पुराण-समीक्षा
(प्रश्न) पुराणातील सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत की त्यांतल्या काही खऱ्याही आहेत?
(उत्तर) बहुतेक गोष्टी खोट्या आहेत. परंतु घुणाक्षरन्यायाने एखादी गोष्ट खरीही आहे. जी एखादी गोष्ट खरी आहे ती वेदादी सत्याशास्त्रांतून घेतलेली आहे; आणि ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या भटाभिक्षुकांनी रचलेल्या आहेत. जसे, शिवपुराणामध्ये शैवांनी शिवाला परमेश्वर मानून विष्णु, ब्रह्मा, इंद्र. गणेश, सूर्य इत्यादिकांना शिवाचे दास ठरविले आहे; वैष्णवांनी आपल्या विष्णुपुराणात विष्णूला परमात्मा मानून शिवादिकांना विष्णूचे सेवक बनविले. देवीभागवतात देवीला परमेश्वरी आणि शिवविष्णू वगैरेंला तिचे नकार बनविण्यात आले. गणेश पुराणात गणपतीला ईश्वर व इतर सर्वांना त्याचे दास बनविले गेले. या साच्या गोष्टी या सांप्रदायिकांनी नव्हे तर कोणी केल्या? ही सारी पुराणे एकाच माणसाने रचली असती तर त्यांत अशा परस्परविरोधी गोष्टी आल्या नसत्या. ती विद्वानांनी लिहिली असती तर अशा विचित्र गोष्टी त्यात मुळीच आल्या नसत्या. यापैकी एका पुराणातील गोष्ट खरी मानावी तर दुसन्या पुराणातील गोष्ट खोटे ठरते, दुसऱ्या पुराणातील गोष्ट खरी मानावी तर तिसऱ्या पुराणातील गोष्ट खोटी ठरते आणि तिसऱ्या पुराणातील गोष्ट खरी मानावी तर इतर सगळया पुराणांतल्या गोष्टी खोट्या ठरतात.
शिवपुराण समीक्षा
शिवपुराणकारांनी शिवाला, विष्णुपुराणकारांनी विष्णूला, देवीपुराणकारांनी देवीला, गणेशपुराणकारांनी गणपतीला, सूर्यपुराणकारांनी सूर्याला व वायुपुराणकारांनी वायूला सृष्टीची उत्पत्ती व प्रलय करणारा ठरविले असून त्यांच्यापैकी प्रत्येकजण जन्माला आल्याची कथाही लिहिली आहे. त्यांना असे विचारले पाहिजे की, जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारा स्वत: कसा उत्पन्न होईल? आणि जो स्वतः उत्पन्न होतो तो सृष्टी कशी निर्माण करू शकेल ? या प्रश्नांना त्यांच्याजवळ काहीच उत्तर नसल्यामुळे त्यांना गप्प बसण्याखेरीज गत्यंतर नाही. त्या सर्वांच्या शरीरांची उत्पत्ती सृष्टीतील पदार्थांनीच झाली असली पाहिजे. अशा स्थितीत ते स्वतः सृष्ट पदार्थ व परिच्छिन्न (परिमित) असताना जगाची उत्पत्ती कशी काय करू शकतील ? शिवाय या पुराणांमध्ये टीची उत्पत्ती निरनिराळ्या विलक्षण प्रकारांनी झाल्याचे सांगितले आहे. ते प्रकार तर अगदी अशक्य कोटीतले आहेत. जसे,
शिवपुराणानुसार शिवाने अशी इच्छा केली की, आपण आता सृष्टी निर्माण करावी. म्हणून त्याने एक नारायण जलाशय निर्माण केला. त्या नारायणाच्या बेंबीतून एक कमळ बाहेर आले आणि त्या कमळातून ब्रह्मा उत्पन्न झाला. त्याने पाहिले की, सर्वत्र पाणी पसरलेले आहेत्याने आपल्या ओंजळीत पाणी घेऊन ते जलाशयाच्या पाण्यात टाकले. त्याबरोबर त्या पाण्यातून एक बुडबुडा वर आला, त्या बुडबुड्यातून एक पुरुष
उत्पन्न झाला. त्याने ब्रह्माला सांगितले की, "हे पुत्रा, तूसृष्टी उत्पन्न कर." ब्रह्माने त्याला सांगितले की, "मी तुझा पुत्र नसून तू माझा पुत्र आहेस." यावरून त्यांच्यात विवाद सुरू झाला आणि ते दोघे (दिव्य) देवांची हजार वर्षे एकमेकांशी जलावर लढत राहिले. तेव्हा महादेवाने असा विचार केला की, ज्यांना मी सृष्टी उत्पन्न करण्यासाठी पाठविले ते दोघे आपसात भांडत-लढत बसले आहेत. तेव्हा त्या दोघांच्या मधून एक तेजोमय लिंग उत्पन्न झाले आणि ते बघता बघता आकाशापर्यंत वाढले. ते पाहुन दोघेही आश्चर्यचकित झाले. त्यांनी असा विचार केला की, या लिंगाचा आदि-अंत शोधून काढला पाहिजे. त्यांनी असे ठरविले की, आपल्या दोघांपैकी जो कोणी या लिंगाचा आदि-अंत शोधून काढून आधी परत येईल तो पिता आणि जो नंतर किंवा शोध न लावताच परत येईल तो पुत्र असे समजावयाचे.
विष्णूने कासवाचे रूप धारण केले व तो पाताळाच्या दिशेने जाऊ लागला आणि ब्रह्मा हंसाचे रूप धारण करून आकाशातून उडाला. दोघेही मनाच्या वेगाने निघालेदिव्य सहस्र वर्षांपर्यंत दोघेही जात राहिले. परंतु कोणालाच त्याचे टोक सापडले नाही. तेव्हा विष्णू खालून वर आणि ब्रह्मा वरून खाली जाऊ लागला. ब्रह्माने मनात विचार केला की, विष्णू टोकाचा शोध घेऊन आला तर मला त्याचा मुलगा बनावा लागेल. तो असा विचार करीत असतानाच एक गाय आणि एक केतकीचे झाड वरून खाली आले. त्यांना ब्रह्माने विचारले की, तुम्ही कोठून आलात" त्यांनी सांगितले की, "आम्ही हजार वर्षांपासून या लिंगाच्या आधाराने चालत येत आहोत." ब्रह्माने विचारले, "या लिंगाचा शेवट कोठे तरी आहे की नाही?त्यांनी सांगितले, "नाही !"
ब्रह्माने त्यांना सांगितले की, "तुम्ही माझ्याबरोबर चला आणि मी सांगतो तशी साक्ष द्या. गाईने सांगावे की, "मी या लिंगाच्या मस्तकावर दुधाच्या धारेचा वर्षाव करीत होते आणि झाडाने असे सांगावे की, "मी या लिंगावर पुष्पवृष्टी करीत होते. तुम्ही अशी साक्ष द्याल तर मी तुम्हाला तुमच्या ठिकाणावर घेऊन जाईन."ते म्हणाले" आम्ही खोटी साक्ष देणार नाही. हे ऐकताच ब्रह्मा क्रुद्ध होऊन म्हणाला, 'मी सांगतो तशी साक्ष तुम्ही देणार नसाल तर मी तुम्हाला आताच्या आता भस्म करून टाकतो. तेव्हा ते दोघे घाबरून म्हणाले, "तू सांगतोस तशी साक्ष आम्ही देतो." मग ते तिथे खाली उतरू लागले
हे तिघे पोचण्यापूर्वीच विष्णू तेथे आला होता. ब्रह्मा तेथे जाऊन पोचल्यावर विष्णूला त्याने विचारले, "तुला थांग लागला की नाही?" विष्णू म्हणाला, "मला काही याचा थांग लागला नाही. ” ब्रह्माने सांगितले की, "मी याचे टोक पाहून आलो आहे. तेव्हा विष्णू म्हणाला की, "तुझ्या या म्हणण्याला साक्षीदार कोण आहे?" तेव्हा गाय व केतकीचे झाड यांनी पुढे येऊन अशी साक्ष दिली की, "आम्ही दोघे या लिंगाच्या मस्तकावर होतो तेव्हा हा ब्रह्मा तेथे आला होता. त्याबरोबर लिंगातून शापवाणी बाहेर पडली. त्याने झाडाला असा शाप दिला की, "ज्याअर्थी तू खोटे बोलला आहेस त्या अर्थी तुझे फूल माझ्यावर अथवा जगातील कोणत्याही देवावर वाहिले जाणार नाही आणि जो कोणी ते देवावर वाहील त्याचा सत्यानाश होईल." त्याने गाईला असा शाप दिला की, "ज्या तोंडाने तू खोटे बोललीस त्याच तोंडाने तू विष्ठा खाशील. तुझ्या मुखाची पूजा कोणी करणार नाही. मात्र तुझ्या शेपटीची पूजा लोक करतील" आणि त्याने ब्रह्माला असा शाप दिला की, "तू खोटे बोललास म्हणून जगात कोणीही तुझी पूजा करणार नाही." त्याने विष्णूला असा वर दिला की, "तू खरे बोललास म्हणून तुझी पूजा सर्वत्र केली जाईल."
यानंतर ब्रह्मा व विष्णू यांनी लिंगची स्तुती केली. त्यामुळे ते लिंग प्रसन्न झाले व त्यातून एक जटाजूटधारी मूर्ती बाहेर आली; आणि म्हणाली, "मी तुम्हाला सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी पाठविले असता ते न करता तुम्ही आपसात का भांडत राहिलात?" तेव्हा ब्रह्मा व विष्णू यांनी विचारले, "आमच्या जवळ कसलीच सामग्री
नसताना आम्ही सृष्टी कशी निर्माण करणार?" यावर महादेवाने आपल्या जटेतून एक भस्माचा एक गोळा काढून दिला आणि म्हटले, "जा यातूनच तुम्ही सृष्टी निर्माण करा." वगैरे.
आता ही पुराणे रचणाऱ्याना असे विचारले पाहिजे की, जेव्हा सृष्टी-तत्व आणि पंचमहाभूते ही अस्तित्वात
नव्हती, तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांची शरीरे, जल, कमळ, लिंग, गाय आणि केतकीचे झाड व भस्माचा गोळा ही काय तुमच्या बापाच्या घरातून येऊन पडली?
भागवत पुराण समीक्षा
याचप्रमाणे भागवतात असे सांगितले आहे की, विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मा, ब्रह्माच्या उजव्या पायाच्या अंगठ्यापासून स्वायंभुव व डाव्या पायाच्या अंगठ्यापासून शतरूपा राणी, ललाटापासून रुद्र, मरीची आदी दहा पुत्र उत्पन्न झाले. त्यांच्यापासून दहा प्रजापती झाले. त्यांच्या तेरा मुलींचा विवाह कश्यपाबरोबर झाला. त्यांच्यापैकी दितीपासून दैत्य, दनूपासून दानव, अदितीपासून आदित्य, विनतेपासून पक्षी, कद्रुपासून सर्प, सरमेपासून कुत्रे, कोल्हे आणि इतर स्त्रियांपासून हत्ती घोडे, उंट, गाढव, रेडा, गवत, पालापाचोळा व बाभळीसारखे काटेरी वृक्ष उत्पन्न झाले.
वाः! वा: भागवत रचणाऱ्याची अक्कल काय वर्णावी ? भल्या माणसा, असल्या भाकडकथा लिहिताना थोडीदेखील तुला शरम वाटली नाही? तू तर ठार आंधळा बनलास की? श्री पुरुषांच्या रजोवीर्याच्या संयोगाने
माणसेच जन्माला येतात; परमेश्वराच्या सृष्टिक्रमाविरुद्ध पशु, पक्षी, साप वगैरे कधीही उत्पन्न होऊ शकत नाहीत. हत्ती, उंटसिंह, कुत्रे, गाढव, वृक्ष वगैरे प्राणी व वनस्पती स्त्रीच्या गर्भाशयात राहू तरी शकतील काय?
आणि सिंहासारख्या हिंस्त्रपशूनी उत्पन्न झाल्यावर आईबापांनाच कसे खाऊन टाकले नाही? शिवाय मानवी शरीरातून पशुपक्षी, वृक्ष वगैरे उत्पन्न होणे शक्य तरी आहे काय?
या लोकांनी रचलेल्या अत्यंत असंभव अशा भाकडकथांवर अजून काही लोकांचा विश्वास बसतो, ही दुःखाची गोष्ट आहे. या साफ खोट्या गोष्टी आंधळे पुरोहित आणि आतले व बाहेरचे डोळे फुटलेले त्यांचे चेले ऐकतात व त्यांवर विश्वास ठेवतात. ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे. ही माणसे आहेत की इतर कोणी? ही भागवतादी पुराणे रचणारे गर्भातच किंवा जन्मताच का नष्ट झाले नाहीत? किंवा जन्मास येतानाच का मेले नाहीत? तसे झाले असते तर आम्ही या पापापासून वाचलो असतो आणि आर्यावर्त देशाचे अनेक दुःखे टळली असती.
(प्रश्न) या गोष्टींच्या बाबतीत विरोध असण्याचे कारण नाही. म्हणतात ना, 'ज्याचे लग्न त्याचीच गणी' जेव्हा विष्णूची स्तुती करू लागतात तेव्हा ते विष्णूला परमेश्वर आणि इतर देवांना त्याचे दास ठरवितात. शिवाचे गुणगान करू लागले की शिवाला परमात्मा आणि इतरांना त्याचे किंकर बनवितात. बाकी परमेश्वराच्या मायेने सारे काही घडू शकते म्हणा ! परमेश्वर माणसापासून पशुपक्ष्यांची आणि पशुपक्ष्यांपासून माणसांची उत्पत्ती करू शकतो. नाहीतरी त्याने काही कारण नसतांना आपल्या मायेने सारी सृष्टी निर्माण केलीच आहे की त्याला काय अशक्य आहे? त्याला जे हवे असेल ते सारे तो करू शकतो.
(उत्तर) अरे भोळ्या माणसांनो ! लग्नामध्ये ज्याचे गुणगान केले जाते त्याला सर्वात श्रेष्ठ आणि इतरांना च्याहून तुच्छ ठरवीत नाहीत अथवा त्यांची निंदानालस्ती करीत नाहीत. निदान त्याला सर्वांचा बाप तर ठरवीत नाहीत ना? बोला पुरोहितजी ! इतरांची खुशामत करणाऱ्या भाट चारणांहुनही तुम्ही जास्त थापाडे आहात की नाही? ज्याच्या मागून जावयाचे त्याला सर्वात श्रेष्ठ ठरवावयाचे आणि ज्याला विरोध करावयाचा त्याला सर्वात तुच्छ ठरवावयाचे हा कुठला न्याय? अर्थात तुम्हाला सत्य व धर्म यांच्याशी काय कर्तव्य आहे म्हणा ! तुमचा स्वतःचा स्वार्थ साधला की झाले .
माया ही माणसामध्ये असू शकते. जो कोणी कपटी, फसव्या असतो त्याला मायावी असे म्हणतात. परमेश्वरामध्ये कपट, फसवेगिरी वगैरे दोष नसल्यामुळे त्याला मायावी म्हणता येत नाही. जर सूष्टीच्या प्रारंभी
कश्यप व त्याच्या बायका यांच्यापासून पशु-पक्षी, साप, झाडे वगैरे उत्पन्न झाली असतील तर आजकालही तशी ती का होत नाहीत? सुष्टीक्रमाच्या बाबतीत आम्ही यापूर्वी जे लिहिले आहे तेच बरोबर आहे. पण पुरोहित मंडळी फसली आणि त्यांनी शास्त्रवचनातून वेगळेच अर्थ काढले. शतपथ ब्रह्मणात असे म्हटले आहे की,
तस्मात् काश्यप्य इमा प्रजा ।।शतपथ० प्रपा० ७।।ब्रा० ५।। कं० १।। व० ५।।
म्हणजे ही सारी सृष्टी कश्यपाने बनविली आहे.
कश्यप कस्मात् पश्यको भवतीति।। -निरु०।।अ० २।। खं० २०।।
सृष्टिकर्त्या परमेश्वराचे नाव कश्यप असे आहे. कारण तो पश्यक (द्रष्टा) आहे. 'पश्यतीति पश्यः, पश्य एव पश्यक' म्हणजे जो निर्भ्रम होऊन चराचर जगताला, सर्व जीवांना व त्यांच्या कर्माना, साऱ्या विद्यांना यथावत पाहातो तो पश्यक होय. तोच कश्यप व तोच परमेश्वर होय. ‘आद्यन्तविपर्ययश्च' या महाभाष्याच्या वचनानुसार पहिले अक्षर व अंत्याक्षर यांचा विपर्यास होऊन म्हणजे पहिले अक्षर शेवटी व शेवटचे अक्षर प्रथम येऊन 'पश्यक' या शब्दापासून कश्यप हा शब्द बनला आहेया शब्दाचा हा वैदिक अर्थ समजून न घेता भांग ढोसून सुष्टिक्रमाविरुद्ध भाकडकथा रचण्यात पुराणिकांनी आपला जन्म वाया घालविला.
मार्केंडेय पुराणातील दुर्गापाठामध्ये असे लिहिले आहे की, देवांच्या शरीरांतून तेज बाहेर पडून त्याची
एक देवी बनली. तिने महिषासुराला ठार मारले. त्याचेच दुसरे नाव रक्तबीज असे होते. त्या रक्तबीजाच्या शरीरातून एक जरी रक्तबिंदू जमिनीवर पडला तरी त्या बिंदूपासून तसाच रक्तबीज राक्षस तयार होत असे. त्यामुळे सारे जग रक्तबीजांनी भरून गेले. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या, वगैरे पुष्कळशा भाकडकथा त्यात आहेत. जर रक्तबीजांनी सारे जगभरून गेले होते तर देवी, तिचा सिंह आणि तिचे सैन्य कोठे राहत होते? हे रक्तबीज राक्षस देवीपासून दूर राहत होते असे तुम्ही म्हणत असाल तर त्यांनी सारे जग व्यापून टाकले होते या म्हणण्यात काही अर्थ उरत नाही. जर खरोखरीच सबंध जग रक्तबीजांनी भरून गेले असेल तर पशुपक्षी, मनुष्यादी प्राणी, पाण्यात राहणारे मासे, कासवे, सुसरी, मगरी वगैरे जलचरझाडे-झुडपेवृक्ष वगैरे कोठे राहिले असतील? बहुधा ते सारे दुर्गापाठ रचणाऱ्या पुरोहिताच्या घरात पळून जाऊन राहिले असतील !! पाहा, या लोकांनी भांगेच्या तारेत कसल्या भाकडकथा लिहुन ठेवल्या आहेत. त्यांचा काही ठिकाणा नाही.
आता ज्याला श्रीमद्भागवत' असे म्हणतात. त्यात किती चमत्कारिक गोष्टी सांगितलेल्या आहेत ते
पाहा. ब्रह्माला नारायणाने चतुःश्लोकी भागवताचा जो उपदेश केला आहे त्यात तो म्हणतो,
ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितम् ।
सरहस्यं तदंगञ्च गृहाण गदितं मया।। -भागवत।। स्कन्द २।। अ० ९।। श्लो० ३०।।
अर्थ : हे ब्रह्मदेवा ! विज्ञान व रहस्य यांनी युक्त असलेले आणि धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचे अंग असलेले माझे परमगुह्या ज्ञान तू माझ्याकडून ग्रहण कर, विज्ञानयुक्त ज्ञान म्हटल्यानंतर पुन: परम हे विशेषण लावण्याचे काय कारण? आणि एकदा गुह्य असे म्हटल्यानंतर पुन: रहस्ययुक्त म्हणून द्विरुक्ती करण्याची काय आवश्यकता? अशा प्रकारे आधारभूत असणारे मूळ श्लोकच निरर्थक असतील तर सारा ग्रंथच निरर्थक असणार हे उघड आहे. भागवताचे मूळच असे खोटे असल्याने त्यावरचा वृक्षही खोटाच असणार नाही काय? नारायणाने ब्रह्मदेवाला असा वर दिला आहे की,
भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति किर्हचित्।। भागवत।। स्कन्द २।। अ० ९।। श्लो० ३६।।
"तुला कल्प म्हणजे सृष्टी व विकल्प म्हणजे प्रलय यांमध्ये कधीही मोह होणार नाही. " हा वर मिळाला असताही त्याने दशमस्कंधात मोहित होऊन वत्सहरण केले. यापैकी एक गोष्ट खरी व दुसरी खोटी असणार म्हणून दोन्ही गोष्टी खोट्या ठरतात. जर वैकुंठामध्ये (राग) मोह, दोष, क्रोध, ईर्ष्या, दुख वगैरे गोष्टी नाहीत असे म्हणतात. तर मग सनकादिकांना वैकुंठाच्या दारात क्रोध का आला? जर क्रोध आला असेल तर तो स्वर्गच नाही. तेथे जय-विजय हे द्वारपाल होते. स्वामीची आज्ञा पाळणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनी सनकादिकांना अडविले, हा काय त्यांचा अपराध झाला? त्यांचा अपराध नसताना त्यांना शाप तरी का लागावा? परंतु त्यांना तर ‘पृथ्वीवर जाऊन पडाल." हा सनकादिकांनी दिलेला शाप लागला. यावरून असे सिद्ध होते की, तेथे पृथ्वी नव्हती. तेथे आकाशवायू, अग्नी आणि जल ही चारच तत्वे असणारतर मग वैकुंठाचे दारमंदिर, आणि पाणी हे कोणाच्या आधाराने राहिले होते? त्यानंतर जेव्हा जयविजयांनी सनकादिकांची स्तुती करून विचारले की, "महाराज, आम्ही पुनः वैकुंठात केव्हा येऊ?" यावर त्यांनी सांगितले की, "जर तुम्ही नारायणाची सप्रेम भक्ती कराल तर सातव्या जन्मात आणि विरोध भक्ती कराल तर तिसऱ्या जन्मात वैकुंठाला परत याल."
येथे विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. ती अशी की, जयविजय हे नारायणाचे नोकर होते. त्यांचे रक्षण करणे, त्यांना साह्य करणे हे नारायणाचे कर्तव्य होते. जर कोणी एखाद्याच्या नोकरांना अपराधाशिवाय
दुख देऊ लागला तर त्या नोकरांच्या मालकाने त्या इसमाला जरब बसविली पाहिजे. तसे तो न करील तर त्याच्या नोकरांची कोणीही दुर्दशा करील. खरे म्हणजे नारायणाने जयविजयांचा सन्मान करून सनकादिकांना चांगली शिक्षा द्यायला हवी होती. कारण त्यांनी आत जाण्याचा हट्ट का धरला? आणि नोकरांशी भांडून त्यांना शाप का दिला? जयविजयांच्या ऐवजी सनकादिकांना पृथ्वीवर ढकलून दिले असते तर तो नारायणाचा खरा न्याय झाला असता. नारायणाच्या घरातच एवढा अंधार म्हणजे अन्याय असेल तर जे वैष्णव स्वतःला त्याचे सेवक समजतात त्यांची जेवढी दुर्दशा होईल तेवढी थोडीच ! त्यानंतर विरोधभक्ती करण्याच्या इच्छेने ते दोघे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप यांच्या रूपाने जन्मास आले. त्यांच्या पैकी हिरण्याक्षाला वरहाने मारले. ती कथा अशी दिली आहे:
हिरण्याक्ष पृथ्वीला चटईप्रमाणे गुंडाळून उशाला घेऊन झोपी गेला. विष्णूने वरहाचे म्हणजे रानडुकराचे
रूप धारण करून त्याच्या डोक्याखाली असलेल्या पृथ्वीला आपल्या तोंडात पकडले. त्याबरोबर हिरण्याक्ष जागा झाला. मग त्या दोघांचे युद्ध जुंपले.त्यात वराहाने हिरण्याक्षाला मारून टाकले.
येथे असा प्रश्न उपस्थित होतो की, पृथ्वी गोल आहे की चटईसारखी सपाट. या प्रश्नाचे उत्तर पुराणिक
लोक देऊ शकणार नाहीत. कारण ते भूगोल विद्येचे शत्रु आहेत. हिरण्याक्षाने पृथ्वीला चटईप्रमाणे गुंडाळून उशाशी घेतले, तर तो स्वतः कशावर झोपला? आणि वराह तरी कशावर पाय देऊन धावत आला? त्याने पृथ्वीला तोंडात धरून ठेवले होते. मग ते दोघे कशावर उभे राहून लढले? तेथे उभे राहता येईल अशी दुसरी
जागाच नव्हती. बहुधा भागवतातील पुराणे रचणाऱ्या पुराणकारांच्या छातीवर उभे राहून त्यांनी युद्ध केले असावे आणि खुद्द पुराणकार कशावर झोपला असेल? हे म्हणजे थापाड्यांच्या घरी जमून इतर थापाड्यांनी
एकमेकांना लोणकढया थापा माराव्यात तशातलेच आहे. अशा मेळाव्यात थापांना काय तोटा?
आता हिरण्यकश्यपूची कथा ऐका. त्याचा प्रल्हाद नावाचा मुलगा पक्का ईश्वरभक्त होता. त्याचा बाप त्याला शिकण्यासाठी शाळेत पाठवीत असे. तेथे प्रल्हाद आपल्या शिक्षकांना सांगत असे की, माझ्या पाटीवर 'राम राम' असे लिहून द्या त्याच्या बापाला हे कळताच तो प्रल्हादला म्हणाला, 'तु माझ्या शत्रुचे भजन का करतोस?" परंतु त्याचे म्हणजे प्रल्हादाने ऐकले नाही. तेव्हा हिरण्यकश्यपूने त्याचे हात पाय बांधून
त्याला डोंगरावरून खाली फेकून दिले आणि विहिरीत ढकलून दिले. परंतु त्याला काहीही झाले नाही. तेव्हा
त्याने एक लोखंडाचा खांब अग्नीमध्ये लाल होईपर्यंत तापविला आणि प्रल्हादाला सांगितले, "तुझा इष्टदेव राम जर खरा असेल तर तू या खांबाला मिठी मारलीस तरी तुझे अंग भाजणार नाही. प्रल्हाद त्या खांबाला मिठी मारण्यास तयार झाला. परंतु त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली की,या खांबाला मिठी मारल्यास मी होरपळून
जाणार नाहीना? त्याच वेळी नारायणाने त्याला एक चमत्कार दाखविला. त्या तापलेल्या खांबावरून मुंग्यांची
एक रांग चालत असलेली त्याला दिसली.ते पाहताच त्याचा निश्चय पक्का झाला आणि त्याने चटकन पुढे होऊन त्या खांबाला मिठी मारली. त्याबरोबर खांब दुर्भागला. त्यातून नृसिंह प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याला ठार मारले. मग तो प्रल्हादाचे अंग प्रेमाणे चाटू लागला. त्याने प्रल्हादाला वर मागण्यास सांगितले तेव्हा प्रल्हादाने आपल्या पित्याला सद्गती मिळावी, असा वर मागितला. नृसिंहाने त्याला वर दिला की, "तुझे एकवीस पूर्वज (पिढया) सद्गतीला जातील."
आता पहा ! हीही तसलीच भाकडकथा आहे. भागवत वाचणाऱ्या किंवा ऐकणाऱ्या एखाद्या भक्ताला पकडून डोंगरावरून खाली फेकून दिले तर काय होईल? तो जिवंत राहणार नाही. कोणीही नारायण त्याला
वाचवायला येणार नाही. तो चक्काचूर होऊन मरून जाईल. प्रल्हादाचा बाप त्याला शिकण्यासाठी शाळेत पाठवीत होता. यात त्याने काय वाईट केले? आणि तो प्रल्हाद असा मूर्ख की विद्या शिकायची सोडून बैरागी
होऊ इच्छित होता. जळत्या खांबावरून मुंग्या चालत होत्या आणि त्याला स्पर्श केल्यानंतरही प्रल्हाद भाजला नाही, ही गोष्ट जो कोणी खरी मानीत असेल त्यालाही जळत्या खांबाला बांधून टाकले पाहिजे. तो जर भाजला नाही तर प्रल्हादाचे अंग पोळले नाही, असे समजता येईल. शिवाय जळत्या खांबात राहिलेला नृसिंह कसा जळून गेला नाही?
सनकादिकांनी तिसऱ्या जन्मात पुनः वैकुंठाला येण्याचा वर जयविजयांना दिला होता. त्याचा विसर तुमच्या नारायणाला पडला काय ? भागवतात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मा, प्रजापती, कश्यप, हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू या चारच पिढ्या झाल्या असताना नृसिंहाने कुठल्या एकवीस पिढयांचा उद्धार केला ? खुद प्रल्हादाची पिढी ही पाचवी पिढी होयमग एकवीस पिट्यांना सद्गती मिळेल असे सांगणे खुळेपणच नव्हे काय? पुढे तेच हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे रावण कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र (वक्रदंत) झाले असे सांगितले आहे. मग नृसिंहाचा वर कोठे गेला? अशा मूर्खपणाच्या गोष्टी मूर्ख लोकच सांगतात, ऐकतात व मानतात. विद्वान लोक तसे करत नाहीत.
पुतना व अकूर यांच्याविषयी भागवतात अशाच गप्पा आहेत.
रथेन वायुवेगेन ।भागवत।। स्कन्द १०।। अ० ३९।। श्लो० ३८।।
जगाम गोकुलं प्रति।।भागवत।। स्कन्द १०।। अ० ३८।। श्लो० २४।।
कंसाच्या सांगण्यावरून वायुवेगाने धावणाऱ्या घोड्याच्या रथात बसून अक्रूर सूर्योदय होत असतांना निघाला आणि चार मैल दूर असलेल्या गोकुळात सूर्यास्ताच्या वेळी पोचला. बहुधा ते घोडे भागवत लिहिणाऱ्या भोवती प्रदक्षिणा घालीत राहिले असावेत किंवा वाट चुकून भागवतकाराच्या घरी जाऊन घोडे हाकणारे सारथी व अक्रूर झोपले असावेत. पुतनेचे शरीर सहा कोस रुंद व त्याहून लांब होते असे भागवतात लिहिले आहे. श्रीकृष्णाने तिला मारून मथुराव गोकुळ यांच्यामध्ये टाकले म्हणू. जर खरोखरीच तिचे शरीर एवढे अवाढव्या असते तर मथुरा व गोकुळ ही दोन्ही गावे त्या शरीराखाली दबली गेली असती आणि त्यात पुराणकाराचे घरही सापडून चकाचूर झाले असते. अजामिळाची कथाही अशीच विसंगत आहे. त्याने नारदाच्या सांगण्यावरून आपल्या मुलाचे नाव नारायण असे ठेवले होते. मरणाच्या वेळी त्याने आपल्या मुलाला हाक मारली. ती ऐकून नारायण म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर धावून आला. नारायणाला अजामिळाच्या अंत:करणातील भावना कळली नाही काय? अजामीळ त्याच्या मुलाला हाक मारीत आहे, आपल्याला नव्हे. एवढेही परमेश्वराला समजले नाही काय? नामाचे माहात्म्य एवढे मोठे असेल तर आजकालही नारायणाचे स्मरण करणाऱ्यांची दुःखे दूर करण्यासाठी परमेश्वर का धावून येत नाही? ही गोष्ट खरी असली तर कैदी लोक नारायण नारायण असा जप करून तुरुंगातून का सुटून जात नाहीत ?
अशाच प्रकारे ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध सुमेरु पर्वताचे परिमाण लिहिले आहे. तसेच, प्रियव्रत राजाच्या
रथाच्या चाकोरीतून समुद्र निर्माण झाले, एकूण एकोणपन्नास कोटी योजन पृथ्वी आहे वगैरे असंख्य भाकड कथा भागवतात आहेत. त्याची मोजदादही करता येणार नाही.
हे भागवत बोबदेवाने (बोपदेवाने) रचले आहे. त्याचा भाऊ जयदेव याने 'गीतगोविंद' लिहिले आहे. 'हिमाद्री' नावाचा एक ग्रंथ त्याने रचला आहे. त्यात तो लिहितो की, ‘श्रीमद्भागवत पुराण मी रचले आहे. तशा
अर्थाचे श्लोक त्या ग्रंथात आहेत. त्या पुस्तकाची (पोथीची) तीन पाने आमच्याजवळ होती. त्यांतील एक पान
आता हरवले आहे. त्या पानामध्ये त्याने जे काही लिहिले होते त्याचा सारांश सांगणारे दोन श्लोक आम्ही बनविले आहेत. ते पुढे देत आहोत. ज्यांना मूळ मजकूर पाहावयाचा असेल त्यांनी हिमार्दी ग्रंथाचे अवलोकन
करावे.' आम्ही रचलेले श्लोक असे आहेत,
हिमाद्रे सचिवस्यार्थे सूचना क्रियतेऽधुना।
स्कन्धाऽध्यायकथानां च यत्प्रमाणं समासत ।।१।।
श्रीमद्भागवतं नाम पुराणं च मयेरितम्।
विदुषा बोबदेवेन श्रीकृष्णस्य यशोऽन्वितम्।।२।।
त्या हरवलेल्या पानात अशाच प्रकारचे श्लोक होते. राजाचा सचिव हिमाद्री याने बोबदेव पंडिताला सांगितले की, "तू रचलेल्या श्रीमद्भागवताचे संपूर्ण श्रवण करण्यास मला सवड नाही. म्हणून तू संक्षिप्तपणे श्लोकबद्ध सूचीपत्र तयार कर. ते पाहून श्रीमद्भागवताची कथा मला थोडक्यात समजाऊन घेता येईल. " म्हणून बोबदेवाने एकसूचीपत्र तयार केले. त्यातील हरवलेल्या एका पानात दहा श्लोक म्हणून अकराव्या श्लोकापासून पुढचे श्लोक खाली उद्धृत करीत आहोत. हे खाली लिहिलेले सर्व श्लोक बोबदेवाने रचले आहेतः-
बोधयन्तीति हि प्राहु श्रीमद्भागवतं पुन ।
पञ्च प्रश्ना शौनकस्य सूतस्यात्रेत्तरं त्रिषु।।११।।
प्रश्नावतारयोश्चैव व्यासस्य निर्वृति कृतात् ।
नारदस्यात्र हेतूक्ति प्रतीत्यर्थं स्वजन्म च ।।१२।।
सुप्तघ्नं द्रोण्यभिभवस्तदस्त्रत्पाण्डवा वनम् ।
भीष्मस्य स्वपदप्राप्ति कृष्णस्य द्वारिकागम ।।१३।।
श्रोतु परीक्षितो जन्म धृतराष्ट्रस्य निर्गम ।
कृष्णमर्त्यत्यागसूचा तत पार्थमहापथ ।।१४।।
इत्यष्टादशभि पादैरध्यायार्थ क्रमात् स्मृत ।
स्वपरप्रतिबन्धोनं स्फीतं राज्यं जहौ नृप ।।१५।।
इति वै राज्ञो दार्ढ्योक्तौ प्रोक्ता द्रौणिजयादय ।
इति प्रथमः स्कन्धः।।१।।
याप्रमाणे बारा स्कंधांचे सूचिपन्नबोबदेव पंडिताने तयार करून हेमाद्रीच्या सचिवाला दिले. कोणाला ते सविस्तर पाहावयाचे असेल तर त्याने बोबदेवकृत हिमाद्री नामक ग्रंथात ते पाहावे. अशाच प्रकारे इतर पुराणांमध्येही भाकडकथा भरलेल्या आहेत. एकाहून एक पोरकट चमत्कार त्यात आहेत.
श्रीकृष्णाचा जो इतिहास महाभारतात दिलेला आहे तो अत्यंत उत्तम आहे. त्यांचे गुण, कर्म, स्वभाव व चारित्र्य ही महापुरुषाला शोभावीत अशी आहेत. त्यामध्ये श्रीकृष्णाने जन्मापासन मरणापर्यंत कसलेही अधर्माचरण केले नाही, अथवा कोणतेही दुष्कृत्य त्याच्या हातून घडले नाही, असे लिहिले आहे. परंतु या भागवतकाराने वाटेल ते अनुचित दोष कृष्णाच्या माथी मारले आहेत. दूध, दही, लोणी इत्यादींची चोरी, कुब्जादासीशी समागम, परस्त्रियांशी रासक्रीडा इत्यादी खोटेच दोष श्रीकृष्णावर लादले आहेत. ते सारे वाचूनव इतरांना वाचून दाखवून, स्वतः ऐकून व इतरांना ऐकवून इतर पंथाच्या लोकांनी श्रीकृष्णाची बदनामी
चालविली आहे. भागवत नसते तर श्रीकृष्णासारख्या महात्म्यांची खोटी निंदा मुळीच झाली नसती. शिवपुराणामध्ये बारा ज्योतिर्लिंगाची कथा आहे. ती कथा सर्वथैव अशक्य कोटीतील आहे. नाव ठेवले आहे ज्योतिर्लिग. परंतु त्यात प्रकाशाचा लवलेश नाही. रात्रीच्या अंधारात दिव्याचा उजेड नसेल तर ते लिंग दिसत
नाही. त्या साऱ्या पुराणकारांच्या थापा आहेत.
सूर्यादी ग्रहपूजा समीक्षा
(प्रश्न) जेव्हा वेदाध्ययन करण्याची क्षमता माणसांमध्ये राहिली नाही तेव्हा स्मृतींची रचना केली गेली. जेव्हा स्मृतांचे अध्ययन करण्याएवढी बुद्धी राहिली नाही तेव्हा शास्त्रे लिहिली गेली. जेव्हा शास्त्राध्ययन करण्याचे सामर्थ्य ही नाहीसे झाले तेव्हा पुराणे रचली गेली. स्त्रिया आणि शुद्र यांना वेद वाचण्याचा किंवा ऐकण्याचा अधिकार नसल्यामुळे केवळ त्यांच्यासाठीच पुराणे रवण्यात आली.
(उत्तर) तुमचे हे म्हणणे चुकीचे आहे. कारण सामर्थ्य हे अध्ययन-अध्यापनानेच प्राप्त होत असते आणि वेद वाचण्याचा व ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे प्राचीन काळी गाणी वगैरे स्त्रियांनी वेदाध्ययन केले होते आणि छांदोग्यमध्ये जानश्रुती नावाच्या शुद्धानेही रैक्यमुनींकडे वेदाध्ययन केले होते. यजुर्वेदाच्या २६व्या अध्यायातील दुसऱ्या मंत्रात असे स्पष्ट सांगितले आहे की वेदपठन व वेदश्रवण करण्याचा अधिकार मनुष्यमात्राला आहे. अशा स्थितीत ज्यांनी पुराणासारखे असत्य ग्रंथ लिहिले आणि लोकांना सत्यग्रंथापासून विमुख करून आपल्या स्वार्थाच्या जाळ्यात अडकविले. त्यांना महापापी म्हणावयास नको काय? पाहा ! या पुराणिकांनी नवग्रहांचे भ्रमाचे जाळे पसरून निर्माण करून विद्याहीन लोकांना कसे जखडून टाकले आहे:-
आ कृष्णेन रजसा ।।१।। सूर्याचा मंत्र यजु० अ० ३३। मं० ४३।।
इमं देवाऽअसपत्नँ्सुवध्वम्० ।।२।। चंद्राचा मंत्र यजु० अ० ९। मं० ४०।।
अग्निर्मूर्द्धा दिवः ककुत्पतिः० ।।३।। मंगळाचा मंत्र यजु० अ० ३। मं० १२।।
उद्बुध्यस्वाग्ने० ।।४।। बुद्धाचा मंत्र यजु० अ० १५। मं० ५४।।
बृहस्पतेऽअति यदर्यो ।।५।। बृहस्पतिचा मंत्र यजु० अ० ६। मं० ३।।
शुक्रमन्धसः ।।६।। शुक्राचा मंत्र यजु० अ० ३४। मं० २।।
शन्नो देवीरभिष्टय० ।।७।। शनिचा मंत्र यजु० अ० १९। मं० ७५।।
कया नश्चित्र आ भुव० ।।८।। राहुचा मंत्र यजु० अ० २७। मं० १२।।
केतुं कृण्वन्नकेतवे ।।९।। यास केतुची कण्डिका म्हणतात० यजु० अ० २९। मं० ३७।।
(आ. कृष्णेन.) सूर्य आणि भूमीचे आकर्षण. ॥१॥ हा मंत्र चंद्रासाठी आहे असे समजतात. त्यात राजगुणाचे विधान आहे. ॥२॥ मंगळासाठी याचा जप करतात. यात अग्नीचेचे वर्णन आहे॥३॥ हा मंत्र बुधासाठी आहे असे समजातात. यात यजमान वर्णन आहे.||४|| गुरूसाठी या मंत्राचा जप केला जातो. यात विद्वानांचे गुण वर्णिले आहेत. ॥५॥ हा मंत्र शुक्रासाठी जपतात. त्यात अन्न व वीर्य यांची चर्चा आहे. ॥६॥ हा मंत्र शनीसाठी आहे असे समजतात. यात जल, प्राण व परमेश्वर यांचे वर्णन आहे. ॥७॥ हा मंत्र राहूसाठी आहे अशी समजूत आहे. यात मित्रविषयक चर्चा आहे.॥८॥ हा मंत्र केसाठी आहे असे मानले जाते. परंतु त्यात ज्ञाग्रहणासंबंधी विवेचन आहेसारांश, या मंत्राचा ग्रहांशी काहीही संबंध नाही, परंतु त्यांचा अर्थ न समजल्यामुळे पुराणिक भ्रमात वावरत आहेत.
(प्रश्न) ग्रहांचा काहीपरिणाम माणसांवर होतो की गही?
(उत्तर) हे भटभिक्षुक जसे सांगतात तसा परिणाम मुळीच होत नाही. परंतु नैसर्गिक परिणाम होत असतात. उदाहरणार्थ, सूर्याच्या किरणांपासून उष्णता व चंद्राच्या किरणांपासून शीतलता प्राप्त होते. तसेच ऋतुचक्रानुसार हवामानात जे बदल घडून येत असतात त्यांच्यामुळे उष्णता व थंडी निर्माण होऊन माणसाच्या प्रकृतीच्या अनुकूल-प्रतिकूल परिणाम होऊन त्याला सुख किंवा दुःख होत असते. पण जोशीबुवा लोकांना फसविण्यासाठी सांगतात, "महाराज ! शेटजी ! यजमान! आज तुमच्या पत्रिकेतील चंद्र, सूर्य इत्यादी क्रूर ग्रह अष्टमस्थानी आले आहेत. शनीची साडेसाती सुरू झाली असून त्याची वक्रदृष्टी तुमच्या पायावर पडली आहे त्यामुळे तुम्हाला अडीच वर्षे फारच त्रास होणार आहे. तो तुम्हाला घरदार सोडायला लावून देशोधडीला लावील. मात्र तुम्ही दान, जप, पूजा, पाठ वगैरे करून ग्रहांची शांती कराल तर साऱ्या दु:खापासून तुमचा बचाव होईल.
या लोकांना सांगितले पाहिजे की, “अहो भटजीबुवा ! तुमचा आणि ग्रहाचा काय संबंध? ग्रह ही काय चीज आहे?
(जोशीबुवा) दैवाधीनं जगत्सर्वं मन्त्रधीनाश्च देवता ।
ते मन्त्र ब्राह्मणाधीनास्तस्माद् ब्राह्मणदैवतम्।।
पाहा! केवढा मोठा पुरावा आहे । सारे जग देवांच्या आधीन आहे. सगळे देव मंत्रांच्या आधीन आहेत आणि ते मंत्र ब्राह्मणांच्या आधीन आहेत. म्हणून ब्राह्मणांना देव असे म्हणतात. वाटेल त्या देवाला मंत्र सामर्थ्याने बोलावून, प्रसन्न करून घेऊन आपले काम त्यांच्याकडून करवून घेण्याचा अधिकार आम्हालाच आहे. आमच्याजवळ मंत्रसामर्थ्य नसते तर तुमच्या सारख्या नास्तिकांनी आम्हाला या जगात राहच दिले नसते.
(सत्यवादी) चोर, दरोडेखोर, दुष्कृत्ये करणारे हे सारेही तुमच्या देवांच्या आधीन असतील ना? मग देवच त्यांच्याकडून दुष्कृत्ये करवून घेत असतील नाही? तसे असेल तर तुमचे देव आणि राक्षस यांच्यामध्ये काय फरक ? मंत्र तुमच्या कटात असतील तर तुम्ही त्यांच्याकडून वाटेल ती कामे करवून घेऊ शकत असणार मग त्या मंत्रांच्या साह्याने देवांना वश करून घेऊन तुम्ही राजे लोकांचे खजिने आणून आपल्या घरात ते का भरून ठेवीत नाही ? आणि स्वस्थ बसून आनंद का उपभोगीत नाही? असे घरोघरी जाऊन शनीसाठी तेलाचे
छायादान मागण्यासाठी तुम्ही दाणेदार भीक कशाला मागता? ज्याला तुम्ही धनदेवता समजता त्याला आपल्या मंत्राने वश करून घेऊन भरपूर धन मिळवा की ! बिचाऱ्या गरिबांना का लुटता?
तुम्हाला दान दिल्याने ग्रहप्रसन्न होतात आणि न दिल्याने रुष्ट होतात असे तुम्ही म्हणता.तर मग सूर्य वगैरे ग्रहांची प्रसन्नता व अप्रसन्नता कशी असते ते आम्हाला प्रत्यक्ष दाखवा. सूर्य, चंद्र वगैरे ग्रह ज्याच्या अष्टम स्थानी (म्हणजे अनुकूल) आहेत असा एकमाणूस आणि हे ग्रह ज्याच्या तृतीय स्थानी (म्हणजे प्रतिकूल) आहेत असा दुसरा माणूस घ्या. त्या दोघांना ऐन ज्येष्ठाच्या भर दुपारच्या उन्हात तापलेल्या जमिनीवरून अनवाणी चालायला लावा. आता सूर्य ज्याला अनुकूल आहे त्याचे शरीर व पाय होरपळता कामा नयेत; आणि तो ज्याला प्रतिकूल आहे त्याचे पाय होरपळले पाहिजेत. तसेच पौष महिन्यात पौर्णिमेच्या रात्रीत्या दोघांना रात्रभर उघड्या अंगाने उभे केले आणि त्यापैकी एकाला थंड वार्बली व दुसऱ्याला वाजली नाही तरग्रह हे कूर अथवा सौम्य दृष्टीचे असतात हे तुमचे म्हणणे आम्ही मान्य करू.
ग्रह तुमचे नातेवाईक किंवा इष्टमित्र आहेत काय? तुमचे टपाल किंवा तार त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्याकडून तुम्हाला पत्र, तार वगैरे येते काय? किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाता अथवा ते तुमच्याकडे येतात? तुमच्याजवळ मंत्रसामर्थ्य असेल तर तुम्ही स्वतः राजा किंवा धनाढ्य का होत नाही? किंवा शचूंना मंत्रसामर्थ्याने आपल्या आधीन का करीत नाही?
वेद व ईश्वराच्या आज्ञेविरुद्ध फलज्योतिषाच्या अशा प्रकारच्या पोपलीला चालवणारे नास्तिकच होत
ज्याला ग्रहदशा प्राप्त झालेली आहे त्याने तुम्हाला दानधर्म करण्याऐवजी स्वतःच त्या दानाचा उपभोग घेतल्यास काय हरकत? आम्हालाच दान दिले तर ग्रह प्रसन्न होतात. इतरांना दिल्यास ते प्रसन्न होत नाहीत, असे तुमचे म्हणणे असेल तर काय तुम्ही ग्रहांचा मक्ता घेतला आहे? जर तुम्ही तसा मक्ता घेतला असेल तर सूर्य वगैरे ग्रहांना तुम्ही आपल्या घरी बोलावून घ्या आणि जळून मरा.
खरी गोष्ट अशी आहे की, सूर्यादी लोक चेतन नसून जड (अचेतन) आहेत. ते कोणालाही सुख अथवा
दु:ख देण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत. परंतु ग्रहदानावर पोट भरणारे तुम्ही लोक मात्र इतरांना छळणारे मूर्तिमंत ग्रह आहात. ग्रह या शब्दाचा अर्थही तुम्हाला लागू पडतो. 'ये गृहणन्ति ते ग्रहाः' म्हणजे जे (दान) ग्रहण करतात त्यांना ग्रह असे म्हणतात. जोपर्यंत तुमचे पाय राजे, श्रीमंत, शेट, सावकार व गरीब लोकांपर्यंत जाऊन पोचत नाहीत तोपर्यंत कुणालाही नवग्रहांची आठवण देखील होत नाही. जेव्हा तुमही साक्षात सूर्य, शनी वगैरे ग्रहांचे मूर्तिमंत क्रूर रूप धारण करून त्यांच्या राशीला जाऊन बसता तेव्हा दान घेतल्याखेरीज त्यांना मुळीच सोडीत नाही. जे लोक तुमच्या कचाट्यात सापडत नाहीत त्यांना तुम्ही नास्तिक म्हणून त्यांची निंदा करीत फिरता.
(जोशीबुबा) ज्योतिषाचे प्रत्यक्ष फळ तुम्हीच पाहा ना ! आकाशात राहणारे सूर्य, चंद्र, राह, केतू यांच्या संयोगामुळे जे ग्रहण घडून येते त्यासंबंधी आम्ही आधीच सांगू शकतो. जसे ते ग्रहण आम्ही वर्तिविल्याप्रमाणे
ठराविक वेळी दिसते तसे ग्रहांचे फळही प्रत्यक्ष दिसते. ग्रहांमुळेच माणसे श्रीमंत, गरीब, राजा, रंक, सुखी किंवा दु:खी होतात.
(सत्यवादी) ग्रहणरूपी जे प्रत्यक्ष फळ दिसते ते गणितविद्येचे फळ आहे. फलज्योतिषाचे नव्हे. गणितविद्या ही खरी आहे. परंतु फलज्योतिष विद्या स्वाभाविक संबंधजन्य गोटी वगळता साफ खोटी आहे. अनुलोम किंवा प्रतिलोम गतीने फिरणारे पृथ्वी व चंद्र हे ग्रह अमुक वेळी कोठे असतील ते गणिताच्या साह्याने माहीत होतेत्यावरून अमक्या वेळी अमक्या देशात खग्रास किंवा खंडग्रास सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसेल असे खूप आधी सांगता येते. जसे,
छादयत्यर्कमिन्दुर्विधुं भूमिभा । ग्रहलाघव अ०५। व० ४।
हे सिद्धान्त शिरोमणीचें वचन आहे. सूर्यसिद्धान्त वगैरे ग्रंथांमध्येही असेच सांगितले आहे. त्याचा अर्थ असा की, "जेव्हा सूर्य व भूमी (पृथ्वी) यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते आणि जेव्हा सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते." म्हणजे असे की, चंद्राची छाया (सावली) पृथ्वीवर पडली की सूर्यग्रहण आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडली की चंद्रग्रहण होते. सूर्य स्वत:च प्रकाशरूप असल्यामुळे त्याच्यावर कोणाची छाया पडू शकत नाही. परंतु ज्याप्रमाणे दिवा व आपण यांच्यामध्ये एखादी वस्तू धरल्यास दिवा तिच्या आडोश्याला जातो व तो आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने सूर्य दिसेनासा होतो व आपल्या बाजूला सावली पडते त्यालाच सूर्यग्रहण म्हणतात. चंग्रहणाच्या वेळी पृथ्वीमुळे अशीच स्थिती घडून येते.
माणसे श्रीमंत, गरीबप्रजा, राजा, रंक वगैरे बनतात ती त्यांच्या कर्मांमुळे बनतात. ग्रहांमुळे नव्हे. अनेक ज्योतिषी आपल्या मुला-मुलींची लगे ग्रहांचे गणित मांडून, शुभ मुहूर्तावर करतात. तरीही त्यांपैकी काही लग्न पतिपत्नींमधील बेबनावामुळे अयशस्वी होतात. काही मुली विधवा होतात तर काही पुरुष विधुर होतात. फलज्योतिष खरे असते तर असे का झाले असते ? म्हणून कर्माची गती खरी असून ग्रहांची गती सुखदुःखाला कारणभूत नसते असेच म्हणावे लागते.
खरे म्हणजे ग्रह आणि पृथ्वी ही दोन्ही अवकाशाच्या पोकळीत एकमेकांपासून इतकी दूर आहेत की कर्त्ता व कर्म या नात्याने त्यांचा परस्परांशी कसलाही साक्षात संबंध असू शकत नाही. कर्म करणारा व त्या कर्माचे फळभोगणारा जीव आहे आणि कर्माची (सुख-दुःखरूप) फळे भोगावयास लावणारा परमात्मा आहे.
ग्रहांची फळे माणसाला भोगावी लागतात असे तुम्ही मानीत असाल तर या प्रश्नाचे उत्तरा की, ज्या क्षणी एका माणसाचा जन्म होतो, त्या क्षणाला तुम्ही ‘ध्रुवात्रुटी' समजून त्याची जन्मकुंडली मांडता त्याच क्षणी या पृथ्वीच्या पाठीवर दुसऱ्या एखाद्या माणसाचा जन्म होतो की नाही? होत नाही असे म्हणणे असेल तर ते साफ खोटे आहे आणि जर होतो असे तुम्ही म्हणत असाल तर एका चक्रवर्ती राजाच्या जन्मक्षणी जगामध्ये अन्यत्र जन्माला येणारा दुसरा माणूस चक्रवर्ती राजा का होत नाही ? आता तुम्ही जर म्हणत असाल की, सारी पोट भरण्यासाठी आम्ही चालविलेली तिकडम बाजी आहे, तर मात्र तुमचे म्हणणे कोणीही मान्य करील.
मृतक-श्राद्ध समीक्षा
(प्रश्न) गरुडपुराणही खोटे आहे काय?
(उत्तर) होय. ते साफ खोटे आहे.
(प्रश्न) मग मेलेल्या जीवाची काय गती होते?
(उत्तर) त्याने जशी कर्में केली असतील तशी त्याची गती होणार.
(प्रश्न) गरुड पुराणात असे लिहिले आहे की, यमपुरीचा राजा यम असून चित्रगुप्त हा त्याचा मंत्र आहे. काजळाच्या डोंगरासारखे प्रचंड व भयंकर असे त्याचे दूत शरीरधारी जीवाला पकडून घेऊन जातात; आणि
त्यांच्या पापपुण्यांनुसार त्यांना नरकात किंवा स्वर्गात टाकतात. म्हणून मृतात्म्यासाठी दान, पुण्य, श्राद्ध, तर्पण वगैरे करतात आणि वैतरणी नदी तरून जाण्यासाठी गोदान केले जाते या सगळ्याच गोष्टी खोट्या कशा असतील?
(उत्तर) या सगळ्या भाकडकथा भटाभिक्षुकांनी रचलेल्या आहेत. इतरत्र जीव यमलोकी जातात आणि धर्मराज (यम) व चित्रगुप्त वगैरे त्यांचा न्यायनिवाडा करतात. मग जे जीव यमलोकात राहतात आणि पापे करतात त्यांचा न्यायनिवाडा करणारा दुसरा एखादा यमलोक असला पाहिजे असे मानावे लागेल. तसेच यमदूतांची शरीरे पर्वतप्राय असतील तर ती दिसत का नाहीत? आणि मरणाच्या जीवांना नेण्यासाठी ते त्यांच्या घरात कसे जातात? त्यांच्या दारातून त्यांचे बोट देखील आत शिरणार नाही आणि लहान गल्लीबोळातून जाताना ते अडकून कसे बसत नाहीत ? तुम्ही असे म्हणाल की, ते सूक्ष्मदेह धारण करतात. मग त्यांच्या मूळच्या पर्वतमय शरीरातली अवाढव्य हाडे भटजीबुवा आपल्या घराखेरीज दुसरीकडे कोठे ठेवणार?
जेव्हा अरण्यात आग लागते तेव्हा किडे, मुंग्या वगैरे क्षुद्र जीव मोठ्या संख्येने मरतात. त्यांना यमलोकी घेऊन जाण्यासाठी असंख्य यमदूतांना तेथे जावे लागत असणार. डोंगराएवढे प्रचंड यमदूत तेथे एकदम गेल्याने सर्वत्र अंधार पसरत असणार. त्या अंधारात आपापल्या वाट्याच्या जीवांना पकडण्यासाठी ते धावपळ करीत असताना त्यांची एकमेकांशी टक्कर होत असणारपर्वतांची मोठमोठी शिखरे मोडून पृथ्वीवर पडतात तसे या यमदूतांचे अवयव गरुडपुराण वाचणाऱ्या व ऐकणाऱ्या लोकांच्या अंगणात पडतील तर त्यांच्याखाली दबून हे लोक मरून जातील किंवा ते अवयव त्यांच्या घराच्या दारात अथवा रस्त्यात पडले तर वाटच बंद होऊन जाईल. मग ते घरातून कसे बाहेर पडतील अथवा रस्त्याने कसे चालतील?
श्राद्ध, तर्पण, पिंडदान वगैरे त्या मृत जीवांपर्यंत जाऊन मुळीच पोचत नाही. मात्र मृत जीवांचे प्रतिनिधी बनलेल्या भोजनभाऊ भटांच्या घरी, पोटात व हातात जाऊन ते पोचते. वैतरणी नदी तरून जाण्यासाठी दान केलेली गाय भटजीवांच्या घरी किंवा कसायाच्या खाटिकखण्यात जाऊन पोचते. ती गाय वैतरणीच्या काठी न जाता येथेच राहते. मग कुणाची शेपटी पकडून तुम्ही वैतरणी पार करणार? शिवाय ज्या हाताने तिची शेपटी पकडायची तो हात तर येथेच जाळून किंवा पुरून टाकलेला असतो. मग गाईची शेपटी कशी पकडणार?
हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट मी सांगतो. एक जाट (शेतकरी) होता. त्याच्या घरी एक उत्कृष्ट गाय होती. ती रोज वीस शेर दूध देत असे. तिचे दूध अत्यंत स्वादिष्ट होते. कधीकधी ते भटजी महाराजांनाही प्यायला मिळत असे. तो पुरोहित मनात म्हणे, ‘या जाटाचा म्हातारा बाप जेव्हा मरायला टेकेल तेव्हा याच गाईचे दान करायला मी त्याला सांगेन. थोड्याच दिवसात दैवयोगाने त्या जाटाचा म्हातारा बाप मरायला टेकला. त्याची वाचा बंद झाली आणि त्याला खाटेवरून काढून जमिनीवर झोपविण्यात आले. याचा अर्थ असा की, त्याचा अंतराळ जवळ आला होता. जाटाचे नातेवाईक व इष्टमित्र गोळा झाले होते. त्यावेळी पुरोहित मोठ्याने ओडून म्हणाला, “अहो यजमान ! आता तुम्ही याच्या हातून गोदान करवा ." जाटाने १० रुपये काढून बापाच्या हातावर ठेवले आणि पुरोहिताला सांगितले, "म्हणा आता गोदानाचा संकल्प!" पुरोहित म्हणाला, "वाहवा। बाप काय वारंवार मरतो? तुम्ही यावेळी एक खरीखुरी गाय आणाती दूध देणारी असावी, म्हातारी नसावी. ती सर्व दृष्टींनी उत्तम असली पाहिजे. अशाच गाईंचे दान करावयाचे असते.
(जाट) आमच्या जवळ तर एकच गाय आहे. तिच्याशिवाय आमच्या मुलाबाळांचा सांभाळ होणार नाही. म्हणून मी ती गाय देणार नाही. तरीपण तुमचेही राहु द्या आणि आमचेही राहू द्या. हे २० रुपये घ्या आणि संकल्प सांगा. या वीस रुपयांची दुसरी दुभती गाय तुम्ही विकत घ्या.
(पुरोहित) वा ! वा ! तुम्ही तुमच्या बापापेक्षा गाईचे महत्व जास्त समजता काय? आपल्या बापाने वैतरणी नदीत बुडून दुःख भोगावे, अशी तुमची इच्छा आहे काय? चांगले सुपुत्र आहात की तुम्ही!
हे ऐकताच त्या जाटाचे नातेवाईक पुरोहिताच्या बाजूने बोलू लागले. कारण त्याने त्यांना आधीच शिकवून ठेवले होतेत्याने खूण करताच ते त्याच्यासारखे बोलू लागले आणि तीच गाय पुरोहितास द्यायला लावली. त्यावेळी जाट काही बोलला नाही. थोड्या वेळाने त्याचा बाप मेला. मग त्या पुरोहिताने ती गाय, तिचे
वासरू व दूध काढण्याची कासंडी ताब्यात घेतली आणि तो घरी गेला. तेथे त्याने गायीला बांधले आणि कासंडी घरात ठेवून तो पुनःजाटाच्या घरी आला. तेथून तो प्रेताबरोबर स्मशानात गेला आणि त्याने त्याचा दहनविधी करविला. तेथेही त्याने थापा मारून दक्षिणा उकळली. त्यानंतर दश गात्र, सपिंडी (पिंडदान) वगैरे
अंत्यसंस्काराच्या नावाखालीही पुरोहिताने जाटाला खूप लुबाडले. महाब्राह्मणांनीही धर्माच्या नावावर त्याला लुटले आणि खादाड व भिकारी यांनी भरपूर गोडधोड खाऊन घेतले. हे सारे चालू असताना जाटा इकडून तिकडून दूध मागून आणून कसेबसे भागविले. सगळे अंत्यसंस्कारपूर्ण झाल्यावर चौदाव्या दिवशी सकाळी जाट पुराहिताच्या घरी गेला. त्यावेळी गाईची धार कादून, कासंडी भरून पुरोहित ते दुध घरात नेत होता. इतक्यात जाट तेथे जाऊन पोचला. त्याला पाहून पुरोहित म्हणाला, 'या यजमान ! बसा।'
(जाट) भटजीबुवा ! तुम्ही ही जरा इकडे या
(पुरोहित) हे दूध घरात ठेवून येतो.
(जाट) छ ! छे! ती दुधाची कासंडी घेऊनच इकडे या.
यावर पुरोहिताने ‘ठीक आहे’असे म्हणून तो जाटाजवळ बसला. त्याने दुधाची कासंडी जाटासमोर ठेवली.
(जाट) भटजीबुवा ! तुम्ही मोठेच खोटारडे आहात.
(पुरोहित) मी काय खोटेपणा केला?
(जाट) तुम्ही मला असे सांगा की, तुम्ही माझी गाय कशासाठी घेतली होती?
(पुरोहित) तुमच्या वडिलांना वैतरणी नदी तरून जाता यावी म्हणून .
(जाट) तर मग तुम्ही ती गाय वैतरणीच्या काठी कापोचविली नाही? आम्ही तुमच्या भरवशावर राहिलो आणि तुम्ही तरती गाय आपल्या घरी आणून बांधली. माझ्या बापाला वैतरणी पार करताना किती त्रास झाला
असेल कोण जाणे.
(पुरोहित) छेः । छे. तुम्ही केलेल्या दान-पुण्याच्या प्रभावाने दुसरी एक गाय तेथे गेली असणार आणि तिने तुमच्या वडिलांना पैलतीराला नेऊन पोचविले असणार.
(जाट) वैतरणी नदी येथून किती दूर आणि कोणत्या बाजूला आहे?
(पुरोहित) वैतरणी येथून सुमारे तीस कोटी कोस दूर आहे. कारण पृथ्वी एकूण एकोणपन्नास कोटी योजने आहे; आणि तिच्या दक्षिण नैऋत्येला वैतरणी नदी आहे.
(जाट) इतक्या अंतरावरून तुमच्याशी पत्रव्यवहार चालत असेल, नाही? पत्र किंवा तार पाठवून गोदान झाल्याचे तुम्ही कळविले असेल आणि तिकडून त्या पुण्याची गाय बनली आणि तिने अमक्याच्या बापाला पैलतीराला नेऊन पोचविले असे उत्तर आले असेल. ते उत्तर मला दाखवा बधू?
(पुरोहित) आमच्या जवळ गरुडपुराणातील लिखाणाखेरीज दुसरा कसलाच पुरावा नाही. पत्र किंवातार नाही.
(जाट) गरुड पुराणात जे काही लिहिले आहे ते खरे आहे ते आम्ही खरे कसे मानावे?
(पुरोहित) जसे इतर सर्व लोक मानतात तसे.
(जाट) तो ग्रंथ तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला पोट भरता यावे म्हणून रचला आहे. कारण पित्याला आपल्या पुत्राखेरीज दुसरे कोणीही प्रिय नसते. जेव्हा माझेबाबा पत्राने किंवा तासे गाय घेऊन यायला कळवितील तेव्हा मी गाईला घेऊन वैतरणी नदीच्या काठी जाई आणि त्यांना पैलतीराला पोचवून गाईला परत घेउन येईल. मग मी माझ्या मुलाबाळांसह तिचे दुध पिईन. आणा ती कासंडी इकडे.
असे म्हणून तो जाट दुधाने भरलेली कासंडी, गाय व तिचे वासरू घेऊन आपल्या घरी जायला निघाला.
(पुरोहित) अहो महाराज! तुम्ही दिलेले दान परत घेता ? तुमचा सत्यानाश होईल.
(जाट) गप्प बसा ! नाहीतर तेरा दिवस दुधाशिवाय आम्हाला जे हाल सोसावे लागले त्याचे उट्टे काढीन. ती धमकी ऐकताच भटजीबुवा गप्प बसले आणि जाट दुधाची भरलेली कासंडी, गाय व वासरू घेऊन घरी परतला.
अशा या जाटासारखे लोक मोठ्या संख्येने तयार होतील तर या पुरोहितांच्या लीला जगात चालणार
नाहीत.हे भटजी लोक असे सांगतात की, माणसाच्या मृत्यूनंतर दहा-बारा दिवस पिंडदान वगैरे जी उत्तरकायें केली जातात. त्यांच्या योगाने मृत व्यक्तीच्या शरीराच्या दहा भागांना ते पिंड मिळतात. त्यातून शरीराचे दहा भाग तयार होतात. बाराव्या दिवशी केल्या जाणान्यासपिंडी या श्राद्धामुळे या दहाभागांनी बनणाऱ्या शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो आणि मग तो अंगुष्ठमात्र शरीरधारी जीव यमलोकी जातो. आता ही गोष्ट खरी असेल तर मरण काळी माणसाला घेऊन जाण्यासाठी यमदूत येतात असे म्हणणे निरर्थक ठरते. त्यांना यावयाचेच असेल तर त्यांनी तेरा दिवसांची क्रियाकमी झाल्यानंतर यावयास पाहिजे आणि जर ते मृत व्यक्तीला गेल्यावर घेऊन जात असतील तर त्यानंतर केलेल्या क्रियाकर्माचा काय उपयोग? शिवाय, दहा दिवसांनी अंगठ्या एवढे शरीर तयार होत असेल तर मृत माणूस आपली पली, मुले आणि इष्ट मित्र यांच्या मोहाने परत का येत नाही?
(प्रश्न) स्वर्गात जाणाऱ्या माणसाला तेथे काही मिळत नाही. त्याच्या नावाने जो दानधर्म केला जातो तोच त्याला तेथे मिळतो. म्हणून सगळया वस्तू दान केल्या पाहिजेत.
(उत्तर) तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वर्गात काहीच मिळत नसेल तर स्वर्गापेक्षा हा लोकच चांगला. कारण येथे धर्मशाळा आहेत. लोक गरजू माणसांना दान किंवा भिक्षा देतात. इष्टमित्र व नातेवाईक एकमेकांना चमचमीत मेजवान्या देतात. उत्तमोत्तम वस्त्रे मिळतात. स्वर्गात यापैकी काहीच मिळत नसेल तर त्या निर्दय,
पण व भिकारड्या स्वर्गात स्वतः भटाभिक्षुकांनीच जावे आणि हालात दिवस काढावेत. भल्या माणसांनी तेथे कशाला जावे ?
(प्रश्न) तुमचे म्हणणे असे की यम, यमलोक वगैरे काही नाही.तर मग माणूस मेल्यावर त्याचा जीव कोठे जातो? आणि त्याचा न्यायनिवाडा कोण करतो?
(उत्तर) तुमच्या गरुड पुराणात जे काही लिहीले आहे ते साफ खोटे आहे. त्याला काहीच आधार नाही. वेदांमध्येजे काही सांगितले आहे ते असे:-
यमेन ।। ऋ० मं० १०।। सू० १४।। मं० ८।।
वायुना ।। ऋ० मं० २०।। सू० १४१।। मं० २।।
सत्यराजन् ।।यजु० अ० २०। मं० ४।।
इत्यादी वेदवचनांवरून असे स्पष्ट दिसून येते की 'यम' हे वायूचे एक गाव आहे. शरीरत्याग केल्यानंतर जीव अंतरिक्षात वायूच्या आधाराने राहतात आणि जो सत्यकर्ता, नि:पक्षपाती परमात्मा आहे तोच 'धर्मराज' सर्वांचा न्यायनिवाडा करतो.
(प्रश्न) तुमच्या म्हणण्याप्रमाणे गोप्रदान वगैरे काही करू नये आणि काहीही दानधर्म करू नये, असे ठरते.
(उत्तर) तुमचे हे म्हणणे साफ चूक आहे. सत्पात्री दान अवश्य करावे. परोपकारी लोकांना परोपकारासाठी सोने, चांदी, हिरे, मोती, माणके, अन्न, पाणी, जमीन, वस्त्रे, गायी वगैरे गोष्टींचे दान करणे उचितच आहे. मात्र कुपात्री दान कधीही करू नये.
कुपात्र-सुपात्र-लक्षण
(प्रश्न) कुपात्र व सुपात्र यांची लक्षणे कोणती?
(उत्तर) जो कोणी लबाडकपटी, स्वार्थी, विषयांध, कामी, क्रोधी, लोभी, मोही, इतरांचे नुकसान करणारा, पट, मिथ्यावादी, अविद्वान, कुसंगी, आळशी असेल तो, दात्याकडे जाऊन वारंवार याचना करणे, धरणे धरून बसणे, नाही म्हणून सांगितले तरी निलाजरेपणाने मागतच राहणे, कितीही मिळाले तरी समाधान न होणे, जो कोणी देणार नाही त्याची निंदानालस्ती करणे, त्याला शिव्या व शाप देणे, ज्याने अनेकदा साह्य केले
असताना एखाद्या वेळी त्याच्याकडून साह्य न झाल्यास त्याच्याशी शत्रुत्व करणे, वरून साधूचा वेष धारण करून लोकांना फसवणे, आपल्याजवळ एखादा पदार्थ असतांना काहीही नाही म्हणून सांगणे, सर्वांना फसवून आपला स्वार्थ साधणे, रात्रं-दिवस भिक मगत राहणे, भोजणाचे निमंत्रण मिळाल्यावर भांग वगैरे मादक द्रव्ये खाऊन पिऊन तेथे जाणे आणि फुकटच्या खाद्य पदार्थावर ताब मारणे, मादक द्रव्यांच्या नशेत भलते सलते चाळे करणे, सत्य मार्गाला विरोध करून आपल्या स्वार्थासाठी असत्य मार्गाचा अवलंब करणे, आपल्या चेल्यांनी फक्त आपलीच सेवा करावी, इतरांची करू नये असा उपदेश त्यांना करणे, सविद्या वगैरे प्रवृत्तींचा विरोध करणे, त्री-पुरुष, माता, पिता, मुले, राजा, प्रजा, इष्टमित्र यांच्यामध्ये अप्रीती निर्माण करणे, जगातील हे सारे व्यवहार म्हणजे माया असून जगही मिथ्या आहे असा खोटा उपदेश करणे ही सारी कुपात्रांची लक्षणे आहेत.
जे लोक ब्रह्मचारी, जितेंद्रिय, वेदादी विद्यांचे अध्ययन-अध्यापन करणारे, सुशील, सत्यवादी, परोपकारप्रिय, पुरुषार्थं, उदार, विद्या व धर्म यांची निरंतर उन्नती करणारे धर्मात्मा, शांत, निंदा-स्तुतीने दुःखी
किंवा आनंदी न होणारे, निर्भय, उत्साही, योगी, ज्ञानी, सुष्टिक्रम, वेदाज्ञा व ईश्वराचे गुण-कर्म-स्वभाव यांना अनुसरून वर्तन करणारे, न्यायी, नि:पक्षपाती, सत्योपदेश व सत्यशास्त्रे यांचे अध्ययन-अध्यापन करणाऱ्यांचे
परीक्षक, कोणापुढेही लांगूलचालन न करणारे, प्रश्नांची यथार्थ उत्तरे देणारेआपल्या प्रमाणेच इतरांचेही सुख दु:ख, हानि-लाभ समजून घेणारे, अविद्यादी क्लेश, हठ्ठ, दुराग्रह, दुराभिमान यांपासून मुक्त, अपमान हा अमृतासमान आणि सन्मान हा विषासमान मानणारे, संतोषी, जे कोणी प्रेमाने व जेवढे काही देतील त्यातच समाधान मानणारे, आपत्काळी एकदाच मागणारे आणि दिले नाही तरी दुःखी न होणारे वन देणाऱ्याविषयी अपशब्द न उच्चारता तेथून चटकन निघून जाणारे, त्यांची निंदानालस्ती न करणारे, सुखी पुरुषांशी मैत्री व दुखितांवर करुणा करणारे, पुण्यात्म्यांच्या संगतीने आनंदित होणारे आणि पापी लोकांच्या बाबतीत उपक्षावृत्ती बाळगणारे म्हणजे त्यांच्याविषयी राग (मोह) द्वेषादी भावना न बाळगणारे, सत्याला मानणारे, सत्यवादी, सत्यकर्म करणारे निष्कपट, ईष्यद्विषरहित, गंभीर वृत्तीचे, सत्पुरुष, धार्मिक वृत्तीचे, सर्व प्रकारच्या
दुराचारापासून दूर राहणारे, आपले तन-मन-धन परोपकारात वेचणारे, इतरांच्या सुखाखातर आपले प्राणही अर्पण करणारे, इत्यादी शुभ लक्षणांनी जे युक्त असतात ते सुपात्र होते. मात्र दुष्काळासारख्या आपत्काळी अन्न, पाणी, वस्त्र, औषधे, स्थान वगैरे गरजेच्या गोष्टी सर्वांना द्याव्यात. कारण अशा वेळी सर्व लोक वरील गोष्टी मिळविण्यास पात्र असतात.
(प्रश्न) दाते किती प्रकारचे असतात?
(उत्तर) दाते तीन प्रकारचे असतात:- उत्तम, मध्यम व निकृष्ट. जो देश, काळ व पात्रता यांचा विचार करून दान देतो आणि त्याचे हे ज्ञान सत्यविद्या, धर्म व लोककल्याण यांच्या उन्नतीसाठी असते तो उत्तम दाता होय. कीर्ती किंवा स्वार्थ यांसाठी जो दान देतो तो मध्यम प्रकारचा दाता होयजो आपल्या अथवा इतरांच्या हिताचा विचार न करता वेश्या, खुशामतखोर, भाटचारण इत्यादिकांना दान देण्यात पैशाची उधळपट्टी करतो, दान देताना तिरस्कार व अपमान करतो, पात्रापात्रतेचा विचार न करता सब घोडे बारा टक्के या न्यायाने सगळ्यांनाच देत सुटतो, देताना भांडणतंटे करतो, इतर धर्माम्यांना दुःख देऊन स्वतः सुखी होण्यासाठी जो दान करतो तो अधम दाता होय. थोडक्यात सांगावयाचे तर जो माणसांची पारख करून अथवान करता केवळ आपली प्रशंसा इतरांनी करावी म्हणून दान देतो तो मध्यम दाता आणि जो कसलीही पारख न करता अंधाधूदपणे निरर्थक दान करतो तो निकृष्ट दाता होय.
(प्रश्न) दानाची फळे इहलोकी मिळतात की परलोकी?
(उत्तर) ती सर्वत्र मिळतात.
(प्रश्न)ती फळे आपोआप मिळतात की ती देणारा कोणी आहे?
(उत्तर) फळे देणारा परमेश्वर आहे. ज्याप्रमाणे चोर, दरोडेखोर आपण होऊन तुरुंगात जाऊ इच्छित नाही,
पण राजा त्याला तुरुंगात टाकतोच. धार्मिकांच्या मुखाचे रक्षण करतो व त्यांना सुख उपभोगण्याची संधी देतो.
चोर-डाकुंपासून रक्षण करून सर्वांना सुखात ठेवतो. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्वांना पाप-पुण्याच्या सुख दुःखरूपी फळांचा अनुभव करवितो.
एकादशी वगैरे व्रतांची समीक्षा
(प्रश्न) गरुड पुराणादी जे ग्रंथ आहेत ते वेदार्थाचे किंवा वेदांचे समर्थन करणारे, त्यांना पुष्टी देणारे आहेत की नाहीत?
(उत्तर) मुळीच नाहीत. उलटते वेद विरोधी असून वेदांनी सांगितलेल्या मार्गाच्या उलट्या दिशेने जाणारे आहेत. ज्याप्रमाणे एखादा माणूस एकाचा मित्र व साऱ्या जगाचा शत्रू असतो त्याप्रमाणे पुराण आणि तंत्रग्रंथ यांवर श्रद्धा ठेवणारा माणूस असतो. कारण हे ग्रंथ एकमेकांचा विरोध करणारे आहेत. या ग्रंथाविषयी श्रद्धा बाळगणे हे कोणाही विद्वानाचे काम नसून ते अडाणीपणाचे लक्षण आहे
असे पाहा ! शिवपुराणात त्रयोदशी व सोमवार यांना महत्व आहे; तर आदित्य पुराणात रवीचे माहात्म्य वर्णिले आहे. चंद्रखंडामध्ये सोमग्रह, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहु, केतू यांना तर विष्णुपुराणानुसार वैष्णवाची एकादशी, वामनाची द्वादशी, नृसिंहाची किंवा अनंताची चतुर्दशी, चंद्राची पौर्णिमा, दिक्पालांची दशमी, दुर्गेची नवमी, बसूची अष्टमी, मुनींची सप्तमी, कार्तिक स्वामीची षष्ठी, नागाची पंचमी, गणेशाची चतुर्थी, गौरीची तृतीया, अश्विनीकुमारांची द्वितीया, आद्या देवीची प्रतिपदा व पितरांची अमावस्या, असे वेगवेगळे दिवस पुराणांनुसार उपवास करण्याचे आहेत. पुराणांमध्ये सर्वत्र असे लिहिले आहे की, जो कोणी या वारी व तिथींना खाणे पिणे करील तो नरकात जाईल.
तेव्हा भटजीबुवा व त्यांचे चेले यांनी कोणत्याही वारी अथवा कोणत्याही तिथीला भोजन करू नये. कारण खाणे पिणे केल्यास ते नरकात जातील. ‘निर्णयसिन्धु, 'धर्मसिन्धु, 'व्रतार्क' वगैरे जे ग्रंथ प्रमादी लोकांनी तयार केले आहेत त्यांमध्ये या साऱ्या व्रतांची अगदी दुर्दशा करून टाकण्यात आली आहे. जसे, एकादशीला शैव, एक दशमीविद्धा तर दुसरी शैवांची, कोणी एकादशीला उपवास करतो तर कोणी द्वादशीला. भटजीबुवांची लीला अगाध आहे. उपाशी केव्हा राहावयाचे याविषयी ते वादविवादच करतात. त्यांनी एकादशीचे जे व्रत सुरू केले आहे त्यात कोणाविषयी दयाबुद्धी नसून त्यांचा स्वतःचा स्वार्थच आहे. ते म्हणतात,
एकादश्यामन्ने पापानि वसन्ति।।
सारी पापे एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये निवास करतात. आता या भटजीबुवांना विचारले पाहिजे की, कोणाची पापे अन्नामध्ये वसतात ? तुझी की तुझ्या बापाजाद्यांची? जर सगळीच्या सगळी पापे एकादशीच्या दिवशी अन्नात जाऊन राहत असतील तर त्या दिवशी कोणालाही दु:ख होता कामा नये. तसे काही घडत ही. उलट उपवास करणारे भुकेने तडफडतात. दुःख हे पापाचे फळ आहे. म्हणून उपाशी राहणे हे पाप आहे. या उपवासाचे भलतेच माहात्म्य किंवा स्तोम माजविण्यात आले आहे. त्याच्या कथा वाचून पुष्कळ लोक फसतात. अपैकी एक कथा अशी आहे
ब्रह्मलोकामध्ये एक वेश्या होती. तिने काही अपराध केल्यामुळे तिला असा शाप मिळाला की, 'तू पृथ्वीवर जाऊन पडशील. ' तिने देवांची स्तुती करून विचारले की, मी पुन: स्वर्गात कशी येऊ शकेन ? देवांनी सांगितले, जेव्हा कोणी एकादशीच्या व्रताचे फळ तुला देईल तेव्हाच तू पुनः स्वर्गात घेशीलती स्त्री विमानासहित एका नगरात येऊन पडली. तेथील राजाने तिला विचारले की, 'तू कोण आहेस?' तेव्हा तिने सगळी हकीकत त्याला सांगितली; आणि म्हणाली, जर कोणी मला एकादशीचे पुण्य अर्पण करील तर मी पुनः स्वर्गात जाऊ शकेन.'
राजाने नगरामध्ये शोध घेतला. परंतु एकादशीचे व्रत करणारा कोणीही आढळला नाही. परंतु एके दिवशी एका शूद्र पतिपत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यात रागावून शुद्ध में एक दिवस आणि एक रात्र उपाशी राहिली होती. दैवयोगाने त्या दिवशीच एकादशी होती. राजदूतांना तिने सांगितले की, 'मी काही जाणूनबुजून एकादशी केली नव्हती. पण अजाणता मी त्या दिवशी उपाशी राहिले होते.' तिचे बोलणे ऐकून ते तिला राजासमोर घेऊन गेले राजाने तिला सांगितले की, 'तु या विमानाला स्पर्श करत्या प्रमाणे तिने विमानाला स्पर्श केला. त्याबरोबर विमान वर उडून स्वर्गात गेले. हे तर अजाणता घडलेल्या एकादशी व्रताचे फळ आहे. तेव्हा जाणीवपूर्वक एकादशीचे व्रत केल्याने केवढे अपरंपार पुण्य मिळेल !!!
वाहवा ! हे आंधळ्या लोकांनो ! हे सारे खरे असेल तर एक गोष्ट करा. हा पानांचा विडा स्वर्गात असत नाही. त्याला आम्ही स्वर्गात पाठवू इच्छितो. तेव्हा एकादशीचे व्रत करणाऱ्या सर्व लोकांनी आपापल्या पुण्याचे फळ वापरून हा विडा स्वर्गात पाठवावा, तो स्वर्गात गेला तर आपण लाखो विडे स्वर्गात पाठवू. मग आम्हीही एकादशी करू; आणि जर तसे घडले नाही तर तुमचा उपासमारीपासून आपोआप बचाव होईल.
वर्षातील चोवीस एकादशींची वेगवेगळी नावे ठेवलेली आहेत. एकीचे नाव 'धनदा' तर दुसरीचे 'कामदा'
तिसरी ‘पुत्रदा' तर चौथी 'निर्जला'. अनेक दरिटी गरजू व संततिहीन लोक एकादशीचे व्रत करता करता म्हातारे झाले व मरूनही गेले परंतु कोणालाही धनप्राप्ती झाली नाही, कोणाचीही इच्छा पूर्ण झाली नाही अथवा कोणालाही मूल झाले नाही. ऐन वैशाखाच्या शुक्ल पक्षात थोडा वेळ जरोपण मिळाले नाही तर प्राण कंठाशी येतात. अशावेळी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना अतिशय दुःखभोगावे लागते. विशेषत: बंगालमध्ये एकादशीच्या दिवशी विधवा स्त्रियांचे भयंकर हाल होतातअशा प्रकारची एकादशी करावयास सांगणाच्या निर्दयी कसायांच्या मनात तसे लिहिताना थोडीही दया कशी निर्माण झाली नाही ? त्याने निर्जला ऐवजी तिचे नाव 'सजला असे ठेवले असते आणि पौष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीचे नाव निर्जला' असे ठेवले असते तर थोडेफार चांगले झाले असते. परंतु या भिक्षुकांना दयेशी काय कर्तव्य? 'कोणी जगो अथवा मरो. भटाला मात्र पोट पूर्ण भरो !”
गर्भवती किंवा नवपरिणीता स्त्रीने, लहान मुलांनी व तरुणांनी कधीही उपवास करता कामा नये. परंतु
कोणाला उपवास करायचा असेल तर त्याने ज्या दिवशी त्याला अजीर्ण झाले असेल व भूक लागली नसेल त्यादिवशी दूध किंवा शरबत पिऊन राहावे. जे लोक भूक लागली असता खात नाहीत आणि भूक लागली नसताना अन्न खातात ते दोघेही रोग सागरात गटांगळ्या खातात व दुःख भोगतात. म्हणून या मूखी माणसांच्या बोलण्यावर व लिहिण्यावर कोणीही विश्वास ठेवू नये.
आता गुरुशिष्यांचा मंत्रोपदेश आणि विविध मतमतांतराच्या चरित्रांचे विवेचन करतो.
मूर्तिपूजेच्या संप्रदायांचे अनुयायी असे म्हणतात की, बेद अनन्त आहेत 'ऋग्वेदाच्या २१, यजुर्वेदाच्या १०१, सामवेदाच्या १००० व अथर्ववेदाच्या ९ शाखा आहेत. त्यापैकी काही थोड्याच शाखा उपलब्ध आहेत. इतर शाखा लुप्त झाल्या आहेत. त्या लुप्त शाखांमध्येच मूर्तिपूजा व तीर्थमाहात्म्य वगैरे गोष्टी असाव्यात. त्या
वेदांमध्ये नसत्या तर पुराणात कोठून आल्या असत्या? कार्यावरून कारणाचे अनुमान काढता येते. त्याप्रमाणे
पुराणांना पाहून मूर्तिपूजेविषयी काय शंका आहे?
(उत्तर) वृक्षाची जी फांदी असते ती त्या वृक्षासारखीच असते. त्याच्या विरुद्ध नाही.शाखा लहान अथवा मोठी कशीही असली तरी त्यांच्यात मूलभूत विरोध नसतो. याचप्रमाणे वेदांच्या जेवढ्या शाखा सध्या उपलब्ध आहेत त्यामध्ये पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा करावी आणि विशिष्ट जल-स्थलांना तीर्थक्षेत्र समजून पवित्र मानावे असे सांगितल्याचे कोठे आढळत नाही. यावरून लुप्त शाखांमध्येही या गोष्टी नसल्या पाहिजेत असे
सिद्ध होते. शिवाय चार वेद संपूर्ण स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांमध्ये जो उपदेश आहे त्याच्या विरुद्ध विचार प्रतिपादन करणाऱ्या शाखा असू शकत नाहीतआणि ज्या शाखा वेदविरुद्ध विचार मांडतात त्यावेदांच्या शाखा आहेत असे कोणीही सिद्ध करू शकत नाही. म्हणून पुराणे ह्या वेदांच्या शाखा नसून सांप्रदायिक लोकांनी परस्पर विरोधी ग्रंथ बनविले आहेत.
वेद हे परमेश्वरकृत आहेत असे तुम्ही मानता की मनुष्यकृत? परमेश्वरकृत ! जर ते परमेश्वराने निर्माण केले आहेत तर आश्वलायनादी ऋषिमुनींच्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या ग्रंथांना तुम्ही वेद का मानता ? ज्याप्रमाणे झाडाची फांदी व पाने पाहिली की त्यावरून ते झाड पिंपळाचे, वडाचे, आंब्याचे वगैरे असल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे ऋषि-मुनींनी लिहिलेली वेदांगे, चारही ब्राह्मण ग्रंथ, अंगे, उपांगे, उपवेद इत्यादी ग्रंथांच्या साह्याने वेदांचा अर्थ समजून घेता येतो. म्हणून या ग्रंथांना वेदांच्या शाखा असे म्हटलेले आहे.
वेदांविरुद्ध असणाऱ्या ग्रंथांचे प्रमाण त्याचप्रमाणे वेदांना अनुकूल असणारे ग्रंथ अप्रमाणित असू शकत नाहीत. लुप्त झालेल्या शाखांमध्ये मूर्तिपूजा वगैरे गोष्टींना मान्यता देण्यात आलेली होती. असे असेल तर इतर कोणी असेही म्हणू शकेल की, लुप्त शाखांमध्ये सगळ्याच गोष्टी उलटधा लिहिलेल्या होत्या. उदाहरणार्थ, वर्णव्यवस्था उलटी म्हणजे अत्यंज आणि शूद्राचे नाव ब्राह्मणादी, ब्राह्मणादिकांना शुद्ध, अंत्यज यांच्यासारखे खालचे स्थान दिलेले होतेअगम्यं स्त्रीशी गमन करणे, अकर्तव्य हे कर्तव्य, मिथ्या भाषणादी गोष्टी हा धर्म आहे व सत्यभाषाणादिला अधर्म असे त्या लुप्त शाखांमध्ये सांगण्यात आले होते. असे म्हणणाऱ्यांला, तुम्ही तेच उत्तर द्यावे, जे उत्तर आम्ही तुम्हाला दिले. आमच्या उत्तराचा मथितार्थ असा की, वेदांमध्ये आणि त्यांच्या उपलब्ध शाखांमध्ये वर्णव्यवस्थेत ब्राह्मणक्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची जी स्थाने आहेत तीच लुप्त शाखांमध्ये असली पाहिजेत, असे मानले पाहिजे. नाहीतर वर्णाश्रम व्यवस्था वगैरे सगळी अन्य प्रकारची होईल.
जैमिनी, व्यास व पतंजली यांच्या वेळेपर्यंत तरी सगळ्या शाखा विद्यमान होत्या की नाही? जर त्या असतील तर त्यांनी केलेल्या विधानाचे खंडन तुम्ही करू शकणार नाही; आणि जर त्या नसतील तर त्या शाखा अस्तित्वात होत्या याला काय पुरावा ? तुम्हीच पाहा! जैमिनीने आपल्या पूर्वमीमांसा या ग्रंथात कर्मकांड, पतंजली मुलीचे योगशास्त्रामध्ये सारे उपासनाकांड आणि व्यासमुगीने शारीरिक सूत्रांमध्ये वर्णिलेले सारे ज्ञानकांड ही सर्व वेदानुकूल आहेत. त्यांमध्ये पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा अथवा प्रयागादी तीर्थाचे नाव देखील आढळत नाही. ते कोठून लिहितील? वेदांमध्ये त्या गोष्टी असल्या तर ते लिहिल्याशिवाय सोडले नसते तेव्हा लुप्त शाखांमध्ये देखील मूर्तिपूजा यांचे प्रमाण नव्हते तसेच, हे शाखा ग्रंथ वेद नव्हेत. त्यांमध्ये ईश्वरकृत वेदांतील मंत्ररूपी प्रतीके घेऊन त्यांचे निरूपण करण्यात आले आहेआणि जगातील स्त्रीपुरुषांचे इतिहास आदी नमूद केलेले आहेत. यासाठी त्या गोष्टी मूळ वेदांमध्ये असूच शकत नाहीत. वेदांमध्ये फक्त मनुष्यांसाठी विद्येचा उपदेश केला आहे. त्यांत कोणाही माणसाचे नाव देखील नाही. म्हणून त्यांत मूर्तिपूजेचे पूर्णपणे खंडन आहे.
मूर्तिपूजेमुळे महापुरुषांची निंदा
असे पाहा ! मूर्तिपूजेमुळे श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण,नारायण, शिव इत्यादींचा उपहास होत आहे. सर्वजण जाणतात की ते मोठे महाराजाधिराज होते आणि त्यांच्या पत्नी सीता, रुक्मिणी, लक्ष्मी, पार्वती वगैरे महाराण्या होत्या. परंतु मंदिरादिकांमध्ये त्यांच्या मूर्ती ठेवून पुजारी लोक त्यांच्या नावाने भीक मागतात तेव्हा जणू ते त्यांना भिकारीच बनवितात. हे पुजारी म्हणत असतात की, "या महाराज, या राजेसाहेब ! या शेटजी ! या सावकार ! देवाचे दर्शन घ्या. चरणामृत घ्या आणि देवाला काही भेट अर्पण करा. महाराज ! राम-सीता, कृष्ण- रुक्मिणी किंवा राधा-कृष्ण, लक्ष्मी-नारायण आणि शिव-पार्वती यांना तीन दिवस झाले, कोणीही त्यांना बालभोग, राजभोगच नव्हे तर साधे जलपान किंवा खाणे पिणेही मिळालेले नाही. आज त्यांच्याजवळ काहीही नाही. राणीजी, शेठाणीजी, सीता आदी यांच्यासाठी तुम्ही नथ बनवून द्या. खाद्य पदार्थ पाठवा; म्हणजे आम्ही राम-कृष्णादिकांना नैवेद्य दाखवू. देवांची वस्त्रे फाटली आहेत. देऊळ मोडकळीस आले असून कानाकोपऱ्याची पडझड झालेली आहे. वरून पोतेरा मारला आहे आणि दुष्ट चोरांनी सारे काही लुटून नेले. देवाचे कपडे उंदरांनी कुरतडून टाकले. अहो, एके दिवशी तर उंदरांनी कहरच केला. मूर्तीचा डोळाच घेऊन पळाले. त्याच्या जागी नवा चांदीचा डोळा बसवणे आम्ही करू शकलो नाही. म्हणून तेथे कवडी बसवली आहे
हे लोक रामलीला व रासमंडळही घडवून आणतात. सीता-राम आणि राधा-कृष्ण नाच करतात आणि राजा, महंत वगैरे त्यांचे सेवक मजेत बसले आहेत. देवळात राम, सीता वगैरे देव उभे असतात. तर पुजारी अथवा महंत आसनावर किंवा गादीवर लोडाला टेकून आरामात बसतात. भयंकर उकाडा होत असतो तेव्हाही देवांना आत बंद करतात आणि आपण स्वतः मात्र मोकळ्या हवेत पलंगावर आरामात झोपतात. पुष्कळ पुजारी आपल्या नारायणाला डबीत बंद करून तिच्यावर कापड गुंडाळतात व ती डबी आपल्या गळ्यात अडकवितात. जशी माकडीण आपल्या पिलाला गळ्यात लटकविते तसे हे पुजारी देवाला गळ्यात लटकवितात. जेव्हा कोणी मूर्ती फोडतो तेव्हा हाय, हाय करीत ते ऊर बडवतात आणि असा आक्रोश करतात की, "या दुष्टांनी सीता-राम, राधा-कृष्ण आणि शिव-पार्वती यांची मूर्ती फोडून टाकली. आता चांगल्या कारागिराने बनविलेली दुसरी संगमरवरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा-अर्चा केली पाहिजे.
"नारायणाला तुपाशिवाय नैवेद्य चालत नाही. तेव्हा फार नसले तरी थोडे बहुत तूप अवश्य पाठवून द्य." अशी मागणी हे लोक करतातत. रासमंडल किंवा रामलीला झाल्यावर सीता-राम व राधा-कृष्ण यांची सोंग घेणाऱ्यांना ते भीक मागायला लावतात. जेथे जत्रा बगैरे भरते तेथे लहान मुलांना मुकुट घालून आणि सजवून कन्हैया बनवितात आणि त्या कन्हैयाला रस्त्याच्या कडेला बसवून त्याला भीक मागायला लावतात.
ही किती दुःखाची व शरमेची गोष्ट आहे. याचा तुम्हीच विचार करा. तुम्हीच सांगा, सीताराम वगैरे असे दरिद्री व भिकारी होते काय ? हा त्यांचा उपहास व निंदा नाही तर दुसरे काय आहे ? आपल्या आदरणीय पूर्वजांची याहून अधिक निंदा कोणती असू शकेल? रामकृष्णादिकांच्या काळात सीता, रुक्मिणी, लक्ष्मी व पार्वती यांना रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या घरात उभे करून पुजारी म्हणाले असते की, "लोकहो ! इकडे या आणि यांचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर भेटवस्तू व दक्षिणा ठेवा" तर राम, सीता वगैरे देवांनी या मुर्खांच्या सांगण्यावरून असे उभे राहण्यास मुळीच मान्यता दिली नसती आणि त्यांना तसे काहीही करू दिले नसते. किंबहुना त्यांचा असा उपहास करणाऱ्यांना त्यांनी शिक्षा दिल्याशिवाय कधी सोडले नसते. अर्थात खुद्द देवांनी जरी पुजाऱ्यांना शिक्षा केली नसती तरी अनेक मूर्तिपूजेच्या विरोधकांनी त्यांना चांगलीच अद्दल घडविली असती आणि अजूनही त्या कुकर्माची शिक्षा त्यांना मिळत आहेत. जोपर्यंत ते हे मूर्तिपूजेचे कुकर्म सोडणार नाहीत तोपर्यंत त्यांना ही शिक्षा भोगत राहावे लागेल.
मारण मोहनोच्चाटन-वाममार्ग समीक्षा
आर्यावर्त्तामध्ये पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा करणाऱ्यां चा जो सतत पराजय होत आला आणि आजही त्यांना जी मानहानी दररोज सहन करावी लागत आहे त्याचे कारण मूर्तिपूजा हेच आहे, कारण मूर्तिपूजा हे पाप आहे आणि पापाचे फळ दु:ख आहे. पाषाणादिकांच्या मूर्तावर विश्वास ठेवल्याने आपले फार नुकसान झाले आहे; आणि आपण मूर्तिपूजेचा त्याग केलानाही तर दिवसेदिवस अधिकाधिक नुकसान होत राहील. मूर्तिपूजेच्या या प्रकरणात वाममार्गी लोक फार मोठे अपराधी आहेत. जेव्हा ते एखाद्याला आपला चेला बनवितात तेव्हा तो सामान्य माणूस असल्यास त्याला
दं दुर्गायै नम । भं भैरवाय नम । ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे।।
इत्यादी मंत्रांचा उपदेश करतात. बंगालमध्ये विशेषत: एकाक्षरी मंत्राचा उपदेश करतात, जसे हां हीं क्लीं आणि धनाढ्यांना ते पूर्णाभिषेक करतात. म्हणजे त्यांना संपूर्ण मंत्राची दीक्षा देतात
दहा महाविद्यांचे मंत्र असे असतात:-
ह्रीं, श्रीं, क्लीं।। ह्रां ह्रीं ह्रूं बगलामुख्यै फट् स्वाहा।। किंवा हूं फट् स्वाहा।।
हे लोक जारण, मारण, उच्चाटन, मोहन, विद्वेषण, वशीकरण इत्यादी प्रयोग करतात. वस्तुतः त्यांच्या या मंत्रांनी काहीच होत नसते. परंतु ते हातचलाखीने जे काही करतात ते मंत्रांनी झाले असे लोकांना सांगतात. जेव्हा ते एखाद्याला मारण्याचा प्रयोग करतात तेव्हा ज्याच्यासाठी हा प्रयोग करावयाचा असेल त्याच्याकडून भरपूर द्रव्य घेऊन ज्याला मारावयाचे त्याची कणकेची किंवा मातीची मूर्ती तयार करतात आणि त्या बाहुल्याच्या छातीत, बेंबीत, गळ्यात मुरे भोसकतात आणि डोळे, हात, पाय यांमध्ये खिळे ठोकतात. त्याच्यावर भैरवाची किंवा दुर्गेची मूर्ती बसवितात आणि तिच्या हातात त्रिशूल देऊन तो त्या बाहुल्याच्या छातीत खुपसतात. एक वेदी तयार करून मांसादिने होम करतात आणि तिकडे मारेकऱ्याला पाठवून ज्याला मारावयाचे असेल त्याला विषप्रयोगादि उपायांनी ठार मारण्याची व्यवस्था करतात. हे पुश्चरण चालू असताना तो माणूस मारला गेला तर तो आपल्या मंत्रसामर्थ्यने मेला आणि आपल्याला भैरवाची किवा देवीची सिद्धी प्राप्त आहे असे ते लोकांना सांगतात.
यावेळी ते ‘‘भैरवोभूतनाथश्च' इत्यादी मंत्रांचा पाठ करतात. मारय-मारय, उच्चाटय-उच्चाटय, विद्वेषय-विद्वेषय, छिन्धि-छिन्धि, भिन्धि-भिन्धि, वशीकुरु-वशीकुरु, खादय-खादय, भक्षय-भक्षय,
त्रेटय-त्रेटय, नाशय-नाशय, मम शत्रून् वशीकुरु-वशीकुरु, हुं फट् स्वाहा।। कामरत्न० उच्चाटन प्रक० म० ५-७
इत्यादी मंत्र ते झपाट्याने म्हणतात. मनसोक्त मद्य पितात व मांस खातात. दोन भिवयांच्या मधोमध गेंदुराची रेखा काढतात. कधी-कधी हे लोक काली वगैरे देवतांच्या नावाने एखाद्या माणसाला ठार मारून होमामध्ये त्याची आहुती देतात आणि स्वतःही त्याचे थोडेसे मांस खातात. जेव्हा एखादा माणूस त्यांच्या भैरवी
चक्रात जातो आणि मद्य, मांस प्राशन-भक्षण करण्यास तयार होत नाही तेव्हा ते त्याला ठार मारून त्याची आहुती देतात. त्यांच्यातील जो अघोरी माणूस असतो तो मृत मनुष्याचे मांसही खातो. अजरी बजरी करणारे लोक तर विष्ठाही खातात व मूत्रही पितात !
वाममार्गी लोकांमध्ये चोळी मार्गी आणि बीजमार्गी असे दोन भेद आहेत. चोळी मार्गी लोक एखाद्या गुप्त ठिकाणी किंवा जमिनीत एक स्थान बनवितात तेथे बायका, पुरुष, मुले, मुली, बहिणी, आया, सुना वगैरे
सर्वजण एकत्र बसून मांस खातात, दारू पितात. एका स्त्रीला नागवी करून सगळे पुरुष तिच्या जननेंद्रियाची पूजा करतात. तिचे नाव दुर्गादेवी असे ठेवतात. मग एका पुरुषाला नग्न करून त्याच्या जननेंद्रियाची पूजा सर्व स्त्रिया करतात. दारू पिऊन-पिऊन झिंगल्यानंतर सर्व स्त्रियांच्या चोळ्या मातीच्या एका मोठ्या नांदेत किंवा गंगाळामध्ये टाकून त्या एकत्र मिसळतात. त्यानंतर एकेक पुरुष पुढे येऊन त्या डेऱ्यात हात घालून एकेक चोळी बाहेर काढतो. ज्या पुरुषाच्या हाताला ज्या खीची चोळ लागेल ती त्याची आई, बहीण, मुलगी किंवा सून कोणीही असली तरी त्याची बायको होते. अशा प्रकारे कुकर्म केल्याने व खूप नशा चढल्याने त्यांची आपसात भांडणे व जोडपट्टीही होते. तेव्हा पहाटेच्या अंधुक प्रकाशात ते लोक आपापल्या घरी परत जातात तेव्हा आई ही पूर्ववत आई, मुलगी ही मुलगी, बहीण ही बहीण आणि सून ही सून बनते आणि बीजमार्गी स्त्रीपुरुष समागम करून वीर्य पाण्यात मिसळून पितात. हे अधम लोक असल्या गोष्टींनाच मुक्तीचे साधन मानतात. ते विद्या, विवेक व सज्जनता रहित होत असतात.
शैव पंथाची समीक्षा
(प्रश्न) शैव पंथाचे लोक तर चांगले असतात ना?
(उत्तर) कसले चांगले असणार? 'जसा प्रेतनाथ तसाच भूतनाथ ज्याप्रमाणे वाममार्गी लोक मंत्रोपदेश वगैरेद्वारे द्रव्याचे अपहरण करतात त्याप्रमाणे शैवही ‘ओं नमः शिवाय' यांसारख्या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करतात. रुद्राक्ष व भस्म धारण करतात, मातीची आणि पाषाणादिकांची लिंगे बनवून त्यांची पूजा करतात आणि हरहर बं बं असे आवाज तोंडातून काढतात आणि बड, बड, बड असे बकरी सारखे शब्द उच्चारतात. त्याचे कारण ते असे सांगतात की, टाळी वाजविल्याने व बं बं असे म्हटल्याने पार्वती प्रसन्न होते आणि शंकर नाराज होतो. कारण जेव्हा भस्मासुराला घाबरून शंकर पळाला होता तेव्हा त्याची थठ्ठा करण्यासाठी बं बं असा आवाज काढून टाळ्या पिटल्या होत्या. याउलट गालात बोटे घालून, बड, बड, बड असा आवाज केल्याने पार्वती अप्रसन्न होते व शंकर खुष होतो. कारण की, पार्वतीचा बाप दक्ष प्रजापती याचे शिर टाकून
त्याच्या धडावर बकऱ्याचे मुंडके बसविले होते. त्या बकऱ्याच्या आवाजाची नक्कल बड, बड, बड अशी गालात बोटे घालून केली जाते, असे ते मानतात. शिवरात्र व प्रदोष वगैरे व्रते करतात त्यामुळे मुक्ती मिळते असे मानतात. म्हणून जसे वाममार्गी भ्रांत आहेत तसे शैवही आहेत. शैवांमध्ये कानफाटे, नाथ, गिरी, पुरी, वन, अरण्य, पर्वत, सागर असे भेद असून गृहस्थाश्रमीही शैव असतात. काही लोक एकाच वेळी दोन घोड्यांवर स्वार होतात. अर्थात ते वाममार्गी व शैव या दोन्ही पंथांना मानतात. पुष्कळ लोक वैष्णवही असतात. त्यांच्या संबंधी तंत्रग्रंथात पुढील श्लोक आहे:-
अन्त शाक्ता बहिश्शैवा सभामध्ये च वैष्णवा ।
नानारूपधरा कौला विचरन्तीह महीतले।। कौलोपनिषद, कुलार्णव तंत्र उल्लास ११
हा तंत्राचा श्लोक आहे. आतून शाक्त म्हणजे वाममार्गा, बाहेरून शैव म्हणजे रुद्राक्ष व भस्म धारण करणारे हे लोक सभेमध्ये स्वत:ला वैष्णव म्हणवतात की आम्ही विष्णूचे उपासक आहोत अशा नानाप्रकाराचे रूप धारण करून वाममार्गी पृथ्वीतलावर विचरण करीत असतात.
वैष्णवमत-समीक्षा
(प्रश्न) वैष्णव तरी चांगले आहेत ना?
(उत्तर) कसले दगडाचे चांगले ! जसे ते तसे . वैष्णवांच्या लीला पाहून घ्या ! ते स्वतःला विष्णूचा दास मानतात. त्यांच्यामध्ये श्रीवैष्णव जे चक्रांकित असतात. ते स्वत:ला सर्वात श्रेष्ठ समजतात. पण तसे काही नाही
(प्रश्न) का बरे? तथ्य कसे नाही? सर्व काही आहे. पाहा ना ! कपाळावर नारायणाच्या चरणकमळासारखा टिळा आणि त्याच्या मधोमध पिवळी रेखा श्री असते. म्हणून आम्हाला श्रीवैष्णव असे म्हणतात. एका नारायणाशिवाय दुसऱ्या कोणालाही आम्ही मानत नाही. महादेवाच्या लिंगाचे दर्शनही आम्ही करीत नाही. कारण आमच्या कपाळावर जी श्री विराजमान आहे ती लज्जित होते. आलमंदार आदी स्तोत्रांचा पाठ आम्ही
करतो. मांस खात नाही व मद्यपान करीत नाही. मग आम्ही चांगले का नाही?
(उत्तर) या तुमच्या टिळयाला हरिपदाची आकृती व पिवळ्या रेषेला श्रीमानणे हे निरर्थक आहे. कारण ती तर तुमच्या हाताची कारागिरी व जसे कपाळाचे चित्र आहे. हत्तीच्या कपाळावर जशा चित्रविचित्र आकृत्या काढतात. तुमच्या कपाळावर विष्णूचे पदचिह्न कोठून आले? काय कोणी वैकुंठात जाऊन विष्णूच्या पावलाचा छाप आपल्या कपाळावर मारून आणला आहे?
(विवेकी) आणि तुमची ती खरीश्री जड आहे की चेतन?
(वैष्णव) ती चेतन आहे.
(विवेकी) तर मग तुमच्या कपाळावरची ही रेखा जड असल्यामुळे ती खरी श्री नाही. आम्ही असे विचारतो की, श्री ही बनविलेली आहे की न बनविलेली आहे ? जर ती न बनविलेली असेल तर ती श्री असू शकत नाही. कारण ती तर तुम्ही स्वतःच्या हातांनी दररोज रेखाटत असता. म्हणून ती खरी श्री असू शकत नाही. जर तुमच्या कपाळावर श्री आहे तर कित्येक वैष्णवांचे वाईट चेहरे असे श्रीहीन, शोभारहित का दिसतात ललाटावर श्री असताना तुम्ही असे दारोदार भीक मागून का हिंडता? आणि अन्नछत्रात जेवून पोट का भरता? ही गोष्ट विपरीत आहे की कपाळावर तर श्री पण काम मात्र महादारिद्र्याचे ही म्हणजे दुराग्रहाची व निर्लजपणाची कमालच झाली !
पूर्वी परिकाल नावाचा एक वैष्णव भक्त होता. तो चोऱ्या करून, दरोडे घालून, लोकांना फसवून खूप द्रव्य गोळा करी आणि ते वैष्णवांजवळ ठेऊन प्रसन्न राहत असे. एकदा त्याला चोरीमध्ये लुटून नेता येईल असे काहीच मिळाले नाही. त्यामुळे तो व्याकुळ होऊन फिरत होता. नारायणाने समजले की आपला भक्त दुःखी आहे. म्हणून तो एका सावकाराचे रूप धारण करून, अंगठया घालून रथात बसून समोर आला. त्याला पाहताच परिकाल रथाजवळ गेला आणि त्या सावकाराला म्हणाला,"अंगावरचे सगळे दागिने ताबडतोब उतारा,नाहीतर मी तुम्हाला मारून टाकीन." दागिने काढीत काढीत बोटातील अंगठी काढण्यास थोडा वेळ लागला. त्याबरोबर परिकालाने नारायणाचे बोट छाटून अंगठी काढून घेतली. नारायण प्रसन्न झाला आणि त्याने चतुर्भुज होऊन परिकालाला दर्शन दिले. नारायण त्याला म्हणाला, 'तू माझा अत्यंत लाडका भक्त आहेस. कारण तू लूटमार करून लुटलेली सारी संपत्ती वैष्णवांना अर्पण करून त्यांची सेवा करतोस. तू खरोखर धन्य आहेस. त्यानंतर परिकालाने ते सारे दागिने वैष्णवांना नेऊन दिले.
एकदा एक व्यापारी परिकालाला आपला नोकर म्हणून बरोबर घेऊन जहाजातून परदेशी गेला. तेथे त्याने जहाजात सुपारी भरली. परिकालाने एक सुपारी फोडून तिचा अर्धा भाग व्यापाराकडे सावकाराकडे दिला व त्याला म्हणाला, "ही माझी अर्धी सुपारी जहाजावर ठेवा, आणि मला असे लिहून द्या की, जहाजावरची अर्धी सुपारी परिकालाची आहे." व्यापारी म्हणाला, "अरे, तुला हव्या असतील तर हजार सुपाऱ्या घे." परिकाल म्हणाला,"छेः छेः! मी अधर्मी नाही की मी खोटे घेऊ मला फक्त माझी अर्धी सुपारी हवी." व्यापारी विचारा भोळा भाबडा होता. त्याने परिकालाने सांगितल्याप्रमाणे त्याला लिहून दिले. काही दिवसांनी जहाज स्वदेशी परतले व बंदराला लागले. जेव्हा सुपारी उतरून घेण्याची तयारी सुरु झाली तेव्हा परिकाल व्यापाराला म्हणाला, "माझी आराधी सुपारी मला द्या." व्यापारी परिकालाने दिलेली अर्धी सुपारी त्याला देऊ लागला. यावर परिकाल भांडू लागला, म्हणाला" या जहाजावरची निम्मी सुपारी माझी आहे. अर्धा वाटा घेईन अखेर तो तंटा न्यायालयात गेला. परिकालाने व्यापाऱ्याकडून लिहून घेतलेले न्यायाधीशाला दाखविले. त्यात जहाजावरची अर्धी सुपारी परिकालाची असल्याचे व्यापाऱ्याने लिहून दिले होते. व्यापाऱ्याने आपली बाजू मांडण्याचा खूप प्रयल केला. पण परिकालाने ऐकले नाही. जहाजातील अर्धी सुपारी परिकालाने ताब्यात घेतली आणि ती वैष्णवांना अर्पण केली. ते पाहून वैष्णव अत्यंत खूष . तेव्हापासून आजपर्यंत त्या चोर-डाकू परिकालाची मूर्ती वैष्णवांच्या मंदिरात ठेवतात. ही कथा 'भक्तमाल' या ग्रंथात लिहिलेली आहे. आता बुद्धिवंतांनीच हे ठरवावे की वैष्णव, त्यांचे सेवक आणि नारायण हे तिघेही चोर आहेत की नाहीत ?
जरी वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये काही थोडे चांगले असते. तथापि त्या विशिष्ट संप्रदायात राहत कोणतीही व्यक्ती सर्वथैव चांगली होऊ शकत नाही. आता तर वैष्णवांमध्ये फाटा फुट होऊन त्यांनी वेगवेगळी टिळा कंठी धारण केली. रामानंदी पंथाचे लोक दोन्ही बाजूना गोपीचंदनाचा टिळा लावून मधोमध लाल रेघ काढतात. निमावत पंथाचे लोक दोन बारीक रेषांमध्ये काळा ठिपका काढतात. माधव पंथाचे लोक फक्त काळी रेखा काढतात तर गोड बंगालो कट्यारीच्या आकाराचे आणि रामप्रसादी दोन चंद्रकोरी रेखाटून त्यांच्या मधोमध शुभ्र गंधाचा टिळा लावतात. रामानंदी लोक लाल रेषेला लक्ष्मीचे प्रतिक मानतात आणि ती नारायणाच्या हृदयात बसलेली आहेअसे समजतात. तर इतर लोक त्या रेषेला राधेचे प्रतिक मामून ती श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये विराजमान आहे असे समजतात.
भक्तमाल या ग्रंथात एक कथा आहे. कोणी एक माणूस एका झाडाखाली झोपला होता. तो झोपेतच मेला. वरून एका कावळ्याने विद्या केली. ती त्या माणसाच्या कपाळावर पडून टिळकाकार झाली. या माणसाच्या जीवाला घेऊन जाण्यासाठी यमदूत तेथे आले. इतक्यात विष्णूचे दूतही तेथे येऊन पोहोचले. त्या
दूतांमध्ये वाद सुरू झाला. यमदूत म्हणाले, "आमच्या मालकाने या माणसाला घेऊन येण्याची आज्ञा आम्हाला केली आहे. म्हणून आम्ही त्याला यमलोकात घेऊन जाणार. "विष्णूचे दूत म्हणाले,या इसमाला वैकुंठात घेऊन येण्याची आज्ञा आमच्या स्वामीने केली आहे. हा पाहा. या माणसाच्या कपाळावर वैष्णवी टिळा आहे. याला कसे घेऊन जाणार?" हे ऐकताच यमदूत निमूटपणे परत गेले विष्णूचे दूत त्याला आरामात वैकुंठात घेऊन गेले. नारायणाने त्याला वैकुंठात ठेऊन घेतले.
पाहा ! कपाळावर योगायोगाने टिळ्याचा आकार तयार होण्याचे जर एवढे महात्म्य आहे तर जे लोक आस्थेने स्वतःच्या हाताने टिळा लावून घेतात ते नरकाऐवजी सरळ वैकुंठात जात असतील तर त्यात काय आश्चर्य?
आम्ही असे विचारतो की, लहानसा टिळा कपाळावर लावल्याने जर माणूस वैकुंठात जात असेल तर संपूर्ण चेहऱ्यावर गंधाचा लेप लावल्याने किंवा सारे तोंड काळे केल्याने अथवा अंगभर गंध लावल्याने माणूस
वैकुंठाच्याही पलीकडे जात असेल की नाही? म्हणून या साऱ्या गोष्टी व्यर्थ आहेत. आता या वैष्णवांपैकी खाकी लोक अंगाला धूळ व राख लावणारे गोसावी लंगोटी लावून, जटा वाढवून, साधूचा वेश धारण करतात
ते बगळ्यासारखे ध्यान लावतात. भांग पितात आणि गांजा चरस ओढतात. त्यामुळे त्यांचे डोळे लाल भडक होतात. ते थोडे थोडे अन्न, पीठ, पैसे, कवडी यांची भीक लोकांकडे मागतात आणि गृहस्थांच्या मुलांना भुलवून आपले चेले बनवितात. त्यांच्यामध्ये बहुधा मच असतात. कोणी विद्या शिकत असेल तर ते त्याला शिकू देत नाहीत. ते म्हणतात,
पठितव्यं तदपि मर्त्तव्यं दन्तकटाकटेति कि कर्त्तव्यम्।।
संतांना विद्या शिकण्याची काय गरज? विद्याध्ययन करणारेही मरतात. मग दातांच्या कण्या करण्याची काय गरज ? साधूंनी चार धामांची यात्रा करावी, संतांची सेवा करावी आणि रामाचे भजन करावे.
जर कोणाला मूर्तिमंत अविद्या व मूर्ख माणूस पाहावयाचा असेल तर त्याने या खाक्यांना पाहवे. त्यांच्याकडे जे कोणी जातात त्यांना ते बच्चा, बच्ची म्हणतात. मग ते लोक या त्याच्या आईबापासारखे का असेनात. हे खाकी आहेत असेच रुँखंड, सूँखंड, गोदडिये (गोधडीवाले), जमाती सुतरेसाई, अकाली, कानफाटे, जोगी, औघड वगैरे आहेत. सारे एकाच माळेचे मणी आहेत.
एका खाकी साधूचा चेला "श्रीगणेशाय नमः" घोकत घोकत पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेला. तेथे एक पंडित बसलेला होता. तो चेला तोंडाने 'स्त्रीगते साजनमें' असे म्हणत असल्याचे पाहन तो पंडित त्याला
म्हणला, "अरे साधु ! तू अशुद्ध घोकतो आहेस. नीट 'श्री गणेशाय नम’ असे म्हण. ते ऐकताच चेल्याने चटकन् लोटा भरून घेतला आणि आपल्या गुरूकडे जाऊन तो म्हणाला, "हा बम्मन् माझ्या घोकण्याला 'असूद्ध म्हणतोय." हे ऐकताच खाकी झटकन उठला आणि विहिरीवर जाऊन त्या पंडिताला म्हणाला, 'तू माझ्या चेल्याला बहकावतोस काय? तू काय गुरूचे उपस्थ शिकला. हे बय, तुला एकाच प्रकारचा पाठ माहीत आहे. आम्हाला तीन प्रकारचे पाठ माहित आहेत. 'स्त्रीगनेसाजन्नमें, 'गनेसा यन्नमें' आणि 'श्रीगनेसायनमें'."
(पंडित) साधू महाराज, ऐका ! विद्या ही फार अवघड गोष्ट आहे. ती शिकल्याशिवाय येत नाही.
(खाकी) अरे जा रे ! आम्ही सगळे विद्वान रगडले आहेत. भांगेच्या घोटात साऱ्या पंडितांना आम्ही पोटात रिचवले आहे. संतांचे घर (सामर्थ्य) फार मोठे असते. तुला बापड्याला ते काय कळणार?
(पंडित) हे बघ ! तू शिकला असतास तर असे अपशब्द वापरले नसतेस. कसे वागावे याचे तुला सारे ज्ञान प्राप्त झाले असते
(खाकी) अरे, तू आमचा गुरू बनतोस? तुझा उपदेश आम्ही ऐकणार नाही.
(पंडित) कसा ऐकशील? तुझ्याजवळ तेवढी बुढीच नाही. उपदेश ऐकून तो समजण्यासाठी विद्या शिकावी लागते.
(खाकी) जो सारे वेद व शास्त्रे शिकून आमच्या सारख्या संतांना मान देत नाही त्याचे ते शिक्षण व्यर्थ होय.
(पंडित) हो ! आम्ही संतांची सेवा अवश्य करतो. परंतु तुझ्या सारख्या हुल्लडबाजाची नाही. कारण सज्जनविद्वान, धार्मिक, परोपकारी पुरुषांनाच संत असे म्हणतात.
(खाकी) हे बघ आम्ही अहोरात्र नागवे राहतो धुनी पेटवितो. गांजा व चरस यांचे सारखे झुरके मारतो. तीन-तीन लोटे भांग पितो, गांजा,भांग, धोत्रा यांच्या पानांची भाजी बनवून खातो. अफू आणि सोमल विषही गिळंकृत करतो. रात्रंदिवस नशेत राहतो. त्यामुळे सगळ्या दु:खाचा आम्हाला विसर पडतो. जगाला आम्ही काही समजत नाही. भीक मागून मिळालेल्या पिठाचे रोट बनवून खातो. रात्रभर आम्ही इतके जोराजोरात खोकत असतो की जवळपास झोपलेल्यांना मुळीच झोप येत नाही. अशा प्रकारच्या अनेक सिद्धी आणि साधूपण आमच्यात आहेतर मग तू आमची निंदा का करतोस? याद राख, अरे बापुड्या! तू आम्हाला त्रास देशील तर आम्ही तुला जाळून भस्म करून टाकू.
(पंडित) ही सारी लक्षणे असभ्य, पूर्व व घमेंडखोराची आहेत. ती साधूची लक्षणे नव्हेत. ऐक !
‘साध्नोति पराणि धर्मकार्याणि स साधुः' जो धर्मयुक्त उत्तम कामे करतो, सदैव परोपकारात प्रवृत्त असतो, ज्याच्यामध्ये कोणताही दुर्गुण नसतो, जो विद्वान असतो, सत्योपदेश करून सर्वांवर उपकार करतो त्याला साधू असे म्हणतात.
(खाकी) अरे जा रे ! तुला साधूचे मर्म काय कळणार? संतांचे घर (सामर्थ्य) फार मोठे असते. कुणा संताच्या वाटेला जाऊ नकोस. नाहीतर तो आपला चिमटा तुला मारील आणि तुझे कपाळ फडून टाकीन.
(पंडित) ठीक आहे गोसावी बुवा. आपल्या आसनावर बसा. आमच्यावर रागाने असे बेभान होऊ नका. आजकाल कोणते राज्य चालू आहे माहीत आहे ना? कुणाला माराल तर पकडले जाल आणि तुरुंगात पडाल. फटके खाल किंवा तुम्हालाच कोणीतरी बदडून काढील. मग काय कराल ? हे साधूचे लक्षण नव्हे.
(खाकी) चल रे चेल्या ? कुणा राक्षसाचे तोंड पाहायला लावलेस तू
(पंडित) तू कधी एखाद्या महात्म्याच्या संगतीत राहिलेला नाहीस. नाहीतर तू असा जड-मूर्खराहिला नसतास. (खाकी) आम्ही स्वतःच महात्मा आहोत. आम्हाला इतर कोणाची गरज नाही.
(पंडित) जे फुटक्या नशिबाचे असतात त्यांची बुद्धी तुझ्यासारखी असते आणि ते तुझ्यासारखेच घमंडखोर असतात.
अशी बाचाबाची झाल्यावर खाकी आपल्या आसनावर जाऊन बसला आणि पंडित महाशय घरी गेले.
संध्याकाळी आरती झाल्यावर त्या खाकीला मोठा समजून अनेक तरुण खाकी त्याला 'इंडोत, उंडोत (दंडवत) असे म्हणून साष्टांग नमस्कार करून त्याच्याभोवती बसले. तेव्हा त्या खाकीने विचारले, "अरे रामदाशा ! तू किती शिकला आहेस?"
(रामदास) महाराज ! मी ‘वेस्नुसहसरनाम’ सरलाम शिकलो आहे.
(खाकी) अरे गोविंददाशा ! तू काय शिकला आहेस?
(गोविंददास) मी अमुक खाकी महाराजांकडे 'रामसतबराज' वाचले आहे,
(रामदास) महाराज आपण काय शिकला आहात?
(खाकी) आम्ही गीता वाचली आहे.
(रामदास) कोणाजवळ?
(खाकी) चल बे छोकरे! आम्ही कोणालाही शुरू करीत नाही. हे बघ.आम्ही ’परागराज' (प्रयागराज) मध्ये राहत होतो. आम्हाला एकही 'अक्खर (अक्षर) येत नव्हते. जेव्हा एखादा लांब-रुंद धोतर नेसलेला पंडित मला दिसे तेव्हा त्याच्याकडे जाऊन, गीतेचे पुस्तक त्याच्यासमोर धरून त्याला विचारी, "या कलगीवाल्या अक्खराचे नाव काय आहे?" असे विचारीत विचारीत अठरा अध्यायांची गीता भरडून काढली. एकही गुरू केला नाही.
आता तुम्हीच विचार करा, अशा विद्येच्या शत्रूंच्या घरी अविद्या मुक्काम ठोकणार नाही तर ती कोठे जाणार? हे लोक नशापाणी, आळस, भांडणतंटा करणे, खाणे, पिणे, झोपणे, झांजा बडविणे, घंटा वाजविणे,
शंखपुंकणे, धुनीपेटविणे, अंघोळ करणे, कपडे धुणे आणि चोहीकडे व्यर्थ भटकणे यांखेरीज दुसरे कोणतेही
चांगले काम करीत नाहीत. दगड वितळविला तरी या खाकी गोसाव्यांना एखादी गोष्ट समजावून सांगणे फार
अवघड आहे. कारण हे लोक बहुधा शूद्र वर्णाचे मजूर, किसान, कहार असतात आणि मजूरी करण्याचे सोडून अंगाला राख लावून बैरागी किंवा गोसावी बनतात. त्यांना विद्या किंवा सत्संग यांचे माहात्म्य कळणे
शक्य नसते.
यापैकी नाथपंथियांचा मंत्र ‘नम शिवाय’ खाकी गोसाव्यांचा ‘नृसिंहाय नमः' रामावतांचा ‘श्रीरामचन्द्राय नमः’ अथवा ‘सीतारामाभ्यां नम:' कृष्णभक्तांचा ‘श्रीराधाकृष्णाभ्यां नम:’ किंवा ‘नमो भगवते वासुदेवाय' आणि बंगाल्यांचा ‘गोविन्दाय नम:’ आहे. यांपैकी आपापला मंत्र कुणाच्याही कानात उच्चारून ते त्याला आपला शिष्य बनवितात. ते शिष्याला सांगतात, "बच्चे ! तू आता तुंब्याचा (कडू भोपळ्याचा) मंत्र मी सांगतो तसा म्हण":-
जल पवितर सथल पवितर और पवितर कुआ।
शिव कहे सुन पार्वती तूंबा पवितर हुआ।। रामस्नेही धर्मशास्त्र, रामपटल
अर्थ :- जल पवित्र आहे. स्थळ पवित्र आहे आणि विहीर पवित्र आहे. शिव म्हणतो, पार्वती ऐक. तुंबा(भोपळा) पवित्र झाला.
अशा माणसाची योग्यता साधू, विद्वान होण्याची किंवा जगावर उपकार करणाऱ्याची कधी तरी असू शकेल काय? बैरागी,गोसावी रात्रंदिवस लाकडे व गोवया जाळीत असतात. एका महिन्यात अनेक रुपयांची लाकडे ते जाळून टाकतात. त्याऐवजी एका महिन्यात जाळल्या जाणाऱ्या लाकडाच्या किंमतीचे घोंगडे वगैरे घेतील तर शतांश पैशात ते आनंदात राहतील. पण एवढी बुद्धी त्यांना कुठून सुचणार? या लोकांनी धुनीजवळ बसून तापणारे (शेकणारे) म्हणून स्वत:ला तपस्वी म्हणवून घेतात. या मार्गाने तपस्वी होता येत असेल तर जंगली माणसे यांच्याहनही अधिक तपस्वी ठरतील.जटा वाढविल्या, अंगाला राख लावली, कपाळावर टीळा लावला म्हणजे माणूस तपस्वी होत असेल तर सगळेच तपस्वी होऊ शकतील. हे बैरागी,गोसावी वगैरे बाहेरून त्यागमूर्ती दिसतात, परंतु आतून महासंग्रही असतात.
कबीरपंथ-समीक्षा
(प्रश्न) कबीरपंथी तरी चांगले आहेत ना?
(उत्तर) मुळीच नाहीत.
(प्रश्न) का बरे? ते लोक तर पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा करण्याचे खंडन करतात. कबीर साहेब स्वतः फुलातून उत्पन्न झाले आणि शेवटी फुलांतच विलीन झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा जेव्हा जन्मही झालेला नव्हता तेव्हाही कबीरसाहेब होते. ते मोठे सिद्ध पुरुष होते. त्यामुळे वेद व पुराणे यांना जी गोष्ट समजली नाही ती कबीरांनी जाणली होती. कबीरांनीच लोकांना खरा मार्ग दाखविला. 'सत्यनाम कबीर' आदी हा त्यांचा मंत्र आहे.
(उत्तर) पाषाणादिकांच्या मूर्तीएवजी पलंग, गादी, खडावा, ज्योती म्हणजे दिवा यांची पूजा करणे हे मूर्तिपूजेहून काही वेगळे आहे काय? फुलांतून उत्पन्न होऊन कबीर साहेब हे एखादा भुंगा होते की फुलाचे
कळी होते ?
या संदर्भात जी गोष्ट प्रचलित आहे ती खरी असावी. काशीमध्ये एक विणकर राहत होता. त्याला मूलबाळ नव्हते. एके दिवशी रात्रीच्या अंधुक प्रकाशात तो रस्त्याने चालला होता. इतक्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक टोपली दिसली. त्या टोपलीत रात्रीच जन्मलेले एक मूल फुलांमध्ये ठेवलेले होतेतो विणकर त्या मुलाला घेऊन घरी गेला आणि त्याने ते मूल आपल्या बायकोच्या स्वाधीन केले. तिने त्याचे पालन पोषण केले. तो मुलगा मोठा झाल्यावर विणकराचे काम करू लागला. त्याला संस्कृत शिकण्याची इच्छा झाली. म्हणून तो एका पंडिताकडे गेला. परंतु त्या पंडिताने त्याचा अपमान केला. तो म्हणाला, "आम्ही विणकरांना शिकवीत असतो." ज्ञान प्राप्तीसाठी तो अनेक पंडितांकडे गेला परंतु कोणीही त्याला विद्या शिकविली नाही. तेव्हा मग तो आपल्या मोडक्या-तोडक्या भाषेत विणकर वगैरे लोकांना उपदेश करू लागला. तोभजने रचीत असे व एकतारीवर ती गात असे. तो पंडित, वेद व शास्त्रे यांची यथेच्छ निंदा करीत असे. काही मुखी लोक त्याच्या जाळ्यात अडकलेतो मेल्यावर लोकांनी त्याला सिद्धपुरुष बनवून टाकलेत्याने आपल्या हयातीत
जी काही काव्यरचना केली होती तिचे अध्ययन त्याचे चेले करू लागले. कान बंद करून घेतल्यावर जो आवाज ऐकू येतो त्याला त्यांनी अनहत शब्द असे नाव दिले. मनाच्या वृत्तीला ते 'सुरति' म्हणतात त्या सुरतीला तो अनहत शब्द ऐकण्यात तल्लीन करणे हेच परमेश्वराचे ध्यान असून ते ध्यान जो करतो तो संत होय असे ते समजतात. त्या ठिकाणी काळ पोहोचू शकत नाही. ते लोक वर्छीच्या आकाराचे गंध लावतात आणि चंदनादिकाच्या माळा गळ्यात घालतात. आता तुम्हीच विचार करा की, या मार्गाने आत्म्याची उन्नती कशी होणार आणि ज्ञान कसे वाढणार? हा साराच पोरकटपणा आहे.
नानक-पंथाची समिक्षा
(प्रश्न) पंजाबात नानकजींनी एक संप्रदाय सुरु केला होता. तेही मूर्तिपूजेचे खंडन करीत असत. त्यांनी लोकांना मुसलमान होण्यापासून वाचविले. ते साधू बनले नाहीत. गृहस्थच राहिले. त्यांनी ज्या मंत्राचा उपदेश
केला त्यावरून त्यांचा हेतू फार चांगला होता असे दिसून येते. तो मंत्र असा आहे.
ओं सत्यनाम कर्त्ता पुरुष निर्भो निर्वैर अकालमूर्त्त अजोनि सहभं गुरु प्रसाद जप आदिसच जुगादि सच है भी सच नानक होसी भी सच।। जपजी, पौडी १
'ओ३म्' ज्याचे सत्य नाव आहे तो कर्ता पुरुष निर्भय व निर्वैर आहे. तो अकालमूर्ती आहे. म्हणजे काळाच्या पकडीत सापडत नाही आणि योनित येत नाही. तो 'अजन्मा' आहे. तो प्रकाशमान आहे. गुरूच्या
कृपेने त्याचाच जप करतो परमात्मा आदिमध्ये सत्य होता. युगादिकांच्या वेळी सत्य होता. वर्तमानकाळी सत्य आहे आणि यापुढेही सत्यच राहील.
(उत्तर) नानकांचा हेतू चांगला होता. परंतु त्यांच्याजवळ विद्वत्ता मुळीच नव्हती. त्यांना फक्त आपल्या प्रदेशातील खेड्याची पंजाबी भाषा येत होती. त्यांना संस्कृतचे ज्ञान नव्हते आणि वेदादी शास्त्रांचे अध्ययन त्यांनी केले नव्हते. त्यांना संस्कृत येत असती तर त्यांनी 'निर्भय' हा शब्द 'निर्भो' असा का लिहिला असता? संस्कृत भाषेचे ज्ञान त्यांनी रचलेल्या संस्कृती स्तोत्रांवरून दिसून येते. आपण संस्कृतमध्ये देखील ढवळाढवळ करावी परंतु संस्कृत भाषा शिकल्याशिवाय कशी येणार? पण ज्या खेडवळ लोकांनी कधी संस्कृत भाषा ऐकली नव्हती त्यांचे समोर संस्कृतचे 'संस्कृती-स्तोत्र' बनवून आपण संस्कृतचेही पंडित बनले असतील. लोकांनी आपल्याला मान द्यावा, आपली ख्याती व्हावी व आपली प्रतिष्ठा वाढावी अशी इच्छा त्यांच्या मनांत नसती तर त्यांनी ही गोष्ट कधी केली नसती. त्यांना कीर्तीची हाव नक्कीच असणार. ती नसती तर त्यांनी जी भाषा येत होती तिच्यातच त्यांनी लिहिले असते. आपण संस्कृत शिकलेलो नाही असे त्यांनी सांगून टाकले असते. मनांत गवांची भावना असल्यामुळे मानसन्मान मिळवण्यासाठी त्यांनी ते ढोंग केले असावे. म्हणूनच त्यांच्या ग्रंथात वेदांची निंदा वस्तुती आढळतातकारणत्यांनी तसे केले नसते तर त्यांना जेव्हा कोणी वेदांचा अर्थ विचारला असता व त्यांना ता सांगता आला नसता तेव्हा त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. म्हणून त्यांनी आधीच आपल्या शिष्यांसमोर कोठे-कोठे वेदाच्या विरुद्ध उद्गार काढले तर कोठे-कोठे वेदाविषयी चांगले मतही व्यक्त केले आहेकारण वेदाविषयी थोडेफार अनुकूल उद्गार काढले नसते तर लोकांनी त्यांना नास्तिक म्हटले असते. जसे,
वेद पढ़त ब्रह्मा मरे । आसा १। प० १०।। चारों वेद कहानि । राग तिलंग १। प० १।।
सन्त कि महिमा वेद न जानी।। ब्रह्मज्ञानी आप परमेश्वर।। सु० पौ० ७। प० ८।।
अर्थ: (सतत वेदपठन करणारा ब्रह्माही मेला. चारही वेद म्हणजे निव्वळ एक कल्पित कथा आहे. संतांचा महिमा वेदांना कळत नाही. नानक म्हणतात की, ब्रह्मज्ञानी माणूस हा स्वत:च परमेश्वर असतो.)
वेदपठन करणारे मेले. पण वेदपठन न करणारे नानकजीसारखे लोक स्वत:ला अमर समजत होते ? ते मेले नाहीत काय? वेद हे सर्व विद्यांचे भांडार आहे. परंतु जो कोणी बेद ही एक कहाणी आहे असे म्हणतो त्याच्या सगळ्याच गोष्टी कल्पित कथा आहेत, ज्या मूखमा लोक संत समजतात त्या बिचाऱ्यांना वेदांचा महिमा कधीच कळणार नाही. नानकजनी वेदांचा गौरव केला असता तर त्यांचा पंथ चालला नसता; आणि ते गुरूही बनू शकले नसते. कारण ते स्वतः संस्कृत विद्या शिकलेले नसल्याने इतरांना ती शिकवून त्यांना शिष्य कसे बनवू शकले असते.
ज्यावेळी पंजाबात नानकजींचा उदय झाला त्यावेळी पंजाबात संस्कृत विद्येचा पूर्ण अभाव होता आणि तो प्रदेश मुसलमानांच्या छळाने त्रस्त झालेला होता. अशा वेळी त्यांनी काही लोकांना (इस्लामपासून) वाचविले. नानकजींच्या हयातीत त्यांचा संप्रदाय फारसा नव्हता आणि त्यांना पुष्कळसे शिष्य मिळालेले नव्हते. परंतु अविद्वान लोकांमध्ये अशी प्रथा आहे की, ते एखाद्या माणसाला तो मेल्यानंतर सिद्धपुरुष बनवून टाकतात आणि मग त्याचे माहात्म्य रचून त्याला ईश्वरासमान मानतात.
वस्तुतः नानकजीफार श्रीमंत किंवा जमीदार वर्गातलेही नव्हते. परंतु त्यांच्या चेल्यांनी 'नानक चंद्रोदय'
व 'जनमसाखी' इत्यादी ग्रंथांमध्ये ते फार मोठे सिद्ध पुरुष व अत्यंत ऐश्वर्यवान होते असे लिहून ठेवले आहे
नानक ब्रह्माला भेटले, त्यांच्याशी खूप चर्चा केली, सर्वांनी त्यांचा सन्मान केला, त्यांच्या लक्षात पुष्कळ घोडे, रथ, हत्ती वगैरे सोने, चांदी, मोती, पन्ना, हिरे माणके वगैरे रत्नांनी सजविले, अमूल्य रत्नांची तर गणतीच नव्हती, असे लिहिले आहे. या सगळ्या थापा नाही तर काय? मात्र हा सारा नानकजींच्या चेल्यांचा दोष आहे. नानकजींचा नाही.
नानकांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने 'उदासी ' गावाचा पंथ सुरू केला, तर रामदास वगैरे मंडळींनी
'निर्मले’ नावाचा पंथ निर्माण केला. नानकांच्या नंतर त्यांच्या गादीवर बसलेल्यांनी त्याची भाषा ग्रंथसाहेबामध्ये
संग्रहित केल्या. दहावे गुरू गोविंदसिंग गुरू झाले. त्यांच्यानंत रकुणाचीही रचना ग्रंथसाहिबामध्ये समाविष्ट केली नाही. परंतु तोपर्यंतच्या काळात जी लहान लहान पुस्तके लिहिली गेली होती त्या सर्वांचे एकत्र संकलन करून ग्रंथ बांधला गेला. नानकानंतर त्यांच्या ग्रंथातील अनेक लोकांनी अनेक पुस्तके लिहिली. काही लोकांनी पुराणांसारख्या भाकडकथाही लिहिल्या. ब्रह्मज्ञानी माणूस स्वत:च परमेश्वर असतो, हे तत्व गृहीत धरून नानकांचे शिष्य झुकत गेले. त्यांनी कर्म व उपासना करणे सोडल्याने परिस्थिती खूपच बिघडली. नानकजनी ईश्वराची जी विशिष्ट प्रकारची भक्ती करायला सांगितली होती ती त्यांचे शिष्य करीत राहिले असते तर चांगले झाले असते. आता उदासी म्हणतात की आम्ही मोठे, तर निर्मले म्हणतात आम्ही मोठे. अकाली व तरहलाई म्हणतात आम्ही सर्वांचेवर आहोत.
या गुरूपैकी गोविंदसिंह अत्यंत शूरवीर होते. मुसलमानांनी त्यांच्या पूर्वजांचा फार छळ केला होता. म्हणून ते मुसलमानांवर सूड उगवू इच्छित होते. पर्णातू त्यांच्या जवळ कसलीच युद्धसामग्री नव्हती; आणि मुसलमानांची बादशाही तर ऐन जोरात होती. म्हणून त्यांनी एक पुरश्चरण केले आणि असे जाहीर केले की, "देवीने मला एक वर आणि एक तलवार देऊन अशी आज्ञा केली आहे की, तू मुसलमानांशी लढाई कर. तुझा जय होईल." ही वार्ता सर्वत्र पसरली आणि खूप लोक त्यांना येऊन मिळाले. ज्याप्रमाणे वाममार्गी लोकांनी 'पंचमकार' व चक्रांकित (वैष्णव) लोकांनी 'पंच संस्कार' चालविले त्याप्रमाणे गुरु गोविंदसिंहांनी 'पंच ककार' सुरू केले. त्यांचे हे पंच ककार युद्धाकरिता उपयुक्त होते. पहिला ककार म्हणजे 'केश' (केस). डोकीवरील केस वाढविल्याने लाठी किंवा तलवार यांच्या आघातापासून थोडाफार बचाव होण्याची शक्यता होती. दुसरा ककार म्हणजे 'कंगण' अकाली शीख डोकीवरील फेट्यात मोठे लोखंडी कडे घालतात. हातात कडे घालतात. या दोन कड्यांमुळे डोक्याचे व मनगटाचे रक्षण होते. तिसरा ककार म्हणजे 'काछ'(कसोट). लोक जशी लंगोट किंवा घुटन्यावर चड्डी घालतात तसा हा पळण्याच्या व उड्या मारण्यात चांगला उपयोगी होतो. पुष्कळसे अखाडेबाज पहिलवान हे नेसतात. चौथा ककार म्हणजे 'कंगा' (कंगवा). या कंगव्याने केस विंचरून स्वच्छ ठेवता येतात पाचवा ककार म्हणजे 'काचू' (कट्यार) किंवा किरपान (कृपान), शत्रूशी हातघाईच्या लढाईत याचा चांगला उपयोग होतो. गुरू गोविंदसिंहानी आपल्या बुद्धीमत्तेने त्यावेळी आवश्यक ही प्रथा चालू केली होती. आता या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही. युद्धाच्या कामी उपयुक्त ठराव्यात म्हणून ज्या गोष्टी त्यांनी प्रचलित केल्या त्या आता शीख पंथाचे अभिन्न अंग बनल्या आहेत.
शीख लोक मूर्तिपूजा करीत नाहीत. परंतु त्याहूनही अधिक पूजा ग्रंथसाहेबाची करतात. तीही एक प्रकारची मूर्तिपूजाच नाही काय? कोणत्याही जड (ज्ञानरहित) वस्तूसमोर मस्तक नमविणे किंवा तिची पूजा करणे ही सर्व मूर्तिपूजाच आहे. मूर्तिपूजकांनी आपल्या भक्तीचे दुकान मांडून जशी पोटापाण्याची सोय केली
आहे तशीच या लोकांनीही केली आहे. जसे पुजारी मूर्तीचे दर्शन घडवितात आणि तिच्यापुढे पैसे वगैरे ठेवायला लावतात तसेच नानकपंथी लोकही ग्रंथाची पूजा करतात, इतरांकडून पूजा करवितात आणि त्यांना भेटवस्तू अर्पण करायला लावतात. परंतु मूर्तिपूजक लोक वेदांचा जेवढा मान ठेवतात तेवढा हे ग्रंथसाहेबवाले ठेवीत नाहीत. हे म्हटले जाऊ शकते की, यांनी वेदपठण किंवा वेदश्रवण केलेले नसते. काय करणार? ही किंवा दुरणही नसलेले बुद्धिमान लोक जेव्हावेदांचे श्रवण करतात अथवा वेद वाचतात तेव्हा ते कोणत्याही संप्रदायाचे असले तरी वेदमतात येतात. तरीपण या शीख लोकांनी खाण्यापिण्यातील निरर्थक बंधने पुष्कळ अंशी काढून टाकली आहेत. याचप्रमाणे विषयासक्ती व दुरभिमान यांचा त्याग करून हे लोक वैदिक धर्माची उन्नती करतील तर चांगली गोष्ट होईल.
दादूपंथ-समीक्षा
(प्रश्न) दादूपंथी लोकांचा मार्ग तरी चांगला आहे ना ?
(उत्तर) चांगला असा फक्त वेदमार्गच आहे. तो मार्ग धरणे असेल तर तसे करा नाही तर सदैव गटांगळ्या खात राहाल. संत दादू दयाल यांचा जन्म त्यांच्या मतानुसार गुजरातेत झाला होता. नंतर ते जयपूरजवळच्या आमेर या गावी राहू लागले. ते तेल्याचा धंदा करीत. देवाची लीला अगाध आहे. दादूजीही पूजले जाऊ लागले. त्यांनी वेदादी शास्त्रांचा अभ्यास करायचे सोडून 'दादूराम, दादूराम' यातच मुक्ती आहे असे मानले, जेव्हा सत्याचा उपदेश होत नाही तेव्हा असल्या वितंडगोष्टी चालतात.
रामस्नेही मत-समीक्षा
अगदी अलीकडेच शाहपुरा या गावी 'रामसनेहीं' या नावाचे मत सुरू झाले. त्या लोकांनी वेदोक्त धर्माचा त्याग करून 'राम, राम' असे म्हणणेच चांगले मानले आहे. रामनामातच ज्ञान, ध्यान व मुक्ती ते मानतात. परंतु जेव्हा भूक लागते तेव्हा रामनामाचा-जप करून भाजीभाकरी मिळत नाही. कारण खाण्यापिण्याचे पदार्थ गृहस्थांच्या घरीच मिळतात. हे लोकही मूर्तिपूजेचा धिक्कार करतात. परंतु ते स्वत:च मूर्ती बनत आहेत. हे लोक बहुधा स्त्रियांच्याच संगतीत राहतात. कारण रामजीला 'रामकी' (रामाची स्त्री) शिवाय आनंद मिळू शकत नाही.
रामचरण गावाचा एक साधू होऊन गेला. त्याचा पंथ मुख्यतः मेवाडमधील शाहपुरा या गावातून सुरू
झाला. या पंथाचे लोक 'रामराम' हा परममंत्र व तोच सिद्धांत मानतात. त्यांच्या एका ग्रंथात संतदास वगैरेची
वाणी संग्रहित केलेली आहे. त्यात लिहिले आहे:
भरम रोग तब ही मिट्या, रट्या निरंजन राइ ।
तब जम का कागज फट्या, कट्या कर्म तब जाइ।।१।। सारवी ६।। सुमरणका अंग १७।।
(अर्थ : जेव्हा एखादा माणूस ईश्वराच्या नावाचा जप करतो तेव्हा त्याच्या साऱ्या शंका दूर होतात, त्याला रोगराई होत नाही, यमराज त्याच्या पापपुण्याची नोंद असलेले कागदपत्र फाडून टाकतो आणि त्याची सर्व पापे नाहीशी होतात. )
आता शहाण्या लोकांनी विचार करावा की, केवळ 'रामराम' म्हटल्याने माणसाचा भ्रम जे अज्ञान आहे ते कसे नष्ट होणार ? आणि यमराजाच्या नियमांनुसार त्याच्या पापांची फळे त्याला भोगावी न लागता माणूस आपल्या कर्माच्या फळांतून मुक्त होणार की नाही? असा समज पसरविणे म्हणजे माणसाला पापाच्या जाळ्यात अडकविणे आणि मनुष्य जन्म वाया घालवणेच आहे. आता या लोकांचा मुख्य गुरू जो रामचरण त्याची काही वाचणे पहा.
महमा नांव प्रताप की, सुणौ सरवण चित लाइ।
रामचरण रसना रटौ, क्रम सकल झड़ जाइ।।
जिन जिन सुमिर्या नांवकूं, सो सब उतर्या पार।
रांमचरण जो वीसर्या, सो ही जम के द्वार।।
रांम विना सब झूठ बतायो। रांम भजत छूट्या सब क्रम्मा।।
चंद अरु सूर देइ परकम्मा। राम कहे तिन कूं भै नाहीं।।
तीन लोक में कीरति गाहीं। रांम रटत जम जोर न लागै।।
रांम नाम लिख पथर तराई। भगति हेति औतार ही धरही।।
ऊंच नीच कुल भेद बिचारै। सो तो जनम आपणो हारै।।
सन्तां कै कुल दीसै नाहीं। रांम रांम कह राम सम्हांहीं।।
ऐसो कुण जो कीरति गावै। हरि हरिजन की पार न पावै।।
रांम संतां का अन्त न आवै। आप आपकी बुद्धि सम गावै।।
(अर्थ: हे मित्रा, परमेश्वराच्या नावाचा प्रताप व महिमा किती मोठा आहे ते लक्ष देऊन ऐक रामनामाचा जप केल्याने सारी पाप नष्ट होतात. ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केले ते सारे भवसागर तरून गेले. परंतु ज्यांना देवाचे विस्मरण झाले ते यमाच्या तावडीत सापडले. रामाखेरीज इतर सर्व मिथ्या आहे. रामाची भक्ती केल्याने मनुष्य कर्ममुक्त होतो. चंद्र व सूर्य अशा रामभक्ता भोवती प्रदक्षिणा घालतात. राम सांगतो की, अशा लोकांना कसलेही भय उरत नाही. तीन्ही लोक त्यांचे गुणगान करतात. रामनाम जपणाऱ्यावर यमाचा जोर चालत नाही. रामाचे नाव लिहिलेले दगड पाण्यावर तरंगत राहिले. आपल्या भक्तांसाठी ईश्वर अवतार धारण करतो. जो कोणी माणसाची जात व कुळ यांचा विचार करून उच्चनीच असा भेदभाव करतात ते आपला जन्म व्यर्थ घालवितात. संत लोक जातीपातींचा विचार करीत नाही. राम नाम असे म्हणत ते रामस्वरूप होऊन जातात. जो कोणी रामाचे गुणगान करतो तो थोर होय. त्याचे सामर्थ्य अपार असते. राम म्हणतो, संतांच्या मोठेपणाला अंत नाही. प्रत्येकाने आपापल्या बुद्धीप्रमाणे रामाचे गुणगान करावे.)
यांचे खंडन:- रामचरण वगैरे लोकांचे ग्रंथ पाहिल्यानंतर प्रथमतः ही गोष्ट लक्षात येते की, रामचरण हा
एक साधा खेडवळ माणूस होता. तो मुळीच शिकलेला नव्हता. तो सुशिक्षित असता तर त्याने अशा थापा कशाला मारल्या असत्या? केवळ राम राम असे म्हटल्याने सर्व पापे नष्ट होतात, हा या लोकांचा केवळ भ्रम
आहे. असल्या गोष्टी सांगून ते आपला व इतरांचा जन्म वाया घालवितात. यमाचे भय ही तर फारच मोठी गोष्ट
झाली. परंतु राजाचा शिपाई, चोर, डाकू, वाघ, साप, विंचू आणि डास इत्यादिकांचे भयही रामनामाच्या जपाने
दूर होत नाही. रात्रंदिवस राम, राम करीत राहिल्याने काहीही साध्य होत नाही. ज्याप्रमाणे 'साखर, साखर' असे म्हणत राहिल्याने तोंड गोड होत नाही त्याचप्रमाणे सत्यभाषण आदी कमें न करता केवळ रामनामाचा जप केल्याने काहीही होणार नाही. एकदा रामराम असे म्हटल्याने त्यांच्या रामाला ते ऐकू जात नसेल तर जन्मभर रामनामाचा जप करूनही त्याला ते ऐकू जाणार नाही आणि जर ज्याला एकदा म्हटलेले ऐकू जात असेल तर दुसऱ्यांदा राम राम म्हणणे व्यर्थ आहे. या लोकांनी आपले पोट भरण्यासाठी आणि इतरांचा जन्म नष्ट करण्यासाठी ही सारी लबाडी रचली आहे. यांचे नाव असते रामस्नेही परंतु काम करतात ते रांडस्नेही जिकडे पाहावे तिकडे गंडाच रांडा. त्या संतांभोवती घोळका करून बसलेल्या दिसतात. असली पाखंडे या देशात नसती तर आर्यावर्त्त देशाची अशी दुर्दशा का झाली असती ? हे लोक आपल्या चेल्यांना आपले उष्टे खायला लावतात आणि स्त्रियाही यांना साष्टांग नमस्कार घालतात. हे साधू लोक स्त्रियांशी एकांतवासही करतात.
या पंथाची आणखी एक शाखा मारवाडातील खेडापा गावाच्या गावी सुरू झाली आहे. या शाखेचा इतिहास असा आहे:-
रामदास नावाचा चांभार कुळात जन्मलेला एक व्यक्ती होता. त्याला दोन बायका होत्या. प्रथम अनेक दिवसांपर्यंत तो औघड (अघोरी) पंथाचा अनुयायी बनून कुत्र्यांबरोबर खात-पीत असे. नंतर तो वाममार्गी लोकांच्या कुंडापंथात गेला. नंतर तो रामदेवाचा 'कामडिया' बनला. तो आपल्या बायकांसह गात असे. असाच हिंडता-हिंडता तो 'सीथल' गावाच्या चर्मकारांचा गुरू असलेल्या हररामदासाला जाऊन भेटला. हररामदासाने त्याला रामदेव पंथाचा उपदेश करून आपला चेला बनविले. नंतर हा रामदास आपल्या खेडापा गावी परत गेला आणि तेथे त्याने आपली गादी स्थापन केली व आपला पंथ सुरू केला.
तिकडे शाहपुरा या गावी रामचरणाचा पंथ वाटू लागला होता. त्याचाही इतिहास असा ऐकिवात आहे
की, तो जयपूरचा व्यापारी होता. त्याने दांतडा या गावी एका साधूकडून वेश घेऊन त्याला आपला गुरू केला
आणि शाहपुण्यात आपले स्थान जमविले. भोळ्या लोकांमध्ये पाखंडाची पाळेमुळे लवकर रुजतात. त्यामुळे
त्याचा पंथ तेथे चांगला रुजला. वर उल्लेखिलेल्या रामचरणाची वचने प्रमाण मानून लोकांना आपले चेले बनवितात. त्यांमध्ये उच्च-नीच असा भेद नाही. ब्राह्मणापासून अंत्यजांपर्यंत सर्व लोक त्यांचे अनुयायी बनतात. आजही ते लोक कुंडापंथी लोकांप्रमाणेच आचरण करतात. कारण ते मातीच्या कुंडयातूनच खातात
आणि साधूचे उष्टे खातात. ते लोकांना वेदमत व आई, बाप व सांसारिक गोष्टी इत्यादींविषयी त्यांचा संबंध तोडायला लावतात व आपले चेले बनवितात. हे लोक रामनामाला महामंत्र समजतात आणि त्यालाच ते 'छुच्छम' (सूक्ष्म) वेदही मानतात. रामनामाचा जप केल्याने अनंत जन्मांची पाप नष्ट होतात. त्याशिवाय कोणालाही मुक्ती मिळत नाही. प्रत्येक श्वासोच्छवासाबरोबर राम-राम जे म्हणतात त्यांना ते सत्यगुरू म्हणतात; आणि सत्यगुरूला परमेश्वराहूनही श्रेष्ठ मानून ते त्याच्या मूर्तीचे ध्यान करतात. साधूंचे पाय धुऊन ते पाणी तीर्थ समजून पितात. जेव्हा चेला गुरूपासून दूर जातो तेव्हा त्याने आपल्या गुरूची नखे व दाढीचे केसही आपल्याजवळ ठेवावीत आणि रोज त्यांना आंघोळ घालून ते पाणी तीर्थ समजून प्राशन करतात. हे लोक रामदास व हररामदास यांच्या उक्ती वेदांहूनही श्रेष्ठ समजतात. त्या ग्रंथांना प्रदक्षिणा घालून ते आठ साष्टांग नमस्कार घालतात आणि गुरूजवळ असल्यास त्याला साष्टांग नमस्कार घालतात. स्त्रियांना व पुरुषांना ते रामनामाचा जप करण्याचा सारखाच मंत्रोपदेश देतात. नामस्मरण केल्यानेच कल्याण होते असे ते मानतात. ग्रंथ पठण व विद्याध्ययन हे पाप आहे असे ते समजतात. त्यांची एक साख अशी आहे:-
पंडताइ पाने पड़ी, ओ पूरब लो पाप ।
राम–राम सुमर्यां विना, रइग्यौ रीतो आप।।१।।
वेद पुराण पढ़े पढ़ गीता, रांमभजन बिन रइ गये रीता।।
(अर्थ:- विद्याध्ययन हे निरर्थक आहे. ग्रंथ वाचने हे पाप आहे. रामनाम न घेता केलेली सारी कर्में व्यर्थ आहेत. वेद, पुराणे व गीता यांचा अभ्यास करताना रामनामाचा जप केला नाही तर त्या अभ्यासाचा काही उपयोग नाही.)
अशा प्रकारची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. स्त्रीने पतीची सेवा करणे हे पाप पण गुरू व साधूची सेवा करणे हा धर्म आहे असे ते सांगतात. वर्णाश्रम व्यवस्था ते मानीत नाहीत. ब्राह्मण हा रामस्नेही नसेल तर तो नीच आणि चांडाळ, रामस्नेही असल्यास तो उत्तम (श्रेष्ठ) आहे, असे ते मानतात. ते ईश्वराचा अवतार मानीत माहीत आणि रामचरणाचे जे वचन आम्ही यापूर्वी उद्धृत केले आहे त्यात सांगितल्याप्रमाणे 'भगति हेति औतार ही धरही’ म्हणजे संत व भक्तांसाठी ईश्वर अवतार घेतो असे ते समजतात. अशा प्रकारचे जे
पाखंडी पंथ आहेत त्यांच्यामुळे आर्यावर्त्त देशाला अहितकारी आहेत. या विवेचनावरून शहाणे लोक योग्य तो बोध घेतील.
गोकुलियापंथ-समीक्षा
(प्रश्न) गोसाव्यांमध्ये गोकुलिये या नावाचा ग्रंथ आहे. तो फार चांगला आहेपाहा ना, ते कसे ऐश्वर्य उपभोगतात. त्यांच्याजवळ काहीतरी लीला व सामर्थ्य असल्याखेरीज त्यांना एवढे ऐश्वर्यप्राप्त होणे शक्य आहे काय?
(उत्तर) ते ऐश्वर्य गृहस्थाश्रमी लोकांचे असते. त्यात गोसाव्यांचे काहीच नसते.
(प्रश्न) वाहवा । गोसाव्यांना त्यांच्या कर्तृत्वाने ते ऐश्वर्य प्राप्त होते. असे ऐश्वर्य इतरांना का प्राप्त होत नाही?
(उत्तर) इतर लोकही त्यांच्यासारख्या लांड्यालबाड्या करतील तर त्यांनाही असे ऐश्वर्य लाभेल यात काय संशय? इतर लोक यांच्यापेक्षा अधिक करतील तर त्यांना यांच्यापेक्षाही जास्त ऐश्वर्य मिळू शकेल.
(प्रश्न) वाहवा ! यात कसला धूर्तपणा? ही सारी गोलोकाची लीला आहे.
(उत्तर) ती गोलोकाची लीला नसून गोसाव्यांची लीला आहे. ती जर गोलोकाची लीला असेल तर गोलोकातही इथल्यासारखीच स्थिती असली पाहिजे. या पंथाचा उदय तैलंगण (आंध्र) देशात झाला. लक्ष्मणभट्ट नावाचा एक तेलंगी ब्राह्मण लग्न झाल्यानंतर आपले आईबाप व पत्नी यांचा त्याग करून काशीला गेला आणि 'माझे लग्न झालेले नाही', असे खोटेच सांगून त्याने संन्यास घेतला. योगायोगाने त्याचे आईबाप व पत्नी यांना काशीमध्ये त्याने संन्यास घेतल्याची बातमी समजली. ते ऐकताच त्याचे आईबाप व पत्नी काशीला गेले आणि ज्याने लक्ष्मणभट्टाला संन्यास दिला होता त्याला भेटून त्यांनी सांगितले की, "याला तुम्ही संन्यासदीक्षा कशी दिली? ही पाहा. ही तरुणी त्याची पत्नी आहे." त्याची पत्नी म्हणाली, "तुम्ही माझा पती मला परत देणार नसाल तर मलाही संन्यास द्या. यावर त्या गुरूने लक्ष्मणभट्टाला बोलावून असे सांगितले की, "तू फारच खोटा आहेस. तू खोटे बोलून संन्यास घेतला आहे. म्हणून संन्यासाश्रमाचा त्याग करून पुनः गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर."त्याप्रमाणे लक्ष्मणभट्टाने पुनः गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि आपल्या घरच्या लोकांबरोबर तो परत गेला.
अशा या मताचे मूळ हे असत्य कपटावर आधारले आहे. जेव्हा ते चौघे तेलंग देशास परत गेले तेव्हा त्याच्या वर्गाच्या लोकांनी त्याला जातीतून काढून टाकले. मग लक्ष्मणभट्ट गाव सोडून इकडे-तिकडे भटकू लागले. तेथून ते पुनः काशीला आलेकाशीच्या जवळ असलेल्या चरणार्गढजवळ चंपारण्य नावाचे जंगल होते. लक्ष्मणभट्ट त्या जंगलातून आपल्या पत्नीसह चालले असता त्यांना तेथे एक लहान मुलगा काणोतरी टाकून दिलेला दिसला. त्या मुलाला एखाद्या श्वापदाने मारून टाकू नये म्हणून त्याच्या सभोवती आग पेटवून ठेवली होती. लक्ष्मणभट्ट आणि त्याची पत्नी यांनी त्या मुलाला उचलून घेतले आणि त्याचे पुत्रवत पालन पोषण केले. मग ते काशीतच राहू लागले. तो मुलगा मोठा झाल्यावर त्याच्या पालक आई-वडिलांचे निधन झाले. यावेळेपर्यंत त्याचे थोडेफार अध्ययन झाले होते. काही दिवसांनी तो मुलगा एका विष्णुस्वामीच्या मंदिरात जाऊन चेला बनला. तेथे त्याचे न पटल्यामुळे तो काशीला परत गेला व त्याने संन्यास घेतला. त्यावेळी असाच एक जातिबहिष्कृत ब्राह्मण काशीत राहत होता. त्याला एक तरुण मुलगी होती. तो ब्राह्मण या तरुणाला म्हणाला, "तू संन्यासाचा त्याग करून माझ्या मुलीशी लग्न कर. "त्याप्रमाणे त्याने त्या मुलीशी लग्न केले. त्याचे वडिलांनी जसे केले तसेच त्यानेही केले. तो आपल्या पत्नीला घेऊन तो विष्णुस्वामीच्या मंदिरात चेला बनला होता तेथे गेला. परंतु ते विवाहित असल्यामुळे त्यांना तेथे कोणी राहू दिले नाही. म्हणून तो तेथून वज्रदेशात जे अविद्येचे माहेरघरच आहे. तेथे त्याने अनेक प्रकारच्या लांड्यालबाड्या करून खोड्यानाट्या गोष्टी लोकांना सांगायला सुरुवात केली. तो असे सांगू लागला की, ‘भगवान श्रीकृष्ण मला भेटले; आणि त्यांनी मला असे सांगितले की, "गोलोकातून जे दैवी जीव मर्त्यलोकात आले आहेत त्यांना तु ब्रह्मसंबंध व्रताने पवित्र करून गोलोकात परत पाठव." अशा प्रकारे मूर्ख लोकांना प्रलोभन दाखवून त्याने काही थोड्या म्हणजे ८४ लोकांना वैष्णव बनविले. त्यांच्यासाठी त्याने खालील मंत्र बनविले. आणि त्यांतही रहस्य ठेवले जसे, श्रीकृष्णः शरणं मम ।।
क्लीं कृष्णाय गोपीजनवल्लभाय स्वाहा।।२।।
हे दोन्ही सामान्य मंत्र आहेत. यानंतरचा मंत्र ब्रह्मसंबंध आणि समर्पण करण्यासंबंधी आहे:-
श्रीकृष्ण शरणं मम सहस्रपरिवत्सरमितकालजातकृष्णवियोगजनित–
तापक्लेशानन्ततिरोभावोऽहं भगवते कृष्णाय देहेन्द्रियप्राणान्त करणतद्धर्मांश्च
दारागारपुत्रप्तवित्तेह पराण्यात्मना सह समर्प्पयामि दासोऽहं कृष्ण तवास्मि।।
या मंत्राचा उपदेश करून शिष्य आणि शिष्यणी यांचे समर्पण करवितात. ‘क्लीं कृष्णायेति' हा 'क्लीं' शब्द तंत्र ग्रंथातील आहे. यावरून हा वल्लभपंथही वाममार्गी लोकांचा एक भेद आहे, हे दिसून येते. यामुळेच
बहुधा गोसावी लोक स्त्रीसंग करतात.
'गोपीवल्लभेति'-कृष्ण काय फक्त गोपींनाच प्रिय होते? इतरांना ते प्रिय नव्हते काय? जो स्त्रैण म्हणजे स्त्रीभोगामध्ये गुंतलेला असतो तोच स्त्रीयांना प्रिय असतो. श्रीकृष्ण असे होते काय?
आता ‘सहस्रपरिवत्सरेति’ - हजार वर्षांची गणना व्यर्थ आहे. कारण वल्लभ आणि त्याचे शिष्य हे काही सर्वज्ञ नाहीत. कृष्णाचा वियोग काय फक्त हजार वर्षांचाच होता? जेव्हा वल्लभाचा जन्म झालेला नव्हता तेव्हा आपल्या दैवी जीवांच्या उद्धारासाठी गोलोकातून कोणीच का आला नाही?
'ताप' व 'क्लेश' हे दोन्ही शब्द पर्यायवाची आहेत. त्यांच्यापैकी एक घ्यायला हवा होता. दोन्हीचा वापर करण्याची आवश्यकता नव्हती.
'अनंत' शब्दाचा वापर करणे निरर्थक आहे. कारण अनंत हा शब्द ठेवला तर ‘सहस्र' या शब्दाला काही अर्थ उरत नाही. आणि सहस्त्र हा शब्द ठेवला तर अनंत शब्द निरर्थक ठरतो. तसेच माणूस अनंत काळापर्यंत 'तिरोहित' म्हणजे दु:खाने आच्छादित राहत असेल तर त्याच्या मुक्तीसाठी वल्लभाचे आगमनही व्यर्थ ठरते. कारण अनताला अंत नसतो.
बरे ! देह, इंद्रिये, प्राण, अंत:करण, धर्मपत्नी, घर-दार, पुत्र, धन-दौलत इत्यादि श्रीकृष्णाला अर्पण का करावयाचे? श्रीकृष्ण हा तर पूर्णकाम होता. त्याला कोणाच्या देहादिकाची इच्छा कशी असू शकेल? शिवाय देहादिकांचे अर्पण करणे शक्यही नसते. कारण देहाचे अर्पण नखशिखांत देह म्हटला जातो. त्यातील मलमूत्रादी घाणेरड्या गोष्टीचे अर्पण कसे करू शकाल?
शिवाय पापपुण्यरूपी कर्में कृष्णार्पण केल्याने त्यांची फळे कृष्णाला भोगावी लागणार. म्हणजे नाव कृष्णाचे परंतु समर्पण मात्र स्वत:च्या फायद्यासाठी करतात. देहामध्ये जे काही मलमूत्रादी आहे सारे गोसाईजींना का अर्पण केले जात नाही? की गोड तेवढे आपण घ्यायचे आणि कडू तेवढे थुंकून टाकायचे?
त्यांच्या ग्रंथात असेही लिहिले आहे की जे काही अर्पण करावयाचे ते आपल्या पंथाच्या गोसाईजींनाच अर्पण करावे; इतर पंथाच्या लोकांना काही देऊ नये, हा सारा स्वार्थसाधूपणा आहे. इतरांचे धनादी लुटण्यासाठी आणि वेदोक्त धर्माचा नाश करण्यासाठी रचलेल्या या लांड्यालबाड्या आहेत. वल्लभपंथाच्या ग्रंथात काय लिहिले आहे ते पहा:
श्रावणस्यामले पक्षे, एकादश्यां महानिशि ।
साक्षाद्भगवता प्रोक्तं तदक्षरश उच्यते।।१।।
ब्रह्मसम्बन्धकरणात्सर्वेषां देहजीवयो ।
सर्वदोषनिवृत्तिर्हि दोषा पञ्चविधा स्मृता ।।२।।
सहजा देशकालोत्था लोकवेदनिरूपिता ।
संयोगजा स्पर्शजाश्च न मन्तव्या कदाचन।।३।।
अन्यथा सर्वदोषाणां न निवृत्ति कथञ्चन ।
असमिर्पतवस्तूनां तस्माद्वर्ज्जनमाचरेत्।।४।।
निवेदिभि समर्प्यैव सर्वं कुर्यादिति स्थिति ।
न मतं देवदेवस्य स्वामिभुक्तिसमर्प्पणम्।।५।।
तस्मादादौ सर्वकार्ये सर्ववस्तुसमर्प्पणम् ।
दत्तापहारवचनं तथा च सकलं हरे ।।६।।
न ग्राह्यमिति वाक्यं हि भिन्नमार्गपरं मतम् ।
सेवकानां यथा लोके व्यवहार प्रसिध्यति।।७।।
तथा कार्य्यं समर्प्यैव सर्वेषां ब्रह्मता तत ।
गंगात्वे गुणदोषाणां गुणदोषादिवर्णनम्।।८।।
हे श्लोक गोसाव्यांच्या 'सिद्धान्तरहस्य' इत्यादी ग्रंथातून घेतले आहेत. हेच गोसाव्यांच्या पंथाचे मूळ तत्व आहे. यांना कोणीतरी विचारले पाहिजे की, श्रीकृष्ण निजधामाला गेलेल्या किमान पाच हजार वर्षे होऊन गेली. अशा स्थितीत तो श्रावण महिन्यातील एकादशीच्या रात्री तो बल्लभांना कसा भेटला? ॥१॥
गोसाईजीचा जो चेला त्यांना सर्वकाही समर्पित करतो त्याच्या शरीराच्या व जीवाच्या साऱ्या दोषाची निवृत्ति होते. मूर्ख लोकांना फसवून आपल्या पंथात आणण्याची ही वल्लभांचा खटाटोप आहे. गोसाव्यांचे चेले व चेल्या यांचे सारे दोष नाहीसे होत असतील तर ते रोग, दारिद्र्य इत्यादी दु:खांनी गांजलेले का असतात? त्यांच्या मते हे दोष पाच प्रकारचे असतात. ॥२॥
(१) सहज दोषः काम, क्रोध इत्यादिकांपासून उत्पन्न होणारे स्वाभाविक दोष. (२) विशिष्ट देशकाळामध्ये केली गेलेली नाना प्रकारची पाये. (३) सर्व सामान्य लोक ज्याला भक्ष्याभक्ष्य म्हणतात ते दोष आणि वेदोक्त जो मिथ्याभाषणादी आहे, (४) संयोगजन्य दोषः वाईट संगतीमुळे निर्माण होणारे चोरी, जारी वगैरे आणि आई, बहीण, मुलगी, सून, गुरुपत्नी यांच्याशी संभोग केल्याने होणारे दोष. (५) स्पर्शजन्य दोष: अस्पृश्य व्यक्तींना स्पर्श केल्याने होणारे दोष. या पाच प्रकारच्या दोघांना गोसावी पंथाचे लोक मुळीच मानत नाही म्हणजे त्यांनी स्वैराचार करावा॥३॥
इतर कोणत्याही प्रकारच्या दोघांची निवृत्ती गोसावी पंथाखेरीज होऊ शकत नाही. म्हणून कोणताही पदार्थ गोसावीबुवांना अर्पण केल्याखेरीज त्यांच्या चेल्यांनी त्याचा उपभोग घेऊ नये. यासाठी हे चेले आपली पत्नी, मुलगी, सून व धनादी पदार्थ गोसाईजींना अर्पण करतात. या समर्पणाचा असा नियम आहे की, जोपर्यंत आपली पत्नी गोसाईजींच्या चरणसेवेत समर्पित होत नाही तोपर्यंत तिच्या पतीने तिला स्पर्श करू नये.||४||
म्हणून गोसाव्यांच्या चेल्यांनी समर्पण केल्यानंतर आपापल्या पदार्थाचा उपभोग घ्यावा. कारण त्यांनी
उपभोग घेतल्यानंतर त्या पदार्थाचे समर्पण होऊ शकत नाही.॥५॥
यासाठी प्रथम सर्व कामांमध्ये सर्व वस्तू समर्पित कराव्यात. पत्नी वगैरे प्रथम गोसाईजींना समर्पित करून मग त्यांचे आपण ग्रहण करावे. याचप्रमाणे सारे पदार्थ हरीला अर्पण करून मग आपण त्याचा उपभोग घ्यावा.॥६॥
गोसावीपंथाहून भिन्न मार्गाचे एक वाक्यही गोसाव्यांच्या चेल्यांनी कधी ऐकू नये अथवा त्याचे ग्रहण करू
नये. त्यांच्या शिष्यांचा हा व्यवहार प्रसिद्ध आहे.॥७॥
याचप्रमाणे सर्व वस्तू समर्पित करून सर्वांमध्ये ब्रह्मबुढी धारण करावी. त्यानंतर ज्याप्रमाणे गंगेमध्ये दुसरे पाणी मिसळल्यानंतर ते गंगारूप बनते. त्याप्रमाणे इतर पंथांतील त्यांचे दोष नाहीसे होऊन त्यांना गोसावी पंथाचे गुण प्राप्त होतातम्हणून आपल्या पंथांच्या गुणांचे वर्णन सदैव करीत राहावे.॥८॥
आता पहा ! इतर सर्व पंथांपेक्षा गोसाव्यांचा पंथ आपले प्रयोजन आहे की नाही? या गोसाव्यांना विचारले पाहिजे की, ब्रह्माचे एकही लक्षण तुम्ही जाणत नाही. मग तुम्ही आपले शिष्य आणि शिष्या यांना ब्रह्माशी संबद्ध कसे करणार ? तुम्ही असे म्हणाल की आम्हीच ब्रह्म आहोत. तेव्हा आमच्याशी संबंध झाल्याने ब्रह्माशी संबंध होतो. परंतु तुमच्यामध्ये ब्रह्माचे गुण, कर्म, स्वभाव यापैकी एकही गोष्ट नाही. मग काय केवळ भोगविलासासाठी तुम्ही स्वत:ला ब्रह्म मानता ? असे पाहा ! तुम्ही आपले शिष्य व शिष्या यांना स्वत:ला समर्पित करून घेऊन शुद्ध करता परंतु तुम्ही स्वतः, तुमची बायको, मुलगी व सून वगैरे असमर्पितच राहतात. म्हणजे तुमचे समर्पण कोणालाच केले जात नाही. तेव्हा तुम्ही सगळे अशुद्ध राहिलात की नाही? तुम्ही असमर्पित वस्तूला अशुद्ध मानता.म्हणजे असमर्पित आईबापांच्या पोटी तुमचा जन्म झाल्याने तुम्ही स्वतःच अशुद्ध ठरत नाही काय ? म्हणून तुम्ही आपली बायको , मुलगी, सून इत्यादींना इतर पंथांच्या लोकांना समर्पित करणे उचित होय.
ही गोष्ट करायला तुम्ही तयार नसाल तर मग तुम्ही इतर स्त्री-पुरुष, बंधन वगैरे स्वत:ला समर्पित करून घेणे आता सोडून द्या. आजवर जे झाले ते झाले. यापुढे तरी लांड्यालबाडया सोडून द्या. आणि सुंदर ईश्वरोक्त वेदविहित सन्मार्गावर येऊन आपला मानवजन्म सफळ करा; आणि धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ साध्य करून आनंद उपभोगा.
आणि असे पाहा. हे गोसावी लोक आपल्या संप्रदायाला 'पुष्टिमार्ग' असे म्हणतात. खाणे, पिणे, धष्टपुष्ट
होणे, सर्व स्त्रियांशी मनसोक्त भोगविलास कणे यालाच पुष्टिमार्ग असे म्हणतात. परंतु यामार्गाने जाणारे लोक
भगंदासारख्या रोगांनी ग्रस्त होऊन कसे झिजून-झिजून मरतात ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. खरे म्हणाल तर हा पुष्टिमार्ग नसून कुष्टिमार्ग आहे. कुष्ठरोगी (महारोगी) माणसाचे शरीर कुजून त्यातील सप्त धातू विघळून जातात आणि तो विलाप करीत मरून जातो. तीच गत या लोकांची होते, असे दिसून येते. त्यामुळे या पंथाला नरकाचा मार्ग असेही म्हणता येते. कारण दु:खाचे नाव नरक व सुखाचे नाव स्वर्ग आहे. अशाप्रकारे हे गोसावी लोक ढोंग व लबाडी यांचे जाळे पसरवून त्यात भोळ्याभाबड्या लोकांना पकडतात आणि स्वत:ला श्रीकृष्ण समजून सगळ्यांचे स्वामी बनतात.
हे लोक असे सांगतात की, गोलोकातून जितके दैवी लोक इहलोकी आले आहेत त्यांच्या उद्धारासाठी
आम्ही लीला पुरुषोत्तम जन्मलो आहोत. जोपर्यंत जो कोणी आमच्याकडून दीक्षा व उपदेश घेत नाहीत तोपर्यंत त्यांना गोलोकाची प्राप्त होत नाही. तेथे एकटा श्रीकृष्ण पुरुष असून बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. वाहवा ! तुमचा हा पंथ मोठा छानच आहे. गोसावी बुवांचे सारे चेले गोपी बनणार म्हणे. आता तुम्हीच विचार करा. एखाद्या पुरुषाला दोन बायका असल्या तर त्याचे किती हाल होतात ! तर मग एका पुरुषामागे कोट्यवधी बायका लागल्या तर त्याच्या दुर्दशेचे काय वर्णन करावे? तुम्ही असे म्हणाल की श्रीकृष्णाचे सामर्थ्य फार मोठे आहे, ते सर्वांना खुष करतात. त्याच्या पत्नीला स्वामिनीजी असे म्हणतात. तिच्यामध्येही श्रीकृष्णासारखे सामर्थ्य असावे. कारण ती त्याची अर्धांगी आहे.
इहलोकमध्ये स्त्रीपुरुषांमधील कामवासना सारखीच जोरदार असते. किंबहुना पुरुषापेक्षा स्त्रीची कामवासना अधिक प्रबळ असते. तसेच गोलोकात का नाही? तसे असल्यास स्वामिनची इतर बायकांशी चांगलीच खडाजंगी होत असणार. कारण सवतीमत्सर फार वाईट असतो. त्यामुळे गोलोक हा स्वर्गलोक बसण्याऐवजी नरक लोकच बनत असेल. किंवा ज्याप्रमाणे अनेक परस्त्रीगामी पुरुषांना गरमी, परमा यांसारखे लैंगिक रोग होतात त्याप्रमाणे गोलोकातील रहिवाशांनाही हे रोग होत असतील. शिः! शिः! शिः! अशा या गोलोकापेक्षा आपला हा मृत्युलोकच बरा म्हणायचा.
असे बघा ! येथील गोसावीबुवा स्वतःला श्रीकृष्ण समजून अनेक स्त्रियांशी शरीरसंबंध ठेवतात.त्यामुळे त्यांना गरमी, परमा यांसारखे रोग होऊन खूप दुःख सहन करावे लागते. आता तुम्हच सांगा, स्वत:ला श्रीकृष्णाचा अवतार समजणारे गोसावी असे रोगपीडित होतात तर गोलोकाचा स्वामी श्रीकृष्ण या रोगांनी पीडीत का होणार नाही ? आणि जर त्याला हे रोग नसतील तर त्याचा अवतार असणाऱ्या गोसाव्यांना ते का होतात ?
(प्रश्न) मर्त्य लोकात लीलावतार धारण केल्याने रोण वगैरे दोष निर्माण होत असतात. परंतु गोलोकात रोग वगैरे दोषच नसल्यामुळे तेथे राहणाऱ्यांना ते होत नाहीत.
(उत्तर) ‘भोगे रोगभयम्' म्हणजे भोग असतो तेथे रोग असतो. बरे ! श्रीकृष्णाच्या त्या कोट्यावधी स्त्रियांना मुले होतात की नाही? जर ती होत असतील तर सगळी मुलेच होतात की मुली? की मुले व मुली दोन्ही होतात ? तुम्ही जर असे म्हणाल की, त्यांना सगळी मुलेच होतात. तर मग त्या मुलींची लग्ने कोणाशी होत असतील? कारण तेथे तर श्रीकृष्णाखेरीज दुसरा कोणी पुरुषच नसतो. जर दुसरा एखादा पुरुष तेथे असेल तर मग तुमचे मूळ विधान खोटे ठरते. तुम्ही जर असे म्हणाल की, त्या स्त्रियांना फक्त मुलेच होतात, तर त्यांच्याबाबतीतही तोच प्रश्न उपस्थित होणार की, त्यांची लग्ने कोणाशी होतात? ते आपआपसातच भानगडी करतात की काय? किंवा इतर कोणाची मुले अथवा मुली तेथे असतील तर गोलोकात एकट श्रीकृष्णच पुरुष
असतो हे तुमचे म्हणणे खोटे ठरते. आता तुम्ही जर असे म्हणाल की, त्या बायकांना मुलेच होत नाहीत तर मग श्रीकृष्ण नपुंसक असून तेथील स्त्रिया वांझ असतात असा ठपका त्यांच्यावर येईल. हा कसला गोलोक? हा तर दिल्लीच्या बादशहांचा जनानखानाच झाला की !
आता गोसावी लोक आपले शिष्य व शिष्यिणी यांचे जे तन-मन-धन स्वतःला अर्पण करवून घेतात तेही
योग्य नाही. कारण विवाहाच्यावेळी स्त्री आणि पुरूष आपापली शरीरे एकमेकांना अर्पण करतात. शिवाय मन हे इतर कोणाला स्वतंत्रपणे समर्पित करता येत नाही. कारण मनाबरोबरच शरीराचेही समर्पण करावे लागते. तसे न करता मन एकाला व शरीर दुसऱ्याला अर्पण केले तर तो व्यभिचार ठरतो. राहता राहिले धन. त्याचीही स्थिती अशीच आहे. जेव्हा मन एखाद्याला (पतीला किंवा पत्नीला) दिल्यानंतर तन किंवा धन दुसऱ्याला देता येत नाही.
या गोसाव्यांचा मुख्य हेतू असा असतो की, चेल्यांनी पैसा कमवावा आणि त्यावर आपण चैन करावी.
वल्लभ संप्रदायाचे गोसावी लोक मुळात तेलंगी ब्राह्मण होते. परंतु आता त्यांना वर्ण बहिष्कृत करण्यात आले
आहे. त्यांना चुकून कोणी आपली मुलगी दिली तर तोही भ्रष्ट समजला जातो. व त्याला जाति बहिष्कृत करण्यात येते. त्यांना असे जातितून बाहेर काढल्यामुळे ते विद्याहीन बनून अहोरात्र आळसात राहतात.
पाहा ! जेव्हा कोणी गृहस्थ या गोसावी गुरूला पादपूजेसाठी घरी बोलावतो. तेव्हा हा गुरू त्याच्या घरी जाऊन एखाद्या लाकडीपुतळ्यासारखा गप्प बसून राहतो. तोंडातून एक शब्दही काढीतही . मूर्ख नसेल तरच बोलेल ना? ‘मूर्खाणां बलं मौनम्' मौन हेच मूर्खांचे बळ असते. तो बोलला की, त्याचे बेंड फुटणार ! मात्र तो तिथल्या स्त्रियांकडे टक लावून पाहत असतो. अशा प्रकारे तो ज्या स्त्रीकडे विशेष रोखून पाहतो तिचे भाग्यच फळाले आले असे समजले जाते आणि तिचा नवरा, भाऊ, आई, बाप सगळेच अत्यंत खुष होतात. तेथील सर्व स्त्रिया गोसाव्याच्या पाया पडतात. त्यांच्यापैकी जिच्यावर गोसाव्याचे मन बसेल अथवा त्याची कृपा होईल तिचे बोट तो पायाने दाबतो. त्या कृत्याने ती स्त्री व तिचा नवरा वगैरे स्वतःला धन्य समजतात. आणि ते तिला असे सांगतात की, "तू गुरुमहाराजांची चरण सेवा करायला जा.!" ज्या घरातील पतीला व इतर लोकांना ही गोष्ट मान्य नसते तेथील स्त्रीला वश करून घेण्यासाठी हे गोसावडे कुंटिनी, मोलकरीण वगैरेंचा उपयोग करतात. खरे म्हणाल तर असली कामे करणारी अनेक माणसे गोसाव्यांच्या मंदिरात आणि त्यांच्या आसपास सदैव वावरत असतात.
अशाच प्रकारे हे लोक अनेक क्ल्प्त्या योजून दक्षिणा उपटतात.ते आपल्या भक्तांना सांगतात, "लाओ
भेंट गोसाईजी की ! त्याची पत्नी, मुलगा, मुलगी, मुख्य नोकर, पाईक, गवई व ठाकुरजी (श्रीकृष्ण) या सवसाठी भेटवस्तू द्या." या सात-आठ जणांच्या नावावर ते भरपूर धन लुटतात. जेव्हा एखाद्या गोसाव्याचा शिष्य मरायला टेकतो तेव्हा त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्याकडून तो भरपूर पैसे उकळतो आणि ते गिळंकृत करतो. औध्वदिहिक क्रियाकर्म करणाऱ्या मुडदेफरासाच्या कामासारखेच त्याचे हे काम नाही काय?
एखादा चेला आपल्या मुला-मुलीच्या लग्नाच्यावेळी गोसावीबुवांना बोलावून त्यांच्या हातून पाणिग्रहण करवितो. काही शिष्य आपल्या गुरूला आंघोळ घालून ते पाणी तीर्थ समजून त्याने आचमन करतात. त्यातील केशरी स्नान विशेष उल्लेखनीय आहे. घरातील स्त्रिया गोसाव्याच्या अंगाला केशराचे उटणे चोळतात. नंतर एका मोठ्या भांड्यात चौरंग ठेवून त्यावर गोसाव्याला बसवितात आणि पुरुष व स्त्रिया मिळून त्याला आंघोळ घालतात. मग गोसावी पीतांबर नेसून, खडाव घालून त्या भांड्यातून बाहेर येतात. आणि आपले भिजलेले धोतर त्या भांड्यात टाकतात. त्यानंतर सारे भक्त त्या पाण्याने आचमन करतात. मग उत्तम पानाचा मसाला विडा तयार करून गुरूला देतात. तो थोडासा खाऊन (चघळून) उरलेला विडा शिष्याने तोंडासमोर धरलेल्या चांदीच्या कटोऱ्यात थुंकून टाकतो. तो उष्टा विडाही सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जातो. याला खास प्रसाद असे म्हणतात. आता तुम्हीच विचार करा की, ही कसली माणसे ? मूढपणातून असाच अनाचार होत राहणार !
अनेक गोसावी आपल्या शिष्यांकडून नाना प्रकारच्या भेटी,नजराणे घेतात. त्याच्यापैकी कित्येकजण फक्त वैष्णवांच्या हातचेच खातात. इतरांच्या हातचे खात नाहीत. काही जण तर वैष्णवांच्या हातचेही खात माहीत. ते लोक लाकडे देखील धुऊन घेतात. परंतु पीठ, गूळ, साखरतूप वगैरे पदार्थ न धुता वापरावे लागल्याने त्यांच्या सोवळ्याला बट्टा लागतो. काय करणार बिचारे? हे पदार्थ धुऊन घ्यायचे ठरविले तर हातात धुपाटणे यायचे !
हे लोक असे सांगतात ही, आम्ही ठाकुरजांच्या विलासाखातर पुष्कळ पैसा खर्च करतो. परंतु ती सारी
चैनबाजी ते स्वतःच करतातआणि त्यातून बऱ्याच भानगडी निर्माण होतात. होळीच्या वेळी रंगीत पाण्याने पिचकाऱ्या भरभरून स्त्रियांच्या अस्पर्शनीय अवयवांवर म्हणजे गुप्त स्थानांवर नेम धरून मारतात. खाद्य पदार्थांची विक्री करणे ब्राह्मणांना निषिद्ध आहे. पण तो धंदाही हे लोक करतात.
(प्रश्न) गोसावजी रोटी, आमटी, कढी, भात, भाजी, मटकीची वडी आणि लाडू वगैरे मिठाई स्वत: बाजारात बसून विकत नाहीत. परंतु हे पदार्थ पत्रावळीत घालून ते आपल्या नोकर-चाकरांना देतात. मग ते लोक त्या पदार्थाची विक्री करतात. स्वत: गोसावीजी ते काम करीत नाहीत.
(उत्तर) गोसावी गुरुनी आपल्या नोकरांना दरमहा पगार दिला असता तर त्यांनी कामाच्या मोबदल्यात अन्न व मिठाई कशाला घेतली असती ? गोसावी बुवा आपल्या नोकरांना पगाराऐवजी भात, आमटी, मिठाई वगैरे देतात. हे पदार्थ ते बाजारात नेऊन विकतात. गोसावीबुवांना स्वत:च बाजारात जाऊन हे पदार्थ विकले असते तर त्यांच्या ब्राह्मण नोकरांना खाद्यपदार्थ विकण्याचे पाप तरी लागले नसते; आणि फक्त गोसावीच खाद्यपदार्थ विकण्याच्या पापाचे भागीदार झाले असते. गोसावी महाराज आधी स्वतः या पात बुडाले आणि मग त्यांनी इतरांनाही आपल्या बरोबर त्या पापात ओढून घेतले. नाथद्वारा वगैरे ठिकाणी स्वतः गोसावीही खाद्यपदार्थ विकतात, खाद्यपदार्थ विकणे निकृष्ट लोकांचे काम आहे. चांगले लोक ते करीत नाहीत. अशा या
नीच लोकांनीच आर्यावर्त्ताची अधोगती करून टाकली.
स्वामी नारायणमत-समीक्षा
(प्रश्न) स्वामीनारायण संप्रदाय कसा आहे
(उत्तर) ‘यादृशी शीतला देवी तादृशो बाहनः खरः' (म्हणजे 'जशी शीतळा देवी तसे तिचे वाहन गाढव') या म्हणीप्रमाणे गोसावी लोक जसे भक्तांना लुबाडतात तसेच स्वामीनारायण संप्रदायाचे लोकही करतात ! असे पाहा ! सहजानंद नावाचा एक इसम अयोध्येजवळच्या एका खेड्यात जन्मास आला होता. तो ब्रह्मचारी बनून गुजरात, काठेवाड, कच्छ, भुज वगैरे प्रदेशात फिरत होता. त्याने असे पाहिले की, या भागातील लोक मूर्ख व साधेभोळे आहेत. त्यांना आपल्या संप्रदायात प्रविष्ट करून घेणे फार सोपे आहे. म्हणून त्याने तेथे आपले दोन-चार शिष्य बनविले आणि त्यांच्यातर्फे अशी अफवा पसरविली की, सहजानंद हा नारायणाचा अवतार असून मोठा सिद्ध पुरुष आहे व तो चतुर्भुज मूर्तीच्या रूपात आपल्या भक्तांना साक्षात दर्शनही देतो.
काठेवाडात दादा खाचरनावाचा एक काठी कुळाचा जमीनदार होता. एकदा सहजानंदाच्या शिष्यांनी त्याला सांगितले की, "तुला चतुर्युज नारायणाचे दर्शन करायचे आहे काय? तुझी इच्छा असल्यास आम्ही सहजानंद स्वामींना तुला दर्शन घडविण्याची विनंती करू."खाचर म्हणाला, 'फार चांगली गोष्ट आहे. " तो एक साधाभोळा खेडूत होता. एका खोलीमध्ये सहजानंद डोकीवर मुकुट धारण करून आणि हातात शंख व
चक्र घेऊन उभा राहिला. दुसरा एक इसम त्यांच्यामागे हातात गदाव पद्म घेऊन उभा राहिला. त्याने आपले हात अशा प्रकारे सहजानंदाच्या शरीराला चिकटून बाहेर काढले की, ती एक चतुर्युज मूर्ती असल्याचा भास निर्माण झाला. सहजानंदाच्या चेल्यांनी दादा खाचराला सांगितले की, "आम्ही तुम्हाला तेथे घेऊन जातो. तुम्ही एकदा डोळे उघडून त्या चतुभुज मूर्तीचे दर्शन घ्या. नंतर लगेच डोळे मिटून इकडे परत या. फार वेळ पाहत राहाल तर भगवान नारायण कोप करतील." त्याने फार वेळापर्यंत ते दृश्य पाहिले तर आपली लबाडी त्याच्या लक्षात येईल असे त्यांना वाटल्यावरून त्यांनी ही सूचना केली होती. त्याप्रमाणे ते त्याला तेथे घेऊन गेले. त्या खोलीत सहजानंद कलाबुताने झगमगणारे रेशमी कपडे अंगात घालून उभा होता. अंधार कोठडीत उभा होता. त्याच्या शिष्यांनी कंदिलाचा उजेड त्याच्यावर पाडला. दादा खेचराला चतुर्भुज मूर्ती दिसली. शिष्यांनी झटकन कंदील बाजूला घेऊन खोलीत पूर्ववत अंधार केला. सर्वांनी त्या चतुर्मुज नारायणाला साष्टांग नमस्कार घातला, आणि ते त्याला घेऊन तेथून बाहेर पडले. त्यावेळी ते दादा खाचराला म्हणाले, "तुम्ही फारच भाग्यवान आहात. आता तुम्ही महाराजांचे चेले बनून दीक्षा घ्या. "तो म्हणाला, 'फार छान गोष्ट आहे." ते शिष्य त्याला घेऊन बाहेर येण्यापूर्वीच सहजानंद दुसरे कपडे घालून आपल्या गादीवर येऊन बसला होता. त्याच्याकडे बोट दाखवून शिष्य दादा खाचराला म्हणाले, "बघा ! एवढयात दुसरे रूप धारण करून महाराज येथे आपल्या आसनावर विराजमान झाले आहेत. तो दादा खाचर त्यांच्या या लबाडीने त्यांच्या जाळ्यात अडकला. तो मोठा जमीनदार असल्यामुळे या संप्रदायाची मुळे तेथे चांगली सुजली. तेथेच त्याने आपल्या स्वामीनारायण संप्रदायाचे मुख्यालय स्थापन केले. तेथून आसपासच्या प्रदेशात हिंडून तो लोकांना उपदेश करू लागला. त्याने अनेकांना साधूही बसविले. कधी-कधी एखाद्या साधूच्या गळ्याची शीर दाबून तो त्याला बेशुद्ध करी आणि लोकांना सांगे, "पाहा. मी याची समाधी लावली." अशा प्रकारच्या लबाड्यांमुळे काठेवाडातील भोळेभाबडे लोक त्याच्या जाळ्यात अडकत गेले. त्याच्या निधनानंतर त्याच्या चेल्यांनी खूप पाखंड पसरविला.
हा संप्रदाय कसा पसरला ते पुढील गोष्टीच्या दृष्टांतावरून लक्षात येईल. एक इसम चोरी करताना पकडला गेला. न्यायाधीशाने त्याचे नाक कापण्याची शिक्षा दिली. त्याप्रमाणे त्याचे नाक कापण्यात आले. त्याबरोबर तो लबाड चोर नाचू गाऊ व हसू लागला. लोकांनी त्याला विचारले, "तू का हसतो आहेस?" तो म्हणाला, "ती सांगण्यासारखी गोष्ट नाही." लोकांनी विचारले, "अशी कोणती गोष्ट आहे ?" त्याने सांगितले, अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. अशी गोष्ट मी कधी पाहिली नाही." लोकांनी पुनः विचारले, "कोणती गोष्ट? सांग ना ! तो म्हणाला, "माझ्यासमोर साक्षात चतुर्युज नारायण उभे आहेत. त्यांना पाहन मी अत्यंत आनंदित होऊन नाचत-गात आहे. मी किती भाग्यवान आहे की, प्रत्यक्ष नारायण मला दर्शन देत आहेत. लोकांनी विचारले, "आम्हाला नारायणाचे दर्शन का होत नाही?" तो म्हणाला, 'तुमचे नाक मध्ये येत आहे ते आडवे येणारे नाक तुम्ही कापून टाकले तर तुम्हालाही नारायण दिसतील नाहीतर ते दिसणार नाहीत त्यांच्यापैकी एका मुर्खाला वाटले की, नाक गेले तरी हरकत नाही. परंतु नारायणाचे दर्शन अवश्य झाले पाहिजे. म्हणून तो चोराला म्हणाला,"माझे नाक तू कापून टाक आणि मला नारायणाचे दर्शन घडव." त्याप्रमाणे त्या चोराने त्याचे नाक कापले आणि त्याच्या कानात हळूच सांगितले की, "तूही माझ्यासारखे कर.नाहीतर लोक तुझ आणि माझी टर उडवितील" त्या मुर्खाने विचार केला, आता नाक काही परत येणार नाही. तेव्हा तो चोर सांगतो तसेच करणे योग्य होईल. म्हणून तोही त्या चोराप्रमाणे नाचु, गाऊ, हसू लागला. आणि मला नारायण
दिसतोय असे सांगू लागला. असे होता-होता नाक कापून घेतलेल्या लोकांची संख्या एक हजारापर्यंत जाऊन
पोचली. तेथे मोठा गोंधळ माजला; आणि त्या लोकांनी आपल्या या संप्रदायाचे नाव 'नारायणदर्शी' (नारायणाला पाहणारे) असे ठेवले. एका राजाने ही बातमी ऐकली; आणि त्याने त्या लोकांना बोलावून घेतले. राजाजवळ जाताच ते लोक जोरजोरात नाचू, गाऊ, हसू लागले. तेव्हा राजाने विचारले, "हे सारे कशासाठी चालले आहे? लोकांनी सांगितले की, साक्षात नारायण आम्हांला दिसत आहे."
(राजा) आम्हांला तो का दिसत नाही
(नारायणदर्शी) जोपर्यंत तुमचे नाक जाग्यावर आहे तोपर्यंत नारायण दिसणार नाही. जेव्हा तुम्ही नक कापून घ्याल तेव्हा तुम्हाला साक्षात नारायण दिसेल.
राजाने मनाशी विचार केला की, हे ठीक आहे. आणि त्याने राजज्योतिषाला सांगितले, "जोशीबुवा, नाक कापून घेण्यासाठी उत्तम मुहूर्त कोणता ते सांगा." ज्योतिषी म्हणाला, "जो हुकूम अन्नदाता ! दशमीच्या
दिवशी सकाळी आठ वाजता नाक कापून घेण्यास आणि नारायणाचे दर्शन करण्यास उत्तम मुहूर्त आहे वाहवा! भटजीबुवा ! तुम्ही आपल्या पोथीत नाक कापून घेण्याचाही मुहूर्त लिहून ठेवला ना? जेव्हा राजाचा निर्णय पक्का झाला तेव्हा त्याने त्या नाक कापलेल्या हजार लोकांच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय करून दिली. त्यामुळे ते सगळे जण अत्यंत खुष होऊन नाचू, गाऊ, हसू लागले. ही गोष्ट राजाचा दिवाण आणि थोडीफार बुद्धी असणारे इतर लोक यांना आवडली नाही. त्या नगरात ९० वर्षांचा एक म्हातारा गृहस्थ होता. तो चार पिढ्यांपूर्वी राजाचा दिवाण होता. त्याचा पणतू सध्या दिवाण होता. त्याने घरी जाऊन पणजोबांना ही गोष्ट सांगितली. ती ऐकूण तो वृद्ध पुरुष म्हणाला, "ते लोक धूर्त दिसतात. तू मला राजाकडे घेऊन चल." त्याप्रमाणे दिवाण आपल्या पणजोबांना घेऊन राजाकडे गेला. तो बसल्यावर राजाने त्याला अत्यंत आनंदाने
त्या नाक कापलेल्या लोकांची हकीगत सांगितली. ती ऐकूण दिवाण म्हणाला, "महाराज ! अशी घाई करू नका. पारख केल्याखेरीज एखादी गोष्ट केल्यास पश्चातापाची पाळी येते."
(राजा) हे हजार लोक खोटे बोलत असतील काय?
(दिवाण) ते खोटे बोलत असतील किंवा खोरे बोलत असतील. त्यांची परीक्षा घेतल्याशिवाय खरे किंवा खोटे कसे ठरविता येईल?
(राजा) ही परीक्षा कशी घ्यावयाची?
(दिवाण) विद्या, सृष्टिक्रम, प्रत्यक्षादी प्रमाणे यांच्या साह्याने परीक्षा घेतली जाते
(राजा) अशिक्षित माणसाने परीक्षा कशी घ्यायची?
(दिवाण) विद्वानांच्या संगतीने आपल्या ज्ञानाची वृत्री करून.
(राजा) विद्वान मिळाला नाही तर काय करावे?
(दिवाण) पुरुषार्थ माणसाला कोणतीही गोष्ट दुर्लभ नसते.
(राजा) मग आता तुम्हीच सांगा की या बाबतीत आम्ही काय करावे ?
(दिवाण) मी म्हातारा माणूस दिवसरात्र घरातच बसून राहतो. मी फार थोड्या दिवसांचा सोबती आहे. म्हणून मी स्वतःच प्रथम नाक कापून घेऊन त्यातल्या सत्यासत्याची पारख करून घेतो. त्यानंतर तुम्हाला से
काही योग्य वाटेल तसे करा.
(राजा) फार छान. जोशीबुवा, दिवाणजींसाठी मुहूर्त बघा.
(ज्योतिषी) जशी महाराजांची आज्ञा। येत्या शुक्ल पंचमीला सकाळी १० वाजता उत्तम मुहूर्त आहे. त्याप्रमाणे पंचमीच्या दिवशी सकाळी ८ वाजता म्हातारा दिवाण राजाकडे जाऊन त्याला म्हणाला, “महाराज, हजार-दोन हजार सैनिक बरोबर घेऊन गेले पाहिजे.
(राजा) तेथे सैन्याची काय गरज?
(दिवाण) तुम्हाला राज्यकारभाराची माहित नाही. मी सांगतो तसे तुम्ही करा.
(राजा) सेनापती, जाऊन सैन्य तयार करा.
साडे नऊ वाजता राजा सर्व लोकांना बरोबर घेऊन मिरवणुकीने त्या नारायणदर्शी लोकांकडे गेला. त्याला पाहून ते लोक नाचू, गाऊ लागले. राजा तेथे बसला. त्याने त्या संप्रदायाच्या महंताला बोलावून घेतले. प्रथम ज्याचे नाक कापण्यात आले होते त्यानेच हा संप्रदाय स्थापन केला होता व तो त्याचा महंत बनला होता. राजा त्याला म्हणाला, "आज आमच्या दिवाणजला नारायणाचे दर्शन घडवा." महंत म्हणाला, "ठीक आहे" दहा वाजण्याची वेळ होताच एक माणूस एक थाळी घेऊन आला. त्याने ती थाळी दिवाणाच्या नकाखाली धरली. मग महंताने धारदार चाकूने दिवाणाचे नाक कापून त्या थाळीत टाकलेदिवाणाच्या नाकाला रक्ताची धार लागली. दिवाणाचा चेहरा मलूल झाला. त्या लबाड महंताने दिवाणाच्या कानात हळूच सांगितले की, दिवाणी, तुम्हीही हसून सर्वांना सांगा की, "मला नारायण दिसतो आहे. आता तुमचे कापलेले नाक काही परत येणार नाही. तुम्ही तसे म्हटले नाही तर लोक तुमची टर उडवतील. सर्व लोक तुमची टिंगल
करतील" एवढे बोलून तो दूर गेला. दिवाणाने आपला हात रुमाल आपल्या कापलेल्या नाकावर दाबून धरला. तेव्हा राजाने त्याला विचारले, "काय दिवाणी? तुम्हाला नारायण दिसतोय की नाही?" दिवाणाने राजाच्या कानात सांगितले, "मला तसले काहीही दिसत नाही. या लबाड इसमाने निष्कारण या हजार माणसांना विद्रुप करून टाकले आहे." यावर राजाने विचारले, "मग आता काय करायचे ?" दिवाणाने सांगितले, "यांना पकडून चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा दिली पाहिजे. त्यांना मरेपर्यंत तुरुंगात ठेवले पाहिजे. आणि ज्याने या सर्वांना बिघडविले आहे त्या बदमाषाची गाढवावरून धिंड काढून आणि हालहाल करून त्याला ठार मारले पाहिजे."इकडे राजा व दिवाण कानगोष्टी करीत असलेले पाहून ते सगळे घाबरले आणि पळून जाण्याची तयारी करू लागले. परंतु त्यांच्याभोवती सैन्याचा घेरा होता. त्यामुळे त्यांना पळून जाता आले नाही. मग राजाने आज्ञा केली की, "या सगळ्यांना पकडून बेड्या घाला आणि तुरुंगात टाका. या बदमाष महंताच्या तोंडाला काळोखी फासून त्याला गाढवावर बसवा. त्याच्या गळ्यात फाटक्या जोड्यांच्या माळा घाला आणि गावातून त्याची धिंड काढा, गावच्या पोरांना त्याच्या अंगावर धूळ आणि राख टाकायला सांगा, प्रत्येक चौकात त्याला जोड्यांनी मारा, त्याच्या अंगावर कुणी सोडून त्याला फाडून खायला लावा अशा प्रकारे त्याला मारून टाका. असे झाले नाही तर पुनः असले कृत्य करण्यास इतर लोक भिणार नाहीत." राजाच्या हुकुमाची अंमलबजावणी झाली आणि अशा प्रकारे नाक कापलेल्या लोकांचा तो संप्रदाय अखेर बंद झाला.
याचप्रमाणे सगळे वेदविरोधी लोक दुऱ्यांचे द्रव्य लुबाडण्यात मोठे पटाईत असतात. ही सगळी संप्रदायाची लीला आहे. हे स्वामीनारायण संप्रदायाचे लोकही इतरांचे धन लुबाडण्यासाठी लांड्यालबाड्या करतात. त्यांच्यापैकी अनेक जण मुर्खांना फसविण्यासाठी मरताना असे सांगतात की, "शुभ्र घोड्यावर बसून मला मोक्षाला नेण्यासाठी सहजानंद आले आहेत. ते दररोज दिवसातून एकदा या मंदिरात येत असतात.
जेव्हा या लोकांची जत्रा भरते तेव्हा पुजारी देवळात बसतात आणि बाहेरच्या बाजूस एक दुकान थाटलेले असते. देवळातून दुकानात माल पाठविण्यासाठी गुप्त छिद्र असते. भक्ताने देवाला नारळ वाहिला की तो त्या भोसक्यातून सरळ दुकानात जाऊन पडतो. अशा प्रकारे एक गारळ दिवसातून हजारो वेळा विकला जातो. इतर वस्तूंच्या बाबतीत अशीच लबाडी चालू असते.
ज्या जातीचा साधू असेल त्याच जातीचे काम त्याच्याकडून करवून घेतले जाते. उदाहरणार्थ तो न्हावी
असल्यास न्हाव्याचे, कुंभार असल्यास कुंभाराचे, कारागीर असल्यास कारागिराचे, व्यापारी असल्यास व्यापाराचे आणि शूद्र असल्यास शूद्राचे काम त्याच्याकडून करवून घेतले जाते.
या लोकांनी आपल्या चेल्यांवर एक प्रकारचा कर बसविला असून त्यापासून त्यांनी आजपर्यंत लाखो-
करोडो रुपये फसवणुकीने गोळा केले आहेत आणि आजही करीत आहेत. जो कोणी गादीवर बसतो तो लग्न करून गृहस्थाश्रमी बनतो. अंगावर दागदागिने घालतो. जेव्हा एखाद्या शिष्याच्या घरी पाद्यपूजेसाठी तो जातो तेव्हा गोकुलिया (गोसावी) गुरूप्रमाणे हा स्वामीनारायण संप्रदायाचा स्वामीही स्वत:बरोबरच आपली बायको, मुले, सुना यांच्यासाठीही भेटी गोळा करतो. हे लोक स्वतला 'सत्संगी' म्हणवितात आणि इतरांना 'कुसंग म्हणतात. आपल्या खेरीज दुसरा कोणी कितीही उत्तम, धार्मिक, विद्वान असला तरी ते त्याला मान देत नाहीत अथवा त्याची सेवा करीत नाहीत. कारण इतर पंथांच्या लोकांची सेवा करणे हे पाप आहे असे ते समजतात. समाजात वावरताना या पंथाचे साधू स्त्रियांचे तोंड देखील पाहत नाहीत. परंतु लपूनछपून ते काय काय करतात याची माहिती लोकांना फारशी नसते. अधून-मधून या साधूच्या व्यभिचाराच्या परस्त्रीगमनाच्या गोष्टी कामांवर येत असतात. त्यांच्यापैकी जे मोठे असतात ते मेल्यानंतर त्यांना गुप्त विहिरीत फेकून देतात आणि असे जाहीर करतात की, "अमुक महाराज सदेह वैकुंठाला गेले. सहजानंदजी स्वतः येऊन त्यांना घेऊन गेले. आम्ही त्यांची खूप विनवणी केली की, "स्वामीजी, आमच्या महाराजांना तुम्ही नेऊ नका. कारण ते महात्मा आहेत. ते येथे राहण्यात लोकांचे कल्याण आहे. परंतु सहजानंदांनी सांगितले की, "नाही! आता यांची वैकुंठात फार आवश्यकता आहे म्हणून आम्ही त्यांना घेऊन जात आहोत." आम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी सहजानंदजींना त्यांच्या विमानासह पाहिले आणि आमच्या मरणोन्मुख गुरूंना त्या विमानात बसवून दिले. ते त्यांना विमानातून वर घेऊन गेले आणि आता-जाता पुष्पवृष्टी करीत गेले."
जेव्हा एखादा साधू आजारी पडतो आणि तो जगण्याची आशा नसते तेव्हा सांगतो की, "मी उद्या रात्री वैकुंठाला जाणार आहे." असे म्हणतात की ठरलेल्या रात्री तो साधू न मरता नुसताच बेशुद्ध झाला तर त्याचे
चेले त्याला विहिरीत फेकून देतात. कारण त्या रात्री त्याला फेकून दिले नाही तर त्याचे भविष्य खोटे ठरते. म्हणून ते असले कृत्य करीत असावेत. याचप्रमाणे जेव्हा गोकुलिया गोसावी मरतो तेव्हा त्याचे चेले असे सांगतात की, "गुसाईंजी लीला विस्तार करून गेले.
गोसावी व स्वामीनारायणवाले या दोघांचा उपदेश करण्याचा मंत्र एकच आहे. श्रीकृष्णः शरणं मम" याचा अर्थ मी श्रीकृष्णाला शरण जातो, असा आहे. परंतु त्याचा अर्थ श्रीकृष्णाने मला शरण यावे किंवा श्रीकृष्ण मला शरण येतो असाही होऊ शकतो. हे सारे पंथ व संप्रदाय विद्याविहीन, निर्बुद्ध लोकांनी स्थापन
केले असल्यामुळे ते वाटेल तशी शास्त्राविरुद्ध वाक्यरचना करतात. कारण त्यांना विद्याच्या नियमांची माहिती नसेल.
माध्वमत-समीक्षा
(प्रश्न) माध्व संप्रदाय तर चांगला आहे ना?
(उत्तर) जसे इतर संप्रदाय आहेत तसाच हा माध्व संप्रदायही आहे. कारण त्या पंथाचे अनुयायीही चक्रांकित (चिह्नित) म्हणजे टिळे, माळा करणारे असतात. त्यांच्यामध्ये एवढाच फरक आहे की, रामानुज पंथाचे लोक आयुष्यात एकदाच चक्रांकित होतात म्हणजे कपाळावर वगैरे छाप मारून घेतात. तर माध्व लोक वर्षातून एकदा असे वारंवार चक्रांकित होत असतात. रामानुजीय चक्रांकित कपाळावर पिवळी रेघ ओढतात तर माध्व काळी रेघ ओढतात. एका माध्व पंडिताशी एका महात्म्याचा खालील प्रमाणे शास्त्रार्थ झाला होता:-
(महात्मा) तुम्ही ही काळी रेघ आणि टिळा कपाळाबर का लावला आहे?
(शास्त्री) हा टिळा लावल्यामुळे आम्हीं वैकुंठाला जाऊ, आणि श्रीकृष्णाचे शरीरही सावळ्या रंगाचे होते म्हणून आम्ही ही काळ रेघ कपाळावर ओढतो.
(महात्मा) काळ रेखा आणि टिळा लावल्याने जर तुम्ही वैकुंठाला जात असाल तर सारा चेहरा काळा करून घेतल्यास तुम्ही कोठे जाल ? वैकुंठाच्याही पलीकडे जाऊन पोहचाल काय? शिवाय श्रीकृष्णाचे सारे
शरीर काळे होते म्हणून तुम्ही आपले सारे शरीर काळे करून घेतल्यास तुम्ही श्रीकृष्णासारखे व्हाल.
सारांश, हे माध्वमतही इतर मतांसारखेच त्याज्य आहे.
(प्रश्न) लिंगाकितांचा पंथ कसा आहे?
(उत्तर) जसा चक्रांकितांचा तसाच हा लिंगांकितांचा (लिंगायतांचा) संप्रदायः आहे. ज्याप्रमाणे रामानुजीय व माध्वमतवाले चक्रमुद्रांनी स्वत:ला डागून घेतात त्याप्रमाणे हे लिंगायत लोक लिंगाकृती मुद्रांनी स्वत:ला डागून घेतात. ते महादेवा खेरीज इतर कोणाची भक्ती करीत नाहीत. या लोकांचे वैशिष्ट्य असे की, ते पाषाणाचे एक शिवलिंग सोन्यात अथवा चांदीत मढवून गळ्यात लटकावतात. साधे पाणी प्यायचे असले तरी
ते त्या लिंगाला दाखवून पितात. त्यांचा मंत्रही शैवाच्या मंत्रासारखाच असतो.
ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज यांची समीक्षा
(प्रश्न) ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज हे तरी चांगले आहेत की नाहीत ?
(उत्तर) त्यांच्या काही गोष्टी चांगल्या व पुष्कळशा वाईट आहेत.
(प्रश्न) ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज हे सर्वात चांगले आहेत. कारण त्यांचे नियम फार चांगले आहेत.
(उत्तर) त्यांचे नियम सर्वांशाने चांगले नाहीत. कारण वेदविद्याविहीन लोकांची कल्पना पूर्णपणे सत्य कशी असू शकेल ? ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज यांच्यामुळे ख्रिस्ती पंथात जाणारी काही माणसे बाटली नाहीत, आणि त्यांनी मूर्तिपूजेचे प्रस्थ थोडेफार कमी केले. इतर ग्रंथांच्या भ्रमजाळातून काही थोड्या लोकांना त्यांनी वाचविले. यांसारख्या त्यांच्या काही गोष्टी चांगल्या आहेत. परंतु,
(१) या लोकांमध्ये स्वदेशभक्ती फार कमी आहे. त्यांनी ख्रिस्ती लोकांचे पुष्कळसे आचार विचार आत्मसात केले आहेत. खाणे-पिणे आणि विवाह इत्यादिकांच नियमही त्यांनी बदलले आहेत.
(२) आपल्या देशाची प्रशंसा करणे व पूर्वजांचा मोठेपणा सांगणे या गोष्टी तर दूरच राहिल्या. उलट ते त्यांची यथेच्छ निंदा करतात. आपल्या व्याख्यानांमध्ये हे लोक ख्रिस्ती, इंग्रज वगैरे लोकांची तोंड भरून स्तुती करतात. ब्रह्मादी महर्षिचे ते नावदेखील घेत नाहीत. उलटते असे सांगत असतात की, "जगामध्ये इंग्रजांसारखे विद्वान इतरत्र कोठेही झाले नाहीत व आर्यावर्त्तातील लोक अनादी काळापासून अडाणीच राहिले आहेत; त्यांची उन्नती कधीच झाली नाही.
(३) वेदव शास्त्रे यांचा सन्मान करणे दूरच राहिले उलट त्यांची भरपूर निंदा ते करतात. ब्राह्मसमाजाच्या उद्दिष्टांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेत साधुसंतांची नावे दिली आहेत त्यांत येशू. मोझेस, मुहम्मद, नानक व चैतन्य यांचाच उल्लेख आहे. त्यात कोणत्याही ऋषीचे अथवा महर्षीचे नाव नाही. यावरून ज्यांची नावे त्यांनी
उद्धृत केली आहेत त्यांच्या मतांसारखीच या लोकांची मते असणारहे उघड आहे. आता तुम्हीच विचार करा. हे लोकदेशात जन्मले आहेत. याच देशाचे अन्न खातात व पाणी पितात. त्याच अन्न-पाण्यावर ते लहानचे मोठे झाले. अशा स्थितीत आपले आईबाप व पूर्वज यांचा मार्ग सोडून परकीयांच्या मताकडे झुकणे, ब्राह्मसमाजी व प्रार्थनासमाजी लोकांनी एतद्देशीय संस्कृत विद्यान शिकता स्वतःला विद्वान समजणे, इंग्रजी शिकून पांडित्याच्या अहंकाराने झटपट एक नवा पंथ सुरू करण्यास प्रवृत्त होणे, या सगळ्या गोष्टी मानवजातीला स्थिर व उन्नत बनविण्यास कशा साह्यभूत होतील?
(४) इंग्रज, यवन, अंत्यज यांच्याबरोबर कसलाही भेदभाव न बाळगता हे लोक खाणेपिणे करतात. त्यांची अशी समजूत झालेली दिसते की, खाण्यापिण्यातील बंधने व जातिभेद मोडल्याने आपली व आपल्या देशाची सुधारणा होईल. परंतु असल्या गोष्टींनी सुधारणा होण्याऐवजी उलट बिघाडच होत असतो.
(५) (प्रश्न) जातिभेद ईश्वरकृत आहे की मनुष्यकृत?
(उत्तर) तो ईश्वरकृत आहे, मनुष्यकृत नाही.
(प्रश्न) कोणते जातिभेद ईश्वरकृत आहेत?
(उत्तर) मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष, जलचर इत्यादी जाती ईश्वराने निर्मिलेल्या आहेत. पशूंमध्ये गाई, घोड़े, हत्ती वगैरे जाती आहेत. वृक्षांमध्ये पिंपळ, वड, आंबा वगैरे जाती आहेत. पक्षांमध्ये हंस, कावळा, बगळा वगैरे जाती आहेत. जलचरांमध्ये मासे, मगरी वगैरे जातिभेद आहेत. माणसांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अंत्यज
हे जातिभेद ईश्वरकृत नाहीत. वर्णाश्रमव्यवस्थेच्या संदर्भात आम्ही यापूर्वी सांगितल्याप्रमाणे गुण-कर्म- स्वभावानुसार वर्णव्यवस्था मानणे आवश्यक आहे. ती जन्मानुसार समजणे चूक आहे. म्हणून ती मनुष्यकृत आहे. असे म्हणावे लागते. माणसाच्या गुणकर्मस्वभावानुसार त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आदीवर्णांची परीक्षा घेऊन त्या-त्या वर्गात टाकणे हे राजाचे व विद्वानांचे काम आहे. भोजनभेदमात्र ईश्वरकृत व मनुष्यकृत आहेत. सिंह, वाघ हे मांसाहारी प्राणी आहेत तर गाय, म्हैस, जंगली रेडा, हत्ती हे प्राणी गवत व झाडपाला खाणारे शाकाहारी प्राणी आहेत. हा भोजनभेद ईश्वरकृत आहे. तर देशकाल वस्तुस्थिती प्रमाणे केला जाणारा
भोजनभेद हा मनुष्यकृत आहे.
(प्रश्न) असे पाहा ! युरोपीय लोक बूट, कोट, पाटलोण घालतात आणि हॉटेलात सर्वांबरोबर खातात, म्हणूनच त्यांची सारखी प्रगती होत असते.
(उत्तर) हे तुमचे म्हणणे चूक आहे. कारण मुसलमान व अंत्यज सर्वांच्या हातचे खातात. तरीही त्यांची उन्नती का होत नाही ? युरोपीय लोकांमध्ये बालविवाह होत नाहीत. मुले व मुली शिक्षण घेऊन सुशिक्षित बनतात. त्यांच्यात स्वयंवराची प्रथा आहे. भोंदू लोकांच्या उपदेशाकडे ते लक्ष देत नाहीत. ते चांगले सुशिक्षित असल्यामुळे कुणाच्याही पाखंडाच्या जाळ्यात अडकत नाहीत. ते जे काही करतात ते आपसात विचार विनिमय करून, सभेमध्ये निर्णय घेऊन करतात. आपल्या देशाच्या व वंशाच्या उन्नतीसाठी ते तनमनधन अर्पण करतात. आळस झटकून उद्योग करतात.
पाहा ! ना ते लोक आपल्या देशात बनविलेल्या बुटांना कार्यालयात व न्यायालयात जाऊ देतात परंतु इथल्या देशी पादत्राणांना तेथे प्रवेश करू देत नाहीत. यावरूनच लक्षात घ्या की, ते लोक आपल्या देशात तयार झालेल्या पादत्राणांचीही केवढी प्रतिष्ठा ठेवतात. तेवढी प्रतिष्ठा ते इतर देशातल्या माणसांचीही ठेवीत नाहीत. तुम्हीच विचार करा. या देशात युरोपीय लोक आल्याला शंभर वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तरी देखील ते आपल्या देशात जसे जाड कपडे वापरीत असत तसेच येथेही वापरतात. आपले स्वदेशी रीतिरिवाज त्यांनी मुळीच सोडलेले नाहीत. परंतु तुमच्यापैकी अनेक लोकांनी त्यांचे अनुकरण केले. यावरूनच तुम्ही निर्बुद्ध व ते बुद्धिमान ठरतात. अनुकरण करणे हे शहाण्याचे काम नव्हे. या युरोपीय लोकांना जे काम सोपविले जाते ते यथोचितपणे ते पार पाडतात. ते अत्यंत आज्ञाधारक असतात. आपल्या स्वत:च्या देशबांधवांना व्यापार वगैरेमध्ये ते मदत करतात. इत्यादी गुणांमुळे आणि सत्कृत्ये केल्यामुळे त्यांची उन्नती होत असते. बूट, कोट, पाटलोण, हॉटेलात खाणे-पिणे इत्यादी सामान्य व वाईट गोष्टी केल्यामुळे त्यांची ही प्रगती झालेली नाही. शिवाय त्यांच्यात जातिभेदही आहे. जेव्हा एखादा युरोपियन, तो कितीही मोठ्या हुद्यावर आणि प्रतिष्ठित असला तरी, दुसया देशातल्या अथवा संप्रदायातल्या मुलीशी लग्न करतो अथवा एखादी युरोपीय मुलगी इतर देशातल्या तरुणाशी लग्न करते तेव्हा ताबडतोब त्यांच्याशी असलेले संबंध त्यांचे जातबांधव तोडून टाकतात. त्यांना सार्वजनिक कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाही. त्यांच्याबरोबर एका टेबलावर बसून इतर लोक जेवण करीत नाहीत. आणि त्यांच्या मुलाबाळांशी रोटी-बेटी व्यवहार करीत नाहीत. हा जातिभेद नव्हे तर काय? असे हे युरोपीय लोक तुमच्या सारख्या साध्याभोळ्या लोकांना असे खोटेच सांगतात की, आमच्यात जातिभेद नाही. तुम्ही सर्व मूर्ख असल्यामुळे त्यांचे म्हणणे खरे मानता. म्हणून आमचे तुम्हाला असे सांगणे आहे की, जे काही करायचे असेल ते नीट विचार करून करावे.म्हणजे पुन: पश्चाताप करण्याची पाळी येत नाही.
असे पाहा । वैद्य व औषध यांची आवश्यकता रोगी माणसाला असते. निरोगी माणसाला ती नसते. विद्यावान हा निरोगी आणि अविद्यावान हा रोगट असतो. त्या रोगापासून त्याची सुटका सत्य विद्या आणि सत्य उपदेश हे करतात. अविधेमुळे त्यांना असा रोग जडला आहे की, खाण्यापिण्यामध्येच धर्म साठविलेला असून त्याचे नियमन पाळल्यास तो जातो असे ते समजतात. जेव्हा कोणी खाण्यापिण्याच्या बाबतीत दृढ नियमांचे पालन करीत नाही असे त्यांना दिसते तेव्हा तो धर्मभ्रष्ट झाला आहे असे ते समजतात व इतरांना तसे सांगत सुटतात. अशा लोकांचे बोलणे आपण ऐकू नये, त्यांच्याजवळ बसू नये व त्यांना आपल्याजवळ बसू देऊ नये.
आता असे सांगा की, तुमची विद्या स्वार्थासाठी आहे की, परमार्थासाठी? जेव्हा तुमच्या विद्येमुळे अज्ञजनांचा फायदा होतो तेव्हा तुमची विद्या परमार्थासाठी आहे. असे म्हणता येते. तुम्ही म्हणाल की, "आम्ही त्यांना ज्ञान देऊ इच्छितो पण ते घेतच नाही. तमग आम्ही काय करावे?" तर यात तुमचाच दोष आहे. त्यांचा नाही. कारण तुम्ही स्वतःचे आचरण उत्तम ठेवले असते तर तुमच्यावर प्रेम करून ते उपकृत झाले असते. याचा अर्थ असा की, तुम्ही हजारो लोकांच्या कल्याणाची पर्वा न करता आपलेच हित पाहिले. हा तुमचा मोठा अपराध आहे. कारण परोपकार करणे हा धर्म असून पहानी करणे हा अधर्म आहे. म्हणून विद्वानांनी यथायोग्य आचरण ठेवून अज्ञानी लोकांसाठी दुःखरूपी सागर तरून जाण्याची नौका बनले पाहिजे. त्यांनी मुर्खासारखे वर्तन करू नये; ज्यायोगे अज्ञजनांची व आपली स्वत:ची दिवसेंदिवस उन्नती होत जाईल असे कर्म करणे उचित आहे.
(प्रश्न) कोणताही ग्रंथ ईश्वरप्रणीत अथवा सर्वाशाने सत्य असतो असे आम्ही मानत नाही. कारण माणसाची बुद्धी निर्भ्रांत (निर्दोष) असत नाही. म्हणून त्याने रचलेले सगळे ग्रंथ भ्रांतीपूर्ण (सदोष) असतात. म्हणून आम्ही सर्व ग्रंथांतून सत्य ग्रहण करतो आणि असत्य सोडून देता. सत्य हे वेद, बायबल, कुराण यांमध्ये अथवा इतर कोणत्याही ग्रंथात असले तरी ते आम्हाला ग्राह्य आहे आणि असत्य हे कोणत्याही ग्रंथातले असले तरी ते त्याज्य आहे.
(उत्तर) ज्या तत्त्वांच्या आधारे तुम्ही सत्यग्राही होऊ इच्छिता त्याच तत्त्वाच्या आधारे तुम्ही असत्यग्राही ठरता. कारण जर सगळीच माणसे निर्भ्रांत होऊ शकत नसतील तर तुम्हीही माणूसच असल्यामुळे भ्रांतिपूर्ण आहात. भ्रांतिपूर्ण माणसाची वचने सर्वांशाने प्रमाणित किंवा शास्त्रशुद्ध असू शकत नाहीत. त्यामुळे तुमचे म्हणणेही विश्वसनीय असणार नाही. म्हणून तुमच्या बोलण्यावरही संपूर्ण विश्वास ठेवता येत नाही. असे असल्यामुळे तुमची मते विषयुक्त अन्नासारखी त्याज्य आहेत. म्हणून तुमची व्याख्याने व पुस्तके कोणीही प्रमाणभूत मानता कामा नये. चौबेजी (चतुर्वेदी) छब्बेजी(षड्वेदी) बनायला निघाले आणि जवळचे दोन वेद घालवून दुबेजी(द्विवेदी) बनले. (म्हणजे 'इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः' अशी तुमची स्थिती झाली आहे) इतर माणसे सर्वज्ञ नाहीत त्याप्रमाणे तुम्हीही सर्वज्ञ नाही. कदाचित भ्रमाच्या आहारी जाऊन तुम्ही असत्य ग्रहण करून सत्य सोडून देत असाल. म्हणून सर्वज्ञ परमात्म्याची वचनेचआपण अल्पज्ञांनी आधारभूत मानली पाहिजेत.
वेदांविषयी विवेचन करताना आम्ही (सातव्या अध्यायात) जे काही सांगितले आहे ते तुम्ही अवश्य मानले पाहिजे. नाही तर 'यतो भ्रष्टस्ततो भ्रष्ट' अशी तुमची स्थिती होऊन जाईल. सारे सत्य वेदांतून मिळते. त्यांत काहीही असत्य नाही. म्हणून त्यांचे ग्रहण करण्याच्या बाबतीत शंका बाळगणे म्हणजे स्वतःचे व इतरांचे नुकसान करून घेणे होय. याच गोष्टीमुळे आर्यावर्त्तातील लोक तुम्हांला आपले समजत नाहीत आणि तुम्ही आर्यावर्त्तांच्या उन्नतीला कारणीभूत होऊ शकत नाही. कारण तुम्ही खिश्चन, मुसलमान वगैरे परपंथियांच्या दारात जाऊन तत्वांची भक मागता. या मार्गाने आपण आपले व इतरांचे कल्याण करू असे तुम्हाला वाटते. पण ते शक्य नाही. एका मातापित्याने जगातल्या सगळ्या मुलांचे पालन पोषण करण्याचा आव आणण्यासारखे हे आहे. सर्व मुलांचे पालनपोषण करणे त्यांना अशक्य असते. परंतु त्या प्रयत्नात ते स्वत:च्या मुलांचा नाश करून टाकतात. तुम्हा लोकांचे वर्तन हे असे आहे. वेदादी सत्य शास्त्रांना मान्यता दिल्याखेरीज तुम्ही आपल्या वचनांची सत्यता व असत्यता यांची पारख करू शकणार नाही आणि आर्यावर्त्ताची उन्नतीही कधी करू शकणार नाही.
या देशाला रोग झालेला आहे, त्याचे औषध तुमच्याजवळ नाही. युरोपीय लोक तुमची पर्वा करीत नाहीत; आणि आर्यावर्त्तातील लोक तुम्हाला परमतानुयायी समजतात. आजवर जे झाले ते झाले. आता तरी तुम्ही आपली चूक ओळखून वेद व इतर सत्य शास्त्रे यांच्या साह्याने देशोन्नतीच्या कामात सहभागी व्हा. त्यातच सर्वांचे कल्याण आहे. तुम्ही असे म्हणता की, सारे सत्य परमेश्वराद्वारे प्रकट होते. तर मग ऋषींच्या आत्म्यांमध्ये परमेश्वराच्या प्रेरणेने प्रकट झालेले सत्याचे ज्ञान देण्याच्या वेदांना तुम्ही का प्रमाणभूत मानीत नाही ? हां ! तुम्ही वेदांचे अध्ययन केलेले नाही आणि ते करू इच्छित नाही, हेच त्याचे कारण आहे. अशा स्थितीत तुम्हाला वेदांचे ज्ञान कसे प्राप्त होणार?
(६) खिश्चन, मुसलमान वगैरे लोकांप्रमाणे तुम्हीही असे मानता कीहे जग उपादान कारणाशिवाय उत्पन्न झाले आहे आणि जीवाचीही उत्पत्ती कण्यात आली आहे. कारणाशिवाय कार्य होणे हे सर्वथैव अशक्य असते. आणि उत्पन्न झालेल्या वस्तूंचा नाश अटळ असतो. या ग्रंथाच्या सातव्या व आठव्या प्रकरणात सृष्टीची उत्पत्ती आणि जीव व ईश्वर यांच्या संबंधी आम्ही विवेचन केलेले आहे.
(७) पश्चाताप व ईश्वराची प्रार्थना यांच्या योगाने पापे नाहीशी होतात, असे जे तुम्ही मानता तीही तुमची चूक आहेया समजुतीमुळेच जगात खूप पापे वाढली आहेत. पौराणिक लोक तीर्थयात्रेने, जैन लोक नमोकार मंत्राचा जप व तीर्थयात्रा यांच्या योगाने ख्रिस्ती लोक येशूवर श्रद्धा ठेवल्याने व मुसलमान लोक 'तोबा' (पश्चाताप) केल्याने पापाची फळे भोगावी न लागता पाप नष्ट होतात असे मानतात. या समजुतीमुळे पापाची भीती नाहीशी होऊन उलट पापे करण्याची वृत्ती खूप वाढली आहे. या बाबतीत ब्राह्म व प्रार्थनासमाजी लोकही पौराणिकांसारखेच आहेत. तुम्ही वेदांचे वाचन वा श्रवण केले असते तर पापपुण्याची फळे भोगल्याशिवाय त्यांचा नाश होत नाही हे तुमच्या लक्षात आले असते आणि तुम्हाला पाप करण्याची भीती वाटली असती व सदैव धर्मांच्या मार्गावरून तुम्ही चालत राहिला असता. पाप किंवा पुण्य भोगल्याशिवाय त्याची निवृत्ती होते असे मानले तर परमेश्वर अन्याय करणारा ठरतो.
जीवाच्या उन्नतीला काही अंत नाही असे तुम्ही मानता. पण ती गोष्ट अशक्य आहे. जीव मर्यादायुक्त (ससीम) असून त्याच्या गुणकर्मस्वभावाचे फळही मर्यादायुक्त असणे अनिवार्य आहे.
(प्रश्न) परमेश्वर दयालू आहे. तो परिमित कर्मांचे फळ अपरिमित (अनंत) देईल.
(उत्तर) परमेश्वर तसे करील तर त्याचा न्याय नष्ट होईलआणि सत्कृत्ये करण्याची धडपडही कोणी करणार नाही. कारण थोड्याशा सत्कर्माचे अनंत फळ परमेश्वर देईल आणि पश्चाताप व प्रार्थना यांच्या योगाने कितीही पापे असली तरीही ती नष्ट होतील अशी समजूत पसरल्यास धर्माची हानी व पापकर्मांची वृद्धी होते.
(प्रश्न) आम्ही असे मानतो की स्वाभाविक (सहजप्रवृत्त) ज्ञान हे वेदांच्या ज्ञानाहन श्रेष्ठ असते. नैमित्तिक ज्ञानाला काही महत्त्व नसते. कारण परमेश्वराने दिलेले स्वाभाविक ज्ञान आमच्यामध्ये नसते तर आम्ही वेदांचे
अध्ययन व अध्यापन कसे केले असते ? म्हणून आमचे मत फार चांगले आहे.
(उत्तर) हे तुमचे म्हणणे निरर्थक आहे. कारण जे ज्ञान कोणीतरी दिलेले असते ते स्वाभाविक नसते. जे जोन सहजप्रवृत्त असते ते स्वाभाविक किंवा नैसर्गिक असते. ते वाढतही नाही अथवा कमीही होत नाही. त्याच्या साह्याने कोणीही उन्नती करू शकत नाही. कारण जंगली माणसांमध्ये स्वाभाविक ज्ञान असते. तरीही ते आपली उन्नती करू शकत नाहीत. जे नैमित्तिक ज्ञान असते त्याच्यामुळेच उन्नती होतेअसे पाहा. तुम्ही-आम्ही जेव्हा बाल्यावस्थेत होतो तेव्हा कर्तव्याकर्तव्य व धर्माधर्म यासंबंधी आपल्याला काहीच नीट कळत नव्हते, जेव्हा आपण विद्वानांकडून ज्ञान ग्रहण केले तेव्हाच आपल्याला कर्तव्याकर्तव्ये व धर्माधर्म कळू लागले म्हणून स्वाभाविक ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असे समजणे बरोबर नाही.
(१) तुम्ही मंडळी पूर्वजन्म व पुनर्जन्म मानीत नाही. ही गोष्ट तुम्ही ख्रिस्ती व मुसलमान लोकांकडून घेतली असावी. पुनर्जन्माविषयीचे विवेचन यापूर्वी येऊन गेले आहे, ते पाहावे. तरी पण एवढे समजून घ्या की जीव हा शाश्वत व नित्य आहे आणि त्याची कर्मेंही प्रवाहरूपाने नित्य आहेत. कर्म आणि कर्मवान (कर्ता) यांचा नित्य संबंध असतो. जीव कोणतेही कर्म न करता (मागील जन्मी) रिकामटेकडा बसून राहिला होता किंवा (पुढीलजन्मी) राहील काय? तुम्ही तर परमेश्वरालाही कर्मरहित म्हणजे रिकामटेकडा मानता. पूर्वजन्म न मानल्यास परमेश्वराला कृतहान व अकृत अभ्यागम (न केलेल्या कर्माचे फळ मिळणे), नैपुण्य (निर्दयता) व वैषम्य (विषमता, अनौचित्य) हे दोष लागतात. कारण पुनर्जन्म नसेल तर जीवाला पापपुण्याची बरीवाईट फळे कशी भोगता येतील? जीव दुसऱ्याला जे सुखदुःख, हानि, लाभ देतो त्याप्रमाणे त्याची फळे पुनः जन्म घेतल्याखेरीज त्याला भोगता येत नाहीत. तसेच, पूर्वजन्मात केलेल्या पापपुण्यांची फळे सुखदुःखाच्या रूपाने याजन्मात भोगावयाची असतात. ती गोष्ट पुनर्जन्माखेरीज कशी शक्य होईल? मागील जन्मातील पोपपुण्यानुसार या जन्मात सुखदुःखे भोगावी लागली नाहीत तर परमेश्वर अन्याय करणारा ठरेल. तसेच, या जन्मात केलेल्या कर्माची फळे भोगण्यासाठी पुढील जन्म मिळणार नसेल तर ती कमें निष्फळ ठरतील. म्हणून पुनर्जन्मावर विश्वास न ठेवण्याचे तुमचे मत बरोबर नाही.
(१०)एका ईश्वराखेरीज दिव्य गुण असणाऱ्या पदार्थाना व विद्वानांनाही देवन मानणे योग्य नाही. कारण परमेश्वराला तुम्ही महादेव म्हणजे सर्व देवांचा देव असे म्हणता. जर इतर देव नसते तर त्याला हे नाव कसे प्राप्त झाले असते ?
(११) अग्नीहोत्रादी परोपकारी कर्मांना कर्तव्य न मानणे बरोबर नाही.
(१२) ऋषींनी व महर्षांनी केलेले उपकार न स्मरता येशूच्या पाया पडणे चांगले नव्हे.
(१३) सर्व विद्यांचे मूळ कारण वेदरूपी विद्या हे आहे. तिच्या मदतीखेरीज इतर कार्य विद्या अस्तित्वात आल्या असे समजणे हा केवळ भ्रम आहे.
(१४) जानवे व शेंडी ही विद्येची चिह्ने आहेत. त्यांचा त्याग करून मुसलमान व खिस्ती लोकांसारखे बसणे हे निरर्थक आहे. तुम्ही कोट-पाटलोण घालता आणि आपल्याला बिल्ले लावून मिरविता यावे अशी इच्छा बाळगता. तर तुम्हाला जानवे वगैरेचे फार ओझे वाटले काय?
(१५) आर्यावर्त्तामध्ये जुन्या काळी ब्रह्मापासून आजपर्यंत पुष्कळ विद्वान् होऊन गेले आहेत. त्यांची प्रशंसा न करता युरोपीय लोकांचीच भरमसाट स्तुती करीत राहणे हा पक्षपात व खुशामतखोरपणा नव्हे काय?
(१६) बीजांकुराप्रमाणे जड (अचेतन) व चेतन यांच्या संयोगाने जीवोत्पत्ती होते असे मानणे, उत्पत्तीपूर्वी जीवतत्त्व नव्हते असे मानणे आणि उत्पन्न होणाऱ्या वस्तूचा नाश होतो असे न मानणे हे पूर्वपार विरुद्ध आहे उत्पत्तीच्या आधी जड (अचेतन) व चेतन वस्तू नव्हती तर जीव कोठून आला? संयोग कोणाचा झाला? बड (अचेतन) व चेतन हे सनातन आहेत असे तुम्ही मानीत असाल तर ते बरोबर आहेपरंतु सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी
ईश्वराखेरीज दुसरे कोणतेच तत्त्व अस्तित्वात नव्हते असे जे तुम्ही समजता ते मात्र निखालस चूक आहे. “म्हणून या देशाची उन्नती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ‘आर्यसमाजा'शी सहकार्य करून त्याच्या उद्दिद्यानुसार आचरण करण्यास सुरुवात करा. नाहीतर तुम्ही काहीही करू शकणार नाही. ज्या देशातील पदाद्यांनी तुमची- आमची शरीरे बनली आहेत, आज त्यांचे पालनपोषण होत आहे व यापुढे होणार आहे त्यांची आपण सर्वजण मिळून तनमनधनाने व प्रेमाने उन्नती करूया. आर्यावत्तांची उन्नती करण्यास ‘आर्यसमाज' जसा समर्थ आहे तसा दुसरा कोणताही समाज, संस्था अथवा संघटना असू शकत नाही. या समाजाला तुम्ही यथोचित साह्य कराल तर ती फार चांगली गोष्टईल. कारण समाजाला भाग्यशाली बनविणे हे समुदायाचे काम असते.ते एकट्या दुकट्याचे काम नसते.”
(प्रश्न) तुम्ही तर सगळ्यांचे खंडन करण्याचाच सपाटा लावला आहे; परंतु त्यांच्या दृष्टीने सगळेच पंथ चांगले आहेत. म्हणून कोणाचेही खंडन करू नये. तुम्ही त्यांचे खंडन करता खरे; परंतु तुम्ही तरी त्यांच्या पेक्षा वेगळे असे काय सांगता? आणि जरी तुम्ही काही सांगत असला तरी तुमच्या तोडीचा किंवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असा एखादा पुरुष नव्हता काय ? आज नाही काय? अशी घमेंड बाळगणे तुम्हाला शोभत नाही. कारण परमात्म्याच्या सृष्टीत एकाहून एक वरचढ, तुल्य आणि कमी प्रतीचे असे अनेक प्रकारचे लोक आहेत. म्हणून
कोणीही घमेंड करणे योग्य नाही.
(उत्तर) धर्म सर्वांचा एकच असतो की अनेक? जर अनेक असतील तर ते एकमेकांच्या विरुद्ध असतात की अविरुद्ध? जर ते एकमेकांच्या विरुद्ध असतील तर एकाशिवाय दुसरा धर्म असू शकत नाही आणि ते एकमेकांच्या अविरुद्ध असतील तर वेगवेगळे धर्म असणे व्यर्थ आहे. म्हणून सर्व मानव जातीच्या दृष्टीने धर्म
एकच आहे व अधर्मही एकच आहे. अनेक धर्म व अधर्म नाहीत. इतरांहून आमचा जो वेगळेपणा आहे तो हाच होय. एखाद्या राजाने सर्व संप्रदायांचे उपदेश एकत्र केले तर ते हजाराहून कमी भरणार नाहीत. परंतु त्या सर्वांची चार प्रमुख भागांत विभागणी केल्यास जगात चारच पंथ प्रमुख असल्याचे आढळून येते. ते असे : पुरानी (पौराणिक), किरानी (ख्रिस्ती), जैनी (जैन व बौद्ध), व कुरानी (मुसलमानी) या चार पंथात सगळे संप्रदाय येऊन जातात. एखाद्या राजाने या सर्वांचे संमेलन भरवून जिज्ञासू वृत्तीने प्रथम वाममार्गी इसमाला विचारले की, हे महाराज ! मी आजपर्यंत कोणालाही गुरू बनविलेले नाही अथवा कोणताही धर्म स्वीकारलेला नाही. तुम्ही मला असे सांगा की, सर्व धर्मामध्ये उत्तम धर्म कोणता आहे ? मी कोणता धर्म स्वीकारावा?
(वाममार्गी) आमचा धर्म सर्वोत्तम आहे.
(जिज्ञासू) मग हे उरलेले नऊशे नव्याण्णव धर्म कसे आहेत?
(वाममार्गी) ते सर्व खोटे आणि नरकाला नेणारे आहेत. कारण ‘कौलत्परतरं नहि’ या वचनाप्रमाणे आमच्या वाममार्गाहून श्रेष्ठ असा दुसरा कोणताही धर्म नाही.
(जिज्ञासू) तुमचा धर्म काय आहे?
(वाममार्गी) देवी भगवतीवर श्रद्धा ठेवणे, मद्यमांसादिपंच मकारांचे सेवन करणे, आणि रुद्रयामल वगैरे चौसष्ट तंत्रग्रंथांना प्रमाण मानणे, वगैरे, तुला मुक्तीची इच्छा असेल तर तू आमचा चेला होऊन जा.
(जिज्ञासू) ठीक आहे. तरी पण इतर महात्म्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या धर्माविषयी प्रथम चौकशी करतो आणि मग ज्या धर्मावर माझी श्रद्धा बसेल व प्रीती जडेल त्याचा चेला बनेन.
(वाममार्गी) अरे, तू असा भ्रमात का पडला आहेस ? ते लोक तुला भुलवून आपल्या जाळ्यात अडकवतील इतर कोणाकडे मुळीच जाऊ नकोस. आम्हालाच शरण ये नाहीतर पस्तावशील. पाहा ! आमच्या पंथात भोग व मोक्ष दोन्ही आहेत.
(जिज्ञासू) ठीक आहेत. रीपण इतरांकडे जाऊन चौकशी करतो. त्याप्रमाणे जिज्ञासू शैवांकडे गेला. तेथेही त्याला असेच उत्तर मिळाले. त्यांत त्यांनी विशेष असे सांगितले की, शिव, रुद्राक्ष, भस्मधारण व लिंगार्चन यांखेरीज मुक्ती कधीच मिळत नाही. तेव्हा त्यांना तेथेच सोडून तो नववेदांती गृहस्थांकडे गेला.
(जिज्ञासू) महाराज तुमचा धर्म काय आहे?
(वेदांती) आम्ही धर्म-अधर्म जाणत नाही. आम्हीच साक्षात ब्रह्म आहोत. आमच्यामध्ये धर्म-अधर्म कोठून असणार ? हे सारे जग मिथ्या आहे. तुला ज्ञानी व शुद्ध व्हायचे असेल तर तू स्वत:ला ब्रह्म मान व जीवभावना सोडून दे. तू नित्यमुक्त होऊन जाशील.
(जिज्ञासू) तुम्ही ब्रह्म व नित्यमुक्त आहात असे म्हणतात. तर ब्रह्माचे गुण, कर्म, स्वभाव तुमच्यामध्ये का नाहीत ? आणि तुम्ही या शरीरात का बद्ध आहात?
(वेदांती) तुला शरीर दिसते म्हणून तु भ्रमात आहेस. आम्हाला ब्रह्माशिवाय काहीही दिसत नाही.
(जिज्ञासू) तुम्ही पाहणारे कोण, आणि तुम्ही कोणाला पाहता?
(वेदांती) पाहणारे ब्रह्म असून ब्रह्माला ब्रह्म पाहते.
(जिज्ञासू) म्हणजे दोन ब्रह आहेत काय?
(वेदांती) नाही. ब्रह्म स्वतःलाच पाहते.
(जिज्ञासू) कोणी आपल्या स्वत:च्या खांद्यावर चढू शकतो काय? तुमचे हे बोलणे म्हणजे वेडयाचे बरळणेच आहे.
तेथून जिज्ञासू जैनांकडे गेला. त्याच्या प्रश्नांना त्यांनी तशीच उत्तरे दिली. फरक इतकाच की, ते म्हणाले, "जिणधम्माखेरीज इतर सर्व धर्म खोटे आहेत. जगाचा कर्ता अगदी ईश्वर असा कोणी नाही. जग हे अगदी काळापासून जसेच्या तसे राहिले आहे; आणि यापुढेही ते तसेच राहणार आहे. ये, तू आमचा अनुयायी होऊन जा. कारण आम्ही सम्यकत्व मानणारे म्हणजे सर्व प्रकारे चांगले आहोत आम्ही उत्तम गोष्टी मानतो. जैन मार्गाखेरीज इतर सर्व मार्ग चुकीचे आहेत."
तेथून तो खिस्ती इसमाकडे गेला. त्या इसमाने वाममार्गी माणसाप्रमाणेच त्याच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली.
आपले वैशिष्ट्य सांगताना तो म्हणाला, "सर्व माणसे पापी आहेत. माणसाच्या स्वत:च्या सामर्थ्याने पापे नष्ट होत नाही. येशूवर श्रद्धा ठेवून पवित्र झाल्याखेरीज माणसाला मुक्ती मिळू शकत नाही. येशूने सर्वांसाठी प्रायश्चित करण्याकरिता आपले प्राण दिले आणि दयेचा प्रकाश दाखविला. तू आमचाच अनुयायी हो.
त्याचे बोलणे ऐकल्यावर जिज्ञासू मौलवी साहेबांकडे गेला. त्यांच्याशीही त्याची अशीच प्रश्नोत्तरे झाली. त्यांनी एवढीचभर घातली की, एकमेव खुदा, त्याचा पैगंबर आणि कुराणशरीफ हा धर्मपंथ मान्य केल्याखेरीज कुणालाही मुक्ती मिळू शकत नाही. जो या धर्माचा स्वीकार करीत नाही तो काफिर असून नरकात जातो.तो ठार मारण्याच्याच योग्यतेचा असतो.
तेथून जिज्ञासू वैष्णवांकडे गेला. तेथेही असाच संवाद झाला. फक्त त्याने एवढे अधिक सांगितले की, आमचा टिळा व छाप पाहून यमराज घाबरतो. 'जिज्ञासूने मनात विचार केला, 'या माणसाला डास, माशा, पोलिस, चोर, डाकू आणि शत्रु घाबरत नाहत. तर यमदूत कसे घाबरतील?
तेथून तो पुढे गेला. सर्वच मतांच्या व पंथाच्या लोकांनी आपापले मत व पंथ खरे असल्याचे त्याला सांगितले. कोणी म्हणे आमचा कबीर खरा आहे, कोणी म्हणे नानक, कोणी म्हणे दादू तर कोणी म्हणे वल्लभ, कोणी सहजानंद तर कोणी माध्व अशा प्रकारे सर्वजण आपापल्या पंथाच्या संस्थापकाला फार मोठा अवतार समजतात, असे त्याला आढळून आले. हजार लोकांना विचारल्यावर त्यांच्या परस्पर विरोधी भूमिका त्याच्या लक्षात आल्या आणि त्याने असा निर्णय घेतला की, त्यांच्यापैकी कोणीही गुरू करण्यास योग्य नाही. कारण एकेक जण कसा खोटा आहे ते सांगणारे नऊशे नव्याण्णव साक्षीदार त्याला भेटले. ज्याप्रमाणे खोटादुकानदार, वेश्या किंवा भडवा आपापल्या वस्तूची महती गतो आणि इतरांच्या वस्तूंची निंदा करतो तसेच हे सगळे मत-पंथवाले आहेत असे त्याला आढळून आले. तेव्हा त्याला उपनिषदाच्या खालील वचनांचे समरण झाले:-
तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् । समित्पाणि श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्।।१।।
तस्मै स विद्वानुपसन्नाय सम्यक्प्रशान्तचित्ताय शमान्विताय ।
येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच तां तत्त्वतो ब्रह्मविद्याम्।।२।। मुण्डक ३।। खं० २।। मं० १२, १३।।
अर्थ:- सत्यस्वरूप परब्रह्माच्या साक्षात्काराकरिता हातात समिधा घेऊन त्याने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूपाशीच जावे, या पाखण्डी लोकांच्या जाळ्यात अडकू नये. ॥१॥
त्या विद्वान ब्रह्मज्ञ गुरूने ज्ञानार्जनासाठी आलेल्या त्या दर्पादी दोषरहित व शांतस्वभावी, जिज्ञासु शिष्याला ‘यथार्थ ब्रह्मविद्येचा म्हणजे परमेश्वराच्या गुण, कर्म, स्वभावाचा उपदेश करावा. तसेच ज्या ज्या पद्धतीने तो श्रोता धर्म, अर्थ, काम, मोक्ष व परमेश्वरास जाणेल त्या त्या मार्गाचा उपदेश करावा."॥२॥
जेव्हा तो अशा पुरुषाकडे जाऊन म्हणाला, "महाराज, या संप्रदायांच्या आपसातील कलहामुळे माझे चित्त भ्रांत झाले आहे. कारण यांच्यापैकी एकावे शिष्यत्व मी पत्करले तर उरलेल्या नऊशे नव्याण्णव लोकांचे शत्रुत्व मला पत्करावे लागेल. ज्याचे नऊशे नव्याण्णव शत्रू व एक मित्र असेल त्याला कधीही सुख लाभू शकणार नाही. म्हणून माझ्या हिताचा व मला ग्रहण करता येईल असा उपदेश तुम्ही मला करा."
(आप्तविद्वान्) (खरा उपदेशक) हे सर्व संप्रदाय अविद्याजन्य, विद्याविरोधी आहेत. तू मूर्ख, पामर व जंगली लोकांना फसवून, त्यांची दिशाभूल करून, आपल्या जाळ्यात अडकवितात आणि आपला स्वार्थ साधतात. ते बिचारे आपल्या मनुष्यजन्माचे फळ गमावून आपला मनुष्यजन्म वाया घालवितातअसे पाहा ! हे
हजार लोक या बाबतीत एकमत होऊ शकतात ते वेदमत ग्राह्य आहे आणि ज्यात परस्परविरोध आहे ते सारे काल्पनिक, खोटे, अधर्म व अग्राह्य आहे.
(जिज्ञासू) याची पारख कशी करायची?
(आप्त) तू यांच्याकडे जाऊन त्यांना खालील प्रश्न विचार. त्यांच्या उत्तरांच्या बाबतीत त्या सवचे एकमत असल्याचे तुला आढळून येईल
त्याप्रमाणे जिज्ञासू त्या हजार लोकांच्या समुदायाकडे गेला आणि त्यांच्या मधोमध उभा राहून तो त्यांना म्हणाला, "ऐका हो ऐका! सत्यभाषणामध्ये धर्म आहे की खोटेपणामध्ये? " सर्वांनी एका स्वरात सांगितले की, "सत्यभाषणात धर्म आहे व असत्यभाषणात अधर्म आहे." मग जिज्ञासूने विचारले, “विद्याध्ययन करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, पूर्ण तारुण्यात विवाह करणे, सत्संग, पुरुषार्थ व सत्य व्यवहार करणे इत्यादी गोष्टींमध्ये धर्म आहे की विद्या न शिकणे, ब्रह्मचर्याचे पालन न करणे, व्यभिचार, कुसंगती, आळस, असत्य व्यवहार लबाड, कपट, हिंसा, दुसऱ्यांची हानी इत्यादी गोष्टी करण्यामध्ये धर्म आहे?
सर्वांनी एकमताने सांगितले की, विद्याध्ययन वगैरे गोष्टींमध्ये धर्म असून विद्या न शिकणे वगैरे गोष्टीत अधर्म आहे."
तेव्हा जिज्ञासून सर्वांना विचारले, "अशाप्रकारे वैदिक धर्माच्या बाबतीत तुम्हां सर्वांचे एकमत आहे तर
सत्यधर्माची उन्नती व मिथ्या मार्गाचा नाश करण्यास का प्रवृत्त होत नाही? यावर ते म्हणाले, "आम्ही तसे केले तर मग आम्हाला कोण विचारील? आमचे चले आमच्या आज्ञेत राहणार नाहीत. आमचा पोटापाण्याचा धंदाच नाहीसा होईल. आणि मग आम्ही आज जी चैन करीत आहोत ती आम्हाला करता येणार नाही. म्हणून
आम्हाला जरी सगळे कळत असले तरी आम्ही आपापल्या पंथाचा व संप्रदायाचा उपदेश व प्रचार करीत राहतो. कारण रोटी खाईए शक्करसे और दुनिया ठगिये मक्करसे म्हणजे जगाला धूर्ततेने फसवून मौजमजा कराव. असे पाहा! जगामध्ये साध्यासुध्या, प्रामाणिक माणसाला कोणी काही देत नाही किंवा विचारीत नाही. जो कोणी ढोंगबाजी व धूर्तपणा करतो त्याचीच चैन असते.
(जिज्ञासू) तुम्ही अशा प्रकारे लबाडी करून लोकांना जे फसवता त्याबद्दल तुमचा राजा तुम्हाला शिक्षा का करीत नाही?
(पंथवाले) आम्ही राजालाच आमचा चेला बनविले आहे. आम्ही पक्का बंदोबस्त केला आहे. आमच्या तावडीतून कोणी सुटू शकत नाही.
(जिज्ञासू) तुम्ही कपटाने इतर पंथाच्या लोकांना फसवून त्यांचे नुकसान करता. या बद्दल परमेश्वरासमोर तुम्ही काय जाब द्याल ? तुम्ही घोर भरकात पडाल. इहलोकातील थोड्याशा जीवनासाठी एवढा मोठा गुन्हा करण्याचे तुम्ही का सोडून देत नाही?
(पंथवाले) जेव्हा जे काही होईल तेव्हा पाहता येईल. नरक आणि परमेश्वराची शिक्षा जेव्हा होईल तेव्हा होवो. सध्या तर चैन करीत आहोत ना ! लोक आम्हाला स्वखुशीने धनधान्य देतात. आम्ही कोणाकडून बळजबरीने काही घेत नाही. मग राजा आम्हाला का शिक्षा करील?
(जिज्ञासू) जेव्हा एखादा माणूस लहान मुलांना फूस लावून त्यांच्या जवळचे पैसे वगैरे लुबाडतो तेव्हा त्याला शिक्षा होते. तशी शिक्षा तुम्हाला का होऊ नये ? कारण,
अज्ञो भवति वै बालः पिता भवति मन्त्रदः ।। मनु०।। अ०२ ।। श्लो० १५३।।
जो ज्ञानरहित म्हणजे अज्ञ असतो तो बालक आणि जो ज्ञान देणारा असतो तो पिता किंवा वृद्ध समजावा. जो बुद्धिमान, विद्वान असतो तो तुमच्या जाळ्यात अडकत . परंतु बालकांप्रमाणे अज्ञानी असणारे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून फसतात. त्यांना फसविल्याबद्दल तुम्हाला अवश्य शिक्षा झाली पाहिजे.
(पंथवाले) राजा, प्रजा सगळेचे आमच्या पंथाचे अनुयायी आहेत. मग आम्हाला कोण शिक्षा करणार? जेव्हा आमच्या कृत्यांना शिक्षा देणारे कायदे होतील तेव्हा आम्ही या गोष्टी सोडून दुसरी काही व्यवस्था करू.
(जिज्ञासू) तुम्ही रिकामटेकडे बसून लोकांच्या संपत्तीवर डल्ला मारता. त्याऐवजी विद्याभ्यास करून गृहस्थांच्या मुलामुलींना शिकविण्याचे काम कराल तर तुमचे व गृहस्थांचे कल्याण होईल.
(पंथवाले) जन्मभर सहजासहजी मिळणारी सुखे आम्ही का सोडावीत? लहानपणापासून तारुण्यावस्था प्राप्त होईपर्यंत विद्याध्ययन करीत राहायचे, नंतर मरेपर्यंत अध्यापन व उपदेश करीत राहायचे, याची आम्हाला काय गरज ? आम्हाला तर काहीही काम न करता लाखो रुपये मिळतात. त्यावर आम्ही चैन करतो. ती आम्ही का सोडावी?
(जिज्ञासू) पण त्याचा परिणाम वाईट होत ना? पाहा ! तुम्हाला अनेक रोग होतात. तुम्ही फार लवकर मरता. शहाणी माणसे तुम्हाला नावे ठेवतात. तरीही कसे समजत नाही?
(पंथवाले) अरे बाबा !
टका धर्मष्टका कर्म टका हि परमं पदम् ।
यस्य गृहे टका नास्ति हा ! टकां टकटकायते।।१।।
आना अंशकला प्रोक्ता रूप्योऽसौ भगवान् स्वयम् ।
अतस्तं सर्व इच्छन्ति रूप्यं हि गुणवत्तमम्।।२।।
तू अजून बच्चा आहेस. तुला जगाचा व्यवहार कळत नाही. असे पाहा ! टक्क्या (पैशा) शिवाय धर्म, टक्क्याशिवाय कर्म आणि टक्क्याशिवाय परमपद प्राप्त होत नाही. ज्याच्या घरात टक्का नाही तो हाय टक्का ! हाय टक्का ! असे म्हणत उत्तम पदार्थाकडे टकमका पाहत राहतो. तो मनात म्हणतो की, "अरे ! माझ्याजवळ टक्का असता तर मी या उत्तम पदार्थाचा उपभोग घेतला असता.॥१॥ कारण सर्व लोक सोळा कलांनी युक्त अदृश्य परमेश्वराविषयी ऐकतात. परंतु तो कोणाला दिसत नाही. याउलट सोळा आणे आणि पैसे, कवड्या यांचे अंश आपल्यामध्ये समाविष्ट करणारा षोडशकलायुक्त रुपया मात्र सर्वांना दिसतो. तोच साक्षात भगवान आहे. म्हणून सर्व लोक रुपये मिळविण्याची इच्छा बाळगतात. कारण सर्व कामना रुपयाच्या साह्याने सफळ होतात.॥२॥
(जिज्ञासू) ठीक आहे. तुमच्या मनातली मळमळ बाहेर आली ते बरे झाले. तुम्ही जे हे सारे पाखंड उभे केले आहे ते केवळ स्वतःला सुख मिळावे म्हणून केले आहे. परंतु त्यामुळे जगाचा नाश होतो. कारण सत्योपदेशाने जसा जगाचा लाभ होतो तशीच असत्योपदेशाने हानी होते. तुम्हाला पैसाच हवा असेल तर नोकरी, व्यापार वगैरे करून तुम्ही पैसा का मिळवीत नाही?
(पंथवाले) तसे करण्यामध्ये खूप परिश्रम होतात आणि त्यात नुकसान होण्याचीही शक्यता असते. परंतु आमच्या या मोफतच्या धंद्यात नुकसान कधीच होत नाही. नेहमी फक्त फायदाच फायदा होतो. आम्ही पाण्यात तुळशीची पाने टाकून लोकांना चरणामृत देतो. एखाद्याला चेला बनवून त्याचे मुंडन करवितो आणि त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच माळ घालतो. एवढे केले की तो चेला जन्मभर पशुवत बनून राहतो. मग तो आमच्यासाठी गुरासारखा राबतो. त्याच्याकडून आम्हाला जे हवे असेल ते आम्ही करवून घेऊ शकतो.
(जिज्ञासू) तुमचे अनुयायी तुम्हाला इतके धन कशासाठी देतात?
(पंथवाले) धर्म साधावा आणि स्वर्ग व मोक्ष मिळावा यासाठी.
(जिज्ञासू) तुम्ही स्वतः मुक्त नाही तुम्हांला मुक्तीचे स्वरूप व साधन माहीत नाही तर तुमची सेवा करणाऱ्यांना मुक्ती अथवा मोक्ष कोठून मिळणार?
(पंथवाले) त्यांच्या सेवेचे फळ त्यांना इहलोकात मिळते काय? मुळीच नाही.ते त्यांना गेल्यानंतर परलोकात मिळते. हे लोक आमची सेवा करून आम्हाला जे काही देतात ते सारे त्यांना परलोकात परत मिळते.
(जिज्ञासू) या लोकांनी तुम्हाला दिलेले त्यांना परत मिळत असेल किंवा नसेल. पण ते तुम्हा घेणाऱ्यांना काय मिळेल ? नरकच मिळेल की इतर काही?
(पंथवाले) आम्ही भजन करतो व करवतो त्याबद्दल आम्हाला स्वर्गात सुख मिळेल.
(जिज्ञासू) तुमचे भजन हे पैसा मिळविण्याचे एक साधन . तुम्ही मिळविलेले सगळे धन येथेच राहून जाईल आणि ज्या शरीराचे एवढे कोडकौतुक तुम्ही करता ते शरीरही राख होऊन येथेच राहील. तुम्ही जर खरोखरी ईश्वराचे भजन करीत असता तर तुमचा आत्माही पवित्र झाला असता .
(पंथवाले) आम्ही अशुद्ध आहोत की काय ?
(जिज्ञासू) तुम्ही आतून अत्यंत गलिच्छ आहात.
(पंथवाले) ते तुम्हाला कसे कळले?
(जिज्ञासू) तुमचे वर्तन आणि व्यवहार यावरून .
(पंथवाले) महात्म्यांचा व्यवहार हत्तीच्या दातासारखा असतो. ज्याप्रमाणे हत्तीचे दात खाण्याचे वेगळे आणि दाखविण्याचे वेगळे असतात त्याप्रमाणे आम्ही आतून पवित्र आहोत आणि बाह्यतः लांड्यालबाड्या करीत असतो.
(जिज्ञासू) तुम्ही आतून शुद्ध असता तर तुमचे बाह्य व्यवहाही शुद्ध राहिले असते. म्हणून तुम्ही आतून घाणेरडे आहात, असे सिद्ध होते.
(पंथवाले) आम्ही कसेही असलो तरी आमचे अनुयायी तरी चांगले आहेत ना?
(जिज्ञासू) जसे तुम्ही गुरू आहात तसेच तुमचे चेले असणार.
(पंथवाले) सर्व माणसांसाठी एक धर्म कधीच चालू शकणार नाही. कारण सर्व माणसांचे गुण, कर्म, स्वभाव वेगवेगळे असतात.
(जिज्ञासू) लोकांना लहानपणापासून एकाच प्रकारचे उत्तम शिक्षण मिळाले, त्यांनी सत्यभाषणादी धर्माचे ग्रहण केले आणि मिथ्याभाषणादी अधर्माचा त्याग केला तर सर्वांचा एक धर्म अवश्य होऊ शकतो. अर्थात माणसांमध्ये धर्मात्मा व अधर्मात्मा हा भेद नेहमीच राहणार. परंतु धर्मात्मे जास्त झाले आणि अधर्मी लोक कमी झाले तर जगातील सुख वाढते; आणि जेव्हा अधर्मी लोकांची संख्या जास्त होते तेव्हा दुःख वाढते. जेव्हा सर्व विद्वान एकाच प्रकारचा उपदेश करतील तेव्हा धमची प्रस्थापना होण्यास मुळीच विलंब लागणार नाही.
(पंथवाले) आजकाल कलियुग चालू आहे. तुम्ही सांगता त्या सत्ययुगातील गोष्टी घडून येतील अशी इच्छा तुम्ही बाळगू नका.
(जिज्ञासू) कलियुग हे एका कालखंडाचे गाव आहे. काळ हा स्वत: निष्क्रिय असल्यामुळे धर्म अथवा अधर्म करण्याबाबतीत तो साधक किंवा बाधक होऊ शकत नाही. मात्र तुम्हीच मूर्तिमंत कलियुगी आहात. मनुष्य हा मुळात सत्ययुगी अथवा कलियुगीनसतो. कारण माणसातील गुणदोष हे अंगभूत किंवा स्वभावसिद्ध नसतात. संगतीमुळे माणसामध्ये गुण किंवा दोष निर्माण होतातते स्वाभाविक नसतात
एवढे बोलून जिज्ञासु आप्तांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, "महाराज ! तुम्ही माझा उद्धार केला, नाहीतर मीही कुणाच्यातरी जाळ्यात अडकून नष्ट भ्रष्ट झालो असतो. यापुढे मी या पाखंडी लोकांच्या मताचे
खंडन आणि वेदोक्त सत्य मताचे मंडन करीत राहीन."
(आप्त) हेच सर्व लोकांचे, विशेषतः विद्वानांचे व संन्याशांचे काम आहे.त्यांनी सर्वांसमोर सत्याचे मंडळ व असत्याचे खंडन केले पाहिजे. त्याप्रकारचे साहित्य लोकांना वाचून दाखवून सत्योपदेशाद्वारे इतरांवर उपकार केला पाहिजे. त्यातच समाजाचे कल्याण आहे.
ब्रह्मचारी व संन्यासी समीक्षा
(प्रश्न) आजकालचे ब्रह्मचारी व संन्यासी तर चांगले आहेत ना?
(उत्तर) हे आश्रम तसे चांगले आहेत. परंतु आजकाल त्याच्यामध्येही पुष्कळच घोटाळा माजलेला आहे. कित्येक लोक स्वत:ला ब्रह्मचारी म्हणवतात आणि जटाजूट वाढवून आपण सिद्ध पुरुष असल्याचा आव आणतात. जपजाप्य व पुश्चरण वगैरे गोष्टीत ते गुंतून पडतात. विद्याध्ययन मुळीच करीत नाहीत. ज्या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रेरणार्थक ब्रह्मचारी हा शब्द बनलेला आहे त्या ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी वेदाध्ययन करण्याचे कष्ट मुळीच घेत नाहीत. हे ब्रह्मचारी म्हणजे बकरीच्या गळ्यातील स्तनासारखे (अजागलस्तन) निरर्थक असतात. त्यांच्यासारखेच संन्यासीही गल्लगल्ली भटकताना दिसतात. ते विद्याविहीन असतात. केवळ दंड व कमंडलू घेऊन भिक्षा मागत फिरतात. वैदिक धर्माच्या उन्नतीसाठी ते काहीही करीत नाहीत. लहान वयातच ते संन्यास घेतात आणि विद्याभ्यास सोडून देतात. असे ब्रह्मचारी व संन्यासी तीर्थयात्रा करतात व पाषाणादिकांच्या मूर्तीचे दर्शन व पूजन करीत फिरतात. त्यांच्याजवळ ज्ञान असले तरी ते इतरांना न देता मौन धारण करतात. एकांत ठिकाणी यथेष्ट खाऊन-पिऊन झोपा काढतात. आणि इतरांची ईर्ष्या व द्वेष यांच्या आहारी जाऊन त्यांची निंदानालस्ती करण्यात वेळ घालवितात. भगवी वस्त्रे परिधान केल्याने व दंड ग्रहण केल्यानेच स्वत:ला कृतकृत्य समजतात आणि आपले जीवन सर्वोत्कृष्ट आहे असे समजून कोणतेही चांगले काम करीत नाहीत. असले संन्यासी या जगात व्यर्थ जगत असतात. अर्थात त्यांच्यापैकी जे कोणी जगाच्या कल्याणाची कामे करतात. ते चांगले असतात.
(प्रश्न) गिरी, पुरी, भारती वगैरे पंथांचे लोक तर चांगले आहेत ना? कारण ते गटाटांनी फिरत असतात. शेकडो साधूंना आनंदी करतात; आणि सर्वत्र अद्वैत मताचा उपदेश करतात. थोडेफार अध्ययन- अध्यापनही करतात. त्यामुळे ते चांगले असावेत असे वाटते.
(उत्तर) गिरी, पुरी वगैरे दहा नावे सनातन नाहीत. कल्पित केली आहेत. ते केवळ चांगले-चुंगले खायला मिळावे म्हणून आपले समुदाय (टोळकी) बनवितात. पुष्कळसे साधू केवळ जेवण्यासाठीच या लोकांच्या टोळ्यांबरोबर राहतात. ते लोक ढोंगीही आहेत. कारण ते आपल्यापैकी एखाद्याला महंत बनवितात. संध्याकाळी त्यांच्यातला प्रमुख महंत गादीवर बसतो. त्यावेळी सर्व ब्राह्मण व साधू उभे राहतात आणि हातात फुले घेऊन म्हणतात :
नारायणं पद्मभवं वसिष्ठं शकिंत च तत्पुत्रपराशरं च । व्यासं शुकं गौडपदं महान्तम्।। (या श्लोकात नारायण, पद्भव, वसिष्ठ, शक्ती त्याचा पुत्र पराशर,व्यास, शुक्र आणि महान गौडपद यांची नावे आहेत. यांना नमस्कार असो.)
आणि 'हरहर' ची गर्जना करीत त्या महंतावर पुष्पवृष्टी करून त्याला साष्टांग नमस्कार घालतात. जो कोणी असे करू इच्छित नाही त्याला त्या टोळीत राहणे अशक्य होऊन जातेहे सारे ढोंग जगाला दाखविण्यासाठी ते करतात. ते दृश्य पाहून लोकांच्या मनावर त्या महंताचा मोठेपणा ठसावा आणि त्यांनी भरपूर धनदौलत आपल्याला द्यावी, हा हेतू त्यामागे असतो. कित्येक मठपती लग्न करून गृहस्थ बनतात. परंतु आव मात्र संन्साची असल्याचा आणतात. ते संन्याशाचे कोणतेही कर्तव्य पार पाडीत नाहीत. संन्याशाची कर्तव्यकर्मे कोणती आहेत याची चर्चा आम्ही पाचव्या समुल्लासात केली आहे. ती कर्तव्ये न करता हे लोक आपला वेळ वाया घालवितात. कोणी चांगला उपदेश केला तर त्यालाही ते विरोध करतात. यांच्यातील बहुतांश लोक भस्म व रुद्राक्ष धारण करणारे असतात. परंतु कोणी-कोणी शैव संप्रदायाचा अभिमान बाळाणारे असतात. आणि जेव्हा शास्त्रार्थ करतात तेव्हा ते आपल्या म्हणजे शंकराचार्यांच्या मताचे समर्थन करतात.आणि चक्रांकित वगैरे मतांचे खंडन करतातते कधीही वैदिक धर्माचे मंडन व पाखंड मताचे खंडन करीत नाहीत.
हे संन्यासी लोक असे समजतात की, ‘खंडन-मंडलाशी काय कर्तव्य ? आम्ही तर महात्मे आहोत.' असले हे लोक जगाच्या दृष्टीने भाररूप आहेत.असल्या लोकांमुळेच वेदमार्ग विरोधी, वाममार्गादी संप्रदायी, ख्रिस्ती, मुसलमान, जैन वगैरे लोकांचे फावले; आणि आजही त्यांची संख्या वाढतच आहे. इकडे वैदिक धर्माला उतरती कळा लागलेली दिसते. तरीही त्यांचे डोळे उघडत नाहीत. कसे उघडणार? त्यांच्या मनात समाजहिताची बुद्धी आणि स्वत:ची कर्तव्ये पार पाडण्याचा उत्साह असता तर त्यांना आपली अवनती दिसली असती. परंतु हे लोक आपली स्वतःची प्रतिष्ठा आणि खाण्यापिण्याची चैन यापुढे इतर कशालाच महत्व देत नाहीत आणि लोकांच्या टिकेला घाबरतात. संन्याशांनी लोकैषणा-प्रसिद्धीची हाव, वित्तेषणा-संपत्तीचा मोह व पुत्रैषणा-पुत्रप्राप्तीची अभिलाषा किंवा शिष्यांवर पुत्रांप्रमाणे मोहित होणे या तीन एषणांचा-इच्छांचा त्याग करावयाचा असतो. जोपर्यंत या एषणा सुटत नाहीत तोपर्यंत त्या संन्यासाला काय अर्थ? म्हणून पक्षपातरहित बनून वेदमार्गाच्या उपदेशाने जगाचे कल्याण करण्यासाठी अहर्निश झटत राहणे हे संन्याशाचे मुख्य कर्तव्य आहे. जोपर्यंत संन्यासी लोक आपल्या आश्रमाची कर्तव्ये पार पाडीत नाहीत. तोपर्यंत त्यांनी स्वत:ला संन्यासी म्हणवून घेणे निरर्थक आहे. गृहस्थाश्रमी लोक आपला व्यवहार व स्वार्थ साधण्यासाठी खूप परिश्रम करतात. त्याहून अधिक परिश्रम लोकहित साधण्यासाठी संन्यासी करतील तरच सर्व आश्रमांची उन्नती होईल.
पाहा ! तुमच्या समोर पाखंडी मते वाढत चालली आहेत. लोक ख्रिस्ती व मुसलमानदेखील होत आहेत. पण तुम्हाला आपल्या घराचे रक्षण करता येत नाही आणि इतरांना आपल्यात सामील करून घेणे शक्य होत नाही. तुमच्या मनात प्रबळ इच्छा असेल तरच तुम्ही या गोष्टी करू शकाल. जोपर्यंत वर्तमानकाळी व भविष्यकाळी संन्यासी लोक उन्नतिशील बनणार नाहीत तोपर्यंत आर्यावर्त्तातील व इतर देशांतील मानवांचे खरे कल्याण होणार नाही. वेदादी सत्य शास्त्रांचे अध्ययन-अध्यापन, ब्रह्मचर्यादी आश्रमांचे यथावत् अनुष्ठान व सत्योपदेश यांच्यामुळे माणसाची प्रगती होत असते. या गोष्टी अमलात आणल्या जात असतील तरच कोणत्याही देशाची उन्नती होते.
लक्षात ठेवा । बुवाबाजी, मूर्तिपूजा वगैरेसारखे अनेक पाखंड तुमच्या डोळ्यासमोर घडत आहेत. उदाहरणार्थ, एखादा धंदेवाईक वृत्तीचा साधू स्वतः सिद्ध पुरुष असल्याचे जाहीर करतो. आणि निपुत्रिकांना
मुले होतील अशी किमया आपल्याजवळ असल्याचे सांगतो. तेव्हा अनेक स्त्रिया त्याच्याकडे जातात आणि हात जोडून पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करतात. मग ते बाबाजी सर्वांना मुलगा होईल असा आशीर्वाद देतात. त्यांच्यापैकी जिला पुत्र होतो ती असे समजते की बुवाच्या आशीर्वादाने तो झाला आहे. तिला जेव्हा कोणी विचारते की, "बाई गं ! डुकरीण, गाढवीण, कुत्री, कोंबडी वगैरे प्राण्यांना कोणत्या बुवाच्या आशीर्वादाने पिले होतात ?" तेव्हा ती काही उत्तर देऊ शकत नाही. जर कोणी असे म्हणत असेल की मी मुलाला जिवंत ठेवू शकतो, तर तो स्वतःच का मरतो?
अनेक लबाड लोक असे काही प्रमाचे जाळे पसरवितात की मोठेमोठे बुद्धिमान लोकही त्याला फसतात. जसे धनसारीचे ठग. हे लोक पावसात जणांचे टोळके बनवून दूरच्या प्रदेशात जातात. त्यांच्यापैकी जो कोणी देखणा व रुबाबदार असतो त्याला ते सिद्धपुरुष बनवितात. आणि ज्या गावात किंवा शहरात श्रीमंत लोक राहत असतील त्याच्या जवळच्या जंगलात त्या सिद्धपुरुषाला बसवितात. मग ते साधक गावात जाऊन, काही माहीत नसल्याचा आव आणून भेटेल त्यांना विचारतात, असा असा महात्मा तुम्ही कोठे पाहिला आहे काय? यावर लोक त्यांना विचारतात "असा महात्मा कोण आहे ? कसा आहे?"
मग ते साधक साथीदार त्यांना विचारतात, "तो फार मोठा सिद्ध पुरुष आहे. तुमच्या मनात काय आहे ते तो सांगतो. तो जे बोलतो ते घडते. मोठा योगीराज आहे. त्याच्या दर्शनासाठी आम्ही आपली घरेदारे सोडून
त्याला शोधीत फिरत आहोत. आम्हाला कोणीतरी सांगितले की ते महात्मा याच बाजूला आले आहेत.
त्यांचे बोलणे ऐकूण गावातले लोक त्यांना म्हणतात, "ते महात्मा तुम्हाला भेटले तर आम्हालाही सांगा. आम्ही त्यांचे दर्शन करू आणि मनातल्या गोष्टी त्यांना विचारू."
अशा प्रकारे ते दिवसभर त्या गावात फिरतात आणि भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या सिद्धपुरुषाची माहिती सांगतात. रात्री सगळे सिद्ध साधक एकत्र जमतात; खातात-पितात आणि झोपतात. पुनः सकाळी उठून गावात जातात आणि लोकांना त्या सिद्ध पुरुषाचे माहात्म्य समजाऊन सांगतात. हा क्रम तीन-चार दिवस चालविल्यानंतर चारही साधक एकेका धनाढयाला गाठून सांगतात "ते महात्मा सिद्धपुरुष आम्हाला की, भेटले. तुम्हाला त्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर आमच्या बरोबर चला." जेव्हा ते जायला तयार होतात तेव्हा साधक त्यांना विचारतात, "तुम्ही महाराजांना काय विचारू इच्छिता? आम्हाला सांगा." त्याप्रमाणे ते लोक त्यांना सांगतात. कोणाला मुलगा हवा असतो तर कोणाला संपत्ती. कोणाला आपला रोग बरा व्हावा असे वाटते तर कोणाला शत्रूवर विजय मिळवायचा असतो. त्यांना ते साधक घेऊन जातात. सिद्ध साधकांनी
आपसात पूर्वी ठरविल्याप्रमाणे ज्याला दुव्याची अभिलाषा असते त्याला उजव्या बाजूला, ज्याला मुलगा हवा असेल त्याला समोर, ज्याला आजार जावा असे वाटत असेल त्याला डावीकडे आणि ज्याला शत्रुवर जय मिळवायचा असतो त्याला मागील बाजूने आणून पुढे आणलेल्या लोकांमध्ये बसवितात. हे लोक जेव्हा सिद्ध पुरुषाला नमस्कार करतात तेव्हा तो आपल्या सिद्धपणाच्या घमेंडीत जोरात ओरडून म्हणतो, "आमच्याकडे मुलगा मागायला तू आला आहेस. अरे, आमच्याजवळ काय मुले भरून ठेवली आहेत ?" त्याचप्रमाणे धन मागायला आलेल्या आणसाला उद्देशून तो म्हणतो, "द्रव्य मिळविण्याची इच्छा बाळगून इथे आला आहेस, इथे काय पैशाच्या पैल्याभरून ठेवल्या आहेत? आम्हा फकिरांजवळधन कोठून असणार?” रोगनिवारणासाठी आलेल्या इसमाला तो म्हणतो, "रोग मुक्त होण्याची इच्छा मनात बाळगून आला आहेस, आम्ही काय वैद्य आहोत? जा, एखाद्या वैद्याला जाऊन भेट. मात्र आलेल्या माणसाचा बाप आजारी असेल तर त्याला घेऊन आलेला साधक अगठा दाखवितो, आई आजारी असल्यास तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट), भाऊ आजारी असल्यास मधले बोट, पली आजारी असल्यास करंगळाजवळचं बोट (अनामिका) आणि मुलगी आजारी असल्यास तो करंगळी दाखवून खूण करतो. ती खूण ओळखून सिद्ध सांगतो की, 'तुझा बापभाऊआई, पत्नी किंवा मुलगी आजारी आहे. त्याचे ते अंतनूनि पाहन ते लोक थक्क होऊन जातात. मग साधक त्यांना म्हणतात, "बघा! जसे आम्ही सांगितले होते तसे हे महाराज आहेत की नाहीत?" यावर ते गृहस्थ म्हणतात, "होय, तुम्ही जसे सांगितले होते तसेच हे आहेत. तुमचे आमच्यावर फार मोठे उपकार आहेत. अशा महात्म्यांचे दर्शन झाले, हे आमचे मोठे भाग्य. त्यांच्या दर्शनाने आम्ही कृतार्थ झालो.
तेव्हा साधक म्हणतो, "लोकहो ऐका ! हे महात्मा मनोगामी आहेत. ते तुमच्या मनातील सर्वकाही जाणतात. हे येथे फार दिवस राहणार नाहीत. म्हणून त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपापल्या कुवतीप्रमाणे तुम्ही तनमनधनाने यांची सेवा करा. कारण सेवा केली की मेवा मिळतो. ते ज्याच्यावर प्रसन्न होतील त्याला काय वर देतील ते सांगता येणार नाही. म्हटलेच आहे की, संतांची गती अपार आहे" सिद्धाचे माहात्म्य वर्णन करणारे हे उद्वार ऐकून आलेले लोक खूष होऊन त्यांची स्तुती करीत घरी जातात. साधकही त्यांच्याबरोबर जातात. वाटेत कोणी आपले विंग फोडू नये यासाठी तेही खबरदारी घेतात. त्या धनाढ्यांचा कोणी मित्र भेटल्यास त्याच्याजवळ ते आपल्या सिद्ध पुरुषाची तोंड भरून स्तुती करतात. अशा प्रकारे जे जे लोक साधकांना भेटतात ते त्यांची हकीकत इतरांना सांगतात. लौकरच गावभर ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरते की अमुक ठिकाणी एक फार मोठे सिद्धपुरुष आले आहेत. मग लोक एकमेकांना सांगतात की, "चला, आपण त्या साधू महाराजांकडे जाऊ. अशा प्रकारे जणू मोठी जत्राच तेथे भरते. जेव्हा फार मोठ्या संख्येने लोक सिद्धपुरुषाकडे जाऊन त्यांना म्हणतात की, " महाराज, आमच्या मनातली गोष्ट सांगा." तेव्हा सगळी व्यवस्था बिघडते. मग तो सिद्ध सर्व लोकांना सांगतो, "आम्हाला त्रास देऊ नका." आणि तो मौन धारण करतो. त्याबरोबर ते साधकही लोकांना सांगू लागतात की, "महाराजांना तुम्ही फार त्रास द्याल तर ते येथून निघून जातील." मग एखादा खूप श्रीमंत माणूस एखाद्या साधकाला बाजूला नेऊन सांगतो, "आमच्या मनात काय आहे ते महाराज सांगतील तर ते खरे सिद्ध पुरुष आहेत हे आम्ही मान्य करू." साधक त्याला विचारतो, "तुमच्या मनात काय आहे?" तो धनाढ्य माणूस त्याला आपल्या मनातील गोष्ट सांगतो. त्यानंतर तो साधक त्याला सिद्ध पुरुषाकडे घेऊन जातो व पूर्व संकेताप्रमाणे त्याला बसवितो. सिद्ध पुरुष चटकन त्याच्या मनातला गोष्ट सांगतो. सभोवताली जमलेले सारे लोक त्यांचे बोलणे ऐकतातआणि सगळे जण म्हणू लागतात, अहाहा ! खरोखरीच हे फार थोर सिद्धपुरुष आहेत. मग कोणी मिठाई, कोणी पैसे, कोणी रुपये, कोणी मोहरा, कोणी कापड तर कोणी शिधा आणून महाराजांना अर्पण करतात. अशा प्रकारे जोपर्यंत लोकांकडून भट येत राहतात तोपर्यंत हे लोक त्यांना लुबाडत राहतात. अधून-मधून भरपूर श्रीमंत परंतु फारशी अक्कल नसलेले एक दोन लोक त्यांना भेटतात. सिद्ध पुरुष त्यांना मुलगा होण्याचा आशीर्वाद देतो किंवा प्रसाद म्हणून मूठभर राख देतो आणि त्यांच्याकडून हजारो रुपये उकळून त्यांना सांगतो की, "तुमची भक्ती खरी असेल तर तुम्हाला नक्कीच मुलगा होईल." अशाप्रकारचे अनेक ठग लोकांना लुटत असतात. विद्वान लोकच अशांची पारख करू शकतात. सामान्य लोकांना त्यांच लबाड कळत नाही.
म्हणून वेदादी विद्यांचे अध्ययन व सत्संग करणे आवश्यक असते. त्यामुळे कोणीही ठग अशा ज्ञानी
व्यक्तीला फसवू शकत नाही; आणि ती व्यक्ती इतरांनाही धोक्यापासून वाचवू शकते. कारण विद्या हा माणसाच तिसरा डोळाच आहेविद्या आणि शिक्षण यांच्याशिवाय ज्ञान होत नाही. जे लहानपणापासून उत्तम शिक्षण घेतात तेच माणूस आणि विद्वान बनतात. ज्यांना वाईट संगत लागते ते बुट , पाणी, महामूर्ख बनतात. त्यांना फार दु:ख भोगावे लागते म्हणूनच ज्ञान ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे असे म्हटले जते. जो कोणी जाणतो तोच मानतो.
न वेत्ति यो यस्य गुणप्रकर्षं स तस्य निन्दां सततं करोति ।
यथा किराती करिकुम्भजाता मुक्ता परित्यज्य बिभर्ति गुञ्जा ।। वृद्ध अ० ११।। श्लो०१२।।
हा कोण्या कवीचा श्लोक है, जो ज्याचा गुण जाणत नाही, त्याची निरंतर निंदा करतो. उदाहरणार्थ, जंगली भिल्ल हतीच्या गंडस्थळातील मोती टाकून देऊन गुंजांच्या माळा गळ्यात घालून फिरतो. त्याचप्रमाणे
पुरुष विद्वानज्ञानी, धार्मिकसत्पुरुषांचा सत्संग करणारा, योगी, पुरुषार्थी, जितेंद्रिय, सुशील असतो तोच धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्त करून या जन्मी व नंतरच्या जन्मात सदा आनंदात राहतो.
आर्यावर्त्तात राहणाऱ्या लोकांचे पंथ व संप्रदाय यांविषयी हे सारे थोडक्यात लिहिले आहे. यानंतर आर्यराजांचा जो थोडासा इतिहास मिळाला आहे तो सर्व सजनांच्या माहितीसाठी आम्ही खाली देत आहोत.
आता आर्यावर्त्तातील श्रीमान महाराज युधिष्ठिर यांच्यापासून महाराज यशपाल यांच्यापर्यंत जे राजवंश होऊन गेले त्यांचा इतिहास आम्ही लिहितो. श्रीमान् महाराज स्वायंभुव मनू पासून महाराजा युधिष्ठिरंपर्यंतचा इतिहास महाभारतादी ग्रंथामध्ये लिहिलेलाच आहे. त्यामुळे सज्जनांना येथील काही इतिहास माहीत असेल. आम्ही खाली जी माहिती देत आहोत ती 'हरिश्चन्द्रचन्द्रिका' व 'मोहनचन्द्रिका' या पाक्षिकांमधून अनुवादित करून घेतलेली आहे. ही पाक्षिके राजपुतान्यातील मेवाड भागातील उदयपूर संस्थानाची राजधानी चित्तौडगढजवळ नाथद्वारा या क्षेत्रस्थानाहून प्रकाशित होत होती. आमचे आर्यसज्जन अशाच प्रकारे इतिहास आणि ज्ञानग्रंथ यांचे संशोधन करून ते प्रसिद्ध करतील तर देशाचा फार मोठा लाभ होईल.या पाक्षिकांच्या संपादकांना त्यांच्या एका मित्राकडून विक्रम संवत् १७८२ (इ.स. १७२५) साली लिहिल्या गेलेल्या एका प्राचीन ग्रंथाचे हस्तलिखित मिळाले होते. त्या ग्रंथाचा सारांश संवत् १९३९ (इ.स. १८८२) यावर्षी सदर पाक्षिकाच्या मार्गशीर्ष शुक्लपक्षातील १९ व २० या दोन क्रमांकाच्या अंकात छापलेला आहे. तोच आम्ही खाली देत आहोत:-
आर्यावर्तीय राजांची वंशावळ
इंद्रप्रस्थामध्ये आर्य लोकांनी श्रीमन्महाराज यशपाल यांच्यापर्यंत राज्य केले. त्यांमध्ये श्रीमन्महाराज युधिष्ठिर यांच्यापासून महाराज यशपाल यांच्यापर्यंत सुमारे १२४ पिढ्यांनी म्हणजे राजांनी ४१५७ वर्षे, १ महिने, १४ दिवस एवढा काळ राज्य केले. श्रीमन्महाराज युधिष्ठिराच्या वंशात ३० पिढचा होऊन गेल्या. त्यांनी १७७० वर्षे, ११ महिने व १० दिवस राज्य केलेल त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
तपशील :-
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
) राजा युधिष्ठिर ३६ ८ २५
२) राजा परीक्षित ६० ० ०
३) राजा जनमेजय ८४ ७ २३
४) राजा अश्वमेघ ८२ ८ २२
५) द्वितीयराम ८८ २ ८
६) छत्रमल ८१ ११ २७
७) चित्ररथ ७५ ३ १८
८) दुष्टशैल्य ७५ १० २४
९) राजा उग्रसेन ७८ ७ २१
१०) राजा शूरसेन ७८ ७ २१
११) भुवनपति ९६ ९ ५५
१२) रणजीत ६५ ० २४
१३) ऋक्षक ६४ ७ ४
१४) सुखदेव ६२ ० २४
१५) नरहरिदेव ५१ १० २
१६) सुचिरथ ४२ ११ २
१७) शूरसेन (दुसरा) ५८ १० ८
१८) पर्वतसेन ५५ ८ २१
१९) मेधावी ५२ १० १०
२०) सोनचीर ५० ८ २१
२१) भीमदेव ४७ ९ २०
२२) नृहरिदेव ४५ ११ २३
२३) पूर्णमल ४४ ८ ७
२४) करदवी ४४ १० ८
२५) अलंमिक ५० ११ ८
२६) उदयपाल ३८ ९ ०
२७) दुवनमल ४० १० २६
२८) दमात ३२ ० ०
२९) भीमपाल ५८ ५ ८ ३०) क्षेमक ४८ ११ २१
|
राजा क्षेमकाचा प्रधान विश्रवा याने क्षेमक राजाला मारून त्याची गादी बळकावली. त्याच्या वंशातील १४ पिढयांनी ५०० वर्षे, ३ महिने व १७ दिवस राज्य केले. त्याचा तपशील
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
१) विश्रवा १७ ३ २९
२) पुरसेनी ४२ ८ २१
३) वीरसेनी ५२ १० ७
४)अनङ्गशायी ४७ ८ २३
५) हरिजित ३५ ९ १७
६) परमसेनी ४४ २ २३
७) सुखपाताल ३० २ २१
८) कद्रुत ४२ ९ ४
९) सज्ज ३२ २ १४
१०) अमरचूड २७ ३ १६
११) अमीपाल २२ ११ २५
१२) दशरथ। २५ ४ १२
१३) बीरसाल ३१ ८ ११
१४) वीरसालसेन ४० ७ १४
|
राजा वीरसालसेनचा पंतप्रधान वीरमहा याने राजाला ठार मारून तो राज्यावर बसला. त्याच्या वंशातील १६ पिढ्यांनी ४४५ वर्ष, ५ महिने व ३ दिवस राज्य केलेत्याचा तपशील :-
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
१) राजा वीरमहा ३५ १० ८
२) अजितसिंह २७ ७ १९
३) सर्वदत २८ ३ १०
४) भुवनपति १५ ४ १०
५) वीरसेन (पहिला) २१ २ १३
६) महीपाल ४० ८ ७
७) शत्रुपाल २६ ४ ३
९) तेजपाल २८ ११ १०
१०) माणिकचंद ३७ ७ २१
११) कामसेनी ४२ ५ १०
१२) शत्रुमर्दन ८ ११ १३
१३) जीवनलोक २८ ९ १७
१४) हरिराव २६ १० २९
१५) वीरसेन (दुसरा ) ३५ २ २०
१६) आदित्यकेतू २३ ११ १३
|
मगधदेशाचा राजा आदित्यकेतु याला प्रयागचा राजा धन्धर याने ठार मारले व तो गादीवर बसला. त्याच्या वंशातील ९ पिढ्यांनी ३७४ वर्षे, ११ महिने, २६ दिवस राज्य केलेत्याचा तपशीलः
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
१) राजा धन्धर ४२ ७ २४
२) महर्षी ४१ २ २९
३) सनरच्ची ५० १० १९
४) महायुद्ध ३० ३ ८
५) दुनाथ २८ ५ २५
६) जीवनराज ४५ २ ५
७) रुद्रसेन ४७ ४ २८
८) आलक ५२ १० ८
९) राजपाल ३६ ० ०
|
राजा राजपाल याला सामंत महानपालानं ठार मारून त्याचे राज्य बळकावले. त्याने १ पिढी १४ वर्षे राज्य केले. अवंतिकेचा (उज्जैनचा ) राजा विक्रमादित्य याने महानपालाला लढाईत मारून त्याचे राज्य घेतले. त्याने ९३ वर्षे राज्य केले. राजा विक्रमादित्याला पैठणच्या शालिवाहनाचा उमराव समुद्रपाल योगी याने ठार मारून तो राज्यावर आला. त्याच्या १६ पिढ्यांनी ३७२ वर्षे, ४ महिने, २७ दिवस राज्य केले. त्याचा
तपशीलः-
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
१) समुद्रपाल ५४ २ २०
२) चन्द्रपाल ३६ ५ ४
३) सहायपाल ११ ४ ११
४) देवपाल २७ १ २८
५) नरसिंहपाल १८ ७ २०
६) सामपाल २७ ११ ७
७) रघुपाल २२ ३ २५
८) गोविन्दपाल २७ १ १७
९) अमृतपाल ३६ १० १३
१०) बलीपाल १२ ५ २७
११) महीपाल १३ ८ ४
१२) हरिपाल १४ ८ ४
१३) सीसपाल ११ १२ १३
१४) मदनपालः १७ १० १९
१५) कर्मपाल १६ २ २
१६) विक्रमपाल २४ ११ १३
|
राजा विक्रमपालने पश्चिम दिशेचा राजा मलुखचंद बोहरा याच्यावर चढाई करून त्याच्याशी मैदानात लढाई केली. या लढाईत विक्रमपाल मारला गेला. त्यानंतर मलुखचंदाने इंद्रप्रस्थाचे राज्य जिंकून घेतले. त्याच्या १० पिढ्यांनी १९१ वर्ष, १ महिना, १६ दिवस राज्य केले. त्याचा तपशील :-
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
१) मलुखचंद ५४ २ १०
२) विक्रमचंद १२ ७ १२
३) अमीनचंद (+) १० ० ५
४) रामचंद १३ ११ ८
५)हरिचंद १४ ९ २४
६) कल्याणचंद १० ५ ४
७) भीमचंद १६ २ ९
८) लोवचंद २६ ३ २२
९) गोविंदचंद ३१ ७ १२
१०) राणी पद्मावतीं १ ० ०
|
*काही इतिहासात याचेनाव भीमपाल असेही लिहिले आहे.
+ त्याचे नाव कोठे कोठे मानकचंद असेहि लिहिलेले आढळते. 'दीपद्मावतगोविंदचंदाची राणी होती.
राणो पद्मावती मरण पावली. तिला मूलबाळ नव्हते. म्हणून सर्व मंत्र्यांनी आपसात विचार-विनिमय करून हरिप्रेम वैराणी याला गादीवर बसविले बते त्याच्या नावाने राज्य करू लागले. हबैिम वैराग्याच्या ४ पिढ्यांनी ५० वर्षे, २१ दिवस राज्य केलेत्याचा तपशील :-
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
१) हरिप्रेम ७ ५ १६
२) गोबिंदप्रेम २० २ ८
३) गोपालप्रेम १५ ७ २८
१) महाबाहु ६ ८ २९
|
राजा महाबाहु राज्य त्याग करून तपश्चर्या करण्यास वनात गेला. बंगालचा राजा आघासेन याला ही बातमी कळताच तो इंद्रप्रस्थाला येऊन राज्य करू लागला. त्याच्या वंशातील बारा पिढयांनी १५१ वर्षे, ११ महिने व २ दिवस राज्य केले. त्याचा तपशीलः
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
१) राजा आघासेन १८ ५ २१
२) विलावलसेन १२ ४ २
३) केशवसेन १५ ७ १२
४) माधवसेन १२ ४ २
५) मयूरसेन २० ११ २७
६) भीमसेन ५ १० ९
७) कल्याणसेन ४ ८ २१
८) हरिसेन १२ ० २५
९) क्षमसंन ८ ११ १५
१०) नारायनसेन २ २ २१
११) लक्ष्मीसेन २६ १० ०
१२) दामोदर सेन ११ ५ १९
|
राजा दामोदरसेन याने आपल्या उमरावाला फार ग्रास दिला. त्यामुळे राजाचा उमराव दीपसिंह याने बंड पुकारले. त्याने राजाच्या सैन्याला आपल्याकडे वळवून घेतलेनंतर झालेल्या लढाईत राजा मारला गेला; आणि दीपसिंह स्वतः राजा बनला. त्याच्या वंशातील ६ पिढयांनी १०७ वर्षे, ६ महिने व २२ दिवस राज्य केले, त्याचा तपशील :-
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
१) पासिंह १७ १ २६
२) राजसिंह १४ ५ ०
३) रणसिंह ९ ८ ११
४) नरसिंह ४५ ० १५
५) हरिसिंह १३ २ २९
६) जीवनसिंह ८ ० १
|
राजा जीवनसिंहाने काही कारणाने आपले सर्व सैन्य उत्तरेकडे पाठविले होते. ती बातमी वैराटचा राजा पृथ्वीराज चव्हाण याला समजताच त्याने जीवनसिंहावर चढाई केली. त्या लढाईत जीवनसिंह मारला गेला; आणि पृथ्वीराज इंद्रप्रस्थाचा राजा बनला त्याच्या ५ पिढ्यांनी ८६ वर्षे व २० दिवस राज्य केले. त्याचा तपशील :-
आर्यराजा वर्षे महिने दिवस
|
१) पृथ्वीराज १२ २ १९
२) भयपाल १४ ५ १७
३) दुर्जनपाल ११ ४ १४
४) उदयपाल ११ ७ ३
५) यशपाल ३६ ४ २७
|
राजा यशपाल याच्यावर गझनीचा सुलतान शहाबुद्दीन घोरी याने स्वारी केली आणि संवत् १२४९ (इ.स. ११९२) साली राजा यशपालला पकडून प्रयागच्या किल्ल्यात कैद करून ठेवले. त्यानंतर सुलतान शहाबुद्दीन इन्द्रप्रस्थावर म्हणजे दिल्लीवर राज्य करू लागला. त्याच्या ५३ पिढ्यांनी ७४५ वर्षे, १ महिना व १७ दिवस राज्य केले. त्याचा तपशील इतिहासाच्या अनेक पुस्तकांतून दिलेला असल्याने आम्ही येथे तो लिहिलेला नाही.
यानंतर बौद्ध व जैन या पंथाविषयी आम्ही लिहिणार आहोत.
इति श्रीमदयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे
सुभाषाविभूषित आर्यावर्तीयमतखण्डनमण्डनविषय
एकादशः समुल्लासः सम्पूर्णः ॥११॥
No comments:
Post a Comment