणा भांग, मिरची (चमचमीत पदार्थ) आणि लाडू मला द्या. ते मी खाऊन पिऊन तुमचा जयजयकार करीन. दुसरा प्राणी आहे कासव. यमुना नदीत इतकी कासवे आहेत की स्नानासाठी पाण्यात उतरताच ती अंगाला कडकडून चावतात. त्यामुळे घाटावर स्नान करणेही अशक्य होऊन जाते. तिसरा प्राणी आकाशात राहतो तो म्हणजे माकड, लाल तोंडाच्या माकडांचा मथुरेत असा काही सुळसुळाट आहे की नाकी नऊ येतात. पगडी, टोपी, दागिनेच नव्हे तर पादत्राणेही ती पळवितात. एवढेच नव्हे तर ती माणसांना चावतात, धक्का देऊन खाली पाडतात व कधी कधी मारूनही टाकतात. हे तीन्ही प्राणी पोप व त्यांचे चेले यांना पूजनीय वाटतात. शेकडो मण चणे वगैरे खाद्यपदार्थ कासवांना खायला घातले जातात. माकडांना चणे गूळ यांसारखे पदार्थ खाऊ घालतात आणि चौब्यांना दक्षिणा देऊन व लाडू खायला घालून त्यांचे सेवक त्यांची सेवा करतात. वृंदावन कधी काळी तीर्थक्षेत्र राहिले असेलही. परंतु सध्या मात्र तो वेश्याव्यवसायाचा अड्डाच बनला आहे. मूर्ख स्त्रीपुरुष आणि बुबाबाजी करणारे गुरू व त्यांच्या शिष्यशिष्यणी यांच्या मर्कटलीला तेथे चालू असतात. याचप्रमाणे गोवर्धनची दीपमालिका जत्रा आणि व्रजयात्रा यांसारख्या प्रसंगीही पुरोहित मंडळींचे चांगलेच फावते. कुरुक्षेत्रातही पोटभरू पुजाऱ्यांचे असेच प्रताप चालू असतात. जो कोणी खराखुरा धार्मिक व परोपकारी वृत्तीचा असेल तो या सऱ्या प्रकारापासून दूर राहतो.
(प्रश्न) मूर्तिपूजा व तीर्थयात्रा या गोष्टी सनातन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्या खोट्या कशा असणार ?
(उत्तर) तुम्ही सनातन कशाला म्हणता? जी गोष्ट अनादी काळापासून चालत आलेली असते तिला सनातन असे म्हणतात. जर या गोष्टी सनातन असल्या तर वेदांमध्ये आणि ब्राह्मण वगैरे ऋषिमुनिकृत ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आला असता की नाही ? तसा तो आढळत नाही. याचे कारण काय ? याचे कारण असे की, मूर्तिपूजाही अडीच तीन हजार वर्षांपूर्वी वाममार्गी व जैन लोकांनी सुरु केली आहे. त्याआधी ती आर्यावर्त्तामध्ये अस्तित्वात नव्हती. त्यावेळी ही तीर्थक्षेत्रेही नव्हती. जेव्हा जैनां गिरनार, पालिताणा, सम्मेत शिखर, शत्रुंजय, आबू वगैरे तीर्थक्षेत्रे निर्माण केली तेव्हा पुराणिकांनीही त्यांच्यासारखीच आपलीही तीर्थक्षेत्रे तयार केली. या बाबातात कोणाला खात्री करून घ्यावयाची असल्यास त्याने पंडयाकडे असलेल्या जुन्या वह्या, ताम्रपत्र वगैरे पाहावेत. त्यावरून त्याच्या लक्षात येईल की, ही सारी तीर्थक्षेत्रे गेल्या हजार-पाचशे वर्षांच्या आतलीच आहेत. एक हजार वर्षांहून अधिक जुनी नोंद कोणाजवळही नाही. यावरून ही तीर्थक्षेत्रे आधुनिक असल्याचे सिद्ध होते.

तीर्थ व नामस्मरण-समीक्षा

(प्रश्न) तीर्थ माहात्म्य व नाममाहात्म्य यांना काही महत्वच नाही काय? 'अन्यक्षेत्रे कृतं पापं काशीक्षेत्रे विनश्यति' यासारखी जी वचने उद्धृत केली जातात ती खरी आहेत की नाही?
(उत्तर) नाही. कारण या मार्गाने पापे नष्ट झाली असती तर दरिद्री माणसाला संपत्ती व आंधळ्याला डोळे मिळाले असते. कुष्ठरोग्यांचा तो रोग नाहीसा झाला असता. परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही. म्हणून असल्या गोष्टींनी कुणाचेही पाप किंवा पुण्य नाहीसे होत नाही.

(प्रश्न) गंगा गंगेति यो ब्रूयाद्योजनानां शतैरपि ।
मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति।।१।।
हरिर्हरति पापानि हरिरित्यक्षरद्वयम्।।२।। ब्रह्मपुराण अ० १७५।। श्लो० ८२।।
प्रात काले शिवं दृष्ट्वा निशि पापं विनश्यति ।
आजन्मकृतं मध्याह्ने सायाह्ने सप्तजन्मनाम्।।३।। पदंपुराण खंड ३।। अ० २२।। श्लो० ३४।।

     इत्यादी श्लोक पुराणांमध्ये आहेत. एखाद्याने शेकडो, हजारो कोसांवरून नुसते तोंडाने 'गंगा, गंगा '
असे म्हटले तरी त्याची सारी पाप नष्ट होऊन तो विष्णुलोकाला म्हणजे वैकुंठाला जातो. ही या दोन अक्षरांचा उच्चार म्हणजे नामोच्चारण सारी पापे नाहीसे करते. असेच माहात्म्य राम, कृष्ण, शिव, भगवती इत्यादी नावांचे आहे.॥२॥ जो माणूस सकाळी शिवाचे म्हणजे त्याच्या लिंगाचे किंवा मूर्तीचे दर्शन घेतो त्याने रात्री केलेले पाप नाहीसे होते. हेच दर्शन दुपारी घेतल्यास जन्मभर केलेले पाप नष्ट होते आणि संध्याकाळीदर्शन घेतल्यास सात जन्माची पापे नाहीशी होतात. असे हे दर्शन माहात्म्य आहे.॥३॥ हे सारे काय खोटे आहे?
(उत्तर) त्यात काय शंका ? गंगा, हरी, रामकृष्ण, नारायण, शिव, भगवती यांच्या नामस्मरणाने कधीही पाप नाहीसे होत नसते. तसे झाले असते तर जगात कोणीच दु:खी राहिला असता, आणि पाप करायलाही कुणी भ्याला नसता. आजकाल पुरोहितांच्या लबाडीमुळे याच कारणाने पाप वाढत चालले आहे. मूढ लोकांची अशी खात्री असते की, आपण नामस्मरण अथवा तीर्थयात्रा केली की, सगळीपापे आपोआप नाहीशी होतील.
या खात्रीमुळे ते पापे करून इहलोकीच्या व परलोकीच्या सुखाला सारखे होतात. परंतु केलेल्या पापाची फळे भगावच लागतात.

तीर्थ शब्दाचा अर्थ

(प्रश्न) तर मग एखादे तीर्थ व नामस्मरण हे खरे आहे की नाही?
(उत्तर) होय, आहे. सत्य शास्त्रांचे अध्ययन-अध्यापन, धर्मनिष्ठ विद्वानांचा सत्संग, परोपकार, धर्मानुष्ठान, योगाभ्यास, निर्घरत्व, निष्कपटत्व, सत्यभाषण, सत्य मानणे, सत्य करणे, ब्रह्मचर्य, आचार्य, अतिथी, माता व पिता यांची सेवा, परमेश्वराची स्तुती व प्रार्थना, उपासना, शांती, जितेंद्रियता, सुशीलता, धर्मयुक्त पुरुषार्थ ज्ञान-विज्ञान इत्यादी शुभ गुणकर्म दुःखातून तारणारे असल्यामुळे ती वेदांनुसार तीथेच आहेत. जल व स्थल
यांनी युक्त असणारी कधी तीर्थे असू शकत नाहीत. कारण 'जना यैस्तरन्ति तानि तीर्थानि" म्हणजे ठिकाणही ज्यांच्या योगाने माणूस दु:खांतून मुक्त होतो त्यांना तीर्थ असे म्हणतात. जल-स्थलयुक्त ठिकाण ही तारणारी
नसून बुडवून मारणारी असतात. त्यापेक्षा नौका वगैरेला तीर्थ म्हणणे अधिक सयुक्तिक होय. कारण त्यांच्या
साह्याने माणसे समुद्र वगैरे तरून जातात.

समानतीर्थे वासी।।१।। -अष्टा० ४। ४। १०७।।
नमस्तीर्थ्याय च ।।२।। यजुः० अ० १६।। मं० ४।।

      जे ब्रह्मचारी (विद्यार्थी) एका आचार्याजवळ एक शाखा एकमेकांबरोबर शिकत असतात त्यांना सतीर्थ्य  म्हणजे समानतीर्थसेवी असे म्हणतात.जे वेदादी शास्त्रे शिकले आहेत आणि सत्यभाषणादी धर्मलक्षणांनी युक्त असे साधू आहेत त्यांना अन्नादी पदार्थ देणे आणि त्यांच्याकडून विद्या ग्रहण करणे यालाही तीर्थ म्हणतात. नामस्मरण याला म्हणतात - यस्य नाम महद्यशः ।। यजु०अ० ३२।। मं० ३।।
          धर्मयुक्त काम करणे हेच मोठे यश असून तेच परमेश्वराचे नामस्मरण होय. ब्रह्म, परमेश्वर, ईश्वर, न्यायकारी, दयाळू, सर्वशक्तिमान वगैरे नावे परमेश्वराच्या गुणकर्मस्वभावानुसार आहेत. जसे - सर्वाहून मोठा म्हणून ब्रह्म, ईश्वरांचा ईश्वर म्हणून परमेश्वर, तो सामथ्र्यवान आहे म्हणून ईश्वर जो कधीही अन्याय करीत नाही, सदैव न्यायच करतो तो न्यायकारी, सर्वावर कृपादृष्टी ठेवतो म्हणून दयाळू, आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करतो, त्यासाठी कोणाचीही मदत घेत नाही, म्हणून सर्वशक्तिमान जगातील विविध पदार्थाची निर्मिती करणारा म्हणून ब्रह्मा, सर्वांमध्ये व्याप्त होऊन सर्वांचे रक्षण करतो म्हणून विष्णु, सर्व देवांचा देव म्हणून महादेव, प्रलय करतो म्हणून रुड, असा अर्थ व्यक्त करणारी नावे परमेश्वराची आहेत. परमेश्वराचे हे गुण स्वतःमध्ये आणण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मोठी कामे करून त्याने मोठे बनावे. त्याने समर्थाहून समर्थ बनावेआपले सामर्थ्य सतत वाढवावे, कधीही अधर्माचरण करू नये. सर्वांवर दया करावी. सर्व प्रकारची साधने परिपूर्ण बनवावीत. तंत्रज्ञानाचा विकास करून नाना प्रकारची उपकरणे तयार करावीत. साऱ्या जगातील जीवांना आपल्या आत्म्याप्रमाणेच सुख-दु:ख होत असते हे ओळखावे. सर्वांचे रक्षण करावे विद्वानांमध्ये विद्वान बनावे, दुष्कृत्ये करणाऱ्या दुष्टांना शिक्षा करावी आणि सज्जनांचे रक्षण करावे. अशा प्रकारे परमेश्वराच्या नावांचे अर्थ जाणून घेऊन परमेश्वराच्य गुणकर्मस्वभावानुसार आपले गुणकर्मस्वभाव बनविण्याचा प्रयत्न करणे हेच परमेश्वराचे नामस्मरण होय,

गुरू माहात्म्य समीक्षा

(प्रश्न) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वर ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम ।। गुरु-गीता गुरुमाहात्म १६।।

      इत्यादी गुरुमाहात्म्य तर खरे आहे ना? गुरूचे चरणामृत प्राशन करावे. त्याच्या आज्ञेचे पालन करावे, लोभी असल्यास त्याला वामनाप्रमाणे, क्रोधी असल्यास नरसिंहाप्रमाणे, मोही असल्यास रामाप्रमाणे, कामी असल्यास कृष्णासमान मानावे. गुरू कितीही पापी असला तरी त्याच्याविषयी अश्रद्धा बाळगू नये. संत अथवा गुरू यांच्या दर्शनाला जाताना पावलोपावली अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. ही गोष्ट बरोबर आहे की नाही?
(उत्तर) मुळीच बरोबर नाही. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आणि परब्रह्म ही परमेश्वराची नावे आहेत. त्याची बरोबरी गुरु कधीच करू शकणार नाही. ज्या गुरुगीतेमध्ये हे गुरुमाहात्म्य वर्णिलेले आहे. ती कुणा पुजाऱ्यानेच रचलेली पोपलीलाच आहे. माता, पिता, आचार्य व अतिथी हेच खरे गुरू होत. त्यांची सेवा करणे व त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करणे हे शिष्याचे कर्तव्य असून विद्या देणे हे गुरूचे काम आहे. परंतु गुरू लोभी, क्रोधी, मोही व कामी असेल तर त्याचा त्याग करावा. तेवढ्याने भागले नाही तर त्याला शारीरिक शिक्षा करावी. किंबहुना अशा माणसाला ठार मारण्यातही काही दोषनाही. जो विद्यादी सदगुणांच्या बाबतीत श्रेष्ठ नसेल, बाह्यतः माळ, टिळा, टोपी वगैरे करून वेदांविरुद्ध मंत्रोपदेश करीत असेल तो गुरू नसून, जणू धनगरच आहे असे समजावे. ज्याप्रमाणे धनगर आपल्या शेळ्या-मेंढ्यांकडून दूध, लोकर वगैरे मिळवून आपला स्वार्थ साधतात त्याप्रमाणे ढोंगी गुरू आपले शिष्य व शिष्यिणी यांचे धन लुबाडून आपला स्वार्थ साधतात.

दोहा – गुरु लोभी चेला लालची, दोनों खेलें दाव ।
भवसागर में डूबते, बैठ पत्थर की नाव।।

     लोभी गुरू व लालची चेला हे दोघेही एकमेकांवर डाव करीत असतात. ते जणू दगडी नावेत बसून भवसागरात बुडून जातात. गुरू समजतो की आपले शिष्य व शिष्यिणी आपल्याला काही न काही अवश्य देतील, आणि शिष्याला वाटते की खोटी शपथ घेण्यासाठी व पापमुक्त होण्यासाठी गुरूचा उपदेश झाला तरी पुष्कळ आहे. अशा प्रकारे दोघेही भवसागरूपी दु:खात बुडून जातात. असे गुरू व चले यांच्या तोंडात राख पडो. अशा माणसांच्या वाऱ्यालाही उभे राहू नये. जो कोणी त्याच्या जवळ जाईल तो दुःखसागरात पडेल पुजारी, पुराणिक वगैरे लोकांनी जशी लबाडी चालविली तशीच या धनगरी वृत्तीच्या गुहंनी चालविली आहे, हे सारे स्वार्थी लोकांचे काम आहे. जे लोक परमार्थी असतात ते स्वतःला दुःख भोगावे लागले तरी जगावर उपकार करणे सोडीत नाहीत. गुरुमाहात्म्य, गुरुगीता वगैरे ग्रंथ याच लोभी, कुकर्मी गुरूंनी रचले आहेत.

(प्रश्न) अष्टादशपुराणानां कर्त्ता सत्यवतीसुत ।।१।।
इतिहासपुराणाभ्यां वेदार्थमुपबृंहयेत्।।२।। -महाभारत आदिपर्व अ० ३।। श्लो० २६७।।
पुराणानि खिलानि च।।३।। मनु०।। अ०३ ।। श्लो० २३२।।
इतिहासपुराण पञ्चमो वेदानां वेद ।।४।। -छान्दोग्य।।प्रपा० ३।। खं० ७।। व०१।। 
दशमेऽहनि किञ्चित्पुराणमाचक्षीत।।५।। शतपथ० प्रपा० १३ ।।ब्रा० ४।। का० ३।। व० १३।।
पुराणविद्या वेद ।।६।। सूत्रम्।।

      अठरा पुराणांचे कर्ते व्यास आहेत. व्यासवचन अवश्य प्रमाण मानले पाहिजे॥१॥ इतिहास, महाभारत, अठरा पुराणे यांतून वेदांचा अर्थ शिकावा व शिकवावा. कारण इतिहास व पुराणे वेदांच्या अर्थाला अनुकूल आहेत. ॥२॥ पितरांचे क्रियाकर्म करताना पुराणे व हरिवंश यातील कथा श्रवण कराव्यात.॥३॥ इतिहास व पुराणे यांना पाचवा वेद असे म्हणतात॥४॥ अश्वमेध यज्ञाच्या समाप्तीच्या दहाव्या दिवशी थोडेसे पुराण श्रवण
करावे. ॥५। पुराणांमध्ये जे काही सांगितले आहे ते वेदार्थाशी जुळणारे आहे. त्यामुळे पुराणविद्या हा वेदच आहे॥६॥ इत्यादी पुराव्यावरून पुराणेही प्रमाण आहेत असे ठरते आणि पुराणांमध्ये मूर्तिपूजा व तीर्थयात्रा करावी असे सांगितले आहे म्हणून मूर्तिपूजा व तीर्थयात्रा या गोष्टी पुण्यप्रद ठरत नाहीत काय?
(उत्तर) अठरा पुराणे व्यासांनी रचली असती तर त्यात असल्या गप्पा व भाकडकथा आल्या नसत्या. कारण शारीरिक सूत्र, योगशास्त्रावरील भाष्य वगैरे व्यासोक्त ग्रंथ नजरेखालून घातल्यानंतर लक्षात येते की व्यास हे फार मोठे विद्वान, सत्यवादी, धार्मिक व योगी होते. त्यांनी अशा भाकडकथा कधीच लिहिल्या नाहीत. यावरून हे सिद्ध होते की ज्या परस्पर विरोधी संप्रदायांच्या लोकांनी भागवतादी नवीन कपोलकल्पित ग्रंथांची रचना केली आहे. त्यांच्यामध्ये व्यासांच्या गुणांचा लवलेशही नव्हता. तसेच वेदशास्त्रांविरुद्ध असत्यवादी लिखाण करणे हे व्यासांसारख्या विद्वानांचे काम असू शकत नाही. वेदविरोधी, स्वार्थी व विद्वान लोकांचे ते काम आहे. इतिहास व पुराण या शब्दांचा खरा अर्थ शिवपुराणादी ग्रंथांना लागू होत नाही कारण,

ब्राह्मणानीतिहासान् पुराणानि कल्पान् गाथानाराशंसीरिति ।

     हे ब्राह्मण व सूत्रे यांतील वचन आहे. ऐतरेय, शतपथ, साम आणि गोपथ या ब्राह्मण ग्रंथाचीच इतिहास, पुराण, कल्प, गाथा व नाराशंसी ही पाच नावे आहेत. (इतिहास) जनक व याज्ञवल्क्य यांचा संवाद हा इतिहास
आहे. (पुराण) ब्राह्मण ग्रंथांतील जगदुत्पत्ती वगैरेचे वर्णन म्हणजे पुराण होय. (कल्प) वेदांतील शब्दांच्या सामर्थ्यांचे वर्णन व निरूपण करणे हे कल्प होय. (गाथा) दृष्टांत आणि दृष्टांताद्वारे स्पष्टीकरण करणाऱ्या कथा
व प्रसंग यांना गाथा असे म्हणतात. (नाराशंसी) मनुष्याच्या प्रशंसनीय अथवा अप्रशंसनीय कृत्यांचे कथन करणे म्हणजे नाराशंसी होय. यांतूनच वेदार्थाचा बोध होतो.
       पितृकर्म म्हणजे ज्ञानी लोकांची प्रशंसा श्रवण करणे. अश्वमेधाच्या शेवटीही ब्राह्मण ग्रंथातील विद्वत्  स्तुतीचा भाग ऐकावा असे सांगितले आहे. व्यासकृत जे ग्रंथ आहेत ते ऐकणे व ऐकविणे ही गोष्ट व्यासांच्या जन्मानंतरच घडू शकते, त्याच्या आधी नाही. जेव्हा व्यासांचा जन्म झालेला नव्हता तेव्हा वेदार्थ शिकणे-शिकविणे व ऐकणे-ऐकविणे चालू होते. म्हणून सर्वात प्राचीन ब्राह्मण ग्रंथांनाच पुराण असे म्हणणे शक्य आहे. अलीकडच्या काळातील कपोलकल्पित श्रीमद्भागवत, शिवपुराण इत्यादी मिथ्या किंवा दूषित ग्रंथांना पुराण ही संज्ञा दिली जाऊ शकत नाही.
       व्यासांनी वेदांचे अध्ययन व अध्यापन करून वेदार्थाचा प्रसार केला. म्हणून त्यांचे नाव वेदव्यास असे पडले. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून आरपार जाणाऱ्या रेषेला व्यास असे म्हणतात. व्यासांनी ऋग्वेदापासून अथर्ववेदापर्यंत चारही वेदांचे अध्ययन केले होते व ते त्यात पारंगत झाले होते. शुकदेव व जैमिनी वगैरे शिष्यांना त्यांनी वेद शिकविले होते. म्हणून त्यांचे जन्मगाव कृष्णद्वैपायन असे असले तरी ते वेदव्यास (वेदपारंगत) या टोपण नावानेच प्रख्यात झाले. काही लोक असे म्हणतात की व्यासांनी वेदांचे संकलन केले म्हणून त्यांना वेदव्यास हे नाव प्राप्त झाले. परंतु ते खोटे आहे. कारण व्यासांचे पिता, पितामह, प्रपितामह, पराशर, शक्ती, वसिष्ठ, ब्रह्मा इत्यादिकांनीही चारही वेदांचे अध्ययन केले हो. तेम्हणून व्यासांनी वेदांचे संकलन केले ही गोष्ट खरी नाही.

No comments:

Post a Comment