Sunday 19 June 2016

तेरावा समुल्लास


1
अनुभूमिका (३)

या बायबलावर आधारलेला पंथ फक्त ख्रिस्ती लोकांचाच नसून यहुदी वगैरे लोकांच्या पंथांचाही त्यात समावेश होतो. या तेराव्या समुल्लासात आम्ही फक्त ख्रिस्ती पंथाचीच चर्चा केली आहे. याचे कारण असे की आजकाल बायबलाच्या पंथाचे अनुयायी मुख्यतः ख्रिस्ती लोक असून यहुदी वगैरे इतर लोक गौण आहेत. मुख्य गोष्टीचे ग्रहण केले की त्यामध्ये गौण गोष्टीचे ग्रहण येऊन जाते म्हणून यात यहुदी लोकांचा समावेश आहे असे समजावे. यांचा जो विषय आम्ही या प्रकरणात लिहिला आहे. तो केवळ बायबलातील ज्या त्या ख्रिस्ती, यहुदी वगैरे सर्व पंथाचे लोक मानतात आणि आपल्या पंथाचे मूळ कारण आहे असे समजतात.

या ग्रंथाची अनेक भाषांतरे झाली आहेत. या पंथातील मोठमोठ्या पादऱ्यांनीच  ही भाषांतरे केली आहेत. त्यातील देवनागरी (हिंदी) अथवा संस्कृत भाषांतर वाचल्यानंतर माझ्या मनात बायबलबाबत अनेक शंका उत्पन्न झाल्या. त्यापैकी काही शंका या तेराव्या समुल्लासात सर्वांच्या विचारासाठी मी लिहिल्या आहेत. मी हे लिखाण केवळ सत्याची वृद्धी व असत्याचा ऱ्हास  व्हावा या हेतूने केले आहे. कोणाला दु:ख द्यावे, कोणाचे नुकसान करावे अथवा कोणावर खोटे दोषारोप करावेत यासाठी हे लिखाण केलेले नाही. याचा अभिप्राय पुढील लेखात सर्वजण समजून घेतील की हा ग्रंथ आणि याचे मत कसे आहे ? या लिखाणाचे हे प्रयोजन आहे की, सर्व लोकांना यास पाहणे, त्याचे श्रवण व त्यासंबंधी लेखन करणे सहज होईल आणि कोणीही याचा पक्षी प्रतिपक्षी होऊन विचाराने हे ईसाई मत आंदोलन कसे आहे हे जाणतील यामुळे एक हेतू हा सिद्ध होईल की, लोकांचे धर्मविषयक ज्ञान वाढेल आणि सत्यासत्य व कर्तव्याकर्तव्य या बाबतीत आपण काय केले पाहिजे हे त्यांना कळेल. त्यायोगे सत्य व कर्तव्य कर्माचा स्वीकार आणि असत्य व अकर्तव्य कर्माचा परित्याग करणे त्यांना सोपे जाईल.

सर्व लोकांना उचित आहे की त्यांनी सगळ्यांची पंथविषयक पुस्तके वाचावीत, समजून घ्यावीत, त्यातील गोष्टींविषयी आपली संमती अथवा असमती व्यक्त करावी किंवा लिहावी नाहीतर ऐकावी. कारण माणूस जसा वाचनाने पंडित होतो तसा श्रवणाने बहुश्रुत होतो. जर श्रोता दुसऱ्याला समजाऊ शकत नसला तरी स्वतः समजू

2
शकतोच. जे कोणी पक्षपाताच्या आहारी जाऊन पाहतात त्यांना आपले किंवा दुसऱ्यांचे गुण-दोष कळत नाहीत. माणसाचा आत्मा यथायोग्य सत्यासत्याचा निर्णय करण्यास समर्थ असतो. त्याने स्वत: जेवढे काही वाचले अथवा ऐकले असेल तेवढ्यावरून तो निर्णय करू शकतो. दोन्ही पक्षांच्या लोकांना एकमेकांच्या मतांविषयी नीट माहिती नसेल, ते फक्त आपल्याच पंथाविषयी जाणत असतील व दुसऱ्यांच्या पंथाविषयी अज्ञानी असतील तर त्यांच्यामध्ये यथायोग्य संवाद घडून येऊ शकत नाही. उलट अज्ञानी लोक भ्रमरूपी खड्ड्यात जाऊन पडतात. असे होऊ नये म्हणून या ग्रंथामध्ये सर्व प्रचलित पंथांची थोडक्यात चर्चा लिहिली आहे. यावरून त्या पंथातील इतर गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या याविषयी वाचकाला अंदाज बांधता येईल. जी सर्वमान्य सत्ये आहेत ती सर्व पंथात सारखीच आहेत. मतभेद होतात ते खोट्या गोष्टींच्या संबंधात किंवा एक सत्य आहे तर दुसरे असत्य आहे तरीही थोडाफार वादविवाद होतो. जर वादी-प्रतिवादी सत्यासत्याचा निर्णय करण्यासाठी वादविवाद करतील तर अवश्य निर्णय होईल.

आता मी या तेराव्या समुल्लासात ख्रिस्ती पंथाविषयी थोडेसे विवेचन करून ते सर्वांसमोर ठेवतो. ते कसे आहे याचा वाचकांनी विचार करावा.

अलमतिलेखेन विचक्षणवरेषु

3
तेरावा समुल्लास

ख्रिश्चन पंथाची समीक्षा

आता आम्ही ख्रिस्ती लोकांच्या पंथाविषयी लिहितो. त्यावरून त्याचा पंथ निर्दोष आणि त्यांचा मतग्रंथ बायबल ईश्वरकृत आहे किवा नाही ? प्रथम आम्ही बायबलाच्या तौरैत भागाविषयी लिहितो:

आकाश, पृथ्वी आणि सृष्टि उत्पत्ति

(१) 'आरंभी ईश्वराने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. पृथ्वी बेडौल व उजाड होती. सखोल पाण्यावर अंधार होता आणि ईश्वराचा आत्मा पाण्याच्या पृष्ठभागावर डोलत होता. --तौरेत उत्पत्ति पुस्तक पर्व १। आय० १।२ ।।

(समीक्षक) तुम्ही आरंभ कशाला म्हणता?
(ख्रिस्ती) सृष्टिच्या प्रथम उत्पतिला.

(समीक्षक) हीच सृष्टि प्रथम उत्पन्न झाली काय? हिच्या पूर्वी ती कधीच उत्पन्न झाली नव्हती काय?
(ख्रिस्ती) आम्हाला ते माहीत नाही. ती झाली होती की नव्हती ते ईश्वर जाणे.

(समीक्षक) तुम्हाला जर ते माहीत नाही तर ज्या या पुस्तकातून शंकेचे निवारण होऊ शकत नाही त्याच्यावर तुम्ही विश्वास का ठेवला? आणि याच पुस्तकाच्या आधारे लोकांना उपदेश करून या संशयग्रस्त ख्रिस्ती पंथात तुम्ही का फसविता ? त्याऐवजी नि:संदेह सर्व शंकांचे निवारण करणाऱ्या वेदमताचा स्वीकार तुम्ही का करीत नाही? तुम्हाला ईश्वराच्या सुष्टिचे ज्ञान नाहीतर तुम्ही ईश्वराला कसे जाणणार? तुम्ही आकाश कशाला मानता?
(ख्रिस्ती) पोकळीला आणि वरचे.

(समीक्षक) पोकळची उत्पत्ति कशी झाली? कारण हा पदार्थ विभू, अत्यंत सूक्ष्म आणि वर खाली एकसारखा आहे. जेव्हा आकाश उत्पन्न झाले नव्हते तेव्हा पोकळी व अवकाश हे होते की नाही ? जर ते नसेल तर ईश्वर जगाचे कारण आणि जीव कोठे राहत होते ? अवकाशाशिवाय कोणताही पदार्थ स्थिर राहू शकत नाही. म्हणून तुमच्या बायबलातील विधान बरोबर नाही. ईश्वर बेडौल आणि त्याचे ज्ञानकर्म बेडौल असते की सर्व व्यवस्थित असते?

4
(ख्रिस्ती) सर्व सुडौल असते.

(समीक्षक) तर मग येथे ईश्वराने निर्माण केलेली पृथ्वी बेडौल होती असे का लिहिले आहे?
(ख्रिस्ती) बेडौल याचा अर्थ ती उंच-सखल होती व सपाट नव्हती.
(समीक्षक) मग ती सपाट कोणी बनविली? आजही ती उंचसखल नाही काय ? ईश्वर सर्वज्ञ आहे म्हणून त्याचे कोणतेही काम, कृती बेडौल असू शकत नाही. त्याच्या कामात कधीच भूलचूक होऊ शकत नाही. बायबलमध्ये ईश्वराची सृष्टि बेडौल असे लिहिली आहे. म्हणून ते पुस्तक ईश्वरकृत असू शकत नाही. प्रथम हे सांगा की ईश्वराचा आत्मा काय पदार्थ आहे?

(ख्रिस्ती) तो चेतन आहे.
(समीक्षक) तो साकार आहे की निराकार? व्यापक आहे की एकदेशी ?

(ख्रिस्ती) तो निराकार, चेतन व व्यापक आहे. परंतु एका सिनाई पर्वत, चौथा स्वर्ग (आकाश) वगैरे ठिकाणी तो विशेषकरून राहतो.
(समीक्षक) तो निराकार असेल तर त्याला कोणी पाहिले आहे? आणि व्यापकाचे जलावर डोलणे कधी होऊ शकत नाही. बरे! जेव्हा ईश्वराचा आत्मा पाण्यावर डोलत होता तेव्हा ईश्वर कोठे होता? यावरून हेच सिद्ध होते की ईश्वराचे शरीर कोठेतरी अन्यत्र असणार; अथवा आपल्या आत्म्याचा एक तुकडा त्याने पाण्यावर तरंगत ठेवला असणार. तसे असेल तर तो कधीच विभू व सर्वज्ञ होऊ शकत नाही. तो विभू नसेल तर जगाची उत्पत्ती, धारण, पालन आणि जीवांच्या कर्माची व्यवस्था अथवा प्रलय या गोष्टी तो कधी करू शकला नसता. कारण ज्या पदार्थाचे स्वरूप एकदेशी असते. त्याचे गुण, कर्म, स्वभावही एकदेशी असतात. असे असल्यामुळे तो ईश्वर होऊ शकत नाही. कारण ईश्वर हा सर्वव्यापक अनंत गुण कर्म स्वभावयुक्त, सच्चिदानंदस्वरूप, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्तस्वभाव, अनादी, अनंत इत्यादी लक्षणांनी युक्त आहे असे वेदात सांगितले आहे. त्यालाच तुम्ही मानाल तरच तुमचे कल्याण होईल, नाहीतर नाही. ॥१॥

(२) आणि ईश्वराने म्हटले की, "प्रकाश होवो" आणि प्रकाश झाला आणि ईश्वराने पाहिले की, प्रकाश चांगला आहे. -तौरेत उत्पत्ति पर्व० १। आ० ३। ४ ।।

(समीक्षक) ईश्वराचे बोलणे जडरूप प्रकाशाने ऐकले काय? जर ऐकले असेल तर आजही सूर्य, दिवा व अग्नी यांचा प्रकाश तुमचे आमचे म्हणणे का ऐकत नाही? प्रकाश हा जड असतो. तो कधीही कोणाचेही बोलणे ऐकू शकत नाही. ईश्वराने जेव्हा प्रकाश पाहिला तेव्हाच त्याला प्रकाश चांगला आहे? त्यापूर्वी त्याला ते माहीत नव्हते काय ? जर त्याला ते माहीत असते तर तो पाहिल्यानंतर तो चांगला आहे असे त्याने का म्हटले? जर त्याला ते आधीपासून माहीत नसेल तर तो ईश्वरच नव्हे. म्हणून तुमचे बायबल ईश्वरोक्त नाही आणि त्यात वर्णिलेला ईश्वर सर्वज्ञ नाही. ॥२॥

(३) आणि ईश्वराने म्हटले आहे की पाण्यामध्ये आकाश (अवकाश) होवो: आणि ते पाण्यांना पाण्यांपासून विभक्त करो. तेव्हा ईश्वराने आकाश बनविले आणि आकाशाच्या वरील पाण्यांपासून वेगळे केले

5
आणि तसे झाले आणि ईश्वराने आकाशाला स्वर्ग म्हटले आणि संध्याकाळ व सकाळ झाली. दुसरा दिवस
उजाडला.--तौरेत उत्पत्ति पर्व० १। आ० ६। ७। ८।।

(समीक्षक) आकाशाने व पाण्यानेही ईश्वराचे ऐकले काय? पाण्यामध्ये आकाश नसते तर पाणी कोठे राहिले असते ? पहिल्या आयतामध्ये ईश्वराने आकाश निर्माण केल्याचे सांगण्यात आले आहे. मग पुनः आकाशाची निर्मिती करणे निरर्थक ठरते. आकाशाला स्वर्ग म्हटले आहे. ते तर सर्वव्यापक आहे. म्हणून स्वर्ग सर्वत्र आहे असे ठरते. म्हणून स्वर्ग वर आहे असे म्हणण्यात काही अर्थ नाही. एव्हाना सूर्य उत्पन्नच झालेला नव्हता. मग दिवस व रात्र कोठून आले? असल्याच अनेक अशक्य गोष्टी पुढील आयतामध्ये भरलेल्या आहेत. ॥३॥

(४) मग ईश्वरम्हणाला की, "आपण आपल्यासारखे स्वरूप देऊन माणसाला आपल्यासारखे बनवावे." आणि ईश्वराने माणसाला आपल्यासारखे स्वरूप देऊन उत्पन्न केले. म्हणजे त्याने माणसाला ईश्वराच्या रूपात निर्माण केले. ईश्वराने नर व नारी या रूपात माणसाची निर्मिती करून त्यांना आशीर्वाद दिला.
(समीक्षक) ईश्वराने माणसाला आपल्यासारखेच स्वरूपात निर्माण केले होते तर ईश्वराचे स्वरूप पवित्र, ज्ञानरूप, आनंदमय इत्यादी लक्षणांनी युक्त आहे. मग माणूस त्याच्यासारखा का झाला नाही? तो तसा झाला नाही याचा अर्थच हा की माणूस ईश्वरासारखे स्वरूप धारण करणारा नव्हता. माणसाला ईश्वराने निर्माण केले, आणि त्याला आपल्यासारखेच रूप दिले. त्याचे स्वरूप निर्माण करता येण्यासारखे आहे. म्हणून तो अनित्य का नाही? शिवाय त्याने माणसाला कोठून निर्माण केले?
(ख्रिस्ती) मातीपासून
(समीक्षक) त्याने माती कशापासून निर्माण केली?
(ख्रिस्ती) आपल्या सामर्थ्याने.
(समीक्षक) ईश्वराचे सामर्थ्य अनादी आहे की नवीन?
(ख्रिस्ती) अनादी आहे.
(समीक्षक) जर अनादी असेल तर जगाचे कारण सनातन ठरते. मग अभावापासून भावाची उत्पत्ती का मानता?
(ख्रिस्ती) सृष्टिच्या पूर्वी ईश्वराखेरीज दुसरी कोणतीच वस्तू नव्हती.
(समीक्षक) जर नव्हती तर हे जग कशापासून बनले? आणि ईश्वराचे सामर्थ्य हे द्रव्य आहे की गुण? जर ते द्रव्य असेल तर ईश्वराहून वेगळा असा दुसरा पदार्थ अस्तित्वात होता; आणि जर तो गुण असेल तर गुणापासून द्रव्य कधी बनू शकत नाही. ज्याप्रमाणे रूपापासून अग्नी आणि रसापासून पाणी बनत नाही आणि ईश्वरापासून जग निर्माण झाले असते तर ते ईश्वरासारखे गुण, कर्म व स्वभाव असणारे बनले असते. परंतु ते ईश्वराच्या गुणकर्मस्वभावासारखे नसल्यामुळे ते ईश्वरापासून बनलेले गाही परंतु जगाचे कारण असणाऱ्या परमाणू वगैरे नावे असलेल्या जडाने बनले आहे हेव सिद्ध होते. जगाच्या उत्पत्तिसंबंधी वेदादी शास्त्रांमध्ये जे लिहिलेले आहे. ते तुम्ही मान्य करा. ज्यात ईश्वर हा सृष्टिकर्ता आहे असे सांगितले आहे. (आदमचे) आंतरिक स्वरूप जीवासारखे आणि बाह्यस्वरूप माणसासारखे आहे. मग ईश्वराचे स्वरूप तसे का नाही? कारण आदम हा ईश्वरासारखा बनला तर ईश्वरही आदमसारखाच असला पाहिजे. ॥४॥

(५) आणि त्या महान परमेश्वराने जमिनीवरच्या धुळीपासून आदिमानव बनविला आणि त्याच्या नाकपुड्यांत प्राणवायू फुंकला. त्याबरोबर आदम हा जिवंत प्राणी झाला आणि महान परमेश्वराने एडनमध्ये पूर्वेच्या बाजूस एक बाग तयार केली आणि जो आदम त्याने बनविला होता त्याला तेथे ठेवले. मग त्या बागेच्या मध्यभागी जीवनाचा वृक्ष व बरे-वाईट जाणण्याचे झाड जमिनीतून उगविले.-तौरेत उत्पत्ति पर्व० २। आ० ७। ८। ९ ।।

(समीक्षक) जेव्हा ईश्वराने एडनमध्ये बाग तयार करून त्यामध्ये आदमला ठेवले तेव्हा त्याला पुन: तेथून हाकलून द्यावे लागेल हे ईश्वराला माहीत नव्हते काय? ईश्वराने आदमला धुळीपासून बनविले, म्हणजे तो ईश्वराचे स्वरूप नव्हता आणि जर तो तसा असता तर मग ईश्वरही धुळीपासून बनला असेल ? ईश्वराने याच्या नाकपुड्यांत श्वास फुंकला. तर तो श्वास ईश्वरस्वरूप होता की वेगळा? तो वेगळा असेल तर माणूस ईश्वराचे स्वरूप नव्हता असे म्हणावे लागेल. जर तो एकच असेल तर माणूस आणि ईश्वर हे एकसारखेच म्हणावयाचे जर ते एकसारखेच असतील तर माणसाप्रमाणे जन्म, मरण, वृद्धी, क्षय, सुधा, तृष्णा वगैरे दोष ईश्वरामध्ये येतील. मग तो ईश्वर कसा होऊ शकेल? म्हणून तौरेत ची ही गोष्ट बरोबर ठरत नाही; आणि हे पुस्तकही ईश्वरकृत ठरत नाही. ॥५॥

6
ते तुम्ही मान्य करा. ज्यात ईश्वर हा सृष्टिकर्ता आहे असे सांगितले आहे. (आदमचे) आंतरिक स्वरूप जीवासारखे आणि बाह्यस्वरूप माणसासारखे आहे. मग ईश्वराचे स्वरूप तसे का नाही? कारण आदम हा ईश्वरासारखा बनला तर ईश्वरही आदमसारखाच असला पाहिजे.॥४॥

(५) आणि त्या महान परमेश्वराने जमिनीवरच्या धुळपासून आदिमानव बनविला आणि त्याच्या नाकपुड्यांत प्राणवायू फुंकला. त्याबरोबर आदम हा जिवंत प्राणी झाला आणि महान परमेश्वराने एडनमध्ये पूर्वेच्या बाजूस एक बाग तयार केली आणि जो आदम त्याने बनविला होता त्याला तेथे ठेवले. मग त्या बागेच्या मध्यभागी जीवनाचा वृक्ष व बरे-वाईट जाणण्याचे झाड जमिनीतून उगविले. -तौरेत उत्पत्ति पर्व० २। आ० ७। ८। ९ ।।

(समीक्षक) जेव्हा ईश्वराने एडनमध्ये बाग तयार करून त्यामध्ये आदमला ठेवले तेव्हा त्याला पुन: तेथून हाकलून द्यावे लागेल हे ईश्वराला माहीत नव्हते काय? ईश्वराने आदमला धुळीपासून बनविले, म्हणजे तो ईश्वराचे स्वरूप नव्हता आणि जर तो तसा असता तर मग ईश्वरही धुळीपासून बनला असेल ? ईश्वराने याच्या नाकपुड्यांत श्वास फुंकला. तर तो श्वास ईश्वरस्वरूप होता की वेगळा? तो वेगळा असेल तर माणूस ईश्वराचे स्वरूप नव्हता असे म्हणावे लागेल. जर तो एकच असेल तर माणूस आणि ईश्वर हे एकसारखेच म्हणावयाचे जर ते एकसारखेच असतील तर माणसाप्रमाणे जन्म, मरण,वृद्धी, क्षय, क्षुधा, तृष्णा वगैरे दोष ईश्वरामध्ये येतील. मग तो ईश्वर कसा होऊ शकेल? म्हणून तौरेत ची ही गोष्ट बरोबर ठरत नाही; आणि हे पुस्तकही ईश्वरकृत ठरत नाही. ॥५॥

आदमच्या बरगडीपासून स्त्री उत्पत्ति

(६) आणि महान परमेश्वराने आदमला गाढ झोप आणली व तो झोपी गेला. त्यावेळी परमेश्वराने आदमच्या छातीच्या फासळ्यांपैकी एक फासळी काढली आणि तिची जागा मांसाने भरून काढली. मग महान परमेश्वराने आदमच्या त्या फासळीपासून एक स्त्री बनविली आणि तिला आदमजवळ आणले. -तौरेत उत्पत्ति पर्व० २।। आ० २१। २२ ।।

(समीक्षक) ईश्वराने आदमला धुळीपासून बनविले मग त्यांच्या स्त्रीलाही धुळीपासून का बनविले नाही? आणि स्त्रीला हाडापासून निर्माण केले तसे आदमला हाडापासून का बनविले नाही? नरापासून उत्पन्न झाल्यामुळे स्त्रीही नारी तर नारीपासून उत्पन्न होत असल्यामुळे नर व्हावयाला पाहिजे. त्या दोघांमध्ये परस्परांविषयी प्रेम असले पाहिजे. पुरुष जसा आपल्या पत्नीवर प्रेम करतो तसे स्त्रीनेही आपल्या पतीवर प्रेम केले पाहिजे. विद्वज्जनांनो, ईश्वराची पदार्थविद्या म्हणजे फिलॉसॉफी कशी चमकते आहे. जर आदमची एक फासळी काढून स्त्री बनविली आहे तर सर्वच पुरुषांच्या छातीत एक फासळी कमी का असत नाही? तसेच स्त्रीच्या छातीत एकच फासळी असली पाहिजे. कारण ती एका फासळीपासून बनलेली आहे. ज्या सामग्रीपासून सारे जग बनविले त्या सामग्रीपासून स्त्रीचे शरीर बनू शकत नव्हते काय ? म्हणून बायबलचा हा सृष्टिक्रम सृष्टिविद्येच्या विरुद्ध आहे.॥६॥

7
सैतान

(७) महान परमेश्वराने जे पशू बनविले होते त्यांमध्ये साप धूर्त होता आणि त्या स्त्रीला म्हटले, "तू या बागेतील प्रत्येक झाडाचे फळ खाऊ नको, असे ईश्वराने निश्चित सांगितले आहे काय?" स्त्री सापाला म्हणाली, "आम्ही या बागेतील इतर झाडांची फळे खातो. परंतु "बागेच्या मधोमध असलेल्या त्या झाडाचे फळ तुम्ही खाऊ नका व त्याला स्पर्शही करू नका. तसे कराल तर मरून जाल." तेव्हा साप स्त्रीला म्हणाला, "तुम्ही मुळीच मरणार नाही. कारण ईश्वराला माहीत आहे की ज्या दिवशी तुम्ही त्याचे फळ खाल त्यादिवशी तुमचे डोळे उघडतील आणि बरे व वाईट ओळखण्याच्या बाबतीत ईश्वरासारखे बनाल." मग त्या झाडाचे फळ खाण्यास स्वादिष्ट दिसायला सुंदर व बुद्धी देणारे आहे. असे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा तिने त्या झाडाचे फळ काढून खाल्ले आणि आपल्या नवऱ्यालाही दिले. त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी उंबराची पाने एकत्र शिवून आपल्यासाठी वस्त्र तयार केले.

     मग महान परमेश्वराने सापाला सांगितले, "तू हे जे केले आहेस त्यामुळे तू सर्व गुराढोरांहून आणि वन्य पशुपक्ष्यांहून अधिक शापित होशील. तू आपल्या पोटावर सरपटत राहशील आणि जन्मभर माती खात राहशील. मी तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या वंशात व तिच्या वंशात वैर निर्माण करून ठेवीन. माणूस तुझे डोके ठेवील आणि तू त्याच्या टाचेला चावा घेशील" मग त्याने स्त्रीला सांगितले की, "मी तुझे दुःख आणि गर्भधारण खूप वाढवीन तू दुःखाने लेकरे प्रसवशील, तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर प्रभुत्व गाजवील. 'मग तो आदमला म्हणाला, "तू आपल्या पत्नीचे सांगणे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस असे मी सांगितले होते त्या झाडाचे फळ तू खाल्लेस. म्हणून भूमी तुझ्यासाठी शापित झाली आहे. जन्मभर कष्ट करून तिचे फळ खाशील. ती तुझ्यासाठी काटेकुटे उगवील आणि तू शेतीतील भाजीपाला खाशील" -तौरेत उत्पत्ति० पर्व० ३। आ० १। २। ३। ४। ५। ६। ७। १४। १५। १६। १७। १८।।

(समीक्षक) ख्रिस्ती लोकांचा ईश्वर सर्वज्ञ असता तर त्याने या लबाड सापाला म्हणजे सैतानाला का निर्माण केले असते? असा दुष्ट सैतान या ईश्वराने निर्माण केला तो ईश्वरच त्या गुन्ह्याचा वाटेकरी आहे. कारण त्याने त्याला दुष्ट बनविले नसते तर त्याने दुष्टपणा कशाला केला असता? आणि जर तो पूर्वजन्म मानीत नाही तर काही अपराध नसताना त्याला त्याने पापी का बनविले ? खरे म्हणाल तर तो साप नव्हताच. तो मनुष्यच होता. कारण तो मनुष्य नसता तर तो माणसाची भाषा कशी बोलू शकला असता? जो स्वत: खोटा असतो व इतरांना खोटया मार्गाने नेतो त्याला सैतान म्हटले पाहिजे. वस्तुत: येथे सैतान सत्यवादी होता आणि म्हणून त्याने त्या स्त्रीची दिशाभूल केलेली नव्हती. उलट त्याने खरे तेच सांगितले होते, आणि ईश्वराने आदम व हव्वा (ईव्ह) यांना असे खोटेच सांगितले होते की, "तुम्ही या झाडाचे फळ खाल तर मराल" तो वृक्ष ज्ञानदाता आणि अमर बनविणारा असताना त्याचे फळ खाण्याची मनाई ईश्वराने का केली? ज्याअर्थी त्याने ते फळ वर्ज्य


ठरविले त्याअर्थी तो ईश्वर खोटा आणि दिशाभूल करणारा ठरतो. कारण त्या वृक्षाची फळे माणसाला ज्ञान व सुख देणारी होती, अज्ञानदायक व मृत्युकारक नव्हती. ईश्वराने त्या वृक्षाचे फळ खाण्यास बंदी केली होती. त्याला तसे करावयाचे होते तर त्याने त्या वृक्षाची उत्पत्तीच कशाला केली होती ? ती जर त्याने स्वतःसाठी केली असेल तर तो अज्ञानी मर्त्य होता काय ? आणि जर ती दुसऱ्यांसाठी केली असेल तर त्या वृक्षाचे फळ खाण्यात कसलाच अपराध नव्हता. आजकाल कोणताच वृक्ष ज्ञानदायक व मृत्युनिवारक असल्याचे पाहण्यात येत नाही. ईश्वराने त्या वृक्षाचे बीजही नष्ट करून टाकले काय? असल्या गोष्टी करणारा माणूस लबाड व कपटी ठरतो. मग ईश्वरही तसाच का ठरू नये? कारण जो इतरांना फसवितो व ढोंगबाजी करतो तो कपटी व ढोंगी होईल. मग ईश्वरालाही कपटी व ढोंगी का म्हणू नये? शिवाय त्याने त्या तिघांना त्यांचा काहीच अपराध नसताना शाप दिला. त्यामुळे ईश्वर अन्याय करणाराही ठरला. खरे तर हा शाप ईश्वरालाच लागला पाहिजे. कारण तो खोटे बोलला होता व त्याने त्यांची दिशाभूल केली होती. अशी ही त्यांची फिलॉसॉफि! पूर्वी वेदनेशिवाय गर्भधारणा आणि मुलाचा जन्म होऊ शकत होतो काय? श्रम केल्याखेरीज कोणीतरी आपली उपजीविका चालवू शकतो काय? पूर्वी काटेकुटे असणारी झाडे नव्हती काय? आणि ईश्वराच्या सांगण्याप्रमाणे भाजीपाला खाणे हे सर्व माणसांच्या बाबतीत उचित होते तर बायबलाच्या उत्तरार्धात मांसाहाराविषयी जे लिहिले आहे ते खोटे ठरत नाही काय? ते खरे असेल तर आधी लिहिलेले हे खोटे ठरते. आदमचा कोणताच अपराध सिद्ध होत नसताना ख्रिस्ती लोक असे का म्हणतात की आदमच्या अपराधामुळे त्याची संतती असणारी सारी मानवजात पापी आहे? असला मतग्रंथ व असला ईश्वर बुद्धिमंतांना कधी तरी मान्य होऊ शकेल काय? ॥७॥

(८) आणि महान परमेश्वर म्हणाला, “पाहा! मनुष्य बरेवाईट जाणण्याच्या बाबतीत आमच्यापैकीच एक झाला." आणि आता असे होऊ नये की, त्याने आपल्या हाताने जीवनरूपी झाडाचे फळ तोडून खावे आणि अमर व्हावे म्हणून ईश्वराने त्याला बाहेर हाकलून दिले आणि एडनच्या बागेच्या पूर्व दिशेस जीवनवृक्षाच्या रखवालीसाठी देवदूत तैनात केले आणि सर्व दिशांना सतत फिरत राहणारी चकाकती तलवार त्या वृक्षाच्या वाटेवर ठेवली.  -तौरेत उत्पत्ति पर्व० ३। आ० २२। २४।।

(समीक्षक) बरे! ज्ञानाच्या बाबतीत आदम आपल्या तोडीचा बनला याबद्दल ईश्वराला अशी ईर्ष्या व भ्रम का झाला? ती काय वाईट गोष्ट होती? अशी शंकाच त्याला का आली? कारण ईश्वराच्या तोडीचा कोणीही कधीही होऊ शकत नाही. परंतु या लिखाणावरून असेही सिद्ध होऊ शकते की तो ईश्वर नसून विशेष मनुष्य होता. बायबलामध्ये जेथे-जेथे ईश्वराचा उल्लेख येतो तेथे-तेथे तो माणूस असल्यासारखाच लिहलेला आहे. आता पाहा, आदमच्या ज्ञानात वृद्धी होणार या कल्पनेने ईश्वर किती दु:खी झाला! आणि त्याने त्या अमर वृक्षाचे फळ खाल्ले याबद्दल ईश्वराला त्याचा किती हेवा वाटला! त्याने आदमला प्रथम जेव्हा त्या बागेत ठेवले तेव्हा त्याला हे भविष्यज्ञान नव्हते.म्हणून ख्रिस्ती लोकांचा ईश्वर सर्वज्ञ नव्हता असे म्हणावे लागते. तसेच त्याने चमचमत्या तलवारीचा पहारा ठेवला.हे कामही माणसाचे आहे. ईश्वराचे नाही. ॥८॥

(९) आणि कालांतराने काइन हा शेतकरी बनल्यावर भूमीतून पैदा केलेल्या फळापैकी काही फळे

9
परमेश्वराला अर्पण करण्यासाठी घेऊन आला आणि आबेल हा मेंढपाळ बनल्यावर आपल्या मेंढरांपैकी नुकत्याच जन्मलेल्या धष्टपुष्ट कोकरांपैकी एक कोकरू परमेश्वराला अर्पण करण्यासाठी घेऊन आला. (काइन व आबेल हे दोघे भाऊ आदम व हव्वा यांची मुले होती. पुढे काइने आबेलला ठार मारले.) परमेश्वराने आबेलचा आदरसत्कार करून त्याची भेट स्वीकारली. परंतु काइन आणि त्याची भेट यांचा आदर त्याने केला नाही. त्यामुळे काइन फार रागावला आणि त्याचा चेहरा उतरला. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, "तु का रागावलास? आणि तुझे तोंड का उतरले?" -तौरेत उत्पत्ति पर्व० ४। आ० ३। ४। ५। ६।।

(समीक्षक) ईश्वर मांसाहारी नसता तर मेंढराची भेट त्याने का स्वीकारली असती? आणि आबेलचा सत्कार, तसेच काइनचा व त्याच्या भेटीचा तिरस्कार का केला? अशा प्रकारे त्यांच्यात भांडण लागल्यास आणि आबेलच्या मृत्यूला ईश्वरच कारणीभूत झाला आणि सामान्य माणसे जशी आपसात बोलतात तसेच हे ख्रिस्ती लोकांच्या ईश्वराचे बोलणे आहे. बाग तयार करणे व तेथे येणे-जाणे हेही माणसाचेच काम आहे यावरून हे स्पष्ट होते की हे बायबल ईश्वराने रचलेले नसून माणसांनी लिहिलेले आहे. ॥९॥

(१०) जेव्हा परमेश्वराने काइनला विचारले की, "तुझा भाऊ आबेल कोठे आहे?" तेव्हा तो म्हणाला, "मला माहीत नाही. मी माझ्या भावाचा राखणदार आहे की काय?" तेव्हा ईश्वर म्हणाला, "तू काय केलेस हे? तुझ्या भावाचे रक्त शब्द बनून मला जमिनीतून हाका मारीत आहे. आता तू पृथ्वीकडून शापित झाला आहेस."-तौरेत उत्पत्ति पर्व० ४। आ० ९। १०। ११।।

(समीक्षक) काइनला विचारल्याशिवाय ईश्वराला आबेलची हकीकत माहित नव्हती? आणि रक्ताचा शब्द बनून तो कधी कोणाला हाक मारू शकतो काय? या सगळ्या अज्ञानीयांच्या गोष्टी आहेत. म्हणूनच हे पुस्तक ईश्वराने किंवा विद्वानाने रचलेले असू शकत नाही. ॥१०॥

(११) आणि मेथूसलहच्या जन्मांनतर त्याचा बाप ईनक (हनोख) तीनशे वर्षे ईश्वराबरोबर चालत राहिला. -तौरेत उत्पत्ति पर्व० ५। आ० २२।।

(समीक्षक) वाह रे वा ख्रिस्ती लोकांचा ईश्वर मानव नसता तर ईनक त्याच्या बरोबर कसा चालू शकला असता? म्हणून (ख्रिस्ती) लोक वेदोक्त निराकार ईश्वरालाच मानतील तर त्यांचे कल्याण होईल॥११॥

(१२) आणि मग असे झाले की जेव्हा माणसे पृथ्वीवर वाढू लागली आणि त्यांना मुली झाल्या तेव्हा ईश्वराच्या पुत्रांनी मानवाच्या कन्या पाहिल्या. त्या सुंदर आहेत असे पाहून त्यांच्यापैकी त्यांना ज्या पसंत पडल्या त्यांच्याशी त्यांनी लग्ने केली. त्या काळी पृथ्वीवर त्यावेळी दानव होते आणि त्यानंतरही, जेव्हा ईश्वराच्या पुत्रांचा मानवाच्या कन्यांशी संबंध जुळून आला तेव्हा त्यांना मुले झाली. ती बलबान झाली. पूर्वीच्या काळी जे प्रख्यात लोक होते तेच हे. ईश्वराने असे पाहिले की पृथ्वीवर माणसाची दुष्टता फार वाढली आहे आणि त्यांच्या मनांतील विचार व भावना या सदैव फक्त वाईटच असतात. तेव्हा माणसाला पृथ्वीवर उत्पन्न केल्याबद्दल परमेश्वर पस्तावला आणि त्याला फार दु:ख झाले. मग परमेश्वर म्हणाला की, ज्या माणसाला मी उत्पन्न केले त्या

10
माणसापासून पशु, सरपटणारे प्राणी व आकाशात उडणारे पक्षी यांच्यापर्यंत सर्वांना मी पृथ्वीवरून नष्ट करून टाकीन. कारण त्यांना निर्माण केल्याबद्दल मला पश्चाताप होत आहे. -तौन पर्व० ६। आ० १। २। ३। ४। ५। ६।।

(समीक्षक) खिश्चनांना विचारले पाहिजे की, "ईश्वराचे पुत्र कोण आहेत?" आणि ईश्वराची बायको, सासू सासरा, मेहुणा आणि नातेवाईक कोण आहेत? कारण ईश्वराच्या पुत्रांनी मानवांच्या कन्यांशी विवाह केल्यामुळे ईश्वर त्यांचा व्याही झाला; आणि त्यांच्यापासून झालेली मुले ही ईश्वराची नातवंडे झाली. अशा गोष्टी ईश्वराच्या बाबतीत खऱ्या असू शकतात काय? आणि ईश्वरी ग्रंथात त्यांना स्थान असू शकते काय ? यावरून हेच सिद्ध होते की अशा जंगली लोकांनी बायबल रचले आहे, जो सर्वज्ञ नाही व ज्याला भविष्यकाळाचे ज्ञान नाही तो ईश्वर असूच शकत नाही. तो जीव आहे. जेव्हा त्याने सृष्टी बनविली तेव्हा कालांतराने माणसे दुष्ट बनतील हे त्याला कळले नाही काय ? तसेच पस्तावणे, अत्यंत दु:खी होणे, चुकीचे कृत्य करून नंतर पश्चात्ताप करणे वगैरे गोष्टी खिश्चनांच्या ईश्वराच्या बाबतीतच घडू शकतात. वेदोक्त ईश्वराच्या संबंधात त्या घडू शकत नाहीत. यावरून हेही सिद्ध होऊ शकते की ख्रिस्ती लोकांचा ईश्वर पूर्ण विद्वान योगीही नव्हता. नाहीतर मन:शांती व ज्ञान यांच्या साह्याने तो दुःखशोकापासून अलिप्त राहू शकला असता. अहो, पशुपक्षीही दुष्ट झाले. तो ईश्वर सर्वज्ञ असता तर त्याला असा विषाद का झाला असता त्याचे कारण एवढेच की तो ईश्वर नव्हता आणि म्हणून बायबल हा ईश्वरकृत ग्रंथ नाही. वेदोक्त परमेश्वर हा सर्व पापे, क्लेश, दु:खे, शोक इत्यादीपासून मुक्त असून तो ‘सच्चिदानंदस्वरूप आहे. त्याला ख्रिस्ती लोकांनी मानले असते अथवा अजूनही मानतील तर ते आपला मनुष्यजन्म सफल बनवू शकतील. ॥१२॥

नोहाची नौका

(१३) त्या नौकेची लांबी ३०० हात, रुंदी ५० हात आणि ऊंची ३० हात असावी. तू त्या नौकेतून जाशील. तुझ्याबरोबर तुझी मुले, तुझी पत्नी आणि तुझ्या मुलांच्या बायका असतील आणि साऱ्या प्राण्यांच्या जातीपैकी प्रत्येकी दोन जिवंत प्राण्यांना आपल्याबरोबर नौकेत घे. त्यायोगे तेवढे प्राणी तुझ्याबरोबर जिवंत राहतील. दोन प्राण्यांपैकी एक नर व एक मादी असावी. पक्ष्यांच्या एकेका जातीतून गुरांच्या एकेका जातीतून आणि पृथ्वीवर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी असे दोन-दोन प्राणी जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील. तू स्वतःसाठी आहाराची सर्व सामग्री जमवून ठेव. तिचा उपयोग तुला व त्या प्राण्यांना खाण्यासाठी होईल. ईश्वराच्या या आज्ञेप्रमाणे नूह (नोहा) ने सर्व काही केले.-तौरेत उत्पत्ति पर्व० ६। आ० १५। १८। १९। २०। २१। २२।।

(समीक्षक) अशा ज्ञानविरोधी व अशक्य गोष्टी सांगणाऱ्याला कोणीही विद्वान माणूस ईश्वर मानू शकेल काय? कारण एवढ्या मोठ्या, लांब, रुंद व उंच नावेत हती-हत्तीण, उंट-उंटीण (सांडणी), वगैरे कोट्यावधी प्राणी आणि त्यांच्या खाण्यापिण्याचे पदार्थ व नोहाचे सगळे कुटुंब या सर्वांचा समावेश होणे शक्य आहे काय? म्हणूनच हे पुस्तक मनुष्यकृत आहे आणि ज्याने लिखाण केले तो विद्वानही नव्हता.॥१३॥

(१४) मग मोहाने परमेश्वरासाठी एक वेदी तयार केली आणि सर्व पशुपक्ष्यांमधील शुद्ध (पवित्र) प्राणी

11
घेऊन त्या वेदीवर त्यांचा होम केला. (त्यांना बळी दिले)... त्या सुगंधाने परमेश्वर प्रसन्न झाला आणि तो आपल्या मनात म्हणाला, “माणसासाठी मी पृथ्वीला (भूमीला) पुनः कधी शाप देणार नाही. कारण माणसाच्या मनातील भावना त्याच्या बालीशपणाने वाईट आहे आणि ज्याप्रमाणे मी सर्व प्राण्यांना आता मारले आहे त्याप्रमाणे पुन: कधी मारणार नाही." -तौरेत उत्पत्ति पर्व० ८। आ० २०। २१ ।।

(समीक्षक) वेदी बनविणे व होम करणे या विधीच्या उल्लेखावरून या गोष्टी वेदांतून बायबलाने घेतल्या आहेत. परमेश्वराने सुगंध घेतला, याचा अर्थ त्याला नाकही आहे काय? (ख्रिस्ती) लोकांचा हा ईश्वर कधी शाप देतो तर कधी पस्तावतो. म्हणजे तो माणसासारखा अल्पज्ञच नाही काय? तो कधी म्हणतो की मी आता शाप देणार नाही. पूर्वी शाप दिला होता आणि पुन: देणार. प्रथम सर्वांना मारून टाकले आणि आता म्हणतो की आता कधीच मारणार नाही !!! हा सारा पोरकटपणा आहे. ईश्वर किंवा एखादा विद्वान असे बोलत नसतो. कारण विज्ञानाची सुद्धा गोष्ट आणि निश्चय स्थिर असतो.॥१४॥

(१५) आणि ईश्वराने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्ही सफल व्हा;आणि आपली संख्या खूप वाढवून तिने पृथ्वी भरून टाका. हालचाल करणारा प्रत्येक जीवजंतू तुमच्यासाठी खाद्य पदार्थ होईल. मी तुम्हाला हिरव्या पालेभाज्यांसारख्या सर्व वस्तू दिल्या आहेत. मात्र ज्या मांसात जीव आहे ते, म्हणजे रक्तासहित मांस खाऊ नका." -तौरेत उत्पत्ति पर्व० ९। आ० १। २। ३। ४।।

(समीक्षक) एकाला प्राणकष्ट देऊन दुसऱ्यांना आनंद देणारा हा खिश्चनांचा ईश्वर निर्दयी ठरत नाही काय? जे आईबाप एका मुलाला मारून दुसऱ्या मुलाला खाऊपिऊ घालतात ते महापापी नसतात काय? तशीच ही गोष्ट आहे. कारण ईश्वराच्या दृष्टीने सर्वच प्राणी मुलांसारखे आहेत. परंतु ख्रिस्त्यांचा ईश्वर तसा नसल्यामुळे तो कसायाचे काम करतो आणि त्यानेच सर्व माणसांना हिंसक बनविले आहे. म्हणून खिश्चनांचा ईश्वर निर्दय असल्याने पापी ठरत नाही काय?॥१५॥

(१६) आणि सर्व पृथ्वीवर एकच भाषा व एकच बोली होती...मग ते म्हणाले, "या! आपण जगभर पांगून जाऊ नये व आपले नाव व्हावे यासाठी आपण एक नगर वसवू या आणि ज्याचे शिखर स्वर्गाला जाऊन भिडेल असा मनोरा बांधू या." माणसाची मुले जे नगर व मनोरा बांधीत होती ते पाहण्यासाठी परमेश्वर खाली उतरला. मग परमेश्वर म्हणाला, "पाहा ! हे लोक एकच आहेत आणि त्या सर्वांची भाषा एकच आहे. त्यांनी असे काम करावयास सुरुवात केली आहे. म्हणून ते जे काही मनात योजतील ते केल्याशिवाय राहाणार नाहीत. चला! आपण खाली उतरू आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण करू. त्यामुळे त्यांना एकमेकांचे बोलणे कळणार नाही. मग परमेश्वराने त्यांना सर्व पृथ्वीवर विखरून टाकले आणि त्यांनी ते नगर वसविण्याचे काम सोडून दिले. -तौरेत उ० पर्व० ११। आ० १। ४। ५। ६। ७। ८।।

(समीक्षक) जेव्हा संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर एकच भाषा बोलली जात असेल तेव्हा सर्व माणसे परस्परांशी अत्यंत आनंदाने वागत असतील. परंतु काय करणार? या खिस्त्यांच्या मत्सरी ईश्वराने सर्वांच्या भाषेत गोंधळ निर्माण करून सर्वांचा सत्यानाश केला! खरोखर त्याने हा मोठाच अपराध केला. सैतानाच्या कृत्याहून हे कृत्य

12

अधिक नीचपणाचे नाही काय? यावरून हेही लक्षात येते की ख्रिस्ती लोकांचा ईश्वर सिनाई नावाच्या पर्वतावर राहत होता; आणि जीवांचे कल्याण व्हावे अशी त्याची इच्छा नव्हती. ईश्वराची गोष्ट जाऊ द्या, कोणीही शाहणा माणूस असे करणार नाही आणि बायबल हा ईश्वरी ग्रंथ का होऊ शकतो. ॥१६॥

(१७) मग तो आपली पत्नी सराइ (सारा) हिला म्हणाला, "हे पाहा. तू दिसायला सुंदर आहेस हे मला माहीत आहे. म्हणून जेव्हा मिसरी (ईजिप्तचे) लोक तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील की ही याची बायको आहे" आणि ते मला मारून टाकतील पण तुला जिवत ठेवतील.. तेव्हा त्यांना असे सांग की, "मी याची बहीण आहे. त्यायोगे तुझ्यामुळे माझे भले होईल आणि तुझ्या कारणाने माझे प्राण वाचतील -तौन उ० पर्व० १२। आ० ११। १२। १३।।

(समीक्षक) आता तुम्हीच पाहा! असे बोलणारा अब्राहम हा ख्रिस्ती व मुसलमान लोकांचा मोठा पैगंबर समजला जातो. त्याची कृत्ये असत्य भाषणादी वाईट आहेत. ज्यांचे पैगंबर असे असतील त्यांना ज्ञानाचा किंवा कल्याणाचा मार्ग कसा सापडणार? ॥१७॥

(१८) आणि ईश्वराने अब्राहमला सांगितले "तू आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशातील लोक पिढ्यान् पिढ्या माझा करार पाळाल.. माझा तुझ्याशी व तुझ्यानंतर तुझ्या वंशातील इतर लोकांशी झालेला करार तुम्ही सर्वांनी पाळावा. तो असा की तुमच्यापैकी प्रत्येक पुरुषाची सुंता करण्यात यावी... आणि तुम्ही तुमच्या शिश्नाच्या टोकाचे कातडे कापून टाका. ती तुमच्या माझ्यामधील कराराची खूण असेल., आणि पिढ्यान् पिढ्या तुमच्यांतील प्रत्येक पुरुषाची जन्मल्यानंतर आठव्या दिवशी सुंता करावी. ते मूल घरात जन्मलेले असो किंवा परक्या माणसाकडून विकत घेतलेले, तुझ्या रक्ताचे नसलेले असो, त्याची सुंता अवश्य करावी. जो तुझ्या घरात जन्मला असेल आणि तुझ्या पैशांनी विकत घेतलेला असेल त्याचीही सुंता अवश्य करावी. म्हणजे माझा हा करार तुमच्या मांसामध्ये कायमचा टिकून राहील... सुंता न केलेला मुलगा, ज्याच्या शिश्नाच्या टोकाचे कातडे कापलेले नाही असा जीव आपल्या लोकांपासून तुटला जाईल, कारण त्याने माझा करार मोडला आहे"-तौन उ० पर्व० १७। आ० ९। १०। ११। १२। १३। १४।।

(समीक्षक) आता पाहा, ईश्वराची ही आज्ञा किती विचित्र व अनैसर्गिक आहे! ईश्वराला सुंता अभिप्रेत असती तर त्याने मुळातच शिश्राच्या टोकावर कातडे निर्माण केले नसते. ज्याअर्थी त्याने ते निर्माण केले आहे त्याअर्थी ते शिश्नाग्राच्या रक्षणासाठी आहे. डोळ्यांवरील पापणीचे कातडे जसे डोळ्यांच्या रक्षणासाठी असते तसेच हे आहे. कारण ते गुप्तस्थान अत्यंत नाजुक आहे. त्याच्यावर कातडे नसते तर एखादी मुंगी चावल्याने किंवा थोडीशी इजा झाल्याने फारपीडा झाली असती. शिवाय लघवी केल्यानंतर मूत्राचे शेवटचे थेंब कपड्याला लागू नयेत वगैरे कारणांसाठी ते कातडे आहे. ते कापणे वाईट आहे. जर हा ईश्वरी करार होता तर ख्रिस्ती लोकांनी तो का मोडला ? ते आता सुंता का करीत नाहीत? ही आज्ञा नेहमीसाठी आहे. तिचे पालन न केल्याने या ग्रंथातील एक शब्दही खोटा नाही, अशी जी साक्ष येशूने दिली होती की व्यवस्था पुस्तकातील एक बिंदु ही असत्य नाही, ती खोटी ठरते. येशूची ही प्रतिज्ञा खरी की खोटी याचा विचारही ख्रिस्ती लोक करीत नाहीत. ॥१८॥

13

(१९) नंतर अब्राहमशी बोलणे संपवून ईश्वर त्याच्यापासून वर गेला. -तौन उ० पर्व० १७। आ० २२।।
(समीक्षक) यावरून असे सिद्ध होते की ख्रिस्त्यांचा देव माणसासारखा किंवा पक्ष्यासारखा होता.तो वरून खाली व खालून वर जात-येत होता. बहुधा तो कुणी जादूगाराच होता, असे दिसते. ॥१९॥

ईश्वराने मांसाहार केला

(२०) नंतर त्याला परमेश्वर ममरेच्या मैदानात दिसला. तो दुपारच्या उन्हाच्या वेळी आपल्या तंबूच्या दारात बसला होता.... तो आपली दृष्टी वर करून पाहतो तो काय, त्याच्या जवळ तीन माणसे उभी होती. त्यांना पाहताच तो आपल्या तंबूच्या दारातून उठून त्यांना भेटावयासाठी त्यांच्याकडे धावत गेला आणि त्याने जमिनीपर्यंत वाकून त्यांना प्रणाम केला.... आणि म्हणाला, "हे माझ्या प्रभु! आता तुमची कृपादृष्टी माझ्यावर झाली असेल तर तुम्हांला अशी विनंती करतो की या दासाला सोडून जाऊ नका. तुमची इच्छा असेल तर मी थोडे पाणी आणतो. त्याने तुम्ही आपले पाय धुवा आणि झाडाखाली विश्रांती घ्या. मग मी भाकरीचा एक तुकडा आणीन. ती खाऊन तुम्ही तृप्त व्हा. नंतर पुढे जा. कारण यासाठीच तुम्ही या दासाजवळ आला आहात."... तेव्हा ते म्हणाले, "तू बोलतोस तसे कर.".. आणि अब्राहम घाईघाईन तंबूत असलेल्या साराकडे गेला आणि म्हणाला, ‘घाई कर आणि तीन मापे सपीठ लवकर तयार करून ते मळून पोळ्या तयार कर."..नंतर अब्राहम गुरांच्या कळपाकडे धावत गेला आणि एक चांगले कोवळे लुसलशीत वासरू निवडून त्याने ते चाकराकडे दिले. त्यानेही ते चटकन कापून साफसूफ केले. मग त्याने लोणी, दूध व शिजविलेले वासरू त्यांच्यासमोर आणून ठेवले आणि तो त्यांच्या जवळच झाडाखाली उभा राहिला आणि त्यांनी ते खाल्ले. -तौन पर्व० १८। आ० १। २। ३। ४। ५। ६। ७। ८।।

(समीक्षक) आता तुम्ही विचार करा, सज्जनांनो! ज्यांचा ईश्वर वासराचे मांस खातो त्याचे उपासक गायी, वासरे पशूंना खाल्ल्याशिवाय का सोडतील? ज्याला मुळीच दयामाया नाही, जो मांस खाण्यास आतुर असतो तो ईश्वर कसा असू शकेल ? ईश्वराबरोबर जी दोन माणसे होती ती कोण होती कोण जाणे! बहुधा समजते की ते जंगली माणसांचे टोळके असावे. त्यांचा जो म्होरक्या होता त्याचे गाव बायबलमध्ये ईश्वर असे ठेवले असावे. या गोष्टीमुळेच बुद्धिमंत लोक बायबल हे ईश्वरकृत पुस्तक आहे असे मानू शकत नाहीत आणि अशा ईश्वराला ईश्वर समजत नाहीत. ॥२०॥

(२१) मग परमेश्वराने अब्राहमला विचारले, "सारा असे म्हणून का हसली की, मी म्हातारी असूनही मला नक्की मूल होईल काय?" परमेश्वराला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? -तौन पर्व० १८। आ० १३। १४।।
(समीक्षक) आता ख्रिस्त्यांचा ईश्वराचा हा पोरकटपणा तुम्हीच पाहा. तो मुलांसारखा व स्त्रियांसारखा चटकन चिडतो आणि साराला टोमणे मारतो!!! ॥२१॥

(२२) तेव्हा परमेश्वराने सोडोम व गोमोरा या शहरांवर स्वर्गातून गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला. आणि ती शहरे, त्यात राहणारे सारे नागरिक, सगळी मैदाने आणि जे काही भूमीतून उगवले होते त्याचा त्याने नाश केला. -तौन उत्प० पर्व० १९। आ० २४। २५।।

14
(समीक्षक) बायबलातील ईश्वराची ही लीलाही आता पाहा. त्याला मुलाबाळांचीही दया आली नाही. त्याने जमीन उलटवून तिच्याखाली त्या सर्वांना गाडून, मारून टाकले. ते सगळेच अपराधी होते काय? ही गोष्ट न्याय, दया व विवेक यांच्या विरुद्ध आहे. ज्यांचा ईश्वर असली कृत्ये करतो त्याचे उपासक तशी कृत्ये का करणार नाहीत?॥२२॥

मुलीशी बापाचा संभोग

(२३) "चल, आपण दोघी आपल्या बापाला द्राक्षाची दारू पाजू आणि त्याच्याजवळ झोपू आणि आपल्या बापाचे बीज सुरक्षित ठेवू" त्याप्रमाणे त्या रात्री त्या दोघींनी आपल्या बापाला दारू पाजली. मग थोरली मुलगी बापापाशी जाऊन निजली. दुसया दिवशी थोरली म्हणाली, “आज रात्रीही आपण आपल्या बापाला दारू पाजू.मग तू त्याच्या कुशीत जाऊन झोप. अशा प्रकारे आपण आपल्या बापाचे बीज जतन करून ठेवू" त्याप्रमाणे लूथच्या दोन्ही मुली आपल्या बापापासून गरोदर राहिल्या. -तौन उत्प० पर्व० १९। आ० ३२। ३३। ३४। ३६।।

(समीक्षक) पाहा ! ज्या दारूच्या नशेत बाप व मुलगी असले कुकर्म करण्यापासून परावृत्त होऊ शकत नाहीत असली दुष्ट दारू जे ख्रिस्ती लोक पितात त्यांच्या दुष्कृत्यांचा काय पारावार आहे ? म्हणून सज्जनांनी मद्यपानाचे नाव देखील घेऊ नये. ॥२३॥

(२४) आणि आपण सांगितल्याप्रमाणे परमेश्वराने साराची भेट घेतली आणि त्याने वचन दिले होते तसे त्याने साराच्या बाबतीत केले आणि सारा गरोदर राहिली. -तौन उत्प० पर्व० २१। आ० १। २।।
(समीक्षक) आता विचार करा. साराची भेट घेऊन तिला गरोदर केली. हे कसे घडले ? सारा आणि परमेश्वर या दोघांशिवाय तिसरा कोणी गर्भधारणेला कारणीभूत झालेला दिसतो काय ? सारा ही परमेश्वराच्या कृपेनेच गरोदर राहिली असे दिसून येते. ॥२४॥

(२५) मग अब्राहमने भल्या पहाटे उठून भाकरी व पाण्याची पखाल घेतली व ती हाजिराच्या खांद्यावर ठेवली आणि मुलगाही तिच्या स्वाधीन करून तिला रवाना केले.... तिने त्या मुलाला एका झुडुपात टाकून दिले.. आणि ती त्याच्या समोर बसून जोरजोरात आक्रोश करू लागली...तेव्हा ईश्वराने त्या मुलाचा शब्द ऐकला. -तौन उत्प० पर्व० २१। आ० १४। १५। १६। १७।।

(समीक्षक) आता पाहा ! ख्रिस्ती लोकांच्या ईश्वराची लीला, साराचा पक्ष घेऊन त्याने हाजिराला तेथून हाकलून लावले. जोरजोरात आक्रोश केला हाजिराने आणि देवाने शब्द ऐकला मुलाचा. ही किती विचित्र गोष्ट आहे. बहुधा हे मुलाचेच रडणे असावे असा ईश्वराला भ्रम झाला असावा. असला हा प्राणी कधी ईश्वर असू शकेल काय ? आणि बायबल हा ईश्वरी ग्रंथ होऊ शकतो काय ? त्या पुस्तकात सामान्य माणसाच्या वचनाशिवाय दुसरे काही नाही. त्यात थोडेसे सत्य पण सर्व नरर्थक गोष्टीच भरल्या आहेत. ॥२५॥

(२६) आणि या गोष्टीनंतर असे झाले की ईश्वराने अब्राहमची परीक्षा पाहिली आणि त्याला म्हटले की, "हे अब्राहम.... इसहाक या तुझ्या एकुलत्या पुत्रावर तू खूप प्रेम करतोस. त्याला घेऊन ते मोरिया देशात जा

15
आणि तेथील मी सांगेन त्या एका डोंगरावर त्याचा होम कर". त्याप्रमाणे अब्राहमने आपला मुलगा इसहाक याला बांधून लाकडाच्या वेदीवर ठेवले... मग अब्राहमने हातात सुरा घेऊन आपल्या मुलावर त्याचा वार करण्यासाठी त्याने हात वर उचलला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून त्याला ओरडून सांगितले की, "अब्राहम, अब्राहम ! तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस. त्याला काही करू नकोस. कारण तू ईश्वराला भितोस हे आता मला समजले आहे" -तौन उत्प० पर्व० २२। आ० १। २। ९। १०। ११। १२।।

(समीक्षक) आता स्पष्ट झाले की हा बायबलातील ईश्वर सर्वज्ञ नसून अल्प आहे आणि अब्राहमही एक भोळाभाबडा माणूस होता. तसे नसते तर त्याने जे केले ते केले नसते आणि जर बायबलातला ईश्वर सर्वज्ञ असता तर अब्राहमच्या भविष्यातील श्रद्धेचे ज्ञान जाणले असते. यावरून ख्रिस्त्यांचा ईश्वर सर्वज्ञ नाही याची खात्री पटते. ॥२६॥

(२७) म्हणून तुम्ही आमच्या कबरीपैकी एक निवडून तिच्यात तुम्ही आपल्या मृतव्यक्तीला पुरा... परंतु तुम्ही मृत माणसाला पुरावे हे बरे. -तौन उत्प० पर्व० २३। आ० ६।।
(समीक्षक) प्रेते पुरण्याने जगाचे फार नुकसान होते. कारण ती कुजून वातावरण दुर्गधयुक्त होते आणि रोग पसरतात.

(प्रश्न) पाहा! ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याला जाळणे ही चांगली गोष्ट नाही. प्रेताला पुरणे म्हणजे जणू त्याला झोपविण्यासारखे असते. म्हणून प्रेत पुरणेच योग्य होय.
(उत्तर) प्रेतावर तुमचे इतके प्रेम असेल तर ते आपल्या घरातच का ठेवून घेत नाही? आणि ते पुरता तरी कशाला? ज्या जीवात्म्यावर प्रेम होते तो तर निघून गेला. आता दुर्गधी मातीवर कसले प्रेम? आणि त्याच्यावर तुम्ही प्रेम करता तर त्याला जमिनीत कशाला पुरता? कारण एखाद्याला कोणी म्हटले की, "मी तुला जमिनीत पुरून टाकतो" तर ते ऐकून तो कधीच आनंदित होत नाही. त्याचे तोंड, डोळे, शरीर यांवर माती, दगडविटा, चुना टाकणे, छातीवर भला मोठा दगड ठेवणे हे काय प्रेमाचे लक्षण म्हणावयाचे? आणि पेटीत घालून पुरल्याने दुर्गध निर्माण होतो तो जमिनीतून बाहेर पडून सारे वातावरण दूषित करतो; आणि त्यातून भयंकर रोग निर्माण होतात. दुसरी गोष्ट अशी की एक प्रेत पुरण्यासाठी कमीत कमी ६ हात लांब व ४ हात सुंद जमीन लागते. या हिशेबाने शेकडो, हजारो, लाखो किंवा करोडो माणसांसाठी कितीतरी जमीन निष्कारण गुंतून पडते. ती शेत, बाग किंवा वसाहत करण्यासाठी वापरता येत नाही. म्हणून प्रेत पुरणे ही सर्वात अधिक वाईट गोष्ट आहे तिच्याहून थोडी कमी वाईट गोष्ट म्हणजे प्रेत पाण्यात टाकणे ही होय. कारण पाण्यातील जलचर जरी ते ताबडतोब फाडून खात असले तरी त्याची हाडे व इतर घाण पदार्थ पाण्यातच राहतात आणि तेथे त्या कुजून जगाच्या दुःखाला कारणीभूत होतात. त्याहून आणखी थोडी कमी वाईट गोष्ट प्रेत जंगलात नेऊन टाकणे ही होय. तेथील मांसाहारी पशुपक्षी ते प्रेत फाडून खातील. तथापि त्याची हाडेहाडांतील मजा व इतर घाण पदार्थ सर्वत्र पसरेल व तेवढ्या प्रमाणात जगाचे अकल्याणच होईल. म्हणून प्रेत जाळणे ही सर्वोत्तम गोष्ट होय. कारण त्यायोगे शरीरातील सर्व पदार्थ अणुरेणू बनून हवेत उडून जातील.

16
(प्रश्न) प्रेत जाळण्यानेही दुर्गंध पसरतो.
(उत्तर) जर ते अशास्त्रीय पद्धतीने जाळले तर थोडा दुर्गंध पसरतो. परंतु पुरणे वगैरे क्रियांतून उत्पन्न
होणाऱ्या दुर्गंधापेक्षा तो पुष्कळच कमी असतो. परंतु वेदांत सांगितल्याप्रमाणे प्रेताचे विधिपूर्वक दहन केल्यास
मुळीच दुर्गंध उत्पन्न होणार नाही. वेदात सांगितलेला विधी असा आहे:-

जमिनीमध्ये तीन हात खोल, साडेतीन हात रुंद व पाच हात लांब अशी वेदी (खड्डा) तयार करावी. या वेदीच्या भिंती (बाजू) अशा उतरत्या असाव्यात का तळाशी वेदीची सदी वरच्या संदीच्या निम्मी म्हणजे पावणे दोन हात असावी. त्यात शरीराच्या वजनाइतके तुपघालावे. एका शेराला गुंजभर कस्तुरी व एक मास केशर या हिशेबाने केशर व कस्तुरी त्यात टाकावी. नंतर कमीत कमी अर्धा मण आणि जास्तीत जास्त कितीही चंदनाची लाकडे घालावीत. अगर, तगर, कापूर इत्यादी सुगंधी पदार्थ आणि पळस वगैरेची लाकडे त्या वेदीत भरावीत किंवा रचावीत. त्यावर प्रेत ठेवून पुनः वेदीच्या मुखापासून एक वीतभर उंच लाकडे चारी बाजूनी रचावीत त्यावर तुपाच्या आहुती देऊन अग्नीसंस्कार करावा असे वेदात लिहिले आहे. या पद्धतीने प्रेत जाळल्यास मुळीच दुर्गंध पसरणार नाही. या संस्कारालाच अंत्येष्टी, नरमेध किंवा पुरुषमेध यज्ञ असे नाव आहे. माणूस दरिद्री असला तरी त्याने चितेमध्ये वीस शेराहून कमी तुप घालता कामा नये. त्यासाठी त्याला भीक मागावी लागली तरी हरकत नाही. त्याच्या जातीवाल्यांकडून किंवा राजाकडून त्याला एवढे तूप मिळाले पाहिजे. ते कसेही असले तरी याचप्रकारे दहन करावे. काही कारणाने चंदन, तूप, केशर, कस्तुरी वगैरे पदार्थ मिळू शकले नाहीत तर प्रेत पुरण्यापेक्षा नुसत्या लाकडांनी प्रेताचे दहन करणे उत्तम आहे. कारण सव्वा वीस चौरस वार (गज) जमिनीवर किंवा एका वेदीमध्ये लाखो करोडो प्रेते जाळता येतात. प्रेत पुरल्याने जमीन जशी वाया जाते तशी ती दहनाने वाया जात नाही. शिवाय कबरी किंवा थडगी पाहिली की मनात भीती उत्पन्न होते. म्हणून प्रेते पुरणे वगैरे सर्वथा निषिद्ध होय. ॥२७॥

(२८) माझा मालक अब्राहम याचा ईश्वर धन्य आहे. कारण ज्याने माझ्या मालकावर आपली दया केली आणि त्याच्याशी सत्याने वर्तन करणे सोडले नाही. मी वाटेवर असताना त्याने मला माझ्या धन्याच्या भावांचे घर दाखविण्यात माझ्यापुढे होऊन मार्ग दाखविला. -तौन उत्प० पर्व० २४। आ० २७।।
(समीक्षक) तो अब्राहमचाच ईश्वर होता काय ? ज्याप्रमाणे आजकाल जसा एखादा बिगारी किंवा वाटाड्या लोकांच्या पुढे चालत जाऊन त्यांना वाट दाखवितो तसेच ईश्वराने केले असेल तर तो आता मार्ग का दाखवत नाही? आणि तो माणसांशी का बोलत नाही म्हणून या साऱ्या गोष्टी ईश्वराच्या किंवा ईश्वरी ग्रंथाच्या असू शकत नाहीत. त्या तर जंगली माणसाच्या गोष्टी आहेत. ॥२८॥

(२९) इस्माईलच्या मुलांची नावे त्यांच्या पिढ्यांनुसार अशी आहेतः-  इस्माईलचा पहिला मुलगा नबजोत (नबीत) आणि केदार, अदबील व मिबसाम, मिश्मा, दुमाह, मस्सा, हदर, तेमा, जेतूर, नफीस आणि किदीमह. -तौन उत्प० पर्व० २५। आ० १३। १४। १५।।

17
(समीक्षक) हा इस्माईल अब्राहमच्या पत्नीपासून नव्हे तर त्याची दासी हाजिरा हिच्यापासून झालेला दासी पुत्र होता. ॥२९॥

(३०) मी तुझ्या बापासाठी त्याच्या आवडीचे स्वादिष्ट भोजन तयार करीन. ते तू आपल्या बापाकडे घेऊन जा. म्हणजे तो खाईल आणि स्वतः मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल आणि रेबेकाने आपला थोरला मुलगा एसौ याची जी उंची वस्त्रे तिच्याजवळ घरात होती ती काढून आपला धाकटा मुलगा याकूब (जेकब) याच्या अंगात घातली आणि बकरीच्या पिलांची कातडी त्याच्या हातांभोवती व मानेच्या गुळगुळीत भागाभोवती गुंडाळली. तेव्हा याकूब आपल्या बापाला म्हणाला, "मी तुमचा थोरला मुलगा एसौ आहे. तुमच्या सांगण्याप्रमाणे मी केले. कृपा करून उठून बसा आणि मी शिकार करून आणलेले मांस खा; म्हणजे तुमचा आत्मा मला आशीर्वाद देईल." -तौन उत्प० पर्व० २७। आ० ९। १०। १५। १६। १९।।
(समीक्षक) पाहा! अशा लबाडीने व कपटाने आशीर्वाद मिळवून हे लोक सिद्ध व पैगंबर बनतात. ही आश्चर्याची गोष्ट नाही काय? आणि असे होते ख्रिस्ती लोकांचे अग्रसर तेव्हा त्यांच्या पंथात काय कमी सावळा गोंधळ असेल? ॥३०॥

(३१) आणि याकूब भल्या पहाटे उठला आणि त्याने उशाला जो दगड घेतला होता तो खांबासारखा उभा करून ठेवला आणि त्याच्या माथ्यावर तेल घातले. त्याने त्या स्थानाचे नाव बेथेल (बैतुल) असे ठेवले. आणि हा जो धोंडा मी खांबासारखा उभा केला आहे तो देवाचे घर होईल-तौन उत्प० पर्व० २८। आ० १८। १९। २२।।
(समीक्षक) आता हे जंगली लोकांचे काम पाहा. यांनी दगडधोंडे पुजले आणि पुजविले. याला मुसलमान लोक 'बैतुल मुकद्दम' (पवित्र घर) म्हणतात. हाच दगड ईश्वराचे घर होते काय ? आणि त्या दगडातच ईश्वर राहत होता काय ? वाहवा ! तुम्हाला काय म्हणावे ख्रिस्ती लोकांनो ? सर्वात मोठे मूर्तिपूजक तर तुम्हीच आहात.॥३१॥

(३२) आणि ईश्वराने राहिला (राचेल) चे स्मरण केले आणि ईश्वराने तिचे म्हणणे ऐकले आणि तिची कूस उघडली आणि ती गरोदर राहिली. तिने एका पुत्राला जन्म दिला. ती म्हणाली, "देवाने माझे दूषण (दोष) दूर केले. " -तौन उत्प० पर्व० ३०। आ० २२। २३।।
(समीक्षक) छान! हे ख्रिस्त्यांच्या ईश्वरा तू फार मोठा डॉक्टर दिसतोस ! स्त्रियांची कूस उघडण्यासाठी तुझ्याजवळ कोणती शस्त्रे अथवा औषधे होती? खरे म्हणजे या सगळ्या अंधाधुद गोष्टी आहेत. ॥३२॥

(३३) परंतु ईश्वर अरामी (सीरियन) लाबान याच्याकडे रात्री स्वप्नात आला आणि त्याला म्हणाला, "नीट लक्षात ठेव. तू याकूबशी बरे किंवा वाईट काहीच करू नकोस. कारण तू तुझ्या बापाच्या घराची फार अभिलाषा बाळगली आहेस. तरीपण तू माझे देव का चोरलेस?" -तौन उत्प० पर्व० ३१। आ० २४। ३०।।
(समीक्षक) आम्ही हे केवळ नमुन्यादाखल लिहिले आहे. बायबलात असे सांगितले आहे की ईश्वर हजारों लोकांच्या स्वप्नात आला, त्यांच्याशी बोलला, जागेपणी प्रत्यक्ष भेटला, आला, गेला. त्याने खाणे-पिणे केले. परंतु आता तो आहे की नाही, कोण जाणे! कारण आता ईश्वर कोणालाही स्वप्नात अथवा जागेपणीही

18
भेटत नाही. हे जंगली लोक दगडादिकांच्या मूर्तीना देव मानून पुजत होते, असेही दिसून येते. परंतु ख्रिस्त्यांचा ईश्वर सुद्धा दगडालाच देव मानतो एरव्ही देवांची चोरी कशी होऊ शकते. ॥३३॥

(३४) आणि याकूब आपल्या वाटेने निघून गेला आणि ईश्वराचे दूत त्याला भेटले. त्यांना पाहून याकूब म्हणाला, "हे देवाचे सैन्य आहे." -तौन उत्प० पर्व० ३२। आ० १। २।।
(समीक्षक) आता मात्र खिश्चनांचा ईश्वर माणूसच आहे याविषयी मुळीच शंका उरली नाही. कारण तो सैन्यही बाळगतो. सैन्य आहे म्हणजे शस्त्रेही असणार आणि जेथे-तेथे चढाई करून लढाई देखील तो करीत असणार. नाहीतर सैन्य ठेवण्याचे काय प्रयोजन? ॥३४॥

(३५) मग याकूब एकटा राहिला आणि तेथे पहाट होईपर्यंत एक जण त्याच्याशी मल्लयुद्ध करीत राहिला आणि आपण त्याच्यावर जय मिळवू शकत नाही हे पाहून त्याने याकूबच्या मांडीच्या आतील भागाला स्पर्श केला. तेव्हा त्याच्याशी झोंबाझोंबी करताना याकूबच्या मांडीचा खळगा (सांधा) उखडला. तेव्हा तो म्हणाला, ‘पहाट झाली. मला जाऊ दे. " पण याकूब म्हणाला, "जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. पण त्याने विचारले, "तुझे नाव काय?" तेव्हा तो म्हणाला, "याकूब" तेव्हा तो म्हणाला की, "यापुढे तुझे नाव याकूब असे राहणार नाही. लोक तुला इसराईल म्हणतील. कारण ईश्वराशी व माणसांशी राजाप्रमाणे मल्लयुद्ध केलेस व त्यात तू विजयी झालास." तेव्हा याकूब त्याला म्हणाला, "कृपा करून मला तुमचे नाव सांगा. " तेव्हा तो म्हणाला, "तू माझे नाव कशाला विचारतोस?" आणि त्याने याकूबला आशीर्वाद दिला आणि याकूबने त्या स्थानाचे नाव 'पॅनिएल' असे ठेवले. कारण 'मी ईश्वराला प्रत्यक्ष पाहिले आणि माझा प्राण वाचला आहे. आणि जेव्हा तो पॅनिएलच्या पलीकडे निघाला तेव्हा सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडला. तो आपल्या मांडीतून लंगडत होता...म्हणून इसराईलच्या वंशातील लोक त्या मांडीतील जी घोडशीर लचकली होती ती आजपर्यंत खात नाहीत. कारण त्याने याकूबच्या मांडीतील लचकलेल्या घोडशिरेला स्पर्श केला होता... -तौन उत्प० पर्व० ३२। आ० २४। २५। २६। २७। २८। २९। ३०। ३१। ३२।।

(समीक्षक) ख्रिस्त्यांचा ईश्वर असा आखाड्यात कुस्ती करणारा मल्ल आहे. म्हणून तर सारा आणि राहिला यांचा पुत्रवती बनविण्याची कृपा त्याने केली. असला कधी ईश्वर असू शकतो काय? त्याची आणखी लीला पाहा! एक जण नाव विचारतो तर दुसरा आपले नावच सांगत नाही आणि ईश्वराने त्याच्या मांडीतील नाडी बढविली आणि तो विजयी झाला. परंतु तो डॉक्टर असता तर त्याने मांडीची नाडी बरी केली असती. अशा या ईश्वराच्या भक्तीमुळे जसा याकूब लंगडत राहिला तसे इतर भक्तही लगडत असतील. याकूबने ईश्वराला प्रत्यक्ष पाहिले आणि त्याच्याशी मल्लयुद्धही केले. ही गोष्ट ईश्वर शरीरधारी नसता तर कशी घडली असती? हा सगळाच पोरकटपणाचा खेळ आहे.॥३५॥

(३६) ईश्वराचे तोंड पाहिले. - -तौन उत्प० पर्व० ३३। आ० १०।।
(समीक्षक) जर ईश्वराला तोंड असेल तरत्याला इतरही सगळे अवयव असतील आणि त्याला जन्ममरणही असणार. ॥३६॥

19
(३७) आणि यहूदाचा पहिला मुलगा एर परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले. तेव्हा यहूदाने ओनानाला सांगितले की, "तू आपल्या भावाच्या बायकोजवळ जा. तिच्याशी लग्न कर आणि आपल्या भावासाठी संतती उत्पन्न करून त्याचा वंश चालव". तेव्हा ओनानाने हे जाणले की हा वंश आपला असणार नाही. म्हणून तो आपल्या भावाच्या बायकोजवळ गेला आणि त्याने आपले वीर्य भावासाठी देण्याऐवजी जमिनीवर सांडले. त्याचे हे कृत्य परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होते. म्हणून त्याने ओनानालाही मारून टाकले.-उत्पत्ति, तौन उत्प० पर्व० ३८। आ० ७। ८। ९। १०।।
(समीक्षक) आता पाहा ! ही कृत्ये माणसांची आहेत की ईश्वराची? वस्तुतः ईश्वराच्या आज्ञेनेच आपल्या भावजयीशी त्याने नियोग केला होता. मग त्याला त्याने जिवे का मारले ? त्याला ईश्वराने सद्बुद्धी का दिली नाही? वेदोक्त नियोगही पूर्वी सर्वत्र चालत होता. यावरून हे सिद्ध होते की नियोग पद्धती सर्व देशात रूढ होती. ॥३७॥

जुना करार ‘निर्गम’ चे पुस्तक
अज्ञानी व भांडखोर मोझेस

(३८) जेव्हा मूसा (मोझेस) सज्ञान झाला तेव्हा तो आपल्या भाऊबंदांकडे गेला. तेथे त्याने त्यांची कष्टाची कामे पाहिली. एक मिसरी (ईजिप्शियन) माणूस आपल्या भावांपैकी कतएका इबरानी (हिब्रू) इसमाला मारीत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे नजर फिरवून कोणी नाही असे पाहिले आणि त्या मिसरी माणसाला ठार मारले आणि त्याला वाळूत लपविले..... दुसऱ्या दिवशी तो बाहेर गेला तेव्हा दोन इबरानी आपापसात मारामारी करीत असलेले त्याला दिसले. तेव्हा ज्याने अपराध केला होता त्याला तो म्हणाला, "तू आपल्या शेजाऱ्याला का मारतोस? "..तेव्हा त्याने विचारले, "तुला आमच्यावर राजा किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले ? तू त्या मिसरी माणसाला जसे ठार मारलेस तसेच मलाही मारून टाकावे अशी तुझी इच्छा आहे काय?" तेव्हा मूसा घाबरला व पळून गेला. -तौन या० प० २। आ० ११। १२। १३। १४। १५।।
(समीक्षक) आता पाहा! मूसा हा बायबलातील प्रमुख पैगंबर (प्रेषित) असून तोच या पंथाचा संस्थापक ज्याचे चरित्र क्रोधादी विकारयुक्त मानवाची हत्या करणारा आणि चोराप्रमाणे राजदंडापासून वाचणारा होता. आपण केलेले कृत्य तो लपवीत होता. म्हणजे तो नक्कीच खोटे बोलणाराही असणार, अशा माणसालाही ईश्वर भेटला. तो पैगंबर बनला. त्याने यहुदी पंथाची स्थापना केली. त्याचा तो पंथही मूसासारखा बनला. म्हणूनच ख्रिस्ती लोकांचे मूसापासून पुढे जे पैगंबर झाले ते ज्ञानी नसून जंगली होते.॥३८॥

(३९) जेव्हा परमेश्वराने पाहिले की मूसा आपल्याकडे येत आहे तेव्हा तो झाडीच्या मागून त्याला म्हणाला, "मूसा अरे मूसा!" तेव्हा तो म्हणाला, "मी इथे आहे" ... मग त्याने सांगितले की, “इकडे माझ्याजवळ येऊ नको. आपल्या पायांतील पादत्राणे काढून ठेव. कारण ज्या ठिकाणी तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे" -तौन या० पु० प० ३। आ० ४। ५।।
(समीक्षक) पाहा! जो माणूस दुसऱ्या माणसाला मारून वाळूत पुरून टाकतो त्याच्याशी ईश्वराची मित्रता

20
आणि त्या माणसाला ते पैगंबर मानतात. आणखी असे पाहा की तुमच्या ईश्वराने पवित्र स्थानी पादत्राणे घालून जाता कामा नये असे मूसाला सांगितले होते. मग तुम्ही ख्रिस्ती लोक या आज्ञेच्या विरुद्ध आचरण का करता?
(प्रश्न) आम्ही पादत्राणांऐवजी टोपी काढतो.
(उत्तर) हा दुसरा अपराध तुम्ही करता. कारण टोपी काढावी असे ईश्वराने सांगितलेले नाही अथवा तुमच्या मतग्रंथातही लिहिलेले नाही. जे काढावयास हवे ते काढीत नाही आणि जे काढता कामा नये ते काढता. या दोन्ही गोष्टी तुमच्या मतपुस्तकाच्या विरुद्ध आहेत.
(प्रश्न) आमच्या युरोपात थंडी फार असते. म्हणून आम्ही पादत्राणे काढीत नाही.
(उत्तर) डोक्याला थंडी लागत नाही काय? आणि असेच असेल तर जेव्हा युरोपात जाल तेव्हा तसे करा. परंतु जेव्हा तुम्ही आमच्या घरी येता किंवा झोपण्याच्या खोलीत येता तेव्हा तरी पादत्राणे काढीत जा. तसे न कराल तर तुम्ही बायबलच्या आज्ञेविरुद्ध वागता असे म्हणावे लागेल. तसे तुम्ही करता कामा नये.

(४०) तेव्हा ईश्वराने त्याला म्हटले की, "तुझ्या हातात हे काय आहे ?" तो म्हणाला, "ती छडी आहे. तेव्हा ईश्वराने सांगितले की, "ती जमिनीवर टाकून दे." त्याने ती जमिनीवर टाकली. त्याबरोबर ती साप बनली आणि मूसा त्याच्या समोरून पळू लागला...तेव्हा परमेश्वराने मूसाला सांगितले की, आपला हात पुढे कर आणि त्या सापाची शेपटी पकड." त्याप्रमाणे मूसाने आपला हात पुढे करून सापाची शेपटी पकडली. त्याबरोबर पुनः त्याच्या हातात ती छडी बनली. .. तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले की, "आता तू आपला हात काखेत घाल" त्याप्रमाणे त्याने आपला हात आपल्या काखेत घातला. जेव्हा त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा तो बर्फासारखा कोडाने भरलेला असल्याचे त्याला दिसले... आणि परमेश्वराने त्याला सांगितले की, "तू आपला हात पुन: काखेत घाल" त्याने पुन: आपला हात आपल्या काखेत घातला आणि जेव्हा त्याने तो बाहेर काढला तेव्हा तो आपल्या इतर शरीरासारखा पूर्ववत झाल्याचे त्याला दिसून आले... "तू नील (नाईल) नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर टाक. तू नदीतून जे पाणी बाहेर काढशील ते कोरड्या जमिनीवर पडताच त्याचे रक्त होईल.” -तौन या० प० ४। आ० २। ३। ४। ६। ७। ९।।
(समीक्षक) आता पाहा ! हा जणू जादूचा खेळ, ईश्वर जादूगार, मूसा त्याचा सेवक आणि या गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक कसे आहेत ? आजकालचे जादूगार याहून कमी करामती करतात काय ? हा कसला ईश्वर? तो तर जादूगार आहे. या गोष्टींवर विद्वान् लोक कसा विश्वास ठेवतील? आणि दर खेपेस तो म्हणतो की, "मी परमेश्वर आहे. मी अब्राहम, इसहाक आणि याकूब यांचा ईश्वर आहे." अशा प्रकारे प्रत्येकाजवळ तो आपल्या तोंडाने स्वतचीच प्रशंसा करीत फिरतो. हे कृत्य सज्जनाचे असू शकत नाही. ढोंगी माणूसच अशी आत्मस्तुती करीत असतो. ||४०॥ |

(४१) मग मूसाने इसराईलच्या सर्व वडील माणसांना बोलावून सांगितले की, "तुम्ही आपापल्या कुटुंबाप्रमाणे मेंढरे काढून घ्या आणि वल्हांडण सणासाठी कापा आणि जुफ झाडाची जुडी घेऊन भांड्यातल्या रक्तात बुचकळून ते रक्त दाराच्या चौकटीच्या वरच्या पट्टीवर फासा आणि ते रक्त चौकटीच्या दोन्ही बाजूंवर

21
लावा आणि तुमच्यापैकी कोणी सकाळ होईपर्यंत घराच्या दाराबाहेर पडू नका, कारण परमेश्वर मिसरी लोकांना मारण्यासाठी तुमच्या दारांवरून जाणार आहे. तो तुमच्या दाराच्या चौकटीवरील आणि दोन्ही बाजवांवरील रक्त पाहून दारावरून पुढे निघून जाईल; आणि नाश करणाऱ्या लोकांना तुम्हाला मारण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. -तौन या० प० १२। आ० २१। २२। २३।।
(समीक्षक) हा जो जादूटोणा करणाऱ्यासारखा ईश्वर आहे तो कधीतरी सर्वज्ञ असू शकेल काय? दाराच्या चौकटीवर रक्ताचा छाप पाहिला तरच ते इसराइली माणसाचे घर आहे अन्यथा नाही. हे काम सुद्धबुद्धीच्या माणसाच्या कृत्यासारखे आहे. यावरून हे लक्षात येते की या गोष्टी एखाद्या जंगली माणसाने लिहून ठेवल्या असाव्यात॥४१॥ ।

(४२) मग असे झाले की परमेश्वराने मध्यरात्री मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेल्या मुलांना मारून टाकले. आपल्या राजसिंहासनावर बसणाऱ्या फारोहाच्या ज्येष्ठ पुत्रापासून बंदी गृहात असलेल्या कैद्याच्या थोरल्या मुलापर्यंत, एवढेच नव्हे तर गुराढोरांची पहिली वासरेही मारुन टाकली. तेव्हा रात्री फारोहा उठला. त्याचे सगळे नोकर-चाकर आणि सर्व मिसरी लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला. ज्या घरातील एकही माणूस मेले नव्हते असे घर उरले नाही. -तौन या० प० १२। आ० २९। ३०।।
(समीक्षक) छान! मध्यरात्री एखाद्या दरोडेखोराप्रमाणे निर्दय बनून ख्रिस्त्यांच्या ईश्वराने मुले-बाळे म्हातारे-कोतारे व गुरेढोरेही त्यांचा काही अपराध नसताना मारून टाकले. त्याला मुळीच दया आली नाही. मिसर देशामध्ये एवढा विलाप चालू होता तरीही ख्रिस्त्यांच्या ईश्वराच्या अंतःकरणातून निष्ठुरता नष्ट झाली नाही. ईश्वरच काय पण कोणी सामान्य माणूसही असले क्रौर्य करणार नाही. परंतु हे आश्चर्य नाही. कारण असे लिहिलेच आहे की, ‘मांसाहारिण: कुतो दया' ख्रिस्त्यांचा ईश्वर मांसाहारी असल्यामुळे त्याचा दयेशी काय संबंध?||४२॥

(४३) परमेश्वर तुमच्यासाठी युद्ध करील. इसराईलच्या मुलांना सांग की, "पुढे चला. परंतु तू आपली काठी वर उचल आणि आपला हात समुद्रावर लांब करून समुद्राचे दोन भाग कर. मग इसराईलची मुले समुद्राच्या मधोमध बनलेल्या कोरड्या जमिनीवरून चालत जातील. -तौन या० प० १४। आ० १४। १५। १६।।
(समीक्षक) काय महाराज ? जुन्या काळी मेंढरांच्या मागून धनगर चालतो तसा ईश्वर इसराईलच्या मुलांच्या मागे मागे डुलत होता. आता तो कोठे अंतर्धान पावला कोण जाणे ! तसे नसते तर त्याने समुद्रातून चारी बाजूला आगगाड्यांचे रूळ टाकले असते व त्यामुळे जगाचे कल्याण झाले असते आणि गवा वगैरे बनविण्याचे श्रम वाचले असते. पण काय करावे? ख्रिस्ती लोकांचा ईश्वर कुठे दडून बसला आहे कोण जाणे! बायबलमधील ईश्वराने मोझेसच्या बाबतीत अशा अनेक असंभव गोष्टी केल्या आहेत. परंतु त्यावरून एवढेच दिसून आले की ख्रिस्ती लोकांचा ईश्वर जसा आहे तसेच त्याचे भक्त आहेत आणि तसाच त्याने चलेला धर्मग्रंथ आहे. असला ग्रंथ आणि असला ईश्वर आम्हा लोकांपासून दूर राहिलेलाच बरा. ॥४३॥

(४४) कारण की, मी परमेश्वर तुझा ईश्वर दैदिप्यमान व सर्वशक्तिमान आहे. पितरांच्या अपराधाची शिक्षा, त्यांच्या मुलांना. जे माझ्याशी वैर बाळगतात, त्यांच्या तिसन्या व चौथ्या पिढीपर्यंत देणारा आहे. -तौन या० प० २०। आ० ५।।

22
(समीक्षक) बापाने केलेल्या अपराधाबद्दल त्याच्या चार पिढ्यांतील वंशजांना शिक्षा देणे हे चांगले आहे असे समजणे हा कुठला न्याय ? चांगल्या बापाला वाईट मुले आणि दुष्ट बापाला सज्जन मुले होत नाहीत काय? असे असल्यामुळे तो चवथ्या पिढीपर्यंतच्या मुलाबाळांना तो कशी शिक्षा करू शकतो? आणि पाचव्या पिढीपासून नंतर जो कोणी दुष्ट निर्माण होईल त्याला तो शिक्षा करू शकणार नाही. अपराध नसताना कोणालाही शिक्षा देणे ही अन्यायकारी गोष्ट आहे॥४४॥

ईश्वराचा विश्रामदिन

(४५) सब्बाथ हा विश्रांतीचा दिवस पवित्र राहावा म्हणून त्याचे स्मरण कर.. तू सहा दिवस परिश्रम कर... परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या विसाव्याचा दिवस आहे.. परमेश्वराने सब्बाथच्या दिवसाला आशीर्वाद दिला. -तौन या० प० २०। आ० ८। ९। १०। ११।।
(समीक्षक) रविवार हा एकच पवित्र आणि सहा दिवस अपवित्र आहेत ? आणि परमेश्वराने सहा दिवस खूप परिश्रम केले होते म्हणून तो थकून सातव्या दिवशी झोपी गेला काय ? आणि जर रविवारला आशीर्वाद दिला तर सोमवार वगैरे इतर ६ वारांना काय दिले? अर्थात शाप दिला असणार ! असले कृत्य कोणताही विद्वान करणार नाही. मग ते ईश्वराचे कसे असू शकेल ? रविवारमध्ये असे कोणते गुण होते आणि सोमवार वगैरे इतर दिवसांमध्ये कोणते दोष होते, की ज्यामुळे एकाला पवित्र ठरवून देवाने आशीर्वाद दिला; आणि इतर वारांना उगीचच अपवित्र ठरविले ?॥४५॥

(४६) आपल्या शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊ नकोस... शेजाऱ्याची बायको, त्याचे दास-दासी, त्याचे बैल व गाढवे अथवा त्याची कोणतीही वस्तू यांविषयी अभिलाषा बाळगू नकोस किंवा लोभ धरू नकोस. -तौन या० प० २०। आ० १६। १७।।
(समीक्षक) वाहवा, म्हणून तर ख्रिस्ती लोक परदेशी लोकांच्या मालमतेवर असे तुटून पडतात जसे तहानलेला माणूस पाण्यावर आणि उपाशी माणूस अन्नावर, ही जशी मतलब साधूपणाची आणि पक्षपाताची गोष्ट (आज्ञा) आहे तसाच खिश्चनांचा ईश्वरही अवश्य असणार. जर आम्ही सर्व माणसांना शेजारी मानतो असे कोणी म्हणत असतील तर ज्यांना शेजारी म्हणता येत नाही अशा, शिवाय कोण स्त्रिया व दासी आहेत की त्यांना अशेजारी समजावे? म्हणून या सगळ्या गोष्टी स्वार्थी माणसांच्या आहेत; ईश्वराच्या नव्हेत. ॥४६॥

(४७) जेव्हा कोणी एखाद्या माणसाला मारतो व तो माणूस मरतो तेव्हा त्या मारणाऱ्याला अवश्य मारून टाकावे...आणि तो माणूस मारला गेला नाही परंतु ईश्वराने त्याच्या हाती सोपविला असेल तर मी तुला पळून जाण्याचे ठिकाण दाखवीन -तौन या० प० २१। आ० १२। १३।।
(समीक्षक) जर हा ईश्वराचान्याय खरा असेल तर मूसा एका माणसाला मारून, पुरून पळून गेला होता. त्याला ही शिक्षा का झाली नाही ? ईश्वराने त्या माणसाला मारण्यासाठीच मूसाच्या हाती सोपविले होते असे असेल तर ईश्वर पक्षपाती ठरतो. कारण त्या मूसाचा राजाकडून न्यायनिवाडा का होऊ दिला नाही? ॥४७॥

23
(४८) आणि शांततेसाठी परमेश्वराच्या नावाने बैलांचे बलिदान केले.... आणि मूसाने अर्धे रक्त घेऊन ते भांड्यात ठेवले आणि अर्थ रक्त वेदीवर शिंपडले. आणि मूसाने ते रक्त घेऊन लोकांवर शिंपडले आणि तो म्हणाला, "या गोष्टींसाठी परमेश्वराने तुमच्याशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त आहे" आणि परमेश्वराने मूसाला सांगितले की, "तू डोंगरावर माझ्याजवळ ये; आणि तेथे राहा. मी तुला दगडाच्या लाद्या आणि मी लिहिलेले नियम व आज्ञा देईन." -तौन या० प० २२। आ० ५। ६। ८। १२।।
(समीक्षक) आता पाहा ! या सगळ्या जंगली लोकांच्या गोष्टी आहेत की नाहीत ? आणि परमेश्वराने बैलांचा बळी स्वीकारणे आणि वेदीवर रक्त शिंपडणे ही किती रानटीपणाची व असभ्यतेची गोष्ट आहे ! जर ख्रिस्त्यांचा परमेश्वर बैलांचे बलिदान घेतो तर त्याचे भक्त बैलांचे व गायींच्या बलिदानाचा प्रसाद घेऊन आपले पोट का भरणार नाहीत ? आणि जगाची हानि का करणार नाहीत? असल्या वाईट वाईट गोष्टी बायबलात भरलेल्या आहेत, असले कुसंस्कारी लोक वेदांमध्येही या गोष्टी आहेत असा खोटा आरोप करू पाहतात, परंतु वेदांमध्ये असल्या गोष्टी नावालाही नाहीत. यावरून असा निश्चय होतो की ख्रिस्त्यांचा ईश्वर हा एक गिरीजन होता. तो डोंगरावर राहत होता. त्या परमेश्वराला शाई, लेखणी, कागद तयार करण्याची कला अवगत नव्हती. अथवा त्याला त्या गोष्टी प्राप्तही झालेल्या नव्हत्या. म्हणून शिळांच्या पाट्यावर तो मजकूर लिहून देत होता आणि आपल्या सारख्याच जंगली लोकांसमोर तो ईश्वरही बनून बसला होता. ॥४८॥

(४९) आणि म्हणाला, "तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस. कारण मला पाहिल्यावर कोणीही माणूस जगणार नाही. आणि परमेश्वराने सांगितले, “हे पाहा ! माझ्याजवळ एक ठिकाण आहे आणि तू त्या खडकावर उभा राहा... मग असे होईल की जेव्हा माझे वैभव जवळून जाईल तेव्हा मी तुला खडकाच्या खोबणात ठेवीन आणि तेथून निघून जाईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकून टाकीन.. मग मी माझा हात काढून घेईन. तेव्हा तुला माझा मागचा भाग दिसेल. परंतु माझा चेहरा दिसणार नाही." -तौन या० प० ३३। आ० २०। २१। २२। २३।।
(समीक्षक) आता पाहा. ख्रिस्त्यांचा ईश्वर केवळ माणसासारखाच शरीरधारी होता आणि मूसाशी कपटीपणा करून तो स्वतःच कसा ईश्वर होऊन बसला, पाहा ! मूसाला फक्त मागची बाजूच दिसावी म्हणून त्याने त्याला हाताने झाकून टाकले की नसेल. जेव्हा परमेश्वराने आपल्या हाताने मूसाला झाकले असेल तेव्हा त्याच्या हाताचे रूप मूसाने पाहिले नसेल काय ?॥४९॥

जुना करार, लेवीय व्यवस्थेचे पुस्तक
मांसाहारी ईश्वर

(५०) आणि परमेश्वराने मूसाला बोलावले आणि सभामंडपाच्या तंबूतून तो त्याला म्हणाला की, "इसराईलच्या लेकरांशी बोल आणि त्यांना सांग, "तुमच्यापैकी कोणी परमेश्वरासाठी भेटवस्तू आणणार असेल तर त्याने ती गुराढोरांपैकी म्हणजे गाय, बैल व शेळी-मेंढी यांपैकी आपली भेटवस्तू आणावी." -तौन लैव्य व्यवस्था की पुस्तक, प० १। आ० १। २।।

24
(समीक्षक) आता तुम्हीच विचार करा! ख्रिस्त्यांचा परमेश्वर गाय, बैल इत्यादी पशूचे बळ घेणारा, आपल्यासाठी बलिदान करण्याचा उपदेश करणारा आणि गाय, बैल वगैरे पशूंच्या रक्तामांसाचा भुकेला व तहानलेला आहे की नाही? म्हणून त्याला अहिंसक व ईश्वरी कोटीतील समजता येणार नाही. तो तर मांसाहारी संसारी माणसासारखा आहे. ॥५०॥

(५१) आणि त्याने तो बैल परमेश्वरासमोर मारावा; आणि पाद्री (उपाध्याय) असलेल्या हारूनच्या पुत्रांनी त्याचे रक्त आणावे आणि सभामंडपाच्या तंबूच्या दारात असलेल्या यज्ञवेदीच्या सभोवती ते शिंपडावे.... नंतर त्याने बळी दिलेल्या बैलाचे कातडे काढावे; आणि त्या पशूचे तुकडे करावेत आणि पार्टी असलेल्या हारूनच्या मुलांनी यज्ञवेदीवर अमी ठेवावा आणि त्यावर लाकडे रचावीत.. आणि हारूनच्या पाद्री मुलांनी ते (मांसाचे) तुकडे, डोके व मांदे (चरबी) यज्ञवेदीच्या अग्नीवर रचलेल्या लाकडांवर विधिपूर्वक ठेवावे... मात्र त्याने त्या पशूची आतडी व पाय पाण्याने धुवावेत आणि ते जळण्यासाठी अग्नीत टाकावेत. परमेश्वराला सुगंध मिळावा म्हणून अग्नीद्वारे ही भेट दिली गेली असे स्पष्ट होईल. -तौन लै० व्यवस्था की पुस्तक, प० १। आ० ५। ६। ७। ८। ९।।

(समीक्षक) थोडा विचार करा! परमेश्वराच्या भक्तांनी त्याच्या समोर बैल मारावा आणि परमेश्वराने त्याला तो मारू द्यावा. भक्तांनी त्या बैलाचे रक्त वेदीच्या चोहोबाजूला शिंपडावे, अग्नीत त्याचा होम करावा, त्याचा सुगंध ईश्वराने घ्यावा, हा सारा प्रकार कसायाच्या घरापेक्षा कमी खेळ आहे काय ? म्हणूनच बायबल हे ईश्वरकृत नाही असे ठरते आणि जंगली लोकांसारखी कृत्य करणारा तो ईश्वर असू शकत नाही. ॥५१॥

(५२) मग परमेश्वर मूसाला असे म्हणाला, ज्याच्यावर अभिषेक करण्यात आला आहे असा तो पाद्री इतर लोक करतात तसेच पाप करील तर त्याने आपण केलेल्या पापाच्या निवृत्तीसाठी एक निर्दोष खोंड परमेश्वराकरिता आणावा. त्याने तो खोंड सभामंडपाच्या तंबूच्या दाराजवळ परमेश्वरासमोर आणावा आणि आपला हात खोंडाच्या डोक्यावर ठेवावा; आणि परमेश्वरासमोर खोंडकापावा. " -तौन लै० व्य० प० ४। आ० १। ३। ४।।

(समीक्षक) आता पापापासून मुक्त होण्याचे प्रायश्चित्त, पाप स्वतः करावयाचे गाय वगैरे उत्तम पशूची हत्या करावयाची आणि खुद्द परमेश्वरानेच ती करवून घ्यावयाची! धन्य आहेत हे ख्रिस्ती लोक! अशा गोष्टी करणाऱ्याला व करविणाऱ्यालाही ईश्वर मानून लोक आपल्या मुक्तीची आशा बाळगतात?॥५२॥

(५३) जेव्हा एखादा राज्यकर्ता पाप करतो तेव्हा त्याने बकऱ्यांपैकी निर्दोष नर (बकरा) बळ देण्यासाठी आणावा.... आणि तो परमेश्वरासमोर कापावा. पापाच्या निवृत्तीसाठी केलेले हे बलिदान आहे.... -तौन लै० प० ४। आ० २२। २३। २४।।

(समीक्षक) वाहवा! असे असेल तर यांचे अध्यक्ष म्हणजे न्यायाधीश, सेनापती वगैरे पाप करायला कशाला भीत असतील? स्वतः यथेच्छ पापे करावीत आणि त्यांचे प्रायश्चित्त म्हणून गाय, वासरे, बकरे वगैरे प्राण्याचा जीव घ्यावा की झाले ! म्हणूनच ख्रिस्ती लोक कोणत्याही पशुला अथवा पक्षाला ठार मारण्यास कचरत नाहीत. ख्रिस्ती लोकांनो, ऐका! आता तरी हा जंगली पंथ सोडून सुसभ्य, धर्ममय, वेदमताचा स्वीकार करा. त्यानेच तुमचे कल्याण होईल. ॥५३॥

25
(५४) आणि जर त्याला बकरा आणता आला नाही तर त्याने आपण केलेल्या पापाच्या निवृत्तीसाठी दोन होले आणि पारव्याची दोन पिले परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणावीत... त्याने त्यांची मुंडी मुरगळावी पण त्यांचे मुंडके धडापासून वेगळे करू नये. त्याने आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप करावा; मग त्याला क्षमा केली जाईल... परंतु त्याला दोन होले आणि कबुतराची दोन पिले मिळाली नाहीत तर त्याने शेरभर सपीठाचा दहावा भाग पापाचे प्रायश्चित्त म्हणून आणावा. त्यावर तेल घालू नये. ..आणि त्याला क्षमा केली जाईल.. -तौन लै० प० ५। आ० ७। ८। १०। ११। १३।।

(समीक्षक) आता ऐका ईश्वराने पापाचे प्रायश्चित्त करणे इतके सोपे करून ठेवले आहे की ख्रिस्ती लोकांमध्ये श्रीमंत अथवा गरीब कोणीही पाप करण्यास भीत नसेल ख्रिस्त्यांच्या बायबलातील ही मोठी अद्भुत गोष्ट आहे की कष्टाविना पापाने पापमुक्त व्हावे प्रथम पाप करायचे आणि मग त्या पापाच्या क्षालनासाठी प्राण्यांची हिंसा करावयाची, खूप मजेत मांस खायचे आणि तिकडे पापही नाहीसे व्हायचे! छान! पारव्याच्या पिलाची मान मुरगळल्याने ते बराच वेळापर्यंत तडफडत असणार तरीही ख्रिस्ती लोकांना दया येत नाही. दया कशी येणार? त्यांचा ईश्वर त्यांना उपदेशच हिंसा करण्याचा करतो. जर सर्व पापांचे असे प्रायश्चित्त तयार आहे तर मग येश्वर विश्वास ठेवल्याने पाप नष्ट होते असला दिखावा ते कशाला करतात ? ॥५४॥

(५५) जो याजक (उपाध्याय) ज्या कोणाचा होम करतो त्याने अर्पण केलेल्या होमपशूचे कातडे त्या याजकाच्या मालकीचे होईल... आणि जे काही खाद्य पदार्थ-मग ते भट्टीत भाजलेले असोत, कढईत तळलेले असोत की तव्यावर परतलेले असोत, ज्या याजकाने अर्पण केलेले असतील ते सगळे त्या याजकाचे होतील... -तौन लै० प० ७। आ० ८। ९।।

(समीक्षक) या देशातील देवीचे भोप्ये आणि मंदिराचे पुजारी यांच्या क्लृप्त्या विचित्र आहेत हे आम्हाला माहीत होते. परंतु ख्रिस्त्यांचा ईश्वर आणि त्याचे पुजारी यांच्या लीला इथल्यापेक्षा हजारपटींनी जास्त आहेत. कारण कातड्याचे पैसे त्यांना मिळतात आणि खाद्य पदार्थ खायला मिळतात. त्यामुळे ख्रिस्ती याजकांची चांगलीच चंगळ त्यावेळी झाली असणार आणि आताही होत असणार! एखादा माणूस आपल्या एका मूलाला ठार मारून दुसऱ्या मुलाला त्याचे मांस खायला घालतो असे कधी घडू शकेल काय ? सर्व माणसे पशुपक्षीही सारी जणू ईश्वराची लेकरेच आहेत. तर परमेश्वर अशी कृत्ये कधी करू शकत नाही. म्हणूनच हे बायबल ईश्वरकृत आणि त्या वर्णिलेला ईश्वर व त्याचे भक्त कधीही धर्मज्ञ असू शकत नाहीत. असल्याच सगळ्या गोष्टी लैव्य पुस्तकांत भरलेल्या आहेत. त्या कुठवर सांगाव्यात ? ॥५५॥

'गणना’ चे पुस्तक

(५६) आणि परमेश्वराचा दूत हातात उपसलेली तलवार घेऊन वाटेत उभा असलेला गाढवीने पाहिला. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात शिरली. तिने रस्त्यावर परत फिरावे म्हणून बलामाने गाढवीला काठीने मारले. तेव्हा परमेश्वराने गाढवीचे तोंड उघडले, आणि तिने बलामाला विचारले, "मी तुला असे काय केले की ज्यासाठी तू मला तीन वेळा मारलेस? "-तौन गि० प० २२। आ० २३। २८।।

26
(समीक्षक) पूर्वी गाढवाला सुद्धा देवदूतांचे दर्शन घडत असे पण आजकाल विशप, पाद्री वगैरे श्रेष्ठ किंवा अश्रेष्ठ माणसांनाही ईश्वर व त्याचे दूत दिसत नाहीत. आता परमेश्वर व त्याचे दूत आहेत की नाहीत ? जर असतील तर ते गाढ झोपेत आहेत काय? की आजारी पडले आहेत? अथवा एखाद्या दुसऱ्या भूगोलवर ते गेले आहेत? की दुसऱ्या एखाद्या धंद्यात ते गुंतले आहेत? की आता ख्रिस्ती लोकांवर रुष्ट झाले आहेत? अथवा मरून गेले? काय झाले कळत नाही. यावरून असे अनुमान निघते की जे सध्या नाहीत दिसत नाहीत ते केव्हाही नव्हते व दिसत नव्हते. परंतु त्यांनी या सगळ्या कपोलकल्पित भाकडकथा रचल्या आहेत. ॥५६॥

(५७) तर आता मुलांपैकी प्रत्येक मुलाला आणि जिचा पुरुषाशी संयोग झाला आहे अशा प्रत्येक स्त्रीला ठार मारा.. परंतु ज्यामुलींचा पुरुषांशी संयोग झालेला नाही त्यांना स्वतःसाठी जिवंत ठेवा. -तौन गिनती प० ३१। आ० १७। १८।।

(समीक्षक) वाहवा! मूसा पैगंबर आणि तुमचा ईश्वर धन्य आहे! जो स्थर्य, मुले, वृद्ध व पशू यांची हत्या करण्यापासून अलिप्त राहत नाही त्याला काय म्हणावे ? यावरून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते की मूसा हा विषयासक्त होता. कारण तसा तो नसता तर अक्षतयोनी म्हणजे पुरुषांशी समागम न केलेल्या मुली आपल्यासाठी त्याने कशाला मागविल्या असत्या? अथवा त्यांना अशी निर्दयी व विषयवासनायुक्त आज्ञा का देतो?॥५७॥

सॅम्युएलचे दुसरे पुस्तक

(५८) आणि त्याच रात्री असे झाले की परमेश्वराचा हा शब्द नाथानकडे पोहचला. ॥ की, "जाऊन माझा सेवक दाऊद (दावीद) याला सांग की परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्या निवासस्थानी एक घर बांधशील काय ? ॥ कारण जेव्हापासून इसराईलच्या मुलांना मिसर देशातून आणले तेव्हापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. तंबूत आणि डेऱ्यांमध्ये राहत आलो." -तौन समुएल की दूसरी पु० प० ७। आ० ४। ५। ६।।

(समीक्षक) आता तर ख्रिस्त्यांचा ईश्वर मनुष्यासारखा देहधारी नाही आणि उलाहणे देतो की, "मी फार श्रम केले. इकडे- तिकडे फिरत राहिले. आता दाऊद घर बांधून देईल तर मी त्यात विश्रांती घेईन." असल्या ईश्वरावर आणि अशा पुस्तकावर श्रद्धा ठेवण्यास ख्रिस्ती लोकांना लाज का वाटत नाही? पण काय करतील विचारे ? फसले आहेत ! आता त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी खूप पुरुषार्थ करणे आवश्यक आहे.॥५८॥

राजांचे पुस्तक

(५९) आणि बाबिलोनचा राजा नबूखुदनजर याच्या राज्याच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी बाबिलोनच्या राजाचा एक सेवक नबूजरअद्दीन हा हुजऱ्यांचा सरदार यरूशलेमला आला; आणि त्याने परमेश्वराचे मंदिर, राजाचा राजवाडा आणि यरूशलेमची सगळी घरे व प्रत्येक मोठ्या माणसाचे घर अग्नीने जाळून टाकले...आणि हुजऱ्यांच्या सरदाराबरोबर आलेल्या खालद्यांच्या सगळ्या सैन्याने यरूशलेमच्या सभोवती असलेले तट जमीनदोस्त केले. -तौन रा० पु० २। प० २५। आ० ८। ९। १०।।

(समीक्षक) काय करणार? ख्रिस्त्यांच्या ईश्वराने स्वतःच्या सुखासाठी दाऊद वगैरे मंडळींकडून घर

27
बांधून घेतले होते. त्यामध्ये तो विश्रांती करीत असेल. परंतु नबूजरअद्दीनने ईश्वराचे घर नष्ट करून टाकले आणि ईश्वर किंवा त्याच्या दूताचे सैन्य काहीही करू शकले नाही. पूर्वी त्यांचा ईश्वर मोठमोठ्या लढाया मारीत असे आणि विजयी होत असे. परंतु आता आपले घर मोडले-जाळले जात असताना तो गप्प का बसला कोण जाणे! आणि त्याचे दूत कोठे पळून गेले कोण जाणे? अशा कठीण समयी कोणीही मदतीस आला नाही आणि परमेश्वराचा पराक्रमही कोठे उडून गेला कोण जाणे ! ही गोष्ट खरी असेल तर यापूर्वी त्याच्या विजयाच्या गोष्टी लिहिल्या होत्या त्या खोट्याच म्हटल्या पाहिजेत. मिसर देशातील मुले व मुली यांना ठार मारण्यापुरताच तो शूरवीर बनला होता? आणि आता शुरवीरांसमोर गप्प बसला काय ? अशा प्रकारे ख्रिस्त्यांच्या ईश्वराने आपलीच निंदा व अप्रतिष्ठा करून घेतली. या पुस्तकामध्ये अशाच हजारो निरर्थक कहाण्या भरलेल्या आहेत. ॥५९॥

जुना करार, भाग दुसरा (जबूर) कालवृत्तांत १
बायबलचा क्रूरकर्मा ईश्वर

(६०) म्हणून परमेश्वराने इसराईलवर मरी (रोगराई) धाडली आणि इसराईल मधील सत्तर हजार माणसे पडली. (मेली.) -जबूर २। काल० पु० प० २१। आ० १४।।

(समीक्षक) ही पाहिलीत इसराईलच्या ख्रिस्त्यांच्या ईश्वराची लीला? ज्या इसराईलच्या वंशाला ईश्वराने पुष्कळ वर दिले होते आणि ज्यांच्या पालनपोषणासाठी तो अहोरात्र धडपडत होता त्याच ईश्वराने आता रागाच्या सपाट्यात मरी घालून सत्तर हजार माणसे मारून टाकली. एका कवीने जे लिहिले आहेत ते खरेच आहे. तो म्हणतो,

क्षणे रुष्टः क्षणे तुष्टो रुष्टस्तुष्टः क्षणे क्षणे ।
अव्यवस्थितचित्तस्य प्रसादोऽपि भयंकरः ।।

जसा एखादा माणूस क्षणात प्रसन्न तर क्षणात अप्रसन्न होतो म्हणजे ज्याची वृत्ती क्षणाक्षणाला बदलते त्याची प्रसन्नताही भयंकर असते, तशीच ही ख्रिस्त्यांच्या ईश्वराची विचित्र लीला आहे. ॥६०॥

ईयोबाचे पुस्तक

(६१) आणि एके दिवशी असे झाले की परमेश्वरासमोर ईश्वराचे पुत्र येऊन उभे राहिले, आणि सैतानही त्यांच्यामध्ये परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला... आणि परमेश्वराने सैतानाला विचारले, "तू कोठून आलास?" तेव्हा त्या सैतानाने उत्तर देऊन परमेश्वराला सांगितले की, "पृथ्वीवर इकडे-तिकडे हिंडत-फिरत मी आलो आहे. तेव्हा परमेश्वराने सैतानाला विचारले, "माझा दास ईयोब (ऐयूब) याची पारख केली आहेस काय? पृथ्वीच्या पाठीवर त्याच्यासारखा कोणी नाही. तो सिद्ध पुरुष, प्रामाणिक असून तो ईश्वराला भितो व पापापासून दूर राहतो. त्याने अजूनही सचोटी सोडलेली नाही. असे असताना तू निष्कारण त्याचा नाश करण्यास मला चिथावलेस."... तेव्हा सैतानाने उत्तर म्हणून परमेश्वराला सांगितले की, "कातडीसाठी

28
कातडी! माणसाजवळ जे काही असते ते सारे तो आपल्या प्राणासाठी देईल. परंतु आता तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडांना व मांसाला स्पर्श कर आणि पाहा. तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील."... यावर परमेश्वर सैतानाला म्हणाला, "पाहा! तो तुझ्या हातात आहे. पण तू त्याचे प्राण वाचव. ".... तेव्हा सैतान परमेश्वराच्या समोरून गेला, आणि त्याने ईयोबाला मोठमोठ्या फोडांनी (गळवांनी) तळपायापासून मस्तकापर्यंत हैराण केले. -जबूर ऐयू० प० २। आ० १। २। ३। ४। ५। ६। ७।।

(समीक्षक) हे पाहा ख्रिस्त्यांच्या ईश्वराचे सामर्थ्य। सैतान त्याच्या समोर त्याच्या भक्तांना यातना देतो. पण तो परमेश्वर सैतानाचे पारिपत्य करीत नाही. आपल्या भक्तांना वाचवू शकत नाही, अथवा त्याच्या दूतांपैकी कोणी सैतानाशी सामना करू शकत नाही. एकट्या सैतानाने सर्वांना भयभीत करून सोडले आहे. शिवाय ख्रिस्त्यांचा ईश्वर सर्वज्ञही नाही. तो सर्वज्ञ असता तर त्याने ईयोबाची पारख करायला सैतानाला का सांगितले असते?॥६१॥

उपदेशांचे पुस्तक

(६२) होय! माझ्या अंत:करणाने बुद्धी (शहाणपण) व ज्ञान यांचा खूप अनुभव घेतला आहे... आणि मी शहाणपण व मूर्खपणा व वेडपटपणा म्हणजे काय हे जाणून घेण्याच्या कामी माझे मन लावले. मला असे आढळून आले की तीही मनाची गांजणूकच आहे.... कारण अधिक बुद्धीत (शहाणपणात) अधिक यातना असतात आणि ज्याचे ज्ञान वाढते त्याचे दु:खही वाढते. -जन उ० प० १। आ० १६। १७। १८।।

(समीक्षक) आता पाहा ! बुद्धी आणि ज्ञान हे दोन पर्यायवाची शब्द असून त्यांना हे लोक भिन्न मानतात. बुद्धी वाढली की शोक व दुःख होते असे मानणे हे अविद्वानांचे काम आहे. विद्वान माणूस असे कसे लिहिल? यावरून हे बायबल ईश्वराने तर नव्हेच, एखाद्या विद्वानानेही रचलेले नाही, हे सिद्ध होते. ॥६२॥

येथपर्यंत आम्ही जुन्या करारातील काही भागांविषयी थोडक्यात विवेचन केले; यानंतर मत्तयकृत शुभवर्तमान वगैरे नव्या करारातील काही भागांविषयी थोडक्यात विवेचन करू. कारण ख्रिस्ती लोक या नव्या कराराला प्रमाणभूत धर्मग्रंथ मानतात. त्याला ते 'नवा करार' असे म्हणतात. तेच त्याचे इन्जील ठेवले आहे त्यात काय लिहिले आहे ते पाहिले की त्याची पारख होईल.

नवा करार अथवा पवित्रशास्त्र मत्तयकृत शुभवर्तमान
कुमारी मातेपासून येशूचा जन्म

(६३) येशु खिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दाण झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली अशी दिसण्यात आली... तो त्या गोष्टींच्या विचारात आहे तो पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू आपली बायको मरीया हिचा स्विकार करावयाला भिऊ नको, कारण तिच्या ठायी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे." -इं० प० १। आ० १८। २०।।

29
(समीक्षक) या गोष्टी प्रत्यक्षादी प्रमाणे आणि सृष्टिक्रम यांच्या विरुद्ध असल्यामुळे त्या कोणीही विद्वान मान्य करू शकणार नाही. या गोष्टींवर मूर्ख आणि जंगली माणसेच विश्वास ठेवतील. सभ्य विद्वान त्या कधीही मानणार नाहीत. तुम्हीच पाहा! जो परमेश्वराचा नियम आहे तो कोण मोडू शकेल? खुद्द परमेश्वरच आपल्या नियमाचा भंग करील तर त्याची आज्ञा कोणीही पाळणार नाही; आणि तो परमेश्वरही सर्वज्ञ व निर्भ्रान्त राहणार नाही, मरीयाला ज्याप्रकारे गर्भ राहिला त्याप्रकारे कोणतीही कुमारिका गरोदर राहील त्या सगळ्या ईश्वरापासून गरोदर आहेत असे कोणालाही म्हणता येईल आणि त्या कुमारिका असे खोटेनाटेच सांगू लागतील की, "परमेश्वराच्या दूताने स्वनात येऊन मला असे सांगितल की, हा गर्भ परमात्म्याकडून आहे." वस्तुतः ही अगदी अशक्य गोष्ट आहे. याचप्रमाणे सूर्यापासून कुंती गर्भवती झाली वगैरे ज्या गोष्टी पुराणात लिहिलेल्या आहेत त्याही सर्व असंभव आहेत. अशा गोष्टींना अज्ञानी निर्बुद्ध लोक मानतात आणि भ्रमजाळात पडतात. अशी गोष्ट झाली असेल की एखाद्या पुरुषाशी समागम झाल्याने मरीया गरोदर राहिली असावी. मग तिने किंवा दुसऱ्या कोणीतरी तो गर्भ ईश्वराकडून असल्याची असंभव गोष्ट पसरविली असावी. ॥६३॥

(६४) तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आल्याने त्याला रानात नेले.. .मग तो चाळीस दिवस व चाळीस रात्र उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, "तू देवाचा पुत्र असलास तर या दगडाच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर."  -इं० मत्ती प० ४। आ० १। २। ३।।

(समीक्षक) यावरून ख्रिस्त्यांचा ईश्वर सर्वज्ञनाही, हे स्पष्ट सिद्ध होते. कारण तो सर्वज्ञ असता तर त्याने येशूची परीक्षा सैतानाकडून का करविली असती? स्वतःने जाणले असते. आजकाल एखाद्या ख्रिस्त्याला चाळीस रात्री व चाळीस दिवस उपाशी ठेवले तर तो जगू शकेल काय? यावरून हेही सिद्ध झाले की येशु हा ईश्वरचा पुत्रही नव्हता अथवा त्याच्याजवळ कसलीही किमया म्हणजे सिद्धीही नव्हती. तशी सिद्दी असती तर त्याने सैताना समक्ष दगडाच्या भाकरी बनवून का दाखविल्या नसत्या आणि तो स्वतः उपाशी कशाला राहिला असता? खरे म्हणजे परमेश्वराने जे दगडधोंडे बनविले आहेत त्यांच्या भाकरी बनविणे कोणालाही शक्य नाही आणि ईश्वरही पूर्वी केलेले नियम बदलू शकत नाही. कारण तो सर्वज्ञ आहे आणि त्याची कामे चुकभूलविना आहेत.॥६४॥

(६५) त्याने त्यांना म्हटले, “माझ्या मागून या. मी तुम्हाला मासे पकडणारे (कोळी) बनवीन." मग ते ताबडतोब आपली जाळी तेथेच सोडून देऊन त्याच्या मागून चालले. -इं० मत्ती प० ४। आ० १९। २०।।

(समीक्षक) जुन्या करारामध्ये ज्या दहा आज्ञा तौरैत ग्रंथात सांगितलेल्याः आहेत त्याप्रमाणे “आपल्या आईबापांचा मान ठेवा. म्हणजे तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. परंतु येशूने आपल्या आईबापांची सेवा केली नाही आणि इतरांनाही आईबापाच्या सेवेपासून परावृत्त करून आपल्या जाळ्यात अडकविले. या पापामुळेच तो चिरंजीव झाला नाही असे दिसते. या घटनेवरून हेही लक्षात येते मासळीप्रमाणे माणसांना आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी त्याने आपला एक पंथ सुरू केला. खुद्द येशूच असा आहे मग आजकालचे पाद्री लोक आपल्या जाळ्यात माणसाना अडकवीत असतील तर

30
त्यात काय आश्चर्य ? कारण ज्याप्रमाणे मोठमोठे व पुष्कळ मासे जाळ्यात पकडणाऱ्याची प्रतिष्ठा वाढते व त्याचा चरितार्थ उत्तम चालतो त्याचप्रमाणे जो अनेक लोकांना आपल्या पंथात ओढतो त्याची प्रतिष्ठा वाढते आणि याचा चरितार्थ उत्तम चालतो. म्हणूनच ज्यांनी वेदांचे व शास्त्रांचे पठण व श्रवण केलेले नाही अशा बिचाऱ्या भोळ्याभाबड्या माणसांना हे ख्रिस्ती लोक आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्या आईबापांपासून व कुटुंब वगैरे पासून वेगळे करतात. म्हणून सर्व विद्वान आर्यांनी स्वतः त्यांच्या भ्रमजाळापासून दूर राहून आपल्या इतर भोळ्या भाबड्या बांधवांना वाचविण्यात तत्पर राहवे. ॥६५॥

रोग्यांना बरे करणे

(६६) नंतर येशू सभास्थानांत शिक्षण देत, राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकातले सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व गल्लीभर फिरला... आणि त्याची कीर्ती सूरिया (सीरिया) देशभर पसरली; तेव्हा ज्यांस नाना प्रकारचे रोग व वेदना लागल्या होत्या, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षघाती होते अशा सर्व दुखणेकऱ्यांस त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांस बरे केले. -इं० मत्ती प० ४। आ० २३। २४।।

(समीक्षक) आजकाल मंत्र, तंत्र, पुरश्चरण, आशीर्वाद, गंडा, ताईत, भस्म, चुटकी वगैरे उपायांनी भूतेखेते पळून जातात आणि रोग बरे होतात हे खरे असेल तर बायबलाची गोष्ट खरी व्हावी याचे कारण भोळ्याभाबड्या लोकांना फसविण्यासाठी या गोष्टी आहेत. येशूने केलेले चमत्कार खरे होते असे जर, ते लोक मानत असतील तर येथील देवऋष्यांचे (भोप्यांचे) चमत्कार ते का खोरे मानीत नाहीत? कारण या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत. ॥६६॥

(६७) जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. मी तुम्हांस खचित सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावाचून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदू नाहीसा होणार नाही.... यास्तव जो कोणी या अगदी लहान आज्ञांतील एकही रद्द करील व तद्नुसार लोकांस शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. -इं० मत्ती प० ५। आ० ३। १८। १९।।

(समीक्षक) जर स्वर्ग एक असेल तर राजाही एकच असला पाहिजे. त्यामुळे जितके दीनदुबळे आहेत ते सर्व स्वर्गात गेले तर स्वर्गातील राज्यावर अधिकार कोणाचा होईल? म्हणजे ते आपसात भांडणतंटे करतील आणि सगळी राज्यव्यवस्था खिळखिळी होऊन जाईल आणि ‘दीन' म्हणजे कंगाल लोक असे असेल तर ते बरोबर नाही. दीन म्हणजे निरभिमानी असा अर्थ घेतला तर तेही बरोबर नाही. कारण दीन आणि निरभिमान यांचा अर्थ एकच नाही. परंतु जो मनाने दीन असतो त्याला कधीच समाधान लाभत नाही. म्हणून तो अर्थही बरोबर नाही. जेव्हा आकाश व पृथ्वीही निघून जातील तेव्हा व्यवस्थाही नाहीशी होईल. अशी अनित्य व्यवस्था माणसांची असते. सर्वज्ञ ईश्वराची नसते. जो या आज्ञांचे पालन करणार नाही तो स्वर्गामध्ये सर्वात लहान समजला जाईल असे प्रलोभन व भय दाखविले आहे.॥६७॥

31
(६८) आमची रोजची भाकरी आज आम्हांस दे.... पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका.-इं० म० प० ६। आ० ११। १९।।

(समीक्षक) यावरून असे दिसून येते की ज्या काळी येशूचा जन्म झाला होता त्या काळी माणसे जंगली व दरिद्री होती; आणि येशुही तसाच दरिद्री होता. म्हणूनच तो रोजची भाकरी मिळावी यासाठी ईश्वराची प्रार्थना करतो आणि अनुयायांना शिकवितो. असे आहे तर ख्रिस्ती लोक धनाचा संचय का करतात? येशूच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपली सारी संपत्ती दान करून त्यांनी दीन बनले पाहिजे. ॥६८॥

(६९) मला हे प्रभो, हे प्रभो असे म्हणतो तो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. -इं० म० प० ७। आ० २१।।

(समीक्षक) आता तुम्हीच विचार करा. मोठेमोठे पाद्री, बिशप साहेब व ख्रिस्ती लोक येशूचे हे वचन सत्य समजत असतील तर ते येशूला कधीही प्रभू म्हणजे ईश्वर म्हणणार नाहीत. ही गोष्ट त्यांनी मान्य केली नाही तर ते पापापासून केव्हाही वाचू शकणार नाहीत. ॥६९॥

(७०) त्या दिवशी मला अनेकजण म्हणतील "प्रभुजी, प्रभुजी, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली, व तुझ्या नावाने बहुत अद्भुत कृत्ये केली नाहीत काय?" तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, "माझी तुमची कधीच ओळख नव्हती. अहो, अधर्म करणाऱ्यांनो,मजपुढून निघून जा." -इं० म० प० ७। आ० २२। २३।।

(समीक्षक) पाहा! जंगली माणसांची खात्री पटविण्यासाठी येशु आपण स्वर्गातील न्यायाधीश बनू पाहत होता ही भोळ्या लोकांना प्रलोभन दाखविण्याची एक क्लृप्ती आहे.॥७०॥

(७१) तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी येऊन त्याच्या पाया पडत म्हणाला, "प्रभुजी, तुझी इच्छा असली तर मला शुद्ध करावयास तु शक्तिमान आहेस." त्यावर त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, "माझी इच्छा आहे. शुद्ध हो." तेव्हाच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. -इं० म० प० ८। आ० २। ३।।

(समीक्षक) या सगळ्या गोष्टी भोळ्या भाबड्या लोकांना फसविण्यासाठी आहेत. ज्ञान व सृष्टिक्रम यांच्याविरुद्धच्या गोष्टींना जर ख्रिस्ती लोक खऱ्या मानतात तर पुराणांत व महाभारतातील गोष्टी खऱ्या मानाव्या लागतील. जसे शुक्राचार्य, धन्वन्तरी, कश्यप इत्यादींनी अनेक दैत्यांच्या मेलेल्या सैन्याला जिवंत केले होते. बृहस्पतीचा मुलगा कच याचे तुकडे-तुकडे करून ते हिंस्र प्राण्यांना व माशांना खाऊ घातले होते. तरीही शुक्राचार्यांनी कचाला जिवंत केले. मग कचाला मारून त्याचे मांस शुक्राचार्याला खाऊ घातले गेले तरीही शुक्रचार्याने त्याला पोटात जिवंत करून बाहेर काढले. या प्रकरणात शुक्राचार्य स्वत: मेला पण कचाने त्याला जिवंत केले. कश्यप ऋषीने तक्षकाकडून भस्म केली गेलेली झाडे व माणसे पुनः जिवंत केली. धन्वन्तरीने लाखो प्रेते जिवंत केली. लाखो कुष्ठरोग वगैरे बरे केले. लाखो आंधळ्यांना दृष्टी दिली आणि बहिऱ्यांना श्रवणशक्ती मिळवून दिली. या गोटीखोट्या असतील तर येशूच्या चमत्काराच्या गोष्टी खोट्या का नाहीत ? जे लोक इतरांच्या गोष्टी खोट्या आणि आपल्या खोट्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणतात ते हटवादीच नव्हेत काय? म्हणून ख्रिस्त्यांच्या ह्या कथा हठधर्मी का नाहीत? ॥७१॥

32
(७२) मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त माणसे कबरीतून निघून येत असताना त्याला भेटली. ती इतकी उग्र होती की त्या वाटेने कोणाच्याने जाववत नसे, ... तेव्हा पाहा? तो ओरडून म्हणाली, "हे देवाच्या पुत्रा, आमचा व तुझा काय संबंध? नेमलेल्या समयापूर्वी तूआम्हांस पीडा द्यावयास येथे आला आहेस काय?".. तेथे त्यांजपासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. .. मग त्या भूतांनी त्याला विनंती केली की, "तू जर आम्हांला काढीत असलास तर आम्हांस त्या डुकरांच्या कळपात पाठव." .... त्याने त्यांस म्हटले, "जा!" मग ती निघून डुकरात शिरली आणि पाहा! तो सारा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. -इं० म० प० ८। आ० २८। २९। ३१। ३२।।

(समीक्षक) आता तुम्ही थोडा विचार कराल तर या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत कारण मेलेला माणूस कबरीतून कधीही बाहेर येऊ शकत नाही. मेलेली माणसे कोणाच्या अंगात प्रवेश करीत नसतात अथवा कोणाशी बोलतही नसतात. असल्या गोष्टी अडाणी लोकांच्या आहेत; जे महाजंगली असतात तेच असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. येशूने त्या डुकरांची हत्या करविली. त्या डुकरांच्या मालकाचे जे नुकसान झाले त्याचे पाप येशूला नक्कीच लागले असणार ! ख्रिस्ती लोक येशू हा पापाबद्दल क्षमा करणारा व पवित्र करणारा मानतात. मग तो त्या भुतांनाच का पवित्र करू शकला नाही? आणि डुकरांच्या मालकांना नुकसान भरपाई का दिली नाही? आजकालचे सुशिक्षित ख्रिस्ती इंग्रज या  भाकड कथांवर विश्वास ठेवीत असतील काय? जर ठेवीत असतील तर ते भ्रमजाळात पडले आहेत. ॥७२॥

(७३) मग पाहा, खाटेवर पडलेल्या कोण्या एका पक्षाघाती माणसास त्याजकडे आणले. तेव्हा येशु त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, "मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मी धार्मिकांस नव्हे तर पापी जनांस बोलवावयास आलो आहे. -इं० म० प० ९। आ० २। १३।।

(समीक्षक) वर सांगितल्याप्रमाणे ही गोष्टीही तशीच असंभव आहे आणि पापाची क्षमा करण्याविषयी लिहिले आहे ते केवळ भोळ्या लोकांना प्रलोभन दाखवून फसविण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे एकाने प्यालेल्या दारूची अथवा भांगेची आणि खाल्लेल्या अफूची नशा दुसऱ्याला चढत नाही त्याचप्रमाणे एकाने केलेले पाप दुसऱ्याला लागत नाही; तर जो पाप करतो तोच त्याची फळे भोगतो. हाच ईश्वराचा न्याय आहे. जर एकाने केलेले पापपुण्य दुसऱ्याला लागेल अथवा न्यायाधीश ते स्वतःवर ओढवून घेईल किंवा ते करणाऱ्यांना ईश्वर यथायोग्य फळ न देईल तर तो अन्याय करणारा ठरेल. पाहा ! धर्मच कल्याणकारक आहे. येशू किंवा दुसरा कोणी नाही. धर्मात्म्यांना तारण्यासाठी येशूची मुळीच आवश्यकता नाही आणि पाप्यांना त्याची गरजसुद्धा नाही. कारण पाप कुणाचेही सुटू शकत नाही. ॥७३॥

मी शांततेसाठी आलो नाही

(७४) तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यांस जवळ बोलावून त्यांनी अशुद्ध आत्म्यांस काढावे आणि सर्व प्रकारचे विकार व सर्व प्रकारची दुखणी बरी करावी असा अधिकार त्यांस दिला... कारण बोलणारे तुम्ही
33
नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुम्हांमध्ये बोलणार आहे.... मी पृथ्वीवर शांतता चालवावयास आलो असे समजू नका. मी शांतता चालवावयास नव्हे तर तलवार चालवावयास आलो आहे.. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांत विरोध पाडण्यास मी आलो आहे. ...आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. -इं० म० प० १०। आ० १। २०। ३४। ३५। ३६।।

(समीक्षक) ज्याने ३० रुपयांच्या लोभाने येशूला पकडून दिले आणि ज्यांनी बदलून ऐन वेळी पळ काढला तेच येशूचे बारा प्रिय शिष्य होते. भुते अंगात संचारणे अथवा ती काढून टाकणे, औषध किंवा पथ्यपाणी यांच्या मदतीशिवाय रोग बरे करणे या गोष्टी ज्ञानाच्या व सृष्टिक्रमाच्या विरुद्ध असंभव आहेत. म्हणून असल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवणे हे अज्ञानी लोकांचे काम आहे. जरजीव बोलणारे नसून ईश्वरच बोलणारा असेल तर जीव काय काम करतात ? तसेच सत्य वा असत्य भाषणाचे फळ म्हणून मिळणारे सुख अथवा दुःख ईश्वर भोगत असेल तर तीही एक खोटी गोष्ट आहे. येशू या जगात फूट पाडण्यास व भांडणे लावण्यासाठी आला होता. तोच आजकाल कलह लोकांमध्ये चालू आहे. फूट पाडणे ही किती वाईट गोष्ट आहे! कारण त्यामुळे माणसांना सर्वथा दुःखच होते. ख्रिस्ती लोकांनी हाच कलहाचा गुरुमंत्र समजला असावा. कारण लोकांमध्ये फाटाफूट असणे ही गोष्ट चांगली आहे असे येशूच समजत होता. मग ख्रिस्ती लोक तसे का समजणार नाहीत? घरच्या लोकांना घरच्या लोकांचे शत्रु बनविणे हे येशूचेच काम असणार. ते श्रेष्ठ पुरुषाचे काम असू शकत नाही. ॥७४॥

(७५) येशूने त्यांस विचारले, "तुम्हांजवळ किती भाकरी आहेत ? ते म्हणाले" सात, व काही मासळल्या." ...मग त्याने लोकसमुदायांस जमिनीवर बसावयास सांगितले.... नंतर त्याने त्या सात भाकरी व मासळ्या घेऊन उपकारस्तुती केली, त्यामोडून शिष्यांस दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायाला दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या भरून घेतल्या जेवणाऱ्यांमध्ये चार हजार पुरुष होते. शिवाय स्त्रिया व मुले निराळीच होती..... -इं० म० प० १५। आ० ३४। ३५। ३६। ३७। ३८।।

(समीक्षक) आता पाहा! आजकालचे दांभिक सिद्ध व जादूगार यांच्य हातचलाखीच्या गोष्टीसारखीच ही लबाडीची गोष्ट नाही काय? त्या भाकरांमध्ये इतर भाकरी कोठून आल्या? येशुजवळ अशा सिद्धी होत्या तर स्वतःला भूक लागल्यावर उंबराची फळे खाण्यासाठी तो का भटकत असे ? त्याने स्वतःसाठी माती, पाणी व दगड यांच्यापासून मोहनभोग, भाकरी वगैरे का बनविल्या नाहीत ? या सगळ्या गोष्टी पोरकटपणाच्या आहेत. जसे लबाड साधू, बैरागी असल्या लबाड गोष्टी करून भोळ्याभाबड्या लोकांना फसवितात तसेच हेही आहेत. ॥७५ ॥

(७६) आणि त्या समयी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देईल. -इं० म० प० १६। आ० २७।।

(समीक्षक) जर कर्मानुसारच माणसाला फळ मिळणार असेल तर ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्या पापाची क्षमा मिळते असा उपदेश करणे व्यर्थ आहे आणि कर्मानुसार फळ मिळते हे खरे असेल तर हा उपदेश खोटा ठरतो. जर कोणी असे म्हणेल की क्षमा करण्यास योग्य असणाऱ्यांना क्षमा केली जाते आणि क्षमा

34
करण्यास योग्य नसणाऱ्यांना क्षमा केली जात नाही तर तेही बरोबर नाही. कारण सर्व कर्माची फळे यथायोग्यपणे दिल्यानेच न्याय व पूर्ण दया होते. ॥७६॥

येशूचे विज्ञान विरोधी वचन

(७७) "हे अविश्वासी व कुटिल पिढीच्या लोकांनो, मी कोठवर तुम्हांबरोबर राहू? कोठवर तुमचे सोसू? कारण मी तुम्हांस खचित सांगतो की जर तुम्हांमध्ये मोहरीच्या दाण्याएवढा जरी विश्वास असेल तर या डोंगराला येथून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हांला काहीच असाध्य असणार नाही. -इं० म० प० १७। आ० १७। २०।।

(समीक्षक) ख्रिस्ती लोक असा उपदेश करीत फिरत असतात की, "आमच्या मतात या, क्षमा मिळवा आणि मुक्ती प्राप्त करा." पण ते सारे खोटे आहे.कारण येशुमध्ये पापाचे निवारण करण्याचे, श्रद्धा बसविण्याचे व पवित्र करण्याचे सामर्थ्य असते तर त्याने आपल्या शिष्यांच्या आत्म्यांना निष्पाप, श्रद्धावान व पवित्र का केले नाही? जे लोक येशूच्या सहवासात राहून त्याच्याबरोबर फिरत असत त्यांनाच तो शुद्ध विश्वासू आणि पापमुक्त करू शकला नाही तर तो मेल्यानंतर आता-तो कोठे आहे कोण जाणे! कोणालाही पवित्र बनवू शकणार नाही. येशूच्या चेल्यांमध्ये मोहरी एवढीही श्रद्धा नव्हती आणि त्यांनीच हे बायबल तयार केले आहे. म्हणून ते प्रमाणभूत असू शकत नाही. कारण जे अविश्वासू, अपवित्रात्मा, अधर्मी असतात अशा माणसांच्या लिखाणावर विश्वास ठेवणे हे कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या माणसाचे काम नव्हे. यावरून हेही सिद्ध होते की येशूचे हे वचन खरे असेल तर एकाही ख्रिस्ती माणसामध्ये एका मोहरीच्या दाण्या एवढाही विश्वास म्हणजे श्रद्धा नाही. जर कोणी असे म्हणत असेल की आमच्यामध्ये पूर्ण किंवा थोडी श्रद्धा आहे तर त्याला म्हणावे, "हा जो डोंगर वाटेत आला आहे तो जरा पलीकडे सरकवा." जर त्याच्या प्रयत्नाने तो डोंगर सरकला तर त्याच्यामध्ये पूर्ण श्रद्धा नाही मोहरीच्या एका दाण्याएवढी श्रद्धा अवश्य आहे. परंतु जर त्याला तो डोंगर सरकविता आला नाही तर ख्रिस्ती लोकांमध्ये विश्वास, श्रद्धा म्हणजेच धर्म यांचा लवलेशही नाही असे खुशाल समजावे. जर कोणी असे म्हणेल की येथे अभिमान वगैरे दोषांसाठी डोंगर हा शब्द वापरलेला आहे, तर तेही बरोबर नाही. कारण जर असे असेल तर प्रेते, आंधळे, महारोगी, भूतग्रस्त यांना येशूने जिवंत व बरे केल्याच्या बायबलात ज्या गोष्टी आहेत त्याठिकाणी आळशी, अज्ञानी, विषयासक्त व भ्रांतचित लोकांना उपदेश करून ख्रिस्ताने सचेत (सावध) व कुशल बनविले असा अर्थ लावता येईल. परंतु असा अर्थ लावणेही बरोबर होणार नाही. कारण मग तो आपल्या शिष्यांनाच सावध व हुशार का बनवू शकला नाही? म्हणून अशा असंभव गोष्टी सांगणे ही गोष्ट येशूचे अज्ञानच दर्शविते. येशूजवळ विद्या किंवा ज्ञान असते तर त्याने जंगली लोकांसारख्या मूर्खपणाच्या गोष्टी कशाला उच्चारल्या असत्या ? तथापि 'यत्र देशे द्रुमो नास्ति तत्रैण्डोऽपि द्रुमायते' किंवा 'निरस्तपादपे देशे एरंडोऽपि द्रुमायते' म्हणजे ज्या देशात एकही मोठा वृक्ष नसतो तेथे एरंडाचे झाड हाच सर्वात मोठा व उत्तम वृक्ष समजला जातो, या न्यायाने महाजंगली लोकांच्या देशात येशूलाही श्रेष्ठत्व प्राप्त होणे स्वाभाविक होते. परंतु आजकाल येशूची काय गणती होऊ शकते ? येशू कोणाच्या खिजगणतीत असणार? ॥७७॥

35
(७८) मी तुम्हांस खचित सांगतो, "तुमचे मन वळल्याशिवाय व तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही." -इं० म० प० १८। आ० ३।।

(समीक्षक) आपल्याच इच्छेने मन वळविणे हे स्वर्गप्राप्तीला आणि नवळविणे नरकप्राप्तीला कारणीभूत होत असेल तर कोणीही कोणाचे पापपुण्य कधी घेऊ शकत नाही, असे सिद्ध होते आणि बालकांसारखे होण्याचा जो उल्लेख आला आहे त्यावरून असे लक्षात येते की येशूच्या गोष्टी ज्ञान आणि सृष्टिक्रम यांच्या विरोधी होत्या आणि त्याच्या मनात असाही विचार होता की लोकांनी माझे म्हणणे लहान मुलांप्रमाणे डोळे मिटून मान्य करावे, काहीही प्रश्न विचारू नयेत. पुष्कळसे ख्रिस्ती लोक बाळबुद्धीचे असल्यासारखेच वागतात. नाहीतर अशा तर्कविसंगत, ज्ञानविरोधी गोष्टी त्यांनी का मानल्या असत्या ? तसेच हेही सिद्ध झाले की येशू स्वतः विद्याविहीन व बालिश नसता तर इतरांना बालवत बनण्याचा उपदेश त्याने का केला असता? याचे कारण एवढेच की जो जसा असतो तो इतरांनाही आपल्यासारखेच बनवू इच्छितो. ॥७८॥

(७९) तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले "मी तुम्हांस खचित सांगतो की स्वर्गाच्या राज्यात धनवनाचा प्रवेश होणे कठिण आहे...मी आणखी तुम्हास सांगतो की देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या वेढ्यातून जाणे सोपे आहे." -इं० म० प० १९। आ० २३। २४।।

(समीक्षक) यावरून हे सिद्ध होते की येशु दरिद्री होता. श्रीमंत लोक त्याला मान देत नसणार. म्हणून त्याने हे लिहिले असावे. परंतु त्याचे हे म्हणणे बरोबर नाही. कारण श्रीमंत व गरीब लोकांमध्ये बरे-वाईट असतात. जो कोणी चांगले काम करील त्याला चांगले फळ व वाईट काम करील त्याला वाईट फळ मिळते. त्यावरून हेही सिद्ध होते की येशु ईश्वरी राज्य एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित मानत होतो सर्वत्र नव्हे, असे असल्यामुळे तो खरा ईश्वरच नव्हे. कारण जो ईश्वर आहे त्याचे राज्य सर्वत्र आहे. शिवाय त्या स्वर्गाच्या राज्यात कोण प्रवेश करील अथवा करणार नाही असे म्हणणे हे अज्ञानजनक आहे. याप्रमाणे हेही आले की जेवढे ख्रिस्ती लोक धनाढय आहेत ते सारे नरकातच जातील काय? आणि सगळे दरिद्री लोक स्वर्गात जातील काय? येशु ख्रिस्ताने थोडा विचार केला असता की श्रीमंतांजवळ जेवढी साधनसामग्री असते तेवढी गरिबांजवळ नसते आणि धनाढ्य लोक आपल्या संपत्तीचा विनियोग विवेकपूर्वक धर्मसंमत कामांसाठी करतील तर त्यांना उत्तम गती प्राप्त होऊ शकेल आणि गरिबांजवळ साधनसंपत नसल्यामुळे ते दुर्दशेत खितपत पडतील. ॥७९॥

(८०) येशूने त्यांस म्हटले की, "मी तुम्हांस खाचित सांगतो की पुनरुत्पत्तीत मानवाचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजसिंहासनावर बसेल तेव्हा माझ्यामागून आलेले तुम्हीही बारा राजसहासनावर बसून इसराईलच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल... आणि ज्या कोणी घर, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहेत त्याला शंभरपट मिळून सार्वकालिक (अनंत) जीवन हे वतन मिळेल. -इं० म० प० १९। आ० २८। २९।।

(समीक्षक) आता मात्र येशूच्या मनातले बिंग बाहेर पडले. आपण गेल्यानंतरही लोकांनी आपल्या जाळ्यातून निसटून जाऊ नये. ३० रुपयांच्या लोभापायी ज्याने आपल्या गुरूला म्हणजे येशूला पकडून दिले

36
आणि ठार मारविले तो नराधमही त्याच्या बारा शिष्यांमध्ये होता. इतरांबरोबर तोही येशूच्या सिंहासनाजवळ असणाऱ्या सिंहासनावर बसणार आणि इसराईलच्या वंशाचा पक्षपाताने न्यायनिवाडा करणार. एवढेच नव्हे तर त्यांचे सर्व गुन्हे माफ करणार आणि इतर वंशांचाही न्यायनिवाडा करणार! यावरून असे अनुमान निघते की ख्रिस्ती लोक न्यायनिवाडा करताना ख्रिस्त्यांच्या बाबतीत पक्षपात करतात. एखाद्या गोऱ्या इसमाने काळ्या माणसाला ठार मारले असले तरी बहुधा पक्षपात करून त्याला निरपराधी ठरवितात व सोडून देतात. तसाच येशूच्या स्वर्गाचा न्यायही असाच असणार अंतिम निवाड्याच्या एकाच दिवशी सर्वांचा न्यायनिवाडा करण्याच्या या पद्धतीत एक मोठा दोष आहे. तो असा की एक माणूस सृष्टिच्या प्रारंभीच मेला; आणि दुसरा न्यायदानाच्या आदल्या रात्री मेला. आता जो आधी मेला असेल त्याला सृष्टिच्या सुरुवातीपासून अंतिम प्रलयापर्यंत आपला न्यायनिवाडा केव्हा होणार याची वाट पहत बसावे लागणार आणि दुसऱ्याला झटपट न्याय मिळणार. हा केवढा मोठा अन्याय आहे ! शिवाय जो नरकात जाईल तो अनंत काळापर्यंत नरकातच राहणार आणि जो स्वर्गात जाईल तो सदैव स्वर्गसुखाचा उपभोग घेत राहणार. हाही मोठा अन्याय आहे. कारण अंत असणारी साधने व कर्मे यांच्या फळांनाही अंत असला पाहिजे शिवाय दोन जीवांची पापे अथवा पुण्ये कधीच सारखी नसतात. त्यामुळे तारतम्यानुसार कमी-जास्त सुख-दुखे असणारे अनेक स्वर्ग वनरक असतील तरच सुख-दुःख भोगता येतील. परंतु तशा प्रकारची व्यवस्था ख्रिस्त्यांच्या मतग्रंथात कोठेच दिसत नाही. म्हणून बायबल हे ईश्वरकृत ठरू शकत नाही अथवा येशूही ईश्वराचा मुलगा होता असे म्हणता येत नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीला शंभर आईबाप असू शकत नाहीत. तसे समजणे मोठा अनर्थ आहे. कारण एका व्यक्तीची एकच आई व एकच बाप असतो. पण बायबलात म्हटले आहे की, "ज्या कोणी आई, बाप, मुले. सोडली आहेत त्याला ती शंभरपट मिळतील" कुरानात अनुमान आहे की मुसलमानांनी स्वर्गात ७२ स्त्रिया मिळतील असे लिहिले आहे त्याप्रमाणेच हा विचार आहे. ॥८०॥

(८१) मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली... आणि वाटेवर अंजिराचे एक झाड पाहून तो त्याकडे गेला. पण पानांवाचून त्यावर त्याला काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येवो." आणि ते अंजिराचे झाड लागलीच वाळून गेले. -इं० म० प० २१। आ० १८। १९।।

(समीक्षक) सर्व पाद्री आणि ख्रिस्ती लोक असे सांगतात की येशू अत्यंत शांत, क्षमाशील आणि क्रोधादी दोषांपासून मुक्त होता. परंतु या घटनेवरून तो अत्यंत रागीट होता व त्याला ऋतूंविषयीचे ज्ञान नव्हते. तो जंगली स्वभावाच्या माणसासारखा वागत होता. वस्तुतः वृक्ष हा जड परंतु मोसम नसल्यामुळे त्याच्यावर फळे नव्हती. यात त्याचा काय अपराध होता? पण येशूने त्याला शाप दिला व तो वाळून गेला. कदाचित ते झाड त्याच्या शापाने वाळले नसणार. त्याच्यावर काहीतरी औषध टाकल्यामुळे ते वाळून गेले असेल तर त्यात आश्चर्य नाही. ॥८१॥

(८२) त्या दिवसांतील संकटांमागून लागलीच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पतन पावतील आणि आकाशाची दळे डळमळतील. -इं० म० प० २४। आ० २९।।

37
(समीक्षक) वाहवा येशुबुवा! तारे पतन पावतात ही गोष्ट तुम्ही कोणत्या विद्याच्या आधाराने जाणली? आणि ती डळमळणारी आकाशाची सैन्ये कोणती आहेत? येशु थोडीशी जरी विद्या शिकला असता तरी त्याने जाणले असते की सगळे तारे हे आपल्या पृथ्वीसारखेच भूगोल (ग्रहगोल) आहेत आणि ते पडत नसतात यावरून येशू हा सुताराच्या कुळात जन्माला आला होता हे लक्षात येते. नेहमी लाकडे कापणे, तासणे, जोडणे हीच कामे तो करीत असणार. परंतु आपणही या जंगली देशात पैगंबर बनू शकू अशी कल्पना त्याला सुचली आणि तो उपदेश करू लागला. त्याच्या मुखातून अनेक चांगल्या गोष्टी बाहेर पडल्या. पण पुष्कळशा गोष्टी वाईटही होत्या. तेथील लोक जंगली होते. त्यांनी त्यांचे मानले. आजकाल युरोपातील देश जसे सुधारलेले आहेत तसे ते जुन्याकाळी असते तर येशूची बुवाबाजी मुळीच चालली नसती. आता वस्तुस्थितीचे थोडेफार ज्ञान युरोपीय लोकांना झाले असले तरी व्यावहारिक डावपेच व हटवादीपणा यांमुळे हा पोकळ मत ते सोडत नाहीत आणि सर्वस्वी सत्य वेदमार्गाचा स्वीकार करीत नाहीत. हीच काय ती त्यांच्यात उणीव आहे. ॥८२॥

(८३) आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने कधीच नष्ट होणार नाहीत -इं० म० प० २४। आ० ३५।।

(समीक्षक) हे बोलणेही अज्ञानदर्शक व मूखतापूर्ण आहे. आकाश नष्ट कसे होणार? आकाश अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ते डोळ्यांना दिसतच नाही. मग त्याचे हलणे कोण पाहू शकतो? शिवाय आपल्याच तोंडाने आपली बढाई मारणे हे भल्या माणसांचे काम नव्हे. ॥८३॥

(८४) मग डावीकडल्यांसही तो म्हणेल, “अहो शापग्रस्तहो, सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक (कायमचा) अग्नी तयार केला आहे त्यात माझ्या पुढून निघून जा." -इं० म० प० २५। आ० ४१।।

(समीक्षक) जे आपले शिष्य आहेत त्यांना स्वर्ग देणे आणि इतरांना अनंत अग्नीत टाकणे हा केवढा मोठा पक्षपात आहे बरे! परंतु आकाशच उरणार नाही असे एकदा म्हटल्यानंतर जळणारी आग, नरक, स्वर्ग या गोष्टी कोठे राहणार? ईश्वराने सैतानाला व त्याच्या दूतांना निर्माण केले नसते तर त्याला नरकाची एवढी तयारी कशाला करावी लागली असती ? आणि एक अगदी सामान्य सैतान ज्या ईश्वराला भ्याला नाही तो ईश्वर तरी कसला? कारण सैतान हा ईश्वराचाच दूत असूनही त्याने बंड केले. त्याच वेळी त्याला पकडून तुरुंगात टाकणे अथवा मारून टाकणे ईश्वराला जमले नाही. मग त्याचे ईश्वरत्व कोठे राहिले? सैतानाने येशूलाही चाळीस दिवस दुःख दिले, पण येशू त्याचे काही वाकडे करू शकला नाही. म्हणजे त्याचे ईश्वराचा पुत्र असणे व्यर्थच ठरले. यावरून येशू हा ईश्वराचा पुत्र आणि बायबलातील ईश्वर हा ईश्वर असू शकत नाही. ॥८४॥

(८५) तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा शिष्यांतील एकाने मुख्य याजकांकडे जाऊन म्हटले, "मी त्याला धरून तुमच्या स्वाधीन केले तर मला काय द्याल?" त्यांनी त्याला तीस रुपये द्यावयाचे ठरविले -इं० म० प० २६।। आ० १४। १५।।

(समीक्षक) आता पाहा. येशूची सगळी करामत आणि ईश्वरत्व यांचे रहस्य येथे उघडे पडले. कारण त्याचा जो मुख्य शिष्य होता तो यहुदीही येशूच्या प्रत्यक्ष सहवासाने पवित्रात्मा बनला नाही. मग तो येशू मेल्यानंतर इतरांना पवित्रात्मा कसा बनवू शकणार? त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याच्या भरवशावर राहणारे लोक

38
कसे फसविले जातात पाहा. कारण ज्याने आपल्या प्रत्यक्ष सहवासात राहिलेल्या शिष्याचे काहीही कल्याण केले नाही तो स्वत: मेल्यावर कोणाचे काय कल्याण करू शकणार?॥८५॥

गुरूचे(येशुचे) रक्त-मांसभक्षण

(८६) मग ते भोजन करीत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, "घ्या. खा. हे माझे शरीर आहे. " ... आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांस दिला व म्हटले, "तुम्ही सर्व यातील प्या....हे माझे (नव्या) कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतले जात आहे." -इं० म० प० २६। आ० २६। २७। २८।।

(समीक्षक) कोणताही सभ्य माणूस अशी गोष्ट करील काय ? अविद्वान, जंगली माणसाखेरीज इतर कोणीही आपले मांस हे आपल्या शिष्यांचे अन्न आहे आणि आपले रक्त हे त्यांचे पेय आहे असे म्हणणार आणि याच प्रकाराला आजकाल ख्रिस्ती लोक 'प्रभुभोजन' म्हणतात. म्हणजे खाद्यपेयांमध्ये येशूचमांस व रक्त आहे अशी भावना बाळगून खातात-पितातही किती वाईट गोष्ट आहे. ज्यांनी आपल्या गुरुचे मांस व रक्तही खाण्यापिण्याच्या भावनेतून वगळले नाही ते इतरांना कसे सोडतील? ॥८६॥

(८७) मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे पुत्र यांस बरोबर घेतले आणि तो खिन्न व अतिकष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटले, "माझा जीव मरणप्राय, अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे राहा व माझ्याबरोबर जागृत असा."..मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली: "हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला मजवरून टळून जावो. तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो." -इं० म० प० २६। आ० ३७। ३८। ३९।।

(समीक्षक) पाहा ! येशू हा केवळ एक सामान्य माणूस नसता, ईश्वराचा पुत्र, त्रिकालदर्श व विद्वान असता तर त्याने अशी मर्कटचेष्टा केली नसती. यावरून हे स्पष्ट दिसून येते की येशू हा ईश्वराचा मुलगा असून तो त्रिकालज्ञ होता व पापाची क्षमा करणारा आहे असे येशूने अथवा त्याच्या चेल्यांनी खोटेनाटेच पसरविले आहे. यावरून येशू हा केवळ एक सामान्य, साधा, अगदीच अडाणी होता; तो विद्वान योगी किंवा सिद्ध नव्हता. ॥८७॥

(८८) तो बोलत आहे इतक्यात, पाहा, बारांतील एक जो यहूदा तो आला आणि त्याजबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांजकडला मोठा समुदाय तलवारी व सोटे घेऊन आला. त्याला धरून देणाऱ्याने त्यांस अशी खूण सांगून ठेवली होती की, "मी ज्याचे चुंबन घेईल तोच तो आहे, त्याला धरा." मग त्याने लागलीच येशुजवळ येऊन "गुरुजी, सलाम" असे म्हणून त्याची पुष्कळ चुंबन घेतली. तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूला धरून अटक केली. इतक्यात सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. शेवटी दोघे जण येऊन म्हणाले की, “देवाचे मंदिर मोडावयास व तीन दिवसांत बांधावयास मी समर्थ आहे असे ह्याने म्हटले. तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, "तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध कशी साक्ष देतात?" तरी

39
पण येशु उगाच राहिला. यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, "मी तुला जिवंत देवाची शपथ घालून विचारतो की, "देवाचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस की नाहीस हे आम्हांस सांग." येशू त्याला म्हणाला, "तू म्हटलेस तसेच. आणखी मी तुम्हांस सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल." तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, "याने दुर्भाषण केले आहे. आम्हास आणखी साक्षीदार कशाला पाहिजे ? पाहा? आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हांस कसे वाटते?" त्यांनी उत्तर दिले की, "हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर धुकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या; आणि कोणी त्याला थापडा मारून म्हटले, "अरे ख्रिस्ता, आम्हांला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारेल ? इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याजकडे येऊन म्हणाली, "तूही गालीलकर येशुबरोबर होतास." तो सर्वांच्या समोर नाकारून बोलला, "तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.” मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांस म्हटले, "हाही नासोरी येशुबरोबर होता." पुनः तो शपथ वाहून नाकारून बोलला, "मी त्या मनुष्याला ओळखत नाही. तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, "मी त्या मनुष्याला ओळखत नाही." -इं० म० प० २६। आ० ४७। ४८। ४९। ५०। ६१। ६२। ६३। ६४। ६५। ६६। ६७। ६८। ६९। ७०। ७१। ७२। ७४।।

(समीक्षक) आता तुम्हीच विचार करा. आपल्या अनुयायांमध्ये दृढ विश्वास निर्माण करण्याचे सामर्थ्य किंवा प्रभाव येशु ख्रिस्तामध्ये नव्हता. तसा विश्वास त्यांच्यामध्ये असता तर त्यांनी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता लोभाच्या आहारी जाऊन आपल्या गुरूला पकडून दिले नसते, त्याला नाकारले नसते, खोटे बोलले नसते व त्यांनी खोटी शपथ घेतली नसती. तसेच तौरेतमध्ये सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या अंगी चमत्कार करून दाखविण्याचे सामर्थ्य नव्हते, त्यात लिहिले आहे की लुकाच्या घरी त्याच्या पाहुण्यांना मारण्याकरिता अनेक लोक आले होते. तेथे ईश्वराचे दोन दूत होते. त्यांनी त्या लोकांना आंधळे करून टाकले. तशी ही गोष्टही असंभव आहे. तथापि येशूमध्ये एवढे देखील सामर्थ्य नव्हते. तरीही आजकाल ख्रिस्ती लोकांनी येशूच्या नावावर अवाच्या सवा चमत्कारांच्या कितीतरी भाकडकथा रचून सगळीकडे पसरविल्या आहेत. असे हालहाल होऊन मरण्यापेक्षा येशूने लढा दिला असता, समाधी घेतली असती अथवा दुसऱ्या एखाद्या पद्धतीने प्राणत्याग केला असता तर ते चांगले झाले असते. परंतु येशुजवळ विद्या नसल्यामुळे अशी बुद्धी त्याला कशी सुचणार? तोच येशू असेही म्हणतोः

(८९) तुला असे वाटते काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? -इं० म० प० २६। आ० ५३।।

(समीक्षक) येशु ख्रिस्त धमक्याही देतो, आपल्या बापासंबंधी बढाया करीत जातो, पण काहीही करू शकत नाही. ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे पाहा ! जेव्हा महायाजकाने त्याला विचारले की, "हे लोक तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, त्याचे उत्तर दे." तेव्हा येशु चुप राहिला. येशूने हे चांगले केले नाही. जे काही खरे होते ते त्याने अवश्य सांगितले असते तर बरे झाले असते. त्याने आपल्या मोठेपणाच्या वल्गना करणे उचित

40
नव्हते आणि ज्यांनी येशूवर खोटा आरोप करून त्याला ठार मारले त्यांचे ते कृत्यही उचित नव्हते. कारण त्यांनी येशूवर जो आरोप केला होता तो त्याचा अपराध नव्हता. परंतु तेही जंगलीच होते. त्यांना न्यायाच्या गोष्टी कशा समजणार? येशूने आपण देवाचे पुत्र आहोत असा बहाणा केला नसता आणि त्या (ज्यू) लोकांनी त्याच्याशी असे वाईट वर्तन केले नसते तर दोघांच्याही दृष्टीने चांगले झाले असते. परंतु एवढे ज्ञान, धर्मात्मता आणि न्यायशीलता त्यांच्यामध्ये कोठून असणार? ॥८९॥

(९०) मग येशु सुभेदाराच्या पुढे जाऊन उभा राहिला असता सुभेदाराने त्याला विचारले, "तू यहुद्यांचा राजा आहेस काय?" येशूने त्याला म्हटले, "तू म्हणतोस तसेच." मुख्य याजक व वडील हे त्याजवर दोषारोपण करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, "हे लोक तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तू ऐकत नाहीस काय?" परंतु त्याने त्याला काही उत्तर दिले नाही. एका शब्दानेही नाही. यावरून सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. पिलाताने त्यांस म्हटले, "तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे ?" सर्व म्हणाले, "त्याला वधस्तंभावर चढवावे. क्रुसावर खिळवावे. तेव्हा त्याने त्यांच्याकरिता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळविण्याकरिता (शिपायांच्या) स्वाधीन केले. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला कचेरीत नेले आणि सगळी पलटण जमवून त्याजकडे आणली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला. काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला; त्याच्या उजव्या हातात वेताची काठी दिली आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, "हे यहुद्यांच्या राजा, तुझा जयजयकार होवो." असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा केली. ते त्याजवर थुंकले व तो वेत घेऊन त्याच्या मस्तकावर मारू लागलेमग त्याची थट्टा (टवाळी) केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्यांच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळविण्याकरिता घेऊन गेले. मग गलगुथा म्हणजे कवटीची जागा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी पोचल्यावर त्यांनी त्याला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळविले आणि त्यांनी त्याच्या दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला. तो असा: "हा यहुद्यांचा राजा येशू आहे. नंतर त्यांनी त्याज बरोबर दोन लुटारू (डाकू), एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळविले आणि जवळून जाणाऱ्यांनी डोकी हलवीत त्याची अशी निंदा केली की, "अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, तू स्वतःचे तारण कर, तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये." तसेच मुख्य याजकी, शास्त्री व वडील यांसहित थट्टा करीत म्हणाले, "त्याने दुसऱ्यांचे तारण केले; त्याला स्वतःचे तारण करता येत नाही. तो इसराईलांचा राजा आहे. त्याने आता वधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याजवर विश्वास ठेवू. तो देवावर भरवसा ठेवतो. त्याला तो प्रिय असेल तर त्याने त्याला आता सोडवावे. कारण 'मी देवाचा पुत्र आहे,' असे तो म्हणाला होता." जे लुटारू त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनीही त्याची अशीच निंदा केली. मग दुसऱ्या प्रहरापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशात अंधार पडला आणि सुमारे तिसऱ्या प्रहरी येशु मोठ्याने आरोळी मारून बोलला, "एलोई, एलोई, लमा सबक्तनी म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास ?" तेथे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, "तो

41
एलीयाला बोलावतो." मग त्यांच्यातून एकाने लागलीच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून वेतावर ठेवून त्याला प्यावयास दिला. मग येशूने पुनः मोठ्याने ओरडून प्राण सोडला." -इं० म० प० २७। आ० ११। १२। १३। १४। २२। २३। २४। २६। २७। २८।२९। ३०। ३१। ३३। ३४। ३५। ३७। ३८। ३८। ३९। ४०। ४१। ४२। ४३। ४४। ४५। ४६। ४७। ४८। ५०।।

 (समीक्षक) त्या दुष्टांनी येशूशी अत्यंत वाईट वर्तन केले. परंतु येशूचाही दोष आहे. कारण ईश्वराचा कोणी पुत्र नाही आणि ईश्वर कुणाचा बाप नाही. तो कोणाचा बाप बनला तर कोणाचा तरी सासरा, मेहुणा, सोयरा वगैरेही होईल. तसेच जेव्हा अध्यक्षाने त्याला विचारले तेव्हा त्याने जे काही खरे होते ते सांगायला हवे होते. त्याने जे अद्भुत चमत्कार पूर्वी करून दाखविले असे सांगितले जाते ते खोरे असते तर आताही सुळीवरून (क्रुसावरून) उतरून त्याने सर्वांना आपले अनुयायी बनविले असते. तसेच तो ईश्वराचा पुत्र असता तर ईश्वरानेही त्याला वाचविले असते. तो त्रिकालदर्शी असता तर पित्तमिश्रित द्राक्षारसाला ते आधीच कळले असते. तो चमत्कार करणारा असता तर त्याने आरोळी मारू प्राण का सोडला? यावरून हे ओळखले पाहिजे की वाटेल तेवढी चलाखी केली तरी शेवटी खरे ते खरे व खोटे ते खोटेच ठरते. यावरून हेही सिद्ध झाले की येशु हा त्या काळच्या जंगली माणसापैकी थोडाफार बरा माणूस होता. तो चमत्कार करणारा, ईश्वराचा पुत्र आणि विद्वानही नव्हता. कारण तो तसा असता तर त्याला असे दु:ख का भोगावे लागले असते ? ॥९०॥

(९१) तेव्हा पाहा, मोठा भूकंप झाला; कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला... तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे...या, प्रभू निजला होता ते हे स्थळ पाहा. ... तेव्हा त्या स्त्रिया त्याच्या शिष्यांस हे वर्तमान सांगावयास धावत गेल्या. मग पाहा, येशू त्यांस भेटून म्हणाला, "कल्याण असो." त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्यास नमन केले... तेव्हा येशूने त्यांस म्हटले, "भिऊ नका. जा आणि हे माझ्या भावांस सांगा. यासाठी की त्यांनी गालीलात जावे. तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल."... इकडे अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने नेमिला होता त्यावर गेले. ... आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले, तरी कित्येकांस संशय वाटला....तेव्हा येशु त्याच्या जवळ येऊन त्यांस म्हणाला, "स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे.. आणि पाहा, जगाच्या अंतापर्यंत मी सदैव तुम्हांबरोबर आहे." -इं० म० प० २८। आ० २। ६। ९। १०। १६। १७। १८। २०।।

(समीक्षक) ही गोष्टही विश्वास ठेवण्यासारखी नाही, कारण ती सृष्टिक्रमाविरुद्ध व विद्याविरोधी आहे ईश्वराजवळ दूत असणे, त्यांना इकडे तिकडे पाठविणे, स्वर्गातून खाली आणणे या गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हणजे ईश्वराला मामलेदार किंवा कलेक्टर बनविणेच नाही काय ? येशू त्याच शरीरासह स्वर्गात गेला आणि जिवंत झाला काय? कारण त्या स्त्रियांनी त्याचे पाय धरून प्रणाम केला, तेव्हा त्याचे तेच शरीर होते काय? आणि तीन दिवसांत ते शरीर सडले कसे नाही? तसेच स्वत:च्या तोंडाने सर्वांचा अधिकारी म्हणणे हे शुद्ध ढोंग आहे. शिष्यांना भेटणे आणि त्यांच्याशी सर्व गोष्टी बोलणे हे अशक्य आहे. कारण जर ते सारे खरे असेल तर आजकाल कोणी मेलेली माणसे जिवंत का होत नाहीत ? आणि त्याच शरीरासह स्वर्गात का जात नाहीत?॥९१॥

हे सारे मत्तयकृत शुभवर्तमानाविषयी झाले. आता मार्ककृत शुभवर्तमानाविषयी लिहितो.

42
मार्ककृत शुभवर्तमान

(९२) जो सुतार, मरीयेचा पुत्र, तो हाच आहे ना? -इंनमार्क प० ६। आ० ३।।

(समीक्षक) वस्तुत: युसूफ हा सुतार होता. म्हणून येशूही सुतार होता. तो अनेक वर्षे सुताराचे काम करीत होता. त्यानंतर पैगंबर (प्रेषित) बनण्याचा प्रयत्न करता-करता तो देवाचा पुत्रच बनला आणि जंगली लोकांनीही त्याला देवाचा पुत्र मानले. तेव्हा मोठी करामात केली त्याने लोकांमध्ये फाटाफूट निर्माण केली. ॥९२॥

लूककृत शुभवर्तमान

(९३) येशू त्याला म्हणाला, "तू मला उत्तम का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही." -इं० लू० प० १८। आ० १९।।

(समीक्षक) जर येशूच एकमेव ईश्वर म्हटला जातो तर खिश्चनांनी पवित्रात्मा, पिता व पुत्र हे तीन कोठून आणले? ॥९३॥

(९४) तेव्हा त्याने हेरोदाकडे पाठविले. ...येशूला पाहन हेदोराला फार संतोष झाला. कारण त्याजविषयी ऐकल्यावरून त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती; आणि त्याच्या हातून झालेले एखादे अद्भुत कृत्य दृष्टीस पडेल अशी त्याला आशा होती.... त्याने त्याला बरेच प्रश्न केले; परंतु त्याला काही उत्तर दिले नाही. -इं० लू० प० २३। आ० ७। ८। ९।।

(समीक्षक) ही घटना मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये नाही. यावरून साझदार लोकात मतभेद दिसतात म्हणून त्यांच्या साक्षीला काही अर्थ उरत नाही. कारण सर्व साक्षीदारांनी एकच गोष्ट सांगितली पाहिजे. तसेच येशु चतुर व चमत्कारी असता तर त्याने उत्तर दिले असते; आणि त्याने चमत्कार दाखविला असता. यावरून हेच सिद्ध होते की येशुजवळ विद्या व अर्थात शक्ती मुळीच नव्हती. ॥९४॥

योहानकृत शुभवर्तमान

(९५) प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. . तोच प्रारंभी देवासह होता. ... सर्व काही त्याच्या द्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते; व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. -यो०प० १। आ० १। २। ३। ४।।

(समीक्षक) प्रथम वक्याशिवाय शब्द असू शकत नाही आणि शब्द देवाबरोबर होता असे म्हणणे निरर्थक ठरते. तसेच शब्द हा कधीही ईश्वर होऊ शकत नाही. कारण आधी शब्द देवासह होता असे म्हटल्यास देवाच्या पूर्वी शब्द अथवा शब्दाच्या आधी देव होता असे म्हणता येणार नाही. जोपर्यंत सृष्टिच्या उत्पतिचे कारण विद्यमान नसेल तोपर्यंत शब्दाद्वारे सृष्टिची निर्मिती मुळच होऊ शकत नाही आणि शब्दाशिवाय, काहीही न बोलता, सुष्टिकर्ता सृष्टिची निर्मिती करू शकतो. जीव काय होते आणि ते कशात होते ? या वचनानुसार जीव अनादी आहेत असे तुम्ही मानाल. ते अनादी असतील तर 'आदमाच्या (माणसाच्या) नाकपुड्यांत परमेश्वराने श्वास फुकला' हे विधान खोटे ठरते आणि जीवन हे फक्त माणसांच्या दृष्टीनेच प्रकाश होते काय ? पशुपक्ष्यादिकांचा तो प्रकाश नाही काय ? ॥९५॥

43
(९६) (आणि रात्रीच्या भोजनाच्या वेळी) शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कर्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. -यो० प० १३। आ० २।।

(समीक्षक) ही गोष्ट खरी गाही. कारण खिश्चनांना असे विचारता येईल की, “जर सैतान सर्वांना भुरळ घालतो किंवा भडकवितो तर सैतानाला कोण भडकवितो?" सैतान स्वतःच बहकत असेल तर माणूसही आपोआप, स्वतःच बहकू शकतो. मग सैतानाचे काय काम? परंतु जर सैतानाला उत्पन्न करणारा आणि भडकविणारा परमेश्वर असेल तर तोच सैतानाचा सैतान ख्रिस्त्यांचा ईश्वर ठरतो. परमेश्वरानेच सर्वांना सैतानाद्वारे भडकविले. असली कामे ईश्वराची असू शकतात काय? खरी गोष्ट अशी आहे की ज्यांनी ख्रिस्त्यांचा हा मंतग्रंथ रचला आणि येशु हा देवाचा पुत्र आहे म्हटले तेच बहुधा सैतान असावेत. बाकी हा मतपंथ ईश्वरकृत नाही, यात वर्णिलेला ईश्वर हा खरा ईश्वर नाही आणि येशु हा देवाचा पुत्र होऊ शकत नाही.॥९६॥

येशू ईश्वराचा अवतार ?

(९७) तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा. .... माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. त्या नसल्या तर मी तुम्हास सांगितले असते की, "मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो."...आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुनः येऊन तुम्हांस आपल्याजवळ घेईन. यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे... येशूने त्याला म्हटले मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणी जात नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते." -यो० प० १४। आ० १। २। ३। ६। ७।।

(समीक्षक) आत पाहा. येशूचे हे उद्गार पोपांच्या लीलेपेक्षा कमी आहेत काय? त्याने असला प्रपंच रचला नसता तर त्याच्या पंथात कोण अडकले असते ? येशूने आपल्या बापाचा मक्ता घेतला आहे काय? जर ईश्वर येशूच्या अधीन असेल तर तो पराधीन झाल्याने तो ईश्वरच नव्हे कारण ईश्वर कुणाचीही शिफारस ऐकत नाही. येशूच्या पूर्वी कोणालाच ईश्वरप्राप्ती झाली नव्हती काय ? अशा प्रकारे स्थान वगैरेचे प्रलोभन देणारा आणि आपल्याच तोंडाने स्वतः मार्ग, सत्य व जीवन सांगणारा पूर्णपणे ढोंगी समजला जातो. म्हणून ही गोष्ट कधीही खरी असू शकत नाही. ॥९७॥

(९८) मी तुम्हास खचित सांगतो की, "मी जी कृत्ये ती मजवर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील." -यो० प० १४। आ० १२।।

(समीक्षक) आता पाहा. जे ख्रिस्ती लोक येशूवर पूर्ण श्रद्धा ठेवतात ते येशूप्रमाणेच मृतांना जिवंत करणे वगैरे गोष्टी का करू शकत नाहीत ? आणि जर ते श्रद्धेच्या बळावर चमत्कार करू शकत नसतील तर येशूने देखील चमत्कार केले नव्हेत असेच ठामपणे समजले पाहिजे. कारण स्वतः येशूच सांगतो की तुम्हीही चमत्कार करून दाखवाल. तरीही आजकाल कोणी ख्रिस्ती माणूस एकही चमत्कार करून दाखवू शकत नाही. येशूने मृतांना जिवंत केले वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवणाच्याचे अंतश्चक्षू फुटलेच आहेत असे म्हटले पाहिजे. ॥९८॥

44
(९९) तू एकच खरा देव आहेस. -यो०प० १७। आ० ३।।

(समीक्षक) जर तो एकच ईश्वर असेल तर ख्रिस्ती लोकांनी पिता, पुत्र व पवित्र आत्मा ही तीन ईश्वर आहेत असे म्हणणे साफ खोटे आहे.॥९९॥

बायबलामध्ये अशा प्रकारच्या अवास्तव गोष्टी भरलेल्या आहेत.

योहानाला झालेले प्रकटीकरण

आता योहानाच्या अद्भुत गोष्टी ऐकाः

(१००) राजासनाभोवती चोवीस आसने आहेत; आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडील बसलेले आहेत, असे दृष्टीस पडले... राजासनाच्या आतून विजा, पाणी व गर्जना नियत आहेत. सात अग्नीरूपी मशाली राजासनापुढे जळत आहेत. ते देवाचे सात आत्मे आहेत... राजासनापुढे स्फटिकासारखा जसा काय काचेचा समुद्र आहे आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूस, पुढे व मागे डोळ्यांनी भरलेले असे चार प्राणी आहेत. -यो० प्र० प० ४। आ० ४। ५। ६।।

(समीक्षक) आता पाहा ! एखाद्या शहरासारखा ख्रिस्त्यांचा स्वर्ग आहे आणि त्याच ईश्वर दीपकाप्रमाणे अग्नी आहे. सोन्याचे मुकुट वगैरे आभूषणे धारण करणे आणि मागेपुढे डोळे असणे या असंभवनीय गोष्टी आहेततेथे सिंह वगैरे चार पशू असल्याचेही लिहिले आहे. असल्या या गोष्टींवर कोणाचा विश्वास बसेल ?॥१००॥

(१०१) जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट लिहिलेली व सात शिक्के (सिंले) मारून बंद केलेली अशी पुस्तकाची एक गुंडाळ मी पाहिली..., आणि पुस्तकाचे शिक्के फोडून ते उघडावयास कोण योग्य आहे. असे मोठ्याने ओरडणारा एक बलवान देवदूत मी पाहिला.... तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणी हे पुस्तक उघडावयास किंवा पाहावयास समर्थ नव्हता... हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो. -यो० प्र० पर्व० ५। आ० १। २। ३। ४।।

(समीक्षक) आता पाहा ! ख्रिस्ती लोकांच्या स्वर्गातील सिंहासनाचे व मनुष्यांचा थाटमाट आणि अनेक शिक्के असलेले मोहोरबंद पुस्तक आहे. ते पुस्तक उघडण्यास व त्यात डोकावून पाहण्यास समर्थ असा कोणी स्वर्गात अथवा पृथ्वीवर मिळाला नाही यामुळे योहान रडू लागला. यावर एक वृद्ध माणूस म्हणाला येशू ते पुस्तक उघडणारा आहे. याचा अर्थ एवढाच की ज्याचे लग्न त्याचे गुणगान. अशा प्रकारे येशूचे माहात्म्य ठसविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु ह्या सर्व सांगावयाच्या गोष्टी आहेत. ॥१०१॥

(१०२) तेव्हा राजासन व चार प्राणी यांच्यामध्ये आणि वडीलमंडळ यांच्यामध्ये, ज्याचा जणू काय वध  करण्यात आला होता असे कोकरू उभे असलेले मी पाहिले. त्याला सात शिंगे व सात डोळे होते. ते सगळे पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत. -यो० प्र० प० ५। आ० ६।।

45
(समीक्षक) आता योहानाच्या स्वप्नातील मनोव्यापार पाहा. त्या स्वर्गामध्ये सगळे ख्रिस्ती चार पशु व येशूही आहे. इतर कोणी नाही. तेथे एक अद्भुत गोष्ट घडली की येथे तर येशूला दोन डोळे होते आणि एकही शिंग नव्हते, तो स्वर्गात गेल्यावर सात शिंगे आणि सात डोळ्यावाला झाला आणि ते सात डोळे व शिंगे ईश्वराचे आत्मे बनले होते. अरेरे! असल्या गोष्टींवर ख्रिस्ती लोकांनी का बरे विश्वास ठेवला ? भले ! बुद्धीचा थोडा तरी उपयोग करते.॥१०२॥

(१०३) त्याने पुस्तक घेतले तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील (पुरुष) कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धूपाने भरलेली सोन्याची धुपाटणी होती. ती म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. -यो० प्र० प० ५। आ० ८।।

(समीक्षक) जेव्हा येशू स्वर्णत नसेल तेव्हा हे बिचारे धूप, दिप, नैवेद्य, आरती इत्यादींनी कोणाची पूजा करीत असतील? येथे प्रोटेस्टंट खिश्चन मूर्तिपूजेचे खंडन करतात आणि त्यांचा (कॅथलिकांचा) स्वर्ग हे मूर्तिपूजेचे घर बनले आहे॥१०३॥

(१०४) मग कोकराने सात शिक्क्यांपैकी एक शिक्का (सील) फोडला तेव्हा मी पाहिले चार प्राण्यांतील एकाला गर्जनेसारख्या वाणीने ‘ये’ असे म्हणताना मी ऐकले... मग मी पाहिले तो पांढरा घोडा आणि त्याजवर बसलेला एक स्वार दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते व त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला. त्याने दुसरा शिक्का फोडला तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला 'ये' असे म्हणताना ऐकले. ... तेव्हा दुसरा घोडा निघून गेला. तो अग्नीवर्ण (लाल) होता; आणि त्यावर वसलेल्या इसमाकडे पृथ्वीवी शांती हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला मोठी तलवार दिलेली होती.... त्याने तिसरा शिक्का फोडला तेव्हा मी तिसऱ्या प्राण्याला 'ये' असे म्हणताना ऐकले. ... मग मी पाहिले तो काळा घोडा आणि त्यावर बसलेला कोणी एक दृष्टीस पडला. त्याच्या हातात तागडी होती. ... त्याने चौथा शिक्का फोडला तेव्हा मी चौथ्या प्राण्याला 'ये' असे म्हणताना ऐकले. ... मग मी पाहिले तो फिकट घोडा, आणि त्यावर वसलेला एक पुरुष दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यु. .. इत्यादी. -यो० प्र० प० ६। आ० १। २। ३। ४। ५। ७। ८।।

(समीक्षक) आता पाहा. पुराणातील भाकडकथांपेक्षा या गोष्टी जास्त हास्यास्पद व खोट्या आहेत की नाहीत ? एखाद्या पुस्तकाच्या शिलबंदीत घोडा व घोडेस्वार कसे काय सामावू शकले असतील? हे स्वप्नातले बरळणे ज्यांनी खरे मानले आहे त्यांच्यात अविद्या जितकी म्हणावी ती थोडीच आहे॥१०४॥

(१०५) ते मोठ्याने ओरडून म्हणाले, "हे प्रभो, जो तू पवित्र व सत्य आहेस तो न्यायनिवाडा करीत नाहोस; आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेत नाहीस. हे किती काळ चालणार? तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुद्ध झगा देण्यात आला; आणि त्यांस असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हांसारखे जिवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ स्वस्थ राहा." -यो० प्र० प० ६। आ० १०। ११।।

46
(समीक्षक) जे कोणी ख्रिस्ती असतील ते न्यायासाठी न्यायाधीशाच्या हवाली असल्याने त्यांना न्याय मिळविण्यासाठी रडत बसावे लागेल. परंतु जो वैदिक मताचा स्वीकार करील त्याला न्याय मिळण्यात मुळीच विलंब लागणार नाही. ख्रिस्त्यांना विचारले पाहिजे की, "ईश्वराचे न्यायालय आजकाल बंद आहे काय? न्यायदानाचे काम हल्ली होत नाही काय ? न्यायाधीश रिकामे बसले आहेत काय ? या प्रश्नांना योग्य उत्तरे ते देऊ शकणार नाही. ख्रिस्त्यांच्या ईश्वराला भुरळ घालणे फार सोपे आहे व तो सुद्धा बहकावण्यास येतो कारण त्यांच्या सांगण्यावरून तो ताबडतोब त्यांच्या शत्रूवर सूड घेऊ लागतो. हे ख्रिस्ती लोक खुनशी स्वभावाचे आहेत. ते मेल्यानंतरही शत्रूवर सूड उगवितात. त्यांच्यामध्ये सहनशीलता मुळीच नाही आणि जेथे मन:शांती नसेल तेथे दुःखाला काही सीमा उरत नाही. ॥१०५॥

(१०६) उंबराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले. -यो० प्र० प० ६। आ० १३। १४।।

(समीक्षक) आता पाहा! भविष्यवाणी उच्चारणाऱ्या योहानाजवळ विद्या किंवा ज्ञान नाही म्हणूनतो असा बरळतो. सगळे तारे हे भूगोल (खगोल) असल्यामुळे ते एका पृथ्वीवर कसे पडू शकतील? आणि सूर्यादिकांचे गुरुत्वाकर्षण त्यांना इकडे-तिकडे कसे जाऊ देईल ? आणि तो आकाशाला चटईसारखे समजतो काय? वस्तुत: आकाश हा साकार पदार्थ नाही. त्यामुळे त्याला कोणीही गुंडाळून गोळा करू शकत नाही. सारांश, योहान वगैरे सर्व जंगली माणसे होती. त्यांना या गोष्टी काय माहीत असणार? ॥१०६॥

(१०७) ज्यांच्यावर शिक्का करण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इसराईल लोकांच्या सर्व वंशापैकी एकशे चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला. .. यहूदाच्या वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला. -यो० प्र० प० ७। आ० ४। ५।।

(समीक्षक) बायबलातील ईश्वर हा फक्त इसराईल वगैरे जमातींचाच स्वामी आहे की सगळ्या जगाचा? तो फक्त त्यांचाच ईश्वर नसता तर त्याने त्या जंगली लोकांचीच बाजू का घेतली असती ? त्यांचीच सहायता करीत होता. तो इतरांचे नावही घेत नाही. म्हणून तो ईश्वरच नाही आणि योहानाने इसराईल जमातीच्या माणसांवर शिक्का मारणे ही त्यांची अल्पज्ञता आहे अथवा ती त्यांची चुकीची कल्पना आहे॥१०७॥

(१०८) यामुळे ते ईश्वराच्या सिंहासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात. -यो० प्र० प० ७। आ० १५।।

(समीक्षक) ही महा मूर्तिपूजा नाही काय? अथवा त्यांचा ईश्वर देहधारी मनुष्यासमान एकदेशी नाही आहे? आणि ख्रिस्त्यांचा ईश्वर रात्री झोपतही नाही. तो रात्री झोपत असता तर रात्री त्याची पूजा कशी करीत असतील? आणि त्याची झोपही उडत असणार? जर तो अहोरात्र जागा राहत असेल तर तो विक्षिप्त किंवा महान रोगी असेल.॥१०८॥

(१०९) मग दुसरा एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि

47
सर्वपवित्र जनांच्या प्रार्थनांसह राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता... देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला... तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. त्यावेळी गर्जना, वाणी, विजा व भूमिकंपही झाला. -यो० प्र० प० ८। आ० ३। ४। ५।।

(समीक्षक) आता पाहा ! स्वर्गातही वेदी, धूप, दीप, नैवेद्य आणि तुतारीचा निनाद आहे. येथील वैराग्यांच्या देवळापेक्षा ख्रिस्त्यांचा स्वर्ग काही कमी आहे काय? काही तेथील थाटमाट जास्तच आहे.॥१०९॥

(११०) पहिल्या देवदूताने कर्णा (तुतारी) वाजविला तो रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होउन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली. तेव्हा पृथ्वीचा तृतीयांश भाग जळून गेला. झाडांचा तृतीयांश भाग जळून गेला व सर्व हिरवे गवत जळून गेले.-यो० प्र० प० ८। आ० ७।।

(समीक्षक) वाहवा ख्रिस्ती भविष्यवाद्यांन! ईश्वर, ईश्वराचे दूत, तुतारीचा निनाद आणि प्रलयाची लीला हा सगळा बालिश खेळ दिसत आहे.॥११०॥

(१११) पाचव्या देवदूताने कर्ण वाजविला, तो एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ अगाध कूपाची किल्ली दिली होती. त्याने अगाधकूप उघडला तो त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला; आणि कूपाच्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांस पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ती दिली होती. ... त्यांस असे सांगितले होते की, पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये; तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र (त्रास) द्यावा... त्यांना जिवे मारण्याचे काम त्यांजकडे सोपविले नव्हते. तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे सोपविले होते. त्यापासून होणारी पीडा विंचु माणसाला नांगी मारतो तेव्हा होणाऱ्या पीडेसारखी होती. -यो० प्र० प० ९। आ० १। २। ३। ४। ५।।

(समीक्षक) तुतारीचा आवाज ऐकून तारे त्याच दूतांवर आणि त्याच स्वर्गात पडले असतील? येथे पृथ्वीवर तर पडले नाहीत. तो कूप अथवा टोळही ईश्वराने प्रलयासाठी पाळले असतील ? त्यांना तो शिक्का पाहुन व वाचूनही घेता येत असेल की शिक्क्यावाल्यांना चावू नका. हे सारे केवळ भोळ्याभाबड्या लोकांना घाबरवून ख्रिस्ती बनविण्यासाठी वापरलेले फसवणुकीचे डावपेच आहेत. तुम्ही ख्रिस्ती झाला नाही तर तुम्हाला टोळ चावतील असल्या गोष्टी विद्याविहीन देशांत चालू शकतात. आर्यवर्त्तात त्या चालणार नाहीत. काय प्रलयाची ही गोष्ट होऊ शकते ?॥१११ ॥

(११२) घोडेस्वारांच्या सैन्यांची संख्या वीस कोटी होती. -यो० प्र० प० ९। आ० १६।।

(समीक्षक) इतके घोडे स्वर्गात कोठे राहत असतील ? कोठे चरत असतील ? त्यांच्या पागा कोठे असतील? आणि त्यांची किती लोद पडत असेल? आणि त्या लिदीचा केवढा दुर्गंध स्वर्गात पसरत असेल ? बस्स! असला स्वर्ग, असला ईश्वर आणि असला पंथ यांना आम्ही आर्यांनी तिलांजलि दिला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कृपेने ख्रिस्ती लोकांच्या शिरांवरील ख्रिस्ती पंथाचे हे थोतांड नाहीसे होईल तर फार बरे होईल. ॥११२॥

48
(११३) मी दुसरा एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य (इंद्रधनुष्य) होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्नीस्तंभासारखे होते. त्याच्या हाती उघडलेले एक लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पायभूमीवर ठेवला आणि तो सिंहगर्जनप्रमाणे मोठ्याने ओरडला. -यो० प्र० प० १०। आ० १। २।।

(समीक्षक) आता तुम्हीच पाहा. बायबलातील देवतांच्या या कथा आमच्या पुराणातील भाटचारणांच्या भाकड कथांहून काकणभर जास्तच नाहीत काय ? ॥११३॥

(११४) नंतर काठीसारखा एक बोरू कोणीतरी मला दिला आणि म्हटले, "ऊठ! देवाचे मंदिर, वेदी व त्यातं उपासना करणारे लोक यांचे माप घे!" -यो० प्र० प० ११। आ० १।।

(समीक्षक) ख्रिस्त्यांची देवळे इहलोकीच नव्हे तर स्वर्गातही बांधली जातात व त्यांचे मोजमाप होते! त्यांच्या स्वर्गासारखाच त्यांच्या गोष्टी ही आहेत. म्हणूनच येथे प्रभुभोजनामध्ये येशूच्या शरीराचे अवयव, मांस व रक्त यांची भावना (कल्पना) करून खातात, पितात. आपल्या गिरजाघरात ते क्रूस (सुळी) वगैरेचा आकार बनवितात. ती तर मूर्तिपूजाच आहे. ॥११४॥

(११५) तेव्हा स्वर्गातील देवाचे मंदिर उघडले; आणि त्याच्या मंदिरात त्यांच्या कराराची पेटी दृष्टीस पडली. -यो० प्र० प० ११। आ० १९।।

(समीक्षक) स्वर्गात जे मंदिर आहे ते नेहमी बंद राहत असावे. ते कधी-कधी उघडले जात असावे. काय परमेश्वराचेही कोणी मंदिर होऊ शकते काय? जो वेदोक्त परमात्मा सर्वव्यापक आहे त्याचे कोणतेही मंदिर असू शकत नाही. परंतु ख्रिस्त्यांचा परमेश्वर साकार असल्यामुळे त्याचे मंदिर मात्र असू शकते मग ते स्वर्गात असो की पृथ्वीवर! आणि येथे जशा तुताऱ्या कुंकल्या जातात व घंटा वाजविल्या जातात तशा त्या ख्रिस्ती लोकांच्या स्वर्गातही वाजविल्या जातात आणि नियम असलेली पेटीही अधून-मधून ख्रिस्ती लोक पाहत असावेत. त्यातून त्यांचे काणते उद्दिष्ट साध्य होत असेल कोण जाणे. खरे म्हणजे या सगळ्या गोष्टी लोक आकर्षत करण्यासाठी आहेत. ॥११५॥

(११६) नंतर स्वर्गात एक मोठे आश्चर्य दृष्टीस पडले. एक स्त्री दिली. तिने अंगात सूर्य घातला होता आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता... ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. .. स्वर्गात दुसरा एक चमत्कार दृष्टीस पडला. पाहा! एक मोठा अग्नीवर्ण (लाल) अजगर दिसला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती; आणि त्याच्या डोक्यावर सात मुकुट होते.. त्याच्या शेपटीने आकाशातील ताऱ्यांचा एक तृतीयांश भाग ओढून घेऊन तो पृथ्वीवर पाडला.  -यो० प्र० प० १२। आ० १। २। ३। ४।।

(समीक्षक) आता यांच्या या प्रचंड थापा पाहा! यांच्या स्वर्गातही बिचारी स्त्री रडत आहे. तिचे दु:ख कोणी ऐकत नाही अथवा ते दुर करू शकत नाही आणि ज्या अजगराने आपल्या शेपटीने एक तृतीयांश तारे पृथ्वीवर पाडले त्याची ती शेपटी केवढी मोठी असेल? वस्तुत: पृथ्वी लहान आहे आणि तारे मोठमोठे खगोल

49
आहेत. या पृथ्वीवर एकही तारा सामावू शकत नाही. त्यामुळे येथे असेच अनुमान केले पाहिजे की एक तृतीयांश तारे हे लिहिणाऱ्याच्या घरावर पडले असावेत आणि ज्या अजगराची शेपटी सर्व ताऱ्यांपैकी एक तृतीयांश ताऱ्यांना गुंडाळून पृथ्वीवर पाडण्याइतकी मोठी होती तो अजगरही त्याच्याच घरात राहात असावा.॥११६॥

(११७) स्वर्गात युद्ध झाले. मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले; आणि त्यांजबरोबर अजगर व त्याचे दूत लढले... -यो० प्र० प० १२। आ० ७।।

(समीक्षक) जो कोणी ख्रिस्त्यांच्या स्वर्गात जात असेल त्यालाही लढाईचे दु:ख मिळत असेल. असल्या स्वर्गाची आशा सोडून येथेच हात बांधून बसून रहा. जेथे शांतताभंग व उपद्रव माजला असेल ते ठिकाण ख्रिस्त्यांनाच योग्य आहे॥११७॥

(११८) मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला. म्हणजे सर्व जगाला ठकविणारा बायबल व सैतान म्हटलेला जुनाट साप ह्याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले; व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले. -यो० प्र० प० १२। आ० ९।।

(समीक्षक) जेव्हा तो सैतान स्वर्गात होता तेव्हा तो लोकांना भ्रमित करत नव्हता काय? मग त्याला जन्मभर तुरंगात डांबून का ठेवले नाही? किंवा त्याला मारून का टाकले नाही? त्याला पृथ्वीवर का टाकण्यात आले? सगळ्या जगाला ठकविणारा जर सैतान असेल तर सैतानाला ठकविणारा कोण आहे ? जर सैतानाने स्वतःच स्वत:ला ठकविले तर बहकणारी माणसे सैतानाच्या प्रेरणेशिवाय स्वतःच बहकत असणार आणि जर त्याला बहकावणारा परमेश्वर असेल तर तो ईश्वरच असू शकत नाही. असे दिसते की ख्रिस्त्यांचा ईश्वरच सैतानाला भीत असावा. कारण तो सैतानाहून प्रबळ असता तर त्याने अपराध करीत असतानाच त्याला शिक्षा का केली नाही? जगात सैतानाचे जेवढे साम्राज्य आहे त्याच्या एक सहस्रांशही ख्रिस्ती लोकांच्या ईश्वराचे राज्य नाही. त्यामुळेच ख्रिस्ती लोकांचा ईश्वर त्याला हटवू शकत नसावा. यावरून हे सिद्ध होते की ज्याप्रमाणे आजचे राज्याधिकारी ख्रिस्ती लोक चोरे, दरोडेखोर वगैरेंना ताबडतोब शिक्षा करतात त्यांच्याप्रमाणेही ख्रिस्ती लोकांचा ईश्वर नाही. अशा स्थितीत वैदिक मताचा त्याग करून पोकळ, खोट्या ख्रिस्ती पंथाचा स्वीकार करील असा कोण निर्बुद्ध माणूस असेल ? ॥११८॥

(११९) अरे पृथ्वीवर व समुद्रात राहणाऱ्या लोकांनो, तुमच्यावर अनर्थ ओढवला आहे. कारण सैतान उतरून तुमच्याकडे आला आहे. -यो० प्र० प० १२। आ० १२।।

(समीक्षक) ख्रिस्त्यांचा ईश्वर फक्त त्याच ठिकाणाचा (स्वर्गाचा) रक्षक व स्वामी आहे काय? तो पृथ्वीवरील मनुष्यादी प्राण्यांचा रक्षक व स्वामी नाही काय? तो या भूमीचाही राजा असेल तर तो सैतानाला का मारू शकला नाहीं? ईश्वर पाहत राहतो आणि सैतान सर्वांना फसवीत फिरतो; तरीही तो सैतानाला प्रतिबंध करीत नाही. यावरून असे दिसते की एक चांगला ईश्वर आहे आणि सैतान नावाचा दुसरा एक सामर्थ्यशाली व दुष्ट ईश्वर होऊन राहिला आहे.॥११९॥

50
.
(१२०) आणि त्याला बेचाळीस महिन्यांपर्यंत आपले काम (युद्ध) चालविण्याचा अधिकार दिला होता. त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, म्हणजे त्याचे नाव, त्याचा मंडप व स्वर्गनिवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड उघडले...पवित्र जनांशी लढण्याचे व त्यांना जिंकण्याचे कार्य त्याकडे सोपविले होते आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यांवर त्याला अधिकार दिला होता... -यो० प्र० प० १३। आ० ५। ६। ७।।

(समीक्षक) जो पृथ्वीवरील लोकांना भ्रमित करण्याच्या हेतूने सैतान व पशु इत्यादींना पाठवितो आणि पवित्र माणसांशी युद्ध करावयास लावतो. त्याचे हे काम डाकूंच्या सरदाराच्या कामासारखे आहे की नाही? असले काम ईश्वराचे अथवा ईश्वराच्या भक्तांचे असू शकत नाही. ॥१२०॥

(१२१) नंतर मी पाहिले तो पाहा! कोकरू सीयोन डोंगरावर उभे असलेले दृष्टीस पडले. त्याजबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले असे एकशे चव्वेचाळीस हजार इसम होते. -यो० प्र० प० १४। आ० १।।

(समीक्षक) आता पाहा! जेथे येशूचा बाप राहत होता तेथेच, सीयोन डोंगरावर त्याचा मुलगाही राहत होता. पण एक लाख चव्वेचाळीस हजार माणसांची गणती कशासाठी केली आहे? एक लाख चव्वेचाळीस हजार लोकच स्वर्गाचे रहिवासी झाले? बाकीच्या कोट्यावधी ख्रिस्ती लोकांच्या कपाळावर शिक्का मारला गेला नाही मग ते सगळे नरकात गेले काय ? खिश्चनांनी सीयोन डोंगरावर जाऊन येशूचा तो बाप आणि त्यांची सेना तेथे आहे की नाही ते पाहिले पाहिजे. जर ती तेथे असतील तर हे लिखाण खरे आहे; नसतील तर ते खोटे आहे. ते तेथे कोठून तरी आले असणार. ते कोठून आले? जर ते स्वर्गातून आले असतील तर एवढे मोठे सैन्य व तो स्वत: वरून खाली उडत ये-जा करायला ते सगळे पक्षी आहेत काय? तो येत जात असेल तर तो एखाद्या जिल्ह्याच्या न्यायाधीशासारखा झाला आणि त्याच्यासारखे एक, दोन, तीन असून भागणार नाही. कमीत कमी एकेका भूगोलासाठी एकेक ईश्वर हवा. कारण एक, दोन, तीन ईश्वर अनेक ब्रह्मांडांतील लोकांचा न्याय करण्यास आणि एकाच वेळी सर्वत्र संचार करण्यास कधीच समर्थ होऊ शकणार नाहीत. ॥१२१॥

(१२२) आत्मा म्हणतो, "खरेच! आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांची कृत्ये तर त्यांच्या बरोबर जातात." -यो० प्र० प० १४। आ० १३।।

(समीक्षक) पाहा! ख्रिस्त्यांचा ईश्वर तर असे म्हणतो की, "त्यांची कृत्ये त्यांच्या बरोबर राहतात." अर्थात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार सर्वांना फळ दिले जाईल. परंतु हे ख्रिस्ती लोक म्हणतात की येशू सर्वांची पापे घेऊन गेला आणि सर्वांना क्षमादानही केले जाईल. आता बुद्धिमतांनी विचार करावा की ईश्वराचे वचन खरे की ख्रिस्त्यांचे? दोघांचेही म्हणणे एकाच वेळी खरे होऊ शकत नाही. त्यांच्यापैकी कोणीतरी एकजण नक्कीच खोटा असणार. आम्हांला काय ? ख्रिस्त्यांचा ईश्वर खोटा ठरो की ख्रिस्ती लोक खोटे ठरोत! ॥१२२॥

(१२३) तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला; आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडविले गेले. त्यातून रक्त वाहिले.

51
त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांस पोहोचेइतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला. -यो० प्र० प० १४। आ० १९। २०।।

(समीक्षक) आता पाहा! यांच्या थापा पुराणातील थापांपेक्षाही वरचढ आहेत की नाहीत ? ख्रिस्त्यांचा ईश्वर क्रोध करताना फारच दु:खी होत असणार. त्याच्या क्रोधाने कुंडे भरली म्हणजे त्याचा क्रोध हे काय पाणी आहे? की ज्याने कुंडे भरली असा दुसरा एखादा द्रव पदार्थ आहे? आणि शंभर कोसपर्यत रक्त वाहत जाणे ही अशक्य गोष्ट आहे. कारण वारा लागताच रक्त गोठते. मग ते कसे वाढू शकेल ? म्हणून असल्या गोष्टी मिथ्या असतात. ॥१२३॥

(१२४) नंतर मी पाहिले तो साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील मंदिर उघडले. -यो० प्र० प० १५। आ० ५।।

(समीक्षक) ख्रिस्त्यांचा ईश्वर सर्वज्ञ असता तर त्याला साक्षीदारांचे काय काम ? तो सर्वज्ञ असता तर त्याला सर्व काही समजले असते. यावरून असे नक्की ठरते की यांचा ईश्वर सर्वज्ञ नसून माणसांसारखा अल्पज्ञ आहे. तो ईश्वरत्वाचे काय काम करू शकणार? नाही !नाही!नाही !!! याच प्रकरणात देवदूतांच्या मोठमोठ्या अशक्य गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्या कोणीही खऱ्या मानू शकत नाही. किती म्हणून लिहावे? या प्रकरणात सगळ्या अशाच गोष्टी भरलेल्या आहेत. ॥१२४॥

(१२५) आणि तिच्या अधर्माची (कुकर्माची) आठवण देवाने केली आहे. जसे तिने दिले तसे तिला द्या. तिच्या कर्मांप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता.-यो० प्र० प० १८। आ० ५। ६।।

(समीक्षक) पाहा, ख्रिस्त्यांचा ईश्वर प्रत्यक्ष अन्याय करणारा आहे. कारण ज्याने जसे व जेवढे कर्म केले असेल त्याला तसे व तेवढेच फळ देणे याला न्याय म्हणतात. त्याहून कमी अथवा अधिक देणे हा अन्याय आहे. जे लोक अन्याय करणाऱ्याची उपासना करतात ते न्यायी कसे असतील?॥१२५॥

(१२६) कारण कोकराचे लग्न निघाले आहे; आणि त्याचा नवरीने स्वत:ला सजविले आहे. -यो० प्र० प० १९। आ० ७।।

(समीक्षक) आता ऐका! खिस्त्यांच्या स्वर्गात विवाहही होतातकारण येशूचा विवाह ईश्वराने तेथेच केला. तेव्हा विचारले पाहिजे की, त्याचा सासरा, सासू, मेहुणा वगैरे कोण होते आणि त्याला किती मुलेबाळे झाली? आणि वीर्यनाश झाल्याने शक्ति, बुद्धि, पराक्रम, आयुष्य वगैरेही घटत जाते. त्यामुळे एव्हाना येशूने तेथे देहत्यागही केला असेल. कारण संयोगजन्य पदार्थाचा वियोग अवश्य होत असतो. आतापर्यंत ख्रिस्ती लोकांनी येशूवर श्रद्धा ठेवून स्वतःची फसवणूक करून घेतली. यापुढेही ते किती काळ आपली अशी फसवणूक करून घेत राहतील कोण जाणे ?॥१२६॥

(१२७) त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साय म्हणजे अजगर त्यास धरले. त्याने एक हजार वर्षेपर्यंत अगाधकूपात बांधलेला असा पडून राहावे म्हणून त्याला त्या अगाधकूपात टाकून दिले आणि हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर सील ठोकले. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. -यो० प्र० प० २०। आ० २। ३।।

52
(समीक्षक) पाहा ! मरू मरू म्हणून मोठ्या मुष्किलीने सैतानाला पकडले आणि एक हजार वर्षांपर्यंत त्याला बंद करून ठेवले. तरीही सुटेल त्यावेळी तो पुनः लोकांची दिशाभूल करणार नाही काय? अशा दुष्टाला कायमचे तुरुंगातच डांबून ठेवले पाहिजे किंवा मारल्या शिवाय सोडूच नये. परंतु या सैतानाचे अस्तित्व हा ख्रिस्त्यांचा केवळ भ्रम आहे. वास्तवात तसे काहीही नाही. फक्त लोकांना भीती दाखवून आपल्या कळपात ओढण्याची ती एक योजना आहे. एका लबाड इसमाने भोळ्याभाबड्या लोकांना सांगितले की, "चला! मी तुम्हांला देवाचे दर्शन घडवितो. तो त्यांना एका एकांत जागी घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने आधीच एका माणसाला चतुर्भुज बनवून एका झाडीमध्ये उभे करून ठेवले होते. त्याने त्या लोकांना सांगितले की, "डोळे मिटा व मी सांगेन तेव्हा डोळे उघडा. आणि पुन: मी सांगेन तेव्हा डोळे मिटा. जो कोणी डोळे मिटणार नाही तो आंधळा होईल." असाच त्यांच्या मनात आहे की जो आमचे मत मानत नाही तो सैतानाने पछाडलेला आहे. त्याप्रमाणे तो त्यांना तेथे घेऊन गेल्यावर म्हणाला, "तो पाहा नारायण!" आणि लगेच त्यांना डोळे मिटण्यास सांगितले. तो देव बनलेला माणूस जेव्हा झाडीत लपला तेव्हा त्याने त्या लोकांस सांगितले" आता डोळे उघडा, तुम्हा सर्वांना नारायणाचे दर्शन घडले!"  वेगवेगळ्या पंथियांच्या या अशाच लीला आहेत. म्हणून त्यांच्या मायाजाळात कोणी अडकता कामा नये. ॥१२७॥

(१२८) नंतर मोठे पांढरे राजसिंहासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश हे दोन्ही पळाले. त्यांच्याकरिता ठिकाण म्हणून सापडले नाही. .. मग मृत झालेल्या लहानथोरांना मी राजसिंहासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरविण्यात आला. -यो० प्र० प० २०। आ० ११। १२।।

(समीक्षक) किती पोरकटपणाच्या गोष्टी आहेत पाहा! पृथ्वी आणि आकाश कसे पळू शकतील? कशावर स्थिर राहणार? ज्याच्या समोरून ते पळाले त्याचे सिंहासन व तो कोठे राहिला? मेलेल्या माणसांना परमेश्वरासमोर उभे करण्यात आले तेव्हा परमेश्वर बसला होता की उभा होता ? इहलोकातील न्यायालय (कचेरी) व दुकान यांमध्ये जसा व्यवहार चालतो तसाच ईश्वराचा व्यवहार चालतो की जो कागदपत्रात लिहिल्याप्रमाणे हिशेब चालतो त्यांमध्ये सर्व जीवांची हकीकत ईश्वर स्वतः लिहितो की त्याचे दिवाणी लिहितात ? असल्या हास्यास्पद गोष्टींवर लोकांना विश्वास ठेवायला सांगून ख्रिस्ती वगैरे पंथाच्या लोकांनी तो ईश्वर नाही त्याला ईश्वर बनवून टाकले आहे. आणि जो खरा ईश्वर आहे त्याला अनीश्वर ठरवून टाकले आहे. ॥१२८॥

(२९) सात देवदूतपैकी एक देवदूत मजबरोबर बोलला. तो म्हणाला, "ये. नवरी म्हणजे कोकराची  बायको मी तुला दाखवितो." -यो० प्र० प० २१। आ० ९।।

(समीक्षक) छान! येशूला स्वर्गात नवरी म्हणजे स्त्री तर छानच मिळाली. तो मजा मारत असेल. जे-जे ख्रिस्ती तेथे जात असतील त्यांनाही स्त्रिया मिळत असतील आणि मुले-बाळे होत असतील आणि फार गर्दी झाल्यामुळे रोगराई होऊन मरतही असतील. अशा स्वर्गाला येथूनच हात जोडले पाहिजेत!॥१२९॥

53
(१३०) नगर चौरस होते. त्याची जितकी रुंदी होती तितकीच त्याची लांबी होती. त्याने नगराचे माप बोरूने घेतले. ते सहाशे कोस भरले. त्याची लांबी, रुंदी व उंची समान होती...मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले. ते माणसाच्या हाताने एकशे चव्वेचाळीस हात भरले. माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात..त्याचा तट 'यास्फे' रत्नाचा होता आणि नगर शुद्ध काचेसारखे शुद्ध सोनेच होते..नगराच्या तटाचे पाय वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातु, चवथा पाचू, .. पाचवा गोमेद, सहावा सार्दी (माणिक), सातवा लसणा (पीतमणी), आठवा गोमेद (फीरोजा), नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा यार्कींथ (धूम्रकांत), बारावा पद्मराग या रत्नांचा होता. .. बारा वेशी, बारा मोत्यांच्या होत्या. एकेक वेस एकेका मोत्याची होती. नगरातील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. -यो० प्र० प० २१। आ० १६। १७। १८। १९। २०। २१।।

(समीक्षक) ख्रिस्त्यांच्या स्वर्गाचे हे वर्णन ऐका. ख्रिस्ती लोक एवढ्या मोठ्या संख्येने जन्मतात व मरतातते सगळे एवढया मोठ्या शहरात (स्वर्गात) कसे सामावू शकतील ? कारण तेथे माणसाचे आगमन होते. पण तेथून कोणी बाहेर जात नाही. ही नगरी बहुमूल्य रत्नांनी बनविलेली आहे, ती संपूर्ण सोन्याची आहे, वगैरे जे काही लिहिलेले आहे तो भोळ्याभाबड्या लोकांना फसवून गुंतविण्याचा डाव आहे. शहराची जी लांबी-रुंदी लिहिलेली आहे ती असू शकते. परंतु त्याची उंची साडेसातशे कोस कशी काय असू शकेल ? ही सर्वस्वी खोटी, कपोलकल्पनेतील गोष्ट आहे आणि एवढे मोठे मोती कोठून आले असतील? हे लिखाण करणाऱ्याच्या घरच्या माठातून ? या थापा पुराणांच्याही बाप आहेत.॥१३०॥

(१३१) त्याच्यात काही निषिद्ध आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही. तर कोकरच्या जीवनी पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. -यो० प्र० प० २१। आ० २७।।

(समीक्षक) जर असे आहे तर पापी लोकही खिश्चन झाल्यास स्वर्गात जाऊ शकतात असे ख्रिस्ती लोक का सांगतात? हे बरोबर नाही. तसे असेल तर ज्या योहानने (सेट जॉनने) या पुस्तकात इतक्या खोट्यानाट्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत तो स्वर्गात कधीच प्रवेश करू शकला नसणार. तसेच येशुही स्वर्गात गेला नसणार कारण जर एकटा पापी स्वर्ग प्राप्त करू शकत नाही तर ज्याने अनेक पाप्यांच्या पापांचे ओझे आपल्या शिरावर घेतले आहे तो कसा काय स्वर्गवासी होऊ शकेल?

(१३२) पुढे काहीही शापित असणार नाही. तर त्यामध्ये देवाचे व कोकराचे राजसिंहासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील... ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. .. यापुढे रात्र असणार नाही आणि त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही. कारण प्रभू देव त्यांजवर प्रकाश पाडतो; आणि ते युगानुयुगे राज्य करतील. -यो० प्र० प० २२। आ० ३। ४। ५।।

(समीक्षक) पाहा! हाच ख्रिस्त्यांचा स्वर्गवास. ईश्वर आणि येशू कायमचे सिंहासनावर बसून राहणार काय? आणि त्यांचे दास सदैव त्यांची तोंडे पाहत त्यांच्या समोर उभे राहणार? आता हे तर सांगा की तुमच्या ईश्वराचे तोंड युरोपीय लोकांच्या तोंडासारखे गोरे आहे की आफ्रिकेतील काळ्या लोकांच्या तोंडासारखे काळे

54
अथवा इतर देशांतील लोकांच्या तोंडासारखे आहे? तुमचा हा स्वर्गही तुरुंगासारखा बंधनरूप आहे. कारण तेथील लोकांमध्ये लहान मोठा भाव आहे आणि त्या एकाच नगरात राहणे भाग असते. मग तेथे दुःख का असणार नाही ? तसेच जो चेहरा धारण करणारा आहे तो ईश्वर कधीही सर्वज्ञ व सर्वेश्वर असू शकत नाही. ॥१३२॥

(१३३) पाहा, मी लौकर येतो. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ (फळ) आहे. -यो० प्र० प० २२। आ० १२।।

(समीक्षक) प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते तर पापांची कधीही क्षमा होत नाही आणि जर क्षमा दिली जात असेल तर बायबलातील गोष्टी खोटया आहेत. जर कोणी असे म्हणेल की क्षमा करणेही बायबलात लिहिले आहे तर ही दोन विधाने परस्परविरोधी म्हणून खोटी आहेत. म्हणून त्यांना मानणे सोडून द्या. ॥१३३॥

बायबलामध्ये लाखोगोष्टी खंडनीय आहेत. त्या सर्वाविषयी कुठवर लिहावयाचे ? ख्रिस्त्यांचा मतग्रंथ जे बायबल त्यातील वर्णनाचा केवळ थोडासा नमुना वानगीदाखल आम्ही येथे दाखविला आहे. एवढ्या वरूनच बुद्धिमान लोक पुष्कळ काही समजून घेतील. त्यातील काही थोड्या गोष्टी वगळल्यास इतर साऱ्या खोट्यनाट्या गोष्टीच त्यात भरलेल्या आहेत. असत्याच्या संगतीने सत्यही शुद्धराहत नाही. त्याचप्रमाणे बायबल हा मतग्रंथही स्वीकारार्ह होऊ शकत नाही. परंतु ते सत्य तर वेदांचा स्वीकार केल्यानेच ग्रहण होते.

इति श्रीमदयानन्दसरस्वतीस्वामिनिर्मिते सत्यार्थप्रकाशे
सुभाषाविभूषिते कृश्चीनमतविषये
त्रयोदशः समुल्लास संम्पूर्णः ॥१३॥

No comments:

Post a Comment